कथा आणि व्यथा
बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....!!
चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची .
"सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा.
थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? "
धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ."
रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला. गावातल्या पुढा-यांनी फोन केला . आरं बापा कडं पहा जरा .तू तू मी मी नका करू . सारं विसरून जा" पण छया...छया...!! काही फरक पडला नाही .म्हतारं बेशुध्द झालं .
शेवटी दोघ आले .
थोरला: "दादा मी आलो .उठ बर.मी केळ आणलीत चिक्कू आणलेत .खा बर थोडं "
धाकटा: "दादा बघ बदाम आणलेत .बिस्किट आणलीत बघ कपडे आणलीत"
थोरला: "पाणी चांगल शुध्द प्यायला पाहिजे.बघ दादा फिल्टर आणलं ."
धाकटा: ."लय घाण दारात .आजार होणारच.मी पैस देतो. शौचालयच बांधून देतो. "
म्हतारी सारं ऐकत व्हती .ती जरा सटकली म्हणाली , "आरं शाहण्यावं, म्हता-याला दवाखान्यात न्यायचं सोडून हे काय लावलं ?फिल्टारच काय आणताय? संडास काय बांधता ?सारी नाटकचं का ? दवाखान्यात न्या नाहीतर म्हया राजाच्या मातीला सुद्दीक येऊ नका ."
कथेतल्या पोरांसारखंच सरकार निष्ठूर झालं आहे. शेतक-यांच्या रोज आत्महत्या होत आहेत आणि हे धोरण आखताहेत शेतक-याची कर्ज माफी ,कर्ज मुक्तीची मागणी असतानी मुख्यमंञ्याला कशा सुंदर कल्पना सुचतात ? कसे भयकर उपाय सुचतात ? या पेक्षा निष्ठूर कोणं असू शकेल बरं ? काय शेतक-याची व्यथा आहे आणि काय कथा झाली आहे.
. . . . . . . . . परशुराम सोंडगे, पाटोदा
वाचने
45266
प्रतिक्रिया
244
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणखी एक उपाय सांगतो.
नितीन जी
In reply to आणखी एक उपाय सांगतो. by नितिन थत्ते
विशुमितजी
+१००००
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
अमर जी,
In reply to +१०००० by संदीप डांगे
हो हो. तो प्रतिसाद गंमतीत
In reply to अमर जी, by विशुमित
प्रतिसाद गंमतीत दिला असला तरी
In reply to हो हो. तो प्रतिसाद गंमतीत by नितिन थत्ते
एक प्रश्न
लागवड आधीही होत होतीच. पण
In reply to एक प्रश्न by नितिन थत्ते
कर्जमाफीच्या भूलथापा
लेख आवडला.
In reply to कर्जमाफीच्या भूलथापा by रांचो
प्रश्न फक्त तेवढाच नाही.
In reply to लेख आवडला. by विशुमित
सरकारी स्तरावरील सगळ्या
In reply to प्रश्न फक्त तेवढाच नाही. by रांचो
उत्तम!
In reply to सरकारी स्तरावरील सगळ्या by विशुमित
ऐतिहासिक दिनु
डांगेराव आता बहुतेक
In reply to ऐतिहासिक दिनु by गामा पैलवान
<<<जीवनावश्यक वस्तूंच्या
In reply to डांगेराव आता बहुतेक by श्रीगुरुजी
बिगर-शेतकरी वर्ग सरकारी
In reply to <<<जीवनावश्यक वस्तूंच्या by विशुमित
बिगर-शेतकरी वर्ग सरकारी भिकेवर किती जगणार, असे जर शेतकऱ्यांनी प्रश्न केला तर वावगे ठरेल का?अजिबात वावगे ठरणार नाही. परंतु शेतकर्यांप्रमाणे आम्ही सुद्धा आयकर भरणार नाही, वीजबिल भरणार नाही, कर्जाची परतफेड करणार नाही, आम्हाला वारंवार कर्जमाफी द्या असे प्रश्न बिगरशेतकर्यांनी केले तर ते वावगे ठरेल का?भाजीपाला घ्याची ऐपत नसेल तर बिस्कीट खाऊन दिवस काढावेत, असा आगाऊ सल्ला त्यांना रुचेल का? साखर परवडत नसेल तर चहाचं फळकुटणं पिऊन तलफ भागवावी, अशी लाज काढली तर त्यांना आवडेल का? भाजीपाला-कांदा-धान्य विकायला दारात येणार नाही असे जर शेतकऱ्याने ठणकावून सांगितले तर शेपटी सरळ ठेवणार का? व्यापाऱ्यांशी संलग्न होऊन देशात माल न विकता, परदेशातून ज्यादा पैका कमावला तर इतरांची हरकत नसावी, काय म्हणता?बिगरशेतकरी आणि शेतकरी हे दोघेही ग्राहक असतात, परंतु प्रत्येक ग्राहक हा शेतकरी असेलच असे नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा फटका शेतकर्यांनाही बसतोच. त्यामुळेच सरकारला हस्तक्षेप करावा लागतो. तसेही शेतकरी भाजीपाला-कांदा-धान्य विकायला ग्राहकांचा दारात येत नाहीतच, त्यामुळे शेपटी सरळ ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. व्यापाऱ्यांशी संलग्न होऊन देशात माल न विकता, परदेशातून ज्यादा पैका कमावला तर कोणाची काहीच हरकत नाही. तसे केल्याने देशांतर्गत टंचाई निर्माण झाली तर सरकार बाहेरून आयात करेलच. त्यामुळे काळजी नसावी. देशात मागणी असताना जास्त दराने माल बाहेरच विकायचा असेल तर त्यावर नियमाप्रमाणे निर्यातकर, नफ्यावर आयकर इ. भरण्याची तयारी ठेवा आणि वीजबिले भरणे, कर्जाची परतफेड इ. गोष्टीही करा.==>आयकर- म्हणजे आयकर भरत नाही
In reply to बिगर-शेतकरी वर्ग सरकारी by श्रीगुरुजी
आयकर- म्हणजे आयकर भरत नाही
In reply to ==>आयकर- म्हणजे आयकर भरत नाही by विशुमित
आयकर- म्हणजे आयकर भरत नाही म्हणून कसे पण रेटणार. आता त्या कक्षेमध्ये नाही म्हणून शेतकरी तो भरत नाही. त्या कक्षेत सरकार ने आणला तर १००% भरणार.(घर भाड्याची खोटी बिले सादर करून आयकर वाचवणारे निर्लज्ज खूप पाहिले आहेत.)शेतकर्यांनी पूर्णपणे कक्षेच्या बाहेर ठेवलेले आहे. त्यामुळे ते आयकर भरतच नाहीत. ==>वीजबिल- ऐकीव माहिती वर तुमचा असा समज झालेला दिसतोय की प्रत्येक शेतकरी वीज बिल भरत नाही/वीज चोरी करतो. असे जर असते तर वीज मंडळाला कधीच टाळे ठोकावे लागले असते. जिथे सरकारी वीजमंडळाचे अधिकारी/कर्मचारी काम चुकार आणि भ्रष्ट आहे तिथेच हा प्रकार चालू असतो आणि तो पण काही %. वीज बिले थकीत असू शकतात पण वसूल केले जातात. त्यामुळे सगळेच शेतकरी चोर/ बुडवे आहेत असले थेट आरोप करू नका. (कृपया तुमच्या पाह्ण्यातल्या नातेवाईकांची उदाहरणे देऊ नका.) शेतकर्यांना अत्यल्प दराने वीजपुरवठा होतो. तरीसुद्धा त्यातील ९०% शेतकरी वीजबिल भरतच नाहीत. त्यांच्याकडून येणार्या थकबाकीची रक्कम फक्त महाराष्ट्रातच १८००० कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. सगळे शेतकरी बुडवे नसतील कदाचित, परंतु ९०% तरी आहेत ना. सर्वांनी वेळेवर कर्जाची परफफेड केली असती तर अनेकवेळा कर्जमाफी द्यावीच लागली नसती. फटका प्रत्येकालाच बसतो, पण बिगरशेतकर्यांना वीजबिल माफी, कर्जमाफी, आयकर माफी अशा सवलती मिळत नाहीत. आयकर, वीजबिल इ. भरणारी, कर्जाची परतफेड करणारी, कर्जमाफी न मागणारी, दरवर्षी वेगवेगळी कारणे पुढे करून नुकसानभरपाई न मागणारी बिगरशेतकरी जनता अजिबात भिकारी नाही. तुम्ही त्यांच्याबद्दल आस्था ठेवली किंवा नाही ठेवली तरी त्यांना फरक पडत नाही. ते काही कायम सरकारकडे कटोरा घेऊन जात नाहीत. ऐपत नसली तर ते आपल्या ऐपतीप्रमाणे सुकडी खातील किंवा श्रीखंडपुरी खातील. परंतु सरकारी मदतीसाठी तोंड वेंगाडणार नाहीत.<<<शेतकर्यांनी पूर्णपणे
In reply to आयकर- म्हणजे आयकर भरत नाही by श्रीगुरुजी
>
In reply to <<<शेतकर्यांनी पूर्णपणे by विशुमित
शेतकर्यांनी पूर्णपणे कक्षेच्या बाहेर ठेवलेले आहे. त्यामुळे ते आयकर भरतच नाहीत.>> -- आणू द्यात की आयकराच्या कक्षेत. नफ्यावरच कर भरायचा आहे ना भरतील ना मग. जास्त काय करावं लागेल अकाउंट्स नीट ठेवावे लागतील. उलट शेतकऱ्यांचा फायदा होईल त्याने.पर्फेक्ट. हेच हवं होतं. पूर्वी २००१ मध्ये साखर कारखान्यांच्या नफ्यावर आयकर लावण्याचे प्रयत्न झाले होते, तेव्हा शेतकरी संघटनांनी थयथयाट केला होता. साखर कारख्यान्यांचे सभासद शेतकरी असल्याने, कारखान्याने मिळविलेल्या नफ्यावर आयकर लावणे म्हणजे थेट शेतकर्यांच्या शेती उत्पन्नावर कर लावण्यासारखं आहे असा युक्तीवाद करून कारखान्यांच्या सभासदांनी आयकर भरायला विरोध केला होता. या कराविरूद्ध तत्कालीन कृषी राज्यमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांना सांगली जिल्ह्यात नागनाथ नायकवडींच्या नेतृत्वाखाली घेराव घालून त्यांना अडवून ठेवले होते. या कराचा प्रस्ताव शेवटी रद्द केला गेला. आम्हाला आयकर लावा. आयकराला आमची अजिबात हरकत नाही असे कितीही उच्चरवाने सांगितले तरी आयकराचे नुसते सूतोवाच केल्यावर शेतकरी थयथयाट करून तो रद्द करायला लावतील.मी एका मागील प्रतिसादात यासंबंधी एक यूआरएल दिली होती. ती वाचली असेलच. त्यात तुम्हाला यासंबंधी माहिती मिळेल. तीन वर्षांपूर्वी शेतकर्यांची वीजबिल थकबाकी १३००० कोटी रूपयांहून अधिक होती. काही दिवसांपूर्वीच लोकसत्तात आलेल्या बातमीनुसार ही थकबाकी आता १८००० कोटींच्या जवळपास गेली आहे.सर्वांनी वेळेवर कर्जाची परफफेड केली असती तर अनेकवेळा कर्जमाफी द्यावीच लागली नसती.>>> -- किती वेळा कर्ज माफी दिली आहे मायबाप सरकार ने ? शेतकऱ्यांनी किती कर्जे घेतली, किती फेड केली, किती बाकी आहेत आणि किती पूर्ण बुडवली आहेत याची कोणाकडे अधिकृत सरकारी आकडेवारी असेल तर कृपया येथे देऊ शकेल का ?१९७८ मध्ये तुमच्या पवार साहेबांनी कर्जावरील व्याज माफ केले होते. नंतर १९८० मध्ये जनाब अंतुलेंनी संपूर्ण कर्जमाफी केली होती. १९९० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री मधू दंडवते यांनी कर्जमाफी जाहीर केली होती (त्यावेळच्या कर्जमाफीचा नक्की आकडा आठवत नाही). २००८ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम् यांनी एकूण ७२००० कोटी रूपये कर्जमाफी केली होती (पवार साहेबांचे समर्थक ही कर्जमाफी त्यांनीच केली असे सांगत फिरत होते. अंदाजपत्रक दुपारी ४ वाजता लोकसभेत सादर होऊन त्यात कर्जमाफीची घोषणा झाल्यावर दुसर्या दिवशी सकाळी ८ च्या सुमाराला येरवडा, गुंजन चित्रपटगृहावरून जाणारा नगर रस्ता इ. ठिकाणी कर्जमाफीबद्दल पवार साहेबांचे आभार मानणारे प्रचंड मोठे फ्लेक्स मी पाहिले होते. अंदाजपत्रक सादर केल्यानंतर केवळ काही तासात ४०-५० फूट लांब व १५-२० फूट रूंदीचे फ्लेक्स रंगवून वर लावणे हे अत्यंत आश्चर्यकारक घटना होती. पवारांच्या पित्त्यांना कर्जमाफीची घोषणा होणार हे बहुतेक आधीच समजले असावे. त्याशिवाय इतक्या कमी वेळात इतके मोठे फ्लेक्स रंगवून उंचावर टांगणे शक्य वाटत नाही. अर्थात कर्जमाफीचा निर्णय अर्थमंत्र्यांचा होता, परंतु पवारांचे पित्ते फ्लेक्सच्या माध्यमातून पवारांना श्रेय देत होते.). १९९१ ते २००७ या काळात अजून एकदोनदा कर्जमाफी झालेली आहे. परंतु त्याचे डिटेल्स आठवत नाहीत.बिगरशेतकरी जनता अजिबात भिकारी नाही. तुम्ही त्यांच्याबद्दल आस्था ठेवली किंवा नाही ठेवली तरी त्यांना फरक पडत नाही. ते काही कायम सरकारकडे कटोरा घेऊन जात नाहीत.>>> --"जीवनावश्यक वस्तूंच्या भावात सरकारने हस्तक्षेप करणे योग्यच आहे" हे बोलून बिगरशेतकरी लोक किती लाचार आहेत आहेत हे दिसून येते. फरक एवढाच आहे की कटोरा घेऊन चौकात बसावे लागत नाही सरकार स्वतः घरी येऊन त्यांच्या कटोऱ्यात भीक घालून जाते. जीवनावश्यक औषध वाले सरकार आणि जनतेला किती भीक घालते आहे ते दिसतंय आमच्या उघड्या डोळ्यांना.बिगर शेतकरी लाचार वगैरे अजिबात नाहीत. ते अजिबात कटोरा वगैरे घेऊन बसलेले नाहीत. ते कटोरा घेऊन बसले असते तर आमचे कर्ज माफ करा, वीजबिल माफ करा, आयकरापासून मुक्ती द्या अशा मागण्या त्यांनी केल्या असत्या. भाव वाढले तर लोकक्षोभ होऊन निवडणुकीत फटका बसेल या भीतिने सरकार स्वतःहून भाव कमी करण्याचा प्रयत्न करते. सरकारचा हस्तक्षेप हा फक्त बिगरशेतकर्यांसाठी नसतो. त्यात शेतकरी सुद्धा लाभार्घी असतात कारण सर्व ग्राहक शेतकरी नसले तरी सर्व शेतकरी हे ग्राहक असतातच व त्यामुळे भाव वाढले की त्यांनाही त्रास होतो आणि भाव कमी झाले की इतरांप्रमाणे त्यांनाही फायदा होतो.ऐपत नसली तर ते आपल्या ऐपतीप्रमाणे सुकडी खातील किंवा श्रीखंडपुरी खातील.>>> -- कांदा थोडा महाग काय झाला तर भळा-भळा रडत होते. गळ्यात कांद्याचे हार काय घालत होते. काय थेरं करत होती. २०० रु तूर डाळ झाली काय सोने मोडायला सोनाराकडे जायला लागले होते लोक. साखर परवडत नाही म्हणून मधुमेह नसला तरी साखर वाढली म्हणून साखरेचे खाणे कमी केले आहे लोकांनी.गळ्यात कांद्याचे हार घालणे इ. प्रकार आमदार वगैरे करतात. सामान्य जनता मिळेल त्या भावाने कांदे व इतर गोष्टी घेतच असते. भळाभळा रडतबिडत कोणीही नव्हते. लोक आपले अंदाजपत्रक, खर्च, खरेदी इ. व्यवस्थित मॅनेज करतात कारण त्यांना माहित असते की आपल्याला शेतकर्यांप्रमाणे कर्ज थकवून किंवा वीजबिल थकवून चालणार नाही. लागोपाट २ महिने वीजबिल भरले नाही तर लगेच नोटिस येते आणि तिसर्या महिन्यातही नाही भरले तर वीज तोडली जाते. वीजबिल न भरणे, वीज महामंडळाच्या अधिकार्यांना मारहाण करणे, त्यांना कोंडून ठेवणे, आकडा टाकून वीज चोरणे इ. प्रकार बहुसंख्य सामान्य जनता करत नाही. तूर डाळ १८० रूपये झाली तरी लिक घेत होतेच. त्यासाठी सोनेबिने असले काही मोडल्याचे ऐकिवात नाही. साखर महाग झाली तरी कोणीही साखर खाणे कमी केलेले नाही. लोक ३० रू. किलो भावाने साखर घेतात आणि ५० रू. किलो भावाने पण घेतात. लोक चिडले तर आपली सत्ता जाईल या भीतिने सरकार स्वतःहूनच हस्तक्षेप करते.<<<शेतकरी थयथयाट करून तो रद्द
In reply to > by श्रीगुरुजी
>
In reply to <<<शेतकरी थयथयाट करून तो रद्द by विशुमित
शेतकरी थयथयाट करून तो रद्द करायला लावतील>> -- ऊस एक असं पीक आहे त्यावर शाश्वत काहीतरी रक्कम शेतकऱ्याच्या हातात पडते. त्यावर तुमचे माझे कधीच एकमत होणार नाही. भूतकाळात काय झाले त्याला थोडे बाजूला ठेवू. शेतकऱ्याला भविष्यात टिकून राहायचं असेल तर जागतिकारणाची सगळी मूल्ये अंगिकारायला माझ्या सारखे असंख्ये शेतकरी आहेत. या बद्दल थोडे शहरातून बाहेर पडा. भरपूर सापडतील.शाश्वत रक्कम हाती पडण्याचा आणि कारख्यान्याच्या नफ्यावर लावलेल्या आयकराला विरोध करण्याचा काय संबंध आहे? जागतिकीकरण अंगिकारायचे तर स्पर्धेला व उत्पादनाचा दर्जा राखायला तोंड द्यायला हवे. हमी भाव, अनुदान इ. गोष्टी अंगिकारून जागतिकीकरणाला तोंड देता येणार नाही.-- कोणी कोणी कधी कधी किती कृषी कर्ज माफी केली तोंड पाठ आहे. औदयोगिक कर्जाचे 'ठक'बाकीदार शी तुलना असेल तर कृपया द्याल का ? आमचे साहेब (तुमचे कोणीच नाहीत), त्यांचे पित्ते (हा काय प्रकार आहे पिते) आणि त्यांचे फ्लेक्स हे सगळे देण्याचे प्रयोजन नाही समजले.तुम्ही कर्जमाफीबद्दल विचारले म्हणून आठवले तेवढे सांगितले. बाकी तुमच्या साहेबांचा आणि आमचा काहीही संबंध नाही.भाव वाढले तर लोकक्षोभ होऊन निवडणुकीत फटका बसेल या भीतिने सरकार स्वतःहून भाव कमी करण्याचा प्रयत्न करते. लोक चिडले तर आपली सत्ता जाईल या भीतिने सरकार स्वतःहूनच हस्तक्षेप करते.>> -- तेच तर म्हणालो ना त्यांना कटोरा घेऊन बसायची गरज नाही त्यांना घरपोच भीक मिळते .बिगरशेतकरी जनता भिकारी असेल तर त्यांच्यात शेतकरी सुद्धा येतात कारण शेतकरी हे ग्राहक सुद्धा आहेत. ज्या भावाने बिगरशेतकर्यांना वस्तू मिळतात त्याच दराने शेतकर्यांना सुद्धा मिळतात.गळ्यात कांद्याचे हार घालणे इ. प्रकार आमदार वगैरे करतात.>> -- कर्ज माफी पण आमदारच मागत आहेत. हाईट म्हणजे सरकार मध्ये असणारे भाजपचे पण आमदार घोषणा देत होते. आम्ही काय त्याच्या वरच नाही बसलो. आम्ही आमची सोय केली आहे.ही मागणी फक्त आमदारांची नाही. मराठा मूक मोर्चातील मागण्यांपैकी 'शेतकर्यांना कर्जमाफी' ही एक प्रमुख मागणी होती. २५-३० शहरातून निघालेले प्रत्येकी ३०-४० लाखांचे मोर्चे पाहिले तर महाराष्ट्रातील यच्चयावत सर्व शेतकर्यांनी ही मागणी केली होती असे म्हणता येईल.वीजबिल न भरणे, वीज महामंडळाच्या अधिकार्यांना मारहाण करणे, त्यांना कोंडून ठेवणे, आकडा टाकून वीज चोरणे इ. प्रकार बहुसंख्य सामान्य जनता करत नाही.>>> -- वरील सगळे प्रकार बहुसंख्य सामान्य शेतकरी सुद्धा नाही करत. अभ्यास वाढवा. चष्मे बदला.अशा बातम्या वाहिन्यांवर पाहिल्यात आणि माध्यमातून सुद्धा वाचल्यात.अशा बातम्या वाहिन्यांवर
In reply to > by श्रीगुरुजी
हेच आहे. केवळ सनसनाटी
In reply to अशा बातम्या वाहिन्यांवर by विशुमित
एन्रॉन प्रकल्प
In reply to <<<शेतकर्यांनी पूर्णपणे by विशुमित
==>आयकर- म्हणजे आयकर भरत नाही
In reply to बिगर-शेतकरी वर्ग सरकारी by श्रीगुरुजी
व्यापाऱ्यांशी संलग्न होऊन
In reply to <<<जीवनावश्यक वस्तूंच्या by विशुमित
असे
काही इतर अडचणी.....
आता काय तिथे पण आरक्षण हवे का
In reply to काही इतर अडचणी..... by नितिन थत्ते
चिल माडी....
In reply to आता काय तिथे पण आरक्षण हवे का by मोदक
डिस्टिन्क्शन च काय घेऊन बसलात
In reply to काही इतर अडचणी..... by नितिन थत्ते
विशुमितजी
माहिती बद्दल धन्यवाद..!!
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
छान चर्चा
विशुमितजीं ...
तसेच अमुल चा उपक्रमही
In reply to विशुमितजीं ... by अमर विश्वास
तसेच अमुल चा उपक्रमही अभ्यासला (Case study) आपण खुप काही शिकण्यासारखे आहे.याबद्दल अजुन थोडे लिहाल का..? वेगळी लेखमाला झाली तरी हरकत नाही.<<<तुमचे याआधीचेही प्रतिसाद
In reply to विशुमितजीं ... by अमर विश्वास
विशुमितजी
<<<माझ्या एका तरी प्रतिसादात
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
श्रीगुरुजींचे ता.ल.
ते कसं काय बुवा?
In reply to श्रीगुरुजींचे ता.ल. by गामा पैलवान
नफातोटा
In reply to ते कसं काय बुवा? by श्रीगुरुजी
यालाच तार्किक लघुमंडळ ( =
In reply to नफातोटा by गामा पैलवान
फक्त एकमार्गी हस्तक्षेप का म्हणून?
In reply to यालाच तार्किक लघुमंडळ ( = by श्रीगुरुजी
अन्नधान्यांच्या काही
In reply to फक्त एकमार्गी हस्तक्षेप का म्हणून? by गामा पैलवान
अहो आमचे प्रश्न अनुत्तरितच की हो !
...या सगळ्या चर्चांमधे
'अमूल'
अमूल आणि इतर
In reply to 'अमूल' by राही
संपूर्ण सहमत
In reply to अमूल आणि इतर by नितिन थत्ते
राहीजी
In reply to संपूर्ण सहमत by राही
नितीन थत्ते जी
In reply to अमूल आणि इतर by नितिन थत्ते
अमूल हा सरकारी ब्रॅण्ड नाही.
In reply to नितीन थत्ते जी by अमर विश्वास
आज पंधरा हजार कोटीच्या
In reply to अमूल हा सरकारी ब्रॅण्ड नाही. by नितिन थत्ते
आज पंधरा हजार कोटीच्या उलाढालीनंतरही अमूलच्या डेअरीजना नवीन यंत्रसामुग्री घेण्यास अल्प दराने कर्ज उपलब्ध करून देणे वगैरे सरकारी मदत मिळत असते.फक्त सरकारी मदत मिळाली म्हणून १५ हजार कोटींचा पल्ला गाठला की पंधरा हजार कोटींमुळे सरकारी मदत मिळते..?नितीन थत्तेजी
In reply to अमूल हा सरकारी ब्रॅण्ड नाही. by नितिन थत्ते
एनडीडीबी स्थापन होण्यापूर्वी
In reply to नितीन थत्तेजी by अमर विश्वास
नितीनजी
In reply to एनडीडीबी स्थापन होण्यापूर्वी by नितिन थत्ते
अमूलला सरकारी मदत
In reply to नितीनजी by अमर विश्वास
एकप्रकारे अमूलचे यश हे
In reply to अमूलला सरकारी मदत by नितिन थत्ते
एकप्रकारे अमूलचे यश हे सातत्यपूर्ण सरकारी मदतीमुळे आहे असे म्हणता येईल.या न्यायाने सरकार शेतीलाही सातत्यपूर्ण मदत करत आहेच की. मग..?एनडीडीबीच्या स्थापनेचा अमूलशी काही संबंध नाही.The National Dairy Development Board was created to promote, finance and support producer-owned and controlled organisations. NDDB's programmes and activities seek to strengthen farmer cooperatives and support national policies that are favourable to the growth of such institutions. Fundamental to NDDB's efforts are cooperative principles and cooperative strategies. हे खुद्द NDDB च्या वेबसाईटवरून घेतले आहे. हे वर्णन तंतोतंत लागू पडेल असा अमुलशिवाय वेगळा असा आणखी कोणता उद्योग त्यावेळी अस्तित्वात होता..? तसेच NDDB च्या Genesis या भागामध्ये आणंद पॅटर्न आणि ऑपरेशन फ्लड असे दोन मुख्य अमुलशी संबंधित / अमुलचा पुढाकार असलेले विषय दिसत आहेत. मग अमुलच्या यशाला सरकारी मदतीच्या कुबड्या लावणे किंवा NDDB च्या यशामधील अमुलचा सहभाग नाकारण्याचा तुमचा नेमका उद्देश काय आहे..? ओढून ताणून अमुलच्या यशाचे श्रेय फक्त काँग्रेसला द्यायचे असेल (डॉ. कुरीयन आणि सहकार्यांना वगळून) तर तसे सांगा. आपण सरळ त्या मुद्द्यावर येवून चर्चा करूया. युवराजांनी तसेही अमुलचे श्रेय "गुजरातकी महिलाओंको" दिलेले आहेच. बाकी NDDB च्या वेबसाईटवरील त्यांची फिल्म बघा. आणि अमुलने अशी फिल्म काढली असती तर नक्की काय वेगळी सुरूवात केली असती ते ही सांगा.>>ओढून ताणून अमुलच्या यशाचे
In reply to एकप्रकारे अमूलचे यश हे by मोदक
+१
In reply to >>ओढून ताणून अमुलच्या यशाचे by नितिन थत्ते
ओके - तो भाग चर्चेपासून
In reply to +१ by अनुप ढेरे
काँग्रेस
In reply to एकप्रकारे अमूलचे यश हे by मोदक
अरेरे, मिपावर असहिष्णुता
In reply to काँग्रेस by राही
धारा मागे पडले ते
In reply to नितीन थत्ते जी by अमर विश्वास
अगदी अगदी, सर्व प्रकारची
In reply to धारा मागे पडले ते by कुंदन
राहीजी