Skip to main content

adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

लेखक कोंबडी प्रेमी यांनी शुक्रवार, 21/07/2017 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU हि एक लिंक पाहिली. ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ?? एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ?? “मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर” अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात. मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा” मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ? मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे) तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल .... समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..

वाचने 144225
प्रतिक्रिया 445

प्रतिक्रिया

In reply to by arunjoshi123

बाईंनी स्वयंपाकात मदत करणार्‍या नवर्‍यांचं कौतुक केलं आहे. पण अशी अपेक्षा प्रत्येकाकडून ठेऊ नका असं म्हटलं आहे.
लोल, मग प्रत्येक बायकोने स्वयंपाक केलाच पाहिजे हा आग्रह का? अपेक्षा नसतीलच ठेवायच्या तर दोघांनिही नका ठेवू ना..

पिराताई,
मी सिन्सिअरली विचारतेय. स्त्रियांना पुरुषांकडुन काय मिळतं?
मला खरंच माहीत नाही. पण स्त्रियांच्या अपत्यांना एक बाप नक्कीच मिळतो. किंवा मिळावा अशी अपेक्षा तरी असते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्त्रियांच्या अपत्यांना एक बाप नक्कीच मिळतो.
पण पुरुषांच्या सर्व अपत्यांना तो मिळतो का (बाप) ?

In reply to by सस्नेह

स्नेहांकिता, तुमचा प्रश्न योग्य आहे. मात्र पिराताईंनी विचारलेला प्रश्न स्त्रियांना काय मिळतं हा होता. त्यामुळे माझं उत्तर स्त्रीपुरुषांच्या अपत्यांना बाप मिळतो असं असलं तरी पिराताईंचा संदर्भ ठळक करण्यासाठी केवळ स्त्रियांचा उल्लेख केला आहे. आ.न., -गा.पै.

अजोंच्या मुद्दा लढवण्याच्या आणि पिराताईंच्या संयत आणि मुद्देसूद प्रतिसाद करण्याच्या कौशल्याला सलाम. बाकी, बाई मुलगी बाहेर कितीही यशस्वी करियर करत असेल तरीही घरकाम, देवधर्म साग्रसंगीत केलंच पाहिजे असे जे आग्रहाने सांगतात ते ऐकणार्‍या(त्यांचेच असे नव्हे अश्या प्रकारे 'संस्कार' करणार्‍या कोणाचेही) मुली सुपरवूमन बनण्याच्या नादात प्रकृतीची वाट लावून घेतात असे वाटते. बाईंचे म्हणणे पटत आजिबात नाही आणि नवरा बायकोने एकमेकाशी, त्यांच्या कुटुंबांशी कसे वागायचे हे ठरवण्यात समाजाचा घंटा स्टेक नाही असे वाटते, ते त्यांनीच आपापसात सुसंवादातून ठरवावे असे माझे मत आहे. बाईंचं भाषण ऐकूण लोक लगेच बायकांना घरकामाला जुंपतील असे नाही. तेव्हा त्यांना पुरुषांच्या बाजूने लढा द्यायचा आहे तर देऊ द्या, ज्यांना त्यांचे पटत नाही त्यांनी विरोधी बाजू लढवावी. विनोदबुद्धी मात्र भारी आहे बाईंना.

In reply to by पुंबा

""""नवरा बायकोने एकमेकाशी, त्यांच्या कुटुंबांशी कसे वागायचे हे ठरवण्यात समाजाचा घंटा स्टेक नाही असे वाटते, ते त्यांनीच आपापसात सुसंवादातून ठरवावे असे माझे मत आहे.""" ==>> विशेष आवडलं. घरामधील वाद वाढायला त्रयस्थ लोकांचा जास्त हात असतो असे माझे मत आहे. माझेच उदा घायचे तर : मी जन्मापासून माळकरी माणूस. माझी बायको लग्नाआधी एक सोमवार सोडला तर एकादशीलासुद्धा मांसाहार करणारी, पण लग्नानंतर बाहेरच्या लोकांनीच तिच्यावर माळ घालण्यासाठी दबाव आणला. मग आमच्या घरचे पण हुरळले. हा प्रश्न आम्ही दोघांनीच चर्चेने सोडवला. म्हातारी करत होती कुरकुर काही दिवस.बायकोच्या ऐकण्यात गेला वगैरे. मी तिला म्हंटलं लहानपणा पासून बघतोय म्हतारच तुला अंघोळीला पाणी विसणून देतंय. मग गप्प बसली. विषयच बंद ..!!

In reply to by पुंबा

नवरा बायकोने एकमेकाशी, त्यांच्या कुटुंबांशी कसे वागायचे हे ठरवण्यात समाजाचा घंटा स्टेक नाही असे वाटते, ते त्यांनीच आपापसात सुसंवादातून ठरवावे असे माझे मत आहे.
लेट मी रिफ्रेजः गुन्हेगार नि व्हिक्टिम्सनी, त्यांच्या संपत्तीच्या स्टेकहोल्डर्सशी कसे वागायचे हे ठरवण्यात समाजाचा घंटा स्टेक नाही असे वाटते, ते त्यांनीच आपापसात सुसंवादातून ठरवावे असे माझे मत आहे. न्यायपालिका गेली उडत. कायदे गेले उडत. समाज गेला उडत. ==================================== आता थोडं यावरच पुढे - कोणत्याही नात्यातली काही मूळ तत्त्वे समाजातून उचलायची असतात आणि मग त्याचं थोडं थोडं स्वतःच्या चवीप्रमाणे कस्टमायझेशन करायचं असतं. कोणासोबत कसे वागायचे याला बेंचमार्क हवाच. अर्थात हे बेंचमार्क हळूहळू सुधारायचे सध्याला वाईट असले तर. मनुष्यास कोणाशी कसे वागावे याची मूलभूत अक्कल असती तर शाळेत सतत संस्कार करावे लागले नसते. आयुष्यभर सतत लोकांशी कसं वागावं हे शिकावं लागलं नसतं. स्वतःच्या किंवा समाजाच्या एकूण व्यवस्थितिसाठी कसं वागायचं हे शून्यातून ठरवणं हे सामान्यांचं विसरा, अगदी तत्त्ववेत्त्यांना कठीण आहे. आणि असे काही वर्कींग रुल्स बनवायची अक्कल असली तरी बुद्ध्या स्वार्थापोटी बरेच असे चांगले प्रोटोकॉल पाळले जाणार नाहीत. आता हे पहा - "वडिलधार्‍यांशी बाय डिफॉल्ट आदराने वागावे. त्यांचे वर्तन कडक असेल तर अ‍ॅडजस्ट करून घ्यावे" आणि "वडिलधार्‍यांना विशेष वागणूक देऊ नये. त्यांची लायकी असेल तर सन्मान कमवतील." समाज हा मूलतः आणि बहुधा क्रिमिनल नसतो असं मानून चलायचं असेल तर दोन पैकि काय सामाजिक प्रथा असायला हवी? ज्या गोष्टिंना कायद्याचं फ्रेमवर्क नाही त्या गोष्टींना फ्रेमवर्कचीच आवश्यकता नाही हे म्हणणं फार विचित्र आहे हो. अशी फ्रेमवर्क काढून घेतल्याने संसार हे संघर्षपूर्ण झाले आहेत, आपण भांडू नये हे कळेपर्यंत (नशिबाने कधी कळल्यास) कितितरी वर्षे वाया जातात. लहानपणी "बायकोवर हात उचलणाराचे" नाव १-२ महिने गावात गाजत असे. त्या माणसाने पुन्हा तसे केले तर सरळ शेजारी जाउन त्यालाचा ठोकत असे. स्त्रीयांवर हात उचलू नये ही प्रथा. आता शहरात लोकांच्या व्यक्तिगत आयुस्यात ढवळाढवळ करू नये हा संकेत इतका प्रबल झाला आहे कि सामाजिक सुरक्षा नावाचा प्रकार उरलेलाच नाही. मग कोणत्या फ्लॅटमधून काय आवाज येतोय आणि कोणाचा चेहरा किती मूलूल दिसतोय याचेशी आपल्याला देणं घेणं उरलेलं नाही. समाजाचा जो काही आय क्यू आहे, अशिक्षण आहे त्याप्रमाणे समाज पुढारलेल्या लोकांना बरेच मूर्खपणे करणे अपेक्षा करतो. त्या मूर्खपणांत सहभागी नाही झालं तर चिडचिड करतो, मात्र समाजाचं ओरियंटेशनच लोकांना डिस्टर्ब करणे आणि त्यांच्यावर अन्याय करणे असं असतं ही धारणा चूक आहे. सबब सामाजिक अपेक्षा प्रत्येकाच्या जीवनाच्या अभिन्न हिस्सा असायला हव्या.
बाई मुलगी बाहेर कितीही यशस्वी करियर करत असेल तरीही घरकाम, देवधर्म साग्रसंगीत केलंच पाहिजे असे जे आग्रहाने सांगतात ते ऐकणार्‍या(त्यांचेच असे नव्हे अश्या प्रकारे 'संस्कार' करणार्‍या कोणाचेही) मुली सुपरवूमन बनण्याच्या नादात प्रकृतीची वाट लावून घेतात असे वाटते.
समजा कोण्या मुलीची क्षमता सुपरवुमन होण्याची नसेल तर १. बाईंने प्राधान्य दिलेल्या गोष्टी २. स्त्रीमुक्ती गोष्टि पैकी काय प्राधान्य असावं? का? (बाई सुपरवुमन आहेत, त्या तसं म्हणत नाहीत, पण आपण म्हणता तसा प्रभाव मुलींवर त्या निश्चित पाडणार. आणि ते अनिष्ट आहे.)
विनोदबुद्धी मात्र भारी आहे बाईंना.
बघा ना, तेवढं तरी चांगलं बोलायचं बिचारीबद्दल.

In reply to by कोंबडी प्रेमी

काय पण शब्द टाकाहो,, हाव डज दॅट मॅटर? तंटा असला पाहिजे. कोंबडी प्रेमी आणि कोंबडी सेवन प्रेमी असे शब्द टाका. माझं काय जातंय? खाली आहेच उदाहरण माळेचं.

या धाग्याच्या निमित्ताने बरेच दिवस घरी पडून असलेले मंगला सामंत लिखित "स्त्री पर्व" वाचायला सुरुवात केली आहे. asdf मातृसत्ताक ते पुरुषप्रधान पद्धती हा मानवजातीचा प्रवास रोचक आहे.

In reply to by विशुमित

ज्यांच्यासमोर डोके बडवून घ्यायची पाळी आहे त्यांच्यासमोर फक्त किबोर्ड बडवला आहे. ============================= आपला नवरा सामंजस्याने सगळे प्रश्न, मतभेद मिटवतो म्हणजे जगात सर्वच ठीकाणी ते संभव आहे असा आत्मविश्वास. आपण नवर्‍याला काही इजा केली नाही म्हणजे असा कोणता प्रॉब्लेमच नसतो असा आत्मविश्वास. पडते घेणे (जे देश सुद्धा करतात, कंपन्या करतात) असं काही नसतंच, समता नाहीतर काडिमोड हा अप्रोच हाच खरा अप्रोच. आणि हो, पिढ्यान पिढ्यांचं शोषण ... त्याचा राग आत्ता...उत्तम पिता, भ्राता, पति, मूल असताना...

एका भाषणाच्या वेळी एका महिलेने त्यांना तुम्ही भाषणे देत गावभर हिन्डत असताना तुमच्या घरी कोण भाकर्‍या बडवता ? असा प्रश्न विचारल्यावर बाई जाम पिसाळली होती.

In reply to by कपिलमुनी

तिच्यापेक्षा क्रॅक स्त्रीवादी स्त्रीया आहेत. पण असो. हे एक रत्न http://indiatoday.intoday.in/story/anyone-who-denies-being-a-feminist-i… हे अजून एक रत्न http://www.india.com/news/india/men-do-not-commit-suicide-never-heard-a…

In reply to by कपिलमुनी

तुम्ही भाषणे देत गावभर हिन्डत असताना तुमच्या घरी कोण भाकर्‍या बडवता ?
लोल! एक नंबर! कोणत्या व्हिड्योत आहे?

In reply to by आदूबाळ

व्हिड्योत असो किंवा नसो पण लॉजिकली पाहिले तर लगातार ४५८ दिवस फिरणाऱ्या आईंच्या घरी भाकरी कोण बडवत असतील ?

In reply to by कपिलमुनी

हायला खरंच की हे बाईंच्या घरातील "भाकरी बडवायचे" डोक्यातच नाही आले. बाईंची (आईंची) भाषण देण्याची फी किती असते कोणाला माहित आहे का?

In reply to by विशुमित

बाईंची (आईंची) भाषण देण्याची फी किती असते कोणाला माहित आहे का?
अज्ञानामूलक असा आत्तापर्यंतचा सर्वात लाजिरवाणा प्रतिसाद. बधाई हो.

In reply to by arunjoshi123

प्रश्न अज्ञानमूलक असेल पण लाजिरवाणा कसा ते नाही कळलं. इथे जेवढे या चर्चे मध्ये सहभागी आहेत त्या पैकी किती जणांना माहित की आई किती फी घेतात किंवा फुकट ज्ञान वाटतात. कीर्तनकार, वक्ते, सेमिनार घेणारे, पोवाडे गाणारे, गोंधळी, नाटककार, एका स्वरात शिवाजी महाराजांवर भाषण देणारे (नितीन , आडनाव विसरलो ) वगैरे सगळे जण समाजप्रबोधन केल्याच्या बदलात पाकिटे घेतात.

In reply to by विशुमित

फी घेत नाहीत हे शक्य आहे का?
ज्यांच्यासाठी पेड स्त्रीवादी स्त्रीया हाच निरीक्षण संच आहे त्यांना हे नवल वाटणारच.

In reply to by arunjoshi123

अपर्णाबाई रामतीर्थकर व्याख्यानाला आल्यावर फी घेत नाहीत. मानधन दिले तर घेतात पण बर्‍याचदा त्या गावातील अनाथ विद्यार्थी गृहाला देऊन टाकतात. गरीब महिलांची कोर्ट प्रकरणे पण त्या फुकटात लढतात. सोलापूर आणि जवळपासच्या जिल्ह्यातील फसवल्या गेलेल्या (अल्पवयीन वगैरे) मुलींचे रिमांडस, गुन्हेगारांवर गुन्हानोंदणी अशा प्रोसीजरमध्ये स्वतः अटेंड राहुन मदत करतात. मुलींनी स्वसंरक्षण करावे आणि शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे कसे याचे, न्याय, कायद्याचे, त्यातील महिलाविषयक तरतूदींचे, सरकारी योजनांचे मार्गदर्शन करतात. कुटुंबातील मतभेद, घटस्फोटासारख्या प्रकरणात समुपदेशक म्हनून काम करतात. पोलीस, कार्यालये अशा ठिकाणी महिलांवर होणार्‍या अत्याचारात महिलांची बाजू मांडतात. त्यांचे पती (स्व. अरुण रामतीर्थकर) दै. सोलापूर तरुण भारतमध्ये कित्येक वर्षे रोखठोक नावाचे सदर सातत्याने लिहित होते. सदैव व्हीलचेअरवर असतानाही त्यांनी प्रखर हिंदुत्ववादी लेखनाचा वसा सोडला नाही. सामाजिक घटना, राजकारण आदि विषयांवर वेगळ्याच अँगलने स्पष्ट आणि सडेतोड लिहायच्या त्यांच्या शैलीसाठी रविवार तरुण भारत प्रसिध्द होता. अगदी शुध्द संघ विचारांचा पाईक असलेला हा लेखक भाजपाच्या चुकाही निरपेक्षपणे दाखवून देत असल्याने संघ परिवारात त्यांच्या मताला भरपूर मान होता.

In reply to by अभ्या..

अपर्णाबाई रामतीर्थकर चांगले काम करत आहेत हे वाचून आनंद आणि आदर वाटला! त्यांच्या चांगल्या कामाला _/\_ फक्त त्यांच्या स्त्र्यीयांविषयीच्या जोखडवादी मताला राम राम ! उदडामाजी काळे गोरे ! आपण काय घ्यायचे ते आपण ठरवायचे.

In reply to by कपिलमुनी

आपण काय घ्यायचे ते आपण ठरवायचे.
हांगाश्श्श्शी. यु ट्युबवर आशिष चंचलानी सारखे कित्येक आईबहीणींवर शिव्याचा रतीब घालून ५ - ५ लाख व्ह्युअर्स मिळवतेत. त्याने काही फरक पडत नाही. समाज लावणीने बिघडत नाही की किर्तनाने सुधरत नाही. आपण आपले बघावे चांगले. हैकिनै

In reply to by कपिलमुनी

अपर्णाबाई रामतीर्थकर चांगले काम करत आहेत हे वाचून आनंद आणि आदर वाटला! त्यांच्या चांगल्या कामाला _/\_ फक्त त्यांच्या स्त्र्यीयांविषयीच्या जोखडवादी मताला राम राम ! अगदी सहमत. त्यांचे समाज कार्य मला माहीत नव्हते. उदडामाजी काळे गोरे ! आपण काय घ्यायचे ते आपण ठरवायचे. +१००

In reply to by अभ्या..

अभ्याराव, +१००००. खरंतर मी तुम्ही वर नोंदलेल्या गोष्टीच आधी ऐकल्या होत्या नंतर त्यांची भाषणे ऐकली.

In reply to by विशुमित

काही क्लिप्स मध्ये त्या स्वत:च मला बोलवा पुन्हा पुन्हा बोलवा असं सांगत आहेत. त्या फुकट येत नसाव्यात ...आणि येऊ हि नव्हे ...कारण घरी भाकरी बडवायला कुणी असो नसो ... चूल पेटती ठेवावी लागेलच ... दुसर एक वाटले म्हणजे हि भाषण देत फिरत असतांना त्या वकिली कधी करतात कोर्टात ? अवघड आहेट प्रश्न

In reply to by अत्रन्गि पाउस

त्या फी घेत नाहीत, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्या फी घेत नाहीत हे त्या भाषणाच्या शेवटी सांगतात! बाकी त्या वकिली केव्हा करतात हा प्रश्न अतार्किक आहे. मला एक सांगावेसे वाटते, त्यांच्या काही अतर्क्य किंवा पुरातन/सनातन विचारांवर आक्षेप असेल तरी त्यांचे काम आणि समाजाचे देणे म्हणून त्यांनी केलेली सेवा याची थोडी माहिती घेऊन टीका करायला हरकत नसावी. वरील एका प्रतिसादात तर त्यांना क्रॅक संबोधले गेले, हे सभ्यपणाच्या कुठल्या निकषांमध्ये बसेल? राहता राहिला प्रश्न (परत एकदा) त्यांच्या घरी भाकऱ्या बडवण्याचा तर मला वाटते सगळा घोळ तिथेच तर आहे. त्या तुम्ही चंद्रावर आहात तर तिथेही भाकऱ्या भडव्या असं सांगायचा प्रयत्न करत नाहीयेत हे न समजण्याइतकं क्लिष्ट आहे का? तुम्ही जेव्हा घरी असाल तेव्हा करा असा त्याचा अर्थ नसतो का? शिवाय रोजच करा, नवऱ्याची मदत घेऊ नका, किंवा एखाद दिवशीही पार्सल मागवू नका हे उप-अर्थ कशाला? मला आता असे वाटू लागले आहे कि इथे बरेच लोक पूर्ण भाषण न बघताच स्वतःला खटकणारे दोन तीन वाक्य शोधून (फॉर द सेक ऑफ डिबेट) मुद्दे मांडत आहेत. शिवाय वरून "भाषण ऐकवले गेलेच नाही" वगैरे पळवाटा. हैला आमी तर ओवेसी बंधूंचं भाषणबी "काय म्हणणं हाये" म्हणून ऐकून घेतो. असो ज्याचा त्याचा दृष्टिकोन!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

अगदी अगदी. ================== वाचायला नको, ऐकायला नको. डिटेल जाणून घ्यायला नको. त्यांची प्रेरणा परंपरावाद आहे इतके त्यांना क्रॅक म्हणायला खूप आहे. ==================== अपर्णाताईंनी खरं तर बायकांच्या घरगुती वागण्यावर खूप ताशेरे ओढले आहेत म्हणून ९३५ संसार उध्वस्त न होऊ देणे हे काम कोणी पाहत नाही. शिवाय दुष्ट, क्रिमिनल स्त्रीयांनी देशोधडीला लावलेले पुरुष हा त्यांचा विषय असल्याने "सर्व सुखवस्तू" बायकांना त्यांची विधाने कुठुनही उचलून संदर्भहिनतेने झोडणे गंमतशीर वाटत आहे.

In reply to by arunjoshi123

त्यांनी जरी ९३५ संसार उध्वस्त होण्या पासून वाचवले असले तरी त्यांच्या भाषणांमध्ये ९.३५ कोटी (आकडा काल्पनिक आहे) संसारामध्ये स्फोट घडवण्याचे पोटेन्शियल आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे. बाकी त्यांच्या घरी भाकरी कोण बडवतात ह्याच उत्तर काही दिले नाही कोणी.

In reply to by विशुमित

बाकी त्यांच्या घरी भाकरी कोण बडवतात ह्याच उत्तर काही दिले नाही कोणी. कृपया हे वाक्य संपादित करा (काढून टाका). (अभ्या च्या प्रतिसादातून उपरती )

In reply to by विशुमित

त्यांच्यावर तुमचा विश्वास अजिबात दिसत नाही. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या भाकर्‍या त्याच बडवतात नि मी ते मानतो. ================ बाकी तुमच्या मतांचा आदर आहेच.

In reply to by विशुमित

त्यांच्या सांगण्यातून स्त्रियांना फायदा होणार नाही असे क्षणभर गृहीत धरू पण त्यांच्या सल्ल्यांमुळे हजारो लोकांचे (तुमचा आकडा कमी केला) संसार कसे मोडले जाऊ शकतात हे जरा लगडून सांगाल का? हाच प्रश्न मी वर पण एके ठिकाणी विचारला होता पण उत्तर मिळाले नाही. बाकी त्यांच्या भाकरी बडवण्यावर मी वर मत मांडले आहे ते पटते का बघा. मला अजोंचे खालील उत्तर पण पटते.

In reply to by आदूबाळ

ह्या बाळोबाला मेल्या शंकाच फार! :प :प लष्करच्या भाकर्‍या भरपूर जमतात. त्यामुळे म्हणावा असा प्रॉब्लेम नसतो.

In reply to by विशुमित

इथे जेवढे या चर्चे मध्ये सहभागी आहेत त्या पैकी किती जणांना माहित की आई किती फी घेतात किंवा फुकट ज्ञान वाटतात.
बाई खूप सेवाभावी काम मोफत करतात हे जवळजवळ सर्वांना माहित आहे. कित्येकांनी त्यांच्या विचारांचा विरोध केलाय, पण कामाची योग्य ती दखल घेतली आहे.

In reply to by arunjoshi123

मला खरंच माहित नव्हतं त्या मोफत सेवाभावी काम करतात त्या. विडिओ ऐकण्यातून सुटले असेल कदाचित. पण तरी मला शंका आहे की मोफत भाषण देत असतील म्हणून. किमान येण्या जाण्याची बिदागी (यासाठी दुसरा शब्द असेल तर कृपया सुचवा) त्या घेत असाव्यात. खात्री करण्यासाठी आमच्या घरातील अखंड हरिनाम सप्ताहाला त्यांना आमंत्रित करण्याचा माझा मानस आहे. पण त्यांच्या कामाबद्दल मी कुठेही वेगळे मत प्रदर्शन केलेले नाही. तसे कुठे आढळले असेल तर कृपया दाखवून द्या.

In reply to by विशुमित

खात्री करण्यासाठी आमच्या घरातील अखंड हरिनाम सप्ताहाला त्यांना आमंत्रित करण्याचा माझा मानस आहे.
मागे पुढे काय पाहता मग?

In reply to by विशुमित

कीर्तनकार
एक नामवंत कीर्तनकार (खरं तर rural stand-up comedy म्हणायला हवे त्यांना) युट्युबवर एका चित्रफितीत "मग मी पैसे घेतले तर/ मला पैसे दिले तर काय बिघडले" अशा आशयाचे प्रवचन झोडताना दिसतात.

In reply to by सतिश गावडे

हो, पैसे हे फक्त एम एन सी कंपन्यांच्या अगदी ज्यूनिअर अधिकार्‍यांनासुद्धा फाईव स्टार लाईफ जोपासायलाच द्यायचे असतात. बाकी कुणाचा पैश्यांवर अधिकार काय?

In reply to by arunjoshi123

एम एन सी मधल्या साऱ्याच जणांचे ध्येय पैसे कमावणे हेच असते. मात्र तुमच्या या प्रतिसादावरुन किर्तनकाराने कीर्तनाच्या नावाखाली स्टॅन्डअप कॉमेडी करुन पैसे कमावणे योग्य आहे असे दिसते. :)

In reply to by सतिश गावडे

किर्तनात उभे राहणे बॅन नाही. किर्तनात विनोद करणे बॅन नाही. ================================= आता ध्येयाबद्दल. तुम्हाला स्कोप आणि कंसिडरेशन हा कंसेप्ट माहित असावाच. एम एन सी मधलया लोकांचे ध्येय (स्कोप) पैसे कमावणे नसते, प्रकल्प (वा तत्सम) पूर्ण करणे हे असते. पैसे हे त्याचे कंसिडरेशन असते. किर्तनकाराचे* ध्येय हे अध्यात्मिक प्रबोधन असते (विनोद हे हत्यार झाले) आणि पैसे हेच त्याचे कंसिडरेशन असते.

एकंदर विषय, वादविवाद, पूर्व उत्तर पक्ष आदी गोष्टींनी फार दिवसांनी एक जोरकस चर्चा अनुभवतो आहे ... खुद्द तीर्थंकरबाईंना हे सगळे मतमतांतरे पोचवले तर त्यांना ह्या चर्चेची दखल पुढील भाषणात घ्यावी लागेल असं वाटत . पण एकंदरीत त्या जरा अति बोलतात आणि अनावश्यक सल्ले देतात हे माझे मत. त्यांच्या सामाजिक कार्याला किंवा सद्हेतू बाळगून कार्य करण्याला सलाम ...पण ..सनी लीयोनी वर पोलीस क्म्प्लेंत आणि हैट्ट म्हणजे पोलिसांनी संध्याकाळ पर्यंत निर्णय देण्याच वचन वगैरे वाचून भरपूर आश्चर्य वाटले बाकी चलने दो

In reply to by अत्रन्गि पाउस

ते रामतीर्थ अस पाहिजे, तीर्थंकर शब्द कुठून डोक्यात घुसला आणि टंकला गेला देव जाणे ... सं म तेवढा बदल करून हा प्रतिसाद उडवला तर बर होईल

आज धाडस करून ऐकल्या दोन क्लिप्स, अपर्णाबाईंच्या. भाषा थोडी रांगडी आहे, शब्द ओबडधोबड आहेत, पण हेतू चांगला वाटला मला. नाती टिकवणे, कुटुंबव्यवस्था टिकवणे हे खरंच आज गरजेचे झाले आहे. त्या काही कुणा एकाचा कैवार घेतात असे वाटले नाही. सासू आणि सून दोघींनी करायची तडजोड सांगतात. नवरा आणि बायको दोघांनी नाते टिकवण्यासाठी काही करावे असे सांगतात. कोबीच्या भाजीचा किस्सा आवडला त्यांचा.

In reply to by सस्नेह

+१००००. सातही ऐका, नक्की मत बनवायला सोपे जाईल. काही गोष्टी पटणार नाहीत पण काही गोष्टी हृदयाला स्पर्शून जातील. काही ठिकाणी त्यांचा भरून आलेला गळाच त्यांचा हेतू सांगून जाईल (काही लोकांना तेही खोटे वाटेल पण त्याला नाईलाज आहे.)

In reply to by सस्नेह

नि:पक्ष मत. तुमचा प्रतिसाद आवडला (मागच्या प्रतिसादांच्या तुलनेत). ================================================ त्यांचे साती व्हीडीओ मस्त टाईमपास म्हणून ऐकावेत.

एकंदर प्रतिसाद वाचून मनोरंजन झाले. आपण लोक स्वतःच्या चष्म्यातून पाहून किती झटकन निवड करून एखाद्याला गुन्हेगार ठरवून मोकळे होतो याचे आश्चर्य आणि गम्मत वाटली.

बापरे! खुपच पुढे गेला की हा धागा! १. अपर्णाबै समाजकार्य करतात हे मी सुद्धा ऐकुन आहे. पण त्यातही त्या वकिली करत नाहीत आता आणि कोर्टात लोकांना मदत करतात अशी दोन परस्पर विरोधी विधाने ऐकलेली असल्याने खरे खोटे देव जाणे. तरीही त्यांच्या कार्याचा आदर करुनन सांगते, त्यांची अनेक मते टोकाची आहेत. चांगले कार्य केले म्हणुन हे ही ऐकुन घ्यावे अशी कुणाची अपेक्षा नसावी. २. त्या काही का हेतुने बोलेनात, इथे लोक त्यांच्या व्हिडीओंचा वापर सुनांना.. बायकोला ऐकवायला वगैरे करत आहेत. त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ त्यांच्या डोक्यात काही का असेना, अजुन त्यांच्या बाकी भाषणांमध्ये त्या काही का बोलेनात, जे सध्या सगळीकडे फिरतंय ते "बायकांनो भान ठेवा, नंतर बलात्काराचे मुद्दे लढवताएत, पण आधी भान नको का?" ,"पुरूषांसमोर केस विंचरतात काय.. हात काय वर नेतात.." ,"आजकाल शिकलेल्या मुलींना स्वयंपाक येत नाही, शिकलेली बायको करायची असेल तर पार्सलची तयारी ठेवा नाही तर स्वतः स्वयंपाक शिका" इ. आहे. ह्यातुन कितीही फिलॉसॉफिकल अर्थ काढायचा म्हणला तरी जो निघायचा तोच अर्थ निघतो. सार्वजनिक ठिकाणी अशी भाषणे देणार्‍या वक्त्याला "ह्या भाषणात मी असं बोलले असले तरी माझे भाषण क्रमांक ५ आणि ७ ऐका, मग तुम्हाला मुद्द्यांचा उलगडा होईल" असे म्हणता येत नसते. बरं, विषय समजा आजकालच्या स्त्रिवाद्यांच्या चुका किंवा बायका कसा कायद्याचा गैरफायदा घेतात असा काही असेल तर हे सिलेक्टिव्ह बोलणे समजु शकतो. पण "चला नाती जपुया" असे म्हणुन बायकांना झोडपणे अत्यंत चुकीचे आहे. भाषणाची सुरुवात ऐका - कुटुंबव्यवस्था मरायला टेकलीये म्हणून बोलतेय अशी म्हणुन होते ती बायका कशा कायद्याचा दुरुपयोग करातात, भान सुटतंय, धर्म बुडतोय, बंधनं नाहीत अशा अंगाने होत जाते. भाषणात सरसकटीकरण तर वाक्या वाक्याला आहे. शिकलेल्या, बाहेर जाणार्‍या बायका (खास करुन आयटी मधल्या) ह्यांच्या विषयी काहीही बोलल्या जातेय. जणु काही सगळ्याच्या सगळ्या आयटी मधल्या पोरी मातृत्व विकायल निघाल्यात. "माझं १५ लाखाचं नुकसान होतं बाळामुळे" हे म्हणणारी बाई भारतात तरी अजुन रेअर केस आहे. बाई एका उदाहरणाला बेमालुमपणे आजकाल आयटीच्या मुली असंच "सर्रास" करत आहेत असं प्रोजेक्ट करत आहेत. बाहेर काहीही काम करा, त्या कामाच्या जीवावर तुम्ही अधिकाराने लोकांना असे काही सांगता, तेव्हा तुम्ही समाजाची स्त्रियांच्या अनिर्बंध वागण्यामुळे भयानक अधोगती होत आहे चित्र उभे करता आणि अनेक लोक त्याचा सोयीस्करपणे स्त्रियांनी म्हणुनच घरात बसायला हवे असा अर्थ काढु शकतात. ३. भाकरी बडवण्याचा काय तो फायनल प्रतिवाद. मी मागच्या पानावर त्यांनी नक्की म्हणले आहे ते शब्द न शब्द लिहुन सांगितले आहे. त्यात त्या स्पष्टपणे म्हणत आहेत की "तुम्ही डॉक्टर असा, इंजिनिअर असा, .... अमुक असा...तमुक असा... अंतराळात जा.. पाताळात जा... स्वयंपाक आलाच पाहिजे, घरात आले अन नवरा म्हणला की जेवायला कर तर असं नाही म्हणता येत की भाषण देऊन आलेय, भाकरी करत नाही. नवर्‍यासमोर वकिली नाही चालत. नवर्‍यासमोर काही चालत नसतं. हे पक्कं लक्षात ठेवा. " (टाळ्यांचा कडकडाट!) ह्यात आता लोकांनी मला सांगाच की कसं "केवळ बायकांनी स्वयंपाक करावा" हे सूचित होत नाही. खास करुन हतोळकर. तुम्ही म्हणताय की ह्यात असं कुठे म्हणलंय की नवर्‍याने मदत करु नये वा नवर्‍याने स्वयंपाक करु नये. तर हे घ्या. मी तुम्हाला त्या जे म्हणल्यात ते लिहुन दिलंय. मागे तर लिंक पण दिलीये. ती क्लिक कराल तर अगदी ह्याच वाक्याला व्हिडिओ सुरु होईल. शिकलेल्या मुलींना स्वयंपाक येत नाही, शिकलेली बायको आणायची असेल तर पार्सलची तयारी ठेवा नाही तर स्वयंपाक शिका , केटरचा स्वयंपाक आणणार आहेत, सुनांना वेळ नाही. - ही सर्व वाक्ये त्या काही कौतुकाने म्हणलेल्या नाहीत. समाजाची कशी अधोगती चालु आहे त्यावर हे भाष्य आहे त्यांचं. एका भाषणाच्या पहिल्या २० मिनिटात ही रत्ने मला सापडलीत. आणि दुर्दैवाने हेच सतत व्हायरल होत आहे. "आजकाल मुलींना नवरा कसा हवा" ह्यात आयटीच्या मुली मातृत्व विकायला निघाल्यात हे इतकं ड्रामाटिक पद्धतीने सांगत आहेत आणि फेसबुक वर सतत हाच व्हिडीओ शेअर होतोय. मी एक साधं उदाहरण देऊन थांबते. माझी एक मैत्रिण आहे. त्यांच्या घरात / जातीत, तीच एक मुलगी आहे जी बाहेर पडुन प्रचंड शिकली. त्यासाठी पुण्याबाहेर राहिली. तिला एक मुलगा आवडायचा खुप. पण जाती बाहेरचा होता. तिने लग्न केले नाही त्याच्याशी. का? तर म्हणाली की जर मी घरच्यांच्या विरोधात जाऊन असं केलं तर माझ्या समाजाचे लोक नक्कीच असं म्हणतील की पोरी जास्त शिकल्या, घराबाहेर गेल्या की हे असं होतं. आणि मग लोक मुलींना तेच उदाहरण देऊन बाहेर जाऊ देणार नाहीत. मला काहीही झालं तरी वडीलांच्या मनाप्रमाणेच लग्न करायला हवं. माझं उदाहरण चुकीच्या कारणाने दिलं जायला नको. आपला समाज हा असा आहे. आज आयटीतल्या मुलींची क्लिप व्हायरल होतेय. कुठल्या तरी घरात एखाद्या मुलीच्या आयुष्यावर त्याचे पडसाद उमटलेही असतील. बायकांनी भान सोडु नका वाली क्लिप सुद्धा व्हायरल होऊन सुनांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर धडकतेय. ह्यांच्यातलं कुणीही (नसलेला) गर्भितार्थ शोधणार नाही हे मी पैजेवर सांगते. पण बघा त्या बाई काय सांगताएत, हे असं होतं पोरींना डोक्यावर घेतलं की वगैरे सोयीस्कर अर्थ निघताएत हे नक्की.

In reply to by पिलीयन रायडर

" पण बघा त्या बाई काय सांगताएत, हे असं होतं पोरींना डोक्यावर घेतलं की वगैरे सोयीस्कर अर्थ निघताएत हे नक्की." कुणीतरी एक बाई काहितरी सांगताहेत म्हणून लगेच लोकांची मते बदलतात? भलताच विनोद आहे. बाकि चालू द्या...

In reply to by रामपुरी

छे हो, अशी कोणाची मतं एका सांगण्यात्/ऐकण्यात बदलत नाहीत पण आधीपासून ज्यांची अशीच आहेत त्यांना "बघा बघा, आम्ही हेच म्हणतोय" असा सपोर्ट मिळाल्यागत होतं. आणि दुर्दैवानं अजूनही समाजाचा बराचसा भाग दुसर्‍या (सोयिस्कर) बाजूला झुकलेला आहे.

In reply to by पिलीयन रायडर

तुमच्या आणि माझ्या मतांमध्ये खूप अंतर असल्याने असहमतीवर सहमती नोंदवितो. बाकी ते भाषण क्रमांक ५ आणि ७ बघा ह्याचा उल्लेख खटकला. यूट्यूबवर ते तुकड्यात आहे याचा दोष वक्त्यावर फोडण्यात काय अर्थ? स्वैपाक यायलाच हवा आणि नवरा स्वैपाक कर म्हणाल्यावर स्वैपाक करावाच लागतो हि वस्तुस्थिती यातून नवऱ्याने स्वैपाकात मदत करू नये असे त्यांचे मत ध्वनित होत असेल असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. असा तुकड्या तुकड्यात वाक्यांचा अर्थ काढण्यात मला तरी हशील वाटत नाही. पूर्ण विडिओ पाहून त्यांचं स्त्रियांबद्दलचं मत, पुरुषांबद्दलचं मत (हो विडिओ पूर्वग्रह न ठेवता पहिला तर हेहि सापडेल त्यात), स्त्री-पुरुष समानतेबद्दलचं मत पाहून मग स्वतःची मते बनवणं योग्य होईल हा अनाहूत सल्ला! बाकी या पूर्ण विडिओत घेण्यासारखे काही विचार सापडले नसतील हे पाहून आश्चर्य वाटलं! असो! पूर्ण विडिओ आधीच मत न बनवता सलग पहावा, अपर्णाजींच्या काम जाणून घ्यावं मग टोकाची मते जरूर मांडावीत!

In reply to by पिलीयन रायडर

पण त्यातही त्या वकिली करत नाहीत आता आणि कोर्टात लोकांना मदत करतात अशी दोन परस्पर विरोधी विधाने ऐकलेली असल्याने खरे खोटे देव जाणे.
तुम्ही आमचाही (सर्वनामाचं लिंग बरोबर आहे.) अपर्णाताई बनवला असल्यामुळे तुम्ही हे ही इग्नोर करालच, पण तरीही सांगावसं वाटतं कि मनुष्याने आपल्या अज्ञानाचा वन्ही आपल्या पूर्वग्रहदोषाच्या ठिणगिसोबत वापरू नये. तर तंटा सोडवण्याची खालील प्रकारच्या पद्धती असतातः १. अमिकेबल सोल्यूशन २. मेडियेशन ३. आर्बिट्रेशन ४. लिटिगेशन ५. इंटरनॅशनल डिस्प्यूट रिझोल्यूशन ६. आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट यातल्या सर्व सरकारमान्य आहेत. आणि क्रिमिनल केस नसेल तर लिटिगेशन टाळावे (मंजे सरकारची अधिकृत मशिनरी टाळावी) असा सरकारचा आग्रह असतो. अगदी या इतर बर्‍याच फोरम्सचे अवार्ड्स फायनल आणि बाईंडिंग असावेत आणि त्याविरुद्ध लिटिगेशन बर्‍याच परिस्थितिंत चालणार नाही असेही सरकार म्हणते. हे सगळे प्रकारे चालवणारे लोक जनरली वकील असतात. बाई आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करतात असं त्या स्पष्ट म्हणाल्या आहेत. (पहा, बायस नसल्यामुळं मी किति व्यवस्थित आठवू शकतो.) ============================= आपल्या विधानाविधानात इतके अज्ञान, बायस आणि समाजशास्त्राच्या तत्त्वांचा अनभ्यास, शिवाय अर्थनिर्णयनाची अतार्किकता ठासून भरली आहे कि कोंबडी प्रेमी सारख्या टाळ्यापिटू स्त्रीवादी लोकांना आपण अपर्णाताई परंपरावाद्यांना जितक्या मिसलिड करत असतिल त्यापेक्षा जास्त मिसलिड करत आहेत. =========================== या प्रतिसादाची भाषा उग्र, टिपिकल अजो स्टाईल आहे हे मान्य. बाकी तुम्ही आपल्या मिसळपावच्या एक गोड ताई आहात अशीच कल्पना आहे नि राहिल. ही मतांतरं केवळ तात्विक आहेत. स्त्रीवादी ज्या उग्रतेने मते मांडतात त्यापेक्षा झोंबणार्‍या उग्रतेने उलट दिशेने लिहिता येते का असा प्रयत्न मी करत असतो. डोल्ट टेक अ‍ॅनिथिंग पर्सनली.

In reply to by arunjoshi123

आपल्या विधानाविधानात इतके अज्ञान, बायस आणि समाजशास्त्राच्या तत्त्वांचा अनभ्यास, शिवाय अर्थनिर्णयनाची अतार्किकता ठासून भरली आहे कि कोंबडी प्रेमी सारख्या टाळ्यापिटू स्त्रीवादी लोकांना आपण अपर्णाताई परंपरावाद्यांना जितक्या मिसलिड करत असतिल त्यापेक्षा जास्त मिसलिड करत आहेत..
आहहहह, जोशीसाहेब मानले तुम्हाला. बाकी आपले मतभेद काहीका असेनात, चिकाटी अन मुद्देसूद पणे किल्ला लढवण्याला सलाम. आपल्याला हे जमत नाही. त्यातल्या त्यात ढीगभर वर्ड सॅलडला हुशारी मानणाऱ्या विरुद्ध प्रतिसादात तुमचे प्रतिसाद प्रचंड कंसिस्टंट आहेत हे मान्य केले आहे. किपीटप.

In reply to by अभ्या..

आपल्याला हे जमत नाही.
१.जालीय संवादांची ही एक त्रुट आहे की आपण "पुरेसा" संवाद करू शकत नाही. माझे प्रतिसाद पाहिले तर सहसा मी प्रतिवादयाच्या फक्त पहिल्या , दुसर्‍या विधानाचा प्रतिवाद करतो. अन्य सर्व विधानांचा करणं वेळेअभावी अशक्य आहे. २. समोरचा खरे, प्रामाणिक बोलत आहे असे "माहित असणे", मानणे नव्हे. समोरच्याच्या नि आपल्या प्रभूत्वांची तुलना हा खेळ न खेळता आपल्याला न पटणार्‍या विधानांवर प्रामाणिक भाष्य करणे. ३. अगदी अपरिहार्य होत नाही तोपावेतो समोरच्याचा व्यक्तित्वाबद्दल भाष्य न करणे. मी जर तुला ढोंगी म्हणालो तर तू माझं काही म्हणणं मान्य करण्याचा स्कोप संपतो. म्हणून तह होईपर्यंत आदर देत राहणे. ४. प्रतिवाद्यांच्या माहीतितून आपली मतं सुधारत, रिफाईन आणि डायल्यूट करत जाणे. मंजे शेवटी आपण खूप तिखट भाजी खाऊ शकत असलो तर त्यांना थोडि लींबू पिळून देणे. ५. योग्य तिच भूमिका घेणे. ६. सगळीकडे एकोळी थूंकून जाणारांस इग्नोर करणे. एकोळे फार धारदार आणि विचारहीन लोक असतात. सुसंवादातून काही शिकायची, शिकवायची त्यांची मानसिकता नसते. म्हणून मुख्य हरिण सोडून झांडांवरून पळणार्‍या माकडाच्या पाठीमागे न धावणे. ७. समोरच्या व्यक्तिला आपला अपमानच करायचा आहे अशी धारणा नसणे. जालीय आयड्यांच्या भावनांची आपण काही समीकरणे बनवतो. प्रतिसादातले विधान हि सगळी समिकरणे तोडून पाहणे. प्रतिवाद्यांचा नेहमी योग्य तो सन्मान करणे. ८. फार गंभीर न होणे. शैली खेळकर ठेवणे. मी स्वतः फार अशिष्ट लिहितो. ते मला सुधारायला हवं. ९. जालावर आपली एक विशिष्ट प्रतिमा न बनवणे. उदा., लोकांनी तुम्हाला मूर्ख मानलं तर ओके म्हणावं. त्यानं एवढा काही फरक पडत नाही. तुमची लाँग टर्म इमेज तुम्ही आहात तशीच बनणार असते. १०. आपण आहोत तसे प्रकट व्हावं. मला वाटतं रफ्लि या गाईडलाईन्स फॉलो कराल तर जमत नाही असं वाटणार नाही. बाकी जालीय संभाषणकौशल्या या विषयात मी सगळे चढ उतार पाहिलेत असं नाही. बराच पूर्वीचा फ्लॅशिपणा बराच नियंत्रित केला आहे.