Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 09/19/2017 - 18:29
मित्रहो ! जर आपल्याला शेजार्‍याच्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा अतोनात त्रास होत असेल तर काय करावे ? कुठे तक्रार करावी? पुण्यात कोठे करावी ? मी असे ऐकले आहे की या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही. हे खरे आहे का? या बाबतीत काय कायदे आहेत ? ते सगळे कुत्री पाळणार्‍यांच्या बाजूनेच आहेत का ? कोणाला या बाबतीत अनुभव असेल तर जरूर येथे लिहा. मी सध्या या त्रासातून जात आहेत म्हणून हा विषय चर्चेला मांडला आहे. यावर असा धागा पूर्वी आला असेल व त्यावर ही चर्चा झाली असेल तर त्याची लिंक मला दिलीत तर बरं होईल. मग हा धागा उडवता येऊ शकेल. आमच्या मागे एक बाई राहते. तिच्याकडे दोन कुत्री आहेत. ती बिलकूल शिकवलेली नाहीत. शिवाय ती म्हणते की ती अ‍ॅनिमल वेलफेअर ऑफिसर आहे. सरकारी नेमणूक आहे. जयंत कुलकर्णी.
  • Log in or register to post comments
  • 38097 views

प्रतिक्रिया

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 09/19/2017 - 18:46

Permalink

एखाद्याला सुपारी द्या कुत्रे

एखाद्याला सुपारी द्या कुत्रे गायब करण्याची. हा प्रभावी ऊपाय! माझ्या हाँस्टेल मध्ये ही कुणीतरी पाळल होत. ते कुत्रं कुणाच्याही रूम मध्ये घुसायचं, घाण करायचं. शेवटी एका काम करनार्याला सुपारी दीली. त्यानंतर कधीच ते कुत्रं पुन्हा दिसलं नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 09/19/2017 - 18:57

In reply to एखाद्याला सुपारी द्या कुत्रे by अमरेंद्र बाहुबली

Permalink

अवांतर : यावरून आठवलं की ....

यावरून आठवलं की माझ्या हॉस्टेलवर असंच भटकं कुत्रं पडीक राहायचं. शेवटी त्याला अडगळीच्या खोलीत नेलं आणि तिथेच दोन दिवस कोंडून ठेवलं. तिसऱ्या दिवशी दार उघडल्यावर जी धूम ठोकली त्याने की नंतर परत दिसलंच नाही. मात्र हा उपाय जयंतरावांच्या शेजारच्या कुत्र्याला लागू पडेलसं दिसंत नाही. -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Tue, 09/19/2017 - 18:52

Permalink

एकलव्याने केला होता यशस्वी

एकलव्याने केला होता यशस्वी प्रयोग, परंतू त्याला अंगठा गमवावा लागला होता. अंगठा हा मोठा 'आधार 'आहे आपल्यासाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 09/19/2017 - 18:53

Permalink

कृपया अवांतर नको.

कृपया अवांतर नको.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 09/19/2017 - 18:59

In reply to कृपया अवांतर नको. by जयंत कुलकर्णी

Permalink

चुकून टाकलं हो अवांतर.

चुकून टाकलं अवांतर. क्षमा असावी. -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 09/19/2017 - 19:19

In reply to चुकून टाकलं हो अवांतर. by गामा पैलवान

Permalink

अवांतर तुम्हाला नाही आहे हो.

अवांतर तुम्हाला नाही आहे हो. दोन्ही प्रतिक्रियेतील वेळ पहा. आणी हा सुपारीवाला उपाय एकदम प्रभावी आहे. हा उपाय जरूर लागु पडेल. ह्या विषयात एकतर लोकांची सहानुभूती कुत्र्याला मिळते. मुकं जनावर वैगेरे! त्यामुळे सरळ मार्गाने जाऊन उपयोग नाही. ऊगाच सर्व गावाला माहीत पडेल की जयंत साहेबांना कुत्र्याचा त्रास आहे नंतर कुत्रं नाहीसं झालं तरी सर्व लोकं ह्यांच्यावरच संशय घेतील. त्यामुळे गुपचुप कुत्रं नाहीसं केलं तर कोणालाच समजणारं नाही.वरून नंतर त्या बाईला सहानुभूती द्यायची. "इथे कुत्रे टिकतचं नाही." त्यामुळे ती देखील नंतर कुत्रे पाळणार नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Tue, 09/19/2017 - 19:39

In reply to अवांतर तुम्हाला नाही आहे हो. by अमरेंद्र बाहुबली

Permalink

पाळलेली कुत्री कशी नाहिशी

पाळलेली कुत्री कशी नाहिशी करणार ? घरात जावून चोरावीच लागतील की
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 09/19/2017 - 20:23

In reply to पाळलेली कुत्री कशी नाहिशी by मराठी कथालेखक

Permalink

ते करणारे बरोबर करतील. फक्त

ते करणारे बरोबर करतील. फक्त योग्य व्यक्ती निवडायचा.बाकी काम त्या व्यक्तीच! आणी अशी व्यक्ती आपल्या अवतीभवती नक्की मिळते. फक्त आपण त्याच्यातले "गुण" ओळखा. हे शक्य नसेल तर वकील, कोर्टकचेरी, नियमअटी, महापालिका वैगेरे आहेच. त्या आधी "ट्राय करणे मे क्या जाता हेै?" हे सगळं मी याकरिता सांगतोय की माझ्या घराकडे ही असचं घडलेलं. त्रास होणार्या व्यक्तीने खुप प्रयत्न केले. पण त्या कुत्र्याचं काहीच वाकडं झालं नाही. शेवटी त्या काकांनी माझ्या मित्राला सुपारी दिली. आणी कधीच जाँगींगला न जाणारा मित्र त्या दिवशी जाँगींग ला गेला......;-)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Tue, 09/19/2017 - 19:11

Permalink

तुमची समस्या रास्त आहे.

तुमची समस्या रास्त आहे. वेगवेगळ्या प्रकारे मार्ग काढता येईल. तुमच्या स्वभावानुसार तुम्ही योग्य वाटेल तो उपाय निवडा. (तुम्ही त्या बाईशी आधीच बोलला असणार पण तिने दाद दिली नाही असे गृहीत धरुन तो उपाय सांगत नाही. शिवाय तुम्ही सोसायटीत नव्हे तर स्वतंत्र घरात रहात आहेत असे गृहीत धरले आहे कारण सोसायटीत तक्रार केल्याचा उल्लेख नाही.) १) सरळसोट उपाय - पोलीस काही करतील असं वाटत नाही. तुम्ही थेट वकील गाठून त्या बाईला नोटीस पाठवा. एखादा हुशार आणि शक्यतो वकील बघा , तो निश्चितच योग्य ती कलमं शोधून नोटीस काढून देईल. त्यावर बाई ऐकली नाहीच तर प्रकरण कोर्टात न्या. २) तांत्रिक उपाय - काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे कुत्र्यांचे भुंकणे थांबवण्याकरिता मिळतात (ऑनलाईन शोधून बघा). पण ती किती अंतरावरुन काम करु शकतात , त्यांची परिणामकारकता ई माहित नाही. तुम्ही थोडे पैसे घालवून प्रयोग करुन बघू शकता. ३) राजकीय मध्यस्थी - नगरसेवक , आमदार ई ची मध्यस्थी करवून बाईंना समजवून बघा ४) आवाजापासून संरक्षण - तुमच्या घराचे कुंपण जास्त उंच करणे , गरजेप्रमाणे काही खोल्या साउंडप्रुफ करणे , खिडक्या बंद ठेवून वातानुकुलन यंत्रणा वापरणे ई काहीसे खर्चिक उपाय करु शकता. यामुळे तुम्हाला इतर आवाजांपासूनही संरक्षण मिळेल (जसे उत्सवातील वाद्ये, स्पीकर्स , मध्यरात्री वाजणारे फटाके ई)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Tue, 09/19/2017 - 19:13

In reply to तुमची समस्या रास्त आहे. by मराठी कथालेखक

Permalink

दुरुस्ती

एखादा हुशार आणि शक्यतो ओळखीचा वकील बघा
  • Log in or register to post comments

Submitted by एकुलता एक डॉन on Wed, 02/14/2018 - 02:35

In reply to तुमची समस्या रास्त आहे. by मराठी कथालेखक

Permalink

तुम्ही त्या बाईशी आधीच बोलला

तुम्ही त्या बाईशी आधीच बोलला असणार पण तिने दाद दिली नाही असे गृहीत धरुन तो उपाय सांगत नाही नेमके करायचे काय आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 09/19/2017 - 19:39

Permalink

सोसायटी

तुम्ही जर सहकारी सोसायटी मधे रहात असाल तर तुम्ही तिथे तक्रार करू शकता. सोसायटीचे नियम याबद्दल काय सांगतात ? कोणताही प्राणी पाळायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी लागते. आमच्या सोसायटीमधे आम्ही प्राणी पाळायचा असेल तर महापालिकेची परवानगी , प्राण्याच्या वॅक्सिनेशनचे पूर्ण रीपोर्ट, सोसायटीमधे घाण केल्यास ती उचलायची जबाबदारी, प्राण्याने कुणाची गाडी खराब केली तर त्याची भरपाई द्यावी असे नियम केले आहेत व तसे मालकाने लिहून द्यावे लागते. तुम्ही याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करावी असे सुचवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 09/19/2017 - 19:43

Permalink

दुवा

दुवा या दुव्यामधे बरेच कायदे , नियम सांगितले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by औरंगजेब on Tue, 09/19/2017 - 19:55

Permalink

सोसायटी आसेल तर सोसायटीची

सोसायटी आसेल तर सोसायटीची परमिशन आनिवार्य आहे. पण बंगला असेल तर महापालिकेची परवानगी / कुत्रा पाळिव प्राणी विभागात नोंदणी केल्ये का ते बघा. अर्थात ह्या गोष्टी अंडरकव्हर अॉपरेशन करुन कराव्या लागतील. आमच्या सोसामध्येहे आॉपरेशन सक्सेसफूल्ल केलय आम्ही.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Tue, 09/19/2017 - 19:55

Permalink

माझ्या ओळखीेतले एक प्रथितयश

माझ्या ओळखीेतले एक प्रथितयश लेखक आणि चित्रकारही सध्या याच त्रासातून जात आहेत. त्यांना या त्रासामुळे त्यांच्या कलेत काॅन्सन्ट्रेशन करता येत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by औरंगजेब on Tue, 09/19/2017 - 20:00

Permalink

https://www.amazon.in/Ortz®

https://www.amazon.in/Ortz®-Dog-Whistle-Stop-Barking/dp/B00L016CRS हे try करा High frequency whistle आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 09/19/2017 - 21:45

Permalink

सर्वांना धन्यवाद !

सर्वांना धन्यवाद ! मी काय केले हे नंतर त्याचा काही उपयोग झाला तर येथे लिहिन.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 09/19/2017 - 21:49

In reply to सर्वांना धन्यवाद ! by जयंत कुलकर्णी

Permalink

त्या बाई मिपावर नाहीत ना?

त्या बाई मिपावर नाहीत ना?
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 09/19/2017 - 21:50

In reply to त्या बाई मिपावर नाहीत ना? by अमरेंद्र बाहुबली

Permalink

:-) नाही त्या मराठी नाहीत...

:-) नाही त्या मराठी नाहीत...
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 09/19/2017 - 22:02

In reply to :-) नाही त्या मराठी नाहीत... by जयंत कुलकर्णी

Permalink

मग आपला मराठी बाना दाखवून

मग आपला मराठी बाना दाखवून द्या!:-)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 09/20/2017 - 00:12

Permalink

जयंतकाका, पण ती कुत्री नक्की

जयंतकाका, पण ती कुत्री नक्की कसा त्रास देतात? काही कुत्री खूप भुंकतात, काही घाण करतात, काही अंगावर धावून जातात तर काही कुत्री दुसर्‍यांच्या घरात शिरतात.
  • Log in or register to post comments

Submitted by पिनाक on Wed, 09/20/2017 - 04:38

Permalink

जवळ एखादा चायनीज किंवा कोरियन

जवळ एखादा चायनीज किंवा कोरियन राहतोय का बघा. राहिलेली हाडं बाईंना पोस्ट करा.
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Wed, 09/20/2017 - 10:34

Permalink

एक कुत्री पाळा..

अवांतर.. एक कुत्री पाळा..आणि तिच्यामुळे त्या दोघा कुत्र्यांमध्ये भांडण लागेल. मग एखादा कुत्रा या भांडणात चचला की कुत्रीला हाकलून द्या. दुसरा कुत्रा मग विरहामुळे जीव देईल. ह.घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by परिंदा on गुरुवार, 09/21/2017 - 17:43

In reply to एक कुत्री पाळा.. by योगी९००

Permalink

काय भारी प्रतिसाद आहे.

काय भारी प्रतिसाद आहे. आवडल्या गेला आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 09/21/2017 - 23:05

In reply to एक कुत्री पाळा.. by योगी९००

Permalink

कुत्री मुळे अजुन आठ दहा

कुत्री मुळे अजुन आठ दहा पिल्ले वाढली मग??
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 09/20/2017 - 11:45

Permalink

मायला कुत्तरडी लयं म्हणजे लयं

मायला कुत्तरडी लयं म्हणजे लयं त्रास देत्यात, रात्री तर उत येतो साल्यांना... माझ्या सारख्या शिफ्ट करणार्‍या व्यक्तिचे तर पार हाल होतात... डोक्याची पार भॉव भॉव करुन टाकतात ! काही वर्षांन पुर्वी या कुत्तरड्यांमुळे माझी पार सटकली होती आणि खोपडी सटकल्याने भर रस्त्यात जाउन दगड मारण्याचा उध्योग केला होता ! दुर्दैवाने नेम चुकला आणि एका पार्क केलेल्या गाडीवर बसला आणि तिची पॅकपॅक सुरु झाली, साला नशिबच खराब ! बाईक चालवताना हीच कुत्तरडी त्यांच्या जिवाचे रान करुन माझ्या तंगड्यांचा चावा घेण्या करता मॅरॅथॉन धावतात... दैव कॄपेने श्वान दंश होउन लस घेण्याची वेळ अजुन तरी आलेली नाही. रोज पेपर उघडुन वाचलात तर कुत्र्याने चावल्याने बालकाचा मॄत्यू किंवा अशा अशा आशयाच्या बातम्या हमखास नजरेत येतील ! शांततेने जगण्याचे पर्याय हल्ली वेगाने कमी होत चालले आहेत तर खड्डे चुकवुन किंवा खड्ड्यात पडुन आपण गचकलो नाही किंवा हातपाय मोडले नाहीत तर आपण मायबाप सरकारच्या दयाळु वॄतीचे आभार मानले पाहिजेत ! उपाय :- १} काही मोठा जुगाड / सेटिंग लावुन शिंझो आबे यांना बोलवुन तुमच्या वास्तुत शांती पुजन करुन घ्या ! { आबे यांना मुंबई मधली रेल्वे पावसच्या पाण्यात रुळ बुडलेले असतानाही कशी धावते या बद्धल ४ कौतुकाचे शब्द सांगावयास विसरु नका, ही टेक्नॉलॉजी जगात कुठेच नाही हे देखील अगदी ठासुन सांगा. } २} बाजारात / ऑनलाईन लेझर गन मिळते का ते पहा ! { मला अजुन सापडली नाही ती गोष्ट वेगळी } तुमच्या मागची कुत्तरडी कोकलायला लागली कि हळुच लपुन लेझर गन ने त्यांच्या पार्श्व भागावर नेम लावुन चटका ध्या ! आपण भुंकलो कि कोणीतरी आपल्या बुडावर डाग देते हे एकदा का त्या दोन कुत्तरड्यांच्या लक्षात आले कि त्रास कमी होइल याची शक्यता वाटते ! ३} आपण सांगितले तसे कुत्री शिकलेली नाहीत, मग त्यांना शिकवायला पाठवण्याचा विचार करुन त्याचा आर्थिक भार उचलण्याची तयारी ठेवा ! ४} ती कुत्री भुंकत असतील तेव्हा त्यांचे आवाज रेकॉर्ड करुन ठेवा, व जेव्हा ती कुत्तरडी आणि तिची मालकिण गा गा करत असेल नेमक्या त्याच वेळेस रेकॉरडेड आवाज मोठ्याने प्ले करा ! ५} तुमच्या आजुबाजुला कुठेले हॉस्टेल असेल आणि त्यात मणीपुर / नागालँड मधले विध्यार्थी असतील तर त्यांच्याशी ओळख वाढवुन एकदा तुमच्या घरी बोलवा, तसेच मागील दोन कुत्तरडी देखील दाखवा... काम तमाम होइल कि नाही ते पहाच !... असो... तुर्तास इतकचे उपाय आठवले आहेत, अजुन काही आठवल्यास सुचवेन... जाता जाता :- मेरे करण अर्जुन आयेंगे च्या चालीतच मेरे मनःशांती के दिन आयेंगे असं अधुन मधुन पुटपुटा, तेव्हढेच चित्तास समाधान मिळेल !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गरम गरम चिलका.... ;) :- Rabhasa
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 09/20/2017 - 12:17

In reply to मायला कुत्तरडी लयं म्हणजे लयं by मदनबाण

Permalink

खरंय मबा. सर्व कुत्र्यांना

खरंय मबा. सर्व कुत्र्यांना (त्यांच्या हरामी श्वानप्रेमींसहित) एकत्रित चिरडून ती (दोन्ही) जमातीच नष्ट करण्याचा उपाय आल्यास वाहवा... नशीबच उघडेल..
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 09/20/2017 - 16:54

In reply to खरंय मबा. सर्व कुत्र्यांना by गवि

Permalink

सर्व कुत्र्यांना (त्यांच्या

सर्व कुत्र्यांना (त्यांच्या हरामी श्वानप्रेमींसहित) एकत्रित चिरडून ती (दोन्ही) जमातीच नष्ट करण्याचा उपाय आल्यास वाहवा... कुत्र्यांचे मालक झाले कि मगच श्वान प्रेम मिरवता येते असा तुमचा " गैरसमज" दिसतो ! माझ्या सोसायटीत फिरणार परंतु अगदी साधु वॄत्ती असणारा कुत्रा पालिकेने / किंवा कुठलेतरी विष खाउन गेला तेव्हा मी ढसाढसा रडलो होतो... ज्या घरी मी राहतोय त्याच्या वास्तुपुजनाच्या दिवशी तो आमच्या घरी आला होता आणि आणि जिथे यज्ञ कुंडात हवत केले होते तो भाग चाटुन काढला होता कारण त्याला तुपाची चव होती, अनेक वर्ष मी त्याच्याशी खेळलो आणि बागडलो देखील , त्याचा विष खाल्लाने जेव्हा शेवट आला तेव्हाही तो त्या क्षणीही आमच्याच घरी आला... तो एक विलक्षण कुत्रा होता. कधीही तो कोणास चावला नाही,लहान मुले त्यांच्या अंगावर बसत, त्याची शेपटी ओढत तरी सुद्धा साधे नखही त्याने कोणाला कधी लावले नाही.एकदा सोसायटीच्या कचर्‍यावाल्याला घाबरुन तो आमच्या फ्लॅट मधे घुसला आणि घाबरुन बिथरल्याने पलंगावर चढुन त्याने खिडकीतुन सरळ खाली उडी मारली तरी त्याचा जीव घेला नाही फक्त पाय मोडुन भागले ! सोसायटी मधील सर्व लोकांचा लाडका कुत्रा असल्याने त्याच्यासाठी तळ मजल्या ची एक खोली { बहुतेक त्यावेळी भाड्याने घेतली } त्याचा डॉक्टरकडे नेउन उचार केला,मोडलेला पाय ठिक होउन तो परत सोसायटी भर फिरु लागला ! हे माझ्या सकट सोसायटी मधल्या सगळ्याचे त्याच्यावरचे प्रेमच होते, वेळे नुसार कोणाच्या फ्लॅट समोर जाउन कोणत्या वेळी काय खायला मिळेल हे त्याला व्यवस्थित ठावूक होते, माझ्या पाहण्यात असा विलक्षण कुत्रा परत आलाच नाही, जरी तो मोकाट होता तरी सुद्धा माझ्या सकट सोसायटी मधल्या सर्वांचा तो कायमच लाडका होता... शेवटी शेवटी त्याला मोतीबिंदू सुद्धा झाला होता. जेव्ह्या त्याचा अंतिमकाळ आला तेव्हा मी सोसायटी मधल्या अनेकांना माझ्या घरी बोलवुन आणले त्याला माझ्या हाताने शेवटचे दुध पाजले, नंतर सगळ्यांनी त्याला कपड्यात गुंडाळुन गच्चीतील मोकळ्या जागेत झोपवले... मी सकाळी झोपेतुन उठलो तसे तडक गच्चीत गेलो, रक्ताची उलटी होउन तो आम्हा सर्वांना सोडुन गेला होता, परत सोसायटी मधले लोक जमले त्याला सोसायटी मधल्याच बागेत खड्डा करुन एका कडेला पुरले... माझ्या सकट ढसा ढसा रडणारे अनेक स्त्री आणि पुरुष तिथे मी पाहिले... एका मोकाट कुत्र्यावर देखील लोक प्रेम करु शकतात... तेही अगदी मनापासुन ! असो... बाकी तुम्ही हरामी श्वानप्रेमींसहित असा उल्लेख केला आहेत म्हणुन सांगतो... अशीही जमात अस्तित्वात आहेच ! उच्च शिक्षण झाल्याची मिजास , मस्ती, घमेंड आणि बुडाखाली असलेला बक्कळ पैसा याच्यावर अशी मंडळी आपले श्वान प्रेम जगजाहिर करत असतात ! त्यांना वाटते त्यांनी श्नान पाळला म्हणजे श्वान प्रेम समजायचा सगळा आयक्यू आभाळातील बापाने त्यांनाच डोनेट करुन ठेवला आहे ! बरं हे हरामी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानांवर प्रेम करतील परंतु आजुबाजुच्या परिचित मनुष्य प्राण्यांशी मात्र विक्षीप्तपणे वागतील असे माझे निरिक्षण आहे ! जाता जाता :- आपण कुत्रे पाळतो म्हणजे आपणासच श्वान प्रेमाचे लायसन्स मिळाले आहे अश्या भ्रमात कधीच कोणी राहु नये !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गरम गरम चिलका.... ;) :- Rabhasa
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 09/20/2017 - 17:42

In reply to मायला कुत्तरडी लयं म्हणजे लयं by मदनबाण

Permalink

मबा.. तू माझा व्यक्तिगत दोस्त

मबा.. तू माझा व्यक्तिगत दोस्त आहेस, तुला माहीतेय.. तुझा दुसरा प्रतिसाद खुलासा करणारा आणि टचिंग आहे. पण मग पहिल्या प्रतिसादातली (उदा.) खालील वाक्यं दुस-या प्रतिसादाच्या मानाने खूप सहानुभूतिशून्य वाटल्याने माझी प्रतिक्रिया छद्मी उमटली. त्याबद्दल क्षमस्व. ... >>>>
मायला कुत्तरडी लयं म्हणजे लयं त्रास देत्यात, रात्री तर उत येतो साल्यांना...
तुमच्या आजुबाजुला कुठेले हॉस्टेल असेल आणि त्यात मणीपुर / नागालँड मधले विध्यार्थी असतील तर त्यांच्याशी ओळख वाढवुन एकदा तुमच्या घरी बोलवा, तसेच मागील दोन कुत्तरडी देखील दाखवा... काम तमाम होइल कि नाही ते पहाच !...
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 09/20/2017 - 17:53

In reply to मबा.. तू माझा व्यक्तिगत दोस्त by गवि

Permalink

मबा.. तू माझा व्यक्तिगत दोस्त

मबा.. तू माझा व्यक्तिगत दोस्त आहेस, तुला माहीतेय.. तुझा दुसरा प्रतिसाद खुलासा करणारा आणि टचिंग आहे. पहिला प्रतिसाद हा व्यंग / विनोदी आणि वाटल्यास बिभत्स रसाने या विषयाला धरुन इतर विषयावर देखील टिप्पणी करणारा आहे, उगाच कोणी कोणत्याही जनावरास त्रास ध्यावा किंवा त्याचा जीव घ्यावा अशा विचाराचा मी अजिबात नाही...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गरम गरम चिलका.... ;) :- Rabhasa
  • Log in or register to post comments

Submitted by सिंथेटिक जिनियस on Wed, 09/20/2017 - 12:06

Permalink

पोलिसांना सांगून पहा .समजूत

पोलिसांना सांगून पहा .समजूत घालतील .
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Wed, 10/11/2017 - 13:00

In reply to पोलिसांना सांगून पहा .समजूत by सिंथेटिक जिनियस

Permalink

कोणाची? कुत्र्यांची?

कोणाची? कुत्र्यांची? मालकिणीची? का माझीच समजूत घाला म्हणून गळ घालावी धागालेखकाने पोलिसांना?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 09/20/2017 - 12:12

Permalink

सर.

सर. १. तुम्हाला कुत्र्यांविषयी ममत्व आहे का? २. तुमच्या तक्रारीमुळे ती कुत्री बेवारशाप्रमाणे म्युनिसिपालिटीने उचलून नेलेली (आणि बहुधा मारलेली / मरणप्राय जीवन जगणारी) तुम्हाला चालणार आहेत का? (आय वॉन्ट सायलेन्स, बाकी आय गिव्ह अ डॅम, असं आहे का?) ३. भुंकणं हा कुत्र्यांचा "स्व" भाव आहे. तुमची आवाजाविषयीची सेन्सिटीव्हिटी वाजवीपेक्षा जास्त असू शकेल असा किमान थियॉरिटिकल विचार तुम्ही करु शकता का? ४. कुत्र्यांच्या मालकाचीही काही मजबूरी असेल असा विचार तुम्ही करता का? ५. ती कुत्री अनट्रेन्ड (न शिकवलेली) आहेत असं तुम्ही म्हणता. तर ट्रेनरची नेमणूक करुन जितपत आवाज कमी करता येईल (तो शून्यवत् होणार नाही) तो तुम्हाला स्वीकारार्ह आहे का? एकूण प्रतिक्रिया पाहून डॉग हेटर्सचं प्रमाण दिसून खूप चलबिचल होते आहे. गार्ड डॉग / वॉच डॉगच्या अनुवंशाच्या जाती आणि कुत्री थोड्याशाही चाहुलीने भुंकतात. ती संरक्षणाची इन्स्टिंक्ट फॉलो करत असतात. शेवटचा प्रश्न: तुम्हाला अल्टिमेट आऊटकम काय अपेक्षित आहे? कुत्र्याला दयामरण किंवा म्युनिसिपालिटीत रवानगी (एकच अर्थ). -एकाहून अधिक श्वानांचा पिता (गवि)
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 09/20/2017 - 13:24

In reply to सर. by गवि

Permalink

श्रीमान श्री श्री

श्रीमान श्री श्री गगनचंद्ररावजी विहारी साहेब, तुमची भूतदयेची रेघ नक्की कुठे संपते..? म्हणजे कुत्र्यांना भूतदयेने वागवावे मात्र तो अधिकार कोंबड्यांना नाही असे कांही आहे का..? ..आणि तोच अधिकार वनस्पतींना द्यायचा म्हटला तर खायचे काय..?? (पॉपकॉर्नप्रेमी) मोदक.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Wed, 09/20/2017 - 13:36

In reply to सर. by गवि

Permalink

प्रिय गवि,

प्रिय गवि, १ माझा एक जवळचा मित्र पूर्वी पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे मरण पावला तरीसुद्धा मला सर्व प्राण्यांविषयी ममत्व आहे. २ असे मुळीच नाही. ३जो माणूस गणपती उत्सवात माणसांचा त्रास सहन करू शकतो त्याच्या सेन्सेटिव्हिटीबद्दल काय बोलणार ? ४ हो मी करतो आणि केला. पण दिवस रात्र कुत्री भुंकत असताना त्यांना शांत करण्याचा प्रयत्न न करणे हे मला समजू शकत नाही. किंवा आज आपल्याकडे कामाला माणसे येणार आहेत तर त्या कुत्र्यांना कुठेतरी बाजूला न ठेवणे हे मी समजू शकत नाही. ५ आमच्या येथे दुसर्‍या बंगल्यातही कुत्री आहेत पण मालक त्यांच्याकडे नीट लक्ष देतात. दोन वेळचे अन्न फेकले की झाले अशी त्यांची अ‍ॅटिट्युड नाही. त्यांचा कोणालाच त्रास होत नाही. डॉग हेटर्सचे प्रमाण खूप आहे कारण मला वाटते त्रास आहे आणि तो त्रास मालकांच्या निष्काळजीपणामुळे बहुतेक वेळा असतो. शेवटच्या प्रश्नाला उत्तर : मला कुत्र्यांकडे नीट लक्ष देऊन ती भुंकणार नाहीत ही काळजी त्यांनी घ्यावी हे अपेक्षित आहे. हे जमत नसल्यास त्यांनी त्या कुत्र्यांना कोणालातरी देऊन टाकावीत. खेडेगावात शेतावर रहात होतो तेव्हा कमीत कमी ७/८ कुत्री पाळलेला, जयंत कुलकर्णी
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 09/20/2017 - 14:06

In reply to प्रिय गवि, by जयंत कुलकर्णी

Permalink

हे जमत नसल्यास त्यांनी त्या

हे जमत नसल्यास त्यांनी त्या कुत्र्यांना कोणालातरी देऊन टाकावीत.
धन्यवाद.. तुम्ही कधीच कुत्रा स्वतः पाळलेला नाही हे कळलं. जरुर तक्रार करा त्या हरामखोर कुत्र्याविरोधात. मरु दे साला.. आपली शांत झोप महत्वाची... अगदी मान्य..
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Wed, 09/20/2017 - 14:40

In reply to हे जमत नसल्यास त्यांनी त्या by गवि

Permalink

गवि,

गवि, मी कुत्रा कोणालातरी देऊन टाकावीत असे म्हटल्यामुळे तुमचा असा समज झालेला दिसतो की मी कुत्री पाळलेली नाहीत. पण कुठला छंद कुठे करावा याचे भान मला निश्चितच आहे. शेतावर काहीच प्रश्र्न नव्हता. येथे मी जर ते कुत्रे आणले तर तो माझा मूर्खपणा ठरेल. असो. मी बघतो आता काय करायचे ते. आपण आता चिंता करू नये ही विनंती. आपली मते कळली. त्यांचा योग्य तो मान राखला आहे आणि जाईल. ता.क. त्यांनी असे कुत्रे देऊन टाकलेले मी पाहिले आहेत म्हणूनच मला हे सुचले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 09/20/2017 - 20:52

In reply to गवि, by जयंत कुलकर्णी

Permalink

क्षमस्व.

ज.कु.काका. पार्श्वभूमी पूर्णतः माहीत नसताना / न जाणता मी श्वानप्रेमापोटी आततायी प्रतिक्रिया दिल्या. त्या नी जर्क रिअॅक्शन होत्या. त्याबद्दल माफ करा.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Wed, 09/20/2017 - 22:07

In reply to क्षमस्व. by गवि

Permalink

गवि,

गवि, काका म्हणता ना मग माफी कसली मागता ? तुम्ही कुत्रे पाळता ना? मग तुम्ही कुत्र्याला किती वेळा जवळ घेता ? मी तरी दिवसातून अनेक वेळा घ्यायचो. या बाईला मी एकदाही कुत्र्याला जवळ घेताना पाहिले नाही. म्हणूनच म्हटले दोन वेळा अन्न फेकले म्हणजे झाले असे नाही. त्याच्यावर माया कोण करणार... असो. विसरा सगळे... :-) आणि जोपर्यंत मी माणसाला प्रत्यक्ष भेटत नाही तो पर्यंत त्याच्या प्रतिक्रिया मी मनाला लावून घेत नाही कारण माझा चेहर्‍यावर आणि डोळ्यावर जास्त विश्र्वास आहे. :-) जयंत कुलकर्णी.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 09/20/2017 - 14:44

In reply to हे जमत नसल्यास त्यांनी त्या by गवि

Permalink

गवि, तुमचा मुद्दा मान्य आहे

गवि, तुमचा मुद्दा मान्य आहे पण आजारी आणि वयस्कर नातलग, तान्हे बाळ असे घरी असताना भूतदयेचे लॉजिक कुठेपर्यंत मान्य करणार..? माझ्या बुलेटच्या टायरवर सोसायटीमधला एक कुत्रा कधीतरी मूत्रविसर्जन करतो. एक दोनदा गार्डला सांगितले आणि नंतर सोसायटीकडे तक्रार केली. परत ते कुत्रं कार्यक्रमात बिझी असताना सापडले की त्याला हातातले हेल्मेट फेकून मारणार हे नक्की. अशा वेळी.. चिखलातून गाडी चालवताच की, रस्त्यावरून जाताना रस्ता कुठे स्वच्छ असतो..? असे लॉजिक चालत नाहीत कारण पाळीव कुत्र्यामुळे दुसर्‍याला त्रास होऊ नये ही कुत्रामालकाची जबाबदारी असते. (भटक्या कुत्र्याचा त्रास आपण कंट्रोल करू शकत नाही आणि भटक्या कुत्र्याचा त्रास चालतो म्हणून पाळीव कुत्र्याचा त्रास चालवून घ्यावा असे कुणाचे मत असेल तर कुत्रामालकाने आपल्या पाळीव कुत्र्याला भटक्या कुत्र्याप्रमाणे वागणूक मिळालेली चालवून घेण्याची तयारी ठेवावी)
  • Log in or register to post comments

Submitted by झेन on Wed, 09/20/2017 - 13:10

Permalink

कुत्र्यांच्या बाबतीत लोक सिरीयस दिसतात

मागे ईथे कुणी तरी मांजराच्या त्रासाबद्द्ल उपाय विचारला होता . . .विचारणा-याला मांजरा पेक्षा सुचवलेल्या उपायांचा जास्त त्रास झाला असावा :-)
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 09/20/2017 - 13:14

Permalink

@गवि

आपल्यामुळे दुसर्‍यांना त्रास होउ नये एवढेच ! रात्री अपराती , भर दुपारी कधीही कुत्री भुन्कतात ! त्यांचा "स्व" भाव आहे पण स्वतच्या घरात विश्रांती घेणे हा हक्क आहे. आपल्या आवडी निवडी जपताना त्याचा दुसर्‍याला त्रास होउ नये एवढीच ' सुजाण' नागरीका कडून अपेक्षा असते.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 09/20/2017 - 14:02

Permalink

काका, एक जालीम उपाय सांगू का.

काका, एक जालीम उपाय सांगू का..? तुम्ही जर बंगल्यात रहात असाल तर त्या कुत्रेवाल्या बंगल्याच्या शक्य जितक्या जवळ (पण तुमच्याच हद्दीत) एक एक असे दर दहा मिनीटांनी लवंगी फटाके उडवायला सुरू करा. दर दहा मिनीटांनी फटाका पेटवण्याचा त्रास वाटत असेल तर एका उदबत्तीला फटाक्यांच्या वाती फुटभर लांब जाड दोर्‍याने गुंडाळा आणि ती लड ठेऊन द्या. (सरळ उदबत्तीला बांधलेत तर पहिल्या फटाक्यानंतर उदबत्ती आणि त्याला जोडलेले फटाके विभक्त होतील. थोडे दिवस दर दहा मिनीटांनी कुत्रा आकाशपाताळ एक करेल आणि लवकरच दमेल. भुंकणे कमी करेल. हे झाल्यानंतरही तुम्हाला होणार्‍या त्रासाचा वचपा काढायचा असेल / मालकीणीला धडा शिकवायचा असेल तर लवंगी फटाक्यांऐवजी मोठे तोटे वापरा.. किंवा सरळ सुतळी बाँब. आपली समस्या समजून न घेणार्‍या असंवेदनशील लोकांसाठी आपण संवेदना दाखवून काहीही फायदा नसतो. त्यामुळे "दिवाळीतले कुत्र्यांचे भीतीमुळे झालेले कणवपूर्ण डोळे" वगैरे प्रतिसाद आलेच तर फाट्यावर मारा. यात मुजोर मालकिणीमुळे कुत्र्यांचे हाल होतील.. ते आपल्यामुळे झालेले कोलॅटरल डॅमेज असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by जेडी on Wed, 09/20/2017 - 14:28

Permalink

animal rescue ला कंप्लेंन्ट

कुत्रा का भुंकतोय, ह्याला काही कारण असावे. व्हेटर्नरी डाक ह्याबद्दल animal rescue ला कंप्लेंन्ट करु शकतात. ते कुत्र्याला उचलुन घेवुन जातात...
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 09/20/2017 - 14:57

Permalink

Animal welfare officer

म्हणजे तिच्याकडेही कुत्री तात्पुरत्या निवाऱ्यासाठी कदाचित आली असावीत. अनोळखी वातावरण, अपुरे खाणे, सतत बांधून ठेवणे यामुळे कुत्री ओरडत असतील. स्थानिक people for animals वगैरे कोणाला विचारून बघा. मला गोव्यातल्या pfa चा अतिशय वाईट अनुभव आहे पण कदाचित तिकडचे काम करत असतील.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Wed, 09/20/2017 - 17:13

Permalink

कुत्रा व मालक

गवि,
जरुर तक्रार करा त्या हरामखोर कुत्र्याविरोधात. मरु दे साला..
या विधानात गडबड आहे. जयंतरावांची मालकाविरुद्ध तक्रार आहे. कुत्र्याविरुद्ध नाही. भले त्रास जरी कुत्र्याकडून होत असला तरी या धाग्यावर केवळ मालकावर वापरायचा उपाय अपेक्षित आहे. काही वाचकांनी कुत्र्यावर वापरायचे अवैध उपाय दिले आहेत खरे, पण त्यांची मूळ हेतूशी सरमिसळ अपेक्षित नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Wed, 09/20/2017 - 17:28

In reply to कुत्रा व मालक by गामा पैलवान

Permalink

लोक समजूनच घेत नाहीत....

लोक समजूनच घेत नाहीत....
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 09/20/2017 - 17:35

In reply to कुत्रा व मालक by गामा पैलवान

Permalink

शेवटी कारवाई कुत्र्यावरच होते

शेवटी कारवाई कुत्र्यावरच होते आणि कुत्राच सफर करतो म्हणून सर्व बोलावंसं वाटलं. क्षमस्व.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 09/20/2017 - 20:16

Permalink

कुत्र्यांशी मैत्री करा.

कुत्र्यांशी मैत्री करा. सुरुवातीला कदाचित त्रास होईल. पण नंतर लळा लागतो. तसचं ती बाई त्या कुत्र्यांना कोंडुन ठेवते का ते बघा. कोंडलेली कुत्री भयानक अग्रेसिव होतात आणि दिवस रात्रं ओरडतात. कोंडुन ठेवलं असेल तर अ‍ॅनिमल रेस्क्यु ला फोन करा. विश्वास ठेवा कुत्र्याला त्रास झाल्याशिवाय तो कधीही आरडाओरडा करत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 09/20/2017 - 21:51

In reply to कुत्र्यांशी मैत्री करा. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

विश्वास ठेवा कुत्र्याला त्रास

विश्वास ठेवा कुत्र्याला त्रास झाल्याशिवाय तो कधीही आरडाओरडा करत नाही
१०० टक्के सत्य ! (कुत्रा नु भ वी) स्नेहा
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com