कदंबाची सळसळ माझ्या अंगी भिनून राही
कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही!!
गोकुळाचे भान सारे सूरात न्हाऊन जाई
कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही!!
कालिंदीचे संथ पाणी इथेच थांबून राही
कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
ततकारले पाउल, खाली उमलली भुई
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
अवा: तत मधल्या दुसर्या त चा पाय मोडायचाय. कसा?
कुजबुजती जन गोकुळी, रीत तीज उमगत नाही
घनश्याम कृष्णाची त्या, राधा अभिसारिका होई |
कशी सांग समजवू त्यांना प्रीतीची ही रीत आगळी
कालींदी तटी रंगल्या, रासरंगांची कहाणी |
नुरले आता माझे काही, चित्ती वसे मूर्त सावळी
यमुनाजळीच्या लाटांसंगे राधा होतसे बावरी |
उमलुनी येते आर्त काही भारलेल्या सुरांमधुनी
धुंद, मधुर त्या लयीमध्ये झुलते मोरपीस बाई |
हळू बोलती काकणे पैंजणांच्या संगे काही
कृष्णा, तुझ्या बासरीला रे बंध कसा नाही |
सगळयांनीच खूप छान लिहिलेत.
विशिष्ट ओळी मागे आपण त्या भावात क्षणमात्र गुंतल्याशिवाय दुसरी ओळ जमत नाही!
कविता अशीच मनापासून स्फुरत असते.. तिला लयीत बसवण्याचे तेवढे छोटे काम आपले!!
खेळात भाग घेतलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार :)
(खेळकर)मुमुक्षु
धागा आवडला !
वा ! काय छान धागा काढलात !!!!!!!
माझेही थोडे..
सुंदर!
नभातून
क्या बात है!
माझाही प्रयत्न
वा !!!
ततकारले
ए
वरच्या
माझा एक प्रयत्न..
वाजवू
माझ्या २ (+) ओळी ..
छान!
आभार :)