महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा.
http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls…
इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे.
पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत.
मुंबई -
शिवसेना – ८६ ते ९२
भाजप – ८० ते ८८
काँग्रेस – ३० ते ३४
मनसे – ५ ते ७
राष्ट्रवादी – ३ ते ६
पुणे -
भाजप – ७७ ते ८५
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६
शिवसेना – १० ते १३
ठाणे -
शिवसेना – ६२ ते ७०
राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४
भाजप – २६ ते ३३
नागपूर -
भाजप – ९१ ते ११०
काँग्रेस – ३५ ते ४१
शिवसेना – २ ते ४
_________________________
एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल.
_________________
दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.
वर्गीकरण
वाचने
49426
प्रतिक्रिया
296
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओ तुम्ही नका बोलू हो! उद्या
In reply to आम्ही बी हुभं हाओ तुमच्या संग by संदीप डांगे
=)) आमची कसली क्रेडिबिलिटी?
In reply to ओ तुम्ही नका बोलू हो! उद्या by फेदरवेट साहेब
संपूर्ण व्हिडीओ
महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकाल
In reply to संपूर्ण व्हिडीओ by कपिलमुनी
भाजपच्या कर्तृत्वाची पाठ
In reply to महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकाल by कपिलमुनी
फडतूस आणि बोगस
In reply to संपूर्ण व्हिडीओ by कपिलमुनी
लैच भारी
In reply to फडतूस आणि बोगस by llपुण्याचे पेशवेll
धर्म ही अफुची गोळी आहे ??
सखेद सहमत.. :((
In reply to धर्म ही अफुची गोळी आहे ?? by धर्मराजमुटके
हे फक्त पुण्यातच होऊ शकते.
हे फक्त पुण्यातच होऊ शकते.
_________________________________________________________ २१ फेब्रुवारीला मतदानाच्या दिवशी पुण्याचे मावळते महापौर व उपमहापौर यांनी मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान यंत्राची साग्रसंगीत पूजा केली. . . . . . . . . . . . . . आणि . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . २३ फेब्रवारीला मतमोजणीनंतर काही दिवसांनी पुण्यातच मतदानयंत्राची अंत्ययात्रा निघाली.पुणे तेथे काय उणे!
आज लातूर, चंद्रपूर आणि परभणी
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या
ई.व्ही.एम
In reply to काँग्रेस व राष्ट्रवादीच्या by श्रीगुरुजी
ळॉळ
In reply to ई.व्ही.एम by गॅरी ट्रुमन
लातूर व चंद्रपुर मधील
In reply to ई.व्ही.एम by गॅरी ट्रुमन
संभाजी पाटील निलंगेकर
In reply to काँग्रेस व राष्ट्रवादीच्या by श्रीगुरुजी