Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 09/19/2017 - 18:29
मित्रहो ! जर आपल्याला शेजार्‍याच्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा अतोनात त्रास होत असेल तर काय करावे ? कुठे तक्रार करावी? पुण्यात कोठे करावी ? मी असे ऐकले आहे की या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही. हे खरे आहे का? या बाबतीत काय कायदे आहेत ? ते सगळे कुत्री पाळणार्‍यांच्या बाजूनेच आहेत का ? कोणाला या बाबतीत अनुभव असेल तर जरूर येथे लिहा. मी सध्या या त्रासातून जात आहेत म्हणून हा विषय चर्चेला मांडला आहे. यावर असा धागा पूर्वी आला असेल व त्यावर ही चर्चा झाली असेल तर त्याची लिंक मला दिलीत तर बरं होईल. मग हा धागा उडवता येऊ शकेल. आमच्या मागे एक बाई राहते. तिच्याकडे दोन कुत्री आहेत. ती बिलकूल शिकवलेली नाहीत. शिवाय ती म्हणते की ती अ‍ॅनिमल वेलफेअर ऑफिसर आहे. सरकारी नेमणूक आहे. जयंत कुलकर्णी.
  • Log in or register to post comments
  • 38097 views

प्रतिक्रिया

Submitted by उपेक्षित on Wed, 09/20/2017 - 20:22

Permalink

आज गवी वेगळ्याच मूड मध्ये

आज गवी वेगळ्याच मूड मध्ये वाटत आहेत, कुठ नेऊन ठेवले आमचे ते प्रगल्भ आणि दिलखुलास गवी ? :)
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on गुरुवार, 09/21/2017 - 11:54

Permalink

माझा पण एक प्रश्न — पाळीव

माझा पण एक प्रश्न — पाळीव कुत्र्याला नैसर्गिक विधी रस्त्यावर करायला लावून ती घाण तशीच ठेवून जाणार्या लोकांंची तक्रार करता येते का?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 09/21/2017 - 14:45

Permalink

दारात कोणीही पाय ठेवलेला

दारात कोणीही पाय ठेवलेला बघितला की बेंबीच्या देठापासनं केकाटणारं शेजार्‍यांचं कुत्रं पाह्यलं आणि या प्राण्याबद्दल कधीही दया वैगरे वाटली नाही. असतील माया लावणारी कुत्री जगात पण अजून पाह्यली नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 09/21/2017 - 18:45

In reply to दारात कोणीही पाय ठेवलेला by सूड

Permalink

या एकदा घरी.

या एकदा घरी.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 09/21/2017 - 18:59

In reply to या एकदा घरी. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

तुमचा कुत्रा शार्ट टेम्पर आहे

तुमचा कुत्रा शार्ट टेम्पर आहे म्हणे.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 09/21/2017 - 19:02

In reply to तुमचा कुत्रा शार्ट टेम्पर आहे by सूड

Permalink

म्हणुनचं बोलावतोय. शॉर्ट

म्हणुनचं बोलावतोय. शॉर्ट टेंपर असला तरी तो बाहेरच्यांसाठी. चुकुन स्वतःहुन जाउन कोणाला त्रास देणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 09/22/2017 - 12:03

In reply to या एकदा घरी. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

या एकदा घरी.

चिमण , घरी बोलवून कुत्रा अन्गावर सोडतो ! कालच तो कुत्र्याला उद्या तुझ्यासाठी नवीन खाऊ आणणार असे सान्गत होता :)
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Mon, 09/25/2017 - 18:02

In reply to या एकदा घरी. by कपिलमुनी

Permalink

hahaha .!!

hahaha .!!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 10/10/2017 - 14:59

In reply to या एकदा घरी. by कपिलमुनी

Permalink

मी त्याच्या कुत्र्याला एका

मी त्याच्या कुत्र्याला एका दिवसाचं खाणं म्हणून तरी पुरेन का अशी शंका आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on गुरुवार, 09/21/2017 - 22:03

Permalink

भटक्या कुत्र्यांच्या आवाज ऐकत

भटक्या कुत्र्यांच्या आवाज ऐकत झोपायची सवय आहे, आणि कुत्री नसलेल्या ठिकाणी गेलात तर झोप येत नाही तरी पण भुंकणारी कुत्री न बाळगण्याबद्दल मी माझ्या शेजार्‍यांचा आभारी आहे हेही तेवढेच खरे.
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Fri, 09/22/2017 - 17:25

Permalink

जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात

जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात जाऊन तुम्ही संबंधित विभागात तक्रार करू शकता याशिवाय आणखी एक गोष्ट करा ती म्हणजे पोलीस स्टेशन ला आणि मॅजिस्टेट ला अर्ज करून १३३ CRPC नोंदवून त्या महिलेला नोटीस पाठवा.
  • Log in or register to post comments

Submitted by रुपी on Sat, 09/23/2017 - 05:49

In reply to जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात by मालोजीराव

Permalink

काकांच्या कथेतील पात्रे खरी

काकांच्या कथेतील पात्रे खरी होऊन प्रतिसादसुद्धा द्यायला लागली! ह. घ्या. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by हरवलेला on Mon, 09/25/2017 - 00:40

In reply to काकांच्या कथेतील पात्रे खरी by रुपी

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Mon, 09/25/2017 - 10:33

In reply to काकांच्या कथेतील पात्रे खरी by रुपी

Permalink

काकांच्या कथेतील पात्रे खरी

काकांच्या कथेतील पात्रे खरी होऊन प्रतिसादसुद्धा द्यायला लागली!
मिपावर नवीन दिसताय :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Mon, 09/25/2017 - 12:37

In reply to काकांच्या कथेतील पात्रे खरी by मालोजीराव

Permalink

काय सांगता ....

काय सांगताय मालोजीराजे! जयंतराव मिपाकरांवर बेतलेल्या कथा लिहितात की काय? ;-) माझा नंबर केंव्हा लागतोयसं झालंय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by Abheeshek on Sat, 09/23/2017 - 23:41

Permalink

इतके उपाय..?? गावाकडचा.. ऐक उपाय आहे...

कुत्र्याच्या वरून आठवलं.. गावाकडे अशी कुत्री शोधून ठेवायची न रात्री.. अशी काही दगड मारायची की गाव त्याच्या आवाजाने ( व्हिवळन्याने) जाग व्हायचं ... .. न मग गुपचुप तिथून फरार व्हायचं..... पण शहरात risky आहे...
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Sun, 09/24/2017 - 00:13

In reply to इतके उपाय..?? गावाकडचा.. ऐक उपाय आहे... by Abheeshek

Permalink

घरातल्या कुत्र्यांना दगड कसा

घरातल्या कुत्र्यांना दगड कसा मारणार ?
  • Log in or register to post comments

Submitted by Abheeshek on Sun, 09/24/2017 - 19:22

In reply to घरातल्या कुत्र्यांना दगड कसा by मराठी कथालेखक

Permalink

हा एक मोठाच प्रश्न आहे..

त्यातल्या त्यात ती बाई एक pet ऑफीसर आहे त्यामुळे असे काही करणे आपल्याला महागात पडू शकते त्यामुळे आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब केलेला कधीही बरा...
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Sun, 09/24/2017 - 23:39

In reply to हा एक मोठाच प्रश्न आहे.. by Abheeshek

Permalink

बरोबर आहे. आणि कायदेशीर तोडगा

बरोबर आहे. आणि कायदेशीर तोडगा समाजाला दीर्घ काळ उपयोगी पडू शकतो (अशा केसचा पुढेही अनेकजण संदर्भ घेवू शकतात) कायदेशीर तोडगा निघण्यास वेऴ लागेल पण तोडगा निघू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sun, 09/24/2017 - 08:05

Permalink

मला तर,

भुंकणाऱ्या कुत्र्यपेक्षा भुंकणारे शेजारी जास्त खतरनाक वाटतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Fri, 10/06/2017 - 10:16

Permalink

भटक्या कुत्र्यांबद्द्ल एक

भटक्या कुत्र्यांबद्द्ल एक पत्र http://epaper.loksatta.com/1383793/loksatta-pune/06-10-2017#page/6/2 त्यात एक प्रश्न असा विचारला आहे की " श्वान प्रेमि लोक भटकी कुत्री दत्तक घेउन का पाळत नाहीत ?"
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 10/06/2017 - 14:45

Permalink

त्रास

त्रास कमी झाला का ? काय उपाय केलात ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 02/14/2018 - 12:34

Permalink

तुम्हाला जसा कुत्र्यांच्या

तुम्हाला जसा कुत्र्यांच्या भुंकण्याचा त्रास होतो तसा मला इथे मुलांच्या ( विशेषतः मुलींच्या) बेंबीच्या देठापासून किंचाळत खेळण्याचा त्रास होतो. ११ मजली इमारतीत कॉमन रेस्क्यू टेरेस ८ व्या मजल्यावर आहे त्यामुळे खाली ड्क्ट जवळ एक पोकळी तयार होते व तळमजल्यावर लिफ्ट पाशी किंचाळलेले आवाज मल्टिप्लाय होउन मोठे ध्वनीप्रदूषण होते व त्याचा त्रास खालच्या मजल्यावरील शांतताप्रेमी लोकांना होतो. घरात टीव्हि सुद्धा नीट पहाता येत नाही एकाग्रतेची कामे करता येत नाहीत.. सोसायटीत तक्रार करुन झाली. अनेकदा शांतपणे व ओरडून सांगून झाले. कॉम्प्लेक्स ची जनता वसाहत झालीये. सार्वजनिक स्वच्छता सार्वजनिक शांतता व सार्वजनिक शिस्त बाळगा व आपल्या सोसायटीचे सौंदर्य जपा हे सुसंस्कृतांना सांगूनही काही उपयोग होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 02/14/2018 - 13:31

In reply to तुम्हाला जसा कुत्र्यांच्या by प्रकाश घाटपांडे

Permalink

सोसायतीतल्या जाणत्यांनी एकत्र

सोसायतीतल्या जाणत्यांनी एकत्र येऊन कारवाई करुन असा हिसका दाखवा पोरांना की यापुढे मोठ्ठा आवाजच काय, नुसता तोंडातून ब्रही फुटू नये. अभ्यास करत बसतील गपगार. यथावकाश मोठी होऊन आयुष्याच्या थपडांनी कायमची गपचीप होतीलच ती. :-) उगाच फुकाची बालऊर्जा आहे ती. वेळीच रोखलेली बरी ..
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Wed, 02/14/2018 - 13:36

In reply to सोसायतीतल्या जाणत्यांनी एकत्र by गवि

Permalink

कुत्र्यांचा

कुत्र्यांचा विषयावर धागा आला की गवि तिरकस हळवे होतात असे निरिक्षण नोंदवून खाली बसतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 02/14/2018 - 13:45

In reply to कुत्र्यांचा by धर्मराजमुटके

Permalink

लहान पोरांना "कमी आवाज करा"

लहान पोरांना "कमी आवाज करा" "मर्यादेत ओरडा" अशी शिस्त लावणं म्हणजे काय प्रकार असतो हे खरोखर विवादास्पद आहे. फक्त तेच वय असतं जेव्हा बिचारा मनुष्यप्राणी "खच्चून" ओरडतो. आता समाजात राहण्याचं शिक्षण किती वयात कंपलसरी करावं याचे त्या त्या सोसायटीचे नियम आपण कोण ठरवणार असा रास्त मुद्दा आहेच. डिपेंडस ऑन टॉलरेंस. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 02/14/2018 - 15:19

In reply to लहान पोरांना "कमी आवाज करा" by गवि

Permalink

घाटपांडेकाकांना ओळखत असल्याने

घाटपांडेकाकांना ओळखत असल्याने त्यांचे शंभर नंबरी भूभूप्रेम माहीत आहे. ते त्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचा उपरोक्त लहान मुलांविषयीचा प्रतिसाद हा उपरोधिक किंवा सूचक आहे असं समजून पुढे लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 02/14/2018 - 16:22

In reply to घाटपांडेकाकांना ओळखत असल्याने by गवि

Permalink

नाही नाही उपरोधिक नाही. खरच

नाही नाही उपरोधिक नाही. खरच इथे असे आहे. मुलांना खेळायला बाग व मोकळी स्पेस आहे इथे. ओपन स्पेस मधे आवाज हवेत जातो. तिथे खेळले तर त्रास होत नाहि. बंदिस्त जागेत तो खूपच मोठा होतो. तसेच किंचाळण्याची फ्रेक्वेन्सी पिच हे हाय असते. पहिल्या मजल्यावर एक भुभु आहे ते कंटिन्युअस ओरडते. पण भुभुंना माझ्याविषयी व मला भुभुंविषयी प्रेम असल्याने माझा मेंदु ते सहजपणे सहन करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on गुरुवार, 02/15/2018 - 07:09

In reply to नाही नाही उपरोधिक नाही. खरच by प्रकाश घाटपांडे

Permalink

ओपन स्पेस मधे आवाज हवेत जातो.

ओपन स्पेस मधे आवाज हवेत जातो. >> नाही जात. आमच्या फ्लॅटसमोरच मोठी पब्लिक बाग आहे. रविवारी पाहटे ६लाच तिथे पोरं येऊन गोंधळ घालायला चालू करतात. तिथली घसरगुंडी रोल होणाऱ्या प्लास्टीकची बनलीय. तिचापण इतका खर्रर्रर्रर्रर आवाज येतो. मला वाटतं आजकाल बिल्डिंगच्या अकॉस्टिकचाच काहीतरी प्रॉब्लेम असतो. फ्लॅटची उंची कमी (फ्लोअर टू फ्लोअर १० फूट) असल्याने आवाज घुमत असेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 02/15/2018 - 10:07

In reply to ओपन स्पेस मधे आवाज हवेत जातो. by एमी

Permalink

तुलनेने म्हणतोय मी

मी बंदिस्त जागेत घुमणार्‍या आवाजाच्या तुलनेने म्हणतोय. बाकी तुमचा बिल्डिंग्च्या अ‍ॅकॉस्टिक चा मुद्दा नोंदनीय आहे. हा विचार आर्किटेक्ट बिल्डर लोकांनी केला पाहिजे. आठव्या मजल्यावरील रेस्क्यू टेरेस मुळे इमारतीचे दोन भाग होतात . एक वरचाअ आठव्या मजल्या पुढिल व दुसरा खालील.बरेचसे लोक बहुमजली कॉम्प्लेक्स मधे नवीनच राहायला आले असतात. त्यांची मानसिकता ही जुनीच असते त्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात. बिल्डर च्या दृष्टीने तळमजल्यावर वा लॉबी मधे मुलांनी असे खेळणे अभिप्रेतच नसते. त्याने त्यासाठी चिल्ड्र्न्स पार्क एरिया दिलेला असतो. ध्वनिप्रदूषण करणार्‍या लोकांना आपण ते करतोय याचे भान नसते. तसेच काही लोक जसे शांतता प्रिय असतात तसे काही गोंगाटप्रिय असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on गुरुवार, 02/15/2018 - 10:59

In reply to तुलनेने म्हणतोय मी by प्रकाश घाटपांडे

Permalink

मी बंदिस्त जागेत घुमणार्या

मी बंदिस्त जागेत घुमणार्या आवाजाच्या तुलनेने म्हणतोय. >> हम्म. असेल कदाचित. बाकी तुमचा बिल्डिंग्च्या अॅकॉस्टिक चा मुद्दा नोंदनीय आहे. हा विचार आर्किटेक्ट बिल्डर लोकांनी केला पाहिजे. >> आमच्याच असे नाही. पुण्यातल्या सगळ्या नवीन इमारतीत हीच उंची असते. त्याऐवजी मी एक बदलापूरचा फ्लॅट बघितलेला त्याची उंची जास्त वाटत होती. 'रेस्क्यू टेरेस' पहिल्यांदाच ऐकलं. कशासाठी असतं ते? बरेचसे लोक बहुमजली कॉम्प्लेक्स मधे नवीनच राहायला आले असतात. त्यांची मानसिकता ही जुनीच असते त्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात. बिल्डर च्या दृष्टीने तळमजल्यावर वा लॉबी मधे मुलांनी असे खेळणे अभिप्रेतच नसते. त्याने त्यासाठी चिल्ड्र्न्स पार्क एरिया दिलेला असतो. ध्वनिप्रदूषण करणार्या लोकांना आपण ते करतोय याचे भान नसते. तसेच काही लोक जसे शांतता प्रिय असतात तसे काही गोंगाटप्रिय असतात. >> सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on गुरुवार, 02/15/2018 - 11:10

In reply to मी बंदिस्त जागेत घुमणार्या by एमी

Permalink

'रेस्क्यू टेरेस' पहिल्यांदाच

'रेस्क्यू टेरेस' पहिल्यांदाच ऐकलं. कशासाठी असतं ते?
आठ मजल्यांपेक्षा जास्त माजले असणाऱ्या सगळ्या इमारतींना ८ व्या मजल्यावर एक ठराविक क्षेत्रफळाची (नक्की माहित नाही किती ते पण ४ फ्लॅट च्या मजल्यावर २ फ्लॅट हे पहिले आहे) जागा रिकामी सोडणे (म्हणजे टेरेस सारखी) बंधनकारक आहे. मला वाटतं जनरली "रेफ्युजी एरिया" असं म्हणतात. ८ व्याच्या वरच्या मजल्यावर काही दुर्घटना झाली तर लोकांना जमा होण्यासाठी हि जागा सोडत असावेत बहुतेक जेणेकरून फायर ब्रिगेड वगैरे लोकांना रेस्क्यू करणे सोपे जावे.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on गुरुवार, 02/15/2018 - 13:39

In reply to 'रेस्क्यू टेरेस' पहिल्यांदाच by बिटाकाका

Permalink

अच्छा धन्यवाद.

अच्छा धन्यवाद. आमच्या एरियात त्याला 8th floor garden flats म्हणून विकत होते. तो आणि त्याच्या वरचे मजले जास्त रेट. फक्त तुमच्यासाठी ही बाग आहे वगैरे :D ही जुनी माहिती. आता रिअल इस्टेट मार्केट कोसळल्यावरच माहित नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश पाटील on Wed, 02/14/2018 - 14:41

Permalink

आमच्या मागे एक बाई राहते.

आमच्या मागे एक बाई राहते. तिच्याकडे दोन कुत्री आहेत. ती बिलकूल शिकवलेली नाहीत
त्यांना शाळेत घातले तर प्रश्न सुटेल कदाचित.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 02/14/2018 - 16:31

Permalink

सध्या आम्हाला आमच्याच

सध्या आम्हाला आमच्याच कुत्र्याच्या भुंकण्याचा त्रास होतो आहे. आम्ही त्याला चार टाईम चमचमीत खायला घालतो. चिकन म्हणू नका अंडी म्हणू नका, डॉग फूड उच्च कंपनीचे (पेडिग्रीला आमचा कुत्रा तोंड लावत नाही. आधी वेंकीज खायचा. ती कंपनी बंद झाल्यावर दुसऱ्या तत्सम कंपनीचे देतो) . आम्ही दिवसभर नसतो तेव्हा शांत असतो. संध्याकाळी मी नि मुलगा आलो की त्याला पाच दहा मिनिट खेळवून गोंजारून मगच आपल्या कामाला लागतो. मुलगा दहा पंधरा मिनिटे मोकळे सोडून खेळवतो. पण आम्ही घरात पाय टाकला की तो जो भुंकणे चालू करतो ते किमान एक तास थांबत नाही. या कालावधीत आम्हाला एकमेकांशी बोलणे, फोनवर बोलणे, इतकेच काय, एकाग्र चित्ताने कशाचाही विचार करणेही अशक्य होते. त्याची खायची वेळ झाली की खाणे समोर ठेवेपर्यंत सुद्धा त्याला दम नसतो. सतत वेगवेगळ्या सुरात भुंकणे. काय करावे ?
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 02/14/2018 - 23:21

In reply to सध्या आम्हाला आमच्याच by सस्नेह

Permalink

आम्ही घरात पाय टाकला की

शीर्षासन करून हातावर चालत या !
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 02/15/2018 - 10:15

In reply to आम्ही घरात पाय टाकला की by कपिलमुनी

Permalink

सज्जड

दम द्या मिपावरच्या नवकविता आणि राजकारणी धागे प्रतिसाद सहीत वाचवून दाखविले जातील म्हणून!!!! तो भुंकणे सुद्धा मौनात करायला शिकेल. आणि तुम्ही एखाद्या खुसखुशीत लेख रांधायला घ्याल. अखिल मिपा हसतं खेळतं ठेवा आणि ठेवण्यासाठी सदोदित प्रयत्न करा या संघाच्या किरकोळ मागणी पत्रातून साभार
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 02/15/2018 - 15:05

In reply to सज्जड by नाखु

Permalink

:)

अखिल मिपा हसतं खेळतं ठेवा
आहेच मिपा हसतं खेळतं :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com