✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खेळ दोन ओळींचा - ४

र — राघव, गुरुवार, 03/05/2009 - 15:26

प्रतिक्रिया द्या
10302 वाचन

💬 प्रतिसाद (66)

धागा आवडला !

मुक्तसुनीत
गुरुवार, 03/05/2009 - 19:11 नवीन
घाटावरचे भट, नीधप , अवलिया , मुमुक्षु , यशोधरा , यांच्या ओळी (आणि सहजरावांचा वात्रटपणा !) झकास ! .... धागा फारच सुरेख !
  • Log in or register to post comments

वा ! काय छान धागा काढलात !!!!!!!

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 03/05/2009 - 19:18 नवीन
" जस अ॑ग-अ॑ग पहिल्या सरीने मोहरून जाई" "अरे कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही"" सुहास.. आता मी "अजुन"काय करू ?
  • Log in or register to post comments

माझेही थोडे..

प्राजु
गुरुवार, 03/05/2009 - 20:08 नवीन
कदंबाची सळसळ माझ्या अंगी भिनून राही कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही!! गोकुळाचे भान सारे सूरात न्हाऊन जाई कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही!! कालिंदीचे संथ पाणी इथेच थांबून राही कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर!

राघव
Fri, 03/06/2009 - 11:12 नवीन
कालिंदीचे संथ पाणी इथेच थांबून राही.. मस्त! मोहक सुरांसाठी जग थांबुन राहतंच! :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

नभातून

चतुरंग
गुरुवार, 03/05/2009 - 20:17 नवीन
नभातून इंद्रधनू धरेवर येई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! चतुरंग
  • Log in or register to post comments

क्या बात है!

राघव
Fri, 03/06/2009 - 11:13 नवीन
नभातून इंद्रधनू धरेवर येई क्लास! :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

माझाही प्रयत्न

क्रान्ति
गुरुवार, 03/05/2009 - 20:49 नवीन
हिच्यावीण तुला दुजा छन्द कसा नाही? कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! क्रान्ति
  • Log in or register to post comments

वा !!!

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 03/05/2009 - 20:59 नवीन
हिच्यावीण तुला दुजा छन्द कसा नाही? कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! सुहास.. आता मी "अजुन"काय करू ?
  • Log in or register to post comments

ततकारले

नीधप
गुरुवार, 03/05/2009 - 22:34 नवीन
ततकारले पाउल, खाली उमलली भुई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home अवा: तत मधल्या दुसर्‍या त चा पाय मोडायचाय. कसा?
  • Log in or register to post comments

ए

जृंभणश्वान
गुरुवार, 03/05/2009 - 23:26 नवीन
वाजवू नकोस, झोपल्यात ना रे गाई, कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! कृष्ण एकदम प्रेमळ देव असल्याने त्याला अशी दटावणी चालेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

वरच्या

अनामिक
गुरुवार, 03/05/2009 - 23:55 नवीन
वरच्या बहुतांशी सगळ्यांच्याच ओळी मस्तं जमल्या आहेत. माझाही एक प्रयत्न... हृदयातले सुर तुझ्या ओठातून वाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! अनामिक
  • Log in or register to post comments

माझा एक प्रयत्न..

लवंगी
Fri, 03/06/2009 - 06:12 नवीन
वेणूनाद आर्त हाक दशदिशा प्रवाहि कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! स्वप्न-भास रात-दिस भान नुरले काही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments

वाजवू

सँडी
Fri, 03/06/2009 - 07:43 नवीन
वाजवू नकोस, झोपल्यात ना रे गाई, कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! :) छान! तत मधल्या दुसर्‍या त चा पाय मोडायचाय. कसा? तत् (tatt + Backspace )
  • Log in or register to post comments

माझ्या २ (+) ओळी ..

मनीषा
Fri, 03/06/2009 - 07:49 नवीन
कुजबुजती जन गोकुळी, रीत तीज उमगत नाही घनश्याम कृष्णाची त्या, राधा अभिसारिका होई | कशी सांग समजवू त्यांना प्रीतीची ही रीत आगळी कालींदी तटी रंगल्या, रासरंगांची कहाणी | नुरले आता माझे काही, चित्ती वसे मूर्त सावळी यमुनाजळीच्या लाटांसंगे राधा होतसे बावरी | उमलुनी येते आर्त काही भारलेल्या सुरांमधुनी धुंद, मधुर त्या लयीमध्ये झुलते मोरपीस बाई | हळू बोलती काकणे पैंजणांच्या संगे काही कृष्णा, तुझ्या बासरीला रे बंध कसा नाही |
  • Log in or register to post comments

छान!

राघव
Fri, 03/06/2009 - 11:16 नवीन
छान! मनातला भाव छान उतरलाय! थोडे आणखी लयीत बसवून नवीन कविता म्हणून प्रकाशित करा की :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

आभार :)

राघव
Fri, 03/06/2009 - 11:22 नवीन
सगळयांनीच खूप छान लिहिलेत. विशिष्ट ओळी मागे आपण त्या भावात क्षणमात्र गुंतल्याशिवाय दुसरी ओळ जमत नाही! कविता अशीच मनापासून स्फुरत असते.. तिला लयीत बसवण्याचे तेवढे छोटे काम आपले!! खेळात भाग घेतलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार :) (खेळकर)मुमुक्षु
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा