Skip to main content

महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकाल

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 21/02/2017 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा. http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls… इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे. पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत. मुंबई - शिवसेना – ८६ ते ९२ भाजप – ८० ते ८८ काँग्रेस – ३० ते ३४ मनसे – ५ ते ७ राष्ट्रवादी – ३ ते ६ पुणे - भाजप – ७७ ते ८५ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६ शिवसेना – १० ते १३ ठाणे - शिवसेना – ६२ ते ७० राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४ भाजप – २६ ते ३३ नागपूर - भाजप – ९१ ते ११० काँग्रेस – ३५ ते ४१ शिवसेना – २ ते ४ _________________________ एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल. _________________ दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.

वाचने 49426
प्रतिक्रिया 296

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

ओ तुम्ही नका बोलू हो! उद्या लोक म्हणतील फेदूदा अन डांगे एकच आयडी आहेत, आमचं बरंय साहेब, एकंदरीत भाजपला प्रश्न विचारणाऱ्या आमच्यासारख्यांचे. कोणीही प्रश्न विचारले का तो थेट तुमचा डु आयडी होतो म्हणे, कसली क्रेडिबिलिटी कमावली आहे तुम्ही...... =)) तरी बरं आता आलेत काही काही जरा नव्या फळीतले कार्यकर्ते =)) सगळे डु आयडी आहेत, सब मिले हुये है जी.

In reply to by फेदरवेट साहेब

=)) आमची कसली क्रेडिबिलिटी? सगळी कृपा त्या भगवंताची! भक्तगणंगांना द्वेष म्हणजे विरोध इतकंच शिकवलेलं आहे. त्यामुळं कोणी विरोध करतो, प्रश्न विचारतो म्हणजे द्वेषच करतो असे त्यांच्या संस्कारातून वाटतंय.. बाकी, रिसबूड साहेब, तारतम्याबद्दल बोलतात... ते एक जाम आवडलं... निदान तारतम्याची ओळखतरी आहे हे ऐकून परमानंद जाहला आज मनी!

गुरुमेहेर प्रकरणात चिखलफेक करण्याअगोदर पूर्ण व्हिडीओ बघा. संपूर्ण व्हिडीओ मधली केवळ सोयीस्कर एवढी एकच स्लाईड वापरली आहे. "दुरीतांचे तिमिर जाओ" अशा भावनेने शांततेचे आवहन करणार असेल तर त्यात गैर काय ??

In reply to by कपिलमुनी

इथे या मुद्द्याचा काय संबंध ? आणि महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकालामधे याचे प्रयोजन काय ??

In reply to by कपिलमुनी

भाजपच्या कर्तृत्वाची पाठ थोपटून घ्याची भारी हौस आहे काही भाटाना, म्हणून एवढा आटापिटा.

In reply to by कपिलमुनी

असल्या फडतूस आनि बोगस शांततेचेच आम्ही विरोधक आहोत. हा जर काही प्रचार करायचा असेल तर तो पाकीस्तानात जाऊन कर, इथले लोक तुलनेने कमी पाकीस्तान द्वेष्ते आहेत. मुळात ज्या देशाशी शांतता स्थापनेबद्दल बोललं जात आहे तो देश त्या लायकीचाच नाही आणि ती लायकी यायची इतक्यात शक्यताही नाही. वाजपेयींसह अनेकांनी प्रयत्न करून झालेले आहेत त्यामुळे असले तुच्छ आशावाद योग्य जागी मारण्यात येतात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आवेश एकदम दांडपट्ट्याचे लवलवते पान फिरवत असलेल्या बाजींसारखा जमलाय, मोप माणसे चिरून कोथळे काढून वगैरे तुम्ही यमसदनी, जहंन्नुम मध्ये धाडली असतील नाही का पुपे तुम्ही? असंच पाहिजे, बोगस शांतिदूत लेकाचे, ती बेटी शांतीची कबुतरे तंदूरभट्टीतच कोंबून टाकायला हवीत, शिवाय एखाद्या डॉक्टरला रक्तमांस पाहायची असते तशी तुम्हालापण योद्धे असल्यामुळे लोळागोळा झालेली माणसे, रक्त बाहेर आलेली आतडी वगैरे बघायची सवय असेल अशी मला आशा आहे अन तुमच्यावर अभंग विश्वासही. :)

धर्म ही अफुची गोळी आहे ?? असे म्हणणार्‍याने एकदा राजकारणावरच्या चर्चा / हाणामार्‍या पाहायला पाहिजेत म्हणजे तो आपले मत नक्कीच बदलेल. राजकारण हे ब्राऊन शुगर / हेरॉईन / कोकेन आहे असे म्हणायला हरकत नसावी.

हे फक्त पुण्यातच होऊ शकते.

_________________________________________________________ २१ फेब्रुवारीला मतदानाच्या दिवशी पुण्याचे मावळते महापौर व उपमहापौर यांनी मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान यंत्राची साग्रसंगीत पूजा केली. . . . . . . . . . . . . . आणि . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . २३ फेब्रवारीला मतमोजणीनंतर काही दिवसांनी पुण्यातच मतदानयंत्राची अंत्ययात्रा निघाली.

पुणे तेथे काय उणे!


आज लातूर, चंद्रपूर आणि परभणी महापालिका निवडणुक निकालांची मतमोजणी आहे. लातूरमध्ये भाजपने ७० पैकी ३८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. भाजपखालोखाल काँग्रेसला ३१ जागी विजय मिळाला आहे. २०१२ मधील निवडणुकीत कॉंग्रेसला ४९, राष्ट्रवादीला १३, शिवसेनेला ६ व रिपाईंला २ जागा होत्या. त्यावेळी भाजपला शून्य जागा होत्या. आता भाजपने ० वरून ३८ वर झेप घेतली आहे, तर काँग्रेस ४९ वरून ३१ वर आली आहे. राष्ट्रवादीचा फक्त १ नगरसेवक निवडून आला असून इतरांना भोपळा मिळाला आहे. लातूरमध्ये मागील वर्षी पाण्याची भीषण टंचाई होती. नागरिकांना ३० दिवसातून फक्त १ दिवस नळाने पाणीपुरवठा केला जात होता. परंतु राज्य सरकारने रेल्वेच्या सहाय्याने निरजेहून लातूरला पाणी पाठवून पाणीटंचाईवर अंशतः तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल एक महिन्याहून अधिक काळ रोज रेल्वेने २५ लाख लिटर पाणी पुरविले जात होते. त्याच बरोबरीने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केल्यामुळे यावर्षी लातूरला पाणीटंचाई जाणवली नाही. लातूरचे विलासराव देशमुख तब्बल ८ वर्षे मुख्यमंत्री पदावर होते. त्याव्यतिरिक्त ते अनेक वर्षे राज्यात व केंद्रात मंत्री होते. लातूरचे एक दुसरे मातब्बर नेते शिवराज पाटील अनेक वर्षे केंद्रात मंत्री होते. या दोघांना लातूरकरांनी अनेकवेळा निवडून देऊनसुद्धा त्यांनी लातूरकरांकरता फारसे काही केले नाही हे दिसून आले. नागरिकांनी राज्य सरकारने पाणीटंचाई कमी करण्याच्या केलेल्या प्रयत्नांना मतपेटीच्या माध्यमातून दाद दिलेली दिसत आहे. चंद्रपूरमधील ६६ पैकी ३१ जागांवर भाजप आघाडीवर आहे तर काँग्रेस फक्त ११ जागांवर आघाडीवर आहे. २०१२ मध्ये चंद्रपूरमध्ये काँग्रेसने विजय मिळविला होता. परभणी महापालिका काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यातून हिसकावून घेण्याची शक्यता आहे. महापालिकेतील ६५ जागांपैकी ३१ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे,. भाजप ८ आणि शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्येकी ७ जागांवर आघाडीवर आहेत. २०१२ मध्ये परभणीत राष्ट्रवादीला ३० जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला फक्त २ जागा मिळाल्या होत्या. एकंदरीत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या १० महापालिकांच्या निवडणुकीतील कल अजूनही कायम आहे. आतापर्यंत झालेल्या १३ महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने ७ महापालिकात स्पष्ट बहुमत मिळविले आहे, एका महापालिकेत बहुमताच्या दिशेने वाटचाल आहे तर २ महापालिकांमध्ये सर्वाधिक जागा मिळविलेल्या आहेत. २०१२ मध्ये भाजप या १३ महापालिकांपैकी फक्त १ महापालिकेत सत्तेवर होता. त्या तुलनेत भाजप आता एकूण १० महापालिकांमध्ये सत्तेवर असणार आहे. या तीन महापालिकेत मनसेला २०१ पैकी फक्त १ जागा मिळाली आहे. राष्ट्रवादीला १२ व शिवसेनेला फक्त ७ जागा आहेत. एकंदरीत मनसेपाठोपाठ हे दोन पक्षसुद्धा अस्तित्वहीन होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी वातानुकुलीत बसमधून काढलेल्या 'संघर्ष यात्रा' नामक नौटंकीचा सुद्धा नागरिकांवर परीणाम झालेला दिसत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

लातूर आणि चंद्रपूरमधील ई.व्ही.एम हॅक केलेली होती पण परभणीतील ई.व्ही.एम मात्र एकदम परफेक्ट होती. या महापालिका निकालांचा अर्थ हाच आहे :)

In reply to by गॅरी ट्रुमन

लातूर व चंद्रपुर मधील पराभवाचे खापर, कॉंग्रेजचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ई.व्ही.एम व मुख्यमंत्री फडणविस यांच्यावर फोडायला सुरुवात देखील केलेय. त्यांच्या मते भाजपाने सत्तेचा दुरुपयोग करुन दोन्ही ठिकाणी सत्ता स्थापन केली आहे. मात्र परभणीत, सत्तेचा दुरुपयोग भाजपाने का केला नाही यावर त्यांनी माध्यमांत अजिबात भाष्य केले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

ह्यांच्यावर दाखवलेला मुख्यमंत्र्यांनी विश्वास सार्थ झाला . विलासराव गेल्यानंतर हे होणारच होते . त्यात पालकमंत्री संभाजीरावांची उमदी कार्यपद्धती लोकांना आवडली अमित देशमुखांच्या तुलनेत . शिवाय पारंपरिक लिंगायत मतांचा भाजप ला फायदा झालाच अनेक वर्ष हे मतदार भाजप चे होते परंतु विलासराव असेपर्यंत ते साध्य झालं नाही . परभणीत राष्ट्रवादीला धोक्याची घंटा आहे तसाच काँग्रेस ला उभारी देणारा निकाल आहे . मनसेच्या २ जागा आहेत वाटत .