Skip to main content

महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकाल

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 21/02/2017 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा. http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls… इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे. पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत. मुंबई - शिवसेना – ८६ ते ९२ भाजप – ८० ते ८८ काँग्रेस – ३० ते ३४ मनसे – ५ ते ७ राष्ट्रवादी – ३ ते ६ पुणे - भाजप – ७७ ते ८५ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६ शिवसेना – १० ते १३ ठाणे - शिवसेना – ६२ ते ७० राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४ भाजप – २६ ते ३३ नागपूर - भाजप – ९१ ते ११० काँग्रेस – ३५ ते ४१ शिवसेना – २ ते ४ _________________________ एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल. _________________ दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.

वाचने 49426
प्रतिक्रिया 296

प्रतिक्रिया

In reply to by विशुमित

आपण कोणाला घरी बोलाविले आणि आपले घर त्याला आवडले नाही तरी शिष्टाचार म्हणून तो आपले व आपल्या घराचे तोंडदेखले कौतुक करतो. त्याला दिलेले जेवण आवडले नाही तरी तो मिटक्या मारत स्वयंपाकाचे कौतुक करतो. बारामतीला आलेल्या नेत्यांनी पवारांवर स्तुतीसुमने उधळणे हा त्यातलाच एक भाग आहे. एक प्रश्न. महाराष्ट्रातील अनेक छोट्या शहरात, छोट्या गावात अजूनही उघडी गटारे आहेत. बारामतीत काय परिस्थिती आहे?

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, एखाद्यवेळेस मोदींना तुमच्या घरी बोलावणं पाठवा ना जरा... शरद पवारांपेक्षा तुमचे महाराष्ट्रातले महत्त्व कैक पटीने जास्तच आहे, तुम्ही एकदा बोलावणं धाडा आणि जेवायला घालाच समारंभ करून, म्हणजे पवार कसे क्षुद्र ह्यावर नेहमी नेहमी तेच तेच मेगबायटीचे पुरण पाडत बसायची गरज पडणार नाही... =))

In reply to by संदीप डांगे

पवार कसे महान असे कौतुक सातत्याने यायला लागल्यावर वस्तुस्थिती मांडणे आवश्यकच असते. त्यात तुम्हाला काय त्रास होतोय ते समजले नाही. पवार दाखविले जातात तितके महान नाहीत ही वस्तुस्थिती समोर मांडल्याने अस्वस्थ झालेले दिसता.

In reply to by श्रीगुरुजी

पवारांना महान म्हणत असंल कोणी तर तुम्हीच सतत अस्वस्थ होऊन मेगाबायटी सडा घालता बॉ! कोणी कोणाला महान म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न... तुमची अस्वस्थता बघून स्पेशयल पहिल्या धारेचा पवारद्वेष दिसतो... भारतात बरेच महान म्हणवले जाणारे लोक आहेत. कोणी महान आहे की नाही हे वस्तुस्थिती नव्हे तर मानणाऱ्याची मानसिकता ठरवते, 'वस्तुस्थिती' सारख्या शब्दामागे आपले विखारी द्वेष लपवायची गरज नाही! :-)

In reply to by संदीप डांगे

कमाल आहे. पवारा दाखविले जातात तितके मोठे नेते नाहीत हे दाखविले की तुम्ही का अस्वस्थ होता? कोणी कोणाला महान म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असेल तर कोणी कोणाला महान म्हणू नये हासुद्धा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. तुम्ही कशाला उगाच अस्वस्थ होताय? वस्तुस्थिती म्हणजे विखारी द्वेष हा जावईशोध कधी लावला तुम्ही? पवारांनी पूर्वी अनेकदा केलेल्या जातीयवादी वक्तव्यांचा संदर्भ मी एका धाग्यात दिला होता. अगदी परवाच्या महापालिका निवडणुकीत सुद्धा पवारांनी "देवेंद्र फडणवीस म्हणजे घाशीराम कोतवालमधील नाना फडणवीस" असे जाहीर वक्तव्य केले होते. यापूर्वी राजू शेट्टींची जात काढणे, माधव गोडबोलेंची जात काढणे, भाजप-सेना युतीबद्दल बोलताना पेशवाईचा संदर्भ देणे, छत्रपती विरूद्ध पेशवे अशी काडी घालणे अशी वक्तव्ये म्हणजे जातीयवादी वक्तव्ये आहेत हे सांगणे हा विखारी द्वेष कधीपासून झाला?
तुमची अस्वस्थता बघून स्पेशयल पहिल्या धारेचा पवारद्वेष दिसतो...
तुमची अस्वस्थता बघून स्पेशयल पहिल्या धारेचा श्रीगुरूजीद्वेष दिसतो.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणजे बारामती नाही आवडले दिल्लीतील लोकांना ? एवढे घाण घर असताना मिटक्या मारत हादडणाऱ्यांना बोलावणे शोभते का पवारांना? तुच्छ लेकाचे..!! बारामती अस्वच्छतेचा महामेरू आहे, सुधारणा करण्यात भरपूर वाव आहे.

In reply to by विशुमित

अरेरे. इथले बारामती पुराण, बारामतीचा पवारांनी केलेला विकास इ. बद्दल वाचून बारामती म्हणजे पृथ्वीतलावरील स्वर्ग, नंदनवन अशी माझी समजूत झाली होती.

In reply to by श्रीगुरुजी

पवारांचा विषय निघताच ज्याअर्थी श्रीगुरूजी धावून येतात,त्याअर्थी गुरूजींचे कधीकाळी पवारांशी सख्य असावे असे भासते.

In reply to by वरुण मोहिते

जो असे बोलतो त्याच्याकडे विदा मागा. कुणीही अडवले नाहीये. मी बोललो असेन तर तसे दाखवून द्या.

In reply to by मोदक

मनाला येईल ते अर्थ स्वतःच काढू नका. शेवटी ताव तवाने बोलण्याने स्वतःची भाटगिरी लपत नाही. बरळणे वगैरे असले शब्द वापरणे बंद वापराने बंद करा

In reply to by विशुमित

हो का..? मग स्वत:ची भाटगिरी लपवण्यासाठी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणे टाळा. तुम्ही उदो उदो करून गुलामी मान्य केली असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी आरोप केलेला विदा देताय ना..? का ते पण हवेतले बाण होते..?

In reply to by मोदक

बाकी तुम्ही शरद पवारांचा उदोउदो करत आहात हे तुम्हीच कबुल केले या धाडसाचे कौतुक वाटते.>>> -- खाली दिलेल्यांचे उदो उदो करण्यापेक्षा शरद पवारांचे उदो उदो करणे नक्कीच चांगले म्हणावे लागेल. http://www.loksatta.com/desh-videsh-news/kargil-martyr-daughter-gets-ra… http://www.loksatta.com/mumbai-news/mlc-prashant-paricharak-pandharpur-…

ज्या गतीने ह्या वेळी भाजपामध्ये अन्य पक्षांतील आयाराम येत होते (सर्वच पक्षांकडे येत होते पण भाजपाकडे ओघ खूपच जास्त होता) ते चिंताजनक होते. तिकीट नाही मिळाले, करा पक्षत्याग आणी जो तिकीट देत असेल त्याचा झेंडा घ्या खांद्यावर ही लोकशाहीला अतिशय मारक गोष्ट आहे. त्यामुळे काहीतरी कायदा करून जर एखाद्या व्यक्तीने पक्ष बदलला किंवा एखाद्या अपक्षाने जरी कुठल्यातरी पक्षात प्रवेश केला तरी त्याच्यावर पक्षात प्रवेश केल्यापासून काही काळ (३ वर्षे वगैरे) पक्षातर्फे निवडणूक लढवायला बंदी घालायला हवी. तरच हे आयाराम गयाराम प्रकार कमी होतील.

In reply to by अभिजीत अवलिया

काही प्रमाणात आयाराम गयाराम होणे चांगलेच आहे. जरा वचक राहतो. पक्षनिष्ठा वगैरे निरर्थक गोष्टींशी लोकंना काय करायचे आहे. काम करणार्‍या पक्षाला निवडून द्यावे. सर्वोच्च नेते उगाच माजतात पक्षनिष्टेमुळे. आणि जिकडून तिकीट मिळेल तिथे जाण्यात काहीच चूक नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार, कर्तव्य, काम करण्याची पद्धत, व्यवस्था याची माहिती नीटपणे घेऊन नंतर विकास व काम ह्या मुद्द्यावर बोलावे. आम्ही विकास करू, किंवा केला असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा ते त्याच संदर्भात बघावे.

In reply to by संदीप डांगे

स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारचे निर्णय सभाग्रूहात व्हावेत. वांद्र्याच्या बंगल्यावर सेटिंगच्या गप्पा मारत आणि मद्याचे पेले रिचवत होउ नयेत. विकास, मराठी माणूस वगैरे सगळ नंतर.

In reply to by अप्पा जोगळेकर

जायचं नाही बंगल्यावर मद्य प्यायला . संघाची शिकवण आहे . कि कर्नाटक विधानसभेत बी पी पाहत विकासकामे करावी .

कुठल्याच पक्षाचा समर्थक नसलो तरी 'सामना' मधली भाषा अत्यंत खुपते. बाकी, अच्छे दिन येतील अशा भ्रमात आता कोणीही मुंबईकर रहात नाही.

पंचवीस वर्षात सेना सडली नाही. सडायला ती अगोदर घडायला तर हवी होती ना ? आज बाळासाहेब काय बोलणार ,,, आज उधूजी काय बोलणार ... आज उद्धट ठाकरे काय बोलणार .... ? दसरा मेळावा ई ई ई ..... सेनेत भाजपापेक्षा एक माझ्या मते चांगले असावे ते म्हणजे मोहला पातळीवरचे संघटन. पण वर संघटना काही नाही मोदींसारखी जादू ही नाही. सबब मराठी मराठी करून जितकी मते मिळतील तितकी मते आजही सेनेला मिळतात तितक्याच मर्यादित जागा. उद्धव ठाकरे यांच्या अर्थ शास्त्राची समज तर अगदी १ लंबरी अशी आहे. महाराष्ट्र प्रदेशात दूरवर सेना वाढवण्याचे श्रेय मात्र त्यानाच दिले पाहिजे.सेनेचे काही लोक त्या त्या विभागात चांगले काम करतात हे पिन्ची मधेही दिसून आले आहे. मनसेचे ही तसेच थोडेसे आहे. भाउ एकत्र आले व काही आर्थिक सामाजिक अशा प्रकारची वेगळी विचारसरंणी त्यानी मांडली तर आजही महाराष्ट्र त्याना स्वीकारेल पण बोलबच्चन गिरीला त्यानी आवर घालावा तरच पुढे काही घडेल नाहीतर मराठी माणूस या विषयावर महाराष्ट्र पेटविणे हे स्वपन रंजन ठरेल कारण हा मुद्दा मुंबई ठाणे या परिसराशिवाय कुठेही चालत नाही.

हा विचारच करत नाही . कोणाला हवी आहे सेना?? काही झालं कि सेना हवी हा गैरसमज आहे .मुंबई बाहेर . त्यांचं ग्रॉऊंड वर्क आहे त्या जीवावर ते येतात . कुठेही घाबरायला काय मराठी माणूस पागल आहे का??का मुंबई ठाण्यात सेना लागायला ??का महाराष्ट्रात मराठी लोक घाबरले असं तर नाहीये ना? ज्या ठिकाणी बाकी लोक आले तिथे मराठी माणूस घाबरत नाही का?? हास्यास्पद मांडणी मुंबई बाहेरच्या लोकांची . असा नसतो विचार लोकांचा .

काही अपवाद वगळता सत्तेमध्ये असणारे चेहरे तेच आहेत,फक्त त्याला आता भाजप असे म्हणतात. आमच्या इकडे भाजप म्हणजे काय माहित नव्हतं लोकांना,पण आता झेडपी ला पण भरभरून उमेदवार निवडून आलेत,अर्थात पूर्वी ते काँग्रेस अन् राष्ट्रवादी मध्येच होते,आता फक्त पक्षाचं नाव बदललं,पण लोक तेच!

उद्धव ठाकरेंची राजकीय अपरिपक्वता पुन्हा एकदा दृग्गोचर झाली आहे. अर्थात पोकळ फुशारक्या व बढाया मारणार्‍यांकडून परिपक्वतेची अपेक्षा करणे जरा अवघडच आहे. २०१४ मध्ये भाजप बहुमतापासून तब्बल २२ जागांनी दूर असताना व स्वतःच्या हातात तब्बल ६३ आमदार असताना व भाजपला काँग्रेस/राष्ट्रवादीचा पाठिंबा नको असताना उधोजींनी हातातले पत्ते नीट खेळले असते तर उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद, सभापतीपद, गृहमंत्रीपद, महसूलमंत्रीपद इ. पैकी काही महत्त्वाची पदे नक्कीच मिळविता आली असती. कदाचित अडीच वर्षांकरीता मुख्यमंत्रीपद सुद्धा मिळविता आले असते. दुर्दैवाने हातातले पत्ते नीट न खेळल्याने शिवसेनेला खूप कमी महत्त्वाची हातात येऊन भाजपच्या हातातले खेळणे बनावे लागले. उधोजींच्या जागी मायावती असती तर तिने एकाच वेळी भाजप व काँग्रेस/राष्ट्रवादीशी गुपचूप बोलणी करून सर्वाधिक फायदा करून घेतला असता. आता पुन्हा एकदा हातातील पाने दाखविण्याची चूक उधोजी करीत आहेत. मुंबईत बहुमतासाठी ११४ जागा हव्या असताना शिवसेना ८४ व भाजप ८२ अशी अटीतटीची परिस्थिती असताना काँग्रेस (३१), राष्ट्रवादी (९), मनसे (७) व इतर (१४) यांना अतोनात महत्त्व आले आहे. अशा वेळी ३ अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे हे जाहीर करून हुरळलेल्या उधोजींनी आपल्या हातातले पत्ते उघड करायला सुरूवात केली आहे. आपली संख्या वाढल्याचे समजल्यावर भाजप दबावाखाली येऊन आपल्या मागण्या मान्य करेल अशा गैरसमजूतीत ते दिसतात. भाजपही बहुमतासाठी जुळवाजुळव करीत असणारच. परंतु भाजपने आपण कोणाचा पाठिंबा मिळविण्याच्या प्रयत्नात आहोत हे अजिबात बाहेर येऊन दिलेले नाही. अगदी आयत्यावेळी ते जाहीर करून सेनेला धक्का देऊन तोंडघशी पाडावे अशी भाजपची योजना असणार. भाजप शिवसेनेला जास्तीत जास्त गाफील ठेवून गुपचूपपणे नगरसेवकांची पळवापळवी करणार हे निश्चित.

भाजपमधील शिवसेना सहानुभूतीदार नेत्यांनी (गडकरी, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील इ.) भाजपने शिवसेनेशी पुन्हा जुळवून घ्यावे यासाठी जाहीर विधाने करण्यास सुरूवात केली आहे. गडकरी, मुनगंटीवार व फडणवीस या तिघांचेही कार्यक्षेत्र विदर्भ असल्याने फडणवीस फार मोठे होणे उर्वरीत दोघांना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे फडणवीसांसमोर अडचणी निर्माण करणे हाच यामागचा हेतू असावा. चंद्रकांत पाटील यांना तर सुरवातीपासूनच सेनेबद्दल मऊ कोपरा आहे. एकीकडे फडणवीस, मोदी व शहा शिवसेनेला पूर्ण नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत असताना व त्यांना त्यात यश येत असताना हे इतर नेते मात्र अडथळे आणत आहेत.

महाराष्ट्रात एक नवीन राजकीय समीकरण उदयाला येण्याची शक्यता दिसत आहे. http://beta1.esakal.com/mumbai/shivsena-congress-alliance-mumbai-32396 मुंबई: मुंबई महापालिकेत 84 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत गुप्त वाटाघाटी सुरू केल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे. या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासू सहकाऱ्यांनी काँग्रेसला एक प्रस्ताव दिला आहे. आज जरी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत युती आणि महापौरपदाच्या निवडणुकीच्या नियोजनाबाबत चर्चा होणार असली तरी महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसची मदत घेण्याची सेनेची मानसिक तयारी झाल्याचेही सांगितले जात आहे. आंधळ्याला लंगड्याची साथ अशी ही नवीन भागीदारी ठरेल का हे आगामी काळच ठरवेल. काँग्रेसची मदत घेणे हे शिवसेना व काँग्रेस या दोघांसाठी फायदेशीर ठरेल का ती दोघांची हाराकिरी ठरेल हे भविष्यात कळेलच. भाजपने शांत राहून होणार्‍या घडामोडी पाहत रहाव्यात. काँग्रेसच्या चिथावणीने शिवसेनेने पाठिंबा काढला तर भाजपसाठी ती इष्टापत्तीच ठरेल. काही काळाने काँग्रेस (४२) + राष्ट्रवादी (४१) + शिवसेना (६३) अशी युती झाली तर एकूण १४६ आमदार होतील व तिघे एकत्रित सरकार स्थापन करू शकतील. हीसुद्धा भाजपसाठी इष्टापत्तीच ठरेल.

In reply to by श्रीगुरुजी

काँग्रेसच्या चिथावणीने शिवसेनेने पाठिंबा काढला तर भाजपसाठी ती इष्टापत्तीच ठरेल.
साधारणतः सहमत. आत्ता सरकार पडलं आणि निवडणुका आल्या तर भाजपासाठी चांगलच आहे. १२०पेक्षा जास्तं देखील येऊ शकतील जागा.

राणीबाग विकास आराखडा, तिथले प्राणी ,स्थलांतरित करणे , दीडशे वर्षांची जुनी बिनकामाची झाडे काढून तिथे नर्स्रीतली खजुरीची झाडे लावण्याचा आराखडा ,गेंडा,पाणघोडा यांचे स्थलांतर,आणि शेवटी पेन्ग्विन प्रकरणातून विश्वास फार उडाला. तसं झालं नसतं तर १२० जागा शिवसेनेच्या आल्या असत्या.

In reply to by श्रीगुरुजी

युद्धाची आणि क्रिकेटची तुलना होऊ शकते? काय वाढून ठेवले आहे हे आजच्या कवळ्या पिढी पुढे? विचार नाही पटले की हाणामारी, बलात्काराच्या धमक्या आणि याची भलामण करणारे २% चे छछोरी क्रिकेटर आणि नाट्यकंपनी ? http://beta1.esakal.com/desh/gurmehar-kaur-drops-out-studentsagainstabv…

In reply to by विशुमित

मग तुम्ही ज्यांचा उदो उदो करता ते साहेब या २% छछोरी क्रिकेटरांचे नेतृत्व का करत होते म्हणे..? (तुम्ही पुन्हा पुन्हा अजाणतेपणे शरद पवारांच्याच कर्तृत्वावर शरसंधान करत आहात असे नम्रपणे दाखवून देत आहे.)

In reply to by मोदक

फाट्यावर मारले तरी लूडबूडक भाट चोंबडेपणा काही सोडत नाही. (आगाऊ सल्ला: तुमच्या सारख्या मिपावरील कथित ६ वर्षा पासूनच्या सदस्याची ट्रोल मध्ये गणना होऊ नये, ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. सर्व काही तुमच्या हातात आहे. शुभेच्छा..!!)

In reply to by विशुमित

ती काळजी तुम्ही कशाला करताय..? मी बघून घेतो. प्रश्नाचे उत्तर नसेल तर तसे सांगा. यांनी केले त्यांनी केले हे कशाला..?

In reply to by श्रीगुरुजी

सुमार दर्जाचे समालोचन आणि ट्रोलिंग इतकेच याच्या हातात राहीले आहे सध्या प्रसिद्धीच्या झोतात रहाण्याकरीता. विनोद कांबळी दर्जाच्या पिंका टाकून ट्विटर अकाउंट चर्चेत ठेवणे ही गरज झाली आहे या माणसाची. बॅटने कमावलेलं एक दिवस या हव्यासापोटी घालवून बसू नये म्हणजे मिळवली.

In reply to by श्रीगुरुजी

कारगिल हुतात्म्यांच्या मुलीचा राजकीय कारणासाठी गैरवापर करणाऱ्या राजकीय पक्षांचा निषेध. पाकिस्तानने माझ्या वडिलांना मारले नाही तर "युद्धा" ने मारले असे हि २० वर्षाची मुलगी कुणाच्या सांगण्यावरून म्हणते. युद्ध खेळायला आपले लष्कर काय आनंदाने गेले ? पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केली. तेथे जाऊन आपण काय कबुतरे उडवायची होती? का मेणबत्त्या पेटवायचा होत्या? कि उपोषण करायचे होते. हे युद्ध भारताने सुरुवात केली नव्हती तर पाकिस्तानने लादले होते. जे एन यु चीच पिलावळ दिल्ली विशवविद्यालयात येऊन असला निमनस्तरीय धांगडधिंगा करत आहे. हि पाकिस्तान बद्दल सहानुभूती कुठून आली आहे ? मला या मुलीची "लाज" वाटते. तिच्या वडिलांचा त्याग तिने पाण्यात घालवला असे स्पष्ट मत माझ्या अनेक लष्करी मित्रांनी (ज्यांनी कारगिल युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला होता) आमच्या ग्रुप वर व्यक्त केले आहे. कारगिल युद्धाचे राजकीयीकरण करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा आणि संघटनांचा परत एकदा निषेध.

In reply to by सुबोध खरे

फार इंटेलेच्युअल असतात हो. आमची एक मैत्रीण होती सेक्रेटरी होती . त्या कॉलेज ची ४-५ वर्षांपूर्वी . ड्रिंक करताना माझ्यासोबत तैवान च्या एका प्रश्नावर तावातावाने बोलत होती . म्हटलं तेरे यहा कॉर्पोरेटर कौन है . मालूम नही बोली .. म्हटलं ओक्के चियर्स .

In reply to by सुबोध खरे

वरील प्रतिसाद लिहिण्याआधी आपण त्या मुलीचा तो प्लकार्ड असलेला पूर्ण विडिओ बघितला का? नसल्यास अर्धवट माहितीवरुन धडाधड जजमेंट पास करत आहात असे म्हणता येईल. गुरमेहर ने अभाविप च्या विरोधात एक प्लकार्ड काय धरले, गणंगांनी तिचे २०१४ च्या जुन्या युद्ध-नको-शांतता-हवी हा संदेश देणार्‍या विडिओचे अर्धवट सोयिस्कर उचलुन ती कशी देशद्रोही आहे हे पसरवायला सुरुवात केली.. तिला बलात्काराच्या डिटेल धम्क्या दिल्यात... ह्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही जणू.... लष्करी अधिकार्‍यांच्या तुमच्या गृपने काय म्हटलं ते तुम्हाला माहित, पण इथे तर काही वेगळंच घडतंय... http://indiatoday.intoday.in/story/army-veterans-vow-to-fight-for-gurme… अभाविप रामजस मध्ये काय करतंय... भाजपच्या आयटीसेलचे सदस्य आयएसआयचे हस्तक म्हणून पकडले गेले, आयएसआय भाजपच्याच लोकांना हेरगीरीसाठी वापरुन उरी सारखे हल्ले बिनचूक करु शकते आहे ह्याबद्दल तुमच्या लषकरी अधिकार्‍यांच्या गृपमध्ये काय मत आहे ते ऐकायला आवडेल.. एका अर्धवट प्लकार्डपेक्षा अख्खी हेरगीरीचे रॅकेट चालवाणारे जास्त घातक असावेत पण त्याबद्दल मात्र मौन...

In reply to by संदीप डांगे

सदर मुलगी ही आपची मोठि प्रचारक व समर्थक आहे. बाकी या आझादी गँगची मनोवृत्ती खालील प्रमाणे आहे. Disagreement = Attack Logical counter = Trolling Truth = Hate Speech Expose Lies = Abuse Expose Another Lie = Targeted Harassment Disagree with a Woman = Sexist, Hariyanvi

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सदर मुलगी ही आपची मोठि प्रचारक व समर्थक आहे. >>> ग्रेट! ही गोष्ट तिला देशद्रोही ठरवायला पुरेशी आहे. नैका?

In reply to by संदीप डांगे

>>> ग्रेट! ही गोष्ट तिला देशद्रोही ठरवायला पुरेशी आहे. नैका? नाही पण तिला किती सिरीयसली घ्यायचं हे ठरवायला पुरेशी आहे.

In reply to by संदीप डांगे

कारगिल युद्धाचे राजकीयीकरण करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा आणि संघटनांचा परत एकदा निषेध.डांगे अण्णा माझे पहिले आणि शेवटचे विधान आपण "नीट" न वाचता उगाच बिनबुडाचे आरोप करत आहात. "भाजपच कशाला लष्करात सुद्धा" पाकिस्तानला मदत करणारे लोक आहेत (आणि असतील). त्यांना शोधून काढण्याचे काम लष्कराचे हेरखाते सतत करत असते. प्रत्येक लष्करी अधिकारी सुटीवर जातो तो कुठल्या प्रान्तातील आहे आणि त्याचे कुणाशी संबंध आहेत यावर लष्करी हेरखाते "लक्ष" ठेवून असते हे बऱ्याच लष्करी अधिकार्यांनाही माहित नाही/नसते. त्यातूनच शत्रूराष्ट्राचे हेरही पकडले जातात. ( हा एक वेगळा विषय आहे.) तेंव्हा माझ्या विधानाचा आपण केवळ पक्षीय/ राजकीय दृष्टिकोनातून विचार करता आहात याबद्दल आपला निषेध. हि मुलगी कारगिलमध्ये हुतात्मा झालेल्या अधिकाऱ्याची मुलगी आहे म्हणून तिला एवढी "प्रसिद्धी" मिळाली (दिली गेली). आणि तिच्या विरुद्ध एवढी राळ उडवली गेली आहे. ती सर्व सामान्य माणसाची मुलगी असती तर असे झाले असते का हा विचार करा ? अन्यथा कबुतरे उडवणारे किंवा मेणबत्त्या जाळणारे लोक भारतात लक्षावधी आहेत. त्यांच्या कडे लक्ष देण्याचे कारण नाही. "आयएसआय भाजपच्याच लोकांना हेरगीरीसाठी वापरुन उरी सारखे हल्ले बिनचूक करु शकते आहे" पाकिस्तानची आय एस आय संघटना एवढी दळभद्री नाही कि तिला भाजपच्या चार टिनपाट आयटी सेलच्या लोकांची मदत घ्यावी लागेल, उडी सारखा हल्ला करायला. एका "राष्ट्राची" गुप्तहेर संघटना आहे ती किती हरामखोर असली तरी त्यांच्या क्षमतेबद्दल भारतीय लष्कराला पूर्ण कल्पना आहे. पिवळा चष्मा लावला कि जग कावीळ झाल्यासारखे दिसते म्हणतात ते हेच.

In reply to by सुबोध खरे

बाकी सर्व फाफटपसारा सोडाहो, तुम्ही कोलांट्या का मारताय? मी विचारले की तुम्ही तिचा पूर्ण विडियो बघितला काय? नसल्यास तिची तुम्हाला 'लाज वाटते' असं म्हणण्याला काही अर्थ आहे काय? तुम्ही व्हिडियो बघितला असता तर 'लाज' वाटते म्हटलेच नसते. पाकिस्तानने माझ्या वडिलांना मारले नाही तर "युद्धा" ने मारले असे हि २० वर्षाची मुलगी कुणाच्या सांगण्यावरून म्हणते. युद्ध खेळायला आपले लष्कर काय आनंदाने गेले ? पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केली. तेथे जाऊन आपण काय कबुतरे उडवायची होती? का मेणबत्त्या पेटवायचा होत्या? कि उपोषण करायचे होते. हे युद्ध भारताने सुरुवात केली नव्हती तर पाकिस्तानने लादले होते. जे एन यु चीच पिलावळ दिल्ली विशवविद्यालयात येऊन असला निमनस्तरीय धांगडधिंगा करत आहे. हि पाकिस्तान बद्दल सहानुभूती कुठून आली आहे ? मला या मुलीची "लाज" वाटते. तिच्या वडिलांचा त्याग तिने पाण्यात घालवला असे स्पष्ट मत माझ्या अनेक लष्करी मित्रांनी (ज्यांनी कारगिल युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला होता) आमच्या ग्रुप वर व्यक्त केले आहे. हा तुमचा मूळ प्रतिसाद, ह्यावर वरखाली ज्या दोन वाक्यांच्या तटस्थ टोप्या लावल्यात त्यांना ह्या विधानांमुळे शून्य अर्थ राहतो. तुम्ही ज्यांचा निषेध करत आहात त्यांच्यात तुम्हीही सामील होतच आहात. "लष्करात बाप गमावलेल्या पोरीनी युद्धविहिन जगताची संकल्पना मांडणे" ह्यात लाज वाटण्यासारखे काय आहे ते मला जरा समजवा. बिना चष्म्याची कावीळ जास्त घातक असते डॉक्टरसाहेब, चष्मा काढता तरी येतो, सबंध शरिरात संचारलेला काविळ काढता येत नाही इतका सहज. तुम्हाला काय सांगायचं? तुम्ही तर लष्करातले डॉक्टर! जजमेंटल कमेन्ट्स करण्याआधी तेवढे मागचे पुढचे बघून घेत चला, इतकं सुचवू शकतो फारतर. दहा महिने जुना व्हिडियो आहे, आताच का राळ उडवली गेली? ह्या प्रश्नाचे उत्तर सोयिस्कर नाही म्हणून कोलांट्या मारत दुसर्‍यांवर चष्मा-काविळ असले बालिश आरोप करणे सोपे असते. -------------------------------------------------------- तुमच्यासाठी खास तिच्या विडियोचा अनुवाद देतोय. (गजू तायडे यांनी केलाय) त्यांच्या फेसबुकवालवरुन. " गुरमेहरचा हा व्हिडिओ दहा महिने जुना आहे. मात्र त्यातला मागचा-पुढचा संदर्भ टाळून फक्त एकच पाटी दाखवून चारी बाजूनं जी राळ उडवली जातेय ती क्षुब्ध करणारी आहे. म्हणूनच खाली कमेन्टीत दिलेल्या व्हिडिओतल्या प्रत्येक पाटीचा इथं मराठीत अनुवाद करून देतोय. व्हिडिओ पहा, खालचा अनुवाद वाचा आणि मग आपली अक्कल वापरायची की तथाकथित देशभक्तीच्या खात्यात गहाण टाकायची ते आपलं आपण ठरवा. अनुवादाच्या बरेवाईटपणाची संपूर्ण जबाबदारी माझी. मुद्द्यांवर प्रतिवाद शक्य नसल्यास अनुवादातल्या चुका काढू शकता. ------------------------------------------------------------------------------ १) हाय २) माझं नाव गुरमेहर कौर ३) मी जलंधर, भारत येथे राहते ४) हे माझे वडील कॅप्टन मनदीप सिंह ५) ते १९९९ च्या कारगिल युद्धात मारले गेले ६) ते वारले तेव्हा मी २ वर्षांची होते. माझ्याकडे त्यांच्या फार कमी आठवणी आहेत ७) वडील नसल्यानं कसं वाटतं याच्या माझ्याकडे जास्त आठवणी आहेत ८) मला हेही आठवतं की पाकिस्तान आणि पाकिस्तान्यांचा त्यांनी माझ्या वडलांना मारल्यामुळे मी किती द्वेष करायचे ९) मी मुसलमानांचाही द्वेष करायचे कारण सर्व मुसलमान पाकिस्तानी असतात असं मला वाटायचं १०) मी ६ वर्षांची असताना एका बुरखा घातलेल्या महिलेला चाकू मारण्याचा प्रयत्न केला होता ११) ती माझ्या वडलांच्या मृत्यूला जबाबदार आहे असं कुठल्याशा विचित्र कारणानं मला वाटलं होतं १२) माझ्या आईनं मला आवरलं आणि समजावलं की १३) माझ्या वडलांना पाकिस्ताननं नव्हे, युद्धानं मारलं १४) हे कळायला मला जरा वेळ लागला, पण आज मी माझा द्वेष सोडून द्यायला शिकले आहे १५) हे सोपं नव्हतं, पण कठीणही नाही १६) मी हे करू शकते, तर तुम्हीदेखील करू शकता १७) आज मीदेखील माझ्या वडलांसारखीच एक सैनिक आहे १८) मी भारत-पाकिस्तानमधल्या शांतीसाठी लढते १९) कारण आमच्यात युद्ध झालं नसतं तर माझे वडील आजही इथेच असते २०) मी हा व्हिडिओ बनवते आहे कारण माझी अशी मागणी आहे की दोन्ही देशांच्या सरकारांनी ढोंगबाजी बंद करावी २१) आणि समस्या सोडवावी २२) जर २ महायुद्धांनंतर फ्रान्स आणि जर्मनी एकत्र येऊ शकतात २३) जर जपान आणि अमेरिका आपला भूतकाळ मागे टाकून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतात २४) तर आपणही का नाही? २५) बहुसंख्य सामान्य भारतीयांना आणि पाकिस्तान्यांना शांती हवी आहे, युद्ध नव्हे २६) मी दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह लावते आहे २७) तिसर्‍या दर्जाच्या नेतृत्वाखाली आपण पहिल्या दर्जाचा देश बनण्याचं स्वप्न पाहू शकत नाही २८) कृपा करून कंबर कसा, एकमेकांशी बोला आणि काम तडीला न्या २९) राष्ट्रपुरस्कृत दहशतवाद आता पुरे ३०) राष्ट्रपुरस्कृत हेरगिरी आता पुरे ३१) राष्ट्रपुरस्कृत द्वेष आता पुरे ३२) सीमेच्या दोन्ही बाजूंना भरपूर लोक मेलेत ३३) आता पुरे म्हणजे पुरे ३४) जिथं आपल्या वडलांना गमावलेल्या गुरमेहर कौर नाहीत अशा जगात मला राहायचंय ३५) मी एकटी नाही. माझ्यासारख्या खूप आहेत ३६) #ProfileForPeace "

In reply to by संदीप डांगे

ज्यांनी कोणी भाषांतराचे कष्ट घेतलेत त्यांनी फालतू गोष्टी भाषांतरीत करण्यात फारच वेळ घालवला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

या मुलीचे वडील शहीद झाले ते युद्ध पाकने भारतावर लादलेले होते. जरी युद्धामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला असला तरी युद्धाचे कारण पाकिस्तान पुरस्कृत घुसखोर होते, तद्वत पाकिस्तान्मुळेच तिचे वडिल शहीद झाले. त्यांच्याविषयी पूर्ण आदर बाळगूनदेखील ती जे म्हणतिये त्याचा निषेधच झाला पाहिजे असे वाटते. जसे तिला तिचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसेच टीका करणार्‍या माझ्यासारख्या सामान्यांनादेखील तिच्या ह्या विधानाची खिल्ली उडवण्याचा, कठोर टीका करण्याचा आणि तिचा निषेध करण्याचा अधिकार आहे. मात्र, हे करत असताना तिला बलात्काराच्या धमक्या आल्या, जे आक्षेपार्ह बोलले गेले त्याचासुद्धा निषेध करावा तेवढा कमीच आहे. विचारांना विचारांना प्रतुत्तर द्यायची शक्ती नसलेले मुर्ख अश्या प्रकारे गलीच्छ भाषेत व्यक्त होतात, अश्यांबद्दल कसलीही सहानुभूती नाही, त्यांना देशभक्त म्हणणे 'देशभक्ती' या म्हान मुल्याचा अपमान आहे. रच्याकने, सेहवागच्या ट्वीटमध्ये आक्षेपार्ह काहीही नाही. त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.

In reply to by पुंबा

या मुलीचे वडील शहीद झाले ते युद्ध पाकने भारतावर लादलेले होते. जरी युद्धामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला असला तरी युद्धाचे कारण पाकिस्तान पुरस्कृत घुसखोर होते, तद्वत पाकिस्तान्मुळेच तिचे वडिल शहीद झाले. त्यांच्याविषयी पूर्ण आदर बाळगूनदेखील ती जे म्हणतिये त्याचा निषेधच झाला पाहिजे असे वाटते.
पूर्ण सहमत आहे.
जसे तिला तिचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसेच टीका करणार्‍या माझ्यासारख्या सामान्यांनादेखील तिच्या ह्या विधानाची खिल्ली उडवण्याचा, कठोर टीका करण्याचा आणि तिचा निषेध करण्याचा अधिकार आहे.
छ्या असे कसे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त डाव्यांनाच असते काय समजलात. तिच्या विधानाचा निषेध करणारे इतर सगळे लोक असहिष्णु, फॅसिस्ट इत्यादी इत्यादी आहेत.
मात्र, हे करत असताना तिला बलात्काराच्या धमक्या आल्या, जे आक्षेपार्ह बोलले गेले त्याचासुद्धा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
पूर्ण सहमत. फक्त या धमक्या देणारा कोणी भट्टाचार्य म्हणून एस.एफ.आय चा कार्यकर्ता आहे असेही म्हटले जात आहे. खरेखोटे माहित नाही. ती शक्यता जास्त आहेच कारण गेल्या दोनेक दिवसांपासून तिला बलात्काराच्या धमक्या दिल्या जात होत्या त्याविषयी चिडीचूप शांतता आहे. आणि दुसरे म्हणजे या प्रकरणात केजरीवाल उतरले आहेत. बहुदा दिल्ली महापालिका निवडणुकांपूर्वी असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करायचा प्रयत्न दिसत आहे. असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करून बिहारमध्ये फायदा झाला असे गृहित धरून तसेच वातावरण परत निर्माण करायचा प्रयत्न असेल तर ते अशक्य असेल असे वाटत नाही. आणि या मुद्द्यामध्ये केजरीवाल उतरतात तो मुद्दा जेन्युईन असू शकत नाही. एकेकाळी असल्या लोकांचा फार फार राग यायचा. पण आता अजिबात राग येत नाही. तर उलट असे लोक पुढे येत आहेत याचा आनंदच वाटतो. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील गुड फॉर नथिंग रिकामटेकडे, विविध फॉरेन फंडेड एन,जी.ओ मधील तथाकथित कार्यकर्ते आणि स्वतःला लै शाने समजणारे बुबुडाविपुमाधवि सोडून इतर कोणाही सूज्ञ भारतीयाचे अफझल-आझादी गँगला समर्थन असेल असे वाटत नाही. जितके हे असले ढोंगी लोक पुढे येतील तितके चांगले होईल. मी तर म्हणतो की २०१९ मध्ये कन्हैय्या-गुरमेहर यांची जोडगोळी मोदी सोडून इतर सर्व भाजप नेत्यांपेक्षा मोदींसाठी जास्त मते मिळवून देईल.

वैग्रे माजी क्रीडापटूंना विचारा कि ... रवी शास्त्री ,गावस्कर , ह्या लोकांना विचारा माजी खेळाडूंसाठी पेन्शन योजना सुरु करणे , स्टेडियम चा विकास करणे , स्पोर्ट अकादमी उभारणे , राजकारण नको विकासावर बोलू. बाकी सेहवाग उत्कुष्ट खेळाडू असूनही असे फोटो टाकत असेल गरज नसताना तर निश्चित छछोर पणा आहे

In reply to by वरुण मोहिते

तुम्ही गुलाम आहेत का शरद पवारांचे? मग इथे मिपावर यायचे नाही, वरून आदेश आला आहे. बिचारे ते तरी काय करणार भाटगिरीचा व्यवसायच वाईट. आहे. ( कृपया हलके घ्या आणि ख्यिक करा)

हास्यास्पद असतात ना पवार असो... गुजरात क्रिकेट असोशिएशन अमित शहा विकासात्मक काम सोडून क्रिकेट जमते का खेळले आहेत का शहा क्रिकेट कधी सहज विचारलं हे प्रश्न पवारांना लागू होतात म्हणून भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष अश्या बोर्डावर अध्यक्ष कसे राहतात ??? आधी मोदी पण होते विकासाचा वारसा घेऊन भाजप जन्माला आलीये ते का राहतात क्रिकेट संघटनेत

मिपावर रायचे तर जय भाजप म्हणावे(च) लागेल असे काहीसे इंस्ट्रकशन 'सदस्य व्हायच्या आधी' मध्ये घातले तर बरे होईल, अशी सुचनावजा विनंती मी मालकांना/संपादकांना नम्रपणे करून स्वतःला लाईन ऑफ़ फायर मध्ये उभा करतोय. च्यायला उगा एखाद फायरिंग स्क्वाड समोर उभा असल्याची भावना आली एकदम.