✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

खेळ दोन ओळींचा - ४

र — राघव, गुरुवार, 03/05/2009 - 15:26

प्रतिक्रिया द्या
10302 वाचन

💬 प्रतिसाद (66)

असुनी

अवलिया
गुरुवार, 03/05/2009 - 15:35 नवीन
असुनी होकार, ओठात शब्द येत नाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! --अवलिया
  • Log in or register to post comments

कुण्या

नीधप
गुरुवार, 03/05/2009 - 15:46 नवीन
कुण्या अस्तुरीची काया उगी हरखून जाई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

वाहवा!! खूप

राघव
गुरुवार, 03/05/2009 - 16:02 नवीन
वाहवा!! खूपच छान :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

ए१

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/05/2009 - 16:19 नवीन
ए१... सुंदर जमलीये ओळ... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

ओहो.. धन्स

नीधप
गुरुवार, 03/05/2009 - 16:21 नवीन
ओहो.. धन्स मुमुक्षु, धन्स बिका! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सुर कानी

मदनबाण
गुरुवार, 03/05/2009 - 15:46 नवीन
सुर कानी पडताच भान हरपुन जाई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
  • Log in or register to post comments

सुंदर

विसोबा खेचर
गुरुवार, 03/05/2009 - 15:47 नवीन
सुंदर धागा.. अभिनंदन मुमुक्षूराव! तात्या.
  • Log in or register to post comments

छान

राघव
गुरुवार, 03/05/2009 - 16:07 नवीन
छान चाललंय! एक प्रयत्न माझाही - वेडावते मन, काया थरारून जाई.. कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! तात्या, मन:पुर्वक धन्यवाद. :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

तुझ्या

दशानन
गुरुवार, 03/05/2009 - 16:18 नवीन
तुझ्या आठवणीने सुगंध बहरला अंगणामध्ये... मनातील कुपी मध्ये बहरला ... गंध प्रेमाचा अरे , कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

अवघड आहे :-(

सहज
गुरुवार, 03/05/2009 - 16:12 नवीन
राधा म्हणे पुरे आता, वेळ कसा जाई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments

सहजरावांन

अवलिया
गुरुवार, 03/05/2009 - 16:23 नवीन
सहजरावांना वेळ घालवायची चिंता पडली? --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

उत्तम

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/05/2009 - 16:17 नवीन
उत्तम धागा, मुमुक्षा.... जमतंय का बघतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

माझाही कृष्ण !!

जयवी
गुरुवार, 03/05/2009 - 16:27 नवीन
तुझ्या श्याम रंगी कशी रंगले गं बाई कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही
  • Log in or register to post comments

सांजभूल

घाटावरचे भट
गुरुवार, 03/05/2009 - 16:33 नवीन
सांजभूल राधिकेला, व्याकुळल्या गायी कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही -घा.भ.
  • Log in or register to post comments

वाह!

राघव
गुरुवार, 03/05/2009 - 16:35 नवीन
खूपच छान! :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

वा... -

नीधप
गुरुवार, 03/05/2009 - 16:41 नवीन
वा... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

सुंदर!!!!!! बि

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/05/2009 - 19:39 नवीन
सुंदर!!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

अरे वा.. छान

राघव
गुरुवार, 03/05/2009 - 16:34 नवीन
अरे वा.. छान जमलंय.. येऊ देत अजुन! :) माझा आणखी एक प्रयत्न - जीवनाची रुक्ष वाट उमलत जाई.. कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! मुमुक्षु
  • Log in or register to post comments

काहीबाही

विसुनाना
गुरुवार, 03/05/2009 - 16:43 नवीन
गोपिकांच्या मनामध्ये येते काहीबाही कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही
  • Log in or register to post comments

मनी रूजे

नीधप
गुरुवार, 03/05/2009 - 16:43 नवीन
मनी रूजे सूर, घुमे चांदणे या देही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

मोरपिसे

झेल्या
गुरुवार, 03/05/2009 - 16:46 नवीन
मोरपिसे सूर दिशा-दिशांत भरुन दाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

मोकाट

दशानन
गुरुवार, 03/05/2009 - 16:50 नवीन
मोकाट सुटला दाहि दिशेने वारा.. मन मारते उतुंग भारारी आकाशी.. बासरीच्या सुरां बरोबर.. दिशेने दाहि कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

मीही एक

यशोधरा
गुरुवार, 03/05/2009 - 16:50 नवीन
मीही एक प्रयत्न करते.. नादावलेल्या जिवाला नुरे भान काही, कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments

सुंदर!

राघव
गुरुवार, 03/05/2009 - 16:53 नवीन
मस्त.. हाच भाव आणण्यासाठी कधीचा मी प्रयत्न करत होतो.. पण नाही जमले! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वा!! -

नीधप
गुरुवार, 03/05/2009 - 16:57 नवीन
वा!! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

धन्यवाद

यशोधरा
गुरुवार, 03/05/2009 - 16:55 नवीन
धन्यवाद मुमुक्षुजी..
  • Log in or register to post comments

नादखुळी

अवलिया
गुरुवार, 03/05/2009 - 16:57 नवीन
नादखुळी झाली राधा, नुरे भान काही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! --अवलिया
  • Log in or register to post comments

मस्त!

राघव
गुरुवार, 03/05/2009 - 16:59 नवीन
क्लास जमलंय! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

क्या बात

जयवी
गुरुवार, 03/05/2009 - 17:16 नवीन
क्या बात है !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

तळमळतो जिव

दशानन
गुरुवार, 03/05/2009 - 16:58 नवीन
तळमळतो जिव माझा सुरांमुळे कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

माझाही एक

मिंटी
गुरुवार, 03/05/2009 - 17:03 नवीन
माझाही एक प्रयत्न : धडधडत्या उराला एक हुरहुर लावी कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! - अमृता अमित
  • Log in or register to post comments

+१

दशानन
गुरुवार, 03/05/2009 - 17:04 नवीन
माझ्या मनात हीच भावना होती पण मला ती शब्दात पकडताच आली नाही त्यामुळे... कुठे दाहि दिशेचा वारा... तळमळ ह्या शब्दात भरकटत राहिलो =)) सुंदर मिंटे ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी

दुहेरी प्रभाव - गोची

सहज
गुरुवार, 03/05/2009 - 17:06 नवीन
पेंद्या, राधा दोघांपैकी एकही कटत नाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !
  • Log in or register to post comments

क्षणी

यशोधरा
गुरुवार, 03/05/2009 - 17:34 नवीन
क्षणी कोण्या झाली राधा सुरांपायी वेडी कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments

माझाही एक प्रयत्न :

sanjubaba
गुरुवार, 03/05/2009 - 17:35 नवीन
भान सुटे,बंध तुटे मन तुझ्यात गुंतून राही...... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! ओढ लावी, वेड लावी जीव तळमळत राही...... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! जाउ कशी, राहू कशी घरी वाट सारे पाही...... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! बेबन्द होई, बेधुंद होई सुचे न मज काही....... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !
  • Log in or register to post comments

छान.. जाउ

राघव
गुरुवार, 03/05/2009 - 18:01 नवीन
छान.. जाउ कशी, राहू कशी घरी वाट सारे पाही...... ही ओळ सुंदर! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanjubaba

किती सुंदर !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/05/2009 - 20:56 नवीन
जाउ कशी, राहू कशी घरी वाट सारे पाही...... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanjubaba

अजून एक प्रयत्नः

झेल्या
गुरुवार, 03/05/2009 - 17:36 नवीन
सूर सृजन अंत जणू काल हा प्रवाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

अवांतर

घाटावरचे भट
गुरुवार, 03/05/2009 - 17:54 नवीन
अवांतरः - कृष्ण बासरीवर काय वाजवत असेल? १) बोल राधा बोल २) काहीतरी मेज्जर क्लासिकल ३) पीलू, खमाजासारखं काहीतरी उपशास्त्रीय ४) की पुलंच्या 'आमची वटवट' मधला कृष्ण वाजवतो तसा सरकारी कानडा?
  • Log in or register to post comments

>>अवांतरः -

लिखाळ
गुरुवार, 03/05/2009 - 21:55 नवीन
>>अवांतरः - कृष्ण बासरीवर काय वाजवत असेल?<< हिरो सिनेमातली जॅकी श्रॉफ वाजवतो ती धून ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

ही धून म्हणताहेत लिखाळ!

चतुरंग
गुरुवार, 03/05/2009 - 22:16 नवीन
http://www.youtube.com/watch?v=4dQwkLgkEvw (सावधगिरीची सूचना - ७.५२ पासून पुढे बघा आधीचा तद्दम हिंदी फिल्मी भाग बघितलात तर धून येईपर्यंत चिडचिड झालेली असेल! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

हीच ती धून..

लिखाळ
गुरुवार, 03/05/2009 - 22:23 नवीन
हीच ती धून.. आहे की नाही भारी :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

माझाही एक प्रयत्न.

दत्ता काळे
गुरुवार, 03/05/2009 - 17:54 नवीन
सूर फिरे अंतरात दिशा दाही दाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! जुना बाळकराम
  • Log in or register to post comments

पहिल्यांदाच प्रयत्न करतोय....चु.भु.दे.घे.

सँडी
गुरुवार, 03/05/2009 - 18:07 नवीन
मन बावरे माझे आता आतुर होई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !
  • Log in or register to post comments

बासरीचा

दशानन
गुरुवार, 03/05/2009 - 18:09 नवीन
बासरीचा सुर.. निघतो माझ्या श्वासातून ही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

गात्र वेणु

घाटावरचे भट
गुरुवार, 03/05/2009 - 18:15 नवीन
गात्र वेणु गात्र सूर अधरी तव राही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही -घा.भ.
  • Log in or register to post comments

छान रंगलाय खेळ!

राघव
गुरुवार, 03/05/2009 - 18:28 नवीन
माझा आणखी एक प्रयत्न - ओथंबिले गात्र, जीव कासावीस होई.. कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! मुमुक्षु
  • Log in or register to post comments

तुझ्या

दशानन
गुरुवार, 03/05/2009 - 18:31 नवीन
तुझ्या बासरीमुळे जडला छंद मला सुरांचा कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

सूर तो

उर्मिला००
गुरुवार, 03/05/2009 - 18:44 नवीन
:) सूर तो आर्ततेचा मज अंतरंगी न्हेई, कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments

हरपले

मराठमोळा
गुरुवार, 03/05/2009 - 19:03 नवीन
हरपले भान बहरली काया मंत्रमुग्ध मन होई. अरे कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा