मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताज्या घडामोडी: भाग ८

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद आल्याने प्रतिसाद एका पानात रहावे यासाठी नवीन धागा सुरु करीत आहे. धाग्याची सुरूवात http://indianexpress.com/article/india/gujarat-congress-three-mlas-join-bjp-rajya-sabha-elections-shankersinh-vaghela/ या बातमीने करीत आहे. गुजरातमध्ये वाघेलांपाठोपाठ अजून ३ कॉग्रेस आमदारांनी (बळवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल, पी आय पटेल) राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. डिसेंबर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या ३ आमदारांपैकी २ पटेल आहेत. मागील दीडदोन वर्षे पटेलांना राखीव जागा द्यावात यासाठी गुजरात पेटविण्याचे प्रयत्न झाले. त्याचा काहीसा फटका भाजपला बसला होता. या पार्श्वभूमीवर २ पटेल आमदारांनी भाजपत जाणे ही भाजपसाठी आनंदाची बातमी आहे.

वाचने 42803 वाचनखूण प्रतिक्रिया 215

In reply to by अभ्या..

श्रीगुरुजी गुरुवार, 07/27/2017 - 20:51
धाग्याचे शीर्षक बदलण्यासाठी भेटा अथवा लिहा: डॉ. सुहास म्हात्रे/नीलकांत, संपादक - डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडॉटमिसळपावडॉटकॉम.

In reply to by वरुण मोहिते

श्रीगुरुजी गुरुवार, 07/27/2017 - 22:46
राजकारणाला माके मुरडणारे व विशेषतः भाजपला शिव्या देणारेच भाजप व राजकारण विषयीच्या बातम्या व प्रतिसाद अतिशय उत्सुकतेने व आतुरतेने वाचतात असा आमचा अनुभव आहे.

In reply to by अभ्या..

सुज्ञ Fri, 07/28/2017 - 17:56
भाग 7 व हा भाग यावरील काही ठराविक लोकांचे प्रतिसाद बघितले की जुन्या धाग्यावर व्हागोबाची पीरगाळलेली शेपटी आजून चांगलीच दुखत्ये असं वाटतय. स्कोर सेटलींगचा अत्यंत हिणकस प्रकार

गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/27/2017 - 22:00
जर का भाजपचे आमदार बाहेर पडले असते आणि भाजपला झटका असे लिहिले असते तर कुणाचे मुखपत्र झाले असते हे?

In reply to by मोदक

गॅरी ट्रुमन Fri, 07/28/2017 - 10:38
"आई भवानीच्या कृपेने भाजपाचा कोथळा काढला" असे काहीतरी पण जोडा यात..
मोदकराव इतके हसवू नका हो. मी सकाळी बसमध्ये असताना हा प्रतिसाद फोनवर वाचला आणि अक्षरशः पोट धरधरून हसायला यायला लागले. आजूबाजूच्या एकादोघांनी हा ट्रुमन असा काय वेड्यासारखा एकटाच हसतोय अशा प्रकारचे कटाक्षही टाकले माझ्यावर :)

गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/27/2017 - 22:19
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एन.धरमसिंग यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी बंगलोरमध्ये निधन झाले आहे. 1 ते मे २००४ ते जानेवारी २००६ दरम्यान कर्नाटकमधील काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युती सरकारचे मुख्यमंत्री होते. ते १९७८ पासून २००४ पर्यंतच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये गुलबर्गा जिल्ह्यातील जीवरगी विधानसभा मतदारसंघातून कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले होते. २००९ मध्ये ते बिदर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द फार लक्षात राहण्यासारखी ठरली नाही. त्यांचे सरकार हे काँग्रेस आणि देवेगौडांच्या धर्मनिरपेक्ष जनता दल या युतीचे ते सरकार होते. देवेगौडांनी अपेक्षेप्रमाणे धरमसिंगांना सुखाने कारभार करू दिला नाही आणि जानेवारी २००६ मध्ये त्यांचा पाठिंबा काढला आणि भाजपच्या मदतीने आपल्या मुलाला-- एच.डी.कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपदावर बसविले. मुळात त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले ही पण एका प्रकारे लॉटरीच लागली होती असे म्हणायलाही हरकत नसावी. २००४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्रिशंकू विधानसभा आली. १९९९ ते २००४ या दरम्यान मुख्यमंत्री असलेले एस.एम.कृष्णा हे २००४ नंतरही मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार ठरले असते. पण ते होते देवेगौडांच्या 'वोक्कलिंग' समाजातील. आपल्याच समाजातील दुसर्‍या पक्षातील नेत्याला सरकार बनवायला पाठिंबा दिला तर तो नेता आपल्या जातीच्या हक्काच्या 'व्होटबँकवर' डल्ला मारेल या भितीने देवेगौडांनी एस.एम.कृष्णा सोडून अन्य नेत्याला पाठिंबा देऊ असे म्हटले. वरकरणी कारण दिले की एस.एम.कृष्णांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला विधानसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळण्यात अपयश आले असल्यामुळे लोकांनी त्यांचे नेतृत्व नाकारले. पण या गोष्टीमागचा खरा हेतू नक्कीच वेगळा होता असे म्हणायला जागा आहे. असो. एन.धरमसिंग यांना श्रध्दांजली

थिटे मास्तर Fri, 07/28/2017 - 03:46
ईतक्यात बातम्या बघताय का स्पेशली हिंदि. मज्जा येतेय आनंद येतोय यार ह्या व्रुत्तवाचकांच्या (news reader) चेहर्‍यावरचे भाव बघताना. विषेश म्हणजे ते व्रुत्त वाचतांना त्यांना अंतर्मनात ज्या वेदना होतायत त्या ते चेहर्‍यावर येण्यापासुन रोखु शकत नाहि. राजदिप सरदेसाई, पुण्यप्रसुन बाजपेयि, रबिश कुमार, वग्रे वग्रे.. राडिया क्विन बरखा दत्त सध्या कुठे दिसत नाहिये अन्यथा हिचे भाव तर बघण्यासारखे राहिले असते. राजदिप सरदेसाई तर आज चक्क पटन्याला लालुंच्या गोठ्यात गेला होता यादव कुळावर (ललवा का खानदान) कसा घटनात्मक अन्याय झालाय ते दाखवायला :) कंबख्त ये चाट्टुकारी ईंसान से क्या क्या करवाती है.

धर्मराजमुटके Fri, 07/28/2017 - 06:46
मी ताज्या घडामोडी भाग ७ मधे देखील तुमच्या एका प्रतिक्रियेवर हा प्रश्न विचारला होता पण बहुधा तो तुमच्या नजरचुकीने बघावयाचा राहुन गेला. सकाळ वृत्तपत्राच्या बातम्यांवर 'चेतन रावळ' हा इसम प्रतिक्रिया देत असतो. तुमच्या प्रतिक्रियेतील शब्दन शब्द कॉपी पेस्ट केल्यासारखा दिसतोय. जर ते तुम्हीच नसाल तर जालीय चौरकर्म फारच वाढलय असे वाटते. पुर्वी लोक फक्त कथा, कविता चोरायचे आता प्रतिक्रिया पण चोरतात हे खरोखरीच फार दुख:द आहे. ही बातमी आणि ही बातमी हे स्क्रीनशॉटस

In reply to by धर्मराजमुटके

मोदक Fri, 07/28/2017 - 08:51
ते वेगळे, हे वेगळे. जालीय चौर्यकर्माबद्दल फारसे वाईट वाटून घेऊ नका. इथे तर फक्त प्रतिक्रिया जात आहेत. माझे रावेरखेडीचे फोटो, एंटबेवरचा लेख असे बरेच कांही सध्या फिरत आहे. किती काय काय जपणार आणि त्रास करून घेणार..?

In reply to by धर्मराजमुटके

गॅरी ट्रुमन Fri, 07/28/2017 - 10:35
धन्यवाद धर्मराजमुटके.चेतन रावळ असे काही करत आहेत हे माहित नव्हते. अर्थातच तो मी नव्हेच. मी मिपावर इतर अनेक मिपाकरांइतक्या प्रमाणात फार इतर मिपाकरांबरोबर मिसळलेलो नाही. तरीही काही मिपाकरांना मी भेटलेलो आहे आणि अनेक माझे फेसबुक फ्रेंडही आहेत. ते सगळे 'तो मी नव्हेच' हे नक्कीच सांगू शकतील :) मोदकरावांनी म्हटल्याप्रमाणे जालीय चौर्याविषयी फार काही करता येणार नाही. त्यामुळे दुर्लक्ष करणे उत्तम. परत एकदा धन्यवाद.

अत्रे Fri, 07/28/2017 - 09:38
http://www.deccanchronicle.com/nation/current-affairs/260717/are-you-mad-are-you-drunk-ap-cm-to-man-who-asked-about-power-cuts.html
If you don’t like my administration, do not take pensions doled out by my government nor walk on the roads laid by my government,” Naidu had said.
चंद्राबाबू हा भरपूर माजलेला माणूस दिसतोय.

भाजप विरोधकांची जळफळाट बघुण मज्जा येते ,बीजेपी सपोर्टर काँग्रेस ला कंटाळलेला आम आदमी ह्यांचे झालेले काँग्रेसी काळातील दमन हेच ह्या बाबीला जिम्मेदार असावे हे हि समजुन घेणे.

In reply to by मोदक

अभिजीत अवलिया Fri, 07/28/2017 - 13:38
बहुतेक राजीनामा देतील. शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ किंवा पत्नी कलासूम पंतप्रधान होऊ शकतील असे सकाळ मध्ये आलेय.

श्रीगुरुजी Fri, 07/28/2017 - 12:53
https://www.dawn.com/news/1348191/supreme-court-disqualifies-prime-minister-nawaz-sharif-in-unanimous-verdict नवाझ शरीफची गच्छंती. त्याच्या जागी नवीन पंतप्रधान येणार का लष्करी राजवट??????

गॅरी ट्रुमन Fri, 07/28/2017 - 13:14
बिहार विधानसभेत आज सकाळी नितीशकुमारांनी त्यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडला.त्यावर मतदान झाले आणि नितीशकुमारांच्या बाजूने १३१ मते आली. नितीशकुमार जिंकले.

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी Fri, 07/28/2017 - 14:00
भाजपसोबत हातमिळवणी करून नितीश कुमार यांनी एनडीएसोबत घरोबा केला असला तरी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत युपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांनाच पाठिंबा देणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश यांनी आपल्या पक्षाची भूमिका बिहार आणि राष्ट्रीय राजकारणाच्या अनुषगांने वेगळी असल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजे नितीशकुमार अजूनही दोन्ही नावांवर पाय ठेवून उभे आहेत. सध्या भाजपच्या नावेत झुकलेले दिसले तरी नवीन संधी दिसताच भाजपच्या नावेवरचा पाय काढून घेऊन संपुआच्या नावेत उडी मारायची तयारी आहे. पक्षाची भूमिका बिहार आणि राष्ट्रीय राजकारणाच्या अनुषगांने वेगळी आहे म्हणजेच बिहारमध्ये भाजपबरोबर असले तरी कोणत्याही क्षणी भाजपचा हात सोडून संपुआबरोबर नव्याने घरोबा करण्याची तयारी. जितक्या कमी वेळात नितीशकुमारांनी आहे तो घरोबा सोडून नवीन घरोबा केला (आधी २०१३ मध्ये आणि आता २०१७ मध्ये) त्यापेक्षा जास्त वेळ तीन वेळा तलाक, तलाक म्हणून काडीमोड घ्यायला लागत असेल. नितीशकुमारांनी २०१३ मध्ये एका क्षणात भाजपला लाथाडून लालूसारख्या कुशासन, भ्रष्टाचार, जंगलराज फेम शत्रूशी घरोबा केला होता, तेव्हाच हा माणूस मनातून बराचसा उतरला होता. परवाच्या घटनेमुळे तर या माणसाविषयी असलेला उरलासुरला आदरसुद्धा पूर्ण नष्ट झाला आहे. अर्थात लालूविषयी अजिबात सहानुभूती नाही, परंतु लालूच्या पक्षाला एका क्षणात लाथाडणे व ज्यापक्षाविरूद्ध २०१५ मध्ये अत्यंत तिखट प्रचार केला त्याचा हात एका क्षणात हातात घेणे ही अत्यंत विश्वासघातकी कृती आहे. नितीशकुमारांनी डोळा मारताक्षणीच भा़जपने थेट त्यांच्या गळ्यात वरमाला घालावी यामुळे भाजपचाही राग आला आहे. हा नवीन घरोबा लवकरात मोडावा व तिथे नव्याने निवडणुक व्हावी अशी माझी इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गॅरी ट्रुमन Fri, 07/28/2017 - 17:20
बरोबर आहे. पण अन्य प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे मोदीविरोध या एकमेव अजेंड्यावर उभी राहिलेली कोणतीही विरोधी पक्षांची आघाडी स्थिर होऊच शकणार नाही हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातूनच अशा आघाडीला अन्यथा मतांची बेरीज होऊन जितकी मते मिळू शकली असती ती कापणे हा या उद्योगाचा मुख्य हेतू आहे असे दिसते. बहुदा तुम्हाला ते म्हणणे पटलेले दिसत नाही. सगळे विरोधक एकत्र आले आणि त्यांच्या मतांची बेरीज झाली तर २०१९ च्या निवडणुका अजिबात सोप्या जाणार नाहीत. दुसरे म्हणजे २०१४ मध्ये सुरवातीला देवेन्द्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा घेतला होता त्यावेळी मिपावर जवळपास सगळ्यांनी त्यावर टिका केली होती पण तुम्हाला ते मान्य होते असे वाटले. शिवसेनेचे जोखड उतरवायला तसे करणे गरजेचे होते अशी त्याची कारणमिमांसा तुम्ही दिली होतीत असेही वाचल्याचे आठवते. ती कारणमिमांसा कोणाला पटेल किंवा पटणार नाही पण निदान तसे पाऊल उचलण्यामागे काहीतरी दुसरा हेतू होता हे तुम्ही मान्य करत होतात. मग आताही तसाच दुसरा हेतू आहे हे तुम्ही मान्य करत नाही याचे आश्चर्य वाटत आहे. नितीशकुमार आणि भाजप १७ वर्षे एकत्र होते. त्या काळात काहीही कुरबुरी झाल्या नव्हत्या. तसेच नितीशकुमार हे कुशल प्रशासक आहेत (सुशासनबाबू) ही प्रतिमा देशात आहे. प्रत्यक्षात ते तसे आहेत की नाही ही गोष्ट वेगळी. त्यांची प्रतिमा तशी आहे हे पण तितकेच खरे. मधल्या काळात काही कारणाने भाजप आणि नितीशकुमारमध्ये दुरावा आला असला तरी बाकी गोष्टी लक्षात घेता परत हातमिळवणी करायला हरकत नसावी. विशेषतः स्वतः नरेंद्र मोदींनी ज्या पक्षाला 'नॅचरली करप्ट पार्टी' असे म्हटले होते त्याच्याशीच हातमिळवणी करण्यापेक्षा तर ते वाईट नाही ना? मुख्यमंत्री असताना नितीशनी लालू आणि कुटुंबियांना काही संरक्षण दिले किंवा त्यांच्या विरूध्दचे भ्रष्टाचाराचे खटले बंद व्हावेत यासाठी काही प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. कितीही काहीही झाले तरी काकांच्या पक्षापेक्षा भ्रष्ट नितीशकुमार नाहीत असे मानायला जागा आहे. तेव्हा २०१४ मध्ये तुम्ही जर राष्ट्रवादीशी छुपी हातमिळवणी करण्यात काही गैर आहे असे मानत नव्हतात तर आता २०१७ मध्ये राष्ट्रवादीपेक्षा बराच जास्त चांगल्या (आणि पूर्वी १७ वर्षे बरोबर असलेल्या) पक्षाबरोबर हातमिळवणी करणे चुकीचे आहे हे मानत आहात ही गोष्ट मात्र हजम झाली नाही. हा थोडा इगोचा मामला आहे? म्हणजे इतकी वर्षे शिवसेनेला विनाकारण मोठ्या भावाचा दर्जा मिळाला तो इगो दुखावला म्हणून शिवसेनेला जागा दाखवून द्यायची आणि त्यासाठी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणे योग्य. पण नितीशकुमारांनी २०१३ मध्ये साथ सोडली म्हणून परत इगो दुखावला गेला म्हणून आता त्यांना परत घेणे चुकीचे आहे असे वाटत आहे का? राजकारण अशा इगोपेक्षा बरेच काही जास्त आहे. मोठे ध्येय साधण्यासाठी काही गोष्टी करायला लागल्या तरी कराव्या लागतात. अटलबिहारी वाजपेयी असताना असे म्हटले जात होते की एन.डी.ए ला २७२ जागा आल्या नाहीत तर त्यांचे सरकार येणे अशक्य. आता अशी परिस्थिती आहे की २०१९ मध्ये भाजपला २७२ जागा आल्या नाहीत तर मोदी परत पंतप्रधान बनणे अशक्य आहे. म्हणजे नितीशकुमारांनी २०१३ मध्ये धोका दिला म्हणून ते धरून ठेऊन २०१९ मध्ये ममता किंवा केजरीवाल किंवा तत्सम कुठल्यातरी थर्डक्लास माणसाला पंतप्रधान (आणि कदाचित कन्हैय्याला मंत्री) बनायची शक्यता मोकळी ठेवायची का? ही गोष्ट काही समजली नाही. आणि त्यातून नितीशना धडा शिकवायचा असेल तर तो शिकवता येईलच. तसा मोदी-शहांचा प्लॅन नसेलच हे कशावरून? आता नितीशकुमार परत लालूंबरोबर जाऊ शकणार नाहीत तेव्हा त्यांना भाजपवरच अवलंबून राहणे आले. त्यामुळे असा धडा शिकवायचाच असेल तर तो आपल्याला अनुकूल वेळी शिकवायचा असा प्लॅन मोदी-शहांचा कशावरून नसेल?

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी Fri, 07/28/2017 - 23:33
बरोबर आहे. पण अन्य प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे मोदीविरोध या एकमेव अजेंड्यावर उभी राहिलेली कोणतीही विरोधी पक्षांची आघाडी स्थिर होऊच शकणार नाही हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातूनच अशा आघाडीला अन्यथा मतांची बेरीज होऊन जितकी मते मिळू शकली असती ती कापणे हा या उद्योगाचा मुख्य हेतू आहे असे दिसते. बहुदा तुम्हाला ते म्हणणे पटलेले दिसत नाही. सगळे विरोधक एकत्र आले आणि त्यांच्या मतांची बेरीज झाली तर २०१९ च्या निवडणुका अजिबात सोप्या जाणार नाहीत. मोदीविरोध या एकमेव अजेंड्यावर उभी राहिलेली कोणतीही विरोधी पक्षांची कोणतीही आघाडी स्थिर होऊच शकणार नाही हा संदेश यापूर्वीच अनेकदा गेलेला आहे. अगदी अलिकडेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये कोणाला मत द्यायचे यावर एकमत नव्हते हे देखील दिसलेले आहे. प्रत्यक्ष मतदानात विरोधी पक्षांची अनेक मते फुटली हेदेखील दिसलेले आहे. बिहारमधील निवडणुकीत जरी राजद, संजद व काँग्रेसची आघाडी झाली तरी त्या आघाडीपासून सप व राष्ट्रवादी काँग्रेस दूर राहिले होते. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत सप व काँग्रेसची आघाडी झाली. परंतु त्यात बसप व अजितसिंग सामील नव्हते. हरयानात काँग्रेस, चौतालाचा पक्ष व भाजप स्वतंत्र लढले आहेत. महाराष्ट्रात देखील भाजपविरोधासाठी कोणतेही विरोधी पक्ष एकत्र आले नव्हते. सगळे विरोधक एकत्र आले तर भाजपला २०१९ ची निवडणुक नक्कीच जड जाईल हे नक्की. परंतु सगळे विरोधक एकत्र येऊच शकत नाहीत हे विरोधी पक्षांना माहित आहे, भाजपला माहित आहे व मतदारांना सुद्धा माहित आहे. तशीही राजद-संजदची आघाडी २०१९ पर्यंत टिकली नसती. राजद+काँग्रेस युतीला बहुमतासाठी जेमतेम ८-१० जागा कमी असल्याने लालूसारखा महाबिलंदर व पाताळयंत्री माणूस तेवढे आमदार मिळविणार हे नक्की होते. एकदा तेवढे आमदार मिळाले की सरकार पाडून स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री करणे यासाठी लालू जोरदार प्रयत्न करणार हेही नक्की होते. म्हणूनच भाजपने ही युती स्वतःहून तुटण्याची वाट बघायला हवी होती. दुसरे म्हणजे २०१४ मध्ये सुरवातीला देवेन्द्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा घेतला होता त्यावेळी मिपावर जवळपास सगळ्यांनी त्यावर टिका केली होती पण तुम्हाला ते मान्य होते असे वाटले. शिवसेनेचे जोखड उतरवायला तसे करणे गरजेचे होते अशी त्याची कारणमिमांसा तुम्ही दिली होतीत असेही वाचल्याचे आठवते. ती कारणमिमांसा कोणाला पटेल किंवा पटणार नाही पण निदान तसे पाऊल उचलण्यामागे काहीतरी दुसरा हेतू होता हे तुम्ही मान्य करत होतात. मग आताही तसाच दुसरा हेतू आहे हे तुम्ही मान्य करत नाही याचे आश्चर्य वाटत आहे. नाही, नाही. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे मी समर्थन केले नव्हते. मी त्यावेळी कोणत्यातरी धाग्यावर असे लिहिले होते की राष्ट्रवादीने न मागता दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग ताकद एकदम संपुष्टात आली. हे ओळखून फडणविसांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेऊन पाठिंबा अधिकृतरित्या स्वीकारला नाही आणि नाकारलाही नाही. त्याबाबत ते गप्पच राहिले. मी त्यावेळी दिल तो पागल है मधील एका प्रसंगाचे उदाहरण दिले होते. जर राष्ट्रवादीच्या पाठिंबा अधिकृतरित्या स्वीकारला असता तर भाजपची सर्वत्र छीथू झाली असती. जर तो नाकारला असता तर शिवसेनेच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडावे लागले असते. त्यामुळे त्यांनी स्वीकार/नकार असे काहीच न देता सरळ सरकार स्थापन करून काम सुरू केले. यथावकाश आवाजी बहुमताने बहुमत सिद्ध केल्यामुळे शिवसेनेला हात चोळत बसावे लागले. सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास मिळत नाही हे पाहून अत्यंत कासावीस झालेल्या सेनेला शेवटी सत्तेत यावेच लागले. परंतु सत्तेत येताना त्यांची बार्गेनिंग पॉवर जवळपास संपुष्टात आली होती कारण आपल्या पाठिंब्याशिवायही सरकार चालत आहे हे कटु सत्य त्यांना पचवायला लागले. नितीशकुमार आणि भाजप १७ वर्षे एकत्र होते. त्या काळात काहीही कुरबुरी झाल्या नव्हत्या. तसेच नितीशकुमार हे कुशल प्रशासक आहेत (सुशासनबाबू) ही प्रतिमा देशात आहे. प्रत्यक्षात ते तसे आहेत की नाही ही गोष्ट वेगळी. त्यांची प्रतिमा तशी आहे हे पण तितकेच खरे. मधल्या काळात काही कारणाने भाजप आणि नितीशकुमारमध्ये दुरावा आला असला तरी बाकी गोष्टी लक्षात घेता परत हातमिळवणी करायला हरकत नसावी. विशेषतः स्वतः नरेंद्र मोदींनी ज्या पक्षाला 'नॅचरली करप्ट पार्टी' असे म्हटले होते त्याच्याशीच हातमिळवणी करण्यापेक्षा तर ते वाईट नाही ना? मुख्यमंत्री असताना नितीशनी लालू आणि कुटुंबियांना काही संरक्षण दिले किंवा त्यांच्या विरूध्दचे भ्रष्टाचाराचे खटले बंद व्हावेत यासाठी काही प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. कितीही काहीही झाले तरी काकांच्या पक्षापेक्षा भ्रष्ट नितीशकुमार नाहीत असे मानायला जागा आहे. तेव्हा २०१४ मध्ये तुम्ही जर राष्ट्रवादीशी छुपी हातमिळवणी करण्यात काही गैर आहे असे मानत नव्हतात तर आता २०१७ मध्ये राष्ट्रवादीपेक्षा बराच जास्त चांगल्या (आणि पूर्वी १७ वर्षे बरोबर असलेल्या) पक्षाबरोबर हातमिळवणी करणे चुकीचे आहे हे मानत आहात ही गोष्ट मात्र हजम झाली नाही. हा थोडा इगोचा मामला आहे? म्हणजे इतकी वर्षे शिवसेनेला विनाकारण मोठ्या भावाचा दर्जा मिळाला तो इगो दुखावला म्हणून शिवसेनेला जागा दाखवून द्यायची आणि त्यासाठी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणे योग्य. पण नितीशकुमारांनी २०१३ मध्ये साथ सोडली म्हणून परत इगो दुखावला गेला म्हणून आता त्यांना परत घेणे चुकीचे आहे असे वाटत आहे का? परत नितीशकुमारबरोबर हातमिळवणी करण्यास हरकत नाही. परंतु ती हातमिळवणी मोठा भाऊ या भूमिकेतून व स्वतःच्या अटींवर व्हायला हवी होती. पुन्हा एकदा नितीशसमोर सेकंड फिडल म्हणून राहण्यात काय अर्थ आहे? २०१३ पर्यंत भाजप बिहारमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच स्वतःहून कनिष्ठ भूमिकेत जाऊन बसला. बिहारमध्ये नितीशकुमारांच्या कुर्मी जातीची जेमतेम २-३ टक्के मते आहेत. त्यात मुस्लिम, यादव व इतर काही जातींची थोडी थोडी मते मिळवून संजदची एकूण मतसंख्या जास्तीतजास्त १६-१७ टक्क्यांच्या पुढे फारशी जात नाही. याऊलट भाजपकडे किमान २८-२९ टक्के मते आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच इथेही भाजपचा जनाधार जास्त असला तरी विनाकारण भाजप कनिष्ठ भूमिकेत जाऊन बसला आहे. कालच्या प्रसंगाच्या निमित्ताने हे व्यस्त प्रमाण बदलता आले असते. राजद-संजद युती स्वतःहून तुटली असती (याची नक्कीच शक्यता होती) तर भाजपला त्याचा नक्कीच फायदा करून घेतला असता. दुर्दैवाने तसे झालेले दिसत नाही. भाजप मागील वर्षापासून बरीच चुकीची पावले टाकत आहे असे माझे मत आहे. यापूर्वी अरूणाचल प्रदेश व उतराखंड मधील सरकार अस्थिर करून झाले. नंतर गोव्यात पूर्णपणे पक्षाविरूद्ध जनादेश असताना जनादेश धुडकावून सत्ता स्थापन केली व त्यासाठी पर्रीकरांसारखा मोहरा केंद्रातून एका अत्यंत छोट्या राज्यात पाठविला. याचीच पुनरावृत्ती मणीपूरमध्ये केली. आता बिहारमध्ये तसेच सुरू आहे. निकोप लोकशाहीच्या दॄष्टीने हे योग्य नाही. इतर सर्व पक्षांनी असेच केले असते किंवा असेच केले आहे हा बचाव यासाठी अयोग्य आहे. इतरांसारखेच करणार असाल तर तुमच्यात आणि इतरांमध्ये फरक तो काय? राजकारण अशा इगोपेक्षा बरेच काही जास्त आहे. मोठे ध्येय साधण्यासाठी काही गोष्टी करायला लागल्या तरी कराव्या लागतात. अटलबिहारी वाजपेयी असताना असे म्हटले जात होते की एन.डी.ए ला २७२ जागा आल्या नाहीत तर त्यांचे सरकार येणे अशक्य. आता अशी परिस्थिती आहे की २०१९ मध्ये भाजपला २७२ जागा आल्या नाहीत तर मोदी परत पंतप्रधान बनणे अशक्य आहे. म्हणजे नितीशकुमारांनी २०१३ मध्ये धोका दिला म्हणून ते धरून ठेऊन २०१९ मध्ये ममता किंवा केजरीवाल किंवा तत्सम कुठल्यातरी थर्डक्लास माणसाला पंतप्रधान (आणि कदाचित कन्हैय्याला मंत्री) बनायची शक्यता मोकळी ठेवायची का? ही गोष्ट काही समजली नाही. आणि त्यातून नितीशना धडा शिकवायचा असेल तर तो शिकवता येईलच. तसा मोदी-शहांचा प्लॅन नसेलच हे कशावरून? आता नितीशकुमार परत लालूंबरोबर जाऊ शकणार नाहीत तेव्हा त्यांना भाजपवरच अवलंबून राहणे आले. त्यामुळे असा धडा शिकवायचाच असेल तर तो आपल्याला अनुकूल वेळी शिकवायचा असा प्लॅन मोदी-शहांचा कशावरून नसेल?

In reply to by श्रीगुरुजी

गॅरी ट्रुमन Mon, 07/31/2017 - 16:37
परत नितीशकुमारबरोबर हातमिळवणी करण्यास हरकत नाही. परंतु ती हातमिळवणी मोठा भाऊ या भूमिकेतून व स्वतःच्या अटींवर व्हायला हवी होती. पुन्हा एकदा नितीशसमोर सेकंड फिडल म्हणून राहण्यात काय अर्थ आहे?
कालपरवा बिहार मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. त्यात जदयुचे १४, भाजपचे ११ आणि भाजपचा मित्रपक्ष असलेल्या लोजपचा १ असे नवे मंत्री समाविष्ट करण्यात आले. तसेच भाजपचे मंगल पांडे पाटण्यात उपस्थित नसल्यामुळे त्यांना शपथ घेता आली नाही. त्यांचाही मंत्रीमंडळात लवकरच समावेश होईल. म्हणजे जदयुचे १४ आणि भाजप+ मित्रपक्षांचे १३ मंत्री आहेत. म्हणजे भाजपला पूर्वीइतके दुय्यम स्थान दिले गेलेले नाही. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी राज्यातील ४० पैकी ३१ लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी २५ जागा स्वतः भाजपच्या आहेत. या जागा भाजप सोडायला तयार होईल ही शक्यता बरीच कमी. तेव्हा जदयुला जास्तीतजास्त ९ (किंवा लोजपसारख्या मित्रपक्षांना जदयुच्या तिकिटावर निवडणुक लढवायला लावून जास्तीत जास्त १५) जागा लढवायला मिळू शकतील. पूर्वी जदयु २५ आणि भाजप १५ जागांवर निवडणुक लढवत असे. ते आकडे बरोबर उलटे होतील ही शक्यता जास्त. जर युती तुटली तर २०१९ मध्ये लोकसभेच्या जागावाटपाच्या प्रश्नावरून तुटायचा संभव आहे. आणि त्यातही अमित शहा शिवसेनेला शेवटपर्यंत झुलवत ठेवले होते तसे झुलवत ठेऊन नितीशकुमारांची बार्गेनिंग पॉवर कमी करतील कारण अगदी ऐनवेळी नितीशनी युती तोडली तर भाजप-जदयु-राजद अशी तिरंगी लढत होऊन परत २०१४ ची पुनरावृत्ती होईल हे नितीशकुमारांना कळणार नाही असे नाही. राज्यपातळीवर नितीशकुमार नि:संशय लोकप्रिय आहेत. भाजपकडेच काय इतर कोणत्याही पक्षाकडे त्यांच्याइतक्या लोकप्रियतेचा मुख्यमंत्रीपदासाठीचा उमेदवार नाही. त्यामुळे भाजपला लोकसभा निवडणुकांमध्ये बरीच जास्त मते मिळाली तरी विधानसभा निवडणुकांमध्येही तितकीच मते मिळतील असे नक्कीच नाही. तामिळनाडूमध्ये १९८०-९० च्या दशकात काँग्रेस आणि अण्णा द्रमुक यांच्यात लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस मोठा भाऊ तर विधानसभा निवडणुकांमध्ये अण्णा द्रमुक मोठा भाऊ असे त्याप्रकारे भाजप-जदयुमध्ये काहीतरी व्यवस्था होईल असे वाटते. अर्थातच तामिळनाडूमध्ये मोठ्या भावाला २/३ आणि लहान भावाला १/३ जागा मिळत असत. भाजप विधानसभा निवडणुकांमध्ये १/३ म्हणजे ८१ जागा मान्य करेल असे वाटत नाही. २०१० प्रमाणे कमितकमी १०३ जागांची मागणी तरी करेलच.
राष्ट्रवादीने न मागता दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग ताकद एकदम संपुष्टात आली.
हा पाठिंबा राष्ट्रवादीने खरोखरच न मागता दिला होता असे मला तरी वाटत नाही. पडद्याआड भाजप-राष्ट्रवादीमध्ये काहीच बोलणी न होता राष्ट्रवादीने 'महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे या उदात्त हेतूने' भाजपला पाठिंबा जाहिर केला यावर फार कोणी विश्वास ठेवणे कठिण आहे. मतदार तितके भाबडे नक्कीच नाहीत. दुसरे म्हणजे राष्ट्रपती निवडणुकांच्या वेळी विरोधक एकत्र राहिले नाहीत पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांमध्ये सामान्य लोक प्रत्यक्ष मत देत नसल्यामुळे या फाटाफुटीचा २०१९ वर फार परिणाम होईल असे वाटत नाही. दुसरे म्हणजे उत्तर प्रदेशातही सपा-बसपा एकत्र आले नाहीत हे पण सगळ्यांनीच बघितले. मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की बिहार मॉडेलप्रमाणे सपा-बसपा २०१९ मध्ये खरोखरच एकत्र आले तर (ही शक्यता बरीच आहे) ही आघाडी (बिहारमध्ये झाले त्याप्रमाणे) लवकरच तुटणार म्हणून त्यांना मिळणार्‍या मतांची बेरीज न होता त्यांची बरीच मते कापली जावीत या उद्देशाने भाजपने हा उद्योग केला आहे असे मला वाटते हेच मी ४-५ वेळा लिहिले आहे. उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये ही युती झाली नाही म्हणून २०१९ मध्येही होणारच नाही आणि राष्ट्रपती निवडणुकांमध्ये विरोधकांमध्ये फाटाफूट झाली हा विरोधक एकजिनसी नसल्याचा पुरेसा संदेश आहे असे मला तरी वाटत नाही. त्यापेक्षा बराच जास्त मोठा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवायला हवा आणि त्यासाठी बिहारमध्ये झाले ते चांगलेच झाले असे मला वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

अभिजीत अवलिया Tue, 08/01/2017 - 06:39
राष्ट्रवादीने न मागता दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग ताकद एकदम संपुष्टात आली.
राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा दिला होता ?
हे ओळखून फडणविसांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेऊन पाठिंबा अधिकृतरित्या स्वीकारला नाही आणि नाकारलाही नाही. त्याबाबत ते गप्पच राहिले. मी त्यावेळी दिल तो पागल है मधील एका प्रसंगाचे उदाहरण दिले होते. जर राष्ट्रवादीच्या पाठिंबा अधिकृतरित्या स्वीकारला असता तर भाजपची सर्वत्र छीथू झाली असती.
ही छीथू झाली नाही असे वाटतेय का तुम्हाला? मुळात असे समर्थन देताना पडद्यामागे हालचाली झाल्याशिवाय दिले गेले नसणार हे कुणीही समजून जाईल. त्यामुळे एकवेळ सत्ता नसली तरी चालेल पण राष्ट्रवादीचे समर्थन घेऊन आम्ही सरकार बनवणार नाही असा बाणा फडणवीस दाखवू शकले नाहीत. बहुतेक ह्या समर्थनाच्या बदल्यात सिंचन घोटाळ्यातंले ट्रकभर पुरावे कुठल्या तरी धरणात ट्रकसहित बुडवले गेले असावेत.
भाजप मागील वर्षापासून बरीच चुकीची पावले टाकत आहे असे माझे मत आहे. यापूर्वी अरूणाचल प्रदेश व उतराखंड मधील सरकार अस्थिर करून झाले. नंतर गोव्यात पूर्णपणे पक्षाविरूद्ध जनादेश असताना जनादेश धुडकावून सत्ता स्थापन केली व त्यासाठी पर्रीकरांसारखा मोहरा केंद्रातून एका अत्यंत छोट्या राज्यात पाठविला. याचीच पुनरावृत्ती मणीपूरमध्ये केली. आता बिहारमध्ये तसेच सुरू आहे. निकोप लोकशाहीच्या दॄष्टीने हे योग्य नाही. इतर सर्व पक्षांनी असेच केले असते किंवा असेच केले आहे हा बचाव यासाठी अयोग्य आहे. इतरांसारखेच करणार असाल तर तुमच्यात आणि इतरांमध्ये फरक तो काय?
काहीच फरक नाहीये. जिथे सत्ता तिथे आम्ही हे सगळ्या पक्षांचे सूत्र असते. त्याला जनकल्याणाचा मुलामा चढवला की झाले. भाजप हा नावाला 'पार्टी विथ डिफरन्स' आहे. जो पक्ष गोव्यासारख्या अत्यंत छोट्या राज्याची सत्ता मिळावी म्हणून संरक्षण मंत्र्याला परत पाठवतो आणि हे महत्वाचे खाते कामचलाऊ असल्यासारखे चालवतो त्याच्याकडून बिहारच्या सत्तेचा मिळत असलेला घास सोडला जाईल हे अपेक्षित न्हवतेच.

श्रीगुरुजी Fri, 07/28/2017 - 14:07
एकंदरीत पाकिस्तानी न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार प्रकरणी असलेल्या खटल्यांचा निकाल खूप लवकर लागतो असं दिसतंय. नवाझ शरीफ विरूद्ध असलेल्या खटल्याचा निकाल जेमतेम दीड वर्षांच्या आत लागला. पूर्वी मुशर्रफ प्रकरणाचा निकालही खूप कमी वेळेत लागला होता. त्यांच्याकडे खटल्याला बेमुदत वर्षानुवर्षे स्थगिती देणे असला प्रकार दिसत नाही. २ वर्षांपूर्वी कोळसा घोटाळ्यात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात मनमोहन सिंगांचे नाव आल्यावर ते लगेच सर्वोच्च न्यायालयात गेले व न्यायालयाने खटल्याला लगेच स्थगिती दिली ती आजतगायत. बहुतेक हा खटला मनमोहन सिंगांच्या हयातीत सुरू होईल असे दिसत नाही. किंबहुना भारतीय नेत्यांविरूद्ध भ्रष्टाचाराचे फारच थोडे खटले न्यायालयात दाखल झाले आहेत व त्यातील बहुसंख्य अनेक वर्षे लोंबकळत्या अवस्थेत आहेत. पनामा प्रकरणात काही भारतीयांची नावे सुद्धा होती. पाकिस्तानात या प्रकरणाचा खटला सुरू होऊन निकाल लागलासुद्धा. भारतात मात्र या आघाडीवर सामसूम दिसते.

In reply to by श्रीगुरुजी

अभिजीत अवलिया Fri, 07/28/2017 - 14:14
हो. एक २६/११ चा खटला वगळता पाकिस्तानात निकाल जलद लावले जातात असे वाटतेय. मागे एकदा शाळेवर हल्ला करुन लहान मुलांचा जीव घेणार्या काही अतिरेक्यांचा फार जलद फैसला केला होता.

श्रीगुरुजी Fri, 07/28/2017 - 14:23
नवाझ शरीफची प्रक्षोभक वक्तव्ये सोडली तर नवाझ शरीफ हाच भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी भारताच्या दृष्टीने 'बेस्ट बेट' होता. सध्या असलेल्या पर्यायात शरीफ हाच एक वाईटातला कमीतकमी वाईट माणूस होता. शरीफने यापूर्वी १९९९ मध्ये वाजपेयींच्या बरोबरीने संबंध सुधारण्यासाठी बर्‍यापैकी प्रयत्न केले होते. परंतु पाकिस्तानमधील जहाल गटाने व लष्कराने ते प्रयत्न हाणून पाडले. नंतर २०१४ मध्ये मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहून त्याने एक सकारात्मक संदेश दिला होता. परंतु यावेळी सुद्धा पाकिस्तानमधील जहाल गट, लष्कर, अतिरेकी संघटना व आयएसआयने हे प्रयत्न हाणून पाडले. पाकिस्तानमध्ये आता नवीन पंतप्रधान कोणीही आला किंवा पुन्हा एकदा लष्करी राजवट आली तरी नवीन नेता हा शरीफच्या तुलनेत जहालच असणार आहे. त्यामुळे पुढील काही काळात भारत-पाकिस्तान संबंध अजून जास्त बिघडण्याची शक्यता आहे.

लिओ Fri, 07/28/2017 - 14:25
7 व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार फक्त फिल्ड पोस्टिंगला नेमणुक झालेल्या संरक्षण दलातील अधिकार्यांना रेशनभत्त्या अंतर्गत मिळणारे राशन हे अन्न धान्य, खान्याचे जिन्नस या स्वरुपात मिळणार. ज्या अधिकार्यांना फिल्ड पोस्टिंगला नेमणुक नाही त्या अधिकार्यांना रेशन भत्त्या अंतर्गत मिळणारे राशन हे अन्न धान्य, खान्याचे जिन्नस बंद करुन प्रति दिवस रु ९६ रेशनभत्त्या अंतर्गत दिले जाणार. अधिक माहितीसाठी http://www.livemint.com/Politics/ccLywyVIemDHAWGjIIv3MP/7th-Pay-Commission-Armed-forces-officers-in-peace-stations.html जाणकारांनी अधिक माहीती द्यावी

संग्राम Fri, 07/28/2017 - 15:14
सध्या फक्त पानाच्या शेवटी पेजिनेशन किंवा पुढच्या पानांच्या लिंक्स दिसतात ...हीच सुविधा जर धागा संपल्यावर पण दिलीत तर प्रतिक्रिया वाचणे सोपे होईल आणि नवीन धागे लगेच काढायला लागणार नाहीत

सचु कुळकर्णी Fri, 07/28/2017 - 15:40
World's Highly Discussed News Paper चे संपादकीय वाचले का ? मी तर फारा वर्षाने ह्या मुलुख मैदानी तोफेच्या क्षेत्रात फिरुन आलो. भ्रमनिरास नाहि झाला. वय वर्षे १८ ते यकविस ह्या काळात हेच संपादकिय आधाशा सारखे वाचायचो. अकोल्यात त्यावेळेस आम्हास हे दुसर्या दिवशी मिळायचे. असो.

गॅरी ट्रुमन Fri, 07/28/2017 - 17:53
गुजरातमध्ये काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांनी पक्षातून बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे. मानसिंग चौहान आणि सनाभाई चौधरी हे ते दोन आमदार आहेत. याबरोबर काँग्रेसच्या आतापर्यंत ५ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ऑगस्ट महिन्यातील राज्यसभा निवडणुकांच्या आधी काँग्रेसला धक्का द्यायचा अमित शहांचा डाव दिसतो. सोनिया गांधींचे मर्जीतले अहमद पटेल यांची राज्यसभेतील मुदत संपत आहे आणि ते परत निवडून येऊ शकले नाहीत तर तो पक्षाला खूप मोठा धक्का असेल.

ओम शतानन्द Fri, 07/28/2017 - 20:14
असेच होत राहिले तर भाजप ला कोन्ग्रेस चे स्वरूप प्राप्त होइल भ्रष्टाचार करा आणि कारवाई होऊ नये म्हणुन भाजपात जा असे होत राहील

In reply to by प्रतापराव

अनुप ढेरे Sat, 07/29/2017 - 13:11
भाजपच्या विरोधात बिहारमधला जनादेश होता.
हे विधान भरपूर लोकांकडुन वापरलं जात आहे आणि ते चूक/दिशाभुल करणारं आहे. भाजपा आघाडीला ३५% मतं मिळालेली. जी जवळजवळ २०१४मध्ये मिळाली तितकीच होती. २०१५मध्ये भाजपाला रिजेक्ट बिजेक्ट केलेलं नसून केवळ विरोधकांच्या मतांची बेरीज झाली आणि सीट कमी आल्या. हेच दिल्लीत देखील झालेलं आहे फेब २०१५ला. २०१७मध्ये देखील मायावतींना १५-२० सीट मिळाल्या आहेत. पण २५% मत आहेत. हे देखील रिजेक्शन नाही.

अमितदादा Fri, 07/28/2017 - 23:38
कॅग चा आकाश क्षेपणास्त्राविषयी बातमी वाचली, त्या बातमीमधून सरकारी दारुगोळा आणि शास्त्रस्त निर्मिती कारखाने यांचा गलथानपणा , प्रशासकीय यंत्रणाचा गचाळपणा , सरकारच अक्षम्य दुर्लक्ष, आणि सुरक्षा दले आणि इतर संलग्न संस्था यात नसलेला ताळमेळ दिसून येतो. मुळात अश्या बातम्या वाचल्यानंतर त्याखालील लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या कि असे दिसून येते , लोक कॅग लाच दोष देतायेत, अश्या गोष्टी गुपित ठेवाव्यात असे त्यांचं म्हणणं दिसून येत. मुळात शत्रू राष्ट्राला आपल्या राष्ट्राचा गुपित गोष्टी कॅग चा रिपोर्ट वाचून कळत असतील असे मानाने म्हणजेच भाबडेपणा आहे, अश्या आणि यापॆक्षा कित्तेक पटीने सिक्रेट गोष्टी कळाव्यात म्हणूनच अजस्त्र अशी गुप्तचर यंत्रणा उभारलेली असते. आपल्या सरकार ला हि कोणत्या गोष्टी पब्लिक डोमेन मध्ये मांडल्यास काय होईल याची जाणीव असल्यानेच कॅग ला अश्या गोष्टी मध्ये मुक्तता दिली आहे. कधी अण्वस्त्र किंवा आण्विक भट्या याविषयीचा कॅग चा अहवाल वाचनात आलेला नाही. (मी तरी नाही वाचला.) त्यामुळे messenger शूट करून काहीही उपयोग नाही, शूट करायचे असेल तर सरकार ला करावे लागेल. कॅग च्या अवाहल चा पब्लिक प्रेशर तयार करण्यात मोठा फायदा होतो, कारण त्याशिवाय हि सरकार नामक यंत्रणा हलतच नाही. अत्यंत महत्वाचे प्रोजेक्ट ना १०-१० वर्षे उशीर होतो, याना कोण जबाबदार धरत नाही काही शिक्षा होत नाही. लोकांनी कॅग ऐवजी या यंत्रणांना धारेवर धरलं पाहिजे. सुरक्षा दले आणि शस्त्रस्त निर्मिती कारखाने यांच्यातील नसलेल्या ताळमेळाची कॅग ने उघड केलेली काही प्रातिनिधिक उदाहरणे १. भारतीय बनावटीची रायफल २. अर्जुन टॅंक ३. तेजस विमान ४. कावेरी इंजिन ५. आकाश क्षेपणास्त्र ६. अंत्यंत महत्वाचा लष्करी तळांची कमकुवत सुरक्षा

In reply to by अमितदादा

अभिजीत अवलिया Sat, 07/29/2017 - 08:23
मुळात शत्रू राष्ट्राला आपल्या राष्ट्राचा गुपित गोष्टी कॅग चा रिपोर्ट वाचून कळत असतील असे मानाने म्हणजेच भाबडेपणा आहे, अश्या आणि यापॆक्षा कित्तेक पटीने सिक्रेट गोष्टी कळाव्यात म्हणूनच अजस्त्र अशी गुप्तचर यंत्रणा उभारलेली असते.
पूर्णपणे सहमत. ताज्या घडामोडी -७ ह्या भागात मी दारुगोळ्याच्या स्थितीबद्दल आणि लष्कर प्रमुखांच्या वक्तव्यावरून एक प्रतिक्रिया टाकली होती. त्यावर हा अहवाल कॅगने सरकारला गुप्तपणे द्यायला हवा होता. सध्याच्या परिस्थितीत असा उघड करणे योग्य नाही असे श्रीगुरुजी म्हणाले. पाकिस्तानची ISI ही एक अत्यंत कार्यक्षम गुप्तचर यंत्रणा आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आत्ता ह्या क्षणाला भारताची कितपत युद्धाची तयारी असेल हे देखील पाकिस्तानला/चीनला नक्कीच माहीत असेल. त्यामुळे तो अहवाल गुप्त ठेवला असता तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती असे समजण्याचे काहीच कारण नाही. उलट कॅग हा अत्यंत नि:पक्षपणे काम करणारा असतो आणि त्याचे अहवाल जनतेत आल्याने सरकारवर एक जनतेचा दबाव निर्माण करण्यात मदत होते हे फार महत्वाचे आहे. तुम्ही दिलेल्या दुव्यातील आकाश क्षेपणास्त्राची बातमी वाचली. ८० पैकी २० मिसाईलचे परीक्षण केले आणि त्यातली ३०% फेल झाली हे अतिशय धक्कादायक आहे. तर पूर्व भारतातील ६ एअर बेस वर Infrastructure निर्माण करून तिथे ही मिसाईल साठवून ठेवायची होती. हे काम BEL ही सरकारी कंपनी करत होती जिचा कामाचा दर्जा अतिशय चांगला असतो असे ऐकले आहे. ह्या ६ पैकी फक्त २ ठिकाणी काम पूर्ण होत आलेय आणि ह्या दोन्ही ठिकाणांचा इंडियन एअर फोर्सने कामाचा दर्जा चांगला नाही म्हणून ताबा घेतलेला नाही. त्यावरून एक प्रश्न पडतो जेव्हा हे Infrastructure निर्माण करण्याचे काम चालू होते तेव्हा कामाची गुणवत्ता तपासणे वगैरे प्रकार का केले गेले नाहीत ? एकंदरीत भारतातील कोणतेही सरकार म्हणजे ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला ह्याच प्रकारची आहेत आणि संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत सरकारी काम म्हणजे मागचे पाढे पंचावन्न म्हणायला वाव आहे. .

In reply to by अमितदादा

सुबोध खरे Sat, 07/29/2017 - 09:37
CAG ने ऑडिट केले आहे ते बरोबर आहे. त्याबद्दल शंका नाही. आणि ते आपले काम चोख करीत आहेत यातही शंका नाही. परंतु बहुसंख्य लोकांना क्षेपणास्त्राची अचूकता याबद्दल मूलभूत माहिती कमी आहे असे वाटते. जगातील कोणतेही क्षेपणास्त्र १०० % अचूक नसते आणि ८० % अचिकट हि उत्तम समजली जाते. ८०% क्षेपणास्त्रे आपल्या लक्ष्याचा भेद करतील हि शक्यता गृहीत धरून ती वापरली जातात. पेट्रियट सारखे किंवा एक्सोसे(ट) सारखे नावाजलेले क्षेपणास्त्र सुद्धा किती अचूक आहे हे खालील दुव्यात पहा. http://www.slate.com/articles/news_and_politics/war_stories/2003/03/patriot_games.html http://navy-matters.blogspot.in/2013/05/aaw-hard-or-soft-kill.html https://www.quora.com/What-happened-to-Exocet-sales-after-the-Falklands-War २०१६ च्या सरावात रशिया कडून घेतलेल्या ओसा क्षेपणास्त्र प्रणालीतील दोन पैकी एक क्षेपणास्त्र चालले नाही. http://www.ibtimes.co.in/exercise-iron-fist-2016-failures-promt-iaf-evaluate-after-some-missiles-missed-targets-671603 During the second segment of the Exercise Iron Fist 2016, where the IAF undertook night operations, a Mirage 2000 dropped U.S.-made Paveway laser-guided bomb (LGB), but the bomb did not hit its designated target. Viewers also wondered what happened to the Soviet-origin OSA AK-M surface-to-air missile system, which, when launched, failed to hit an incoming hostile threat, which was simulated for the exercise. आकाश हे क्षेपणास्त्र अजूनही विकसनशील टप्प्यात आहे तरीही त्याचा डावपेचात्मक वापर म्हणून ते तैनात केलेले आहे रशिया कडून S ४०० हि क्षेपणास्त्र प्रणाली हातात येईपर्यंत चीनवर दबाव ठेवण्यासाठी आकाश आणि ब्राम्होस तैनात करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ५० % अचूक असली तरी दोन क्षेपणास्त्रे (SALVO) डागणे आपल्याला परवडण्यासारखे आहे. ( मुळात ती जोडीनेच डागली जातात) कारण एका भारतीय क्षेपणास्त्राचा खर्च साधारण आयात क्षेपणास्त्राच्या २०-३५% एवढाच असतो आणि जोवर तुम्ही स्वतः शस्त्रास्त्रे वापरुन पहात नाही तोवर त्यातील कमतरता समजून येत नाही. आज ISRO ची वाहवा करणारे लोक काळ त्यांना पाण्यासारखा पैसा वाया घालवतात म्हणून शिव्या घालतच होते. शेवटी अणूशस्त्रे क्षेपणास्त्रे उपग्रह किंवा पाणबुड्या यांसारखे तंत्रज्ञान यात स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे आणि हे तंत्रज्ञान तुम्हाला कोणीही देणार नाही. राफाल या विमानाबाबत हाच वाद चालू असल्यामुळे ३६ विमानांची मागणी असूनही ती आणली जात नाही याचे कारण फ्रांस आपल्याला संवेदनाशील तंत्रज्ञान देण्यास तयार नाही हे आहे. सरकारचे अपयश नाही.

In reply to by सुबोध खरे

अमितदादा Sat, 07/29/2017 - 10:25
@खरे साहेब तुम्ही म्हणताय क्षेपणास्त्रातील अचूकतेबाबत जे बोलताय त्यात तथ्य आहे. तुम्ही दिलेल्या पहिली आणि शेवटची लिंक मी वाचल्या आणि ह्या दोन गोष्टी पहा. पेट्रियट क्षेपणास्त्र बाबत काय म्हटलंय ते "The new version of the air-defense weapon, known as the Patriot Advanced Capability-3 (or PAC-3) is said to have intercepted four of the six missiles that Iraq has fired at Kuwait." आणि मी दिलेल्या बातमीत आकाश क्षेपणास्त्राबद्दल काय म्हटलंय ते "As many as a third of the home-made Akash surface-to-air missiles have failed basic tests,the missiles fell short of the target, had lower than the required velocity, and there was malfunctioning of critical units." आकाश मिसाईल इंटरसेप्ट करण्यात फेल झाली नसून बेसिक टेस्ट मध्येच फेल झालीय, खूप मोठा फरक आहे दोन गोष्टीत. चूक असेल तर दुरुस्त करा इसरो ला दोष देणारा माणूस माझ्या पाहण्यात नाही, इसरो ने अत्यंत कष्टात कमी पैशात भारताला प्रचंड यश मिळवून दिले आहे. इसरो चा success रेट खूप जास्त आहे. भारतीय शास्त्रस्त निर्मिती कारखान्यापेक्षा पाकिस्तानातील कारखाने उत्तम आहेत असे भारतीय उपलष्करप्रमुख म्हणाले आहेत. Pakistan defence industrial base better than ours: Army vice chief @अभिजित अवलिया तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. ठीक आहे मिसाईल बाबत एक वेळ समजून घेऊ परंतु कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेलं infrastructure योग्य नसेल तर हे ताळमेळ नसल्याच प्रतीक आहे

In reply to by सुबोध खरे

अभिजीत अवलिया Sat, 07/29/2017 - 12:22
शेवटी अणूशस्त्रे क्षेपणास्त्रे उपग्रह किंवा पाणबुड्या यांसारखे तंत्रज्ञान यात स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे आणि हे तंत्रज्ञान तुम्हाला कोणीही देणार नाही. राफाल या विमानाबाबत हाच वाद चालू असल्यामुळे ३६ विमानांची मागणी असूनही ती आणली जात नाही याचे कारण फ्रांस आपल्याला संवेदनाशील तंत्रज्ञान देण्यास तयार नाही हे आहे. सरकारचे अपयश नाही.
मान्य आहे आपण स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे. पण त्या अगोदर सध्याची असलेली तातडीची गरज देखेल पूर्ण केली पाहिजे का नको? IAF ला एकूण ४२ squadron ची गरज आहे आणि सध्या IAF कडे फक्त ३३ आहेत. तर पार्लमेंटच्या स्टँडिंग कमिटीच्या रिपोर्टनुसार फक्त २५ squadron आहेत. ह्यातील देखील बरीच विमाने येत्या ८-१० वर्षात सेवेतून काढायची गरज आहे. HAL ने तब्बल ३३ वर्षे घेऊन बनवलेल्या तेजस विमानांना अजूनही Final Operational Clearance मिळालेला नाही. कारण IAF ने ह्या विमानात बर्याच त्रुटी शोधल्या आहेत ज्या दुरुस्त करणे HAL ला जमलेले नाही. त्यामुळे ह्या त्रुटी पूर्ण करून IAF ची २०० तेजसची ऑर्डर पूर्ण करायला किमान साल २०२५ उजाडणार आहे. तर तेजसची न्हेवी साठी बनवलेली आवृत्ती नेव्हीने नाकारलीय. गतवर्षी IAF ने ७०००० कोटी रुपये नवीन साधनांच्या खरेदीसाठी मागितले होते आणि त्यांना फक्त ३३००० कोटी दिले गेले. ह्या ३३००० कोटीमधील किती पैसे विमानांच्या खरेदीसाठी वापरले जातील आणि नवी विमाने यायला किती वर्षे लागतील बरे? पाकिस्तान आणि चीन सारखे शत्रू देश शेजारी असताना राफालबद्दल किती वर्षे वाद घालत बसायचा ह्याला काही लिमिट नको का?

In reply to by अभिजीत अवलिया

सुबोध खरे Sat, 07/29/2017 - 13:47
साहेब राफाल बाजारातून खताचं पोतं उचलून आणलं इतकं सोपं नाही. त्याच्या वर वापरायची क्षेपणास्त्रे, बॉम्ब, ECM (इलेक्ट्रॉनिक काउंटर मेझर) पॉड या सर्वांचे तंत्रज्ञान तुम्हाला त्यांनी देणे आवश्यक आहे. त्याच्या पायलट च्या प्रशिक्षणाचा भार त्याची किंमत आणि त्याला लागणार वेळ या बऱ्याच गोष्टी यात अध्यारुथ असतात. शिवाय त्याचा प्रत्येक सुटा भाग किती आणि काय किमतीला देणार त्याचा पुरवठा किती वर्षे पर्यंत करणार त्याला लागणारा तंत्रज्ञानाचा आधार( टेक्निकल सपोर्ट) किती वर्षे पर्यंत मिळेल इतके सर्व अन्यथा प्रत्यक्ष युद्धाचे वेळेस एका स्क्रू किंवा नट पायी अक्खे विमान जमिनीवर उभे राहते. कारगिल युद्धाचे वेळेस फ्रान्सने मिराजच्या लेसर गाईडेड बॉम्बची किंमत तिप्पट सांगितली होती. आयत्यावेळेस रशिया आणि इस्रायलने आपल्याला त्याचे लेसर गाईडेड बॉम्ब ३० % किमतीत पुरवले होते शिवाय त्यांचे तंत्रज्ञ आपल्या बेस वर नडी अडचणीसाठी उभे होते. रशियाच्या मिग २१ पासून मिग २९ पर्यंत सर्व विमानांचे उच्च तंत्रज्ञान नसलेले भाग एकच होते. त्यामुळे एकाच भाग दुसऱ्याला लावून तीन विमानांपैकी दोन विमाने वाळवंटातही परत चालू करणे शक्य होते. पाश्चात्य देश एका विमानाचे स्क्रू सुद्धा दुसऱ्या विमानाला फिट होणार नाहीत हि "काळजी" घेतात. त्यामुळे अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी हि स्थिती होते. मागतील त्या किमतीला तुम्हाला त्यांच्या सुट्या भागांची खरेदी करावी लागते ते सुद्धा तुमचे युद्ध हे त्यांच्या "तत्वात" बसत असेल तर. कारण युद्ध चालू झाले तर सर्वात पहिले काय होते तर शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर ते बंदी (एम्बार्गो) घालतात. ती उठेपर्यंत युद्ध संपायची वेळ आलेली असते. भारतीय वायुसेनेकडे इतक्या विविध देशाची विमाने असण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. "तेजस" च्या ऐवजी इतर विमाने विकत मिळतात परंतु अणुबॉम्ब, उपग्रह किंवा क्षेपणास्त्रे यांचे तंत्रज्ञान तुम्हाला कोणीच विकत देत नाही. त्यामुळे तुमच्या कडे असलेल्या अपुऱ्या साधनसंपत्तीचा सुविनयोग करण्याच्या दृष्टीने क्षेपणास्त्र अणुबॉम्ब आणि उपग्रह तंत्रज्ञानाकडे संपत्ती वळवली गेली. आज चीन तुमच्या देशात सहज घुसखोरी करू शकत नाही याचे कारण तुमच्या कडे असलेली अण्वस्त्रे अग्नी पृथ्वी आणि ब्राम्होस सारखी क्षेपणास्त्रे आणि चक्र आणि अरिहंत सारख्या पाणबुड्या ज्या मलाक्का सामुद्रधुनीतून होणारा चीनचा व्यापार पूर्ण बंद पाडू शकतील. तुम्ही युद्ध हरला तरी चीनला त्यांची भयंकर आणि न परवडणारी किंमत चुकवावी लागेल. जो देश चंद्र किंवा मंगळावर यान पाठवतो त्याला विमान तंत्रज्ञान तयार करणे अशक्य नाही पण सामरिक स्थिती आणि आर्थिक स्थिती यात कशाला प्राधान्य द्यायचे हे गरीब देशाला ठरवायलाच लागते. असो हा एक फार मोठा, महत्त्वाचा आणि सखोल असा विषय आहे. टंकाळा आला आहे.

In reply to by सुबोध खरे

अभिजीत अवलिया Sat, 07/29/2017 - 15:13
अहो खरे साहेब, तुम्ही सांगताय ते कुणीही नाकारलेले नाही. फायटर विमाने खरेदी करणे खताचे पोते खरेदी करण्यासारखे नाही हे सर्वाना माहीत आहे. माझा मुद्दा होता किती वर्षे वाट बघायची ह्याचा. कारण IAF ने २००१ साली विमानांची गरज व्यक्त केली. A.K. Antony प्रमुख असलेल्या डिफेन्स कौन्सिलने २००७ साली विमान खरेदीला मान्यता दिली. म्हणजे जवळपास १७ वर्षे होत आलीत IAF ने विमानांची गरज व्यक्त केल्यापासून. माझा आक्षेप ह्या सरकारी दिरंगाईला आहे.

In reply to by सुबोध खरे

अप्पा जोगळेकर Sat, 07/29/2017 - 15:50
हे सगळे वाचून देशाला पूर्ण वेळ संरक्षण मंत्री असणे किती आवश्यक आहे हे जाणवत आहे. भाजप ला गोव्यात सत्ता स्थापन करायची आहे ती कशी करायची अथवा नाही हा भाजप चा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या सत्ता हव्यासासाठी देशाने किती काळ संरक्षण मंत्र्याशिवाय राहायचे हा प्रश्नच आहे. हे अपयश मोदींचे आणि पर्यायाने सरकारचे आहे असे वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

विशुमित Mon, 07/31/2017 - 15:58
शहा अध्यक्षाच्या खुर्चीतच सुखी आहेत असे म्हणत आहेत. त्यांचं बरोबर म्हणा, संरक्षण मंत्री झाले तर बर्फात, वाळवंटात चालता तर आले पाहिजे ना.

सचु कुळकर्णी Sat, 07/29/2017 - 02:00
No Hindi On Bengaluru Metro, Karnataka Chief Minister Siddarmaiah Tells Centre काहि दिवसांपुर्वि ह्यांनि वेगळा झेंडा हि मागितला होता कर्नाटका करता. मस्तय. मला वाटत २०१८ नंतर जे काहि काँग्रेसि उरतिल ते एक तर दगड मारत फिरतिल किंवा एकमेकांचे कपडे तरी फाडतिल बेटर २०१८ नंतर ह्यांना नॉर्थ सेंटिनेल बेटांवर ह्यांच्या मेंटल भावि पंतप्रधाना सह सरकारी खर्चाने आगबोटिने नेहमिकरता सोडुन यावे. कारण ह्यांच राजकारण आता फारच घातक मार्गाला चाललय. २०१८ नंतर हे एकमेकांचे कपडे तरी फाडतिल किंवा मग जातिय खेळ खेळुन दंगलि तरी घडवुन आणतिल. ज्याचि सुरुवात ह्यांच्या भावि अर्थमंत्रि ममता दिदि ने बंगाल मध्ये केलिय.

सचु कुळकर्णी Sat, 07/29/2017 - 02:29
http://m.timesofindia.com/india/panic-stricken-congress-herds-44-gujarat-mlas-to-party-ruled-karnataka/articleshow/59815395.cms शेवटि कॉंग्रेसला गुजरात मधले आपले सगळे आमदार बँगलोर ला हलवावे लागले ;) मला आठवतय त्याप्रमाणे सेम नाट्य एकदा विलासरावांनाहि करावे लागले होते सेम व्हेन्यु :)

धर्मराजमुटके Sat, 07/29/2017 - 10:56
नवाझ शरीफचे बंधु पंतप्रधान होणार ! हे म्हणजे साधारण लालू तुरुंगात गेल्यावर राबडीने गादीवर बसण्यासारखे आहे का ? सो मच इंडियन ! मग आता नवाज शरीफना इस्लामिक कायद्याप्रमाणे शिक्षा देणार काय ? इस्लाममधे भ्रष्टाचारासाठी काय शिक्षा आहे ? हातपाय तोडणे, शिरच्छेद की अजुन काही ?

In reply to by धर्मराजमुटके

गामा पैलवान Sat, 07/29/2017 - 12:29

गॅरी ट्रुमन Mon, 07/31/2017 - 18:08
कालच बहुचर्चित 'इंदू सरकार' हा चित्रपट बघितला. भारतीय राजकारणात प्रचंड रस असलेल्या माझ्यासारख्याला हा चित्रपट आवडला हे वेगळे सांगायलाच नको. या चित्रपटातील नायिका इंदू सरकार आणि इतर काही पात्रे काल्पनिक आहेत. या काल्पनिक पात्रांची प्रत्यक्षात घडून गेलेल्या व्यक्तिंबरोबर आणि घटनांबरोबर सरमिसळ अगदी चांगलीच जमली आहे. घडलेल्या घटना बर्‍यापैकी जशा झाल्या त्याप्रमाणेच दाखविल्या आहेत. जुन्या दिल्लीतील तुर्कमान गेट जवळ असलेली झोपडपट्टी दिल्ली डेव्हलपमेन्ट ऑथोरिटीने संजय गांधींच्या शहरे सुंदर आणि झोपडपट्टीमुक्त असावीत या आग्रहाखातर बुलडोझर लावून पाडली. त्यावेळी तिथल्या रहिवाशांनी विरोध केल्यावर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात अनेक लोक मारले गेले. ही घटना तुर्कमान गेटचे नावही न बदलता जशी झाली तशी दाखवली आहे. उत्तर भारतात अनेक लाख लोकांची सक्तीने नसबंदी करण्यात आली होती. अशाच एका ठिकाणी पोलिसांनी अनेकांना पकडून नसबंदी करायला नेले हे दाखविले आहे. चित्रपटामध्ये काही प्रमाणात स्वातंत्र्य घेऊन कथेतील महत्वाच्या पात्रांची नावे बदलली आहेत. उदाहरणार्थ संजय गांधींचे पात्र साकारले आहे नील नितीन मुकेशने. एकंदरीत चेहरा, वेशभूषा, डोक्यावरील विरळ झालेले केस आणि काळ्या रंगाची जाडी चष्म्याची फ्रेम यावरून या पात्राला सगळे 'चीफ' असे म्हणत असले तरी ते पात्र संजय गांधीच आहे हे समजायला काहीच कष्ट पडले नाहीत.आणीबाणीत बदनाम झालेले मंत्री ओम मेहतांचे पात्र साकारलेल्या पात्राला नाव दिले आहे 'ओम नाथ'. संजय गांधींची सहकारी रूखसाना सुलताना (बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगची आई) हिने दिल्लीतील गरीब वस्त्यांमध्ये सक्तीची नसबंदीची 'टारगेट' सरकारी अधिकार्‍यांना दिली होती. कोणतेतरी मुस्लिम नाव असलेली स्त्री संजय गांधींच्या वर्तुळात वावरत असलेली चित्रपटात दाखवली आहे. त्यावरून ती रूखसाना सुलतानाच आहे हे समजलेच. संजय गांधींच्या वर्तुळात एक फ्रेंच दाढी असलेला तरूण दाखवला आहे. बहुदा तो जगदिश टायटलर असावा. तसेच तुर्कमान गेट प्रकरणी बदनाम झालेले दिल्ली डेव्हलपमेन्ट ऑथोरिटीचे प्रमुख जगमोहन यांचे पात्र रंगवले आहे 'राममोहन' (की अन्य कुठला मोहन) हे नाव दिलेल्या पात्राने. संजय गांधींनी माहिती आणि प्रसारणमंत्री इंदरकुमार गुजरालना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना राजीनामा द्यायचा आदेश दिला होता हे माहितच आहे. इंदरकुमार गुजरालांचे पात्र रंगवले आहे 'कुमार' या नाव दिलेल्या पात्राने. गुजरालना संजय गांधींनी राजीनामा द्यायला सांगितले त्याची पार्श्वभूमी चित्रपटात दाखवले आहे त्यापेक्षा वेगळी होती. तेवढे स्वातंत्र्य चित्रपट निर्मात्याने घेतले आहे. चित्रपटाची नायिका इंदू सरकारचा पती दाखवला आहे नवीन सरकार नावाचा आय.ए.एस अधिकारी. २००८ मध्ये भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त झालेले नवीन चावला हे पण १९७५ मध्ये आणीबाणीच्या दरम्यान बदनाम झाले होते. शहा कमिशनने त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. मला बराच वेळ वाटत होते की नवीन हेच नाव आणि आणीबाणीचे समर्थन करणारा आणि आणीबाणीच्या वरवंट्याचा फायदा मिळालेला सरकारी अधिकारी यावरून ते पात्र नवीन चावलांचे असावे. पण १९७५ मध्ये या चित्रपटात दाखविले आहेत तितके नवीन चावला वरीष्ठ होते असे वाटत नाही. आणि चित्रपटात शेवटी त्या पात्राला आत्महत्या करताना दाखवले आहे. त्यावरून ते पात्र नक्की कोणाचे असावे हे समजले नाही. बहुदा ते पात्र नवीन चावलांचेच असले तरी चित्रपट निर्मात्याने कथानकात तेवढा बदल केला असावा. आणीबाणीला भूमिगत राहून विरोध करणार्‍यांमध्ये रा.स्व.संघाचे नानाजी देशमुख एक प्रमुख नाव होते. त्यांचे पात्र रंगवले आहे 'नानाजी प्रधान' (अनुपम खेर) नावाच्या पात्राने. नानाजींनी भूमिगत राहून कार्यकर्त्यांच्या जाळ्यामार्फत आणीबाणीदरम्यान जी माहिती सरकारी वरवंट्यामुळे बाहेर येत नव्हती ती बाहेर आणायचे काम केले होते. छुप्या पध्दतीने पत्रके छापून ती जनतेत वाटून सरकारी दडपशाही कशी चालू आहे याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायचे काम त्यांनी केले होते. त्यांच्याच कार्यकर्त्यांपैकी एक-- चित्रपटातील नाव शिवम रेड्डी हा डायनामाईट वापरून रेल्वेपूल, पॉवर प्लॅन्ट उडवून दिल्याशिवाय सरकारला अक्कल येणार नाही असे वारंवार म्हणतो.इथे कथानकाने प्रत्यक्षात घटना घडली त्याबरोबर फारकत घेतली आहे. आणीबाणीच्या दरम्यान गाजलेल्या 'बडोदा डायनामाईट केस' चा संदर्भ याला आहे. पण या प्रकारात रा.स्व.संघाशी आणि नानाजींशी संबंधित कोणाचा हात नव्हता तर समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस आणि उद्योगपती विरेन शाह (१९९९ ते २००३ या काळातील पश्चिम बंगालचे राज्यपाल) यांच्यावर डायनामाईटद्वारे स्फोट घडवून राष्ट्राच्या संपत्तीचे नुकसान करायचा कट आखायचा आरोप ठेवला गेला होता. अशाप्रकारे काहीकाही ठिकाणी कथानकाची प्रत्यक्षात घडलेल्या घटनेशी फारकत झालेली दाखवली आहे. माझा आणीबाणीच्या वेळी जन्मही झाला नव्हता पण त्या काळाविषयी मी नंतर बरेच वाचले आहे त्यामुळे चित्रपटातील बरीचशी पात्रे आणि घटना माझ्या परिचयाच्या होत्या. पण ज्यांना या गोष्टी माहित नसतील त्यांना मात्र चित्रपटात नक्की काय चालू आहे हे समजायला जड जाईल. चित्रपटात १९७० च्या दशकाच्या मध्यातील भारतातील पार्श्वभूमी बर्‍यापैकी व्यवस्थित उभी केली आहे. उदाहरणार्थ त्यावेळचे गोल डायल फिरवून लावायचे फोन, रस्त्यावरील अ‍ॅम्बॅसॅडरसारख्या गाड्या, लोकांची वेशभूषा इत्यादी त्याकाळाला मिळतेजुळते आहे. या चित्रपटाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला, काही ठिकाणी या चित्रपटाचे प्रयोग बंद पाडले त्यामागचे कारण समजतेच. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे प्रयोग बंद पाडायच्या प्रकाराला 'असहिष्णुता' असे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गेली ३ वर्षे अन्यथा सतत 'असहिष्णुता', 'असहिष्णुता' ही बोंब मारणार्‍या कोणीही म्हटल्याचे ऐकिवात नाही. विशेष म्हणजे अशी असहिष्णुतेची बोंब मारणार्‍या अनेक समाजवादी विचारांच्या मंडळींच्या पूर्वसुरींनी/ वैचारिक गुरूंनी स्वतःच १९७५ ते १९७७ या काळातील आणीबाणीला कडाडून विरोध केला होता ही गोष्ट त्यांच्या गावीही आहे असे त्यांच्या सध्याच्या वर्तणुकीवरून वाटत नाही. सध्याच्या काळातील समाजवादी आणि/किंवा डाव्या विचारांच्या विचारवंतांना माझा जोरदार विरोध आहेच. आणि त्यांना माझ्यासारखे करत असलेला तो विरोध योग्यच आहे याचे एकामागोमाग दुसरे कारण ही विचारवंत मंडळी देत आहेत. त्याप्रकारे आपल्या या ढोंगातून या विचारवंतांनी त्यांना विरोध करणे योग्यच आहे याचे आणखी एक कारण दिले आहे. असो. मला तरी 'इंदू सरकार' हा चित्रपट भलताच आवडला आहे. ज्यांनाज्यांना स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय इतिहासात रस आहे त्या सर्वांनी हा चित्रपट बघावाच असे मी म्हणेन. तसेच माझ्या पिढीला आणि सध्या कॉलेजात असलेल्या अनेकांना आणीबाणीच्या नावाखाली इंदिरांच्या काँग्रेस सरकारने किती अत्याचार केले होते याची कल्पना नसते. ती कल्पना यावी म्हणून त्या राजकारणात रस नसला तरी हा चित्रपट जरूर बघावा असे मी म्हणेन. कारण भविष्यात कधीही भारतात अशी परिस्थिती उद्भवायची चिन्हे दिसली तर त्याला आपल्या परिने विरोध करता आला पाहिजे पण त्यासाठी ती चिन्हे नक्की कोणती हे माहित असणे गरजेचे आहे. चित्रपट समीक्षक या चित्रपटाला कितीही मार्क देत असले तरी माझ्याकडून मात्र या चित्रपटाला ५ पैकी ५ मार्क. (हे व्हॉट्सअ‍ॅपवर किंवा फेसबुकवर माझ्या नावाने योग्य तो रेफरन्स देऊन फॉरवर्ड करायला काहीच हरकत नाही).

In reply to by गॅरी ट्रुमन

मोदक Mon, 07/31/2017 - 19:23
निव्वळ या प्रतिसादामुळे आत्ता ताबडतोब अर्ध्या तासानंतरच्या शो ची तिकीटे बुक करून पिच्चर बघायला जात आहे. ;)

In reply to by मोदक

मोदक Mon, 07/31/2017 - 22:18
Empowering thoughts by Gandhi अशा भारदस्त नावाचे पुस्तक उघडावे आणि महात्मा गांधींच्या ऐवजी राहुल गांधीचे विचार वाचायला मिळावेत असे वाटतेय हा पिच्चर बघताना. नै आवडला.

In reply to by गॅरी ट्रुमन

मोदक Tue, 08/01/2017 - 16:41
या चित्रपटाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला, काही ठिकाणी या चित्रपटाचे प्रयोग बंद पाडले त्यामागचे कारण समजतेच. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे प्रयोग बंद पाडायच्या प्रकाराला 'असहिष्णुता' असे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गेली ३ वर्षे अन्यथा सतत 'असहिष्णुता', 'असहिष्णुता' ही बोंब मारणार्‍या कोणीही म्हटल्याचे ऐकिवात नाही. या बाबत सपशेल सहमत. या चित्रपटाला नक्की का विरोध केला ते काँग्रेसीच जाणोत. आणीबाणी पुकारली होती हे वास्तव आहे, ते बदलता येणार नाही. या चित्रपटात "इंदू सरकार" या सामान्य महिलेची कहाणी आहे. इंदिराबाई २ मिनीटे तर संजय गांधी १५ / २० मिनीटे पडद्यावर दाखवले आहेत. बादवे, मिपावर यावेसे वाटत नाही... यावेसे वाटत नाही... असे म्हणून बरोब्बर भाजपाविरोधी पिंका टाकणारे काँग्रेससमर्थकही अशा वेळी सोयीस्कररीत्या गायब होतात असे निरीक्षण आहे. ;)

In reply to by थिटे मास्तर

थिटे मास्तर Sat, 08/05/2017 - 22:26
उडता पंजाब च्या वेळेस... षष्प काहिच तर दाखवलेय नाहि मधुर भांडारकर ने. फिर भि सिट्टि गुल.

In reply to by थिटे मास्तर

थिटे मास्तर Sat, 08/05/2017 - 22:30
कोणाकडे ते फोटो आहेत का हो... आता नेट वर सापडत नाहियेत, नटवर सिंग संजय गांधिंचे जोडे उचलुन आहेत ते. बहुधा त्यावेळेस हे नेते संजय बाबा ना शुज घालुन द्यायचे.

In reply to by थिटे मास्तर

थिटे मास्तर Sat, 08/05/2017 - 22:41
आपण का विदेशी कार वापरतोय ? एक ब्रांड भारतिय हि हवा ! गुड ! आले देवाजि च्या मना तेथे कोणाचे चालेना. साईट फिक्स झालि गुडगाव...साहेब पोहोचले ऑस्ट्रेलियन आर्किटेक्ट ला घेउन...पाहतात तर तिथे तिन म्हशि चरतायत. साला S.P. आणि D.M. ची ऐशि तैशि केल्यावर ३ ट्र्क मागवण्यात आले आणि हुकुम देण्यात आला कि भारताच्या ३ सिमेवर ह्या ३ म्हशि सोडुन या.

In reply to by गॅरी ट्रुमन

थिटे मास्तर Sat, 08/05/2017 - 23:08
मोरारजी देसाई आणि आय.के.गुजराल ह्या दोघांन्नी जेव्हढी रॉ च्या मेहनतिचि वाट लावलि तेव्हढि तर साला जन. झिया ने हि नाहि लावलि.

In reply to by थिटे मास्तर

थिटे मास्तर Sat, 08/05/2017 - 23:35
भरत शाह प्रेझेंट पाहिल्यावरच कदाचित बंद करायला हवा होता...तरी बघितला बाबा ४० मिनिट. मधुर भांडारकर कडुन हि अपेक्षा नव्हती. छ्या.

वीणा३ Tue, 08/01/2017 - 00:46
भाजपच मुखपत्र म्हणा नायतर काहीपण म्हणा, पण इतक्या सातत्याने राजकारणातल्या बातम्या (नवीन आणि अगदी जुन्यापान्या सुद्धा ) देण्याचं काम का देव जाणे भाजप कडे झुकलेले लोकच करताना दिसतायत. आणि ते नुसतंच न करता अभ्यास आकडेवारीसकट करतायत, त्यामुळे त्यांना खोटं पाडणं इतर पक्षाच्या समर्थकांना जमत नाहीये. एकूण काय, मिसळपाव वर पण बीजेपी ला चांगला विरोधी पक्ष नाहीये :P श्री-गुरुजी पूर्णपणे भाजप कडे झुकलेले असले तरी, ट्रुमन साहेब सगळ्याच बातम्या देतायत. भाजप ला नावं पण ठेवतायत, विरोधी पक्ष कुठेच दिसत नाहीये त्याकडे पण लक्ष देतायत, मध्ये कोणी राजकारणी स्वर्गवासी झाले तर त्याची पण माहिती देतायत. जर कोणी इतर पक्षाचे समर्थक अशा प्रकारे फॅक्टस + त्यांचे त्या-त्या पक्षाचे बायस्ड मत इथे मिसळपाव वर देऊ शकले तर वाचायला खरंच आवडेल. आत्ता बरेच कुंपणावरचे लोक ज्यांना कुठल्याच पक्षाविषयी जवळीक नाहीये ते फक्त भाजप कडे झुकलेली मतच वाचतायत इथे. ट्रुमन साहेबाना विशेष धन्यवाद - सातत्याने राजकारणावरच्या माहितीपूर्ण बातम्या देण्याबद्दल .

In reply to by वीणा३

रुपी Tue, 08/01/2017 - 01:18
ट्रुमन साहेबाना विशेष धन्यवाद - सातत्याने राजकारणावरच्या माहितीपूर्ण बातम्या देण्याबद्दल . >> सहमत. खरं तर मिपावर राजकारणाबद्दल चर्चा मी मागच्या ३-४ आठवड्यांतच वाचायला लागले. पण फक्त ताज्या घडामोडीच नाही, तर आधीच्याही काही रोचक घडामोडी वाचायला मिळाल्या. या धाग्यांमध्ये माझ्याकडून भर गालण्यासारखे काही नसले तरी सध्या तरी नियमितपणे धाग्यावर येऊन वाचून जात आहे.

In reply to by रुपी

गॅरी ट्रुमन Tue, 08/01/2017 - 13:59
धन्यवाद वीणाताई, रूपीताई आणि पिराताई.
मिसळपाव वर पण बीजेपी ला चांगला विरोधी पक्ष नाहीये :P
मिपावर सध्या भाजपविरोधक फार लिहित नाहीयेत. म्हणजे मिपावर बीजेपीला चांगला विरोधी पक्ष नाही असे नाही.अडवाणी भाजपचे सारथी असताना भाजपला कडाडून विरोध करायचे काम मिपावर मीच करत होतो :) २०१५ मधील दिल्ली विधानसभा निवडणुका किंवा बिहार विधानसभा निवडणुकांच्या वेळचे मिपावरील चर्चांचे धागे तुम्ही बघितले आहेत का याची कल्पना नाही. त्या चर्चांमध्ये भाजपविरोधकही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते हे वाचायला मिळेलच. हाच प्रकार कन्हैय्याप्रकरणीही झाला होता . इतकेच काय तर ७-८ महिन्यांपूर्वी नोटाबंदीच्या वेळी मोदी-भाजपवर किती टिका झाली होती हे पण दिसेलच. गुरमेहर कौर प्रकरणावरही मिपावर धागा आला होता. त्यातही अशी टिका झालेली वाचायला मिळेल. तसेच मुंबई महापालिका निवडणुका, खा.रविंद्र गायकवाड विमान कर्मचारी मारहाण प्रकरण या चर्चांमध्येही शिवसेना समर्थकांनी भाजपवर भरपूर टिका केली आहे. उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींनी सगळ्या विरोधकांना झोपविल्यानंतर पूर्ण देशातील विरोधी पक्ष थंडावले तोच परिणाम मिपावरही बघायला मिळत असावा :) या गोष्टी बर्‍याच अंशी सिझनल असतात. समजा पंजाबमध्ये आपला यश मिळाले असते तर आपसमर्थकांना चेव चढला असता. तसेच मोदींनी कुठली महत्वाची चूक केली आणि त्याचे पडसाद कुठल्या निवडणुकांमध्ये उमटले तर परत विरोधी पक्ष सक्रीय होतील. सध्या मिपावर भाजपविरोधी मंडळी विशेष लिहित नसली तर त्याविषयी माझ्यासारखे काहीच करू शकणार नाहीत. असे सदस्यही लिहिते व्हावेत असे मात्र नक्कीच वाटते. गेल्या काही वर्षापासून बरेच विरोधी सदस्य 'तिकडे' गेले आहेत. तेव्हा विरोधी मते वाचायची असतील तर इकडच्या नाही तरी 'तिकडच्या' चर्चांमधून वाचायला मिळतील असे वाटते. पुरोगामी विचारवंती वातावरणात माझा तरी जीव घुसमटतो म्हणून मी तिकडे जाणे चारेक वर्षांपासून सोडून दिले आहे तेव्हा तिकडे लेटेस्ट काय चालू आहे याची कल्पना नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

मोदक Tue, 08/01/2017 - 16:44
बॅटमॅनबाबत सहमत. थत्तेचाचा सोयीस्कर पिंका टाकून विषयांतर करतात आणि स्वत:वर शेकले की उत्तरे देत नाहीत असे अलिकडचे निरीक्षण आहे. तसेही थत्तेचाचा "मिपावर यावेसे वाटत नाही.. यावेसे वाटत नाही" असा अनेकदा बोललेले वाचले आहे, त्यामुळे त्यांना सिरीयस चर्चेमध्ये रस असेल असे वाटत नाही.

In reply to by मोदक

अप्पा जोगळेकर Tue, 08/01/2017 - 17:20
थत्तेचाचा सोयीस्कर पिंका टाकून विषयांतर करतात आणि स्वत:वर शेकले की उत्तरे देत नाहीत असे अलिकडचे निरीक्षण आहे. त्यांची आत्यंतिक कॉन्ग्रेस प्रेमी मते त्यांना बर्‍याचदा पेचात टाकत. पण ते फारच अभ्यासू लिहायचे. जसे श्रीगुरुजी आणि ट्रुमन यांची चर्चा वाचायला मिळते तसे थत्तेचाचा आणि इंद्रराज पवार यांचे वादविवाद फार रंगत असत. मिपाच्या सुरुवातीच्या काळातल्या इथल्या राजकीय चर्चा त्यांच्या अभ्यासपूर्ण, कॉन्ग्रेसप्रेमी प्रतिसादांशिवाय अपूर्णच ठरतील. असो. विषयांतर होईल.

In reply to by वीणा३

पिलीयन रायडर Tue, 08/01/2017 - 04:53
सहमत! मी सुद्धा आजकाल इथे चक्कर मारुन जाते. हा धागा सातत्याने अपडेट केला जातो, नवीन काढला जातो. बरीच माहिती कळते. ज्यांना इतर पक्षाबद्दल लिहायचंय त्यांना लिहायला मिपा तितकंच उपलब्ध आहे जितकं ट्रुमन आणि श्रीगुरुजींना. इतकी लोकशाही असताना पोटात दुखण्याचे कारणच काय खरं तर.. पण असो..

In reply to by पिलीयन रायडर

मोदक Tue, 08/01/2017 - 14:28
ज्यांना इतर पक्षाबद्दल लिहायचंय त्यांना लिहायला मिपा तितकंच उपलब्ध आहे जितकं ट्रुमन आणि श्रीगुरुजींना. इतकी लोकशाही असताना पोटात दुखण्याचे कारणच काय खरं तर.. पण असो.. +११

In reply to by वीणा३

विशुमित Tue, 08/01/2017 - 11:14
एकूण काय, मिसळपाव वर पण बीजेपी ला चांगला विरोधी पक्ष नाहीये>>> ==>> मिपावर सुद्धा प्रबळ विरोधीपक्ष आणि निपक्ष सदस्य आहेत फक्त मिपाकर हुशार असल्या कारणाने जे विरोधीपक्ष मोदीसरकारला उठसुठ विरोधकरून चुका करत आहेत, ते कदाचित तो प्रकार इथे करत नाहीत. या मंडळींकडे भाजपकडे झुकलेलीच मतं आहेत हे उमगणे सुद्धा नसे थोडके. बाकी जनता सुज्ञ आहे, या वर माझा नितांत विश्वास आहे.

In reply to by विशुमित

विशुमित Tue, 08/01/2017 - 15:54
भाजपीय नेते आणि समर्थक बोलण्यात /लिहण्यात पटाईत आहेत, यामध्ये काही दुमत नाही. एखादी गोष्ट इतकूस असली तरी ती फुगवून बडा चढाके कसे लोकांच्या गळी उतरायचं यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. बऱ्याच वेळा आरसा दाखवून सुद्धा फक्त सोयीच्या प्रश्नांना उत्तरे द्याची आणि अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांना बगल द्याची ही त्यांची कार्यपद्धती. नाहीतर मागील ६० वर्षातील एखादे अप्रासंगिक उदाहरण देऊन सध्य काळातील प्रश्नांना फाट्यावर मारून द्यायची. पण कामाच्या बाबतीत आउटपुट काय शून्य. नाहीतर २०१९-२०२४ची गाजरं दाखवायची. माझ्या मते भाजप/मोदी विरोधकांनी पेशियन्स ठेवून या सरकारला राहिलेले २/३ वर्ष किंवा अजून एक टर्म सरकार चालवून द्यावे. काय त्यांना करायचंय ते करून द्यावे. आखा भारत काबीज करू देत, हिंदुराष्ट्र येऊ देत, सुशासन येऊ देत, शेतकऱ्यांचं वाटोळे/कर्जमुक्ती करू देत, भटजी-शेटजीचे कल्याण होऊ देत, अल्पसंख्यांकांच्या किडा बसवू देत, पाकिस्तान निस्तनाबुद करू देत, काश्मीरचा बच्चा बच्चा ठेचून काढू देत किंवा चीनचा पार भुगा करू देत. विरोधकांनी शांत बसून हे पाहत राहावे. जनतेला आपोआप सगळे पटेल. निदान त्या नंतर पुढील ५० वर्ष तरी लोक यांच्या भूल थापांना बळी पडणार नाहीत.

In reply to by विशुमित

मोदक Tue, 08/01/2017 - 16:17
नाहीतर मागील ६० वर्षातील एखादे अप्रासंगिक उदाहरण देऊन चला, म्हणजे गांधी / नेहरू खानदानाने देश चालवताना अप्रासंगिक उदाहरणे तयार केली आहेत हे किमान मान्य केलेत..! माझ्या मते भाजप/मोदी विरोधकांनी पेशियन्स ठेवून या सरकारला राहिलेले २/३ वर्ष किंवा अजून एक टर्म सरकार चालवून द्यावे. काय त्यांना करायचंय ते करून द्यावे. हे वाक्य टिपीकल सरंजामशाही वृत्तीचे प्रतीक आहे. विरोधक कोण आहेत जे सरकार चालू देणार..? सामान्य मतदार भाजपाला आघाडीचे सरकार म्हणून निवडून देतो आहे. मग "विरोधी पक्षाने सरकार चालवून द्यावे" म्हणजे नक्की काय करावे..? विरोधी पक्ष पूर्वी सत्तेत बसला होता आणि आता बुडाखालची खुर्ची गेली आहे हे मान्य का होत नाहीये..? आखा भारत काबीज करू देत, हिंदुराष्ट्र येऊ देत, सुशासन येऊ देत, शेतकऱ्यांचं वाटोळे/कर्जमुक्ती करू देत, भटजी-शेटजीचे कल्याण होऊ देत, अल्पसंख्यांकांच्या किडा बसवू देत, पाकिस्तान निस्तनाबुद करू देत, काश्मीरचा बच्चा बच्चा ठेचून काढू देत किंवा चीनचा पार भुगा करू देत. अजुन एक टर्म मध्ये इतके सगळे जर केलेच तर विरोधक नक्की कोणत्या भूलथापांबद्दल बोलणार ते तरी सांगा.

In reply to by मोदक

विशुमित Tue, 08/01/2017 - 16:46
विरोधी पक्ष पूर्वी सत्तेत बसला होता आणि आता बुडाखालची खुर्ची गेली आहे हे मान्य का होत नाहीये..?>>> ==> माझा ही तोच मुद्दा आहे. विरोधकांनी हे मान्य करून मतदारांच्या कौलाचा आदर केला पाहिजे. एकदा त्यांच्या मनासारखे होऊ देत. नंतर दूध का दूध और पाणी का पाणी जनतेला दिसेलच. अजुन एक टर्म मध्ये इतके सगळे जर केलेच तर विरोधक नक्की कोणत्या भूलथापांबद्दल बोलणार ते तरी सांगा.>>> ==> करू तर देत पहिले त्यांना मग बोलू.

In reply to by वीणा३

श्रीगुरुजी Tue, 08/01/2017 - 15:09
श्री-गुरुजी पूर्णपणे भाजप कडे झुकलेले असले तरी, ट्रुमन साहेब सगळ्याच बातम्या देतायत. भाजप ला नावं पण ठेवतायत, विरोधी पक्ष कुठेच दिसत नाहीये त्याकडे पण लक्ष देतायत, मध्ये कोणी राजकारणी स्वर्गवासी झाले तर त्याची पण माहिती देतायत. जर कोणी इतर पक्षाचे समर्थक अशा प्रकारे फॅक्टस + त्यांचे त्या-त्या पक्षाचे बायस्ड मत इथे मिसळपाव वर देऊ शकले तर वाचायला खरंच आवडेल. आत्ता बरेच कुंपणावरचे लोक ज्यांना कुठल्याच पक्षाविषयी जवळीक नाहीये ते फक्त भाजप कडे झुकलेली मतच वाचतायत इथे. मी भाजपच्या प्रत्येक भूमिकेचे समर्थन करीत नाही. नुकतेच झालेले बिहार प्रकरण व त्यापूर्वी भाजपने गोव्यात व मणीपूरमध्ये स्थापन केलेले सरकार याविरोधात मी लिहिले होते. इथे इतर पक्षांचे समर्थकसुद्धा आहेत. २०१४-१५ मध्ये केजरीवाल समर्थकांनी इथे अनेक धागे काढले होते व त्यावर तुंबळ युद्ध झाले होते. परंतु 'आपलाच दाम खोटा' निघाल्यामुळे ते आता केजरीवालांचे समर्थन करण्यापासून लांब राहतात. इथे एकजण राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आहेत. इथे शिवसेनेचे कट्टर समर्थक सुद्धा अनेक आहेत. रवींद्र गायकवाड किंवा नुकत्याच येऊन गेलेल्या शिवसेनेच्या धाग्यावर सेना समर्थकांनी सेनेचे हिरिरीने समर्थन केले होते. पूर्वी काही जण मनसेचे समर्थक होते. परंतु त्यांचाही दाम खोटा निघाला, त्यामुळे तेही आता लिहीत नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

मोदक Tue, 08/01/2017 - 16:20
गुरूजी.. तुम्ही अनेकदा नको त्या गोष्टीचे पण समर्थन करता त्यामुळे असे मत तयार झाले असावे. इथे इतर पक्षांचे समर्थकसुद्धा आहेत. २०१४-१५ मध्ये केजरीवाल समर्थकांनी इथे अनेक धागे काढले होते व त्यावर तुंबळ युद्ध झाले होते. परंतु 'आपलाच दाम खोटा' निघाल्यामुळे ते आता केजरीवालांचे समर्थन करण्यापासून लांब राहतात. इथे एकजण राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आहेत. इथे शिवसेनेचे कट्टर समर्थक सुद्धा अनेक आहेत. रवींद्र गायकवाड किंवा नुकत्याच येऊन गेलेल्या शिवसेनेच्या धाग्यावर सेना समर्थकांनी सेनेचे हिरिरीने समर्थन केले होते. पूर्वी काही जण मनसेचे समर्थक होते. परंतु त्यांचाही दाम खोटा निघाला, त्यामुळे तेही आता लिहीत नाहीत. + २० लाख.

अत्रे Tue, 08/01/2017 - 06:21
http://abpmajha.abplive.in/mumbai/update-on-traffic-police-related-pil-filed-by-sunil-toke-in-hc-430320
हेड कॉन्स्टेबल सुनील टोके यांनी ट्रॅफिक पोलिसांच्या भ्रष्टाचारासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेची गंभीर दखल घेत, मुंबई उच्च न्यायालयानं याचं जनहीत याचिकेत रुपांतर करण्याचे निर्देश दिलेत. टोके यांनी पोलिसांच्या सेवेत असताना केलेल्या या आरोपांतील तथ्य पडताळून पाहण्यासाठी जनहितार्थ या याचिकेची मोठ्या स्तरावर चर्चा होणे गरजेचं आहे ही भावना हायकोर्टानं व्यक्त केली होती.
http://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/crime/cop-who-exposed-corruption-in-traffic-dept-now-moves-hc/articleshow/56385250.cms http://www.hindustantimes.com/mumbai-news/acb-report-on-no-corruption-in-mumbai-traffic-department-an-eyewash-hc/story-sppK5SPNAB1kz5aFELGqZM.html http://www.dnaindia.com/mumbai/report-curb-corruption-if-you-can-t-stop-it-hc-to-traffic-police-2500411 लढा चालू ठेवल्याबद्दल सुनील टोके यांचे अभिनंदन. यांचा मेल आयडी कोणाकडे आहे का? मराठी वर्तमानपत्रांत फार काही या केसबद्दल दिसत नाही. "व्हाट्सअप ने काढले नवीन फिचर!" छाप टुकार बातम्या देण्यापेक्षा सखोल अभ्यास करून बातम्या दिल्या तर बरे होईल.

अभिजीत अवलिया Tue, 08/01/2017 - 07:09
डॉकलाम मध्ये भारत चीन ह्यांच्यात तणाव असतानाच उत्तराखंडच्या बाराहोती परिसरात १० चिनी सैनिकांनी २५ जुलैला घुसखोरी केली होती असे समोर आले आहे. http://economictimes.indiatimes.com/news/defence/chinese-army-entered-uttarakhands-chamoli-district-while-doklam-was-on-claims-report/articleshow/59845892.cms

In reply to by अभिजीत अवलिया

श्रीगुरुजी Tue, 08/01/2017 - 15:04
चिनी सैनिकांची घुसखोरी नवीन नाही. अनेक ठिकाणी भारत व चीन यांच्यातील सीमारेषा पूर्णपणे निश्चित झालेली नाही. याचा फायदा घेऊन चिनी सैनिक अनेकवेळा घुसखोरी करतात व भारताने विरोध करून उच्च पातळीवर चर्चा झाल्यानंतर काही दिवसानंतर परत जातात. यामागे अनेक उद्देश आहेत. भारत किती विरोध करतो याची चाचपणी ते करीत असावेत. तसेच आम्ही मनाला येईल तेव्हा तुमच्या प्रदेशात घुसू शकतो व तुम्ही आम्हाला प्रतिकार करू शकत नाही हे वारंवार दाखवून द्यायचा उद्देश असावा. तसेच भविष्यात सीमेवरील काही प्रदेशावर कब्जा करायचा असल्यास वारंवार त्या प्रदेशात आत जाऊन पाहणी करावी हासुद्धा उद्देश असेल. राजनैतिक पातळीवर आम्ही तुमच्यापेक्षा सामर्थ्यवान आहोत हे वारंवार दाखवून भारताला बचावात्मक भूमिका घ्यायला पार पाडणे हादेखील उद्देश असावा. १९६२ च्या पराभवानंतर भारत सावध आहे. त्यामुळेच भारतीय सैनिकांनी भारत, भूतान व चीन यांच्या सीमेवरील वादग्रस्त त्रिभुज प्रदेशात रस्ते बांधण्यापासून चीनला रोखलेले आहे. त्यामुळे चीनचा तिळपापड झालेला आहे. चीन व भूतान यांच्यात राजनैतिक संबंध नाहीत. चीनला ते सुरू करायचे आहेत. परंतु अजूनपर्यंत तरी त्यात यश आलेले नाही. भारत व भूतान यांच्यातील करारानुसार भूतानचे परराष्ट्र धोरण भारताच्या सल्ल्यानुसार ठरते. तसेच भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. त्यामुळे भूतानच्या वतीने भारताने आपल्याला आव्हान दिले आहे हे चीनला सहन झालेले नाही. मागील दीड महिन्यांपासून चीन सातत्याने आक्रमक भाषा बोलत आहे. मागील दीड महिन्यात चीनने अनेकवेळा भारताला युद्धाची धमकी दिलेली आहे. भारताची अवस्था १९६२ पेक्षा वाईट करू अशीही धमकी आलेली आहे. चीनची सरकारी वृत्तपत्रे 'ग्लोबल टाईम्स' आणि 'चायना डेली' सातत्याने भारताविरूद्ध प्रक्षोभक लेख लिहीत आहेत. १९६२ च्या युद्धाची चित्रे प्रसिद्ध करून भारताला घाबरवून सोडायचा प्रयत्न सुरू आहे. दस्तुरखुद्द चीनचे राष्ट्राध्यक्ष युद्धाची भाषा बोलत आहेत. या सर्व प्रकरणात भारताने अत्यंत प्रगल्भ व ठाम भूमिका घेतलेली आहे. चीनच्या कोणत्याही प्रपोगंडाला उत्तर न देता भारत शांत राहून आपल्या भूमिकेवर ठाम आहे. चीनच्या कोणत्याही धमकीला न जुमानता भारताने आपले सैन्य भूतानच्या सीमावर्ती भागात तयार ठेवले आहे. भारतीय नेतेही बहुतांशी शांत राहून आपले काम करीत आहेत. चीनच्या बर्‍याच धमक्यानंतर अरूण जेटलींनी "भारत आता १९६२ चा भारत राहिलेला नाही" असे सांगून युद्ध झाले तर ते १९६२ प्रमाणे एकतर्फी न होता भारत जोरदार प्रतिकार करेल व त्यात चीनचेही प्रचंड नुकसान होईल हे सूचित केले होते. सुषमा स्वराज यांनी सुद्धा चीनने सैन्य मागे घेतले तरच चर्चा होईल असे सांगून भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. चीन भारत कुरापत काढायची वाट पहात आहे. उत्तराखंडमध्ये घुसखोरी करणे हा त्याच प्रयत्नाचा भाग आहे. भारतीय सैन्याने थोडादेखील प्रतिकार केला तरी ते कारण दाखवून भारतावर हल्ला करायला निमित्त मिळेल याची चीन वाट पहात आहे. सुदैवाने भारताने अतिशय प्रगल्भ व समतोल भूमिका घेतलेली आहे. चीन लष्करीदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या भारतापेक्षा बराच प्रबळ असला तरी भूतकाळाचे ओझे न बाळगता चीनच्या कोणत्याही धमकीला घाबरायचे नाही, चीनच्या प्रक्षोभक प्रचाराला अजिबात उत्तर द्यायचे नाही, कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडून वातावरण पेटेल असे करायचे नाही आणि त्याचवेळी आपले सैन्य मागे न घेता आपल्या भूमिकेवर ठाम रहायचे अशी भारताने अत्यंत योग्य भूमिका घेतलेली आहे. भारत व चीन मध्ये युद्ध होण्याची शक्यता खूप कमी आहे. तसे झाले तर दोन्ही देशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. युद्ध टाळण्यासाठी चीन सातत्याने दबाव वाढवित आहे. आपला दबाव भारत फार काळ सहन करू शकणार नाही व शेवटी दबावामुळे भारत माघार घेईल अशी चीनची अटकळ असावी. चीनबरोबर इतके ताणल्यानंतर भारताने चीनच्या दबावामुळे माघार घेतली तर ती मोठी चूक ठरेल. आपण भारतासारख्या मोठ्या देशाला सुद्धा दबाखाली झुकवू शकतो असा संदेश देण्यात चीन यशस्वी होईल. चीनच्या सीमेवरील इतर १३ लहान देशांनाही हा इशारा असेल व त्यांच्यावरील चीनची दादागिरी अजून वाढेल. त्याचबरोबर भविष्यात भारताला चीनसमोर पुन्हा एकदा पडेल भूमिका घ्यायला लागून भारतीय सैन्याचे व पर्यायाने संपूर्ण देशाचे मनोधैर्य खच्ची होईल. चीनलासुद्धा इतक्या पुढे आल्यानंतर आता माघार घेणे अवघड झाले आहे. त्रिभुज प्रदेशातून सैन्य माघारी घेऊन काम थांबविले तर चीनच्या सैन्याचा व चीनचा दरारा कमी होईल व सीमेवरील इतर छोटे देशसुद्धा चीनच्या नजरेला नजर भिडवून बोलायला लागतील. यामुळे चीनच्या विस्तारवादी हालचालींना काही काळ पायबंद बसेल. एकंदरीच चीनने अट्टाहासाची भूमिका घेऊन स्वतःची व भारताची अडचण करून ठेवली आहे. हा प्रश्न दीर्घकाळ लोंबकळत राहील असा अंदाज आहे.

अभिजीत अवलिया Tue, 08/01/2017 - 15:16
तसेच भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे.
ही चुकीची माहिती आहे असे मला कालच समजले. भारत भूतान मैत्री करारात कुठेही भारत भूतानचे संरक्षण करेल असे म्हटलेले नाही. सध्या देखील भारत मित्रत्वाच्या नात्याने आणि आपल्याच पूर्वोत्तर राज्यांच्या संरक्षणासाठी डोकलाम वादात उतरलाय.

In reply to by अभिजीत अवलिया

श्रीगुरुजी Tue, 08/01/2017 - 15:45
बर्‍याच माध्यमातून असेच लिहिले आहे की भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. अर्थात माध्यमातून १००% अचूक लिहिले जाते असे नाही.

In reply to by श्रीगुरुजी

वरुण मोहिते Tue, 08/01/2017 - 16:33
वर ह्याची सविस्तर माहिती आहे . इंडिया भूतान ट्रीटी कश्या बदलत गेल्या याची . माध्यमांतल्या बातम्या वेगळ्या आणि खात्रीशीर बातम्या वेगळ्या . शस्त्रास्त्र पुरवठा भारत करेल , भूतान स्वतः शस्त्रास्त्र बनवून कुठेही निर्यात करू शकणार नाही , भूतान च्या सार्वभौमत्वाला काही दगा झाला तर भारत सरकार भूतान सरकार कडून काही मुद्द्यावर ग्वाही घेऊन सर्व शस्त्रास्त्र पुरवठा करेल असे अनेक मुद्दे आहेत त्यात . आणि आंतराष्ट्रीय कायद्यात प्रत्येक मुद्दा कुठल्यातरी टर्म्स वर बनतो . अपवाद व्हॅटिकन सिटी .(संरक्षणाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर )

श्रीगुरुजी Tue, 08/01/2017 - 15:43
अभिजीत अवलिया व गॅरी यांच्या प्रतिसादात काही समान मुद्दे असल्याने दोघांना एकत्रित उत्तर देत आहे. राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा दिला होता ? हा पाठिंबा राष्ट्रवादीने खरोखरच न मागता दिला होता असे मला तरी वाटत नाही. पडद्याआड भाजप-राष्ट्रवादीमध्ये काहीच बोलणी न होता राष्ट्रवादीने 'महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे या उदात्त हेतूने' भाजपला पाठिंबा जाहिर केला यावर फार कोणी विश्वास ठेवणे कठिण आहे. मतदार तितके भाबडे नक्कीच नाहीत. राष्ट्रवादीने २०१४ मध्ये निवडणुक निकालांच्या दिवशी दुपारी अचानक भाजपला पाठिंबा का दिला असावा हे तसे एक गूढच आहे. त्यामागे २-३ वेगवेगळी कारणे असावीत. १) भाजपला पाठिंबा दिला तर भाजप आपल्या पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार नाही अशा समजूतीने पाठिंबा दिला असावा. २) निवडणुकपूर्व प्रचारात भाजप व शिवसेना यांच्यातील संबंध रसातळाला गेले होते. विशेषत: शिवसेनेने भाजपविरूद्ध अत्यंत जहरी भाषा वापरली होती. त्यामुळे निवडणुकीनंतर हे दोघे भविष्यात कधीच एकत्र येणार नाहीत अशी पवारांची समजूत झालेली असावी. अशा परिस्थितीत आपण बाहेरून पाठिंबा दिला तर आपल्याला हवे तसे या सरकारला नाचविता येईल व भविष्यात सरकारमध्येही सामील होऊन सत्तेची फळे चाखता येतील हा पाठिंबा देण्यामागे हेतू असावा. तसेच वेळ पडल्यास आपल्या सोयीने पाठिंबा काढून घेऊन सरकार पाडून मध्यावधी निवडणुक घेण्यास भाग पाडता येईल अशीही समजूत असावी. आपल्या विरूद्ध सातत्याने बोलणार्‍या भाजपने आपलाच पाठिंबा घेतला तर भाजपबद्दल जनतेत अतिशय वाईट मत होईल व असे सरकार काही काळाने पाडले तर आपल्याला फारसा तोटा न होता भाजपलाच सर्वाधिक फटका बसेल असेही त्यामागे गणित असावे. ३) अजून एक वेगळी शक्यता म्हणजे न मागता पाठिंबा देऊन त्याबदल्यात काही मागण्या पदरात पाडून घ्याव्यात अशी एक योजना असावी. आपल्या नेत्यांना भविष्यात भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचवावे हा एक हेतू असणारच. त्याचवेळी असेही वाचण्यात आले होते की मुख्यमंत्रीपदावर खडसे किंवा फडणवीस किंवा इतर कोणी येण्याऐवजी गडकरींना मुख्यमंत्री करावे यासाठी पवार गुपचूप काही भाजप नेत्यांबरोबर दिल्लीत फिल्डींग लावत होते. इतर कोणापेक्षाही गडकरींना मॅनेज करणे सोपे जाईल अशी त्यांची समजूत असावी. शिवसेना तुम्हाला अजिबात पाठिंबा देणार नाही. आम्ही बाहेरून बिनशर्त पाठिंबा देऊ. परंतु त्याबदल्यात तुम्ही गडकरींना मुख्यमंत्री करा अशी काहीतरी त्यांची मागणी होती असे वाचले होते. पवारांच्या दुर्दैवाने मोदी, शहा व फडणवीस त्यांच्यापेक्षाही वरचढ निघाले. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मौन बाळगून मोदी-शहांनी फडणवीसांना मुख्यमंत्री बनविले व शेवटी शिवसेनेला पाठिंबा द्यायला भाग पाडले. त्यामुळे पवारांची खेळी फसली. काहीच फरक नाहीये. जिथे सत्ता तिथे आम्ही हे सगळ्या पक्षांचे सूत्र असते. त्याला जनकल्याणाचा मुलामा चढवला की झाले. भाजप हा नावाला 'पार्टी विथ डिफरन्स' आहे. जो पक्ष गोव्यासारख्या अत्यंत छोट्या राज्याची सत्ता मिळावी म्हणून संरक्षण मंत्र्याला परत पाठवतो आणि हे महत्वाचे खाते कामचलाऊ असल्यासारखे चालवतो त्याच्याकडून बिहारच्या सत्तेचा मिळत असलेला घास सोडला जाईल हे अपेक्षित न्हवतेच. बिहार मॉडेलप्रमाणे सपा-बसपा २०१९ मध्ये खरोखरच एकत्र आले तर (ही शक्यता बरीच आहे) ही आघाडी (बिहारमध्ये झाले त्याप्रमाणे) लवकरच तुटणार म्हणून त्यांना मिळणार्‍या मतांची बेरीज न होता त्यांची बरीच मते कापली जावीत या उद्देशाने भाजपने हा उद्योग केला आहे असे मला वाटते हेच मी ४-५ वेळा लिहिले आहे. उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये ही युती झाली नाही म्हणून २०१९ मध्येही होणारच नाही आणि राष्ट्रपती निवडणुकांमध्ये विरोधकांमध्ये फाटाफूट झाली हा विरोधक एकजिनसी नसल्याचा पुरेसा संदेश आहे असे मला तरी वाटत नाही. त्यापेक्षा बराच जास्त मोठा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवायला हवा आणि त्यासाठी बिहारमध्ये झाले ते चांगलेच झाले असे मला वाटते. बिहारमध्ये जे झाले व त्यापूर्वी गोवा व मणीपूर मध्ये जे झाले ते अयोग्य होते हे मी यापूर्वीच लिहिले आहे. राजकारण कितीही वाईट असले तरी तिथे थोडी तरी नीतिमत्ता असायला हवी असे माझे मत आहे. २०१३ पासून सातत्याने भाजपवर कठोर टीका करणार्‍या व भाजपशी विश्वासघात करणार्‍या नितीशकुमारांना भाजपने काही मिनिटांत पाठिंबा देणे अयोग्य होते. याच न्यायाने उद्या भाजप केजरीवालांशीही हातमिळवणी करू शकेल. लालू व नितीश ही युती २०१९ पूर्वीच तुटण्याची बरीच शक्यता होती. तसे होताना नितीशकुमारांची विश्वासार्हता जवळपास पूर्ण नष्ट झाली असती व त्याचा फायदा भाजपला झाला असताच. त्यांची युती तुटण्याची वाट न बघता भाजपने घाई करून नितीशकुमारांना पाठिंबा देऊन सत्तेत घुसायची घाई केली. कालपरवा बिहार मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. त्यात जदयुचे १४, भाजपचे ११ आणि भाजपचा मित्रपक्ष असलेल्या लोजपचा १ असे नवे मंत्री समाविष्ट करण्यात आले. तसेच भाजपचे मंगल पांडे पाटण्यात उपस्थित नसल्यामुळे त्यांना शपथ घेता आली नाही. त्यांचाही मंत्रीमंडळात लवकरच समावेश होईल. म्हणजे जदयुचे १४ आणि भाजप+ मित्रपक्षांचे १३ मंत्री आहेत. म्हणजे भाजपला पूर्वीइतके दुय्यम स्थान दिले गेलेले नाही. राज्यसरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे कोणत्याही सरकारची बरीवाईट कामगिरी ही मुख्यमंत्र्याच्या खात्यात जमा होते. त्यामुळे भाजपचे पूर्वीपेक्षा जास्त मंत्री असले तरी हे सरकार नितीशकुमारांचे म्हणूनच ओळखले जाणार. मंत्रीमंडळाचे कोणतेही निर्णय हे त्यांच्या मान्यतेनुसारच होणार. त्याअर्थाने भाजप अजूनही दुय्यम भूमिकेतच आहे. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी राज्यातील ४० पैकी ३१ लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी २५ जागा स्वतः भाजपच्या आहेत. या जागा भाजप सोडायला तयार होईल ही शक्यता बरीच कमी. तेव्हा जदयुला जास्तीतजास्त ९ (किंवा लोजपसारख्या मित्रपक्षांना जदयुच्या तिकिटावर निवडणुक लढवायला लावून जास्तीत जास्त १५) जागा लढवायला मिळू शकतील. पूर्वी जदयु २५ आणि भाजप १५ जागांवर निवडणुक लढवत असे. ते आकडे बरोबर उलटे होतील ही शक्यता जास्त. जर युती तुटली तर २०१९ मध्ये लोकसभेच्या जागावाटपाच्या प्रश्नावरून तुटायचा संभव आहे. आणि त्यातही अमित शहा शिवसेनेला शेवटपर्यंत झुलवत ठेवले होते तसे झुलवत ठेऊन नितीशकुमारांची बार्गेनिंग पॉवर कमी करतील कारण अगदी ऐनवेळी नितीशनी युती तोडली तर भाजप-जदयु-राजद अशी तिरंगी लढत होऊन परत २०१४ ची पुनरावृत्ती होईल हे नितीशकुमारांना कळणार नाही असे नाही. सध्या भाजपचे बिहारमध्ये २५ नसून २२ खासदार आहेत. ७ खासदार लोकजनशक्ती व २ खासदार उपेंद्र कुशवाहच्या पक्षाचे आहेत. समजा ही नवीन युती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकली तर संजदला जास्तीत जास्त ९ जागा लढवायला मिळू शकतात. यापूर्वी ४० पैकी २५ जागा लढविणारा संजद २०१९ मध्ये फक्त ९ जागांवर समाधान मानेल असे वाटत नाही. समजा संजदला जास्त जागा द्यायच्या तर त्यातील जास्तीत जास्त जागा भाजपच्या कोट्यातून द्यावा लागतील. म्हणजे एका अर्थाने भाजप स्वतःचे नुकसान करून घेणार. समजा जागावाटपावरून युती तुटली तर पुन्हा एकदा संजदच्या बरोबरीने भाजपची विश्वासार्हताही कमी होणार.

In reply to by श्रीगुरुजी

अभिजीत अवलिया Wed, 08/02/2017 - 09:49
श्रीगुरुजी, तुम्ही राष्ट्रवादीने २०१४ मध्ये निवडणुक निकालांच्या दिवशी अचानक भाजपला पाठिंबा का दिला असावा हे त्याची वेगवेगळी कारणे तुमच्या अंदाजे सांगितलीत. शेवटी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मौन बाळगून मोदी-शहांनी फडणवीसांना मुख्यमंत्री बनविले व शेवटी शिवसेनेला पाठिंबा द्यायला भाग पाडले असेही म्हणालात. --> तुम्ही अजूनही पवारांनी भाजपाला स्व:खुशीने मदत केली असे गृहीत धरत आहात. माझा अंदाज असा आहे -> निवडणूक निकाल लागल्यानंतर कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले न्हवते. आपण जर लगेच शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव ठेवला तर त्यांना बरीच महत्वाची पदे द्यावी लागलील हे भाजपच्या लक्षात आले. तेव्हा शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपा+राष्ट्रवादीने पडद्यामागे हालचाली केल्या. राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी (?) स्थिर सरकार हवे अशा उदात्त हेतूने भाजपाला पाठिंबा द्यायचा असे वरकरणी घोषित करायचे असे ठरले असावे. त्याबदल्यात राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बगलबच्च्यांवर सरकारने कोणतीही कारवाई करायची नाही असे डील झाले असावे. त्यामुळे सिंचन घोट्याळातील पुरावे भरलेला ट्रक परत कुठे दिसलाच नाही. माझा आक्षेप ह्या पाठिंब्याला आहे. जरी राष्ट्रवादीने स्व:खुशीने पाठिंबा दिला होता असे एकवेळ मानले तरी भाजपाने तो का घेतला हा माझा प्रश्न आहे. संपूर्ण निवडणुक प्रचार काळात भाजपाने राष्ट्रवादीवर NCP म्हणजे Naturally Corrupt पार्टी, हे राष्ट्रवादी नाही, हे तर भ्रष्ट्रवादी अशी टिका केली होती. राष्ट्रवादीचे १०-१० चे घड्याळ म्हणजे त्यांनी गेल्या १० वर्षात भ्रष्टाचार १० पट वाढवला आणि अजून सत्तेत आले तर १५ पट वाढवतील असे पंतप्रधानांचे मत होते. (दुवा - http://timesofindia.indiatimes.com/home/specials/assembly-elections-2014/maharashtra-news/NCP-is-Naturally-Corrupt-Party-alleges-Narendra-Modi-Sharad-Pawar-slams-PM/articleshow/44794774.cms ) मग इतक्या भ्रष्ट पक्षाचा पाठिंबा जरी राष्ट्रवादीने स्वत:हुन दिला असे समजले तरी 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी जाहिरात करून स्वच्छ कारभाराची हमी देणार्या भाजपने घेतला तर हा जनतेचा विश्वासघात न्हवता का?
भाजपशी विश्वासघात करणार्‍या नितीशकुमारांना भाजपने काही मिनिटांत पाठिंबा देणे अयोग्य होते. भाजपने घाई करून नितीशकुमारांना पाठिंबा देऊन सत्तेत घुसायची घाई केली.
इथे पण तुम्ही नेहमीप्रमाणे सोईस्कर भूमिका घेतली आहे. जसे काही नितीशकुमारांनी तडकाफडकी राजीनामा दिला. हे समजल्यानंतर पंतप्रधानांना नितीशकुमारांच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे कौतुक वाटले आणि ५ मिनिटात त्यांनी ट्विटर वरून नितीश कुमारांचे अभिनंदन केले. नंतर ह्या भ्रष्टाचार विरोधी उदात्त लढ्यात सामील झाल्याबद्दल लगेच नितीशकुमारांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. इथे जितके ढोंगी नितीश आहेत तितकाच ढोंगी भाजप देखील. मोदीना २०१९ साली कुणीही आव्हान देऊ शकणार नाही असे परवा नितीश म्हणाले. आणि हेच कारण होते नितीशकुमारांचे महागठबंधंन सोडून भाजपच्या कळपात शिरण्याचे. तसे पण किमान २०२४ पर्यंत केंद्रात सत्ता बदल होईल असे वाटत नाही. मग पराभूतांचा राजा होण्यापेक्षा विजेत्यांच्या कळपात शिरून निदान मुख्यमंत्रीपदी तरी कायम राहू हा सोईस्कर विचार. कारण इतकाच जर त्यांना भ्रष्टाचाराचा तिटकारा होता तर मुळात लालू यादवांशी हातमिळवणी केलीच नसती. हा संधीसाधूपणा जसा नितीशकुमारांनी केला तसेच बिहारची सत्ता मिळतेय म्हटल्यावर हावऱ्यासारखी ती घेण्याचा भाजपाने देखील केला. पण तुम्ही फक्त नितीश विश्वासघातकी, पवार विश्वासघातकी, काँग्रेस विश्वासघातकी असे उच्चं आवाजाने बोलता पण भाजपाने हे जे विश्वासघात केलेत त्याबद्दल फक्त 'भाजपाने चूक केली हा' अशी सौम्य भाषा वापरता. हे म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका आहे. कुणी कशी भूमिका घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण दाखवून द्यावेसे वाटले इतकेच.

In reply to by अभिजीत अवलिया

वामन देशमुख Wed, 08/02/2017 - 10:43
पण तुम्ही फक्त नितीश विश्वासघातकी, पवार विश्वासघातकी, काँग्रेस विश्वासघातकी असे उच्चं आवाजाने बोलता पण भाजपाने हे जे विश्वासघात केलेत त्याबद्दल फक्त 'भाजपाने चूक केली हा' अशी सौम्य भाषा वापरता. हे म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका आहे.
+१

In reply to by अभिजीत अवलिया

श्रीगुरुजी Wed, 08/02/2017 - 14:28
तुम्ही अजूनही पवारांनी भाजपाला स्व:खुशीने मदत केली असे गृहीत धरत आहात. माझा अंदाज असा आहे -> निवडणूक निकाल लागल्यानंतर कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले न्हवते. आपण जर लगेच शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव ठेवला तर त्यांना बरीच महत्वाची पदे द्यावी लागलील हे भाजपच्या लक्षात आले. तेव्हा शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपा+राष्ट्रवादीने पडद्यामागे हालचाली केल्या. राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी (?) स्थिर सरकार हवे अशा उदात्त हेतूने भाजपाला पाठिंबा द्यायचा असे वरकरणी घोषित करायचे असे ठरले असावे. त्याबदल्यात राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बगलबच्च्यांवर सरकारने कोणतीही कारवाई करायची नाही असे डील झाले असावे. त्यामुळे सिंचन घोट्याळातील पुरावे भरलेला ट्रक परत कुठे दिसलाच नाही. माझा आक्षेप ह्या पाठिंब्याला आहे. जरी राष्ट्रवादीने स्व:खुशीने पाठिंबा दिला होता असे एकवेळ मानले तरी भाजपाने तो का घेतला हा माझा प्रश्न आहे. कारण असे असण्याची बरीच शक्यता आहे. अर्थात इतरही काही शक्यता आहेत, परंतु मला हीच शक्यता सर्वाधिक आहे असे वाटते. मी वर लिहिल्याप्रमाणे निवडणुक प्रचाराच्या काळात सेना-भाजप संबंध इतके विकोपाला गेले होते की निकालानंतर हे दोन्ही पक्ष अजिबात एकत्र येणार नाहीत असे पवारांना वाटले असावे. अशा परिस्थितीत आपण बाहेरून पाठिंबा जाहीर करून आपल्याला एका दगडात अनेक पक्षी मारता येतील असे त्यांचे गणित असावे. आपल्या पाठिंब्यामुळे आपल्याविरूद्ध असलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे लांबणीवर टाकली जातील, आपला पाठिंबा स्वीकारला तर आपले काही नुकसान नाही परंतु भाजपची बदनामी होईल, आपला पाठिंबा नाकारला भाजपला शिवसेनेच्या नाकदुर्‍या काढाव्या लागतील म्हणजेच आपला पाठिंबा स्वीकारला किंवा नाकारला तरी भाजपची अडचणच होऊन भविष्यात भाजपला तोटा होईल, आपल्याला जेव्हा सोयिस्कर परिस्थिती निर्माण होईल तेव्हा पाठिंबा काढून घेऊन मध्यावधी निवडणुक लादता येईल व त्यावेळी भाजपला भरपूर तोटा होऊन आपल्याला फायदा होऊ शकेल असे काहीतरी गणित त्यांच्या मनात असावे. शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, कारण शिवसेना पूर्ण खच्ची झाली तर कॉग्रेस/राष्ट्रवादी विरोधी मते भाजपकडे एकवटतील. तसेच जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत शिवसेना आपल्यापेक्षा जास्त कट्टर विरोधकाची भूमिका पार पडेल हे पवारांनी ओळखले होते. भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेचे खच्चीकरण होऊन देणे काँग्रेस/राष्ट्रवादीला परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे ही शक्यता निकालात निघते. फडणविसांनी मागील ३ वर्षात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काही नेत्यांच्या भ्रष्टाचारावर नक्कीच कारवाई केलेली आहे. परंतु सिंचन घोटाळ्याची चौकशी फार वेगाने सुरू नाही असी दिसते आहे. माझ्या मते ही चौकशी म्हणजे फडणविसांनी हातात ठेवलेला हुकुमाचा एक्का आहे. २०१९ पूर्वी निवडणुकीच्या आधी काही काळ या चौकशीला वेग येऊन अजित पवार, तटकरे हे सुद्धा भुजबळ चाचा-भतीजांप्रमाणे, रमेश कदम इ. प्रमाणे आत जातील असा माझा अंदाज आहे. अर्थात निवडणुकीवर डोळा ठेवून आपल्याला सोयीचे असेल तेव्हा कारवाई करणे हे निश्चितच अयोग्य आहे. जरी राष्ट्रवादीने स्व:खुशीने पाठिंबा दिला होता असे एकवेळ मानले तरी भाजपाने तो का घेतला हा माझा प्रश्न आहे. मग इतक्या भ्रष्ट पक्षाचा पाठिंबा जरी राष्ट्रवादीने स्वत:हुन दिला असे समजले तरी 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी जाहिरात करून स्वच्छ कारभाराची हमी देणार्या भाजपने घेतला तर हा जनतेचा विश्वासघात न्हवता का? भाजपने जसा पाठिंबा नाकारला नव्हता, तसाच तो स्वीकारलाही नव्हता. पाठिंब्याविषयी पूर्ण मौन पाळून भाजपने सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेचा धीर सुटला व त्यामुळे सेना सत्तेत सहभागी झाली. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला १४५ तर भाजपला १३८ जागा मिळाल्या होत्या. भाजपची एकूण संख्या मित्रपक्षांसहीत १८७ होती तर काँग्रेसची एकूण संख्या मित्रपक्षांसहीत २१० च्या आसपास होती (२००४ मध्ये भाजपला हरवून काँग्रेसने विजय मिळविला हा प्रचार एक मोठा विनोद आहे कारण ५४३ सदस्यांच्या लोकसभेत दोन्ही पक्षांच्या सदस्यसंख्येत फक्त ७ चा फरक होता व दोन्ही पक्ष बहुमतापासून प्रचंड लांब होते). काँग्रेसने नंतर अजून काही मित्रपक्षांचा पाठिंबा मिळविला. त्यात भर म्हणजे ६२ जागा जिंकणार्‍या डाव्या पक्षांनीही काँग्रेसला बाहेरून पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसच्या समर्थक खासदारांची संख्या ३१० च्या पुढे जाऊन पोहोचली. आता काँग्रेसला इतर कोणाचीही गरज नव्हती. त्या निवडणुकीत सपने ३५ जागा जिंकल्या होत्या. मुलायमसिंगने १९९९ मध्ये वाजपेयींचे सरकार १ मताने पडल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी सोनिया गांधींच्या परकीय जन्माचा मुद्दा उपस्थित करून पाठिंबा देण्याचे नाकारले होते. सोनिया गांधी ते विसरल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी २००४ मध्ये सपकडे पूर्ण दुर्लक्ष केले. सत्ता स्थापनेपूर्वी त्यांनी काँग्रेससमर्थक पक्षांची बैठक बोलाविली होती. त्यात अर्थातच सपला निमंत्रण नव्हते. निमंत्रण नसताना सुद्धा मुलायम सिंगने स्वतःहून आपल्या पक्षाच्या वतीने अमरसिंगला बैठकीसाठी पाठविले. सोनिया गांधींनी बैठकीला आलेल्या अमरसिंगची दखलही घेतली नाही. आपल्या भाषणात त्यांनी पाठिंबा देणार्‍या सर्व पक्षांचे आभार मानले, परंतु त्यात सपचा उल्लेख नव्हता. आपल्या पक्षाचा उल्लेख नसल्याचे पाहून अमरसिंगांनी हात वर करून "हम भी है आपके साथमें" असे ओरडून सांगितले होते. अर्थात सोनिया गांधींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सुरू ठेवले. नंतर २००८ पर्यंत सप संसदेत स्वतःहून संपुआ सरकारला पाठिंबा देत होता परंतु त्यांना संपुआत घेतलेले नव्हते. सोनिया गांधींनी त्यांचा पाठिंबा स्वीकारला नाही आणि नाकारला पण नाही. फक्त योग्य वेळी म्हणजे २००८ मध्ये विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांच्या पाठिंब्याचा उपयोग करून घेतला. फडणविसांनी राष्ट्रवादीने स्वतःहून दिलेल्या पाठिंब्याचा स्वीकार न करता आणि न नाकारता त्याबद्दल मौन पाळून सेनेला नमविण्यासाठी असाच उपयोग करून घेतला. इथे पण तुम्ही नेहमीप्रमाणे सोईस्कर भूमिका घेतली आहे. जसे काही नितीशकुमारांनी तडकाफडकी राजीनामा दिला. हे समजल्यानंतर पंतप्रधानांना नितीशकुमारांच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे कौतुक वाटले आणि ५ मिनिटात त्यांनी ट्विटर वरून नितीश कुमारांचे अभिनंदन केले. नंतर ह्या भ्रष्टाचार विरोधी उदात्त लढ्यात सामील झाल्याबद्दल लगेच नितीशकुमारांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. इथे जितके ढोंगी नितीश आहेत तितकाच ढोंगी भाजप देखील. मोदीना २०१९ साली कुणीही आव्हान देऊ शकणार नाही असे परवा नितीश म्हणाले. आणि हेच कारण होते नितीशकुमारांचे महागठबंधंन सोडून भाजपच्या कळपात शिरण्याचे. तसे पण किमान २०२४ पर्यंत केंद्रात सत्ता बदल होईल असे वाटत नाही. मग पराभूतांचा राजा होण्यापेक्षा विजेत्यांच्या कळपात शिरून निदान मुख्यमंत्रीपदी तरी कायम राहू हा सोईस्कर विचार. कारण इतकाच जर त्यांना भ्रष्टाचाराचा तिटकारा होता तर मुळात लालू यादवांशी हातमिळवणी केलीच नसती. हा संधीसाधूपणा जसा नितीशकुमारांनी केला तसेच बिहारची सत्ता मिळतेय म्हटल्यावर हावऱ्यासारखी ती घेण्याचा भाजपाने देखील केला. पण तुम्ही फक्त नितीश विश्वासघातकी, पवार विश्वासघातकी, काँग्रेस विश्वासघातकी असे उच्चं आवाजाने बोलता पण भाजपाने हे जे विश्वासघात केलेत त्याबद्दल फक्त 'भाजपाने चूक केली हा' अशी सौम्य भाषा वापरता. हे म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका आहे. कुणी कशी भूमिका घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण दाखवून द्यावेसे वाटले इतकेच. २०१७ मध्ये भाजपने गोवा, मणीपूर व उ. प्र. मध्ये (आदित्यनाथांना मुख्यमंत्री बनविणे) घेतलेले राजकीय निर्णय चुकीचे आहेत हे मी पूर्वी अनेकदा लिहिले आहे. मात्र बिहार प्रकरणात भाजपने फक्त चूक केलेली नसून मतदारांचा विश्वासघात केला आहे असे म्हणण्यास माझी मुळीच हरकत नाही.

गॅरी ट्रुमन Tue, 08/01/2017 - 16:55
२०१९ च्या आधी नितीश-लालू युती तुटली असती असे चित्र उभे राहिले कारण आधीपासूनच पडद्याआडून भाजप-जदयु यांच्यात बोलणी सुरू होती असे म्हणायला हरकत नसावी. तेव्हा या घडामोडी झाल्या त्या इतक्या लवकर झाल्या कारण भाजपही मागून पिना मारायचे काम करत होता. ते काम भाजपने केले नसते तर कदाचित नितीशकुमार तसेही महागठबंधनमध्येच राहिले असते ही शक्यता नाही का? म्हणजे हे महागठबंधन २०१९ पूर्वी तसेही तुटले असते असे तुम्हाला वाटते तशी परिस्थिती उभी करण्यात भाजपचाच हात आहे. तो समजा नसता तर नितीश आनंदाने त्या महागठबंधनमध्येच राहिले असते असे म्हणायला जागा नाही का? भाजपने अगदी 'इनोसन्टली' काही मिनिटात नितीशकुमारांना पाठिंबा जाहिर केला होता असे मला तरी वाटत नाही. या नाटकाची पटकथा आधीच ठरलेली होती. त्यातून भाऊ तोरसेकरांनी म्हटल्याप्रमाणे लालूंना दुसर्‍या दिवशी रांचीला चाराघोटाळ्याशी संबंधित सुनावणीसाठी जायचे होते अशा दिवशी संध्याकाळी हे सगळे नाटक घडले म्हणजे स्वतः लालूंना फार काही करता येईल अशी परिस्थिती राहिली नाही. तेव्हा मला वाटते की नितीश महागठबंधनमध्येच २०१९ पर्यंत राहतील ही शक्यता लक्षात घेऊनच भाजपने आधीपासूनच ते महागठबंधन तोडायचे प्रयत्न सुरू केले. आणि नितीशनेही असे तडकाफडकी महागठबंधन तोडले कारण भाजपच्या पाठिंब्याची हमी होती. अन्यथा नितीशकुमारांनी इतकी मोठी जोखीम घेतली असती असे वाटत नाही. तेव्हा २०१९ पूर्वी महागठबंधन तसेही तुटले असते असे तुम्ही म्हणत आहात त्याला ही पार्श्वभूमी आहे.
राज्यसरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने ओळखले जाते.... समजा जागावाटपावरून युती तुटली तर पुन्हा एकदा संजदच्या बरोबरीने भाजपची विश्वासार्हताही कमी होणार.
त्याप्रमाणेच केंद्रसरकार विशेषतः मोदी सरकार हे पंतप्रधानांच्याच नावाने ओळखले जाते. मोदींची आजची लोकप्रियता २०१९ पर्यंत कायम राहिली तर युती तुटली तरी भाजपवर फार परिणाम व्हायला नको. पण इतर राज्यांमध्ये मतदारांना कोणतीही विरोधकांची आघाडी केवळ मोदीविरोध या नावावर उभी राहिली तर ती कधीच स्थिर होऊ शकणार नाही हा जबरदस्त निर्विवाद संदेश लालू-नितीश फुटल्यामुळे गेलाच आहे. त्यावरही फार परिणाम होऊ नये.

In reply to by गॅरी ट्रुमन

वरुण मोहिते Tue, 08/01/2017 - 17:12
फक्त आणि फक्त मोदी ह्यांच्या जीवावर . तेजस्वी यादव ह्याची वाढती लोकप्रियता ह्याला बऱ्याच अंशी कारणीभूत आहे . गठबंधंन होऊन लालूप्रसाद जर ८० जागा मिळवत असतील तर ह्या पुढील निवडणुकांमध्ये नितीशकुमार अजून खाली जातील . मोदी ह्यांना २०१९ साठी फक्त नितीशकुमारांना आपलेसे करायचे आहे . कारण २८२ जागा आज असल्या आणि सर्व विरोधक एकत्र आले किंवा नितीशकुमार हा त्यांचा स्वच्छ चेहरा म्हणून पुढे करता आला तर मोदींना भारी पडले नसते फार पण उपद्रव मूल्य वाढले असते . त्यामुळे आयकर धाडी . हे सगळे राजकारण काही एका दिवसात नाही शिजत .नितीशकुमारांना आता राज्य हवे आहे आणि मोदींना देश . विरोधक सक्षम नसल्याचे कालखंड पहिले तर भारतीय राजकारणात हि अभूतपूर्व परिस्थिती आहे .पद्धतशीर रित्या विकासपुरुष केलेला प्रचार असो , व विरोधकांना नामोहरम करणे असो. देश आपल्या ताब्यात हवा हे प्रचारतंत्र काँग्रेस च्या १९६९ काळापासून ची आठवण करून देते . फक्त त्या काळी विवेकी लोक होती . आज विवेकी लोक कमी आहेत त्यामुळे राजकारण अजून सोपे झाले आहे . ह्या लाटेवर मोदी प्रत्येक गोष्ट कॅच करून स्वार झालेले आहेत . अवांतर _ मिपावर विरोधी नाही पण समतोल मते देणारे बरेच आहेत हो मिपाकरांनो .आताशी कुठे ३ वर्षे झाली सद्य सरकारला . निवडणूक आहेच कि पुढची बोलायला :))

In reply to by वरुण मोहिते

फक्त त्या काळी विवेकी लोक होती .
म्हणजे कोण? नेते कि मतदार?
मिपावर विरोधी नाही पण समतोल मते देणारे बरेच आहेत हो मिपाकरांनो .
+१००००००००

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी Wed, 08/02/2017 - 14:49
एकंदरीत २-३ मुद्द्यांवर आपले मतभेद आहेत. १) भाजपने नितीशकुमारला लालूबरोबर युती तोडायला लावून स्वतः पाठिंबा दिला हे २०१९ च्या दृष्टीने योग्य झाले असे तुमचे मत आहे. परंतु भाजपने थोडी नैतिकता दाखवून नितीशकुमारांना पाठिंबा द्यायला नको होता. किंबहुना २०१९ पूर्वीच ही युती त्यातील अंतर्विरोधामुळे तुटलीच असती व अंतिमतः भाजपलाच त्याचा फायदा झाला असता असे माझे मत आहे. २) मतदारांना कोणतीही विरोधकांची आघाडी केवळ मोदीविरोध या नावावर उभी राहिली तर ती कधीच स्थिर होऊ शकणार नाही हा जबरदस्त निर्विवाद संदेश लालू-नितीश फुटल्यामुळे गेलाच आहे, असे तुमचे मत आहे. माझे मत असे आहे की विरोधकांमध्ये एकी नाही हा संदेश यापूर्वी मतदारांना अनेकवेळा गेलेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतदानातही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उत्तर प्रदेशातही सप-काँग्रेस युतीबद्दलही निवडणुक संपल्यानंतर उलटसुलट बातम्या येत होत्या. ३) बिहारमध्ये राजद-संजद-काँग्रेस ही युती २०१९ पर्यंत कायम राहील या भीतिने भाजपने ती तोडण्याचा प्रयत्न केला असे तुमचे मत आहे. माझ्या मते ही युती २०१९ पूर्वी तुटण्याची बरीच शक्यता होती. विरोधकांमध्ये एकी नाही हा संदेश त्यावेळी पुन्हा एकदा गेला असता. युती स्वतःहून तुटण्याची वाट न बघता ही युती फोडून स्वत: नितीशबरोबर युती करणे योग्य नव्हते. राजद-संजद-कॉग्रेस युतीत लालूचा बराच हस्तक्षेप होता. लालूला फक्त १०-१२ आमदारांची गरज असल्याने लालू फोडाफोडी करून नितीशचे सरकार पाडून त्याजागी स्वतःच्या पक्षाचे सरकार आणण्याचा प्रयत्न करणार हे नक्की होते. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवची लोकप्रियता बर्‍यापैकी वाढत होती. नितीशकुमार परवा दुसर्‍यांदा शपथ घेताना विधानसभेत तेजस्वी यादवने केलेले भाषण त्याच्या परिपक्वतेची साक्ष देणारे होते. इतक्या लहान वयात त्याने खूपच चांगले भाषण करून नितीशकुमारांना जे बोचकारे काढले त्यावरून भविष्यात त्याचे राजकीय भविष्य उज्ज्वल आहे असा माझा अंदाज आहे. शेवटी नितीशकुमारांना युती तोडावीच लागली असती व त्या परिस्थितीत मध्यावधी निवडणुक किंवा पाठिंब्यासाठी भाजपची विनवणी या दोनच शक्यता होत्या व दोही शक्यता भाजपसाठी जास्त अनुकूल ठरल्या असत्या.

In reply to by श्रीगुरुजी

गॅरी ट्रुमन Wed, 08/02/2017 - 15:45
हे सगळे जर-तरचे खेळ आहेत. या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या असत्या तर सोन्याहून पिवळे पण इतिहास बघता तसे होणे सहजसाध्य होते असे मला तरी वाटत नाही. १. २०१४ मध्ये सुरवातीला वाटत होते की नितीश आणि लालू त्यांच्यातील २० वर्षांचे वैर विसरून एकत्र येणेच शक्य नाही. पण ते आले. २. नंतर वाटायला लागले की आधीच्या विधानसभेत ११५ आमदार असताना नितीशकुमार १०० जागा मान्य करणे शक्य नाही त्यामुळे जागावाटपावरून राजद-जदयु-काँग्रेस महागठबंधन तुटेल. पण तसे झाले नाही. ३. नंतर वाटायला लागले की जदयुच्या किमान १५ आमदारांचे तिकिट कापले गेल्यामुळे जदयुमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होईल. पण तसे झाले नाही. ४. नंतर वाटायला लागले की जदयुच्या आमदारांनी बंडखोरी केली नसली तरी ते आतून महागठबंधनचे नुकसान करतील. पण तसे झाले नाही. ५. नंतर वाटायला लागले की इतकी वर्षे जदयु आणि राजदचे कार्यकर्ते एकमेकांविरूध्द प्रचार करत असल्यामुळे त्यांच्यात कटुता कायमच असेल आणि ते महागठबंधनचा प्रचार व्यवस्थित करणार नाहीत. पण तसे झाले नाही. ६. नंतर वाटायला लागले की जदयुची 'महादलित' व्होटबँक लालू यादवांच्या राजवटीत झालेल्या 'यादवीच्या' त्रासामुळे महागठबंधन सत्तेत आल्यास परत तसेच होईल या भितीने भाजपला मत देईल आणि जदयु-राजदच्या नुसती मतांची बेरीज होणार नाही. पण तसे झाले नाही. इतक्या सगळ्या गोष्टी विपरीत झाल्यावर कधीनाकधी नितीश-लालू एकमेकांपासून दुरावतील आणि ती वेळ २०१९ पूर्वीच होईल यावर विसंबून राहण्यात कितपत अर्थ होता? कदाचित हे 'विशफुल थिंकिंग' ठरले असते.

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी Wed, 08/02/2017 - 15:50
२०१९ मध्ये किंवा त्यापूर्वी लालू-नितीश एकमेकांपासून वेगळे होतील हे विशफुल थिंकिंग असू शकेल. त्याचप्रमाणे त्यांची युती २०१९ पर्यंत टिकून राहील हे सुद्धा विशफुल थिंकिंग असू शकते.

In reply to by श्रीगुरुजी

गॅरी ट्रुमन Wed, 08/02/2017 - 15:58
चप्रमाणे त्यांची युती २०१९ पर्यंत टिकून राहील हे सुद्धा विशफुल थिंकिंग असू शकते.
आधीचा इतिहास लिहिला त्याचे कारण हे की त्यांच्या युती २०१९ पर्यंत टिकून राहिल हे विशफुल थिंकिंग असण्यापेक्षा नसायची (म्हणजे युती २०१९ पर्यंत टिकून राहायची) शक्यता जास्त होती हे दाखवून देणे. कारण आधीच्या ६ अडथळ्यांवर महागठबंधन फसेल असे वाटत होते त्यापैकी एकाही अडथळ्यावर ते फसले नाही. तेव्हा सातव्यावर ते फसेल आणि ते पण २०१९ च्या आधी ही शक्यता तसे न होण्यापेक्षा कमीच असे भाजप नेतृत्वाला वाटले असले तर त्यात त्यांची चूक आहे असे वाटत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी Wed, 08/02/2017 - 19:20
ठीक आहे. बघूया २०१९ पर्यंत काय होतंय ते. शरद यादव नवा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत असं काही वेळापूर्वीच वाचलं. त्यांच्या मागे फार कोणी जाईल असे वाटत नाही. परंतु त्यामुळे संजदला एखादा तडा पडेल हे मात्र नक्की. कदाचित २०१९ मध्ये राजद्+काँग्रेस्+शरद यादव अशी पूर्ण नवीन युती पहावयास मिळेल.

विशुमित Tue, 08/01/2017 - 17:32
खासदारांना स्वतःचे वेतन वाढवण्याचा अधिकार असता कामा नये; यासाठी वेगळी यंत्रणा आसावी अशी स्तुत्य मागणी वरुण गांधींनी लोकसभेत केली आहे. http://www.loksatta.com/desh-videsh-news/do-not-have-any-right-to-mps-to-hike-own-salaries-says-varun-gandhi-at-loksabha-1522532/

अमितदादा Tue, 08/01/2017 - 21:54
१. काही दिवसापूर्वी डॉ कलाम यांच्या स्मारकाविषयी झालेला वाद वाचला, वाचून दुःख झालं. खरतर डॉ कलाम यांच्या पुतळ्यापाशी धार्मिक ग्रंथ आणि हातात वीणा देण्याचं प्रयोजन मला कळलं नाही. DRDO च्या म्हणण्यानुसार त्यांना वरून (म्हणजे सेंट्रल मिनिस्ट्री) कडून जो प्लॅन आला तो त्यांनी अमलात आणला (संधर्भ : बातमी Read here). डॉ कलाम हे कला आसक्त असतील हि, ते अध्यात्मिक असतील हि, परंतु सगळ्यात महत्वाचे म्हणजे डॉ कलाम हे विज्ञाननिष्ठ होते, त्यांचा वैज्ञानिक दृष्टीने भारतास खूप काही दिले त्यामुळं त्यांचा पुतळ्यात त्यांच्या मुख्य अंगाचं प्रतिबिंब दिसायला हवं होत. गीता काय तिथं कुराण हि नको होत हवं होत एखाद फिसिक्स किंवा गणिताचं प्रसिद्ध पुस्तक, विण्याची ऐवजी हातात एखाद यंत्र, पेन्सिल किंवा अग्निबाणाची प्रतिकृती. २. काही दिवसापूर्वी गाई च्या दूध, मूत्र आणि शेण यांच्या संशोधनासाठी एक उचस्तरीय समिती नेमण्यात आली त्यात विजय भाटकर, रघुनाथ माशेलकर आणि स्वतः मंत्री हर्षवर्धन यांचा समावेश आहे. हे पाहून सरकारच प्राथमिकता स्पष्ट होते. मुळात गाई वरील संशोधनास विरोध करण्याचं कोणतंच कारण नाही, कारण कोणतीही गोष्ट वैज्ञानिक पातळीवर संशोधन होऊन स्वीकारली किंवा नाकारली पाहिजे. विरोध आहे तो प्राधान्य ठरवायला. मुळात भाटकर आणि माशेलकर हे खूप मोठे वैज्ञानिक त्यांचा वेळ हा देशासाठी लाखमोलाचा त्यामुळे आपल्या देशास अनेक वैज्ञानिक आणि शैक्षणिक समस्या भेडसावत असताना तो तिथे उपयोगी पडला पाहिजे. गाई वरील संशोधन ह्या गोष्टी त्या क्षेत्रातील संशोधकांनी हाताळल्या पाहिजेत एवढे उच्चदर्जाचे रिसोर्सेस वापरता कामा नयेत. (संधर्भ Read here) ३. भारत सरकार ने वैज्ञानिक संस्था आणि संशोधन यावरील निधीत कपात केल्याची बातमी वाचली , अत्यंत negative स्टेप. मुळात प्रश्न असा पडतो कि हे मंत्री अधिकारी असे निर्णय का घेत असतील , याच कारण मुळात देशाचे प्रमुख मोदी आणि RSS यांच्या विचारसरणीत दडलेलं आहे. जेंव्हा मोदीच कर्णाच उदाहरण देऊन आपल्याकडे जुन्या काळी जेनेटिक science होत असे बडबडतात, गणेशाचं उदाहरण देऊन आपल्याकडे प्लास्टिक सर्जेरी तंत्रज्ञान होत असे म्हणतात तेंव्हा वैज्ञानिक आणि कॉमन सेन्स असणारी सामान्य लोक याना डोकयावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. आणि त्यांचे मंत्री अधिकारी सुद्धा मग हाच अँप्रोच घेऊन पुढे येतात. (संधर्भ : Read here)

In reply to by अमितदादा

arunjoshi123 गुरुवार, 08/03/2017 - 13:49
कला आसक्त असतील हि, ते अध्यात्मिक असतील हि, परंतु सगळ्यात महत्वाचे म्हणजे डॉ कलाम हे विज्ञाननिष्ठ होते
तुमच्या डिक्शनरीत कला आणि विज्ञाननिष्ठता तसेच अध्यात्म आणि विज्ञाननिष्ठता या एंट्रीज विरोधार्थी शब्द आहेत म्हणून आहेत का? ========================================== आम्ही जेव्हा एखादं प्रतिगामी मत मांडतो तेव्हा "उद्या तुम्ही असेही कराल" असा उद्यावाचक प्रयोग आम्हा कंजर्ववेटीवांबद्दल फारदा मिसळपावर होत असतो. हाच न्याय इथे लावला तर त्यांचे केस, किंवा पँट कशाला दाखवली, विज्ञाननिष्ठतेचा नि केसांचा / पँटचा संबंध काय असं देखिल उद्या तुम्ही विचाराल. =============== कला आसक्त असतीलही मंजे काय - भयंकर आसक्त होते, अतीव गीताप्रेमी होते. उठ सुट कुठेही गीता कोट करायची अवैज्ञानिक सवय होती त्यांना. "शांततेचं पालन करण्यासाठी हातात शस्त्र असावं लागतं" इ इ विक्षिप्त, त्यांच्या कामाशी असंबंधित विचार त्यांनी त्याच पुस्तकातून उचललेले!

In reply to by अमितदादा

arunjoshi123 गुरुवार, 08/03/2017 - 13:53
त्यांचा वैज्ञानिक दृष्टीने भारतास खूप काही दिले
भारतास केवळ अध्यात्मिक दृष्टिच्या शास्त्रज्ञांनी काही दिले. नास्तिकी वैज्ञानिकांनी अजून तरी काही दिलेले नाही.

In reply to by अमितदादा

arunjoshi123 गुरुवार, 08/03/2017 - 14:05
मुळात भाटकर आणि माशेलकर हे खूप मोठे वैज्ञानिक त्यांचा वेळ हा देशासाठी लाखमोलाचा
हो, पण म्हणूनच ते गाईबद्दल व्यवस्थित रिपोर्ट देऊन सरकारचे भ्रम (होपफुली कायमचे) दूर करतीलना? ====================== बातमी द हींदूने दिली आहे, तेव्हा धुळीचे थर पुसून वाचायला हवी. एका मोठ्या मँडेटमधे (समितीच्या टर्म्स ऑफ रेफरन्स मधे) गाय हा शब्द आढळला कि त्यांनी सुतावरून ढग गाठला.

In reply to by arunjoshi123

अमितदादा गुरुवार, 08/03/2017 - 14:14
तुम्ही प्रतिसाद सॅरकॅस्टिकली दिलाय का? नसेल तर हा खालील उपप्रतिसाद.
तुमच्या डिक्शनरीत कला आणि विज्ञाननिष्ठता तसेच अध्यात्म आणि विज्ञाननिष्ठता या एंट्रीज विरोधार्थी शब्द आहेत म्हणून आहेत का?
नाही. "कला आसक्त असतील हि, ते अध्यात्मिक असतील हि, परंतु सगळ्यात महत्वाचे म्हणजे डॉ कलाम हे विज्ञाननिष्ठ होते" हे वाक्य तेच सिद्ध करताय.
हो, पण म्हणूनच ते गाईबद्दल व्यवस्थित रिपोर्ट देऊन सरकारचे भ्रम (होपफुली कायमचे) दूर करतीलना?
हे पहा मूळ प्रतिसादातील वाक्य "गाई वरील संशोधन ह्या गोष्टी त्या क्षेत्रातील संशोधकांनी हाताळल्या पाहिजेत एवढे उच्चदर्जाचे रिसोर्सेस वापरता कामा नयेत." उरलेले मुद्दे भारीच विनोदी आहेत त्यामुळं त्याचा प्रतिवाद नाही करत.

गुजरातमधील काँग्रेसच्या आमदारांना ठेवण्यात आलेल्या बेंगलोरमधील रिसॉर्टवर आयकर विभागाच्या धाडी पडल्याच्या बातम्या आहेत! योग्य कृती? कि भाजपचा अहमद पटेलांना हरवण्यासाठी चाललेला उतावळेपणा? या अशा (अ)योग्य वेळी पडलेल्या धाडींमुळे भाजप विच-हंटिंगसाठी सरकारी यंत्रणा वापरतोय असा मेसेज जाणार नाही का?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संग्राम Wed, 08/02/2017 - 12:41
मी हीच बातमी लिहायला आलो होतो ...... सरकारी यंत्रणेचा गैरवापर हे "सर्व" विरोधी पक्ष कायमच सांगतात .... पण सध्याच्या घटना, त्यांचा क्रम आणि वेळ बघता असेच वाटते

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गॅरी ट्रुमन Wed, 08/02/2017 - 12:52
गुजरातमधील काँग्रेसच्या आमदारांना ठेवण्यात आलेल्या बेंगलोरमधील रिसॉर्टवर आयकर विभागाच्या धाडी पडल्याच्या बातम्या आहेत! योग्य कृती?
कायद्याप्रमाणे ही कृती करण्यात येत असेल तर त्यात अयोग्य काय आहे? आणि या रिझॉर्टने तशाही बर्‍याच लांड्यालबाड्या केल्या आहेत. सिद्दरामय्यांच्याच काँग्रेस सरकारने या रिझॉर्टला सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याबद्दल मागच्या वर्षी नोटिस बजावली होती. आयकर विभागाच्या धाडी अशा एकाएकी पडत नसतात तर त्यापूर्वी काहीतरी हालचाली विभागीय पातळीवर होतच असतात. त्यामुळे ही कारवाई काँग्रेस आमदार तिथे गेल्यावर झाली असायची शक्यता फारच कमी. कायद्याप्रमाणे कारवाई होत असेल तर त्यात कोणीही तक्रार करू नये. कदाचित काँग्रेसने मुद्दामून अशाच रिझॉर्टमध्ये आपल्या आमदारांना पाठविले असेल असेही मला वाटायला लागले आहे. मोदी सरकार आल्यापासून विरोधकांची एक मोडस ऑपरेन्डी झाली आहे. कितीही बेकायदा गोष्टी केल्या असल्या तरी मोदींवर टिका करून ठेवलेली असली तर त्या बेकायदा गोष्टींसाठी सरकारने बडगा उगारला तर 'आम्ही मोदीविरोधी म्हणून कारवाई होत आहे' अशी ओरड करायला हे लोक मोकळे असतात. अवॉर्डवापसीमध्ये लहान प्रमाणावर हा प्रकार बघायला मिळाला होता. मागच्या वर्षी रविशकुमारच्या हिंदी एन.डी.टी.व्ही ला एक दिवस बंद ठेवायचा आदेश दिल्यावर आणि त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात प्रणॉय रॉयच्या एन.डी.टी.व्ही ला मध्यंतरी नोटिस बजावल्यावर हा प्रकार बघायला मिळाला होता. त्याप्रमाणेच काँग्रेसने मुद्दामून अशा रिझॉर्टमध्ये आमदारांना कशावरून नेले नसेल? म्हणजे धाड पडल्यावर काँग्रेसचे आमदार इथे उतरले होते म्हणून धाड पडली वगैरे वगैरे ओरड करायला काँग्रेसवाले मोकळे आणि स्वयंघोषित पुरोगामी त्यात सूर मिसळायलाही मोकळे.

In reply to by गॅरी ट्रुमन

प्रसाद_१९८२ Wed, 08/02/2017 - 13:07
आणि या धाडीचे भांडवल करुन, कॉंग्रेजने आजही राज्यसभेत गोंधळ घालून राज्यसभेचा वेळ वाया घालवला आहे. शिवाय या रिसॉर्टवर धाड पडल्याने, गुजरात राज्यसभेच्या निवडणुकीत अहमद पटेल यांचा पराभव होणे कसे काय शक्य आहे ? मागे 'गुजरात मधील आमदार, पैसे देऊन भाजपा फोडत आहे' ह्या कॉंग्रेसने केलेल्या आरोपाचे कोणतेही पुरावे त्यांनी अजूनही दिले नाहीत.

In reply to by गॅरी ट्रुमन

संग्राम Wed, 08/02/2017 - 14:13
"कायद्याप्रमाणे ही कृती करण्यात येत असेल तर त्यात अयोग्य काय आहे" - बरोबर, पण प्रश्न वेळेचा आहे ... खूपचं योगायोग वाटतो .... आयकर विभागाच्या धाडी बद्द्ल कुठेतरी वाचलं होतं .... नक्किच त्या अशा एकाएकी पडत नसतात बरीच प्रोसिजर आहे ... परवानग्या घ्याव्या लागतात अगदी असेच बिहार मध्ये सुद्धा ... कदाचित खूपच वेगवान हालचाली करतात :-) आणि हो आत्ताच नाही, आधी म्हटल्याप्रमाणे "सरकारी यंत्रणेचा गैरवापर हे "सर्व" विरोधी पक्ष कायमच सांगतात" तर ... कुछ तो गडबड होती ही होगी ... ?

In reply to by संग्राम

श्रीगुरुजी Wed, 08/02/2017 - 14:32
रीसॉर्टवर नेमकी आताच धाड पडणे हा योगायोग नक्कीच नाही. ज्याप्रमाणे मलिष्काने विडंबनात्मक रॅप प्रसिद्ध केल्यानंतर तिच्या घरी महापालिकेचे कर्मचारी डासांच्या अळ्या तपासण्यासाठी गेले हा योगायोग नव्हता, तसाच हासुद्धा योगायोग नाही. राजकारणात असे योगायोग क्वचितच घडतात. जयललिताच्या मृत्युनंतर २ महिन्यांनी शशिकलाने पनीरसेल्वम हटवून त्याच्या जागी स्वतःला बसविण्याची तयारी सुरू केल्यानंतर तिने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या १-२ दिवस आधीच तिच्याविरूद्ध सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्याचा निकाल लागला हा सुद्धा योगायोग नव्हता.

In reply to by श्रीगुरुजी

अभिजीत अवलिया गुरुवार, 08/03/2017 - 10:08
सहमत आहे. पण तरी देखील कारवाई केली म्हणून काँग्रेसने थयथयाट करणे अयोग्य आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

कृती योग्य कि अयोग्य हा मुद्दा नाहीये, आयकर खात्याने टाकलेली धाड हि योग्यच आहे कारण ते त्यांचे काम आहे. मुद्दा हा आहे कि स्थळ आणि वेळ हे ह्या धाडीचा संदर्भ ठरवतात. भाजपने अशा मुद्द्यांपासून लांब रहायला हरकत नाही. नाहीतरी कित्येक धाडी वर्षानुवर्षे पुढे ढकलल्या जात नाहीत का?

In reply to by arunjoshi123

हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 08/03/2017 - 15:47
थेट हंट करायला हरकत नाही पण सगळ्याच भ्रष्टाचार्यांना करावं. काँग्रेसकडू तशी अपेक्षा नव्हती पण ह्या सरकारकडून आहे. उगाच वेळ काळ पाहून टार्गेट करण्याने प्रकरणाचं महत्व कमी होतं आणि एकूणच लक्ष विचहंटिंगकडे वळते असे मला वाटते.

अनुप ढेरे Wed, 08/02/2017 - 14:46
अहमद पटेल स्वतः पैसा पावर वापरुन विरोधकांना नामोहरम करणार्‍यांपैकी आहे. त्यात त्याने मोदी आणि अमित शहांना लय त्रास दिलेला आहे चित्र विचित्र केसेस त्यांच्या मागे लाउन. अमित शहा वैयक्तिक बदला घेत आहेत आता. बोया पेड बबुल का आम कहांसे पाए.

गामा पैलवान Wed, 08/02/2017 - 17:19
अमितदादा,
मुळात भाटकर आणि माशेलकर हे खूप मोठे वैज्ञानिक त्यांचा वेळ हा देशासाठी लाखमोलाचा त्यामुळे आपल्या देशास अनेक वैज्ञानिक आणि शैक्षणिक समस्या भेडसावत असताना तो तिथे उपयोगी पडला पाहिजे. गाई वरील संशोधन ह्या गोष्टी त्या क्षेत्रातील संशोधकांनी हाताळल्या पाहिजेत एवढे उच्चदर्जाचे रिसोर्सेस वापरता कामा नयेत.
डॉक्टर माशेलकर, डॉक्टर विजय भटकर इत्यादि बड्या संशोधकांनी गोसंशोधन गांभीर्याने घेतल्याने जनतेत एक सकारात्मक संदेश जाईल. अस्सल भारतीय वाणाच्या गायी आणि बैलांची संख्या चिंताजनक रीत्या कमी होते आहे. या हानीस पायबंद बसून बहूपयोगी गायींचं संवर्धन होणं भारतीय जनतेच्या भल्यासाठीच आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जेम्स वांड Wed, 08/02/2017 - 17:32
देशी गोसंवर्धन हे कायम धार्मिक/राजकीय चष्म्यातूनच पाहिलं गेलं पाहिजे असं नाही (अमितदादा, तुम्ही पाहताय असा आरोप नाही बरंका, सर्वसाधारण बोलतोय) भारतातल्या कित्येक वाणाची गुरे दुग्धोत्पादना करता सर्वोत्तम आहेत, गीर, कांकरेज, नेल्लोर कॅटल वगैरे तिकडे ब्राझील मध्ये फायदेशीर म्हणुन प्रसिद्ध होतायत, आमचे मिलिटरीतले एक पाहुणे सांगतात त्याप्रमाणे, आर्मी फार्म जेव्हा सुरु होती तेव्हा फक्त साहिवाल गायी पाळत, त्यांच्यानुसार फौजेला कधीही म्हशींचे दूध पाजत नसत तर साहिवाल गायीचंच असे. (भुलचुक घेणे देणे) वैयक्तिक अनुभव हा की, ऑपरेशन फ्लड अंतर्गत दुग्धोत्पादन वाढवायला, जर्सी/संकर गायी प्रमोट केल्या गेल्या अन तो एक टेम्परवारी प्रयोग होता. ट्रॉपिकल वातावरण असलेल्या भारतात हे भारी पडलं, संकरित गायी रोगराईला जास्त बळी पडतात अन जर्सी मेंटेन करायचा खर्च नफ्याचे गणित गंडवतो. शास्त्रोक्त विचार करून देशी गायी संगोपन ह्यावर रिसर्च केल्यास फायदाच होईल.

In reply to by गामा पैलवान

अमितदादा गुरुवार, 08/03/2017 - 14:36
@गामा पैलवान सहमत नाही. @जेम्स वांड
देशी गोसंवर्धन हे कायम धार्मिक/राजकीय चष्म्यातूनच पाहिलं गेलं पाहिजे असं नाही (अमितदादा, तुम्ही पाहताय असा आरोप नाही बरंका, सर्वसाधारण बोलतोय)
धन्यवाद, परंतु हे लक्ष्यात घ्या सरकार मधीलच काही लोक हा मुद्दा धार्मिक करतायत, त्यांना दूध उत्पादन, शेतकरी हित याच काही पडलेलं नाही त्यांना फक्त पोलिटिकल स्कोर वाडवायचा आहे.
वैयक्तिक अनुभव हा की, ऑपरेशन फ्लड अंतर्गत दुग्धोत्पादन वाढवायला, जर्सी/संकर गायी प्रमोट केल्या गेल्या अन तो एक टेम्परवारी प्रयोग होता. ट्रॉपिकल वातावरण असलेल्या भारतात हे भारी पडलं, संकरित गायी रोगराईला जास्त बळी पडतात अन जर्सी मेंटेन करायचा खर्च नफ्याचे गणित गंडवतो. शास्त्रोक्त विचार करून देशी गायी संगोपन ह्यावर रिसर्च केल्यास फायदाच होईल
याबाबत मी सहमत नाही माझा वैयक्तिक अनुभव वेगळा आहे, मी ज्या ग्रामीण भागातून आहे तिथे गावात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत देशी गाई आहेत बहुतांश शेतकरी जर्सी गाई वापरतात. तसेच मध्यंतरी लोकसत्ता मध्ये एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने (बहुतेक ?) इसराईल मधील दूध उत्पादन आणि संकरित गायी यावर लेख लिहलेला, यामध्ये इसराईल मध्ये गाई ची संख्या न वाढवता दूध उत्पादन कसे वाढवले यावर लिहलेलं. त्यामुळं देशी गाई च्या दूध उत्पादन वाढवण्यात मर्यादा आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे. याबात तद्न्य व्यक्तीच मत आकडेवारी सह वाचाय मिळाल्यास माझं वरील मत बदलायची माझी तयारी आहे. तसेही माझ्या मूळ प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे सरकारी कमिटी दूध उत्पादन वाढवण्याबाबत काम करणार नसून गाई + औषध यावर काम करणार आहे. (संशोधनास विरोध नाही, मूळ प्रतिसाद वाचावा). इथेच थांबतो नाहीतर चर्चा गाईवर फिरण्याची.

महेश हतोळकर गुरुवार, 08/03/2017 - 14:09
http://m.maharashtratimes.com/india-news/dujana-to-armyman-congrats-you-caught-me-but-i-cant-surrender/articleshow/59894513.cms#video#video ही बातमी फार महत्वाची आहे. अशा अनेक टेप प्रसारीत व्हायला पाहिजेत मानवाधीकार आयोगाच्या बुरख्यामागे दडलेल्या अतीरेक्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी हे आवश्यक आहे

गॅरी ट्रुमन गुरुवार, 08/03/2017 - 16:49
पीपल्स डेमॉक्रसी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र आहे. नितीशकुमारांनी महागठबंधन तोडले आणि भाजपशी हातमिळवणी केली याविषयी या मुखपत्रात काही गोष्टी छापून आल्या आहेत असे इकॉनॉमिक्स टाईम्समधील या बातमीत म्हटले आहे: १. भारताच्या राजकीय इतिहासात 'बूर्झवा' राजकारण्यांनी अनेक कोलांट्या आतापर्यंत मारल्या आहेत. नितीशकुमारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करून मारलेली कोलांटीउडी त्यातील सर्वात मोठ्या कोलांट्याउड्यांपैकी असेल. म्हणजे भाजपबरोबर हातमिळवणी केल्यावर नितीशकुमार बूर्झवा झाले. त्यापूर्वी ते 'प्रोलेटॅरीएट' होते तर. २. नितीशकुमारांनी यादव कुटुंबियांविरूध्दच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे निमित्त बनवून आपले ढोंग पुर्ण केले (to enact this elaborate charade) ३. भाजपविरोधातील राष्ट्रीय पातळीवरील महागठबंधनच्या म्होरक्यानेच भाजपबरोबर हातमिळवणी केल्यामुळे भाजपविरोधातील राष्ट्रीय पातळीवरील आघाडीची संकल्पना आता संकटात पडली आहे. ("the concept of a Grand Alliance lies in tatters" ) ४. भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांची आघाडी उघडावी असे माकपला वाटते पण ते अनेकविध धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र घेऊन साध्य होणार्‍यातले नाही. (this cannot be accomplished by putting together an alliance of a motley bunch of secular parties. ) ५. बहुतेक सर्व राज्यपातळीवरील पक्षांनी आपल्या सोयीप्रमाणे भाजपबरोबर हातमिळवणी करायला मागेपुढे बघितलेले नाही. बहुतेक सर्व स्थानिक पक्षांनी 'निओ-लिबरल' अजेंडा वेळोवेळी अंमलात आणला आहे आणि अशा पक्षांचा संधीसाधू युत्या करण्याकडे कल असतो . त्यामुळे अशा संधीसाधू स्थानिक पक्षांना एकत्र घेऊन भाजपविरोधातील सर्व विरोधी पक्षांची राष्ट्रीय पातळीवरील आघाडी विश्वसनीय होऊ शकणार नाही. (Why such a grand alliance is unworkable is the unreliable character of many of the regional parties. Most of the regional parties have embraced the neo-liberal policies and are prone to make opportunistic alliances. The CPI-M said it had concluded "that with the regional parties as the main constituents, there can be no credible all-India alliance. ) नितीश-लालू युती तुटल्यामुळे विरोधी पक्षांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल आणि २०१९ मध्ये आपण मोदींविरोधात विश्वसनीय पर्याय देऊ शकणार नाही असे विरोधी पक्षांना वाटायला लागेल आणि अर्धी लढाई ते तिथेच हरतील आणि किंबहुना त्या कारणामुळेच महागठबंधन तोडून विरोधी पक्षांना चांगलाच दणका द्यावा असे मला वाटले होते. तो परिणाम होताना दिसत आहे. तसे असेल तर नितीशकुमारांबरोबर हातमिळवणी करून भाजपने चांगले केले असे म्हणायला हवे.

In reply to by गॅरी ट्रुमन

गामा पैलवान गुरुवार, 08/03/2017 - 19:49
गॅरी ट्रुमन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र चक्क वाचता तुम्ही? साष्टांग दंडवत घ्या राव माझा! असो. तुमचं हे विधान पटलं :
तसे असेल तर नितीशकुमारांबरोबर हातमिळवणी करून भाजपने चांगले केले असे म्हणायला हवे.
भाजपचे उत्तरप्रदेशात जास्तीतजास्त आमदार निवडवून आणले जातात तेव्हा लबाड बोक्याचा एक डोळा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर असतो. लबाड बोका २०१७ सालच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गर्क असल्याचं दाखवतो तेव्हा तो २०१९ ची पूर्वतयारी करंत असतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गॅरी ट्रुमन गुरुवार, 08/03/2017 - 20:28
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र चक्क वाचता तुम्ही?
मी कम्युनिस्टांना कितीही विरोध करत असलो तरी मी आतून खरा कम्युनिस्टच आहे यावर अनेकांना विश्वास बसत नाही. आता खात्री पटायला हवी. जोक्स अपार्ट मी अर्थातच माकपचे मुखपत्र वाचत नाही पण इकॉनॉमिक टाईम्स मात्र वाचतो आणि त्यात माकपच्या मुखपत्रात आलेल्या लेखाची बातमी होती.

श्रीगुरुजी Sat, 08/05/2017 - 20:53
व्यंकय्या नायडू ५१६ वि. २४४ मतांनी उपराष्ट्रपती पदावर निवडून आले. यावेळी दोन्ही पदांवर खूप मिळमिळीत व्यक्ती आहेत असे माझे मत आहे.

गॅरी ट्रुमन Sat, 08/05/2017 - 20:54
आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान झाले आणि मतमोजणीही आजच पार पडली. भाजप उमेदवार एन.व्यंकय्या नायडू ५१६ मते मिळवून विजयी झाले. विरोधकांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना २४४ मते मिळाली. नायडूंचा उपराष्ट्रपती म्हणून ११ ऑगस्टला शपथ घेतील. 1 याबरोबर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष या चार सर्वात मोठ्या पदांवर प्रथमच भाजपशी संबंधित असलेले नेते आले आहेत.

श्रीगुरुजी Sat, 08/05/2017 - 21:06
चांगली बातमी http://www.tribuneindia.com/mobi/news/nation/sc-to-take-up-ayodhya-appeals-for-hearing-on-august-11/447129 हा वाद लवकरात लवकर मिटावा हीच सदिच्छा. न्यायालयाने अडीच महिन्यांंहून अधिक काळ राखून ठेवलेला तिहेरी तलाक सुनावणीवरील निकाल देखील लवकरात लवकर जाहीर करावा अशी इच्छा आहे.

babubobade Sun, 08/06/2017 - 11:10
Ahead of the 70th Independence Day, Prime Minister Narendra Modi on Sunday invoked the Quit India Movement and exhorted the countrymen to use the same spirit to expel problems of communalism, casteism, corruption, terrorism, poverty and dirt from the country by 2022. He asked the people to take a pledge to contribute in some way or the other to create a “New India”. चले जाव आंदोलनातून प्रेरणा घ्यावी व देश प्रगतीकडे न्यावा , असे मा. मोदीजीनी आवाहन केले. १९४२ साली संघ चले जाव आंदोलनात सहभागी नव्हता. आज ७० वर्षानंतर याच आंदोलनाची आठवण येऊन आजच्या राज्यकर्त्याना व जनतेला देशप्रेमाची प्रेरणा मिळत आहे, हे खरोखरच प्रत्येक भारतीयास अभिमानास्पद आहे. http://indianexpress.com/article/india/with-quit-india-spirit-expel-communalism-casteism-by-2022-pm-narendra-modi-mann-ki-baat-4774162/

In reply to by babubobade

विशुमित Sun, 08/06/2017 - 13:14
खंडोबा ला जसे शंकराचा अवतार आहे म्हणून प्रेसेंट केले अगदी तसे च चले जावं आंदोलनाचं होऊ नये म्हणजे झाले.

In reply to by विशुमित

babubobade Sun, 08/06/2017 - 13:43
चिन्हे तशीच वाटली , म्हणूनच लिहिले. खादीवरचा बापूंचा फोटो उठला, ह्यांचा लागला. आता ७० वर्षापुर्वी चले जावला फिदीफिदी हसणारे , चले जावचाच संदर्भ देऊन स्वतःला प्रमोट करत आहेत.

In reply to by babubobade

मोदक Sun, 08/06/2017 - 16:35
मोगाखान, कांही लिंका पुरावे आहेत का..? का नेहमीप्रमाणे भाजपा / हिंदूद्वेष..

अत्रे Sun, 08/06/2017 - 18:17
https://www.facebook.com/628157246/videos/10155317215722247/ आमच्या औरंगाबादच्या नाट्यगृहाचे सार्वजनिक वाभाडे! वाईट वाटले रंगमंदिराची ही अवस्था बघून ..

श्रीगुरुजी Sun, 08/06/2017 - 20:53
http://www.deccanchronicle.com/technology/mobiles-and-tabs/040817/kult-unveils-beyond-smartphone-for-rs-6999.html हा 'कल्ट' नावाचा भ्रमणध्वनी हस्तसंच भारतीय कंपनीचा आहे का एखाद्या परदेशी कंपनीचा?

अमितदादा Sun, 08/06/2017 - 21:41
डाव्यांचा केरळ मधील हिंसाचार (विशेषतः rss आणि भाजप विरुद्ध) पाहून डावे सत्तेत नसताना तत्ववादी, विचारवादी आणि अहिंसाकवादी असतात आणि सत्तेत आल्यास वरील तत्वांना तिलांजली देऊन हिंसक होतात , मदमस्त होतात हे वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. बंगाल मध्ये ही हेच होत. महाराष्ट्रातील डावे जरा बरे वाटतात, महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा परिणाम की सत्तेत नसल्याचा परिणाम? डावे सुधारले नाहीत तर नामशेष होणार हे नक्की. Mob हिंसेला आळा घातला पाहिजे।

गॅरी ट्रुमन Mon, 08/07/2017 - 12:05
हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बरालांच्या चिरंजीवांनी एका चंडीगढमध्ये एका मुलीचा पाठलाग करून stalking केले. ती मुलगी खमकी निघाली आणि त्यातून आय.ए.एस अधिकार्‍याची मुलगी असल्यामुळे इतर सामान्य घरांमधील मुलींना असते त्यापेक्षा जास्त पाठबळ तिला होतेच. तिने हे प्रकरण नेटाने लावून धरले आणि या चिरंजीवांना अटक झाली. कायदा गाढव असतो या उक्तीचे प्रत्यंतर द्यायला की काय या चिरंजीवांची काही तासात जामीनावर सुटकाही झाली. आता हरियाणा पोलिसांनी या चिरंजीवांविरूध्दचे आरोप त्याला लवकरात लवकर जामीन मिळावा या उद्देशाने 'डायल्युट' केले असा आरोप होत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे की या प्रकरणाशी या चिरंजीवांच्या वडिलांचा काहीही संबंध नाही. नसेलही. जर का या वडिलांनी आपल्या दिवट्या चिरंजीवांना यापूर्वीच घरातून हाकलून दिले नसेल (किंवा या कृत्यामुळे ते त्याला हाकलून देणार नसतील) तर या कृत्याचा जाहिरपणे निषेध करणे आणि कायद्याप्रमाणे आपल्या मुलाला शिक्षा व्हावी एवढे तरी म्हणणे या वडिलांचे उत्तरदायित्व ठरते. अजून तरी त्यांनी तसे काही केल्याचे ऐकिवात नाही. तसेच पोलिसांनी मुद्दामून आरोप 'डायल्युट' केले या आरोपाविषयी स्वतः खट्टर यांनीही काही म्हटल्याचे किंवा संबंधित पोलिस अधिकार्‍यांविरूध्द कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. सध्याची परिस्थिती अशी आहे की मोदींच्या वर्चस्वाला कोणी विरोधी पक्ष आव्हान द्यायच्या स्थितीत नाहीत. ते कमी करायचे काम कोणी करत असेल तर ही सत्तेचा माज चढलेली असली बांडगुळेच.

In reply to by गॅरी ट्रुमन

विशुमित Mon, 08/07/2017 - 12:16
सध्याची परिस्थिती अशी आहे की मोदींच्या वर्चस्वाला कोणी विरोधी पक्ष आव्हान द्यायच्या स्थितीत नाहीत. ते कमी करायचे काम कोणी करत असेल तर ही सत्तेचा माज चढलेली असली बांडगुळेच.>>> ==> मोदी जी आणखी किती दिवस पुरणार आहेत देशासाठी. ही टर्म किंवा जास्तीत जास्त पुढची टर्म. ते एकदा सत्तरी पार झाले की राजकारणातून संन्यास घेतील. (सन्यास घेतील का ते दिसेलच बहुदा). मोदींसारखा ब्रँड होण्याच्या दुर्ष्टीने भाजप काही पाऊले उचलत आहेत का, हे कळायला मार्ग नाही. असा ब्रँड बनवण्यासाठी कमीत कमीत २० वर्ष तरी लागतील.