✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शेजार्‍याच्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा त्रास

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Tue, 09/19/2017 - 18:29  ·  लेख
लेख
मित्रहो ! जर आपल्याला शेजार्‍याच्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा अतोनात त्रास होत असेल तर काय करावे ? कुठे तक्रार करावी? पुण्यात कोठे करावी ? मी असे ऐकले आहे की या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही. हे खरे आहे का? या बाबतीत काय कायदे आहेत ? ते सगळे कुत्री पाळणार्‍यांच्या बाजूनेच आहेत का ? कोणाला या बाबतीत अनुभव असेल तर जरूर येथे लिहा. मी सध्या या त्रासातून जात आहेत म्हणून हा विषय चर्चेला मांडला आहे. यावर असा धागा पूर्वी आला असेल व त्यावर ही चर्चा झाली असेल तर त्याची लिंक मला दिलीत तर बरं होईल. मग हा धागा उडवता येऊ शकेल. आमच्या मागे एक बाई राहते. तिच्याकडे दोन कुत्री आहेत. ती बिलकूल शिकवलेली नाहीत. शिवाय ती म्हणते की ती अ‍ॅनिमल वेलफेअर ऑफिसर आहे. सरकारी नेमणूक आहे. जयंत कुलकर्णी.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
38097 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

आज गवी वेगळ्याच मूड मध्ये

उपेक्षित
Wed, 09/20/2017 - 20:22 नवीन
आज गवी वेगळ्याच मूड मध्ये वाटत आहेत, कुठ नेऊन ठेवले आमचे ते प्रगल्भ आणि दिलखुलास गवी ? :)
  • Log in or register to post comments

माझा पण एक प्रश्न — पाळीव

अभिजीत अवलिया
गुरुवार, 09/21/2017 - 11:54 नवीन
माझा पण एक प्रश्न — पाळीव कुत्र्याला नैसर्गिक विधी रस्त्यावर करायला लावून ती घाण तशीच ठेवून जाणार्या लोकांंची तक्रार करता येते का?
  • Log in or register to post comments

दारात कोणीही पाय ठेवलेला

सूड
गुरुवार, 09/21/2017 - 14:45 नवीन
दारात कोणीही पाय ठेवलेला बघितला की बेंबीच्या देठापासनं केकाटणारं शेजार्‍यांचं कुत्रं पाह्यलं आणि या प्राण्याबद्दल कधीही दया वैगरे वाटली नाही. असतील माया लावणारी कुत्री जगात पण अजून पाह्यली नाहीत.
  • Log in or register to post comments

या एकदा घरी.

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/21/2017 - 18:45 नवीन
या एकदा घरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुमचा कुत्रा शार्ट टेम्पर आहे

सूड
गुरुवार, 09/21/2017 - 18:59 नवीन
तुमचा कुत्रा शार्ट टेम्पर आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

म्हणुनचं बोलावतोय. शॉर्ट

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/21/2017 - 19:02 नवीन
म्हणुनचं बोलावतोय. शॉर्ट टेंपर असला तरी तो बाहेरच्यांसाठी. चुकुन स्वतःहुन जाउन कोणाला त्रास देणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

या एकदा घरी.

कपिलमुनी
Fri, 09/22/2017 - 12:03 नवीन
चिमण , घरी बोलवून कुत्रा अन्गावर सोडतो ! कालच तो कुत्र्याला उद्या तुझ्यासाठी नवीन खाऊ आणणार असे सान्गत होता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

hahaha .!!

विशुमित
Mon, 09/25/2017 - 18:02 नवीन
hahaha .!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मी त्याच्या कुत्र्याला एका

सूड
Tue, 10/10/2017 - 14:59 नवीन
मी त्याच्या कुत्र्याला एका दिवसाचं खाणं म्हणून तरी पुरेन का अशी शंका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

भटक्या कुत्र्यांच्या आवाज ऐकत

माहितगार
गुरुवार, 09/21/2017 - 22:03 नवीन
भटक्या कुत्र्यांच्या आवाज ऐकत झोपायची सवय आहे, आणि कुत्री नसलेल्या ठिकाणी गेलात तर झोप येत नाही तरी पण भुंकणारी कुत्री न बाळगण्याबद्दल मी माझ्या शेजार्‍यांचा आभारी आहे हेही तेवढेच खरे.
  • Log in or register to post comments

जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात

मालोजीराव
Fri, 09/22/2017 - 17:25 नवीन
जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात जाऊन तुम्ही संबंधित विभागात तक्रार करू शकता याशिवाय आणखी एक गोष्ट करा ती म्हणजे पोलीस स्टेशन ला आणि मॅजिस्टेट ला अर्ज करून १३३ CRPC नोंदवून त्या महिलेला नोटीस पाठवा.
  • Log in or register to post comments

काकांच्या कथेतील पात्रे खरी

रुपी
Sat, 09/23/2017 - 05:49 नवीन
काकांच्या कथेतील पात्रे खरी होऊन प्रतिसादसुद्धा द्यायला लागली! ह. घ्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

:)

हरवलेला
Mon, 09/25/2017 - 00:40 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

काकांच्या कथेतील पात्रे खरी

मालोजीराव
Mon, 09/25/2017 - 10:33 नवीन
काकांच्या कथेतील पात्रे खरी होऊन प्रतिसादसुद्धा द्यायला लागली!
मिपावर नवीन दिसताय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

काय सांगता ....

गामा पैलवान
Mon, 09/25/2017 - 12:37 नवीन
काय सांगताय मालोजीराजे! जयंतराव मिपाकरांवर बेतलेल्या कथा लिहितात की काय? ;-) माझा नंबर केंव्हा लागतोयसं झालंय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

इतके उपाय..?? गावाकडचा.. ऐक उपाय आहे...

Abheeshek
Sat, 09/23/2017 - 23:41 नवीन
कुत्र्याच्या वरून आठवलं.. गावाकडे अशी कुत्री शोधून ठेवायची न रात्री.. अशी काही दगड मारायची की गाव त्याच्या आवाजाने ( व्हिवळन्याने) जाग व्हायचं ... .. न मग गुपचुप तिथून फरार व्हायचं..... पण शहरात risky आहे...
  • Log in or register to post comments

घरातल्या कुत्र्यांना दगड कसा

मराठी कथालेखक
Sun, 09/24/2017 - 00:13 नवीन
घरातल्या कुत्र्यांना दगड कसा मारणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Abheeshek

हा एक मोठाच प्रश्न आहे..

Abheeshek
Sun, 09/24/2017 - 19:22 नवीन
त्यातल्या त्यात ती बाई एक pet ऑफीसर आहे त्यामुळे असे काही करणे आपल्याला महागात पडू शकते त्यामुळे आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब केलेला कधीही बरा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

बरोबर आहे. आणि कायदेशीर तोडगा

मराठी कथालेखक
Sun, 09/24/2017 - 23:39 नवीन
बरोबर आहे. आणि कायदेशीर तोडगा समाजाला दीर्घ काळ उपयोगी पडू शकतो (अशा केसचा पुढेही अनेकजण संदर्भ घेवू शकतात) कायदेशीर तोडगा निघण्यास वेऴ लागेल पण तोडगा निघू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Abheeshek

मला तर,

भंकस बाबा
Sun, 09/24/2017 - 08:05 नवीन
भुंकणाऱ्या कुत्र्यपेक्षा भुंकणारे शेजारी जास्त खतरनाक वाटतात.
  • Log in or register to post comments

भटक्या कुत्र्यांबद्द्ल एक

मराठी_माणूस
Fri, 10/06/2017 - 10:16 नवीन
भटक्या कुत्र्यांबद्द्ल एक पत्र http://epaper.loksatta.com/1383793/loksatta-pune/06-10-2017#page/6/2 त्यात एक प्रश्न असा विचारला आहे की " श्वान प्रेमि लोक भटकी कुत्री दत्तक घेउन का पाळत नाहीत ?"
  • Log in or register to post comments

त्रास

कपिलमुनी
Fri, 10/06/2017 - 14:45 नवीन
त्रास कमी झाला का ? काय उपाय केलात ?
  • Log in or register to post comments

तुम्हाला जसा कुत्र्यांच्या

प्रकाश घाटपांडे
Wed, 02/14/2018 - 12:34 नवीन
तुम्हाला जसा कुत्र्यांच्या भुंकण्याचा त्रास होतो तसा मला इथे मुलांच्या ( विशेषतः मुलींच्या) बेंबीच्या देठापासून किंचाळत खेळण्याचा त्रास होतो. ११ मजली इमारतीत कॉमन रेस्क्यू टेरेस ८ व्या मजल्यावर आहे त्यामुळे खाली ड्क्ट जवळ एक पोकळी तयार होते व तळमजल्यावर लिफ्ट पाशी किंचाळलेले आवाज मल्टिप्लाय होउन मोठे ध्वनीप्रदूषण होते व त्याचा त्रास खालच्या मजल्यावरील शांतताप्रेमी लोकांना होतो. घरात टीव्हि सुद्धा नीट पहाता येत नाही एकाग्रतेची कामे करता येत नाहीत.. सोसायटीत तक्रार करुन झाली. अनेकदा शांतपणे व ओरडून सांगून झाले. कॉम्प्लेक्स ची जनता वसाहत झालीये. सार्वजनिक स्वच्छता सार्वजनिक शांतता व सार्वजनिक शिस्त बाळगा व आपल्या सोसायटीचे सौंदर्य जपा हे सुसंस्कृतांना सांगूनही काही उपयोग होत नाही.
  • Log in or register to post comments

सोसायतीतल्या जाणत्यांनी एकत्र

गवि
Wed, 02/14/2018 - 13:31 नवीन
सोसायतीतल्या जाणत्यांनी एकत्र येऊन कारवाई करुन असा हिसका दाखवा पोरांना की यापुढे मोठ्ठा आवाजच काय, नुसता तोंडातून ब्रही फुटू नये. अभ्यास करत बसतील गपगार. यथावकाश मोठी होऊन आयुष्याच्या थपडांनी कायमची गपचीप होतीलच ती. :-) उगाच फुकाची बालऊर्जा आहे ती. वेळीच रोखलेली बरी ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

कुत्र्यांचा

धर्मराजमुटके
Wed, 02/14/2018 - 13:36 नवीन
कुत्र्यांचा विषयावर धागा आला की गवि तिरकस हळवे होतात असे निरिक्षण नोंदवून खाली बसतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

लहान पोरांना "कमी आवाज करा"

गवि
Wed, 02/14/2018 - 13:45 नवीन
लहान पोरांना "कमी आवाज करा" "मर्यादेत ओरडा" अशी शिस्त लावणं म्हणजे काय प्रकार असतो हे खरोखर विवादास्पद आहे. फक्त तेच वय असतं जेव्हा बिचारा मनुष्यप्राणी "खच्चून" ओरडतो. आता समाजात राहण्याचं शिक्षण किती वयात कंपलसरी करावं याचे त्या त्या सोसायटीचे नियम आपण कोण ठरवणार असा रास्त मुद्दा आहेच. डिपेंडस ऑन टॉलरेंस. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

घाटपांडेकाकांना ओळखत असल्याने

गवि
Wed, 02/14/2018 - 15:19 नवीन
घाटपांडेकाकांना ओळखत असल्याने त्यांचे शंभर नंबरी भूभूप्रेम माहीत आहे. ते त्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचा उपरोक्त लहान मुलांविषयीचा प्रतिसाद हा उपरोधिक किंवा सूचक आहे असं समजून पुढे लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नाही नाही उपरोधिक नाही. खरच

प्रकाश घाटपांडे
Wed, 02/14/2018 - 16:22 नवीन
नाही नाही उपरोधिक नाही. खरच इथे असे आहे. मुलांना खेळायला बाग व मोकळी स्पेस आहे इथे. ओपन स्पेस मधे आवाज हवेत जातो. तिथे खेळले तर त्रास होत नाहि. बंदिस्त जागेत तो खूपच मोठा होतो. तसेच किंचाळण्याची फ्रेक्वेन्सी पिच हे हाय असते. पहिल्या मजल्यावर एक भुभु आहे ते कंटिन्युअस ओरडते. पण भुभुंना माझ्याविषयी व मला भुभुंविषयी प्रेम असल्याने माझा मेंदु ते सहजपणे सहन करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ओपन स्पेस मधे आवाज हवेत जातो.

एमी
गुरुवार, 02/15/2018 - 07:09 नवीन
ओपन स्पेस मधे आवाज हवेत जातो. >> नाही जात. आमच्या फ्लॅटसमोरच मोठी पब्लिक बाग आहे. रविवारी पाहटे ६लाच तिथे पोरं येऊन गोंधळ घालायला चालू करतात. तिथली घसरगुंडी रोल होणाऱ्या प्लास्टीकची बनलीय. तिचापण इतका खर्रर्रर्रर्रर आवाज येतो. मला वाटतं आजकाल बिल्डिंगच्या अकॉस्टिकचाच काहीतरी प्रॉब्लेम असतो. फ्लॅटची उंची कमी (फ्लोअर टू फ्लोअर १० फूट) असल्याने आवाज घुमत असेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

तुलनेने म्हणतोय मी

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/15/2018 - 10:07 नवीन
मी बंदिस्त जागेत घुमणार्‍या आवाजाच्या तुलनेने म्हणतोय. बाकी तुमचा बिल्डिंग्च्या अ‍ॅकॉस्टिक चा मुद्दा नोंदनीय आहे. हा विचार आर्किटेक्ट बिल्डर लोकांनी केला पाहिजे. आठव्या मजल्यावरील रेस्क्यू टेरेस मुळे इमारतीचे दोन भाग होतात . एक वरचाअ आठव्या मजल्या पुढिल व दुसरा खालील.बरेचसे लोक बहुमजली कॉम्प्लेक्स मधे नवीनच राहायला आले असतात. त्यांची मानसिकता ही जुनीच असते त्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात. बिल्डर च्या दृष्टीने तळमजल्यावर वा लॉबी मधे मुलांनी असे खेळणे अभिप्रेतच नसते. त्याने त्यासाठी चिल्ड्र्न्स पार्क एरिया दिलेला असतो. ध्वनिप्रदूषण करणार्‍या लोकांना आपण ते करतोय याचे भान नसते. तसेच काही लोक जसे शांतता प्रिय असतात तसे काही गोंगाटप्रिय असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

मी बंदिस्त जागेत घुमणार्या

एमी
गुरुवार, 02/15/2018 - 10:59 नवीन
मी बंदिस्त जागेत घुमणार्या आवाजाच्या तुलनेने म्हणतोय. >> हम्म. असेल कदाचित. बाकी तुमचा बिल्डिंग्च्या अॅकॉस्टिक चा मुद्दा नोंदनीय आहे. हा विचार आर्किटेक्ट बिल्डर लोकांनी केला पाहिजे. >> आमच्याच असे नाही. पुण्यातल्या सगळ्या नवीन इमारतीत हीच उंची असते. त्याऐवजी मी एक बदलापूरचा फ्लॅट बघितलेला त्याची उंची जास्त वाटत होती. 'रेस्क्यू टेरेस' पहिल्यांदाच ऐकलं. कशासाठी असतं ते? बरेचसे लोक बहुमजली कॉम्प्लेक्स मधे नवीनच राहायला आले असतात. त्यांची मानसिकता ही जुनीच असते त्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात. बिल्डर च्या दृष्टीने तळमजल्यावर वा लॉबी मधे मुलांनी असे खेळणे अभिप्रेतच नसते. त्याने त्यासाठी चिल्ड्र्न्स पार्क एरिया दिलेला असतो. ध्वनिप्रदूषण करणार्या लोकांना आपण ते करतोय याचे भान नसते. तसेच काही लोक जसे शांतता प्रिय असतात तसे काही गोंगाटप्रिय असतात. >> सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

'रेस्क्यू टेरेस' पहिल्यांदाच

बिटाकाका
गुरुवार, 02/15/2018 - 11:10 नवीन
'रेस्क्यू टेरेस' पहिल्यांदाच ऐकलं. कशासाठी असतं ते?
आठ मजल्यांपेक्षा जास्त माजले असणाऱ्या सगळ्या इमारतींना ८ व्या मजल्यावर एक ठराविक क्षेत्रफळाची (नक्की माहित नाही किती ते पण ४ फ्लॅट च्या मजल्यावर २ फ्लॅट हे पहिले आहे) जागा रिकामी सोडणे (म्हणजे टेरेस सारखी) बंधनकारक आहे. मला वाटतं जनरली "रेफ्युजी एरिया" असं म्हणतात. ८ व्याच्या वरच्या मजल्यावर काही दुर्घटना झाली तर लोकांना जमा होण्यासाठी हि जागा सोडत असावेत बहुतेक जेणेकरून फायर ब्रिगेड वगैरे लोकांना रेस्क्यू करणे सोपे जावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

अच्छा धन्यवाद.

एमी
गुरुवार, 02/15/2018 - 13:39 नवीन
अच्छा धन्यवाद. आमच्या एरियात त्याला 8th floor garden flats म्हणून विकत होते. तो आणि त्याच्या वरचे मजले जास्त रेट. फक्त तुमच्यासाठी ही बाग आहे वगैरे :D ही जुनी माहिती. आता रिअल इस्टेट मार्केट कोसळल्यावरच माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका

आमच्या मागे एक बाई राहते.

सतिश पाटील
Wed, 02/14/2018 - 14:41 नवीन
आमच्या मागे एक बाई राहते. तिच्याकडे दोन कुत्री आहेत. ती बिलकूल शिकवलेली नाहीत
त्यांना शाळेत घातले तर प्रश्न सुटेल कदाचित.
  • Log in or register to post comments

सध्या आम्हाला आमच्याच

सस्नेह
Wed, 02/14/2018 - 16:31 नवीन
सध्या आम्हाला आमच्याच कुत्र्याच्या भुंकण्याचा त्रास होतो आहे. आम्ही त्याला चार टाईम चमचमीत खायला घालतो. चिकन म्हणू नका अंडी म्हणू नका, डॉग फूड उच्च कंपनीचे (पेडिग्रीला आमचा कुत्रा तोंड लावत नाही. आधी वेंकीज खायचा. ती कंपनी बंद झाल्यावर दुसऱ्या तत्सम कंपनीचे देतो) . आम्ही दिवसभर नसतो तेव्हा शांत असतो. संध्याकाळी मी नि मुलगा आलो की त्याला पाच दहा मिनिट खेळवून गोंजारून मगच आपल्या कामाला लागतो. मुलगा दहा पंधरा मिनिटे मोकळे सोडून खेळवतो. पण आम्ही घरात पाय टाकला की तो जो भुंकणे चालू करतो ते किमान एक तास थांबत नाही. या कालावधीत आम्हाला एकमेकांशी बोलणे, फोनवर बोलणे, इतकेच काय, एकाग्र चित्ताने कशाचाही विचार करणेही अशक्य होते. त्याची खायची वेळ झाली की खाणे समोर ठेवेपर्यंत सुद्धा त्याला दम नसतो. सतत वेगवेगळ्या सुरात भुंकणे. काय करावे ?
  • Log in or register to post comments

आम्ही घरात पाय टाकला की

कपिलमुनी
Wed, 02/14/2018 - 23:21 नवीन
शीर्षासन करून हातावर चालत या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सज्जड

नाखु
गुरुवार, 02/15/2018 - 10:15 नवीन
दम द्या मिपावरच्या नवकविता आणि राजकारणी धागे प्रतिसाद सहीत वाचवून दाखविले जातील म्हणून!!!! तो भुंकणे सुद्धा मौनात करायला शिकेल. आणि तुम्ही एखाद्या खुसखुशीत लेख रांधायला घ्याल. अखिल मिपा हसतं खेळतं ठेवा आणि ठेवण्यासाठी सदोदित प्रयत्न करा या संघाच्या किरकोळ मागणी पत्रातून साभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

:)

सस्नेह
गुरुवार, 02/15/2018 - 15:05 नवीन
अखिल मिपा हसतं खेळतं ठेवा
आहेच मिपा हसतं खेळतं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा