तू.
कधी कधी तुला वाटेल
की तुझ्या अंतरंगात असंख्य तारका आहेत
आणि तू उजळून निघाला आहेस
डोळे दिपवणा ऐवढा
कधी तुला असही वाटेल
की तू अशक्यप्राय लहान आहेस
आणि तुझ संपूर्ण शरीर सामावल आहे
दोन अणू मधल्या विश्वात
परत कधीही न दिसण्यासाठी
बरं तुला असही वाटू शकत
की तू कागदी खेळण आहेस
काळजीपूर्वक बनवलेलं पण सहज विस्कटणार
एवढं नाजूक की स्पर्श करायला ही भीती वाटेल
कधी कधी तुला असही वाटेल
की एखाद्या ग्रहाला थोपवण्याची ताकद
तुझ्या प्रत्येक पेशीत आहे
आणि सामर्थ्य आहे हे विश्र्व उल्थवण्याच
आणि हे वाटण साहजिकच आहे
कारण तू बनलाय स त्याच उर्जेतून
त्याच अनुरेणुतून
आणि त्याच तुटू शकणाऱ्या हाडांतून
ज्यातून हे विश्व बनलय
कारण तू तेवढा जिवंत आहेस
माणूस समजण्याऐवढा......
काव्यरस
वाचने
2422
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
कडक!!!
धन्यवाद
In reply to कडक!!! by जव्हेरगंज
अतिशय सुरेख
धन्यवाद प्राध्यापक.....
In reply to अतिशय सुरेख by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्कॄष्ट रचना !!!!
तुम्ही सांगितलेली कविता मी
In reply to उत्कॄष्ट रचना !!!! by दुर्गविहारी