Skip to main content

त्रास व त्याची तक्रार

शेजार्‍याच्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा त्रास

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 19/09/2017 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो ! जर आपल्याला शेजार्‍याच्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा अतोनात त्रास होत असेल तर काय करावे ? कुठे तक्रार करावी? पुण्यात कोठे करावी ? मी असे ऐकले आहे की या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही. हे खरे आहे का? या बाबतीत काय कायदे आहेत ? ते सगळे कुत्री पाळणार्‍यांच्या बाजूनेच आहेत का ? कोणाला या बाबतीत अनुभव असेल तर जरूर येथे लिहा. मी सध्या या त्रासातून जात आहेत म्हणून हा विषय चर्चेला मांडला आहे. यावर असा धागा पूर्वी आला असेल व त्यावर ही चर्चा झाली असेल तर त्याची लिंक मला दिलीत तर बरं होईल. मग हा धागा उडवता येऊ शकेल. आमच्या मागे एक बाई राहते. तिच्याकडे दोन कुत्री आहेत. ती बिलकूल शिकवलेली नाहीत.