Skip to main content

खेळ दोन ओळींचा - ४

लेखक राघव यांनी गुरुवार, 05/03/2009 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मागल्यावेळी सारखाच. फक्त यावेळेस दुसरी ओळ दिलेली आहे अन् पहिली जमवायची आहे! ..... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या ओळीशी निगडीत अशीच पहिली ओळ असायला हवी! शुभेच्छा!! मुमुक्षु
लेखनविषय:

वाचने 10315
प्रतिक्रिया 66

प्रतिक्रिया

असुनी होकार, ओठात शब्द येत नाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! --अवलिया

In reply to by नीधप

ए१... सुंदर जमलीये ओळ... बिपिन कार्यकर्ते

सुर कानी पडताच भान हरपुन जाई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

सुंदर धागा.. अभिनंदन मुमुक्षूराव! तात्या.

छान चाललंय! एक प्रयत्न माझाही - वेडावते मन, काया थरारून जाई.. कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! तात्या, मन:पुर्वक धन्यवाद. :) मुमुक्षु

तुझ्या आठवणीने सुगंध बहरला अंगणामध्ये... मनातील कुपी मध्ये बहरला ... गंध प्रेमाचा अरे , कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

राधा म्हणे पुरे आता, वेळ कसा जाई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

उत्तम धागा, मुमुक्षा.... जमतंय का बघतो. बिपिन कार्यकर्ते

तुझ्या श्याम रंगी कशी रंगले गं बाई कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही

सांजभूल राधिकेला, व्याकुळल्या गायी कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही -घा.भ.

अरे वा.. छान जमलंय.. येऊ देत अजुन! :) माझा आणखी एक प्रयत्न - जीवनाची रुक्ष वाट उमलत जाई.. कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! मुमुक्षु

गोपिकांच्या मनामध्ये येते काहीबाही कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही

मोरपिसे सूर दिशा-दिशांत भरुन दाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

मोकाट सुटला दाहि दिशेने वारा.. मन मारते उतुंग भारारी आकाशी.. बासरीच्या सुरां बरोबर.. दिशेने दाहि कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

मीही एक प्रयत्न करते.. नादावलेल्या जिवाला नुरे भान काही, कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

In reply to by यशोधरा

मस्त.. हाच भाव आणण्यासाठी कधीचा मी प्रयत्न करत होतो.. पण नाही जमले! मुमुक्षु

नादखुळी झाली राधा, नुरे भान काही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! --अवलिया

तळमळतो जिव माझा सुरांमुळे कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

माझाही एक प्रयत्न : धडधडत्या उराला एक हुरहुर लावी कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! - अमृता अमित

In reply to by मिंटी

माझ्या मनात हीच भावना होती पण मला ती शब्दात पकडताच आली नाही त्यामुळे... कुठे दाहि दिशेचा वारा... तळमळ ह्या शब्दात भरकटत राहिलो =)) सुंदर मिंटे ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

पेंद्या, राधा दोघांपैकी एकही कटत नाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !

क्षणी कोण्या झाली राधा सुरांपायी वेडी कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

भान सुटे,बंध तुटे मन तुझ्यात गुंतून राही...... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! ओढ लावी, वेड लावी जीव तळमळत राही...... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! जाउ कशी, राहू कशी घरी वाट सारे पाही...... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! बेबन्द होई, बेधुंद होई सुचे न मज काही....... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !

सूर सृजन अंत जणू काल हा प्रवाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

अवांतरः - कृष्ण बासरीवर काय वाजवत असेल? १) बोल राधा बोल २) काहीतरी मेज्जर क्लासिकल ३) पीलू, खमाजासारखं काहीतरी उपशास्त्रीय ४) की पुलंच्या 'आमची वटवट' मधला कृष्ण वाजवतो तसा सरकारी कानडा?

In reply to by घाटावरचे भट

>>अवांतरः - कृष्ण बासरीवर काय वाजवत असेल? हिरो सिनेमातली जॅकी श्रॉफ वाजवतो ती धून ! -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

http://www.youtube.com/watch?v=4dQwkLgkEvw (सावधगिरीची सूचना - ७.५२ पासून पुढे बघा आधीचा तद्दम हिंदी फिल्मी भाग बघितलात तर धून येईपर्यंत चिडचिड झालेली असेल! ;) ) चतुरंग

सूर फिरे अंतरात दिशा दाही दाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! जुना बाळकराम

बासरीचा सुर.. निघतो माझ्या श्वासातून ही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

गात्र वेणु गात्र सूर अधरी तव राही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही -घा.भ.

माझा आणखी एक प्रयत्न - ओथंबिले गात्र, जीव कासावीस होई.. कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! मुमुक्षु

In reply to by राघव

तुझ्या बासरीमुळे जडला छंद मला सुरांचा कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

:) सूर तो आर्ततेचा मज अंतरंगी न्हेई, कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

हरपले भान बहरली काया मंत्रमुग्ध मन होई. अरे कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

घाटावरचे भट, नीधप , अवलिया , मुमुक्षु , यशोधरा , यांच्या ओळी (आणि सहजरावांचा वात्रटपणा !) झकास ! .... धागा फारच सुरेख !

" जस अ॑ग-अ॑ग पहिल्या सरीने मोहरून जाई" "अरे कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही"" सुहास.. आता मी "अजुन"काय करू ?

कदंबाची सळसळ माझ्या अंगी भिनून राही कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही!! गोकुळाचे भान सारे सूरात न्हाऊन जाई कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही!! कालिंदीचे संथ पाणी इथेच थांबून राही कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

कालिंदीचे संथ पाणी इथेच थांबून राही.. मस्त! मोहक सुरांसाठी जग थांबुन राहतंच! :) मुमुक्षु

नभातून इंद्रधनू धरेवर येई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! चतुरंग

हिच्यावीण तुला दुजा छन्द कसा नाही? कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! क्रान्ति

हिच्यावीण तुला दुजा छन्द कसा नाही? कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! सुहास.. आता मी "अजुन"काय करू ?

ततकारले पाउल, खाली उमलली भुई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home अवा: तत मधल्या दुसर्‍या त चा पाय मोडायचाय. कसा?

वाजवू नकोस, झोपल्यात ना रे गाई, कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! कृष्ण एकदम प्रेमळ देव असल्याने त्याला अशी दटावणी चालेल अशी आशा आहे.

वरच्या बहुतांशी सगळ्यांच्याच ओळी मस्तं जमल्या आहेत. माझाही एक प्रयत्न... हृदयातले सुर तुझ्या ओठातून वाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! अनामिक

वेणूनाद आर्त हाक दशदिशा प्रवाहि कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! स्वप्न-भास रात-दिस भान नुरले काही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

वाजवू नकोस, झोपल्यात ना रे गाई, कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! :) छान! तत मधल्या दुसर्‍या त चा पाय मोडायचाय. कसा? तत् (tatt + Backspace )

कुजबुजती जन गोकुळी, रीत तीज उमगत नाही घनश्याम कृष्णाची त्या, राधा अभिसारिका होई | कशी सांग समजवू त्यांना प्रीतीची ही रीत आगळी कालींदी तटी रंगल्या, रासरंगांची कहाणी | नुरले आता माझे काही, चित्ती वसे मूर्त सावळी यमुनाजळीच्या लाटांसंगे राधा होतसे बावरी | उमलुनी येते आर्त काही भारलेल्या सुरांमधुनी धुंद, मधुर त्या लयीमध्ये झुलते मोरपीस बाई | हळू बोलती काकणे पैंजणांच्या संगे काही कृष्णा, तुझ्या बासरीला रे बंध कसा नाही |

In reply to by मनीषा

छान! मनातला भाव छान उतरलाय! थोडे आणखी लयीत बसवून नवीन कविता म्हणून प्रकाशित करा की :) मुमुक्षु

सगळयांनीच खूप छान लिहिलेत. विशिष्ट ओळी मागे आपण त्या भावात क्षणमात्र गुंतल्याशिवाय दुसरी ओळ जमत नाही! कविता अशीच मनापासून स्फुरत असते.. तिला लयीत बसवण्याचे तेवढे छोटे काम आपले!! खेळात भाग घेतलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार :) (खेळकर)मुमुक्षु