Skip to main content

महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकाल

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 21/02/2017 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा. http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls… इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे. पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत. मुंबई - शिवसेना – ८६ ते ९२ भाजप – ८० ते ८८ काँग्रेस – ३० ते ३४ मनसे – ५ ते ७ राष्ट्रवादी – ३ ते ६ पुणे - भाजप – ७७ ते ८५ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६ शिवसेना – १० ते १३ ठाणे - शिवसेना – ६२ ते ७० राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४ भाजप – २६ ते ३३ नागपूर - भाजप – ९१ ते ११० काँग्रेस – ३५ ते ४१ शिवसेना – २ ते ४ _________________________ एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल. _________________ दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.

वाचने 49426
प्रतिक्रिया 296

प्रतिक्रिया

In reply to by मोदक

वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत... काल नाशिकमध्ये लोकशाही बचाव आंदोलन ह्या संस्थेने काही निर्वाचित उमेदवार अवैधरित्या निवडून आलेत त्याबद्दल , निवडणूक अधिकार्‍यांना निवेदन दिलंय.. पुण्यातही बातम्या आल्यात वर्तमानपत्रात.. राजकिय पक्षांचे ह्या गडबडीविरूद्ध आंदोलनाचे मोर्चाचे ठरले आहे. पूर्ण चौकशीअंती जे काही बाहेर येईल ते खरे खोटे जाहीर होईलच....

In reply to by संदीप डांगे

पूर्ण चौकशीअंती जे काही बाहेर येईल ते खरे खोटे जाहीर होईलच.... ओके, हरकत नाही. याचा इतकाच अर्थ आहे की तुम्ही केलेली पुढील विधाने अजुन सिद्ध झालेली नाहीत. १. अनेक ठिकाणी एकूण मतदारांपेक्षा जास्त मतदान झालेले आढळले आहे. २. अनेक उमेदवारांना एकही मत (अगदी त्यांचे स्वतःचेही) नाही ही विधाने सिद्ध झाली तर नक्की कळवा, सिद्ध झाल्यानंतर या संदर्भात जर तुम्हाला आणखी कोठेही पाठपुरावा करण्यासाठी मदत लागणार असेल तर मी मला शक्य होईल ती मदत करेन. (सर्वमान्य संकेतानुसार वरील प्रतिसाद सुरूवातीला येणे अपेक्षित होते. असो.)

भाजप व शिवसेना या दोघांनाही, मुंबईत मॅजिक फिगर गांठता आली नाही, हे बरेच झाले. दोघेही एकमेकांना चेक मधे ठेवतील. शिवसेनेने प्रचारातली व सामना मधली भाषा आता सुधारावी.

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद जाणे हे महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही कारण त्यांच्या लायकीचा दुसरा नेताच महाराष्ट्रात नाही. दानवे, पंकजा मुंडे, खडसे, विनोद तावडे आदी थर्ड ग्रेड नेत्यांनी सुरु केलेली काव काव. मराठा मोर्चे आणि कोपर्डी प्रकरण, नोटाबंदी नंतर भाजपची लाट ओसरल्याची टीका होती वगैरे मुळे पक्षश्रेष्ठींनी फडणवीस साहेबांना जिंकून दाखव असे सांगितले होते. त्यांनी खरोखरच जिंकून दाखवले त्यामुळे हे सगळे अस्तनीतले निखारे थंड पडले आहेत. पंकजाताई हरल्या ते बरेच झाले त्यांची टिवटिव थांबेल आता. आजघडीला फडणवीस यांची उंची गाठू शकेल अशा लायकीचा दुसरा नेताच महाराष्ट्रात नाही. त्यामुळे त्यांचे सीएम पद धोक्यात येणे महाराष्ट्रासाठी चांगले नव्हते. शिवसेनेचे दात घशात गेले. जिल्हा परिषदांमधे भाजपचे घवघवीत यश म्हणजे ग्रामीण भागात सीएमने जलयुक्त शिवार ची केलेली कामे, दुस्काळात जनतेला केलेली मदत आणि स्वच्छ प्रतिमा याला मिळालेली पावती आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

शिवसेनेच्या माफियागिरीला चाप बसला आणि शिवसेना प्रेमी भाजप नेते कावरे बावरे झाले. महापालिका निवडणुकीचा माझ्या द्रूष्टीने तरी एवढाच अर्थ आहे. बाकी गुंडांना घेतले, गँगस्टर बरोबर फोटो काढला वगैरे मुद्दे हास्यास्पद आणि बालिश आहेत. गुंडपुंड नसलेला राजकीय पक्ष भारतात आजवर अस्तित्वातच आलेला नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

मराठा मोर्चे>> -- माझी आंतरिक माहिती (कृपया सोर्स विचारू नका) मराठ्यांनी झाडून कमळाला मतदान केले आहे. आता बोला...

In reply to by विशुमित

असे झाले असेल तर सूज्ञ मतदारांचे हार्दिक अभिनंदन. स्वतः १० वर्षे सत्तेवर असताना मराठा आरक्षणाचे किती काम केले हा मुद्दा सोयीस्कररीत्या विसरून, सत्तेवरून पायउतार होताना मराठा आरक्षणाचे साप सोडले, आणि वर त्यासाठी भाजपाला दोष देऊन "आरक्षणाचे काम न करणार्‍या भाजपाला मतदान करू नका" असा राजकीय पवित्रा एका अराजकीय संघटनेने घेतला हे थोडे विचित्रच वाटले होते.

In reply to by मोदक

लगेच आत्मरंजन करण्यात मुशगुल होऊ नका. कारणे वेगळी आहेत. टंकतो नंतर संपूर्ण माहिती हातात आल्यावर.

In reply to by विशुमित

अरेरे.. मराठा मतदार सूज्ञ आहे असे माझे म्हणणे आत्मरंजन असेल, तर नक्की वस्तुस्थिती काय आहे हे तुम्हीच तुमच्या भाषेत विषद करा.

In reply to by मोदक

राष्ट्रवादी निवडून आले असते तर सर्वसमावेशकतेला मत असते. कमळ आले म्हणून त्यांनी स्थानिक पातळीवर जातीचे राजकारण केले असे असते बहुतेक.

In reply to by विशुमित

अत्यंत चांगली बातमी. जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाला कौल दिला. मराठा समाजाचे अभिनंदन. आज फडणवीस विकासाच्या बाता आणि उत्तम काम करत आहेत. उद्या जर ते उन्मत्त झाले तर जसे राष्ट्रवादीला लोळवले तसे भाजप ला सुद्धा धूळ चारण्यास जनतेने मागेपुढे पाहू नये.

In reply to by अप्पा जोगळेकर

जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाला कौल दिला. मराठा समाजाचे अभिनंदन>> -- अहो जाती-पातीलाच त्यांनी थारा दिला म्हणून तर त्यात गोम आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

जलयुक्त शिवार ही कल्पना जुनी असली (पृथ्विराजबाबांची) तरी अतिशय प्रभावी अंमलबजावणी ही बाब यात महत्वाची होती. त्यातून खूप मोठे नाव व विश्वास मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यभरातून मिळवला. त्यामुळे विदर्भातील माणूस अशी त्यांची प्रतिमा जाऊन ती सर्वव्यापी झाली. १) राज्यभर पसरलेली ग्रामीण भागातील योजना २) प्रत्यक्ष दिसणारी व जाणवणारी योजना ३) ग्रामीण स्त्रियांचे त्रास कमी करणारी योजना ४) शेती वगैरे नेहमीचे मुद्दे सर्वांना माहित असल्याने ते देत बसत नाही. १) १० टक्के सहभाग हा सक्तिचा केल्याने भ्रष्टाचाराला आळा बसला. पूर्वी योजना, मंजूरी, पूर्ती अहवाल वगैरे सगळेच कागदावर असे. कोणी त्याबाबत बोलले तर साम दाम दंड वगैरेने तो आवाज दाबला जात असे. मात्र १० टक्के सहभागामुळे कोणीतरी चुगली करेल या भितीने योजनेत गडबड करणे अवघड बनले. २) कामाच्या सुरवातीचा फोटो व काम पूर्ण झाल्यावर काढलेला फोटो आंतरजालावर पाहाता येऊ लागल्यामुळे पारदर्शकता वाढली. भ्रष्टाचार करणे आणखीनच अवघड होऊन बसले. हे फोटो अपलोड करण्यासाठी खास मोबाईल अ‍ॅप बनवून ते अधिकार्‍यांच्या मोबाइलवर कार्यरत केले. ३) साधारणतः योजना मंजूरी प्रथम, व ती सुध्दा मंत्रालयात आणि नंतर पैशाची तरतूद हा प्रकार थांबवून प्रथम १००० कोटी मंजूर करवून घेऊन मग योजनांप्रमाणे खर्च करायची पध्दत खूपच परिणामकारक ठरली. कालापव्यय खूपच कमी झाला. (अर्थमंत्र्यांच्या लूडबूड क्षमतेला चाप बसवला. ही तर मुत्सद्दीपणाची कमाल होती. याबाबत जास्त लिहिणार नाहीये.) ४) योजना मंजूरी मंत्र्यालयाऐवजी जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द केल्याने मंत्र्यालयातील हस्तक्षेप थांबला. व एकंदरीत कामाचा वेग इतका वाढला की जणू ही योजना सरकारी नसून एखादी खाजगी कंपनी चालवत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ६ महिने अगोदरच कामे सुरू व्हायला लागली. (पूर्वी पावसाळा सुरू होईपर्यंत मंजूरीच आलेली नसे. टक्केवारी व कोणत्या ठेकेदाराला काम द्यायचे यामधे मांडवली करण्यात वेळ जायचा.) ५) योजनांची अंमलबजावणीचे हक्क व अधिकार दोन्हीही जिल्हाधिकार्‍यांना दिल्यामुळे व बाह्य हस्तक्षेप टाळले गेल्यामुळे जिल्हाधिकारी सर्वस्वी जबाबदार धरले गेले व बहुतांश जिल्हाधिकार्‍यांकडून सर्वोत्तम काम करवून घेता आले. वेळप्रसंगी जिल्हाधिकारी बदलले गेले किंवा त्यांना समजही दिली गेली. ६) या योजनेच्या निमीत्ताने मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत राहिले व त्यामुळे लालफितीचा दोष आणखीनच कमी झाला. शिवाय मुख्यमंत्री स्वतः जातीने लक्ष घालत असल्याचा संदेश जाऊन तसेच त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे भ्रष्टाचार करणे अशक्य होऊन बसले. एकंदरीत पारदर्शकता हा शब्दप्रयोग तेव्हापासून जास्त वापरला जायला लागला. हीच पारदर्शकतेची मुख्यमंत्र्यांची हाक या निवडणुकीत खूप प्रभावी ठरली.

In reply to by शाम भागवत

जलयुक्त शिवाराचे बरेच जण खूप गोडवे गात असतात पण पाठोपाठ येणाऱ्या राज्य सरकारांनी खरंच त्याचा शास्त्रीय अभ्यास करून तो कार्यान्वित केला आहे का? http://www.hindustantimes.com/mumbai-news/hc-to-maha-govt-reconstitute-… http://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-high-court-comment-on-jalyuk…

In reply to by विशुमित

न्यायालयाने सांगितले आहे त्याप्रमाणे अभ्यास केला जाईलच हो. नव्हे करायलाच पाहिजे. पृथ्विराजबाबांनी तज्ञांच्याकडून तपासून न घेता परस्परच ही स्कीम सुरू केली हे मलाही आत्ताच कळतय. पण मुद्दा तो नाहीच आहे. एखादी योजना उत्तमरित्या कशी राबवता येऊ शकते ते मी मांडले आहे. त्यातून लोकांचा विश्वास कसा मिळवता येतो ते मी मांडले आहे व या विश्वासाच्या आधारे मते कशी मिळवली जाऊ शकतात ते मी लिहिले आहे. असो.

In reply to by शाम भागवत

योजनेमध्ये च जर फोलपणा असेल तर ती उत्तमपणे राबवण्यात काय हाशील? लोकांनी विश्वास ठेवला, जनमताचा आदर आहे. "पाणी आडवा पाणी जिरवा" आणि 'जलयुक्त शिवारा'मध्ये काय फरक आहे कोणी सांगू शकेल का ?

In reply to by विशुमित

आता संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि स्वच्छ भारत अभियान . फरक आहे ना .जाहिरात किती करतात त्यावर आहे .

कोणास ठाऊक कशी पण कोमात गेली सेना. सेनेने पेटवले रान, घेतली सुंदर धाव. जनता म्हणाली, व्वा व्वा ! सेना म्हणाली, माझीच हवा. कोणास ठाऊक कशी पण कोमात गेली सेना. भाजपने मारली उडी, भरभर चढला शिडी. सेना म्हणाली, थान्ब थान्ब ! भाजप म्हणाला, नानाची टान्ग. कोणास ठाऊक कसा पण कोमात गेली सेना. सेनेने म्हटले पाढे, पण भाजप आला पुढे. जनता म्हणाली, शाबास ! सेना म्हणाली, करा बास. कोणास ठाऊक कसा पण कोमात गेली सेना. सेनेला चारले खडे आणि गेले आता टक्के. जनता म्हणाली, छान छान ! सेना म्हणाली होतोय त्रास.

मराठा मतदार सुद्न्य वैग्रे अश्या टाईपच्या प्रतिक्रिया पहिल्या . बाकी जाऊदे पण ह्या ३ वर्षात फडणवीस ह्यांची कामगिरी बोलणार्यांनी ह्यावर धागा काढा .आवाहन आहे सगळ्यांना कारण कमळ ला मत दिल म्हणजे भारी विकास अश्या प्रतिक्रिया आहेत . तर फडणवीस ह्यांनी सत्ता वाचवणं सोडून काय काम केलं?? दरवेळी छोट्या छोट्या निवडणुका पाहून जीवाचे रान करून प्रचार केला ? आजवर उल्लेखनीय एखादी गोष्ट काय केली ? आजही महानगरपालिकेत मत आलं तरी मोदींचे आभार बोलण्याव्यतिरिक्त महाराष्ट्रात काय केलं ? सत्ता आहे थोडी मतं मिळणारच ५ वर्षेनंतर काय करणार ? फडणवीसांची कामगिरी काय ह्यावर कोणी मतं द्या

In reply to by वरुण मोहिते

नीट वाचा हो. विषुमीत यांच्या विधानावर मी म्हणतोय "मराठा मतदार सूज्ञ आहे" त्यावर ते म्हणत आहेत आत्मरंजनात मश्गुल राहू नका. आता काय बोलणार यावर.. सत्तेसाठी विखुरलेला मराठा जातीसाठी एकत्र येईल असे ऐकले होते. तेथे पण अनेकांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून येत आहे. असो.. बाकी फडणवीसांनी ३ वर्षात कांहीच काम केलं नाही असे तुमचे मत असेल तर तुम्ही धागा काढा. थोडी अभ्यासपूर्ण बैठक हवी असेल तर पहिल्या तीन वर्षात मागच्या चार पाच सरकारांनी काय काय कामे केली ते लिहा म्हणजे तुलनेला सोपे जाईल. फडणवीसांच्या कामगिरीवर मिपाकरांची मते मागण्यापेक्षा आश्वासने विरूद्ध कामगिरी असा अभ्यासपूर्ण लेख लिहिलात तर सगळेच उद्देश साध्य होतील.

In reply to by मोदक

कोणी काम केला याचा . म्हणणं इतकाच कि विकासाला मत म्हणजे कमळाला तर भाजप ने काय विकास केला हे कोणीतरी दाखवावे हि अपेक्षा .महाराष्ट्रात काय निर्णय घेतला फडणवीसांनी ,काय कामगिरी केली ? ह्या वर कोणीतरी प्रकाश टाकावा अवांतर - लेखाला आश्वासने विरुद्ध कामगिरी हे नाव द्यावे . बाकी आम्ही तर काहीच बोलो नाही लोकं विकास विकास म्हणून बोलत आहेत म्हणून विचारलं काय फरक पडला यावर कोणी लिहील का कारण ३ वर्ष होत आली . धावता आढावा घेऊ.त्यामुळे विकास ह्या मुद्यावर कोणी तरी लिहावे .

In reply to by वरुण मोहिते

२८ वर्ष सत्ता भोगून, खंडण्या घेऊन मुंबई सडवली आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला ते लोक ३ वर्षाचा लेखाजोखा मागतात हीच कमाल आहे. तरीपण देऊ लेखाजोखा. डोन्ट वरी.

In reply to by अप्पा जोगळेकर

मुंबई सडली सडली हे कशावरून ?? कारणं काय आहेत अतिरिक्त ताण , वेगवेगळ्या संस्थांचे अधिकार इ. ते सोडून सडली बोलत राहायचं . विकास विकास बोलत राहायचं का?आम्ही तर साधं विचारलं कि विकासाचं काय ?त्यात २८ वर्ष वेग्रे ...असो .म्हणजे काहीही विचारलं तरी २८ वर्ष वैग्रे मोघम स्टेटमेंट करायचं का ?

In reply to by वरुण मोहिते

कसल मोघम. पॉईंट वाइज यादी दिली की खाली. ढेरे शास्त्रींनी पण दिली. आणखीन आठवेल तशी देत जाईन. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव वगैरे मोघम फेकाफेकी चालते का.

In reply to by वरुण मोहिते

परफेक्ट. दुसरे काय नाय. राष्ट्रवादीच्या सहकारातील आर्थिक नाड्या आवळल्यात. सत्तेशिवाय जगणे न जमणार्‍यांनी घड्याळे टाकून कमळ हुंगणार्‍यांची संख्या वाढवलीय. हि सूज आहे. मागच्या दाराने घुसलेत पण ह्यांच्याच करतूतीने भाजपा गाळात नाही गेला म्हणजे मिळवली. (परिचारकांनी मासला दाखवलाच आहे)

In reply to by अभ्या..

सत्तेशिवाय जगणे न जमणार्‍यांनी घड्याळे टाकून कमळ हुंगणार्‍यांची संख्या वाढवलीय.>>> -- तुमच्या परफेक्शनला मानलं अभ्या शेठ.

In reply to by वरुण मोहिते

चला. शिवसैनिक सुद्धा कामगिरी बद्दल विचारु लागले हा एक स्वागतार्ह बदल आहे. मला दिसलेले काही मुद्दे - १. जलयुक्त शिवार बद्दल शाम भागवत साहेबांनी लिहिले आहेच डिट्टेलवार २. दुष्काळ प्रश्न उत्तम प्रकारे हाताळला. लातूरकरांना ट्रेनने पाणी पुरवण्याचे इम्प्लिमेंटेशन तर फारच चांगले. ३. मुंबईत १ लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली ४. नविन उद्योगांसाठी लाल फितीचा कारभार ६७ परवानग्या ते २० परवानग्या असा स्मूथ केला ५. लोड शेडिंग संपले ६. मुंबईत ६ नविन एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा. पैकी ४ चे काम चालू झाले. बहुधा २०२० पर्यंत संपेल. ७. मुंबईत प्रत्येक सिग्नलला सीसीटीव्ही बसवला आणखीन आठवत नाही. बरेच असतील.

In reply to by अप्पा जोगळेकर

८. अनेक टोल गेले. ९. फळभाज्यांची नियमन मुक्ती. १०. मागपुर मेट्रो मान्यता + काम सुरू ११. पुणे मेट्रोला मान्यता + काम सुरू. आधी रा.कॉ + कॉ इकडे १५ वर्षे आणि केंद्रात १० वर्षे सत्तेत असून सुरू केलं नाही. यांनी दोन वर्षात सुरू केली. १२. नासिक रोड कोणाचा आहे माहिती नाही.

In reply to by अनुप ढेरे

इरिगेशन खात्या मधे काय काम झाले हे कोणाला माहिती आहे का ? अजित दादांनी ७०००० कोटीचा स्कॅम केल्यानंतर हे खाते फार संवेदनशील झाले होते. ते खाते बहुधा गिरीश महाज यांच्याकडे आहे. जलयुक्त शिवार चे काम बहुधा पंकजा मुंडे यांच्या ग्राम विकास खात्याच्या अखत्यारीत येते, इरिगेशन मधे येत नसावे.

In reply to by अप्पा जोगळेकर

आम्ही तर सैनिक नाही तरी . दुष्काळ उत्तम हाताळला कसा हाताळला ? शेती करणार्यांना विचारा.बाकी मुद्दा २-७ सगळ्या मुख्यमंत्रांच्या कामात लागू होतो.सगळ्याच कालावधीत नवीन योजना पॅकेज चालू असतं. त्यात नवीन काय ?? कित्येक गोष्टी मागच्या पानावरुन पुढे . जे स्तुती करत आहेत त्यांनी बाकी १७ मुख्यमंत्र्यांची अशी स्तुती केली आहे का कधी ?? त्यांनी काय केलं यावर प्रतिसाद दिले आहेत का?? का फडणवीस बेस्ट

In reply to by वरुण मोहिते

प्रूथ्वीराज चव्हाण चांगले होते. त्यांच्या पायात पाय घालायला राष्ट्रवादी नसत तर बरच काम झाल असत. कसल नवीन योजना पॅकेज. पॅकेज घोषणेबद्दल नाही हो, झालेल्या किंवा सुरु झालेल्या कामांची यादी आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

चव्हाण कशे चांगले होते जरा उदाहरणांसह स्पष्टीकरण देता का? (बारामतीपेक्षा कराड अजून धुळखाऊच दिसतं म्हणून एक भाबडा प्रश्न. का ३ वर्ष पुरेसे नव्हते कराड सुधारायला?)

In reply to by विशुमित

(बारामतीपेक्षा कराड अजून धुळखाऊच दिसतं म्हणून एक भाबडा प्रश्न. का ३ वर्ष पुरेसे नव्हते कराड सुधारायला?) मुख्यमंत्री अख्ख्या महाराष्ट्राचा असतो बर्र का..

In reply to by मोदक

निधी पळवला वैग्रे कोणी बोलू नये . कारण मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्राचा असतो .१८ मुख्यमंत्री झाले आजवर सगळ्यांनी उत्तम विकास करायला हवा होता .गावाकडेच लक्ष द्यायचं असतं तर सगळ्या मुख्यमंत्र्यांना १०% पण साध्य का झालं नाही .??लातूर नागपूर सोलापूर नांदेड मुंबई सिंधुदुर्ग रायगड यवतमाळ सातारा सगळीकडून मुख्यमंत्री झालेत .

In reply to by वरुण मोहिते

मग बारामतीचा का विकास झाला ? विकासाच्या व्याख्या बोला. तसे म्हणाल तर मी पण घराच्या बाल्कनीत मला आठवड्याला पुरून शेजारच्यांच्या घरी निर्यात करता येईल इतकी भाजी पिकवतो. करूया का तुलना..? ;) गावाकडेच लक्ष द्यायचं असतं तर सगळ्या मुख्यमंत्र्यांना १०% पण साध्य का झालं नाही .? ते संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करणारे मुख्यमंत्री असतील. आपल्या गावाचा विकास करूया बाकी लोकांना वार्‍यावर सोडूया असा अ‍ॅप्रोच नसेल त्यांचा. १८ मुख्यमंत्री झाले आजवर सगळ्यांनी उत्तम विकास करायला हवा होता मग केला नाही का विकास..? १ मे १९६० पासून पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल काढला तर काँग्रेस - ८७% (१८,०२१ दिवस) शिवसेना - ८% (१,६७८ दिवस) भाजपा - ४% (८४५ दिवस) राष्ट्रपती राजवट १% (१४५ दिवस) कुणाला जास्त संधी होती म्हणे..? का तुमच्या अपेक्षेप्रमाणे विकास न झाल्याचे खापर राष्ट्रपतींवर फोडूया..? (नै, भाजपावर खापर फोडून तुम्हालाही कंटाळा आला असेल म्हणून राष्ट्रपतींचे नाव सुचवले - तेवढाच बदल.)

In reply to by मोदक

ते माहित आहे . आपण मुख्यामंत्री अक्ख्या महाराष्ट्राचा असतो हे सांगितलंत .म्हणून सांगितलं महाराष्ट्रात किती मुख्यमंत्री झाले .म्हणजे आपण जर म्हणत असाल कि विकास फक्त तिथेच लक्ष देऊन झाला हे चूक आहे .नेहमीच म्हणतो लोक आणि नेते यावरही विकास अवलंबून असतो. आपण व्यक्तिसापेक्ष म्हणालात आणि आता पक्षनिहाय आकडेवारी देताय . काय आहे भाजप खापर वैग्रे मला बोलून काय मिळणारे ?? पण नेहमी चुकीचा प्रचार होतो हे घातक आहे .भाजप च्या झालेल्या चुका ह्यावर कोणी हिरीरीने बोलाय का इकडे ..मोदी काय बोले ह्यावर कोणी मत मांडलाय का? बाकी मला काय मी राष्ट्रपती काय भाजप काय सगळ्यांवर बोलेन समोरचा माणूस निष्पक्ष असला तर निश्चित .

In reply to by वरुण मोहिते

म्हणजे आपण जर म्हणत असाल कि विकास फक्त तिथेच लक्ष देऊन झाला दाखवून द्या बरं मी असे कुठे म्हणालो आहे ते.. (बारामतीपेक्षा कराड अजून धुळखाऊच दिसतं म्हणून एक भाबडा प्रश्न. का ३ वर्ष पुरेसे नव्हते कराड सुधारायला?) या वाक्याच्या संदर्भाने बोलत असाल तर ते विशुमीत. उदो उदो करणारे तेच ते. पण नेहमी चुकीचा प्रचार होतो हे घातक आहे . मोघम बोलू नका हो. कुणी चुकीचा प्रचार केला. कसा केला ते सांगा. भाजप च्या झालेल्या चुका ह्यावर कोणी हिरीरीने बोलाय का इकडे ..मोदी काय बोले ह्यावर कोणी मत मांडलाय का? तेच सांगतोय, तुम्ही अभ्यास करा आणि लेख लिहा. बाकी मला काय मी राष्ट्रपती काय भाजप काय सगळ्यांवर बोलेन समोरचा माणूस निष्पक्ष असला तर निश्चित . नुसते बोलायला कांही श्रम लागत नाहीत. अभ्यास करा आणि बोला. धागा काढायला कांही मदत लागली तर जरूर सांगा.

In reply to by मोदक

आज मनसे बेस्ट ,आज भाजप बेस्ट , जो नवीन काही करेल तो बेस्ट हा झाला चुकीचा प्रचार भाजप चूक आहे कधीतरी हे मान्य करणारा प्रतिसाद आला कि लेख काढतो कि .एखाद्य पक्षाचं समर्थन होणार असेल तर बाकीच्या पक्षांची कामे वाचावीत हा बेसिक मुद्दा आहे . पण भाजप साठीच सगळे प्रतिसाद येणार असतील तर मी काय करू बाकी मुद्दा ३ _४ साठी जुने झाले प्रतिसाद अभ्यास करा आणि बोला वैग्रे

In reply to by मोदक

ओके चव्हाण यांचे एवढे कवतुक का चालू आहे ते आता कळाले. शरद पवारांचे उदोउदो आणि भाजपला विरोध केला म्हणून एवढे तावा-तावाने चालू आहे प्रतिसाद देणे. आयत्या पिटावर रेघोट्या मारणाऱ्या बिचाऱ्यांना यश सुद्धा पचवता येत नाही, याची खंत वाटते. (जिव्हाळ्याचा विषय: बारामती मात्र बेस्ट तालुका जलने वालो को जलने दो..!!)

In reply to by विशुमित

चव्हाणांचे कौतुक..?? तावातावाने दिलेले प्रतिसाद..?? चष्म्याचा ट्रक पोचला वाटतं तुमच्याकडे पण. असो वस्तुस्थिती दाखवल्याने जळजळ झाली असेल तर काळजी घ्या. बाकी तुम्ही शरद पवारांचा उदोउदो करत आहात हे तुम्हीच कबुल केले या धाडसाचे कौतुक वाटते. मिपावर भक्तभाट असतात या डांगेंच्या वाक्याला आता मी आक्षेप घेणार नाही. ;)

In reply to by मोदक

जे आहे ते आहे बोलण्याचं .का चांगलं बोलू नये पवारांना ???ठरवलंय का कोणी संघीय विचार चांगले वैग्रे ...स्वतः मोदी कौतुक करतात मग काय प्रॉब्लेम आहे ??उगाच हिणवल्यासारखं करायचं ??टुकार विचारांना मोदींनेच तोंडावर आपटलाय .बर मोदी पण क्रायटेरिया नाही पण उगाच पवार आले कि खिल्ली . संघाची १०० वेळा खिल्ली उडवायला हवी होती .ज्या विकासावर बोलता त्या विकासावर जेटली म्हणाले १०० बारामती झाले पाहिजे .मोदी म्हणाले विकास क्या है शरदराव से सीखो . हे मान्य असेल तर पुढील प्रतिसाद देतो .

In reply to by वरुण मोहिते

डू आयडी वैग्रे काहींच्या काही बोलून विषय कशाला भरकटवायचा ??दरवेळी शेती चा अनुभव असता नसताना सगळेच मुद्दे मांडतात मिपा वर .सोपं असतं ऑफिस मध्ये बसून लिहिणं.मी बोलो त्याला आधार होता / आहे .नुसतं मुंबई पुणे म्हणजे महाराष्ट्र नाहीये . मुद्दा भरकटवायला डू आयडी वैग्रे विषय .....चालायचं

In reply to by वरुण मोहिते

सोपं असतं ऑफिस मध्ये बसून लिहिणं. >> म्हणजे जिथे तुम्ही नोकरी करता, जिथे तुमचा वेळ कंपनी पैसे देऊन विकत घेते, त्यावेळेत ऑफिसचे इण्णरनेट आपल्या टैमपाससाठी वापरुन लिहायचे? छे छे! अब्रह्मण्यम्!!!! असे काहीही नसते हो, मोहितेसाहेब! जगाला शाणपण शिकवणारे असे करत नसतात... संघाचे असून तुम्हाला एवढं तरी माहित असायला हवं... मोठे व्हा! वाढदिवसाच्या शुभेच्छा! वगैरे वगैरे!!!

In reply to by वरुण मोहिते

मी विशुमीत यांच्या धाडसाचे कौतुक केले, त्याला चवताळुन उत्तर देताय तुम्ही. मग तो तुमचा डुआयडी नसेल तर तुम्हाला का जळजळ झाली म्हणे..? बाकी वैयक्तीक गोष्टी आणि तुमच्या सुरात "जी जी रं.. जी जी रं.. जी.. जी.." करणारे, दोघांनाही फाट्यावर मारले आहे. मुद्दे असले तर बोला. मी कुठे बसून काय लिहितो याची नोंद घ्यायला तुम्हाला नेमले नाहीये. इतक्या वेळा सांगितले तेच अजुन एकदा सांगतो - तुम्ही बोलताय त्याला आधार आहे असे म्हणत असाल तर अभ्यास करून धागा काढण्याचे धाडस दाखवा. खोटे लॉजिक लावून ट्रक फिरवणे किंवा एखाद्या नेत्याची हांजी हांजी / उदो उदो करणे सोपे असते. मुद्दे असले तर इथे बोला. चार दिवसांत लेख लिहितो / प्रतिसाद देतो असे खोटे वायदे करून दिशाभूल करणार्‍या लोकांचे मला पण लै 'फर्स्ट हँड अनुभव' आहेत. तुम्ही त्यांपैकी नसाल अशी अपेक्षा आहे. (बाकी मला शेतीचा अनुभव नाही म्हणून बोलण्याला तुमचा आक्षेप असेल तर तुम्ही राजकारणावर बोलताना किमान ग्रामपंचायत, नगरपालिका वगैरे निवडणूक लढवली असेल अशी अपेक्षा आहे. शाळेतली मॉनीटरची निवडणूक लढवली असेल तर तसे सांगा, मग ठरवतो प्रतिसाद कितपत गंभीरपणे घ्यायचे ते..!)

In reply to by मोदक

मिपा च्या धोरणात बसतं का ?नाही म्हणजे मी पण आरोप करू शकेन . फाट्यावर मारणं वैग्रे पण आहे का धोरणात . म्हणजे समजेल तरी . प्रतिसाद नाही भरकटवणार पण माहिती असलेली बरी. बोलायला मुद्दा होता कि त्यावरच तर बोलत होतो .आपणच डू आयडी वैग्रे मुद्दा काढला . लास्ट मुद्दा नगरसेवक तर एका फटक्यात झालो असतो .. आता मूड नाही आणि रिहॅब च्या धाग्यात मान्य केलाय कि संधी गेली म्हणून .आता मूड नाहीये इतकंच.गंभीर पणे उत्तर अपेक्षित

In reply to by वरुण मोहिते

भाजपाने केलेल्या / न केलेल्या विकासावर तुम्ही लेख लिहा, तेथे बोलूया.

In reply to by मोदक

डू आयडी ची कोणती टूम काढलीत मोदक साहेब? मी वार केला तर पुढून करतो. चुकलो तर १० वेळ माफी मागतो. विचार किती ही पटले नाही तरी सभ्यपणा सोडत नाही. मागे तुम्ही वैयक्तिक होऊन माझ्या आदराच्या पात्रतेविषयी पण बोललात. त्यावेळीस पण मी आपणाला समज दिली होती. मुद्यावर बोला. मुद्दा सोडून दुसऱ्या उखाळ्या पाखाळ्या काढून चर्चेतील मज्जा घालवू नका, ही विनंती...!!

In reply to by वरुण मोहिते

जे आहे ते आहे बोलण्याचं .का चांगलं बोलू नये पवारांना ???ठरवलंय का कोणी संघीय विचार चांगले वैग्रे ...स्वतः मोदी कौतुक करतात मग काय प्रॉब्लेम आहे ??उगाच हिणवल्यासारखं करायचं ??टुकार विचारांना मोदींनेच तोंडावर आपटलाय .बर मोदी पण क्रायटेरिया नाही पण उगाच पवार आले कि खिल्ली . संघाची १०० वेळा खिल्ली उडवायला हवी होती .ज्या विकासावर बोलता त्या विकासावर जेटली म्हणाले १०० बारामती झाले पाहिजे .मोदी म्हणाले विकास क्या है शरदराव से सीखो . हे मान्य असेल तर पुढील प्रतिसाद देतो .
मोदी किंवा जेटली पवारांबद्दल जे बोलले ते कौतुक होते का उपरोध होता? राष्ट्रीय नेत्यांना बारामतीला भेट देण्याचे आमंत्रण देऊन त्यांचे आतिथ्य व पाहुणचार करणे व त्यांच्याकडून आपले कौतुक ऐकून घेणे हा पवारांचा जुना छंद आहे. त्यांनी यापूर्वी माजी पंतप्रधान चंद्रशेखर, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, मोदी, जेटली इ. नेत्यांना बारामतीला बोलावून त्यांचा पाहुणचार करून त्यांच्याकडून आपले कोडकौतुक करून घेतले आहे. आपण एखाद्याकडे पाहुणा म्हणून गेलो तर आपण तोंडदेखलं यजनामाबद्दल चार बरे शब्द बोलतो. त्यात फारसे तथ्य असतेच असे नाही. मोदी, जेटली, मुखर्जी, चंद्रशेखर इ. नी बारामतीला येऊन, पवारांचे आदरातिथ्य स्वीकारून त्यांच्याबद्दल कौतुकाचे चार शब्द उच्चारून त्यांना हरबर्‍याच्या झाडावर चढविणे यातून फार काही अर्थ काढण्याची गरज नाही कारण त्यातून तसा काहीही राजकीय अर्थ निघत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

यायची फालतू माणसाचा छंद म्हणून फाट्यावर मारायचं (मिपा भाषेत ).राजकीय वैग्रे अर्थ नाही तर उगाच का यावं ? वेळ थोडी असतो फुकट सगळ्यांकडे

In reply to by वरुण मोहिते

राजकारणात कोणीही एकमेकांचा वैयक्तिक शत्रू नसतो. ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात. पवार हे तसे राष्ट्रीय राजकारणातले लिंबूटिंबू नेते. त्यांचा पक्ष राज्याच्या व देशाच्या राजकारणातला लाईटवेट पक्ष. पवारांच्या पक्षाला लोकसभेत कधीही २ आकडी खासदार निवडून आणता आले नाहीत तर राज्यात त्यांच्या आमदारांची संख्या कायम एक चतुर्थांशापेक्षा कमीच राहिली. केंद्रात सुद्धा पवारांना गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री अशी महत्त्त्वाची खाती कधीही मिळाली नव्हती (नाही म्हणायला संरक्षणमंत्री पद हे त्यातल्या त्यात महत्त्वाचे पद २० महिने मिळाले होते). त्यांच्या पदरात कृषी मंत्री हे तुलनेने दुय्यम खातेच बहुसंख्य काळ पडले. महाराष्ट्रात त्यांच्या समर्थकांनी आणि मराठी माध्यमांनी पवार म्हणजे एकदम हिमालयाच्या उंचीचे देशातील नेते अशी प्रतिमा करून ठेवली आहे. त्यात तथ्य नाही. पवारांच्या तुलनेत करूणानिधी, जयललिता, मुलायम, मायावती, ममता इ. प्रादेशिक नेते व त्यांचे पक्ष जास्त हेवी समजले जातात. पवार व त्यांच्या पक्षाचे देशाच्या व राज्याच्या राजकारणातील महत्त्व पूर्णपणे संपले आहे. आपण दुर्लक्षित झालो आहोत हे जेव्हा जेव्हा पवारांच्या लक्षात येते तेव्हा तेव्हा काहीतरी वादग्रस्त विधाने करणे, अनपेक्षितरित्या एखाद्या वेगळ्याचे नेत्याची भेट घेऊन खळबळ माजवून देणे व त्यामार्गे स्वतः प्रकाशात येऊन काहीतरी गूढ निर्माण करून संशय वाढविणे असले प्रकार पवार सातत्याने करीत असतात. पूर्वी सुद्धा अचानक मातोश्रीवर जाऊन बाळ ठाकरेंची भेट घेणे किंवा तिसर्‍या आघाडीतील नेत्यांना भेटणे किंवा मोदींची भेट घेणे हा त्यातलाच प्रकार आहे. राष्ट्रीय नेत्यांना बारामतीला बोलावून संभ्रम निर्माण करून चर्चेच्या झोतात राहणे हा देखील त्यातलाच प्रकार. पवारांच्या आमंत्रणावरून काही नेते बारामतीला भेट देतात व पवारांविषयी चार बरे शब्द बोलतात त्यामागे केवळ शिष्टाचार व सौजन्य एवढाच भाग असतो. त्यात काहीही राजकीय अर्थ नसतो. अर्थात पवारांनी स्वतःविषयी इतका संशय व गूढ निर्माण करून ठेवले आहे की अशा प्रत्येक भेटीनंतर माध्यमे काहीतरी राजकीय अर्थ काढतात. प्रत्यक्षात त्यात काहीही नसते.

In reply to by श्रीगुरुजी

लक्ष का द्या ??मोदींकडे थोडी वेळ रिकामा आहे पवारांनी बोलावलं कि जायला .असे थोडी कोण मोठे नेते जातात कुठे ?लोक वेळ का देतात भेटायला??

In reply to by वरुण मोहिते

मोदी अनेक राज्यांना भेटी देतात. महाराष्ट्राप्रमाणे बिहार, केरळ अशा अनेक राज्यात निवडणुक नसताना सुद्धा जातात. सगळेच पंतप्रधान दिल्ली सोडून इतर शहरांना/राज्यांना भेट देत असतात. एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटन, एखाद्या पुतळ्याचा अनावरण समारंभ, एखाद्या विद्यापीठाचा पदवीदान समारंभ, एखाद्या नवीन प्रकल्पाचा शुभारंभ, कोणाचा तरी सत्कार अशी भेटीची अनेक कारणे असू शकतात. पवारांनी भेटीचे आमंत्रण दिल्यानंतर भेटीला नाही म्हणण्यासारखे काहीही नाही. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात भेट देता येते. सौजन्य व शिष्टाचाराचा हा भाग असतो. ज्या ज्या राज्यात पंतप्रधान भेट देतात त्या त्या राज्यात प्रोटोकॉल म्हणून त्या राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांबरोबर अधिकृत सरकारी कार्यक्रमात असतात. मोदी व नितीशकुमार बिहारमध्ये एका व्यासपीठावर एकत्र दिसले किंवा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन व मोदी केरळमधील एका कार्यक्रमात एकमेकांशी बोलताना दिसले तर त्यात काही राजकीय अर्थ नसतो. मोदी किंवा जेटली किंवा प्रणव मुखर्जी बारामतीला जाणे व पवारांचे कौतुक करणे यात कोणतीही राजकीय कृती नसून तो एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे. पवारांच्या ६१ व्या व ७ व्या वाढदिवसाला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण होते. त्या सर्वांनी पवारांचे कौतुक केले. त्यात फक्त औपचारिकताच होती व कोणताही राजकीय डाव नव्हता.

In reply to by श्रीगुरुजी

पण नितीशकुमार से सीखो ,मायावती से सीखो, करुणानिधी से सीखो ,ममता बॅनर्जी से सीखो अशी काही उदाहरण आहेत का ..असलीस तर शेयर करा वाचायला आवडेलतेवढीच माहितीत भर पडेल. प्रोटोकॉल असताना ठरलेलं असत कि कितपत बोलायचं . बाकी पंतप्रधानाच्या मर्जीवर .म्हणजे मोदी बोलतायत त्यावर लिंबू टीम्बू वैग्रे लोकांना मोदी भाव का देत आहेत . परत एकदा सांगतो मोदी काही निकष नाही ५-१० वर्ष सत्तेवर असतील जातील पण परत परत बाकीचे लोक का येत आहेत ?? स्तुती का करत आहेत ?

In reply to by वरुण मोहिते

पाळणार असाल तर अजून एक सांगा अख्ख्या दिल्लीत चर्चा चालू असते कि स्वार्थाशिवाय मोदी कोणाशी काहीच बोलत नाहीत .दुर्लक्ष करणं,स्वार्थ असेल तिथेच बोलणं हे त्यांना बरोबर जमत . आज कोणाला पटलं नाही तरी चालेल पण हे सत्य आहे कार्यशैलीचा अनुभव घेतलेली लोकं तरी बोलतात बाबा असं दिल्लीत . खरा खोटं देव जाणे. बाकी मोदी असोत नसोत ४० वर्षांपासून लोकं बारामतीत येत आहेत लिंबू टीम्बू माणसाकडे .केवळ विकासाचा मुद्दा आणि प्रकल्प पाहायला हा. बाकी राजकीय चर्चा जाऊदे .

In reply to by वरुण मोहिते

पवारजीसे सिखो असे पण उदाहरण नाही. जानेवारीत मोदी बिहारमध्ये गेले होते. तिथे त्यांनी नितीशकुमारांची स्तुती केली. त्यांनी पूर्वी ममता बॅनर्जींचेही कौतुक केले होते. ज्या राज्यात ते किंवा इतर नेते आमत्रणावरून भेट देतात, त्या राज्याच्या भेटीत यजमानांची स्तुती करणे ही औपचारिकता असते. त्यापलिकडे त्यात काहीही नसते. बारामतीला अधूनमधून काही नेते का भेट देतात हे कारण मी पूर्वी अनेकवेळा सांगितले. ते नेते स्वतःहून तिथे जात नसून पवार स्वतःहून त्यांना आमंत्रण देतात व त्यांच्या भेटीतून ते स्वतः प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करतात. त्यानिमित्ताने माध्यमे गॉसिप पसरवतात व त्यायोगे पवार काही दिवस प्रकाशझोतात राहतात.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणजे मुलायमसिंगची पण करायला हवी .सतत यु पी ला जातात म्हणून . बाकी निवडणुकीच्या वेळी स्तुती आणि बाकी स्तुती यात फरक आहे हो. असो पवारांना स्तुती च सर्टिफिकेट कशाला .. असतील नसतील आपलं तर म्हणणं होत कार्यक्षम मोदी का आले . विकास झाला असता त्याच ६-७ तासात उगाच लिंबू टीम्बू च आमंत्रण कशाला स्वीकारा.कोणपण देईल उद्या आमंत्रण मोदींची हि सवय घातक आहे . ममता बॅनर्जींचे कौतुक ?? ज्या वाजपेयींना त्यांनी हैराण केलं त्याच कौतुक चांगलंय म्हणायचं म्हणजे स्वार्थासाठी मोदी कुठेही जातात हा अर्थ होतोय देशासाठी घातक आहे हे . ज्या नितीश कुमारांनी लालू यादव यांच्यासोबत युती केली त्या नितीशकुमारांचं कौतुक देशासाठी घातक आहे हे . अवांतर_मी दिल्ली ला नसतो अधे मध्ये जातो महिन्यातून आम्ही तर काय इतके मोठे नाही कि बातम्या मिळायला . कानावर आलं दिल्लीत ते बोलो .

In reply to by वरुण मोहिते

जेव्हा पंतप्रधान किंवा इतर नेते एखाद्या राज्यात जातात त्यामागचे कारण आधी बघायचे असते. जेव्हा एखादा अधिकृत राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा कार्यक्रम असतो, एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटन असते, भूमीपूजन, पुतळ्याचे अनावरण इ. असते अशा प्रसंगी राजकीय टीका नसते. उलट एकमेकांचे आभारप्रदर्शन असते. जेव्हा निवडणुक प्रचारासाठी राज्यात भेट दिली जाते तेव्हा अर्थातच एकमेकांची उणीदुणी काढली जातात. या दोन भेटीमधला फरक लक्षात घेतला तर कधी स्तुती तर कधी टीका असे का ते लक्षात येईल. मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले. मुलायमसिंग २००७ पर्यंत पंतप्रधान होते. त्यामुळे मोदींनी उ. प्र. मध्ये जाऊन मुलायमसिगांबरोबर एखाद्या अधिकृत कार्यक्रमात जाणे शक्यच नव्हते. २०१४ च्या निवडणुक प्रचारात मोदींनी पवार चाचा-भतीजांवर भरपूर टीका केलेली आहे. परंतु बारामतीला पवारांच्या निमंत्रणावरून भेट घेतल्यावर तिथे राजकीय भूमिका न घेता यजमानांविषयी चार बरे शब्द बोलणे हा शिष्टाचाराचा भाग आहे. त्यापलिकडे यात अर्थ नाही. राहुल व केजरीवाल मोदींवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. मोदीही प्रत्त्युत्तर देतात. परंतु तेच मोदी राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. याचा अर्थ राहुल आणि मोदी एकत्र येत आहेत असा नसतो.

In reply to by श्रीगुरुजी

लक्ष का द्या ??मोदींकडे थोडी वेळ रिकामा आहे पवारांनी बोलावलं कि जायला .असे थोडी कोण मोठे नेते जातात कुठे ?लोक वेळ का देतात भेटायला??

In reply to by वरुण मोहिते

पवारांकडे दाखवण्यासाठी काहीतरी आहे म्हणून बोलावतात आपल्या घरी. आपण नाही का चांगले घर नसले की मित्र मंडळींना टाळतो घरी बोलावण्यासाठी. त्याच बरोबर आपल्या मतदार संघाची आणखी प्रगती कशी होऊ शकते याचा ध्यास घेणारे नेते उरलेत कुठे भारतात ?