यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे.
दोन राज्यातील तीन लोकसभा (जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आणि अनंतनाग तसेच केरळमधील मल्लापुरम) आणि १० राज्यांमधील १२ विधानसभा (आसामातील धेमाजी, हिमाचल प्रदेशातील भोरांज, मध्य प्रदेशातील अटेर आणि बांधवगड, पश्चिम बंगालमधील कांथी दक्षिण, राजस्थानमधील धोलपूर, कर्नाटकातील नंजनगड आणि गुंडुलपेट, तामिळनाडूतील डॉ. राधाकृष्ण नगर, झारखंडमधील लिटिपारा, सिक्किममधील अपर बुर्तुक आणि दिल्लीमधील राजौरी गार्डन) या मतदारसंघात दोन टप्प्यांमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम (९ आणि १२ एप्रिल) निवडणुक आयोगाने जाहिर केला होता. त्यापैकी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील तर तामिळनाडूमधील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक निवडणुक आयोगाने रद्द केली आहे. इतर मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात ९ एप्रिलला मतदान पूर्ण झाले तर उरलेल्या मतदारसंघांमध्ये १२ एप्रिलला मतदान होईल. मतमोजणी १३ एप्रिलला होईल.
श्रीनगर मतदारसंघातून २०१४ मध्ये निवडून गेलेल्या पी.डी.पीच्या खासदाराने मागच्या वर्षी बुरहान वाणी प्रकरणानंतर उसळलेल्या असंतोषादरम्यान राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणुक जाहिर करण्यात आली. पण या मतदारसंघात अवघे साडेसहा टक्के मतदान झाले. तसेच मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही झाला. त्यामुळे निवडणुक आयोगाने राज्यातील अनंतनाग या मतदारसंघातील पोटनिवडणुक सध्या रद्द केली आहे. या मतदारसंघातून २०१४ मध्ये पी.डी.पी च्या मेहबूबा मुफ्ती लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर पोटनिवडणुकीत विजय मिळवून जम्मू-काश्मीर विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
तामिळनाडूतील चेन्नई शहरातील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातून २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जयललितांचा विजय झाला होता. त्यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती. ही पोटनिवडणुक प्रतिष्ठेची होती. अण्णा द्रमुकच्या शशीकला नटराजन गटाने पक्षाचे ज्येष्ठ नेते टी.टी.व्ही.दिवाकरन यांना तर ओ.पन्नीरसेल्वम गटाने ई.मधुसुदनन यांना उमेदवारी दिली होती. त्याचबरोबर जयललितांच्या भाचीने-- जे. दीपानेही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. ही पोटनिवडणुक जिंकेल त्या गटाला जयललितांचा वारसा मिळेल असे म्हटले जाईल हे नक्कीच. त्यामुळे या निवडणुका दोन्ही गटांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. या निवडणुकांसाठी पैशाचा महापूर वाहिला. तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांच्या घरावर आयकर विभागाचा ढापाही पडला. त्यातून निवडणुक आयोगाने ही पोटनिवडणुक रद्द केली.
दिल्लीमधील राजौरी गार्डन मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे. या मतदारसंघात २०१५ मध्ये आआपचे जरनेलसिंग निवडून गेले होते. त्यांनी दिल्ली विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पंजाबमधील लांबी मतदारसंघात प्रकाशसिंग बादल यांच्याविरूध्द निवडणुक लढवली. पण त्याच मतदारसंघातून कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीही निवडणुक लढवली. प्रकाशसिंग बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग या महारथींपुढे जरनेलसिंगची डाळ शिजली नाही आणि लांबीमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. हातात असलेली दिल्लीतील आमदारकी उगीचच त्यांनी सोडली. आता आआपने त्यांना उमेदवारी न देता हरजितसिंग या नव्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. भाजप-अकाली दल युतीतर्फे अकाली दलाचे मनजिंदरसिंग सिरसा (२०१३ मधील विजयी उमेदवार) यांना तर काँग्रेसतर्फे मिनाक्षी चंदेला यांना उमेदवारी दिली गेली आहे. या मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे कारण हा निकाल लागल्यानंतर १० दिवसातच दिल्ली महापालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत याची कल्पना राजौरी गार्डनमधील निकालामुळे येईल. दिल्लीच्या पश्चिम भागात असलेल्या या मतदारसंघात १९४७ मध्ये पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या शीखांची (आणि त्यांच्या वंशजांची) संख्या लक्षणीय आहे. तसेच पंजाबशी या भागातील शीख मतदारांचे जवळचे संबंध आहेत. अनेकांचे नातेवाईक पंजाबमध्ये आहेत. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला त्याचा फायदा उठवायचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. तसेच काँग्रेस नेते अजय माकन यांचा पूर्वीचा हा मतदारसंघ आहे. अजय माकन राजौरी गार्डनमधून १९९३, १९९८ आणि २००३ या ३ निवडणुकांमध्ये दिल्ली विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांचे घरही राजौरी गार्डनच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे काँग्रेस इथे चांगलाच जोर लावत आहे. या मतदारसंघात भाजपचा विशेष जोर नाही. आतापर्यंत एकदाच २०१३ मध्ये भाजप-अकाली दल युतीने ही जागा जिंकली होती. २०१५ मध्ये आआपने तर इतर सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती. या मतदारसंघात पराभव झाल्यास आआपच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर नक्कीच परीणाम होईल आणि १० दिवसांनंतर असलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकांसाठी ते पुरेशा आत्मविश्वासाने सामोरे जाणार नाहीत हे नक्कीच. त्या दृष्टीने आआप आणि केजरीवालांसाठी ही पोटनिवडणुक महत्वाची आहे.
१३ एप्रिलला पोटनिवडणुकांचे निकाल आल्यावर ते इथे पोस्ट करेनच.
वर्गीकरण
वाचने
59366
प्रतिक्रिया
300
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोंग्रेस जिंकतय तिथे असं
MCD कॉंग्रेस ने जिंकावी अस
मलाही तसेच वाटते
In reply to MCD कॉंग्रेस ने जिंकावी अस by सचु कुळकर्णी
आज दिल्लीतील इन्फ्रास्ट्रक्चर
In reply to मलाही तसेच वाटते by गॅरी ट्रुमन
ताज्या घडामोडी
"ताज्या राजकिय घडामोडी"असे शिर्षक खरेतर योग्य दिसेल. कारण ह्या धाग्यांवर राजकारणावर चर्चा अधिक होताना दिसते. दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरिवाल यांना पंजाब व गोव्यात झालेला दारुण पराभव इतका जिव्हरी लागला आहे की, आजकाल ते पत्रकार परिषदा घेऊन काहिही बरळत सुटले आहेत. EC ला त्यांनी धृतराष्ट्र व BJP ला दुर्योधन म्हटले आहे. ज्या इव्हीएम ने त्यांचे ६७ आमदार दिल्लीत निवडुन आणले त्याच इव्हीएम वर आज ते संशय व्यक्त करत आहेतआरोप
In reply to ताज्या घडामोडी by प्रसाद_१९८२
Congress and its chief Sonia
अमेरिकेचे प्रयोजन
अरे भाई, केहना क्या चाहते हो?
In reply to अमेरिकेचे प्रयोजन by गामा पैलवान
दुभंग अमेरिका
In reply to अरे भाई, केहना क्या चाहते हो? by गॅरी ट्रुमन
असू द्या हो !!
In reply to दुभंग अमेरिका by गामा पैलवान
हम्म
In reply to अमेरिकेचे प्रयोजन by गामा पैलवान
केजरीवाल यांच्या पाठोपाठ
अमेरिका अर्थात युनायटेड
चान चान
In reply to अमेरिका अर्थात युनायटेड by सचु कुळकर्णी
गौरक्षक ह्या झेंड्याखाली
अगदी अगदी सच्च्या.
In reply to गौरक्षक ह्या झेंड्याखाली by सचु कुळकर्णी
दोघांनाही कडक सहमती... सचुभौ,
In reply to अगदी अगदी सच्च्या. by अभ्या..
बैलांना यातना होतात हे पण
In reply to दोघांनाही कडक सहमती... सचुभौ, by संदीप डांगे
दळभद्री आहेत ****
In reply to दोघांनाही कडक सहमती... सचुभौ, by संदीप डांगे
राजस्थान
कठीण आहे वसुंधरा राजे
प्रतिष्ठा?
In reply to कठीण आहे वसुंधरा राजे by वरुण मोहिते
हेच ते
In reply to प्रतिष्ठा? by गॅरी ट्रुमन
ट्रम्पसाहेबांचा २०१३ मधील टिवटिवाट
सत्तेबाहेर असतानाचं र्
In reply to ट्रम्पसाहेबांचा २०१३ मधील टिवटिवाट by गॅरी ट्रुमन
सहमत आहे
In reply to सत्तेबाहेर असतानाचं र् by अनुप ढेरे
http://indianexpress.com
सर्व अमेरिकन प्रेसिडेन्ट्स हे
कुलभूषण जाधव यांच्या
तो मुद्दा बोलायला अजून
बरोबर आहे तुमचे , पण हि अटक
In reply to तो मुद्दा बोलायला अजून by वरुण मोहिते
संशयास्पद प्रकार
In reply to बरोबर आहे तुमचे , पण हि अटक by साधा मुलगा
तिकडून पकडून आणून खोटेपणाने
अखेर ज्याची भीती होती ते
विदेशी खाते कर अनुपालन कायद्यांतर्गत असलेल्या खात्यांनाच हा नियम
In reply to अखेर ज्याची भीती होती ते by संदीप डांगे
सर्व बातमीतून हा एक उल्लेख
In reply to विदेशी खाते कर अनुपालन कायद्यांतर्गत असलेल्या खात्यांनाच हा नियम by अनन्त अवधुत
…तर तुमची बँक खाती १ मेपासून
माझ थोड कनफ्युजन ईथेहि आहे, खाते उघडण्याच्या कालावधी संदर्भात.माझ थोड कनफ्युजन ईथेहि आहे,
The purpose of FATCA is aimed
निवडणुक आयोगाचे खुले आव्हान
आव्हान १३ एप्रिल पासून (पक्षी
In reply to निवडणुक आयोगाचे खुले आव्हान by गॅरी ट्रुमन
संशय घेण्यासाठी
In reply to आव्हान १३ एप्रिल पासून (पक्षी by नितिन थत्ते
MCD Elections 2017 Opinion
सर्व्हे
In reply to MCD Elections 2017 Opinion by श्रीगुरुजी
एकदम विरुद्ध अंदाज
In reply to सर्व्हे by गॅरी ट्रुमन
Rigged EVMs? Then How Do You
In reply to एकदम विरुद्ध अंदाज by श्रीगुरुजी
क्लिंटन साहेब
प्रचंड सहमत
In reply to क्लिंटन साहेब by सचु कुळकर्णी
शब्दाशब्दाशी सहमत.
In reply to प्रचंड सहमत by गॅरी ट्रुमन
राहुल काँग्रेस हा पर्याय नक्कीच नाही.
In reply to शब्दाशब्दाशी सहमत. by मोदक
विरोधी पक्ष नॉनइश्यूंचा इश्यू
In reply to प्रचंड सहमत by गॅरी ट्रुमन
तुम न आओगे तो मरने कि है सौ
Israeli Prime Minister
Russia vetoed a draft UN
पोटनिवडणुक निकालांचे कल
विश्लेषण आणि अपेक्षा
In reply to पोटनिवडणुक निकालांचे कल by गॅरी ट्रुमन
एकंदरीत आपापल्या जागा
सध्या १० पैकी ६ जागांवर भाजपा
राजौरी गार्डनमध्ये अकाली दलाचा विजय. आआपला जोरदार झटका
पुन्हा भाजपच!; पोटनिवडणुकीतही
पोटनिवडणुकीत भाजपला ३ जागांचा
राणे भाजपमध्ये जाणार याची
वेगळा विदर्भ (नांदी?)
In reply to राणे भाजपमध्ये जाणार याची by श्रीगुरुजी
<<<या कृत्यामुळे ब्राह्मण
U. S. drops ‘mother of all
फक्त ३६
In reply to U. S. drops ‘mother of all by श्रीगुरुजी
आज मोदींनी सांगितले की
जाणीवपूर्वक केली जाणारी
In reply to आज मोदींनी सांगितले की by पिलीयन रायडर
त्यांनी दोन प्रश्न विचारले,
In reply to जाणीवपूर्वक केली जाणारी by संदीप डांगे