✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

क
कोंबडी प्रेमी यांनी
Fri, 07/21/2017 - 17:47  ·  लेख
लेख
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU हि एक लिंक पाहिली. ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ?? एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ?? “मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर” अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात. मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा” मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ? मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे) तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल .... समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
143599 वाचन

💬 प्रतिसाद (445)

प्रतिक्रिया

घ्यावाच कि आक्षेप, त्यांच्या

हतोळकरांचा प्रसाद
Mon, 07/24/2017 - 21:41 नवीन
घ्यावाच कि आक्षेप, त्यांच्या चुकीच्या गोष्टींवर घ्यावाच आक्षेप! पण त्यांच्या एकूण भाषणातील आपल्याला खटकणाऱ्या वाक्यातून आपल्याला हवी तशी प्रतिमा उभी करणे मला चुकीचे वाटते. त्या मुलींना (फक्त) भाकऱ्याच बडवा असे सांगत आहेत अशी प्रतिमा कशाला? तुम्ही करता ते करून तुम्हाला या गोष्टी यायला पाहिजेत असा त्याचा मतितार्थ नाहीये का? मला वाटते साधारणपणे प्रत्येक स्त्रीला तिच्या आईने हि गोष्ट एकदातरी नक्कीच सांगितली असावी. तेव्हा ती इतकीच खटकणारी वाटली होती का? पुरुषांनाही स्वैपाक यायलाच हवा आणि त्याबद्दल काहीही दुमत नाही. पण पुरुषांना सांगत नाही मग स्त्रीला का सांगता हे मला बायस्ड मत वाटते. बाकी त्या ज्या मुद्द्यांबद्दल सांगत आहेत ते मुद्दे संघर्ष होत असलेल्या कुटुंबाबद्दल आहेत, त्यातून संघर्ष निर्माण होण्याचा मुद्दा गैरलागू वाटतो. कोणत्या मुद्द्यांनी संघर्ष निर्माण होईल असे आपल्याला वाटते? "संसारात जे वाट्याला येईल ते भोग बाई" असे म्हणणारी माता आणि त्यांचे भाषण याची तुलनाच मुळी पटत नाही. त्यांचे सल्ले हे संघर्ष टाळण्यासाठी तुम्ही काय भूमिका बजावू शकता या बाबतीत आहेत असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

नंतर त्या वयस्कर दिसतात आणि

arunjoshi123
Mon, 07/24/2017 - 17:22 नवीन
नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.
मला हे कळत नाही लोक सरकारच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या नितीला बळी पडून स्वतःचं डोकं का खराब करून घेतात. मंजे लग्नास सर्वात सुयोग्य वय काय याचं उत्तर काय आहे? १८-२५ वर्षे. आज जे लोक २५ नंतर लग्न करतात ते चूक आहे. चूक म्हणजे १८ ते २५ पेक्षा चूक. सरकारची ही एक्सप्लिसिट निती आहे कि स्त्री असो वा पुरुष , शक्य तितके लग्न उशिरा व्हायच्या फेवरमधे बोलायचे. मंजे लोकसंख्या वाढिचा दर मंदावतो. अजून तरि तिशोत्तरित लग्न करणार्‍या पोरिंची चिंता करणारी डॉक्यूमेंटरी राज्यसभा टिवीवर (त्यांना भारतातले असले सगळे प्रॉब्लेम सर्वात अगोदर कळतात.) नाही पाहिलि. ========================== शिक्षणाचा आणि लग्नाचा काय संबंध? मुलगी शिकेल नि मगच लग्न करेल ही भूमिका माजोरडी नाही का? म्हणजे १८- २५ या काळातच लग्न करण्याचा सर्वात सुयोग्य नैसर्गिक काळ असतो, आणि याच काळात तुमचं ग्रॅज्यूएशन आणि पोस्ट ग्रॅज्यूएशन पण करायचं असतं. मग अगोदर शिक्षणच हा अट्टाहास का? लग्नानंतर ८ तासाची (आणि दोन तास प्रवासाची) नोकरी करता येत असेल, तर शिक्षण करता का येत नाही? आजकालचे आधुनिक बाप मुलिंचं ब्रेनवॉश करतात, म्हणून मुली आपल्या तारुण्याच्या पिकला वैवाहीक सुखं घेण्याची इच्छा असलेल्या मुली नंतर १२-ते १८ वर्षे ताटकळत बसू शकतात.
  • Log in or register to post comments

तुमच्यामध्ये पण व्हिडीओमध्ये

मोदक
Mon, 07/24/2017 - 17:30 नवीन
तुमच्यामध्ये पण व्हिडीओमध्ये जाऊन व्हायरल होण्याची क्षमता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

तुमच्यासारख्या

arunjoshi123
Mon, 07/24/2017 - 17:54 नवीन
तुमच्यासारख्या बॅक्टेरियांसाठीच तर आमच्यासारखे व्हायरस असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हा हा हा. बॅक्टेरीया नाही हो.

मोदक
Mon, 07/24/2017 - 18:08 नवीन
हा हा हा. बॅक्टेरीया नाही हो. मीच व्हायरस आहे असे एकेकाळी माझ्यावर भडकलेले एक मिपाकरकाका म्हणाले होते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

मला पण तेच

कोंबडी प्रेमी
Mon, 07/24/2017 - 18:16 नवीन
वाटलं .... अपर्णा तैंचा हा डू आयडी असावा अशी शंका येते हघ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

समजा ड्यू आय डी आहे. पण आपणच

arunjoshi123
Mon, 07/24/2017 - 18:23 नवीन
समजा ड्यू आय डी आहे. पण आपणच म्हणालात नि कि यावर सर्व अंगानी चर्चा व्हावी. ================================================= ऑन ए लायटर नोट - ताईंनी भावांसाठी एवढं करावं आणि भावांनी त्यांना असं वार्‍यावर सोडावं हे पटतं का? तुमी बी ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंबडी प्रेमी

शिक्षणाचा आणि लग्नाचा काय संबंध?

विशुमित
Mon, 07/24/2017 - 18:10 नवीन
३-४ लग्न जुळवण्याचा बैठकीत जाण्याचा योग आला. त्यात एक लेटेस्ट ट्रेंड पाहिला मिळाला आणि चर्चिला सुद्धा गेला. . मुलीचे शिक्षण एफ वाय; एस वाय (कला, वाणिज्य,शास्त्र, अभियांत्रिकी, इतर). साधारणता वय १९-२० वर्ष. मुलीचे वडील लग्नाबाबत एक अट टाकताना दिसत होते. मुलीचे राहिलेले शिक्षण मुलाकडच्यांनी पूर्ण करायचं आणि तिला नोकरी करून द्यायची. वधुपित्याच्या बाजूने ह्याचे फायदे असे चर्चिले गेले: (माझी सगळ्याच गोष्टींना सहमती नाही आहे) १) मुलीचे संपूर्ण शिक्षण आणि तिचे लग्न करण्याचा दुहेरी खर्च कमी होतो. २) आताच्या सामाजिक परस्थिती मध्ये वयात आलेली मुलगी सांभाळणे, तिच्यावर देखरेख ठेवणे जिकिरीचे असल्यामुळे लग्न करून जवाबदारी नवरामुलांच्याकडे देणे ३) योग्य वयात लग्न लागते ४) लग्न झाल्या झाल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या लगेच पडत नाहीत. ५) शिक्षणाचे कारण पुढे असल्यामुळे मातृत्वाची घाई सासरचे करत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

वधुपित्याचं बर्‍यापैकी पटलं.

arunjoshi123
Mon, 07/24/2017 - 18:18 नवीन
वधुपित्याचं बर्‍यापैकी पटलं. ======================================
शिक्षणाचा आणि लग्नाचा काय संबंध?
यातनं शिक्षण आधीच झालं पाहिजे असं लॉजिक लावायचा संबंध काय असं म्हणायचं होतं. शब्द चूकिचे निवडले वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

नोकरी करता येत असेल, तर

सतिश गावडे
Tue, 07/25/2017 - 09:54 नवीन
नोकरी करता येत असेल, तर शिक्षण करता का येत नाही?
कारण नोकरी करणारी स्त्री पैसे घरी आणते तर लग्नानंतर स्त्रीने शिकायचे ठरवले तर तिच्या शिक्षणाचा खर्च काही सन्माननीय अपवाद सोडले तर सासरचे लोक नक्कीच करणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

मुलगी सुंदर हवी पण मुलगा

arunjoshi123
Mon, 07/24/2017 - 17:36 नवीन
मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा” मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?
मुलगी सुंदर हवी का कुरुप, चांगल्या परिस्थितीची का वाईट, कमवती का नाही याबद्दल त्या काही कोणाला रिकमेंड करत नाहीत. मुलांना तसंही उद्देशून त्यांचं बहुतांश बोलणं नसतं. सुनेच्या आईवडिलांना चांगलीच ट्रिटमेंट द्या असे त्या म्हणतात. समाजात मिळत नसेल तर त्यात त्यांचा काय दोष? पुरुषांचं प्रबोधन करायला अनंत स्त्रीवादी आहेत, रिकामटेकडे आहेत, सरकार आहे. त्या युनिक यासाठी आहेत कि त्या स्त्रीयांचं प्रबोधन करतात. पुरुषांनी विषम वागावं असं म्हणत नाहीत. त्यांनी देखिल फक्त पुरुषांना झोडणारांना काही टक्के सामिल झालं पाहिजे आहे विचित्र आग्रह आहे. त्या म्हणतात कि पुरुषांच्या बाजूने त्यांच्यावर स्त्रीयांकडून होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढणे हा माझा पेशा आहे.
  • Log in or register to post comments

हि दुसरी पोस्त होती

कोंबडी प्रेमी
Mon, 07/24/2017 - 18:21 नवीन
अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात. हि पोस्त अपर्णाताई ह्यांची नाही पण सिमिलर मुद्दे होते ...पुढे ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

मुलीच्या आईवडिलांचा वावर हा

arunjoshi123
Mon, 07/24/2017 - 17:51 नवीन
मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)
१. तुम्हाला एक फंडामेंटली रॅडिकल कुटूंबव्यवस्था सुचवायची आहे का? मंजे काय, कि मुलगी मुलाच्या घरी जाते, आणि ते घर आणि तिथली सगळी व्यवस्था तिथल्या अगोदरपासून असलेल्या लोकांच्या मालकिची असते. आता इथे तिथे रेसीडेंट नसलेल्या सुनेच्या आईबापांना देखिल निर्णयन अधिकार दिले, आणि ते इतरांच्या पसंदीच्या विरुद्ध निघाले तर काय मेकॅनिझम? २. ती मुलगी सासरी जाण्यासच प्रचंड अल्टनेटिव्ज आपण बनवू शकतो. म्हणजे खूप तितक्या समाज व्यवस्था बनवू शकतो. तुम्हाला "ह्यूमॅनिटि पुढे चालू ठेऊ देणे" याबद्दल आपणांस आस्था आहे असे समजून (वा अदरवाईज) नक्की कशी समाजव्यवस्था सुचवायची आहे? न्यूक्लिअर फॅमिली पैकी एक. लिव इन दुसरं. पण असेट ओनरशिप अजून पॅट्रीयार्किकल आहे, म्हणून वावर मुलाच्या बाजूचाच जास्त असू शकतो.
  • Log in or register to post comments

समाज म्हणून आपण तसे बरेच

arunjoshi123
Mon, 07/24/2017 - 18:14 नवीन
समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
आपण समाज म्हणून अत्यंत परिपक्व होतो, आता हळूहळू आपण परिपक्वता म्हणून अपरिपक्वता स्वीकारत आहोत. हे स्वतःस आधुनिक आणि पुरोगामी समजणार्‍या लोकांच्या बाबतीत होत आहे. समाजात कौटुंबिक अन्याय आणि कौटुंबिक कलह यांचा एक समतोल असावा. कौटुंबिक अन्यायाला फुगवून फुगवून सांगून आपण फार मोठा बागलबूवा निर्माण केला आहे. याला नियंत्रित ठेवण्यासाठी आपण समाजव्यवस्थेचे नियम इतके जास्त बदलले कि सार्वत्रिक कौटुंबिक कलहाचा अजून मोठा राक्षस उभा राहिला आहे. आपण या सुधारांतून कमावलं जास्त का गमावलं जास्त याची प्रामाणिक चिकित्सा करावी. अपर्णाताईंची भाषणं अभ्यासू, तार्किक, चिंतक, विदाधारी, शास्त्रीय इ इ नसली तरी भावनिक, अनुभवातून आलेली, सधेतूप्रेरित, आणि कदाचित मानसशास्त्रीयरित्या उपयुक्त असू शकतात. आणि "भाषण" म्हणून त्यांचा दर्जा आहेच आहे, इंटेरेस्टींग आहे. तुम्ही या सगळ्यापलिकडचे असाल तर भरपूर टीपी आहे.
  • Log in or register to post comments

बरीच चर्चा झाली की! म्हणजे

पिलीयन रायडर
Mon, 07/24/2017 - 18:25 नवीन
बरीच चर्चा झाली की! म्हणजे अरुण जोशींचा मोनोलॉग वगळला तरीही बरीच चर्चा शिल्लक राहतेय वाचायला. अच्छा है!
  • Log in or register to post comments

अरुण जोशींचा मोनोलॉग वगळला

arunjoshi123
Mon, 07/24/2017 - 18:32 नवीन
अरुण जोशींचा मोनोलॉग वगळला
अशी फ्रेज वापरण्याचा बदला लवकरच पिरांशी डायलॉग करून घेण्यात येईल. हा हा हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मोनोलॉगच असू द्या. कारण तसेही

सतिश गावडे
Tue, 07/25/2017 - 10:11 नवीन
मोनोलॉगच असू द्या. कारण तसेही पुरुषांचा मोनोलॉग असे काही नाही सध्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

बादवे,

पिलीयन रायडर
Mon, 07/24/2017 - 19:52 नवीन
बादवे, "भाकरी बडवण्याबद्दलचे" ते सुप्रसिद्ध विधान इथुन पहा - https://youtu.be/_k51WrMVYps?t=1263 त्या चक्क असं म्हणताएत की "अंतराळात जा वा पाताळात, मुलींना स्वयंपाक आलाच पाहिजे. आजकाल शिकलेल्या मुलींना स्वयंपाक येत नाही. मी तर मुलांना सांगतेय, शिकलेली मुलगी घरात आणायची असेल तर पार्सल आणायची तयारी ठेव नाही तर स्वयंपाक शिकुन घे, पर्याय नाही. आज काल पुण्यात स्वयंपाक करतच नाहीत. मी एका ठिकाणी श्राद्धाला गेले होते तर तिथे केटररकडुन स्वयंपाक येणार होता. ह्यांचे पितर केटररच्या हातचं खाऊन मुक्त होणारेत. सुनांना वेळ नाही. आता मी हे भाषण संपवुन घरी गेले आणि हे म्हणाले की जरा काही तरी करुन दे तर पदर खोचुन उभं रहावंच लागतं. असं नाही म्हणतात येत की साप्ताहिक जनहिंदोळा मध्ये उद्या फोटो येणारे. आता भाकरी बिकरी काही करणार नाही. चालत नाही. नवर्‍यासमोर वकिली चालत नाही. हे पक्कं लक्षात ठेवा. काहीच चालत नाही नवर्‍या समोर." आणि हे बोलताना शिकलेल्या मुली, पुणे आणि केटरर ह्यांच्याबद्दल बोलताना जो टोन आहे ना, माशाल्ला!! खरोखर लोकांना "भाकरी बडवणे" म्हणजे कुटूम्बातला आपला सहभाग विसरु नको वगैरे सल्ले त्या देत आहेत असे वाटतेय?!! =)) त्या ठोक म्हणत आहेत "नवर्‍या समोर चालत नाही" आणि तुम्ही लोक गर्भितार्थ काढताय!
  • Log in or register to post comments

एक प्रश्न आला मनात

सामान्य वाचक
Mon, 07/24/2017 - 20:07 नवीन
सुपुत्र रामतीर्थकर काय करतात विवाहित आहेत का किंवा कसे का धसक्यानी त्यांनी लग्न केले नाही वगैरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मला एक कळत नाही की जर पार्सलच

नगरीनिरंजन
Mon, 07/24/2017 - 20:10 नवीन
मला एक कळत नाही की जर पार्सलच आणायचं असेल किंवा स्वत: स्वयंपाक करायचा असेल आणि शिवाय मुलीपेक्षा जास्त कमाई करायचंही बंधन असेल तर मुलांना लग्नाचा फायदा नक्की काय? फक्त शरीरसुखासाठी? तेही हक्काचं नाही. स्त्रिया पुरुषांना जे स्थैर्य आणि कम्फर्ट देऊ शकतात त्यासाठी पुरुष लग्न करतात. लग्न करायचं असतं म्हणून नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ओके. आणि त्याबदल्यात

पिलीयन रायडर
Mon, 07/24/2017 - 20:13 नवीन
ओके. आणि त्याबदल्यात स्त्रियांना ते काय देतात? किंवा स्त्रिया काय मिळवायला लग्न करतात? (जस्ट उत्सुकता!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

काही देत नसतील तर स्त्रिया का

नगरीनिरंजन
Mon, 07/24/2017 - 20:18 नवीन
काही देत नसतील तर स्त्रिया का करतात लग्न? एवढंच जर असेल तर अविवाहित स्त्रियांची संख्या वाढायला हवी होती. उलट चांगला मुलगा पाहून लग्न करणे हेच जीवनध्येय असल्यासारख्या बहुसंख्य मुली वागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मी कुठे म्हणलं की काहीच देत

पिलीयन रायडर
Mon, 07/24/2017 - 20:37 नवीन
मी कुठे म्हणलं की काहीच देत नाहीत? मी तर तुम्हालाच विचारतेय की कशासाठी स्त्रिया लग्न करत असतील? म्हणजे स्थैर्य आणि कम्फर्ट तर स्त्रीयाच देताएत, पैसा आता स्त्रियाही कमावतात, शरीरसुखासाठी लग्न करायची गरज कुणालाच नसते. म्हणजे फक्त मुल का? तर एका मुलापायी जन्मभर पुरुषाला स्थर्य द्यायचे? काय गरज? स्पर्म बँकेतुन स्पर्म घेऊन मुल पैदा करता येईलच. मी सिन्सिअरली विचारतेय. स्त्रियांना पुरुषांकडुन काय मिळतं?
उलट चांगला मुलगा पाहून लग्न करणे हेच जीवनध्येय असल्यासारख्या बहुसंख्य मुली वागतात.
सोशल कंडिशनिंग. लग्न आणि मुल इतिकर्तव्यता असते असे मानणे, समाजाने कानीकपाळी ओरडुन सांगणे, त्यापायी पालकांनीच तसे प्रेशर आणणे, १४ व्या वर्षीच लग्न लावणे, शिक्षण थांबवुन लग्न करणे. इ इ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

पिरातै, बस आता

सामान्य वाचक
Mon, 07/24/2017 - 21:38 नवीन
भाकऱ्या थापायचे बघा जरा. अमिरिकेत गेलात म्हणून काय झाले, संस्कृतीची काही चाड आहे कि नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अमिरिकेत गेलात म्हणून

arunjoshi123
Tue, 07/25/2017 - 00:32 नवीन
अमिरिकेत गेलात म्हणून
हे काय असतं? अमेरिकेत गेलं म्हणून मेंदूतले न्यूरॉन्स वाढतात कि काय? संस्कृतीची चाड वा अक्कल येते? फार तर फार तिथे जाऊन भारताबद्दल गंड उत्पन्न होतो असं मॅक्सिमम केसेसमधे होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

तुम्ही नेहमीप्रमाणे कात्रजच्या घाटात बैल सोडले.

सामान्य वाचक
Tue, 07/25/2017 - 09:21 नवीन
माझे म्हणणे होते कि, अमेरिकेत गेलात तर आपली संस्कृती विसरू नका. भाकऱ्या बडवणे विसरू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

तुम्ही नेहमीप्रमाणे

विशुमित
Tue, 07/25/2017 - 10:37 नवीन
तुम्ही नेहमीप्रमाणे कात्रजच्या घाटात बैल सोडले. ==> हाहा पु वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

परत यायचं असलं तर विसरू नका.

arunjoshi123
Tue, 07/25/2017 - 11:45 नवीन
परत यायचं असलं तर विसरू नका. यायचं नसलं शक्य तितक्या लवकर विसरा. ===========================================================
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

हा प्रतिसाद समजला नाही.

रेवती
Tue, 07/25/2017 - 00:53 नवीन
हा प्रतिसाद समजला नाही. तुम्हीच नव्हे पण हा प्रतिसाद कोणाकडूनही आला तरी भाकरी थापायची की नाही हे जी ती व्यक्ती ठरवते. घराबाहेरील कोणीही सांगितल्यास का ऐकावे? अमेरिकेत जाण्याचे विशेष काय होते? हां, भाकरीचे चांगले पीठ मिळत नाही. भारतात ते चांगले मिळते पण भारतातल्या मुलींनाच तर अपर्णाबाई सांगतायत की भाकरी गोल थापायला आली पाहिजे. संस्कृतीची चाड म्हणजे काय? ती असणे म्हणजे काय? माझा बेसिकातच घोळ आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

सा.वा.नी तो प्रतिसाद बहुतेक

रुपी
Tue, 07/25/2017 - 02:32 नवीन
सा.वा.नी तो प्रतिसाद बहुतेक उपरोधाने लिहिलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अरेच्च्या! मला खरच समजले

रेवती
Tue, 07/25/2017 - 02:42 नवीन
अरेच्च्या! मला खरच समजले नव्हते. चला आता मी तुम्हाला भाकरी व भरल्या वांग्याची भाजी पार्सलाने पाठवते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

मस्तच :)

रुपी
Tue, 07/25/2017 - 03:36 नवीन
मस्तच :) आत्ता पाठवल्या तर छानच, पण मी चंद्रावर गेल्यावर मात्र माझ्या घरच्यांसाठी नक्की पाठवा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अरे, पाठवू की! पौर्णिमेच्या

रेवती
Tue, 07/25/2017 - 03:54 नवीन
अरे, पाठवू की! पौर्णिमेच्या चंद्रासारख्या गोल भाकरी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

म्हन्जे?

कोंबडी प्रेमी
Tue, 07/25/2017 - 09:38 नवीन
भाकरी पौर्णिमेच्या चंद्रा सारखी ह्यात बरेच फाटे फोडता येतील/जाऊ शकतील/जातील (मग आम्ही च फाटे का फोडू नयेत :-D) -हि पौर्णिमा कोण आणि चंद्रा तिची कोण सून मुलगी कि अजून कुणी ? -अष्टमीच्या चंद्रा सारखी भाकरी का नाही ? -अमेरिकेत चंद्र दिसतो का ? का नुसतेच ढग असतात ... -भाकरी त्रिकोणी असते का? आणि तशी ती केली तर संस्कृती जतन होईल कि नष्ट ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अर्रर्रर्र काय हे

सामान्य वाचक
Tue, 07/25/2017 - 09:19 नवीन
आता खरंच पार्सल पाठव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

स्पर्म बँकेतुन स्पर्म घेऊन

arunjoshi123
Tue, 07/25/2017 - 00:36 नवीन
स्पर्म बँकेतुन स्पर्म घेऊन मुल पैदा करता येईलच.
जाज्वल्य स्त्रीवादाचा हा देखिल घोर अपमान आहे. स्टेम सेल रिसर्च आता कोणत्याही पेशी पासून कोणतीही पेशी बनवायच्या फार जवळ आहे. तेव्हा स्पर्म बँक इ इ घोर पुरुषप्रधानतावादी कंसेप्ट कशाला हवेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तर एका मुलापायी जन्मभर

arunjoshi123
Tue, 07/25/2017 - 00:41 नवीन
तर एका मुलापायी जन्मभर पुरुषाला स्थर्य द्यायचे?
बरोबर आहे. ही वीर्य फॉर स्थैर्य डिल एकदम अनफेअर आहे. सिंगल माता हिच खरी माता. किंबहुना, मुलांना जन्म देऊन ही मानवजात पुढे चालू ठेवायचीच कशाला हाच मूलभूत प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हाहाहा!

शब्दबम्बाळ
Tue, 07/25/2017 - 23:06 नवीन
भारी डायलॉग! वीर्य फॉर स्थैर्य! :P भारी चाललीये चर्चा... लय कंफ्यूस व्हायला होतंय आत पण... च्यामारी मी लग्न का केलं हा प्रश्न इतका अवघड असेल वाटलं नव्हतं! बायकोला विचारला तर मला ताप बीप आलाय का बघेल! :D लग्न करण्याला ते मुलगी/मुलगा एकमेकांना आवडणे वगैरे बंद झालं का सध्या? आता आवडणे म्हणजे नक्की काय हे पण लय अवघडे राव! ते डोपामाईन वगैरे बाद झालं ना यातून... मग नक्की काय, आवडणे = डोपामाईन + संपत्ती + जबाबदारपणा + कुटुंब + शिक्षण..... इ.इ. असे काही असेल का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

मी स्त्री नसल्याने

नगरीनिरंजन
Tue, 07/25/2017 - 08:08 नवीन
मी स्त्री नसल्याने स्त्रियांना लग्नातून काय मिळतं ते मी सांगू शकत नाही. ते खरं तर तुम्ही सांगायला हवं. बाकी स्त्रियाही पैसे कमवतात, पुरुषांची गरज काय इत्यादी मुद्दे गैरलागू आहेत. पुरुषांनी निर्माण केलेल्या इंडस्ट्रीयल इकॉनॉमीला गृहीत धरुन अशी विधाने करणे सध्या खूप सोपे असल्याने त्याचा प्रतिवाद करण्यात हशील नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

बहुतांश स्त्रिया

सुबोध खरे
Tue, 07/25/2017 - 10:01 नवीन
बहुतांश स्त्रिया चरितार्थासाठी लग्न करतात-- र धों कर्वे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

खिक् :D

एमी
Wed, 07/26/2017 - 03:46 नवीन
खिक् :D भाकर्या बडवणे या cheap labour मधूनदेखील उच्च/मध्यमवर्गीय आयुष्य मिळवण्याचा समाजमान्य मार्ग याखेरीज इतर कोणताच नसेल :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

लग्नं फक्त खालच्या सामाजिक

arunjoshi123
Wed, 07/26/2017 - 12:38 नवीन
लग्नं फक्त खालच्या सामाजिक स्तरातून वरच्या सामाजिक स्तरात होतात ही नविन माहीती मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

"अंतराळात जा वा पाताळात,

सूड
Wed, 07/26/2017 - 12:28 नवीन
"अंतराळात जा वा पाताळात, मुलींना स्वयंपाक आलाच पाहिजे. आजकाल शिकलेल्या मुलींना स्वयंपाक येत नाही. मी तर मुलांना सांगतेय, शिकलेली मुलगी घरात आणायची असेल तर पार्सल आणायची तयारी ठेव नाही तर स्वयंपाक शिकुन घे, पर्याय नाही. आज काल पुण्यात स्वयंपाक करतच नाहीत. मी एका ठिकाणी श्राद्धाला गेले होते तर तिथे केटररकडुन स्वयंपाक येणार होता. ह्यांचे पितर केटररच्या हातचं खाऊन मुक्त होणारेत. सुनांना वेळ नाही. आता मी हे भाषण संपवुन घरी गेले आणि हे म्हणाले की जरा काही तरी करुन दे तर पदर खोचुन उभं रहावंच लागतं. असं नाही म्हणतात येत की साप्ताहिक जनहिंदोळा मध्ये उद्या फोटो येणारे. आता भाकरी बिकरी काही करणार नाही. चालत नाही. नवर्‍यासमोर वकिली चालत नाही. हे पक्कं लक्षात ठेवा. काहीच चालत नाही नवर्‍या समोर."
१) त्यांनी केलेली विधानं आणि "भाकर्‍या बडवणे" ही तुम्ही वापरलेली फ्रेज यात जमीनअस्मानाचा फरक आहे. त्या किमान स्वयंपाक आला पाहिजे म्हणत असतील तर त्यात वावगं काय आहे? त्याला भाकर्‍या बडवणे म्हणून ते फार काही खालच्या दर्जाचं काम असल्यासारखा उल्लेख करु नये. आमच्या घरात एकजात सगळे स्वयंपाक करतात (बाया-बाप्ये सगळे). अशा वेळी येणार्‍या मुलीला किमान वरण भात भाजी पोळी करता यावी अशी अपेक्षा असली तर त्यात चूक काय आहे असं मला वाटत नाही. येत नसेल तर किमान शिकायची तयारी तरी असावी. आम्ही संक्रांतीला गूळपोळ्या नेल्या की "ओह माय ग्गॉड कित्ती पेशन्स" अशा कमेंट ऐकल्या की त्या मुली आणि त्यांच्या माऊल्यांना दंडवत घालावासा वाटतो. तुम्ही शिक्षणाचं म्हणत असाल तर नऊ वर्षाचा असताना मी वरणभाताचा कूकर लावत होतो. ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपले जवळपास सगळे पारंपारिक पदार्थ (मला आणि माझ्या भावालाही) एकाहाती जमत होते. ऑफिसचं कवतिक सांगायचं घरी नवरात्रात नवमीला आमच्याकडे पुरणपोळ्यांचा नैवेद्य असतो. कित्येकदा सकाळी साडेपाचला उठून पुरणपोळ्या करुन त्या हापिसात पण नेलेल्या आहेत. २) काहीच चालत नाही नवर्‍या समोर. त्यांचं त्यांच्या नवर्‍यासमोर काही चालत नसेल तर आपण त्रागा करण्यात काय अर्थ आहे. ३) त्यांचं मुलींनी काय घालावं काय घालू नये याबद्दलचं विधान मला खटकलं होतं. पण मुली मुलांबद्दल विधानं करत असतील तर चालेल का? "ए तू आळस देऊ नकोस, हात वर केलेस की टीशर्ट वर सरकतं आणि पोट वैगरे दिसतं. त्यात तुम्ही लोक कधी लो वेस्ट जीन्स घालता" हे एका मुलीने मला तोंडावर सांगितलेलं आहे. आता हेच मी जर एखाद्या मुलीला सांगितलं तर केवढा गहजब होईल? तात्पर्य: एकांगी विचार नको. आणि स्वयंपाकाचं म्हणाल तर आपल्या पोटाला लागतं ते करुन खाता येण्यात कमतरता वाटून घेण्यासारखं काही नाहीये. त्या बाई तशाही एरवीच धन्यवाद आहेत. पण भाकर्‍या बडवणं भाकर्‍या बडवणं केव्हापासून चाललंय म्हणून बोललो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

त्यांचं मुलींनी काय घालावं

arunjoshi123
Wed, 07/26/2017 - 12:56 नवीन
त्यांचं मुलींनी काय घालावं काय घालू नये याबद्दलचं विधान मला खटकलं होतं.
मुलींचे, बायकांचे कपडे ( मेकपचा आकर्षकपणा, स्किनचा ओपन सरफेस, प्रॉक्सिमिटि ऑफ ओपन सरफेसेस टू प्रायवेट ऑर सेक्श्यूअल पार्ट्स, टाईटनेस रिविलिंग प्रोफाईल) आणि पुरुषांत्यांच्याबद्दलचे प्रेमजनक आकर्षण, शारिरिक आकर्षण, सेक्स्यूअल अरावजल, नजर खुल्या भागांकडे खुलेपणे वा चोरून नेण्याची प्रवृत्ती, आणि (माझ्या स्वतःच्या मतांप्रमाणे इथून पुढे गुन्हेगारी अशा) उपभोगासाठी फसवेगिरि करण्याच्या प्रवृत्ती वा जबरदस्ती करण्याच्या प्रवृत्ती यांचा संबंधच नाही हा अत्यंतिक मूर्खपणाचा कांगावा आहे. द रिअ‍ॅक्शन इज इजडायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सपोजर. मोअर सो फॉर द पिपल हू हॅव फस्ट टाईम एक्सपोजर टू एक्सपोजर्स इन अ कंट्रि लाईक इंडिया. नामिबियात आदिवास्यांत हा नियम लागू पडत नाही. इथे भारतात पडतो. तर ट्रांझिशन करायचं असेल तर सावकाश, दमानं, धीरानं, स्मॉल डोसेजमधे करा. ================= कपड्यांच्या बाबतीत अत्यंत प्रतिगामी राहणं ही योग्य आहे आणि संपूर्ण नागडं राहणं ही योग्य आहे. त्यातल्या "कमी कंजर्वेटिव ते कमी लिबरल" अशा ट्रांझिशनमधून भारतीय समाज जात आहे. तेव्हा प्रतिक्रिया अकोमोडेटिव आणि सुधारितच येतील असं नाही, अयोग्य असल्या तरी. हे सामाजिक स्थित्यंतरण आहे कोणता इंद्रियनियमनाचा अध्यात्मिक प्रयोग नाही आपल्या अपेक्षा काहिच्या काही असायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तर ट्रांझिशन करायचं असेल तर

अप्पा जोगळेकर
Wed, 07/26/2017 - 13:22 नवीन
तर ट्रांझिशन करायचं असेल तर सावकाश, दमानं, धीरानं, स्मॉल डोसेजमधे करा. जोशी सर तुम्ही या धाग्यावर खूप बोअर करताय. ते 'रैना' सारखे लिहा काहीतरी पुन्हा. तुमच्या लिखाणाच्या क्षमता कशाला वाया घालवताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

हा धागा पुढील प्रतिसादांसाठि

arunjoshi123
Wed, 07/26/2017 - 14:12 नवीन
हा धागा पुढील प्रतिसादांसाठि बंद करण्यात यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

काब्रे ??

अत्रन्गि पाउस
Wed, 07/26/2017 - 14:21 नवीन
फारच चिडलेले दिसताय मी पाहतोय कि तुम्ही प्रत्येक प्रतिसादकर्त्याला उत्तर देताय आणि तुमच्या चिकाटीचे लोकांनी कौतुक सुद्धा केले आहे. एका प्रतिसादात तुम्हाला नं पटणारे सत्य आले तर लगेच धागा बंद ? तुमचे मुद्दे संपले असतील तर तुम्ही थांबा कि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

मी कशाला चिडू? अहो, हे अप्पा

arunjoshi123
Wed, 07/26/2017 - 15:03 नवीन
मी कशाला चिडू? अहो, हे अप्पा जोगळेकर इथले संपादक (का तसले काय तरी) आहेत असं माझं इंप्रेशन आहे. मी कोण टिकोजीराव धागा बंद का चालू ठेवावा ते सांगणारा? पण मागे काही प्रतिसादासाठी बंद धागे पाहिलेत. त्यांना बोर झालं म्हणून उपाय सांगितला. ================ मला एक सांगा चिडलेला माणूस सतत इतका वेळ चीडलेला राहू शकतो का? =========================== शिवाय मी कोणत्याही कौतुकाची दखल घेतलेली नाही. प्रश्न माझ्या लैखनकौशल्याचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

तर ट्रांझिशन करायचं असेल तर

हतोळकरांचा प्रसाद
Wed, 07/26/2017 - 14:40 नवीन
तर ट्रांझिशन करायचं असेल तर सावकाश, दमानं, धीरानं, स्मॉल डोसेजमधे करा.
या वाक्यासाठी - +१०००००. मला नेमका हेच खटकतं कि प्रत्येक पुरोगामी सुधारणवाद्याला प्रत्येक सुधारणा हि दुसऱ्या दिवशीपासूनच झाली पाहिजे असे का वाटत असते कोण जाणे? खासकरून धर्म, संस्कृती, समाज याबाबतीतील सुधारणांच्या बाबतीत तर हा अट्टाहास टोकाला पोहोचल्याचे जाणवते. सद्यपरिस्थितीत समाजामध्ये एक जुन्या संकेतांनुसार घडलेली आणि आता सहजासहजी मते बदलू न शकणारी (आपली माणसे असणारी) पिढी आहे, दुसरी आपल्यासारखी मुद्दे समजून मग मते बनवणारी आणि सुधारणांसाठी स्वतःला तयार ठेवणारी पिढी आहे आणि तिसरी आपली पुढची पिढी आहे ज्याला आपल्याला घडवायचे आहे. ह्या सुधारणा आपल्या पुढच्या पुढील लागू करताना आपल्याला अडचण येईल असे वाटते काय? पण आपल्या आधीच्या पिढीचीही जीवन जगण्याची काही पद्धत आहे आणि आपण त्यांचा त्यांच्या पद्धतीने जगण्याचा हक्क त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हिरावून घेतो आहोत याचा विचार करून सध्याची दुसरी पिढी आधीची पिढी होईपर्यंत तरी जरा सबूरीनेच घ्यायला हवे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

कल आज और कल

अत्रन्गि पाउस
Wed, 07/26/2017 - 15:09 नवीन
ह्यातील राज कपूर चा हतबल बाप आठवला .... वा बुवा सुंदर प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा