आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद आल्याने प्रतिसाद एका पानात रहावे यासाठी नवीन धागा सुरु करीत आहे.
धाग्याची सुरूवात https://indianexpress.com/article/india/gujarat-congress-three-mlas-joi… या बातमीने करीत आहे. गुजरातमध्ये वाघेलांपाठोपाठ अजून ३ कॉग्रेस आमदारांनी (बळवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल, पी आय पटेल) राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. डिसेंबर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या ३ आमदारांपैकी २ पटेल आहेत. मागील दीडदोन वर्षे पटेलांना राखीव जागा द्यावात यासाठी गुजरात पेटविण्याचे प्रयत्न झाले. त्याचा काहीसा फटका भाजपला बसला होता. या पार्श्वभूमीवर २ पटेल आमदारांनी भाजपत जाणे ही भाजपसाठी आनंदाची बातमी आहे.
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
43382
प्रतिक्रिया
215
मिसळपाव
प्रतिक्रिया
सध्याची परिस्थिती अशी आहे की
In reply to <<<<सध्याची परिस्थिती अशी आहे by विशुमित
सध्याची परिस्थिती अशी आहे की मोदींच्या वर्चस्वाला कोणी विरोधी पक्ष आव्हान द्यायच्या स्थितीत नाहीत. ते कमी करायचे काम कोणी करत असेल तर ही सत्तेचा माज चढलेली असली बांडगुळेच.सहमत.
मोदी जी आणखी किती दिवस पुरणार आहेत देशासाठी. ही टर्म किंवा जास्तीत जास्त पुढची टर्म. ते एकदा सत्तरी पार झाले की राजकारणातून संन्यास घेतील. (सन्यास घेतील का ते दिसेलच बहुदा). मोदींसारखा ब्रँड होण्याच्या दुर्ष्टीने भाजप काही पाऊले उचलत आहेत का, हे कळायला मार्ग नाही. असा ब्रँड बनवण्यासाठी कमीत कमीत २० वर्ष तरी लागतील.तुम्ही गंभीरपणे हा प्रश्न विचारला आहे असे समजून उत्तर देत आहे.
मोदींनी ऑक्टोबर २००१ पासून खुर्ची सांभाळल्यापासून ते १६ मे २०१४ पर्यंत उण्यापुर्या साडेबारा वर्षात इतिहास घडवला. त्यामुळे कमीतकमी वीस वर्षे हा दावा कशावरून केलात हे कळाले नाही.
दुसरी गोष्ट, मोदींनी गुजरात मॉडेल यशस्वी केले आणि तो बेंचमार्क तयार झाला आहे, त्यामुळे आपल्या कामगिरीचे मूल्यमापन गुजरातच्या तुलनेत होणार हे सर्वांना माहिती असावे. हे माहिती असणारे भाजपाच्या दुसर्या फळीमध्ये भरपूर नेते आहेत आणि समजा तुमच्या मते ते कर्तबगार नसले तरी त्यांच्या पासंगाला पुरणारे नेते विरोधी पक्षात आहेत का..?
बाकी मला विचाराल तर २०२४ मध्ये मोदी पंतप्रधान नसतील. फडणवीस / योगी किंवा एखादा तरूण चेहरा पुढे येईल. (सध्याच्या कॅबीनेटमध्ये तसे कोणी पंतप्रधानपदासाठी पुढे येईल असे वाटत नाही - गडकरी सोडले तर!)
गुजरात मॉडेल
In reply to सध्याची परिस्थिती अशी आहे की by मोदक
नक्की काय आहे कुणी सांगेल का? आणि काय बेंचमार्क आहे त्याचा?
तुम्ही गंभीरपणे प्रश्न
In reply to गुजरात मॉडेल by चिर्कुट
तुम्ही गंभीरपणे प्रश्न विचारला असेल तरच उत्तर मिळेल? (हा. घ्या )
असली बांडगुळगिरी , वर शांत
In reply to हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवांचे प्रताप by गॅरी ट्रुमन
असली बांडगुळगिरी , वर शांत राहणे, वर गुन्हेगाराला वाचवणे बरेच महाग पडणार आणि पडावे.
तर या कृत्याचा जाहिरपणे निषेध
In reply to हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवांचे प्रताप by गॅरी ट्रुमन
हे बरोबर आहे पण कायद्याने तशी घटना घडली असे सिद्ध झाले तर. आरोप झाले, अटक झाली, जमीन झाला हि तर कायदेशीर प्रक्रियेची सुरुवात आहे. सिद्ध झाले आरोप तर या प्रदेशाध्यक्ष महोदयांनी जाहीर वक्त्यव्य करावे आणि जी काय शिक्षा कोर्ट देईल ती भोगू द्यावी.
असली कृत्ये करण्यासाठी सत्तेचाच मज असावा लागतो काय भारतात?
तरी बरं
In reply to तर या कृत्याचा जाहिरपणे निषेध by हतोळकरांचा प्रसाद
हे भाजपच्या माणसाचे कृत्य आहे ...हेच जर दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या संबंधित लोकांनी केलं असतं तर ? जरा शिवसेनेचे नाव टाकून पहा बरं ? मिपावर वेगळा धागा निघाला असता , शेलक्या शब्दात प्रतिक्रिया लिहिल्या गेल्या असत्या ...कुठे गेले आता ते सगळे मिपाकर ???
भाजप मध्ये असल्यावर/गेल्यावर
In reply to तरी बरं by अभिदेश
भाजप मध्ये असल्यावर/गेल्यावर वाल्याचा पण वाल्मिकी होणार होते, ह्या प्रक्रियेला किती दिवस लागतात हो?
पोरींच्या मागावर कसे राहायचे आणि त्यातून कशी सहीसलामत सुटका करून कशी घायची हा आदर्शच त्यांच्या समोर असेल तर ते तरी काय करणार म्हणा..!!
====================================================
कुठे गेले आता ते सगळे मिपाकर ???
त्यांनी दिवट्या पोराच्या बापावर जवाबदारी टाकून मोदींना सेफ केले आहे.
संस्कार शिकवायला पाहिजे होते म्हणे बापाने पोराला. पोरगी इतक्या रात्री का फिरत होती हे पण एक मंत्र्याने तारे तोडले आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------
हायला त्या पाकिस्तानी बहिणीचे कोड कौतुक करण्याला न चुकलेले ट्विटर किंग ची काही प्रतिक्रिया नाही आली अजून वर्णिका बद्दल.
पोलिसांनी जर सौम्य कलमे लावली
In reply to भाजप मध्ये असल्यावर/गेल्यावर by विशुमित
पोलिसांनी जर सौम्य कलमे लावली, तर न्यायालयात आव्हान दिल्यास न्यायालय कडक कलमे लावण्याचा आदेश देऊ शकते का? हे प्रकरण दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न दिसतो. अर्थात माध्यमातून बरेच स्पेक्युलेशन सुरू आहे. अजून सविस्तर माहिती बाहेर आलेली नाही. हे प्रकरण, मेहता प्रकरण भाजपला जड जाणार आहे. भाजपने आरोपींना वाचविण्याचा अजिबात प्रयत्न करू नये.
मेहता राष्ट्रीय अध्यक्ष्यांचे
In reply to पोलिसांनी जर सौम्य कलमे लावली by श्रीगुरुजी
मेहता राष्ट्रीय अध्यक्ष्यांचे नातेवाईक आहेत. कारवाई होण्याची शक्यता कमी वाटते. बघू पार्टी विद डिफरेन्स वाले काय करतात ते.
??
In reply to तरी बरं by अभिदेश
फक्त शिवसेनेच्या कुणी असे काही केले असते तर शिवसेना समर्थक किती आय.डी नी त्याचा निषेध केला असता? जर रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडिया कर्मचाऱ्याला थोबडावले होते तेव्हा कोणीही शिवसेना समर्थक जे काही झाले ते चुकीचे होते हे म्हणायलाच मुळी तयार नव्हता. तो अनुभव लक्षात घेता त्या मुलीचीच कशी चूक आहे यावर सगळे शिवसेना समर्थक काथ्या कुटत राहिले असते हीच शक्यता सर्वात जास्त. तसले तारे कुणा नेत्याने तोडले आहेत. पण असले काही शिवसेनेच्या माणसाने केले असते तर मिपावरही असेच काही वाचायला मिळाले असते हीच शक्यता जास्त.
<<<<फक्त शिवसेनेच्या कुणी असे
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
फक्त शिवसेनेच्या कुणी असे काही केले असते तर शिवसेना समर्थक किती आय.डी नी त्याचा निषेध केला असता?>>>
==> मी शिवसेना समर्थक नाही पण राष्ट्रवादीच्या कोण्या नेत्याच्या पोराने असले केले असते तर नक्कीच मी निषेद केला असता.
तसले तारे कुणा नेत्याने तोडले आहेत.>>>
==>>रामवीर भट्टी
https://www.loksatta.com/desh-videsh-news/woman-shouldnt-have-gone-out-…
जर रवींद्र गायकवाड यांनी एअर
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
हे आपले वक्तव्य चुकीचे आहे, आपण धागा काढून परत वाचण्यास हरकत नसावी.
ओह्ह्ह
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
विरोध एअर इंडिया च्या सर्व्हिस ला होता . आणि कारण न वाचता तोंडसुख घेणाऱ्या लोकांना . दुसरे पक्ष ह्याविषयी काही चर्चा असली कि भाजप समर्थकांचा तोल जातो हे वेळोवेळी दिसले आहे . भाजप च्या चुका असल्या कि सौम्य शब्द बाकी काय असेल तर १० प्रतिसाद झोडपायला इतरांना .
रमेश किणी प्रकरण?
In reply to ओह्ह्ह by वरुण मोहिते
आणि अगदी तसाच विरोध रमेश किणी प्रकरणात रमेश किणींनाही होता. श्री.रा.रा. राज ठाकरेंना ती जागा खाली करून हवी होती आणि तरीही रमेश किणी ते सोडायला तयार झाले नाहीत. काय हा मराठी बाण्याचा मराठी माणसानेच केलेला उपमर्द. तरीही किती शिवसेना समर्थकांनी निदान राज ठाकरेंना निदान प्रश्न तरी विचारले होते? त्यावेळी मिपा नव्हते. पण असते तर रविंद्र गायकवाड प्रकरणी झाले त्याच्या हजार पटींनी मोठे रण शिवसेना समर्थकांनी मांडले असते हे नक्कीच. तेव्हा शिवसेना समर्थकांचा विरोध नक्की कशाला होता आणि समर्थन कशाला आहे याच्या कहाण्या ऐकवूच नका. तो इतिहास बराच जुना आहे.
ह्या दोन प्रकरणांचा काडीमात्र
In reply to रमेश किणी प्रकरण? by गॅरी ट्रुमन
ह्या दोन प्रकरणांचा काडीमात्र संबंध नसताना आपल्या सरसकट विधानाच्या समर्थनार्थ हे उदाहरण देणे पटले नाही. परत एकदा आधीचा धागा वाचून आपली मते बनवा असे सुचवतो. सरसकट शिवसेना समर्थक, भाजप समर्थक वगैरे विधाने पटत नाहीत असे नमूद करतो.
संदर्भ
In reply to ह्या दोन प्रकरणांचा काडीमात्र by हतोळकरांचा प्रसाद
दोन प्रकरणांचा काडीमात्र संबंध नाही हे खरे असले तर मग हरियाणातील त्या दिवट्याचे कृत्य हलकटपणाचे आहे आणि खट्टर सरकारचे पोलिस याप्रकरणी त्याला वाचवायचा प्रयत्न करत आहेत हे लिहिल्यावर प्रतिसादात शिवसेना आणायची काहीच गरज नव्हती. त्या हरियाणातील भाजप प्रदेशाध्यक्षाच्या दिवट्याचा आणि शिवसेनेचा काय संबंध? काहीच नाही. तरीही शिवसेना प्रतिसादात आणायची ती आणलीच. मग इतरांनी त्यावर भाष्य केलेच पाहिजे ही अपेक्षा करणे जसे अयोग्य आहे त्याचप्रमाणे इतरांनी त्यावर भाष्य करूच नये ही अपेक्षा करणेही. संदर्भासाठी
हा प्रतिसाद.
अच्छा म्हणजे त्यांनी चुकीच्या
In reply to संदर्भ by गॅरी ट्रुमन
अच्छा म्हणजे त्यांनी चुकीच्या पद्धतीने मांडले म्हणून तुम्हीपण "जशास तसे(?)" उत्तर दिले असे आहे ते! मला तुमच्या लेखनाबद्दल आणि मतांबद्दल आदर आहे म्हणून आपलं सांगायचं प्रयत्न केला!
अवांतर: गायकवाडच्या मागे
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
अवांतर: गायकवाडच्या मागे दिल्ली पोलीस का लागले नाहीत अजून? fir होऊन बरेच दिवस झाले.
गायकवाडने माफी मागितल्याने
In reply to अवांतर: गायकवाडच्या मागे by अत्रे
गायकवाडने माफी मागितल्याने प्रकरण संपविले असावे.
आपणही आधीचा धागा काढून
In reply to गायकवाडने माफी मागितल्याने by श्रीगुरुजी
आपणही आधीचा धागा काढून वाचण्यास हरकत नसावी!
आपणही आधीचा धागा काढून
In reply to आपणही आधीचा धागा काढून by हतोळकरांचा प्रसाद
आपणही आधीचा धागा काढून वाचण्यास हरकत नसावी!
ह प्र तुम्ही लय पन्हाळ लावता राव..!!
In reply to तर या कृत्याचा जाहिरपणे निषेध by हतोळकरांचा प्रसाद
हे बरोबर आहे पण कायद्याने तशी घटना घडली असे सिद्ध झाले तर.>>>
==>> सिद्ध बिद्ध काही होणार नाही. रस्त्या वरील सगळे सी सी टीव्ही बंद होते(?)
सिद्ध झाले आरोप तर या प्रदेशाध्यक्ष महोदयांनी जाहीर वक्त्यव्य करावे>>>
==>> २०-२५ वर्षांनी ?
जी काय शिक्षा कोर्ट देईल ती भोगू द्यावी.>>>
==>> पेरोल वर १० वेळा घरी आंतील त्याला.
हो आपले बरोबर आहे, cctv बंद
In reply to ह प्र तुम्ही लय पन्हाळ लावता राव..!! by विशुमित
हो आपले बरोबर आहे, cctv बंद होणे, पॅरोलवर दहा वेळा सोडणे हे सगळे गेल्या तीन वर्षात घडायला सुरुवात झाली!
तो फक्त शिवसेनेचा किंवा भाजपचा नेता किंवा नेत्याचा नातेवाईक होता एवढेच काही लोकांसाठी त्या घटनेची तीव्रता वाढवून तथाकथित निषेध वगैरे नोंदवायला पुरेसे ठरते यातच सगळे आले!
आधूनिक (उत्क्रांत ?) श्रावणबाळ
https://www.loksatta.com/mumbai-news/man-reaches-mother-flat-on-return-…
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/us-techie-comes-home-fi…
हरयाणा प्रकरणावर मत न देता
हरयाणा प्रकरणावर मत न देता , गायकवाड प्रकरण , सेना इत्यादी संबंध नसता उकरुन काढुन , मनातील भडास काढण्याचा थयथयाट मनोरंजक आहे.
??
In reply to हरयाणा प्रकरणावर मत न देता by मराठी_माणूस
वाचत जा हो जरा. सुरवातीलाच त्या प्रकरणाविषयी लिहिले आहे.
बरोबर आहे इथे शिवसेनेचे नाव यायचा काहीच संबंध नव्हता. पण कसे आहे की (माझ्या आकलनाप्रमाणे) शिवसेना समर्थक असलेल्या एका मिपाकराने हा प्रतिसाद देऊन काही कारण नसताना शिवसेनेचे नाव आणले. तेव्हा उकरून कोणी काय काढले आहे हे तुम्हाला दिसत नसले किंवा त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असाल तर त्याला मी तरी काहीही करू शकत नाही आणि करणारही नाही.
भडास हा मराठी शब्द आहे का?
असो. एकूणच नक्की काय लिहिले आहे ते न वाचताच उगीच काहीतरी प्रतिसाद देऊन आपलेच हसे करून घ्यायचा प्रयत्नही मनोरंजक वाटला.
??
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
गॅरी , FYI... मी कोणत्याही पक्षाचा समर्थक वा भक्त नाही आपल्यासारखा . मी विरोधाभास दाखवतोय. जेव्हा भाजप सोडून दुसर्या पक्षाचा मुद्दा असतो तेव्हा काही मिपाकर ज्या पद्धतीने प्रतिसाद देतात , जी भाषा वापरतात आणि भाजपच्या बाबतीत मात्र गुळमुळीत भाषा वापरतात . हे म्हणजे आपला तो बाब्या हा प्रकार आहे.
दुसरे माझे प्रतिसाद जे तुम्ही म्हणताय की शिवसेनेच्या समर्थनार्थ होते , ते तुम्ही नीट वाचलेत तर शिवसेनेला युतीचे कोणतेही श्रेय न देण्याच्या बाबतीत होते. हा कृतघ्नपणा झाला. युतीचा दोघांनाही फाययदा झाला होता , हे मान्य ना करण्याला होता.
मुळात वर उल्लेखलेला प्रतिसाद हा तुम्हाला उद्देशून नसताना , स्वतःवर तुम्ही ओढून घेतलाय.
<<<मुळात वर उल्लेखलेला
In reply to ?? by अभिदेश
मुळात वर उल्लेखलेला प्रतिसाद हा तुम्हाला उद्देशून नसताना , स्वतःवर तुम्ही ओढून घेतलाय.>>>
-===>> मिपावर फक्त गिनेचुणेच भाजप समर्थक उरल्यामुळे असेल कदाचित. जेवढे उरलेले आहेत त्यातले पण काही निःपक्षतेकडे झुकलेले आणि फक्त मोदी समर्थक दिसतायेत.
बाकी इतर पक्षाचे समर्थक तर त्यांच्या पक्षाप्रमाणे अगोदरच बदनाम आहेतच. ते काय आपले विचार बदलतील असे वाटत नाहीत. असो..!!
वरती कमीतकमी वीस वर्षे हा
In reply to <<<मुळात वर उल्लेखलेला by विशुमित
वरती कमीतकमी वीस वर्षे हा दावा कशावरून केलात हे कळाले नाही.
मोदी सारखा ब्रँड बनायला आणि
In reply to वरती कमीतकमी वीस वर्षे हा by मोदक
मोदी सारखा ब्रँड बनायला आणि एक हाती सत्ता आणायला ७० वर्ष लागली भाजपला. मोदींच्या कर्तृत्वामुळे (?) मी फक्त २० वर्षच गृहीत धरली नवीन ब्रँड साठी.
मोदी जो पर्यंत आहेत तो पर्यंत कोणी ब्रँड बनण्याची शक्यता धूसर आहे. २०१९-२०२४ ची टर्म गृहीत धरली तर आणखी ७ वर्ष. त्या नंतर जनता पुढील ३ टर्म भाजपला एकहाती सत्ता देईल असे वाटत नाही. तो पर्यंत २०-२२ वर्ष जाणारच आहे.
फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते. (कृपया ब्राह्मण आहे म्हणून व्हिक्टीम कार्ड खेळू नका. वीट आलाय त्याचा. )
योगीचे नाव घेऊन तुम्ही अमंगळ करमणूक केलीत.
असो- दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
ओके
In reply to मोदी सारखा ब्रँड बनायला आणि by विशुमित
ओके
फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते. (कृपया ब्राह्मण आहे म्हणून व्हिक्टीम कार्ड खेळू नका. वीट आलाय त्याचा. )व्हिक्टीम कार्ड काय.. अटलजी पण ब्राह्मण होते. कसे आहे, महाराष्ट्रातले सरंजामवादी विचार सगळीकडेच लागू पडत नाहीत. कळेल हळूहळू.
योगीचे नाव घेऊन तुम्ही अमंगळ करमणूक केलीत.मुख्यमंत्री होतील असे वाटले नव्हते. पंप्र होणार नाही असेही वाटून घेऊ शकता.
समजा पुढे कधीतरी पंतप्रधानपदाचा उमेदवार न सांगता भाजपा एकहाती निवडून आली आणि केले योगीला पंतप्रधान.. मग काय करणार..?
हा हा हा ..!!
In reply to ओके by मोदक
काहींच्या काही प्रतिसाद..!!
समजा पुढे कधीतरी
In reply to हा हा हा ..!! by विशुमित
समजा पुढे कधीतरी पंतप्रधानपदाचा उमेदवार न सांगता भाजपा एकहाती निवडून आली आणि केले योगीला पंतप्रधान.. मग काय करणार..??
काय करणार ?? भोगणार
In reply to समजा पुढे कधीतरी by मोदक
काय करणार ?? भोगणार दुसऱ्यांच्या कर्माची फळे..!!
तो गुजरातच्या बेंचमार्क चा
In reply to ओके by मोदक
तो गुजरातच्या बेंचमार्क चा प्रश्न अनुत्तरित राहिला. (माझा नाही म्हणा तो प्रश्न )
फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल
In reply to मोदी सारखा ब्रँड बनायला आणि by विशुमित
फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते.वरील यादीत नितीशकुमार आणि विशेषत: पवारांचे नाव पाहून खूप हसलो.
बैसाखीच्या हार्दिक शुभेच्छा..
In reply to फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल by श्रीगुरुजी
बैसाखीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
धन्यवाद! बैसाखीला अजून ८-९
In reply to बैसाखीच्या हार्दिक शुभेच्छा.. by विशुमित
धन्यवाद! बैसाखीला अजून ८-९ महिने आहेत. मराठा मोर्चाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला पण मराठा मोर्चाच्या
In reply to धन्यवाद! बैसाखीला अजून ८-९ by श्रीगुरुजी
तुम्हाला पण मराठा मोर्चाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र बाहेर आहे सध्या. पण पाठिंबा आहेच इथून. लोक पाकिस्तानातून पण पाठिंबा देत आहेत. असो..!!
बघताय काय मग... व्हा मणिशंकर
In reply to तुम्हाला पण मराठा मोर्चाच्या by विशुमित
बघताय काय मग... व्हा मणिशंकर अय्यर.
मला नको. मुंबईकरांना शुभेच्छा
In reply to तुम्हाला पण मराठा मोर्चाच्या by विशुमित
मला नको. मुंबईकरांना शुभेच्छा द्या. महागड्या गाड्यातून येऊन राखीव जागा मागणाऱ्या धनदांडग्यांमुळे उद्या त्यांची वाट लागणार आहे.
कोणाची वाट लागणार?
In reply to मला नको. मुंबईकरांना शुभेच्छा by श्रीगुरुजी
कोणाची वाट लागणार? मुंबईकरांची?
कसे काय ?
एखाद्या शहरात एके दिवशी
In reply to कोणाची वाट लागणार? by विशुमित
एखाद्या शहरात एके दिवशी बाहेरून लाखो माणसे, लाखो वाहने रस्त्यावर आली तर तिथे काय होते?
पटलं..
In reply to एखाद्या शहरात एके दिवशी by श्रीगुरुजी
कुंभ मेळा ..
फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल
In reply to मोदी सारखा ब्रँड बनायला आणि by विशुमित
फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते.
पवार साहेब, नितीश कुमार आणि बॅनर्जी अजून राजकारणात अपरिपक्व आहेत.
इतकी वर्षे राजकारणात राहून आणि कोलांट्या उड्या मारुन सुद्धा पवार साहेब फक्त मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री यापलीकडे जाऊ शकले नाहीत.
आता नाईलाजाने मराठा मोर्चा कार्ड खेळावे लागत आहे.
नितीश कुमार आणि बॅनर्जी यांच्याबद्दल फार काही बोलण्यासारखे सुद्धा नाही.
त्यामुळे फडणवीस यांची तुलना वरील व्यक्तींशी होऊ शकत नाही.
फडणवीस यांची स्पर्धा मोदी, यशवंतराव चव्हाण किंवा अब्राहम लिंकन यांच्याशी होऊ शकते.
फडणवीस यांची स्पर्धा मोदी,
In reply to फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल by अप्पा जोगळेकर
खोखो हसत आहे!
अप्पा.. काही वयक्तिक
In reply to फडणवीस यांची स्पर्धा मोदी, by अत्रे
अप्पा.. काही वयक्तिक कारणांमुळे आज खूप अपसेट होतो. तुमच्या प्रतिसादाने इतका हसलो की सगळं टेन्शन विरघळून गेले.
आजच्या मोर्च्यात पाणी वगैरे वाटप केले की नाही आमच्या (तुमचे पण आहेत बरका) बंधू लोकांना??
गुजरात मॉडेल
In reply to वरती कमीतकमी वीस वर्षे हा by मोदक
>> मोदींनी गुजरात मॉडेल यशस्वी केले आणि तो बेंचमार्क तयार झाला आहे
हा दावा कशावरुन केला हे कळाले नाही.
कशावरून म्हणजे..? २०१४ चा
In reply to गुजरात मॉडेल by चिर्कुट
कशावरून म्हणजे..? २०१४ चा निवडणुक प्रचार ज्या बेसवर झाला किंवा २००२ ते २०१४ पर्यंत जे गुजरातमध्ये जी वेगवेगळी विकासकामे झाली ते काय होते तुमच्यामते..?
२१ अपेक्षित प्रश्नसंचाप्रमाणे प्रश्नोत्तरे हवी असतील तर इतके बेसीक समजावून सांगायला माझ्याकडे वेळ नाही असे समजा. किंवा गुजरात मॉडेल फेल गेले असे समजा - काय फरक पडतो..?
आता मुद्यावर येतो..
In reply to कशावरून म्हणजे..? २०१४ चा by मोदक
मुळात 'गुजरात मॉडेल' असं काही अस्तित्चात नव्हतं. ती फक्त प्रचारासाठी तयार केलेली एक टर्म होती, असं माझं मत आहे.
काही बेसिक प्रश्न -
१. फक्त गुजरातमध्ये झालेली (इतर कोणत्याही राज्यांत न झालेली) कोणती विकासकामे या मॉडेल अंतर्गत झाली आहेत?
१. जर इतकंच यशस्वी आहे ते मॉडेल, तर त्याच्याबद्दल काही डॉक्युमेंटेशन आहे का? त्याचा कुणी अभ्यास केला आहे का?
२. तुम्ही म्हणता की हे मॉडेल बेंचमार्क आहे. त्याचे काय क्रायटेरिया आहेत? कोणी ठरवलेले?
३. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत (उदा. महाराष्ट्र, केरळ, इ.) नक्की कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये गुजरात पुढे आहे? असेल तर या मॉडेलच्या नेमक्या कोणत्या पॉलिसीमुळे ते शक्य झालं?
४. इतर भाजपशासित राज्यांमध्ये ते का लागू नाही झालं इतकी वर्षे?
अजूनही काही प्रश्न आहेत, पण सध्या इतके पुरे.
ता. क. - जर योग्य उत्तरे मिळाली, तर माझे मत जाहीरपणे बदलायला मी तयार आहे. मात्र आजपर्यंत गुजरात मॉडेलबद्दल विचारलेल्या प्रश्नाची टू द पॉईंट उत्तरे मिळत नाहीत असा अनुभव आहे.
गुजरात मॉडेल बद्दल खालील
In reply to आता मुद्यावर येतो.. by चिर्कुट
गुजरात मॉडेल बद्दल खालील संकेतस्थळावर बरीच माहिती आहे.
https://www.quora.com/What-exactly-is-the-Narendra-Modi-Development-Mod…
चिर्कुट
In reply to आता मुद्यावर येतो.. by चिर्कुट
तुमच्या सदस्यनामा प्रमाणेच, तुम्ही विचारलेले प्रश्न देखिल अगदीच 'चिर्कुट' आहेत.
भाजप समर्थक ..
In reply to चिर्कुट by प्रसाद_१९८२
आणि अशी भाषा !!!
हम्म्म
In reply to चिर्कुट by प्रसाद_१९८२
@प्रसाद_१९८२ - शक्य असल्यास विषयाशी संबंधीत उत्तरे द्यावीत अन्यथा आपले मुखकमल उचकटलेच पाहीजे असे काही नाही. व्यक्तिगत टिप्पणीला त्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्त तीव्रतेचे उत्तर मिळेल.
@श्रीगुरुजी - धन्यवाद. लिंक पाहातो.
चिर्कुट साहेब
In reply to आता मुद्यावर येतो.. by चिर्कुट
चिर्कुट साहेब
(आणि इतरही ज्यांना वस्तुस्थिती जाणून घ्यायची आहे)
कोणताही पूर्वग्रह न ठेवता खाली दिलेले दोन दुवे वाचून पहा.
गुजरात राज्य वीज मंडळ तोट्यातून नफ्यात कसे आले आणि सर्वाना २४ तास वीज कशी मिळते
https://www.businesstoday.in/magazine/case-study/gujarats-power-sector-…
https://www.wsj.com/articles/SB10000872396390444226904577560702435343314
विदर्भापेक्षा सर्वच दृष्टींनी वाईट परिस्थिती असताना जलसंधारण आणि इतर अनेक कामांमुळे सौराष्ट्राची शेतीची प्रगती का आणि कशी झाली आणि विदर्भाची प्रगती मात्र सरकारी मदत आणि बऱ्याच सवलती असून का झाली नाही याचा एक तौलनिक अभ्यास आहे
https://www.indiawaterportal.org/sites/indiawaterportal.org/files/gener…
पहा वाचून आणि पटलं तर. मग अजूनही बरंच काही दाखवता येतील.
मी गेली काही वर्षे गुजरात मध्ये प्रत्यक्ष जाऊन( मेडिकल कॅम्पसाठी)पाहिलेल्या गोष्टी आहेत या.
http://www.ndtv.com/elections
In reply to चिर्कुट साहेब by सुबोध खरे
https://www.ndtv.com/elections-news/ndtv-opinion-poll-five-states-where…
<<<२१ अपेक्षित
In reply to कशावरून म्हणजे..? २०१४ चा by मोदक
२१ अपेक्षित प्रश्नसंचाप्रमाणे प्रश्नोत्तरे हवी असतील तर इतके बेसीक समजावून सांगायला माझ्याकडे वेळ नाही असे समजा. किंवा गुजरात मॉडेल फेल गेले असे समजा - काय फरक पडतो..?>>>
==>> एवढे फ्रस्टरेट होऊ नका, आम्ही नाही तुमच्या मागे लागणार स्पष्टीकरणासाठी.
गुजरात मॉडेल फेल च होते. त्याच्या मृगजळाला जनता भुलली. जसे जसे लोक त्याच्या जवळ जातील त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटेल.
एक वेळ मानून चालू कि गुजरात
In reply to <<<२१ अपेक्षित by विशुमित
एक वेळ मानून चालू कि गुजरात बाहेरचे लोक फसले, भुलले, पण गुजरात मधले लोक पण भुलले असे म्हणायचे आहे का? आणि तीन वर्षात त्या मृगजळाच्या किती जवळ पोहोचले असतील म्हणे लोक? म्हणजे या वर्षाखेरीस पर्यंत पुरेसे जवळ पोहोचतील ना? नाही, नाहीतर परत गुजरात मध्ये मृगजळवालेच यायचे! शिवाय केंद्रातला भ्रमाचा भोपळा फोडायला पण दोनच वर्षे वेळ आहे बरं!
मत देणार कसे ??
In reply to हरयाणा प्रकरणावर मत न देता by मराठी_माणूस
वेळोवेळी उघडे पडले आहेत भाजप समर्थक . अमित शहा सारख्या फालतू माणसाबद्दल तर बोलावेसे पण वाटत नाही . ५-१० वर्षे ऐश मग पक्ष परत त्याच ठिकाणी भाजप .
ब्वॉर.
In reply to मत देणार कसे ?? by वरुण मोहिते
ब्वॉर.
वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा..!
मोहिते
In reply to मत देणार कसे ?? by वरुण मोहिते
अमित शहा सारख्या फालतू माणसाबद्दल तर बोलावेसे पण वाटत नाही
क्काय क्काय फालतु पणा केलाय ह्या माणसाने ते बघायला, ऐकायला, वाचायला आवडेल.
५-१० वर्षे ऐश मग पक्ष परत त्याच ठिकाणी भाजप .
कुठली ऐश ? पक्षा साठी राब राब राबण ह्याला ऐश म्हणतात ?
मोहिते तुमचे प्रतिसाद संतुलीत असायचे, आता ते जिलसी कडे झुकतायत. बर तुमच्या थयथयाटाने किंवा आमच्या समर्थनाने षष्प फरक पडणार नाहिये. जंता नाम का प्रानी बौत श्याना हो चला है.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संतुलित प्रतिसाद कसे द्यायचे
In reply to मोहिते by थिटे मास्तर
हे भाजप समर्थकांना सांगा . बाकी प्रतिसाद पोचला .
:))
In reply to संतुलित प्रतिसाद कसे द्यायचे by वरुण मोहिते
:))
फालतू नसलेल्या नेत्यांची पण
In reply to मत देणार कसे ?? by वरुण मोहिते
फालतू नसलेल्या नेत्यांची पण नावे सांगून टाका लगेच!
पक्ष कसा वागेल आणि इथले
पक्ष कसा वागेल आणि इथले पक्षसमर्थक कसे वागतील हे अत्यंत भिन्न मुद्दे आहेत. इथले पक्षसमर्थक कसे वागतील ही बिनमहत्त्वाची नि गौण बाब आहे. ताज्या घडामोडींत त्यावर फार चर्चा आवश्यक नाही.