Skip to main content
लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 15/05/2017 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
ती पहा पडली गझल ती,जीव गेल्यासारखी दादही यावी इथे,तर..लाच देल्यासारखी!? पावसाचे थेंब..वणवा,तू नको काही लिहू... जाणिवांची जाग मेल्याहून मेल्यासारखी! कोपऱ्यावरती गुलाबी पिंक कोणी टाकते रंगते मैफील इथली पान-ठेल्यासारखी! हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी! काय मी जगलो जरासा!जिंदगी वेडावली लागली मागेच माझ्या,ती झमेल्यासारखी! —सत्यजित
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6867
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

माझं लक्ष काय??? हे असलं हवं तुला इकडे यायला.. अं Ssssssss ? हरामखोर पांडू, तूच मार की दांडू! :p

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद! गझलेची एक व्याख्या अशीही केली जाते की,डोक्यात शिरण्याआधीच काळजात घुसते,ती गझल!