शिवाजी महाराज -- काही रेखाचित्रे

मैत्र's picture
मैत्र in कलादालन
6 Jun 2009 - 11:00 pm

शिवचरित्राशी संबंधित काही रेखाचित्रे सुमारे दहा अकरा वर्षांपूर्वी काढली होती. शिवजयंतीपासून मिपाकरांसोबत हा आनंद वाटण्याचा विचार होता.
शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने जमलं. चित्रं जुनी आहेत तशी आणि काही प्रमाणात खराब झाली आहेत. तसेच फोटो घेताना थोडी बहिर्वक्रता आली आहे त्याबद्दल क्षमस्व.
महाराजांबद्दल असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जी चित्रं सहज मनाला आवडली ती घेतली आहेत. कृपया यावरून वाद नसावेत.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'महाराज' या पुस्तकात ज्येष्ठ आणि अत्यंत प्रतिभावंत चित्रकार दीनानाथ दलाल यांनी काढलेली असंख्य अप्रतिम चित्रे आहेत. ती पाहून केलेला हा प्रयत्न आहे. काही कमीजास्त असेल किंवा चूक असेल तर ती माझी आहे. मूळ चित्रे म्हणजे प्रतिभा आणि इतिहासाचा अभिमान यामुळे केवळ नतमस्तक व्हावे याच दर्जाची आहेत.
राज्याभिषेकाचं चित्र अप्रतिम सुंदर आहे आणि त्या प्रसंगाचा विचार करताना तेच डोळ्यापुढे उभं राहतं. पण तेवढं कौशल्य माझ्याकडे नव्हतं.
___________________________________________________________________________________________________
वैभव देवगिरीचे
From Shivaji Maharaj Photos_Latest

मावळचे मैतर ... उद्याचे लढवय्ये !
From Shivaji Maharaj Photos_Latest

विनाशाय च दुष्कृताम !
From Shivaji Maharaj Photos_Latest


पक्षी पिंजर्‍यातून उडाला...

From Shivaji Maharaj Photos_Latest

रणझुंजार मर्दमराठा !
From Shivaji Maharaj Photos_Latest

आनंद वन भुवनी || ....
From Shivaji Maharaj Photos_Latest

कलाइतिहासरेखाटन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

7 Jun 2009 - 7:39 am | मदनबाण

व्वा...फारच सुंदर !!!

(जय भवानी,जय शिवाजी)
मदनबाण.....

Love is a game that two can play and both win.
Eva Gabor

प्राजु's picture

7 Jun 2009 - 8:41 am | प्राजु

छान आली आहेत सगळी चित्रे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

7 Jun 2009 - 10:49 am | टारझन

दोस्ता .... लै भारी ... एकदम सह्ही झालंय .. :) आवडली सगळी चित्र यार .. मला पण १२ वर्षे मागं गेल्या सारखं वाटलं .. मी ही शाळेत अशीच चित्र काढायचो

प्रमोद देव's picture

7 Jun 2009 - 8:44 am | प्रमोद देव

चित्रं आवडली.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

विसोबा खेचर's picture

7 Jun 2009 - 9:03 am | विसोबा खेचर

रेखाटने सुरेखच आहेत.. आपल्या कलेला सलाम!

तात्या.

अवलिया's picture

7 Jun 2009 - 9:19 am | अवलिया

वा! मस्त रेखाटने !!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

मराठमोळा's picture

7 Jun 2009 - 11:44 am | मराठमोळा

आवडली रेखाटने..
रेखाटने/चित्र काढणे, रंगवणे यात खुपच आनंद सामावलेला असतो. :)

(कधी काळी चित्रकला आणी रेखाटने काढणारा) मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

देवदत्त's picture

7 Jun 2009 - 1:48 pm | देवदत्त

छान आहेत चित्रे. एकदम शाळेतील इतिहासाचे पुस्तक आठवले :)

यशोधरा's picture

7 Jun 2009 - 1:57 pm | यशोधरा

खूप आवडली रेखाटनं.

बापु देवकर's picture

7 Jun 2009 - 2:31 pm | बापु देवकर

रेखाटने सुंदर आहेत..

बिपीन बुकलवार's picture

7 Jun 2009 - 4:58 pm | बिपीन बुकलवार

आम्हाला हे असल काही येत नाही ,पण पहायला फार आवडत्,झकास !

चिन्या१९८५'s picture

7 Jun 2009 - 5:23 pm | चिन्या१९८५

सुंदर चित्रे!!!!!

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

भाग्यश्री's picture

7 Jun 2009 - 11:31 pm | भाग्यश्री

खूप आवडले..
अजुनही चित्रे असतील(संदीप नाही! :) ) तर येऊद्या..

www.bhagyashree.co.cc

विशाल कुलकर्णी's picture

8 Jun 2009 - 11:50 am | विशाल कुलकर्णी

सुरेख, विशेषतः श्री समर्थांचे रेखाचित्र खुप आवडले. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059
भाग २: http://www.misalpav.com/node/8085

जागु's picture

8 Jun 2009 - 11:55 am | जागु

मैत्र हे पुस्तक आहे माझ्याकडे. मी ३-४ दिवस आधी वाचुन पुर्ण केले आहे. त्यातील चित्रे अगदी जिवंत वाटतात. तुमची ही आहेत. फक्त दोघांच्या कौशल्यामध्ये फरक आहे.

राघव's picture

8 Jun 2009 - 12:08 pm | राघव

अगदी ताजे वाटले!
इतक्या वर्षांपूर्वी अशी छान चित्रे काढलीत.. मग आत्ता आणखी छान निघतील की. येऊ देत अजून.. आम्ही वाट बघतोय. :)

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jun 2009 - 12:33 pm | परिकथेतील राजकुमार

अ प्र ती म !
खरच खुप सुंदर आहेत चित्र.

राजा परा वर्मा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

क्रान्ति's picture

8 Jun 2009 - 9:13 pm | क्रान्ति

रेखाटने!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

भ ट क्या खे ड वा ला's picture

10 Aug 2017 - 9:34 pm | भ ट क्या खे ड वा ला

आवडली ..
मस्तच

विशुमित's picture

10 Aug 2017 - 10:16 pm | विशुमित

चित्र छान काढलीत पण सगळी वादग्रस्त आहेत. २००९ च्या अगोदरची आहेत आणि बरेच इतिहास संशोधन झाले आहे. त्यामुळे असो..!!

पहिले चित्र नाही समजलं, कशा संदर्भात आहे ते.

अनुप ढेरे's picture

11 Aug 2017 - 1:34 pm | अनुप ढेरे

आणि बरेच इतिहास संशोधन झाले आहे.

श्रीमंत कोकाट्यांचं काय?

विशुमित's picture

11 Aug 2017 - 9:22 pm | विशुमित

क्षमा करा सगळी चित्रे वादग्रस्त नाही त्यातील काही व्यक्ती/ चित्रांबाबत वाद निर्माण झाला आहे. संपादकांना विनंती कृपया "सगळी" ऐवजी 'काही" चित्रे वादग्रस्त आहेत, असा बदल करून मिळेल का?
चित्र नं. २, ४ आणि ५ बाबत माझा बिलकुल आक्षेप नाही आहे. पण
======
ज्या चित्र आणि व्यक्तीबाबत असणारे वाद खालील प्रमाणे:
चित्र क्रमांक १ : जिजाबाईंचे चित्र पाठमोरे काढण्याचे प्रयोजन समजले. त्यांच्या डोक्यावर पदर सुद्धा घेतलेला दाखवला नाही. चित्रकाराच्या अभिव्यक्तीचा सन्मान आहे पण जिजाऊंचे असे कोणते ही चित्र/शिल्प डोक्यावर पदर न घेतलेले मला तरी पाहायला मिळाले नाही. १९९९ साली जिजाऊंचे पोस्टच्या तिकिट प्रसिद्ध करण्यात आले त्यात ही त्यांच्या डोक्यावर पदर आहे.
---
चित्र क्रमांक ३ : कोथळा फेम चित्र
या चित्रामुळे सांगली-मिरज मध्ये मोठी दंगल झाली होती. त्या दंगलीला बरेच सामाजिक-राजकीय कांगोरे आहेत. त्यामुळे मी हे चित्र वादग्रस्त म्हंटले होते. जो पर्यंत अफझल खान जिवंत होता तो स्वराज्याचा शत्रू होता. मरणानंतर ज्यांनी कोथळा काढला त्यांनी सुद्धा शत्रुत्व ठेवले नव्हते. ज्यांना अजून शत्रुत्व ठेवायचं आहे, माझी त्यांना ना नाही.

चित्रा क्रमांक ६: रामदास स्वामी
ते शिवाजी महाराजांचे गुरूच नव्हते हे बऱ्याच इतिहास तज्ज्ञांनी पुराव्यानिशी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाची चिकित्सा होते असेल तर त्यात काही वावगे नाही. त्या तज्ज्ञाची मते आणखी पुरावे देऊन खोडून काढावीत. त्याचे स्वागत आहे.
----

अनुप ढेरे's picture

11 Aug 2017 - 10:17 pm | अनुप ढेरे

अगाध वाचन धाग्याचे, राजा शिवछत्रपती पुस्तकाचे आणि एकंदर इतिहासाचे.

ते चित्र जिजाबाईंचं आहे कुठे लिहिलेलं आढळलं तुम्हाला? देवगिरीचे वैभव टायटल आहे चित्र १. चं. जिजाबाई किंवा त्यांचे वडील हे देवगिरीचे नव्हते. सिंदखेडचे होते.

राजा शिवछत्रपती पुस्तकातदेखील माझ्या आठवणीप्रमाणे हे चित्र खिलजीपूर्व देवगिरीच्या वैभवाचं वर्णन येतं तेव्हा वापरलेलं आहे. तेव्हा जिजाबाई नव्हत्या हे तुम्हाला माहिती असावं. चित्राच्या टायटलवरुन देखील ते समजतय.

म्हणुनच वर विचारलं की नवं संशोधन कोणाचं? कोकाटेसाहेबांचं का?

कपिलमुनी's picture

11 Aug 2017 - 11:01 pm | कपिलमुनी

1. हे चित्र जिजाबाईंचे आहे हे कुठे वाचलेत ? बाकी स्पष्टीकरण इतर सदस्यांनी लिहिले आहेच
2. महाराजांनी कोथळा काढला त्याचा चित्र आहे हे वास्तववादी आहे आता सत्य घटनेमुळे कोणाच्या भावना दुखावल्या तरी इतिहास बदलू शकत नाही
3. वरील चित्रा मध्ये तुम्हाला रामदास स्वामी महाराजांचे गुरू होते असा कुठे लिहिलेला दिसतं? कलेचा आस्वाद घ्यावा ! आपल्या हागणदारीचे दुकान दुसरीकडे चालावा

विशुमित's picture

12 Aug 2017 - 10:37 pm | विशुमित

१)
http://www.misalpav.com/comment/953264#comment-953264
चौथा कोनाडा यांच्या या प्रतिक्रियेमुळे घोळ झाला होता. कारण सन्मानीय सदस्यांनी माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत ली शेवटची ओळ वाचली नसावी कदाचित. ती लिंक पुन्हा देतो.
http://www.misalpav.com/comment/953261#comment-953261

आम्ही साधे शेतकरी आम्हाला कुठला इतिहासाचा गंध, मान्य आहे. सदस्यांनी स्पष्टीकरण दिले पण इतिहासाचे अगाध ज्ञान वगैरे वगैरे विशेषणे लावून. शेती बद्दल पण आम्हाला काही महानुभाव सल्ले देत असतात पण "त्यांना शेंगा कुठे येतात हे तरी माहित आहे का " असे विचारले की लगेच महाविस्स्फोट होतो. (मला नाही स्मरत मी कधी असे कोणाला म्हणालो असेल). असो ज्याचा त्याचा सुसंस्कृतपणा..!!
पदर वगैरे घेणे असले माझ्या घरातपण कोणावर कंपल्शन नाही. फक्त जिजाऊंबद्दलच नाही पण शिवकाळातील कोणत्याच माता भागणीचे असे पाठमोरे चित्र पदर सोडून हत्तीची अंबारीचा देखावा पाहिला असेल याबद्दल शंका आहे. हा मूळ चित्रकाराचा खोडसाळपणा वाटला. पण त्याच्या अभिव्यक्तीचा सन्मान आहे. तुला बाबा जशी चित्रे काढायची आहेत तशी काढ. मला हे चित्र वादग्रस्त वाटले होते. या चित्रासाठी सुद्धा मी माझे शब्द मागे घेतो.
२) घटना वास्तववादी असो नसो मला त्याच्याशी घेणे देणे नाही फक्त या चित्रामुळे सांगली मध्ये दंगल झाली होती, म्हणून माझ्या लेखी हे चित्र वादग्रस्त होते. अफझल खान काही माझा गतजन्मीचा जावई नव्हता रक्त खवळायला (इति- सायकलवाले).
३) धाग्याचे शीर्षक बहुदा तुम्ही नीट वाचलेले दिसत नाही "शिवाजी महाराज -- काही रेखाचित्रे". रामदास कोठून आला या चित्रात? आणि तो म्हणे आदिलशाहीचा (इतिहास चुकला असेल तर करेक्शन करा मायबाप हो) हेर होता ! आता बाबासाहेबांचं फक्त लिखाण प्रमाण म्हणून घेतले असेल त्यांचे विचार नाही बदलणार त्याला मी काय करणार?
तो खराच शिवाजीचा गुरु होता याचे अजून लेटेस्ट काही पुरावे ज्यांच्या कडे असतील त्यांनी जरूर सादर करावेत, सदैव स्वागत आहे.

<strong><em>(संपादित)</em></strong>

कपिलमुनी's picture

13 Aug 2017 - 12:20 am | कपिलमुनी

म्हणे आदिलशाहीचा (इतिहास चुकला असेल तर करेक्शन करा मायबाप हो) हेर होता

याला काही पुरावा आहे का नुसताच म्हणे

अनुप ढेरे's picture

13 Aug 2017 - 9:50 am | अनुप ढेरे

मुनीवर, जाउ द्या. कुठे ब्रिगेडी चिखलात जाता?

अनुप ढेरे's picture

13 Aug 2017 - 9:56 am | अनुप ढेरे

भाऊ, तुम्हीच नवे इतिहास संशोधन वगैरे सुरुवात केलीत पहिल्यांदा. वर आता "आम्ही साधे शेतकरी आम्हाला कुठला इतिहासाचा गंध, मान्य आहे." असला कातडीबचाऊ पवित्रा कशाला घेता? त्यात शेतकरी सल्ले वगैरे असंबद्ध गोष्टी आणताय.

धडपड्या's picture

13 Aug 2017 - 4:54 pm | धडपड्या

भाऊ,

(संपादित) तुम्हीच घेऊन आला आहात ईथे...

फुकाच व्हिक्टिम कार्ड खेळत बसण्यापेक्षा, तुम्ही जे बोलला आहात, त्याचे पुरावे द्या, अन् करा की सगळ्यांची तोंडं बंद...

मुळातच धागा इतिहासाबद्दल नव्हता, तर चित्रकलेबद्दल होता.
चित्रांचा आस्वाद घेता येत नसेल, तर जायचं होतंत पुढच्या धाग्यावर...
उगाच त्यावर वाद निर्माण केलात आपण. त्यावर लोकांनी पुरावे मागितले, तर लगेच आकांडतांडव सुरु केलंत...

तुम्हाला इतिहासाचं बरच ज्ञान आहे, त्यामुळे अस्सल, दुय्यम, सपोर्टिव्ह, आणि तथाकथित वगैरे पुराव्यांबद्दल माहितच असेल आपल्याला...

आणि पुरावे पाहून, ते स्विकारण्याएवढे मिपाकर नक्कीच सूज्ञ आहेत...

तेव्हा वाट पाहतो आपल्या पुराव्यांची...

mayu4u's picture

14 Aug 2017 - 3:42 pm | mayu4u

(संपादित) मध्ये दगड मारून

ही अशी भाषा वाचून लक्षात आले आहेच आमच्या, तरी पण

भविष्यात अशी चूक होणार नाही, या कडे नक्की लक्ष देईल

पुरावे न देता विधाने करण्याच्या चुकीविषयी बोलत आहेत असे वाटते. तस्मात तशी चूक करूच नका.

२) घटना वास्तववादी असो नसो मला त्याच्याशी घेणे देणे नाही फक्त या चित्रामुळे सांगली मध्ये दंगल झाली होती, म्हणून माझ्या लेखी हे चित्र वादग्रस्त होते. अफझल खान काही माझा गतजन्मीचा जावई नव्हता रक्त खवळायला (इति- सायकलवाले).

शिवरायांनी स्वराज्याच्या शत्रुला मारून स्वराज्यावरील संकटाचे निर्दालन केले या घटनेशी तुम्हाला घेणे देणे नाही म्हणजे तुम्ही नक्की कोणत्या विचारधारेचे / सामाजिक घटकाचा भाग आहात हे तुमचे तुम्हाला माहिती असावे अशी अपेक्षा आहे - माहिती असल्यास असे विधान करणे किती धाडसाचे आहे हे तुम्हाला कळाले असावे अशी अपेक्षा आहे. माहिती नसल्यास माहिती मिळवा.

तुम्हाला आजच्या काळात झालेल्या एका दंगलीमुळे मूळ घटना वादग्रस्त वाटत आहे म्हणजे अफझुल्या तुमचा जावई नाही तर नक्की पूर्वज असावा. असो तुमचा दोष नाही. असंबंद्ध लिहून कोलांट्याउड्या मारणे मिपावर नवीन नाही. (चु.भू.दे.घे.)

बाकी "शिवाजी महाराजांची रेखाचित्रे" हा तुमच्या लेखी (संपादित) असेल तर तुमचा बिग्रेडी अजेंडा उघडा पडला आहे हे ही एक आहेच.

<<<<शिवरायांनी स्वराज्याच्या शत्रुला मारून स्वराज्यावरील संकटाचे निर्दालन केले या घटनेशी तुम्हाला घेणे देणे नाही>>>>
==>> स्वराजाचा शत्रू फक्त एकटा अफझलखानचं नव्हता. त्याला खोपडे देशमुखाने रसद पुरवली आणि कृष्णाजी भास्कर ने वकिली केली. कोथळा काढल्यावर, शिवरायांच्या कपाळावर कृष्णाजी ने वार केला होता. सगळी धेंडे तिथेच संपवली गेली. शिवाजी महाराजांनी त्या खानाचे सन्मानपूर्वक दफन पण केले.
राहिला प्रश्न देणे घेण्याचा, खानाचे, खोपड्यांचे आणि कृष्णाजी चे वंशज शोधून त्यांच्यावर मोहीम उघडू, अशी अपेक्षा आहे का?
----------------------------------------------
<< म्हणजे तुम्ही नक्की कोणत्या विचारधारेचे / सामाजिक घटकाचा भाग आहात हे तुमचे तुम्हाला माहिती असावे अशी अपेक्षा आहे>>>>>>
==>> मी एक भारतीय नागरिक आहे आणि भारतीय संविधान ही माझी विचारधारा आहे. तुमची विचारधारा ब्राह्मण्यवादी कावा ह्या प्रकारात मोडत असावी असे प्रकर्षाने जाणवत आहे.
----------------------------------------------
<<<माहिती असल्यास असे विधान करणे किती धाडसाचे आहे हे तुम्हाला कळाले असावे अशी अपेक्षा आहे. माहिती नसल्यास माहिती मिळवा.>>>
==>> धाडसाचे ?? फाशी वगैरे तर होणार नाही ना?? सध्या माहिती मिळवण्याची साधने माझ्याकडे कमी आहेत, मान्य करतो.
---------------------------------------------
<<<< तुम्हाला आजच्या काळात झालेल्या एका दंगलीमुळे मूळ घटना वादग्रस्त वाटत आहे >>>
==>> मी घटना वादग्रस्त होती असे म्हंटलोच नाही, ते चित्र वादग्रस्त होते.
---------------------------------------------
<<<<म्हणजे अफझुल्या तुमचा जावई नाही तर नक्की पूर्वज असावा. >>>
==>> मी 'गतजन्मीचा जावई' म्हंटले होते पूर्वज नोहे. तुम्ही जेनेटिकस मध्ये घुसला आहेत. तुमचा दोष नसावा संस्काराचा दोष असावा बहुतेक. कोणीतरी मला भाषा नीट वापरा असा इशारा दिला आहे. असो ..
--------------------------------------------
<<<<बाकी "शिवाजी महाराजांची रेखाचित्रे" हा तुमच्या लेखी <strong><em> (संपादित) </em></strong> असेल >>>
==>> चित्रांमध्ये शिवाजी महाराज किती जाग्यावर आहेत. जिथे आहेत तिथला आक्षेप अगोदरच मागे घेतला आहे.(कोथळा सोडून)
--------------------------------------------
<<<<तुमचा बिग्रेडी अजेंडा उघडा पडला आहे हे ही एक आहेच.>>>
==>> लोकांबद्दल मत तयार करण्याचे तुमचे कसब वाखण्याजोगे आहे. पण ब्राह्मण्यवादाचा अजेंडा उघडा पडत आहे याची काळजी करायला सुरवात करा.

राहिला प्रश्न देणे घेण्याचा, खानाचे, खोपड्यांचे आणि कृष्णाजी चे वंशज शोधून त्यांच्यावर मोहीम उघडू, अशी अपेक्षा आहे का?

"घटना वास्तववादी असो नसो मला त्याच्याशी घेणे देणे नाही" हे तुमचेच वाक्य आहे ना..? मग..? शिवरायांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेशी घेणे देणे नाही हे विधान तुमची विचारधारा दाखवत आहे.

मी एक भारतीय नागरिक आहे आणि भारतीय संविधान ही माझी विचारधारा आहे. तुमची विचारधारा ब्राह्मण्यवादी कावा ह्या प्रकारात मोडत असावी असे प्रकर्षाने जाणवत आहे.

पहिल्या वाक्यात "नाईलाजाने" हा शब्द अ‍ॅडवायला विसरलात का?
बाकी माझ्या विचारधारेची काळजी करू नका. "शिवराय आमचे दैवत" असला दावा वरपांगी करून मग त्यांच्याच आयुष्यातील महत्वाच्या घटनेला तुच्छ लेखणे तुमच्या बिग्रेडी मानसीकतेला बरोब्बर शोभते. फक्त ते तुमच्या बोलवत्या धन्याला मान्य होईल का ते बघा.

धाडसाचे ?? फाशी वगैरे तर होणार नाही ना?? सध्या माहिती मिळवण्याची साधने माझ्याकडे कमी आहेत, मान्य करतो.

माहिती मिळवण्याची साधने कमी असताना बेलाशक हवेत आरोप करणे कसे काय जमते बुवा..?

मी घटना वादग्रस्त होती असे म्हंटलोच नाही, ते चित्र वादग्रस्त होते.

वरचे चित्र घटलेली घटनाच दाखवत आहे ना..? मग त्यात वादग्रस्त काय आहे..? "शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढून त्याला ठार मारले" ही घटना आणि वरील चित्र यात नक्की काय फरक आहे सांगा. तुम्ही सांगू शकत नसल्यास हे ही विधान बिनशर्त मागे घ्या.

मी 'गतजन्मीचा जावई' म्हंटले होते पूर्वज नोहे. तुम्ही जेनेटिकस मध्ये घुसला आहेत. तुमचा दोष नसावा संस्काराचा दोष असावा बहुतेक. कोणीतरी मला भाषा नीट वापरा असा इशारा दिला आहे. असो ..

पुन्हा तेच. स्वराज्याच्या शत्रुचा कोथळा बघून तुमच्या भावना दुखून पार घटना वादग्रस्त ठरवायला निघाले आहात. यातून तुमच्यावर झालेले देशद्रोही संस्कार दिसत आहेतच. त्यामुळे त्याची काळजी पहिल्यांदा करा. मग बाकीच्यांची उठाठेव करा.

चित्रांमध्ये शिवाजी महाराज किती जाग्यावर आहेत. जिथे आहेत तिथला आक्षेप अगोदरच मागे घेतला आहे.(कोथळा सोडून)

कोथळ्यामुळे नक्की काय फरक पडतो आहे म्हणे..? नै तुमच्या धन्याला अडचणी येत असल्यास तसे सांगा. मी विरोध करणे सोडून देतो.

लोकांबद्दल मत तयार करण्याचे तुमचे कसब वाखण्याजोगे आहे. पण ब्राह्मण्यवादाचा अजेंडा उघडा पडत आहे याची काळजी करायला सुरवात करा.

धन्यवाद. माझा मुळात अजेंडाच नाही. असलाच तर तुमच्यासारख्या स्वराज्याला विनाकारण कमीपणा आणू पाहणार्‍या बिग्रेडी लोकांचा बुरखा फाडणे हा आहे.
बुरखा फाडणे हा वाक्प्रचार आहे हां - लगेच तुमची. भावनांची गळवे फुटायची.

चौथा कोनाडा's picture

10 Aug 2017 - 10:29 pm | चौथा कोनाडा

सुंदर चित्रं आहेत. हावभाव खुप जिवन्त आलेत, अगदी ओरिजनल चित्रांप्रमाणे !

पहिले चित्र पाहिल्याचे स्मरते, जिजाऊचे आहे ? नक्कि आठवत नाही. चित्रे वादग्रत का असावित ?

विशुमित's picture

10 Aug 2017 - 10:48 pm | विशुमित

चित्रे वादग्रत का असावित ?

==>> याला येड घेऊन पेडगावला जाणे म्हणतात.

चांदणे संदीप's picture

11 Aug 2017 - 11:51 am | चांदणे संदीप

आता जरा सांगण्याची कृपा करता का, की नेमकी कोणती चित्रे वादग्रस्त आहेत आणि कशामुळे?

आ. न.
Sandy

पुरावे देऊन विशुमित जी सप्रमाण सिद्ध करणारेत की ही चित्रं वादग्रस्त आहेत.

चित्रे वादग्रत का असावित ?

अफझुल्याचे रक्त बघून त्यांच्या भावना दुखावल्या असाव्यात.

प्रसाद_१९८२'s picture

11 Aug 2017 - 12:54 pm | प्रसाद_१९८२

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'महाराज' या पुस्तकात ज्येष्ठ आणि अत्यंत प्रतिभावंत चित्रकार दीनानाथ दलाल यांनी काढलेली असंख्य अप्रतिम चित्रे आहेत.

==

लेखातील वरिल वाक्य कुणी वाचली नाहीत का?
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेच्या नावामुळे ती चित्र वादग्रस्त झालेत.

नया है वह's picture

11 Aug 2017 - 2:35 pm | नया है वह

चित्रं आवडली.

बबन ताम्बे's picture

13 Aug 2017 - 11:10 am | बबन ताम्बे

चित्रकाराला उत्तेजन द्यायचे सोडून बाकीचे वाद घालण्यात अर्थ नाही. जावेद अखतर एकदा टी व्ही म्हणाले ते अगदी बरोबर आहे. ते म्हणाले की शोलेतला जो सीन आहे , ज्यात धर्मेंद्र महादेवाच्या मूर्तीमागे महादेव बनून डायलॉग म्हणत असतो. त्यावेळची जनता म्हणा किंवा पुढारी वा वृत्तपत्रे म्हणा, कुणीही त्याबद्दल आक्षेप नोंदवला नव्हता . उलट सर्वांनी तो सीन एन्जॉय केला. शोले जर आजच्या जमान्यात आला असता तर निश्चितच त्या सीनवर आक्षेप नोंदवण्यात आला असता.
आज जातीजातीत द्वेष आहे. संधीसाधू पुढारी त्यात तेल ओतत आहेत. मेडिया फालतू पुढाऱ्यांना आणून आगीत तेल ओतणाऱ्या चर्चा घडवून आणत आहेत. समाजाला योग्य दिशा दाखवणारा आज कुणीच दिसत नाही.
मिपावर देखील चांगले , कसदार साहित्य, कला फार कमी बघायला मिळायला लागलेय. त्याऐवजी द्वेषमुलक चर्चा जास्त दिसतात.
महाराजांनी अफजलखानाला मारले ही वस्तुस्थिती आहे. ते चित्रात दाखवले म्हणून काही आभाळ कोसळत नाही.

एकंदर चांगली चित्रे काढली आहेत . इथूनपुढे बघून न काढता पुढील स्वनिर्मित कलाकारीला शुभेच्छा !!

सत्तर च्या दशकातील मूळ पुस्तक आणि चित्रे

मी 99-2000 मध्ये पुस्तक पाहून काही प्रयत्न केले.
2009 मध्ये शिव राज्याभिषेकाच्या निमित्ताने इथे कला दालनात माझी हौशी कला सादर केली.
मिपा तसे नवीन होते. जाणत्यांच्या प्रतिक्रियांचा आनंद.

खूप कौतुक अपेक्षित नव्हते. मला माझ्या मर्यादा माहिती आहेत.
आनंद वाटण्याने वाढतो इतकाच उद्देश.

काही कारणाने धागा वर आला. तर मुद्दाम आणि पूर्ण अकारण वातावरण खराब करणे हा उद्देश पाहून आधी संताप आला आणि नंतर उदासही वाटले.

पुस्तकतली जी चित्रे आवडली आणि जमली ती काढली. जी 2009 मध्ये सुस्थितीत होती ती इथे टाकली.

१ देवगिरी यादव हे तेराव्या शतकातले. महाराजांच्या तीनशे वर्षे आधी.
काही न वाचता, समजून न घेता आधी जिजाऊ आणि मग , माता भगिनी वगैरे पूर्ण संबंध नसलेल्या गोष्टी फक्तं मला आणि चित्रे आवडली त्यांना त्रास देण्यासाठी केल्या आहेत असं मला वाटतं. याचा चित्र, कला, त्या मागच्या भावना यांच्याशी काहीही संबंध नाही.

२. अफझल खान वधाचे चित्र अतिशय सुंदर आहे. बारकावे, चेहऱ्यावरचे भाव, कपडे, बिचवा अनेक गोष्टी. मला ते थोडे तरी जमले याचा अभिमान आहे.
मिरज घटना नंतर झाली. म्हणून ते काढून टाकावे का असे घडले नाही असे मानावे?

३. रामदासांचे चित्र पुस्तकात शेवटी आहे.
राज्याभिषेकाच्या जवळ
आनंद वन भुवनी म्हणून. महाराष्ट्राला छत्रपती राजा लाभला याचा आनंद असे ते चित्र आहे.
महाराजांचे गुरू म्हणून नव्हे.
पण स्वतः ला हवे तेच पहायचे आहे.

देवगिरी चा संदर्भ समजला नाही तर पुस्तकात बघणार कोण. कारण चांगला उद्देशच नाही.
रामदासांच्या जवळ संत तुकारामांचे याहूनही अप्रतिम चित्र पुस्तकात आहे.
तेही मी काढले होते. मिपावर चित्र देण्याच्या अनेक वर्षे आधी मी ते एका गुरूतुल्य आणि तुकारामांचे अभंग खूप आवडणार्‍या शिक्षकांना गुरुपौर्णिमेला भेट दिले. तेव्हा कॅमेरा सहज उपलब्ध नसल्याने फोटो काढून ठेवला नव्हता.

मूळ विचाराचा इतक्या हीन ब्रिगेडी वृत्तीने विचका केला.
लोकांना त्रास झाला की आनंद होणारी किडकीमनोवृत्ती मिपावर पाहून विषण्ण झाले.

वेळे अभावी दूर होतो तेच उत्तम.

शैलेन्द्र's picture

14 Aug 2017 - 6:57 pm | शैलेन्द्र

+11111

वेळे अभावी दूर होतो तेच उत्तम.

थांब रे.. ही बिग्रेडी पिलावळ यासाठीच जन्म घेते, खोटे बोलते आणि पुरावे मागितली की फटीत जाऊन लपते. यांच्याकडे दुर्लक्ष केले तरी आंम्हीच जिंकलो असा खोटा दंगा करायला पुन्हा मोकळेच.

(संपादित)

अनुप ढेरे's picture

14 Aug 2017 - 8:10 pm | अनुप ढेरे

किडकीमनोवृत्ती

अगदी बरोब्बर वर्णन.

पिलीयन रायडर's picture

14 Aug 2017 - 7:52 pm | पिलीयन रायडर

बाकी वाद चालु देत पण समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख आवडला नाही. ते हेर असतील वा नसतील, तुम्ही पुरावे शोधत बसा. पण त्यांचे नुसते साहित्य जरी वाचले तरी त्यांच्या बद्दल आदर का वाटला पाहिजे हे कळेल. मी विशुमित ह्यांच्या प्रतिसादाची इथेच जाहिर तक्रार करतेय. संपादकांनी दखल घ्यावी.

पिलीयन रायडर's picture

14 Aug 2017 - 7:56 pm | पिलीयन रायडर

अनेकांना गुरुस्थानी असणार्‍या व्यक्तिंचा उल्लेख जाणीवपुर्वक एकेरी करुन वातावरण दुषित करण्याचा हा प्रयत्न वाटतो.

हे राहिले.

अनेकांना गुरुस्थानी असणार्‍या व्यक्तिंचा उल्लेख मी एकेरी करण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर सखेद माफी मागतो..!!
पण 'हेर' असण्याचे विधान कायम आहे.
पुरावे बद्दल बोललं तर ही प्रारंभिक माहिती आहे आणि ७-८ महिन्यामध्ये पुराव्या दाखल नवी माहिती लोकांसमोर येईल. मी कोणते ही विधान हवेत करत नाही. ठोस माहिती माझ्याकडे आहे. थोडी प्रतीक्षा करा. त्यात अजून कोणाला समीक्षा करायची असेल तर त्याचे स्वागत आहे.

@मैत्र जी- ""महाराजांबद्दल असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जी चित्रं सहज मनाला आवडली ती घेतली आहेत. कृपया यावरून वाद नसावेत.""
या तुमच्या विधानाचा मी मान ठेवायला पाहिजे होता. त्याबद्दल क्षमस्व..!!

विशुमित, ब्रिगेड, खोपडे , अफझुल्या या वर कोणाला काथ्या कुटायचा असेल तर त्यांनी दुसरा धागा काढा आणि धागा लेखकाला यातून मोकळे करा ही विनंती.

पिलीयन रायडर's picture

14 Aug 2017 - 9:11 pm | पिलीयन रायडर

ठोस माहिती आल्याशिवाय कशाला मग अशी वादग्रस्त विधाने करता?

तेजस आठवले's picture

14 Aug 2017 - 10:07 pm | तेजस आठवले

+1

अनेकांना गुरुस्थानी असणार्‍या व्यक्तिंचा उल्लेख मी एकेरी करण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर सखेद माफी मागतो..!!

@मैत्र जी- ""महाराजांबद्दल असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जी चित्रं सहज मनाला आवडली ती घेतली आहेत. कृपया यावरून वाद नसावेत.""
या तुमच्या विधानाचा मी मान ठेवायला पाहिजे होता. त्याबद्दल क्षमस्व..!!

मी ही या धाग्यावर तुम्हाला प्रत्युत्तर देणे बंद करत आहे.

श्रीमंत कोकाटे?

तेजस आठवले's picture

14 Aug 2017 - 10:38 pm | तेजस आठवले

मलापण हा एकेरी उल्लेख प्रचंड खटकला होता. रामदास स्वामींची ग्रंथसंपदा बघावी ही तुम्हाला विनंती.
https://questraveler.com/2016/08/23/shivtharghal-a-cave-of-wisdom/ ह्या साईट वर गेलात की रामदास स्वामींनी विजापूरहून सरदार निघाला आहे हे सांकेतिक भाषेत काव्याद्वारे सूचित केले होते ते पण बघा. तुम्हाला त्यांना हेर म्हणायचे असेल तर तसे पण ठाम पुराव्याशिवाय तुम्ही हे विधान कसे केलेत ?

पुढचा प्रतिसाद सगळ्यांसाठी:
आपण सर्व मिपाकर कळत नकळत कोणाच्या ना कोणाच्या कळपात ओढले जातोय आणि ह्या गोष्टींचे प्रतिबिंब जवळ जवळ प्रत्येक धाग्यात पडते आहे. कोथिंबिरीच्या जूडीत खूप जास्त कचरा असेल तर ती निवडायचा कंटाळा येतो आणि सर्व जूडीच टाकून दिली जाते. प्रत्येक धाग्यात कोणी ना कोणीतरी विषयाला धरून नसलेले प्रतिसाद देतात आणि आपला अजेन्डा पुढे रेटायचा प्रयत्न करतात. त्याला प्रतिसाद म्हणून दुसऱ्या बाजूचे अजेन्डाधारक प्रतिसाद देतात आणि स्कोर सेटलींगचा प्रयत्न केला जातो.अश्या गोष्टींमुळे लोक धागेच वाचायचे बंद करतील.शिवाजी महाराजांची चित्रे एवढाच विषय असलेला धागा कुठच्या कुठे गेला. धागालेखाचे आडनाव / जात माहिती असती तर सोयीस्कररीत्या ती वापरून गदारोळ माजवला गेलाच नसता ह्याची खात्री आहे का ? मुक्त संकेतस्थळ आहे म्हणून काहीही चालवून घेणे बंद केले पाहिजे असे कधी कधी मनातून वाटते.

माझ्या वरील संपूर्ण प्रतिसादामुळे कोणाची मने दुखावली गेली असतील तर मी माफी मागतो. पण आपण सर्वानीच काही गोष्टींवर विचार करण्याची गरज आहे.

विशुमित's picture

14 Aug 2017 - 10:56 pm | विशुमित

+१
दिलेली लिंक वाचतो.

प्रत्येक धाग्यात कोणी ना कोणीतरी विषयाला धरून नसलेले प्रतिसाद देतात आणि आपला अजेन्डा पुढे रेटायचा प्रयत्न करतात. त्याला प्रतिसाद म्हणून दुसऱ्या बाजूचे अजेन्डाधारक प्रतिसाद देतात आणि स्कोर सेटलींगचा प्रयत्न केला जातो.अश्या गोष्टींमुळे लोक धागेच वाचायचे बंद करतील.शिवाजी महाराजांची चित्रे एवढाच विषय असलेला धागा कुठच्या कुठे गेला. धागालेखाचे आडनाव / जात माहिती असती तर सोयीस्कररीत्या ती वापरून गदारोळ माजवला गेलाच नसता ह्याची खात्री आहे का ? मुक्त संकेतस्थळ आहे म्हणून काहीही चालवून घेणे बंद केले पाहिजे असे कधी कधी मनातून वाटते.

सहमत.

मी या धाग्यावर प्रतिसाद दिले आहेत म्हणून माझी भूमीका मांडतो.

सर्वप्रथम हा जुना धागा वर आला. त्यावर विषुमीत यांनी "सर्वच चित्रे वादग्रस्त आहेत" अशा शेरा मारला आणि नंतर टप्प्याटप्प्याने विधाने मागे घेतली व शेवटी "मी सुरूवातीलाच प्रतिसाद द्यायला नको होता" अशीही मखलाशी करून माफी मागितली. मात्र इतके कळते तर मुळात वाद निर्माण कशाला करायचा हे कळत नाही का..?

मिपाकर विरोध नोंदवण्यात तत्पर आहेत म्हणून या धाग्यावरील वादाचा निकाल लागला. मात्र अकारण चिखलफेकीला सुरूवात केली नसती तर विरूद्ध बाजूने प्रत्युत्तर मिळण्याचा प्रश्नच आला नसताच.

मी आणि माझ्यासारखे अनेकजण पूर्वी "जाऊद्या, दुर्लक्ष करून अनुल्लेखाने मारा" अशा मोडवर होतेच. मात्र दुर्लक्ष किंवा उत्तर मिळाले नाही म्हणजे आंम्ही सांगतो तेच बरोबर अशा सोयीस्कर भूमीका घेऊन नाचणारे पब्लीक असेल तर अत्यंत नाईलाजाने त्यांच्या पातळीवर उतरून उत्तर द्यावे लागते. अर्थात या लोकांच्या पळवाटा ठरलेल्या असतात आणि समोरच्यावर आपण आरोप करतो तसे आरोप आपल्यावर होऊ शकतात हे यांना पचवता येत नाही हेच दिसून आलेले आहे.

अनुप ढेरे's picture

14 Aug 2017 - 10:55 pm | अनुप ढेरे

७-८ महिन्यामध्ये पुराव्या दाखल नवी माहिती लोकांसमोर येईल.

पुरावे कसे सादर करणार या वेळी? भांडारकरवर हल्ला करून का संभाजी बागेतला पुतळा उखडून? का या वेळेला काही नवी सर्कस?

धडपड्या's picture

14 Aug 2017 - 11:13 pm | धडपड्या

अहो, ते भोकाट्या, अन् येडेकर बीग्रेडच्या जन्मापासून कोकलताहेत या विषयावर...

अजूनपर्यंत एक चिटोरा नाही दिलाय पुराव्यादाखल...
सहा सात महिन्यांत असे काय दिवे लावणार आहेत?

बीग्रेड्यांचे पुरावे म्हणजे रात्री पावशेर नवटाक झोकून आलेल्या झोपेत पडलेली स्वप्न...!!!

तुम्ही त्यांच्यातले नसावेत, एवढीच अपेक्षा...

सुखीमाणूस's picture

14 Aug 2017 - 11:29 pm | सुखीमाणूस

मलाही रामदास स्वामीन्चा एकेरी उल्लेख खटकला.
काय वेळ आली आहे. जे स्वराज्याचे हितचिन्तक होते त्याना खलनायक ठरवून, जे शत्रू होते त्यान्चे उदात्तीकरण चालू आहे़.
जर सगळेच ब्राम्हण वाइट होते किवा असतात तर आज शिवाजी महाराजांबद्दल आदर बाळगणारा ब्राम्हण समाज दिसला नसता. मला तर दादोजी कोन्डदेव ब्राम्हण होते हे पुतळा हटवला तेव्हा कळले.
हे सगळे खूप वाइट चालू आहे.
चित्रकार आपली चित्रे छान आहेत. अजून येउद्यात. तुम्ही सगळ्या गदारोळाकडे दुर्लक्ष करा.