Skip to main content

कथा आणि व्यथा बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....

लेखक परशु सोंडगे यांनी शुक्रवार, 17/03/2017 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....!! चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची . "सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा. थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? " धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ." रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला. गावातल्या पुढा-यांनी फोन केला . आरं बापा कडं पहा जरा .तू तू मी मी नका करू . सारं विसरून जा" पण छया...छया...!! काही फरक पडला नाही .म्हतारं बेशुध्द झालं . शेवटी दोघ आले . थोरला: "दादा मी आलो .उठ बर.मी केळ आणलीत चिक्कू आणलेत .खा बर थोडं " धाकटा: "दादा बघ बदाम आणलेत .बिस्किट आणलीत बघ कपडे आणलीत" थोरला: "पाणी चांगल शुध्द प्यायला पाहिजे.बघ दादा फिल्टर आणलं ." धाकटा: ."लय घाण दारात .आजार होणारच.मी पैस देतो. शौचालयच बांधून देतो. " म्हतारी सारं ऐकत व्हती .ती जरा सटकली म्हणाली , "आरं शाहण्यावं, म्हता-याला दवाखान्यात न्यायचं सोडून हे काय लावलं ?फिल्टारच काय आणताय? संडास काय बांधता ?सारी नाटकचं का ? दवाखान्यात न्या नाहीतर म्हया राजाच्या मातीला सुद्दीक येऊ नका ." कथेतल्या पोरांसारखंच सरकार निष्ठूर झालं आहे. शेतक-यांच्या रोज आत्महत्या होत आहेत आणि हे धोरण आखताहेत शेतक-याची कर्ज माफी ,कर्ज मुक्तीची मागणी असतानी मुख्यमंञ्याला कशा सुंदर कल्पना सुचतात ? कसे भयकर उपाय सुचतात ? या पेक्षा निष्ठूर कोणं असू शकेल बरं ? काय शेतक-याची व्यथा आहे आणि काय कथा झाली आहे. . . . . . . . . . परशुराम सोंडगे, पाटोदा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 45266
प्रतिक्रिया 244

प्रतिक्रिया

आणखी एक उपाय सांगतो. शेतकर्‍यांनी लिमिटेड कंपनी काढावी. तिला स्टार्ट अप असे म्हणावे म्हणजे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसाही असला तरी पायजे तितकं कर्ज मिळेल. नफा झाला तर ठीक. न झाला तरी स्टार्ट अप कडून सुरुवातीला कोणी काही अपेक्षा करत नाही. तर कंपनी लिक्विडेशन मध्ये काढायची. पुन्हा नवी कंपनी काढायची. सायकल चालू ठेवायची. पहिल्या कंपनीचे उद्दिष्ट डाळीचे उत्पादन हे असेल. दुसर्‍या कंपनीचे टोमॅटो उत्पादन, तिसर्‍या कंपनीचे कापूस उत्पादन. कंपनीची उद्दिष्टं आणि प्रोजेक्ट रिपोर्ट मात्र नेहमी वेगळा पाहिजे. नेल्को लिक्विडेट झाली म्हणून रतन टाटांना कोणी कर्ज देत नाही असं होत नसतं.

In reply to by नितिन थत्ते

तुमचा प्रतिसाद वाचला आणि कां टवकारले. शेतकरी कंपनी काढण्या बाबत कृपया थोडे विस्तृत सांगू शकाल का ?

विशुमितजी तो वरचा स्टार्टअप चा प्रतिसाद हा गम्मत म्हणून पाहावा व सोडन द्यावा ... स्टार्टअप्सला कर्ज देण्याची एक पद्धत असते .. असे शेतीचे स्टार्टअप्स होत नाहीत व नुसते प्रोजेक्ट रिपोर्ट्स बनवून कर्जेही मिळत नाहीत बाकी ते नेल्को चे उधाहरण चुकीचे आहे . एकतर नेल्को हे टाटा ग्रुप च्या उत्पन्नाचा अत्यंत छोटा हिस्सा होता व दुसरे म्हणजे नेल्को लिक्विडेट झाल्यावर त्याच्या मालमत्तेतून (Assets) सर्व देणी भागवली होती. तेंव्हा एकत्र शेती (co-operative) वगैरे संकल्पना राबवता येतील पण नितीनजींच्या स्टार्टअप च्या जंजाळातून दूर राहा

In reply to by संदीप डांगे

अमर जी, वाचवल्या बद्दल धन्यवाद..!! बघा वर कोणी तरी म्हणत होते शेतकरी सल्ला ऐकत नाही, स्वतःचेच घोडे दामटतात आणि नुकसान करून घेतात. आता असे सल्ले मिळाल्यावर माझ्यासारख्या अडाणी शेतकऱ्याने काय करावे? (नितीन जी हलके घ्या )

In reply to by विशुमित

हो हो. तो प्रतिसाद गंमतीत दिला होता. पण तसे बिझिनेस मॉडेल बनवता येऊ शकते. त्यात जमीन शेतकर्‍याने कंपनीला भाड्याने द्यायची. सध्या त्यात अनेक कायदेशीर अडचणी असतील.

In reply to by नितिन थत्ते

प्रतिसाद गंमतीत दिला असला तरी त्याला एक सकारात्मक किनार आहे. काही तरुण शेतकर्‍यांचा गट बनवून गटशेती करत आहेत, बाजाराचा अभ्यास करुन, कोणता माल कुठे किती लागेल ह्याची आगावू तयारी करुन पिक घ्यायचे, कापणी करुन होलसेल विक्री करायची अशी संपूर्ण चेन विकसित केली आहे. हे कंपनी स्थापन करुन शेतकर्‍यांना शेअरहोल्डर करुन, सर्व प्लानिंग करुन सुरु आहे. त्यात स्केलबेस प्रॉडक्शन असल्याने शेवटी फायदा होतोच. त्यांची नावे मला आता आठवत नाही, पण शोधून देतो.

विदर्भातील कापूस उत्पादन हे कधीपासूनचे आहे. बोअरचे युद्ध त्यामुळे भारतातल्या कापसाला प्रचंड मागणी असे काहीतरी इतिहासात वाचले होते. तर हे विदर्भातले कापूस उत्पादन त्यावेळेपासून सुरू झाले आहे की त्यापूर्वीपासून?

In reply to by नितिन थत्ते

लागवड आधीही होत होतीच. पण कमर्शियल बेसिसवर मोठ्या प्रमाणात उत्पादन इस्ट इन्डिया कंपनीच्या प्रयत्नांमुळे सुरु झाले. विदर्भातले वातावरण तेव्हा कापसासाठी उत्तम होते.. अगदी स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत म्हणजे ९०च्या दशकापर्यंत विदर्भात जिनिंग-प्रेसिंग मिल्स, सुतगिरण्या होत्या... त्यानंतर उतरती कळा लागली आहे.

खुपच छान चर्चा चालु आहे. एक चांगला लेख नुकताच वाचनात आला. चालु असलेल्या चर्चेशी सुसंगत वाटला म्हणुन लिंक देत आहे. http://abpmajha.abplive.in/blog/blog-on-loan-waver-politics

In reply to by विशुमित

खरा प्रश्न आयात- निर्यात धोरणात आहे.> प्रश्न फक्त तेवढाच नाही. सरकारी बाजु कडुन म्हणाल तर खालील प्रश्न आव्हांनात्मक आहेत. यातील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शेतकर्याला हाता तोंडाशी आलेले पिक गमवावे तरी लागते किंवा त्याचा म्हणावा तसा त्याला फायदा होत नाही. १. योग्य व सक्रीय आयात-निर्यात धोरण २. उत्तम रस्ते ३. उत्तम व जलद वाहतुक व्यवस्था ४. प्रत्येक जिल्ह्यात पुरेशी शितगृहे व गोदामे ५. तालुका ते गाव स्तरापर्यंत हवामानाचा अचुक अंदाज ६. पुरेसा वीज पुरवठा ७. शेतकी विद्यालय व शेतकर्यांची सक्रीय प्रयोगशील गटे ८. उत्तम पुरेशी खते व बि-बियाणांची उपलब्धता ९. अर्थ व वीमा पुरवठा. शेतकर्यांच्या बाजुने खालील गोष्टी करणे अत्यंत गरजेचे आहे. १. सामुहिक गट शेती २. योग्य ते पीक बदल. (मागच्या मोसमात शेजार्याला मिरची फायदेशीर ठरली की आजुबाजुचे २५ शेतकरी तेच करतात. हे प्रत्यक्ष खुप वेळा अनुभवले आहे.) ३. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन ४. योग्य जोखीम व्यवस्थापन ५. शेतकर्यांनी एकत्र येवुन अन्न प्रक्रिया उद्योग सहकारी तत्वावर उभा करणे व चालवणे. (ज्या भागात टोमॅटो अधिक पिकवत आहेत, तिथे एकत्र येवुन केचप (सॉस), वाळवले व पॅक केलेले टोमॅटो वगैरे तयार करणे व योग्य वितरण व विपणन व विक्री करणे) वरील यादीत आणखी भर नक्कीच घालता येईल. जे जे पटकन सुचले / वाटले ते लिहीले आहे.

In reply to by रांचो

सरकारी स्तरावरील सगळ्या मागण्या रास्त आहेत. शेतकर्यांच्या बाजुने खालील गोष्टी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामध्ये १. वर आता लोकांचा भर दिसत आहे. टोमॅटो च्या बाबतीत आम्ही तो राबवतोय. २. पीक पोर्टफोलिओ या बद्दल जागरूकता वाढवली पाहिजे. पण काही ठराविक पिकांना लागणारे हवामान, मालाचा उठाव आणि लोकांचा Learning Curve चा अनुभव वाढलेला असतो त्यामुळे प्रत्येक जण ते ठराविक पीक घेतोच. यावर काम झाले पाहिजे. ३. ४ यावर ४-५ वर्षातील हवामान बदलामुळे बरीच जागरूकता आली आहे. ५. हा माझ्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे. अन्न प्रक्रिया. नजीकच्या येणाऱ्या काळामध्ये तो राबवण्याचा माझा मानस आहे. ऍडमिनिस्ट्रेशन ची बाजू सांभाळणारे सध्या लोक आहेत फक्त तंत्रज्ञान आणि मार्केटिंग यासाठीच अभ्यास चालू आहे. कोणाला या बाबत अधिक माहिती असेल तर कृपया मदत करावी.

In reply to by विशुमित

ह्या सगळ्याची जेंव्हा दोन्ही बाजुने अंमलबजावणी होइल, तेंव्हा वीज बिल आणि आयकर आपोआपच भरले जाईल. आणि ती व्यवस्था टिकवुन ठेवण्यासाठी आवश्यक असेल. तंत्रज्ञानासाठी मी तरी सुरुवात इंटरनेट ने करेन. असे युनीट विक्री करणार्या कंपन्यांना संपर्क करेन. मग अनेक गोष्टी हळुह्ळु उलगडत जातील.

श्रीगुरुजी, काल दिनांक २२ मार्च २०१७ हा माझ्या मिपायुष्यातला ऐतिहासिक दिन आहे. कदाचित अवघ्या मिपावरचाही असू शकतो. या धाग्यावर मी तुमच्याशी असहमत आणि चक्क संदीप डांग्यांशी सहमत आहे. शासनाने आजून काय करायला हवंय, असा प्रश्न तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्तीकडून अपेक्षित नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या भावात सरकार नेहमी हस्तक्षेप करीत आलेलं आहे. त्यामुळे आयातनिर्यात धोरणे सतत बदलंत असतात. याचा फटका शेतकऱ्याला सहन करावा लागतो. इतकी प्राथमिक बाब लक्षात घेतल्याखेरीज शेतीचं मूल्यमापन करणं सर्वस्वी अशक्य आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

डांगेराव आता बहुतेक सत्यनारायण घालतील. जीवनावश्यक वस्तूंच्या भावात सरकारने हस्तक्षेप करणे योग्यच आहे. जीवनावश्यक वस्तूंप्रमाणे सरकार जीवनावश्यक औषधांच्या भावात सुद्धा हस्तक्षेप करते. सरकारने तसे करणे अपेक्षित आहे.

In reply to by श्रीगुरुजी

जीवनावश्यक वस्तूंच्या भावात सरकारने हस्तक्षेप करणे योग्यच आहे.>>> -- असे का ? बिगर-शेतकरी वर्ग सरकारी भिकेवर किती जगणार, असे जर शेतकऱ्यांनी प्रश्न केला तर वावगे ठरेल का? भाजीपाला घ्याची ऐपत नसेल तर बिस्कीट खाऊन दिवस काढावेत, असा आगाऊ सल्ला त्यांना रुचेल का? साखर परवडत नसेल तर चहाचं फळकुटणं पिऊन तलफ भागवावी, अशी लाज काढली तर त्यांना आवडेल का? भाजीपाला-कांदा-धान्य विकायला दारात येणार नाही असे जर शेतकऱ्याने ठणकावून सांगितले तर शेपटी सरळ ठेवणार का? व्यापाऱ्यांशी संलग्न होऊन देशात माल न विकता, परदेशातून ज्यादा पैका कमावला तर इतरांची हरकत नसावी, काय म्हणता?

In reply to by विशुमित

बिगर-शेतकरी वर्ग सरकारी भिकेवर किती जगणार, असे जर शेतकऱ्यांनी प्रश्न केला तर वावगे ठरेल का? अजिबात वावगे ठरणार नाही. परंतु शेतकर्‍यांप्रमाणे आम्ही सुद्धा आयकर भरणार नाही, वीजबिल भरणार नाही, कर्जाची परतफेड करणार नाही, आम्हाला वारंवार कर्जमाफी द्या असे प्रश्न बिगरशेतकर्‍यांनी केले तर ते वावगे ठरेल का? भाजीपाला घ्याची ऐपत नसेल तर बिस्कीट खाऊन दिवस काढावेत, असा आगाऊ सल्ला त्यांना रुचेल का? साखर परवडत नसेल तर चहाचं फळकुटणं पिऊन तलफ भागवावी, अशी लाज काढली तर त्यांना आवडेल का? भाजीपाला-कांदा-धान्य विकायला दारात येणार नाही असे जर शेतकऱ्याने ठणकावून सांगितले तर शेपटी सरळ ठेवणार का? व्यापाऱ्यांशी संलग्न होऊन देशात माल न विकता, परदेशातून ज्यादा पैका कमावला तर इतरांची हरकत नसावी, काय म्हणता? बिगरशेतकरी आणि शेतकरी हे दोघेही ग्राहक असतात, परंतु प्रत्येक ग्राहक हा शेतकरी असेलच असे नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा फटका शेतकर्‍यांनाही बसतोच. त्यामुळेच सरकारला हस्तक्षेप करावा लागतो. तसेही शेतकरी भाजीपाला-कांदा-धान्य विकायला ग्राहकांचा दारात येत नाहीतच, त्यामुळे शेपटी सरळ ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. व्यापाऱ्यांशी संलग्न होऊन देशात माल न विकता, परदेशातून ज्यादा पैका कमावला तर कोणाची काहीच हरकत नाही. तसे केल्याने देशांतर्गत टंचाई निर्माण झाली तर सरकार बाहेरून आयात करेलच. त्यामुळे काळजी नसावी. देशात मागणी असताना जास्त दराने माल बाहेरच विकायचा असेल तर त्यावर नियमाप्रमाणे निर्यातकर, नफ्यावर आयकर इ. भरण्याची तयारी ठेवा आणि वीजबिले भरणे, कर्जाची परतफेड इ. गोष्टीही करा.

In reply to by श्रीगुरुजी

==>आयकर- म्हणजे आयकर भरत नाही म्हणून कसे पण रेटणार. आता त्या कक्षेमध्ये नाही म्हणून शेतकरी तो भरत नाही. त्या कक्षेत सरकार ने आणला तर १००% भरणार.(घर भाड्याची खोटी बिले सादर करून आयकर वाचवणारे निर्लज्ज खूप पाहिले आहेत.) ==>वीजबिल- ऐकीव माहिती वर तुमचा असा समज झालेला दिसतोय की प्रत्येक शेतकरी वीज बिल भरत नाही/वीज चोरी करतो. असे जर असते तर वीज मंडळाला कधीच टाळे ठोकावे लागले असते. जिथे सरकारी वीजमंडळाचे अधिकारी/कर्मचारी काम चुकार आणि भ्रष्ट आहे तिथेच हा प्रकार चालू असतो आणि तो पण काही %. वीज बिले थकीत असू शकतात पण वसूल केले जातात. त्यामुळे सगळेच शेतकरी चोर/ बुडवे आहेत असले थेट आरोप करू नका. (कृपया तुमच्या पाह्ण्यातल्या नातेवाईकांची उदाहरणे देऊ नका.) ==> कर्जाची परतफेड- पुन्हा सरसकटीकरण करू नका. मार्च एन्ड चालू आहे. वसुली साठी कर्ज थकीतदारांच्या दारात रोज बँक-पतसंस्था- सोसायट्यांची पथके येत आहेत. किडूकमिडूक गोळा करून सगळे व्याज-हफ्ते भरले जातात. काही मोजके लोक कर्ज परतफेड करत नाहीत ते पण बडे धेंडे, अव्यावहारिक आणि ज्याची खरंच कुवत नाही. कर्ज माफी द्या असे प्रत्येक रामू अण्णा नाही म्हणत. गावपुढाऱ्यांना कामे नाहीत. फटका बसू द्या की सगळ्यांनाच. ९०'च्या दशकांतील जागतिकारणाच्या वेळेस पण भारतीय उद्योगांनी ओरड केली होती. पण प्रत्येक्षात आता काय चित्र आहे? खेदाने म्हणू इच्छितो की सरकारने त्याची भिकारी प्रजा सांभाळण्यासाठी अन्न-धान्य आयात केले तरी चालेल. असल्या भिकारी लोकांबद्दल आस्था ठेवण्यात काय हाशील. ऐपत नसेल तर सरकारी सुकडी खावे त्यांनी. काय म्हणता ?

In reply to by विशुमित

आयकर- म्हणजे आयकर भरत नाही म्हणून कसे पण रेटणार. आता त्या कक्षेमध्ये नाही म्हणून शेतकरी तो भरत नाही. त्या कक्षेत सरकार ने आणला तर १००% भरणार.(घर भाड्याची खोटी बिले सादर करून आयकर वाचवणारे निर्लज्ज खूप पाहिले आहेत.) शेतकर्‍यांनी पूर्णपणे कक्षेच्या बाहेर ठेवलेले आहे. त्यामुळे ते आयकर भरतच नाहीत. ==>वीजबिल- ऐकीव माहिती वर तुमचा असा समज झालेला दिसतोय की प्रत्येक शेतकरी वीज बिल भरत नाही/वीज चोरी करतो. असे जर असते तर वीज मंडळाला कधीच टाळे ठोकावे लागले असते. जिथे सरकारी वीजमंडळाचे अधिकारी/कर्मचारी काम चुकार आणि भ्रष्ट आहे तिथेच हा प्रकार चालू असतो आणि तो पण काही %. वीज बिले थकीत असू शकतात पण वसूल केले जातात. त्यामुळे सगळेच शेतकरी चोर/ बुडवे आहेत असले थेट आरोप करू नका. (कृपया तुमच्या पाह्ण्यातल्या नातेवाईकांची उदाहरणे देऊ नका.) शेतकर्‍यांना अत्यल्प दराने वीजपुरवठा होतो. तरीसुद्धा त्यातील ९०% शेतकरी वीजबिल भरतच नाहीत. त्यांच्याकडून येणार्‍या थकबाकीची रक्कम फक्त महाराष्ट्रातच १८००० कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. सगळे शेतकरी बुडवे नसतील कदाचित, परंतु ९०% तरी आहेत ना.
==> कर्जाची परतफेड- पुन्हा सरसकटीकरण करू नका. मार्च एन्ड चालू आहे. वसुली साठी कर्ज थकीतदारांच्या दारात रोज बँक-पतसंस्था- सोसायट्यांची पथके येत आहेत. किडूकमिडूक गोळा करून सगळे व्याज-हफ्ते भरले जातात. काही मोजके लोक कर्ज परतफेड करत नाहीत ते पण बडे धेंडे, अव्यावहारिक आणि ज्याची खरंच कुवत नाही. कर्ज माफी द्या असे प्रत्येक रामू अण्णा नाही म्हणत. गावपुढाऱ्यांना कामे नाहीत.
सर्वांनी वेळेवर कर्जाची परफफेड केली असती तर अनेकवेळा कर्जमाफी द्यावीच लागली नसती.
फटका बसू द्या की सगळ्यांनाच. ९०'च्या दशकांतील जागतिकारणाच्या वेळेस पण भारतीय उद्योगांनी ओरड केली होती. पण प्रत्येक्षात आता काय चित्र आहे? खेदाने म्हणू इच्छितो की सरकारने त्याची भिकारी प्रजा सांभाळण्यासाठी अन्न-धान्य आयात केले तरी चालेल. असल्या भिकारी लोकांबद्दल आस्था ठेवण्यात काय हाशील. ऐपत नसेल तर सरकारी सुकडी खावे त्यांनी. काय म्हणता ?
फटका प्रत्येकालाच बसतो, पण बिगरशेतकर्‍यांना वीजबिल माफी, कर्जमाफी, आयकर माफी अशा सवलती मिळत नाहीत. आयकर, वीजबिल इ. भरणारी, कर्जाची परतफेड करणारी, कर्जमाफी न मागणारी, दरवर्षी वेगवेगळी कारणे पुढे करून नुकसानभरपाई न मागणारी बिगरशेतकरी जनता अजिबात भिकारी नाही. तुम्ही त्यांच्याबद्दल आस्था ठेवली किंवा नाही ठेवली तरी त्यांना फरक पडत नाही. ते काही कायम सरकारकडे कटोरा घेऊन जात नाहीत. ऐपत नसली तर ते आपल्या ऐपतीप्रमाणे सुकडी खातील किंवा श्रीखंडपुरी खातील. परंतु सरकारी मदतीसाठी तोंड वेंगाडणार नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

शेतकर्‍यांनी पूर्णपणे कक्षेच्या बाहेर ठेवलेले आहे. त्यामुळे ते आयकर भरतच नाहीत.>> -- आणू द्यात की आयकराच्या कक्षेत. नफ्यावरच कर भरायचा आहे ना भरतील ना मग. जास्त काय करावं लागेल अकाउंट्स नीट ठेवावे लागतील. उलट शेतकऱ्यांचा फायदा होईल त्याने. ९०% शेतकरी वीजबिल भरतच नाहीत.>> -- डेफेऱरेड असेल भरतच नाही असे नाही होणार. ९०% आकडा कोठून मिळाला, आम्हाला पण कळू द्यात. आम्ही प्रामाणिकपणे वीज बिल भरतो हे ९०% फुकटे कोण आहेत, हे आम्हाला ही समजेल. थकीत वीज बिलाच्या समस्या पण बऱ्याच आहेत. Meters have been installed on 18 lakh agriculture pumps in the State. It is expected that after noting down the readings of these meters, bills are issued. However, the MSEDCL is issuing bills based on Horse Power (HP) of the pumps instead of readings of the meters. In this process, bills of haphazard amounts are being issued even to the non-functional pump holders. Now, the bills are being corrected following complaints from the farmers. या मुळे MSEB ला आकडे फुगवून सांगायला वेळ मिळतो. अवांतर : एन्रॉन प्रकल्प वेळेत चालू झाला असता तर कदाचित ही वेळ अली नसती. सर्वांनी वेळेवर कर्जाची परफफेड केली असती तर अनेकवेळा कर्जमाफी द्यावीच लागली नसती.>>> -- किती वेळा कर्ज माफी दिली आहे मायबाप सरकार ने ? शेतकऱ्यांनी किती कर्जे घेतली, किती फेड केली, किती बाकी आहेत आणि किती पूर्ण बुडवली आहेत याची कोणाकडे अधिकृत सरकारी आकडेवारी असेल तर कृपया येथे देऊ शकेल का ? बिगरशेतकरी जनता अजिबात भिकारी नाही. तुम्ही त्यांच्याबद्दल आस्था ठेवली किंवा नाही ठेवली तरी त्यांना फरक पडत नाही. ते काही कायम सरकारकडे कटोरा घेऊन जात नाहीत.>>> --"जीवनावश्यक वस्तूंच्या भावात सरकारने हस्तक्षेप करणे योग्यच आहे" हे बोलून बिगरशेतकरी लोक किती लाचार आहेत आहेत हे दिसून येते. फरक एवढाच आहे की कटोरा घेऊन चौकात बसावे लागत नाही सरकार स्वतः घरी येऊन त्यांच्या कटोऱ्यात भीक घालून जाते. जीवनावश्यक औषध वाले सरकार आणि जनतेला किती भीक घालते आहे ते दिसतंय आमच्या उघड्या डोळ्यांना. ऐपत नसली तर ते आपल्या ऐपतीप्रमाणे सुकडी खातील किंवा श्रीखंडपुरी खातील.>>> -- कांदा थोडा महाग काय झाला तर भळा-भळा रडत होते. गळ्यात कांद्याचे हार काय घालत होते. काय थेरं करत होती. २०० रु तूर डाळ झाली काय सोने मोडायला सोनाराकडे जायला लागले होते लोक. साखर परवडत नाही म्हणून मधुमेह नसला तरी साखर वाढली म्हणून साखरेचे खाणे कमी केले आहे लोकांनी.

In reply to by विशुमित

शेतकर्‍यांनी पूर्णपणे कक्षेच्या बाहेर ठेवलेले आहे. त्यामुळे ते आयकर भरतच नाहीत.>> -- आणू द्यात की आयकराच्या कक्षेत. नफ्यावरच कर भरायचा आहे ना भरतील ना मग. जास्त काय करावं लागेल अकाउंट्स नीट ठेवावे लागतील. उलट शेतकऱ्यांचा फायदा होईल त्याने. पर्फेक्ट. हेच हवं होतं. पूर्वी २००१ मध्ये साखर कारखान्यांच्या नफ्यावर आयकर लावण्याचे प्रयत्न झाले होते, तेव्हा शेतकरी संघटनांनी थयथयाट केला होता. साखर कारख्यान्यांचे सभासद शेतकरी असल्याने, कारखान्याने मिळविलेल्या नफ्यावर आयकर लावणे म्हणजे थेट शेतकर्‍यांच्या शेती उत्पन्नावर कर लावण्यासारखं आहे असा युक्तीवाद करून कारखान्यांच्या सभासदांनी आयकर भरायला विरोध केला होता. या कराविरूद्ध तत्कालीन कृषी राज्यमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांना सांगली जिल्ह्यात नागनाथ नायकवडींच्या नेतृत्वाखाली घेराव घालून त्यांना अडवून ठेवले होते. या कराचा प्रस्ताव शेवटी रद्द केला गेला. आम्हाला आयकर लावा. आयकराला आमची अजिबात हरकत नाही असे कितीही उच्चरवाने सांगितले तरी आयकराचे नुसते सूतोवाच केल्यावर शेतकरी थयथयाट करून तो रद्द करायला लावतील.
९०% शेतकरी वीजबिल भरतच नाहीत.>> -- डेफेऱरेड असेल भरतच नाही असे नाही होणार. ९०% आकडा कोठून मिळाला, आम्हाला पण कळू द्यात. आम्ही प्रामाणिकपणे वीज बिल भरतो हे ९०% फुकटे कोण आहेत, हे आम्हाला ही समजेल. थकीत वीज बिलाच्या समस्या पण बऱ्याच आहेत.
मी एका मागील प्रतिसादात यासंबंधी एक यूआरएल दिली होती. ती वाचली असेलच. त्यात तुम्हाला यासंबंधी माहिती मिळेल. तीन वर्षांपूर्वी शेतकर्‍यांची वीजबिल थकबाकी १३००० कोटी रूपयांहून अधिक होती. काही दिवसांपूर्वीच लोकसत्तात आलेल्या बातमीनुसार ही थकबाकी आता १८००० कोटींच्या जवळपास गेली आहे. सर्वांनी वेळेवर कर्जाची परफफेड केली असती तर अनेकवेळा कर्जमाफी द्यावीच लागली नसती.>>> -- किती वेळा कर्ज माफी दिली आहे मायबाप सरकार ने ? शेतकऱ्यांनी किती कर्जे घेतली, किती फेड केली, किती बाकी आहेत आणि किती पूर्ण बुडवली आहेत याची कोणाकडे अधिकृत सरकारी आकडेवारी असेल तर कृपया येथे देऊ शकेल का ? १९७८ मध्ये तुमच्या पवार साहेबांनी कर्जावरील व्याज माफ केले होते. नंतर १९८० मध्ये जनाब अंतुलेंनी संपूर्ण कर्जमाफी केली होती. १९९० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री मधू दंडवते यांनी कर्जमाफी जाहीर केली होती (त्यावेळच्या कर्जमाफीचा नक्की आकडा आठवत नाही). २००८ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम् यांनी एकूण ७२००० कोटी रूपये कर्जमाफी केली होती (पवार साहेबांचे समर्थक ही कर्जमाफी त्यांनीच केली असे सांगत फिरत होते. अंदाजपत्रक दुपारी ४ वाजता लोकसभेत सादर होऊन त्यात कर्जमाफीची घोषणा झाल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी ८ च्या सुमाराला येरवडा, गुंजन चित्रपटगृहावरून जाणारा नगर रस्ता इ. ठिकाणी कर्जमाफीबद्दल पवार साहेबांचे आभार मानणारे प्रचंड मोठे फ्लेक्स मी पाहिले होते. अंदाजपत्रक सादर केल्यानंतर केवळ काही तासात ४०-५० फूट लांब व १५-२० फूट रूंदीचे फ्लेक्स रंगवून वर लावणे हे अत्यंत आश्चर्यकारक घटना होती. पवारांच्या पित्त्यांना कर्जमाफीची घोषणा होणार हे बहुतेक आधीच समजले असावे. त्याशिवाय इतक्या कमी वेळात इतके मोठे फ्लेक्स रंगवून उंचावर टांगणे शक्य वाटत नाही. अर्थात कर्जमाफीचा निर्णय अर्थमंत्र्यांचा होता, परंतु पवारांचे पित्ते फ्लेक्सच्या माध्यमातून पवारांना श्रेय देत होते.). १९९१ ते २००७ या काळात अजून एकदोनदा कर्जमाफी झालेली आहे. परंतु त्याचे डिटेल्स आठवत नाहीत. बिगरशेतकरी जनता अजिबात भिकारी नाही. तुम्ही त्यांच्याबद्दल आस्था ठेवली किंवा नाही ठेवली तरी त्यांना फरक पडत नाही. ते काही कायम सरकारकडे कटोरा घेऊन जात नाहीत.>>> --"जीवनावश्यक वस्तूंच्या भावात सरकारने हस्तक्षेप करणे योग्यच आहे" हे बोलून बिगरशेतकरी लोक किती लाचार आहेत आहेत हे दिसून येते. फरक एवढाच आहे की कटोरा घेऊन चौकात बसावे लागत नाही सरकार स्वतः घरी येऊन त्यांच्या कटोऱ्यात भीक घालून जाते. जीवनावश्यक औषध वाले सरकार आणि जनतेला किती भीक घालते आहे ते दिसतंय आमच्या उघड्या डोळ्यांना. बिगर शेतकरी लाचार वगैरे अजिबात नाहीत. ते अजिबात कटोरा वगैरे घेऊन बसलेले नाहीत. ते कटोरा घेऊन बसले असते तर आमचे कर्ज माफ करा, वीजबिल माफ करा, आयकरापासून मुक्ती द्या अशा मागण्या त्यांनी केल्या असत्या. भाव वाढले तर लोकक्षोभ होऊन निवडणुकीत फटका बसेल या भीतिने सरकार स्वतःहून भाव कमी करण्याचा प्रयत्न करते. सरकारचा हस्तक्षेप हा फक्त बिगरशेतकर्‍यांसाठी नसतो. त्यात शेतकरी सुद्धा लाभार्घी असतात कारण सर्व ग्राहक शेतकरी नसले तरी सर्व शेतकरी हे ग्राहक असतातच व त्यामुळे भाव वाढले की त्यांनाही त्रास होतो आणि भाव कमी झाले की इतरांप्रमाणे त्यांनाही फायदा होतो. ऐपत नसली तर ते आपल्या ऐपतीप्रमाणे सुकडी खातील किंवा श्रीखंडपुरी खातील.>>> -- कांदा थोडा महाग काय झाला तर भळा-भळा रडत होते. गळ्यात कांद्याचे हार काय घालत होते. काय थेरं करत होती. २०० रु तूर डाळ झाली काय सोने मोडायला सोनाराकडे जायला लागले होते लोक. साखर परवडत नाही म्हणून मधुमेह नसला तरी साखर वाढली म्हणून साखरेचे खाणे कमी केले आहे लोकांनी. गळ्यात कांद्याचे हार घालणे इ. प्रकार आमदार वगैरे करतात. सामान्य जनता मिळेल त्या भावाने कांदे व इतर गोष्टी घेतच असते. भळाभळा रडतबिडत कोणीही नव्हते. लोक आपले अंदाजपत्रक, खर्च, खरेदी इ. व्यवस्थित मॅनेज करतात कारण त्यांना माहित असते की आपल्याला शेतकर्‍यांप्रमाणे कर्ज थकवून किंवा वीजबिल थकवून चालणार नाही. लागोपाट २ महिने वीजबिल भरले नाही तर लगेच नोटिस येते आणि तिसर्‍या महिन्यातही नाही भरले तर वीज तोडली जाते. वीजबिल न भरणे, वीज महामंडळाच्या अधिकार्‍यांना मारहाण करणे, त्यांना कोंडून ठेवणे, आकडा टाकून वीज चोरणे इ. प्रकार बहुसंख्य सामान्य जनता करत नाही. तूर डाळ १८० रूपये झाली तरी लिक घेत होतेच. त्यासाठी सोनेबिने असले काही मोडल्याचे ऐकिवात नाही. साखर महाग झाली तरी कोणीही साखर खाणे कमी केलेले नाही. लोक ३० रू. किलो भावाने साखर घेतात आणि ५० रू. किलो भावाने पण घेतात. लोक चिडले तर आपली सत्ता जाईल या भीतिने सरकार स्वतःहूनच हस्तक्षेप करते.

In reply to by श्रीगुरुजी

शेतकरी थयथयाट करून तो रद्द करायला लावतील>> -- ऊस एक असं पीक आहे त्यावर शाश्वत काहीतरी रक्कम शेतकऱ्याच्या हातात पडते. त्यावर तुमचे माझे कधीच एकमत होणार नाही. भूतकाळात काय झाले त्याला थोडे बाजूला ठेवू. शेतकऱ्याला भविष्यात टिकून राहायचं असेल तर जागतिकारणाची सगळी मूल्ये अंगिकारायला माझ्या सारखे असंख्ये शेतकरी आहेत. या बद्दल थोडे शहरातून बाहेर पडा. भरपूर सापडतील. कर्जमाफी >> -- कोणी कोणी कधी कधी किती कृषी कर्ज माफी केली तोंड पाठ आहे. औदयोगिक कर्जाचे 'ठक'बाकीदार शी तुलना असेल तर कृपया द्याल का ? आमचे साहेब (तुमचे कोणीच नाहीत), त्यांचे पित्ते (हा काय प्रकार आहे पिते) आणि त्यांचे फ्लेक्स हे सगळे देण्याचे प्रयोजन नाही समजले. भाव वाढले तर लोकक्षोभ होऊन निवडणुकीत फटका बसेल या भीतिने सरकार स्वतःहून भाव कमी करण्याचा प्रयत्न करते. लोक चिडले तर आपली सत्ता जाईल या भीतिने सरकार स्वतःहूनच हस्तक्षेप करते.>> -- तेच तर म्हणालो ना त्यांना कटोरा घेऊन बसायची गरज नाही त्यांना घरपोच भीक मिळते . गळ्यात कांद्याचे हार घालणे इ. प्रकार आमदार वगैरे करतात.>> -- कर्ज माफी पण आमदारच मागत आहेत. हाईट म्हणजे सरकार मध्ये असणारे भाजपचे पण आमदार घोषणा देत होते. आम्ही काय त्याच्या वरच नाही बसलो. आम्ही आमची सोय केली आहे. वीजबिल न भरणे, वीज महामंडळाच्या अधिकार्‍यांना मारहाण करणे, त्यांना कोंडून ठेवणे, आकडा टाकून वीज चोरणे इ. प्रकार बहुसंख्य सामान्य जनता करत नाही.>>> -- वरील सगळे प्रकार बहुसंख्य सामान्य शेतकरी सुद्धा नाही करत. अभ्यास वाढवा. चष्मे बदला.

In reply to by विशुमित

शेतकरी थयथयाट करून तो रद्द करायला लावतील>> -- ऊस एक असं पीक आहे त्यावर शाश्वत काहीतरी रक्कम शेतकऱ्याच्या हातात पडते. त्यावर तुमचे माझे कधीच एकमत होणार नाही. भूतकाळात काय झाले त्याला थोडे बाजूला ठेवू. शेतकऱ्याला भविष्यात टिकून राहायचं असेल तर जागतिकारणाची सगळी मूल्ये अंगिकारायला माझ्या सारखे असंख्ये शेतकरी आहेत. या बद्दल थोडे शहरातून बाहेर पडा. भरपूर सापडतील. शाश्वत रक्कम हाती पडण्याचा आणि कारख्यान्याच्या नफ्यावर लावलेल्या आयकराला विरोध करण्याचा काय संबंध आहे? जागतिकीकरण अंगिकारायचे तर स्पर्धेला व उत्पादनाचा दर्जा राखायला तोंड द्यायला हवे. हमी भाव, अनुदान इ. गोष्टी अंगिकारून जागतिकीकरणाला तोंड देता येणार नाही. -- कोणी कोणी कधी कधी किती कृषी कर्ज माफी केली तोंड पाठ आहे. औदयोगिक कर्जाचे 'ठक'बाकीदार शी तुलना असेल तर कृपया द्याल का ? आमचे साहेब (तुमचे कोणीच नाहीत), त्यांचे पित्ते (हा काय प्रकार आहे पिते) आणि त्यांचे फ्लेक्स हे सगळे देण्याचे प्रयोजन नाही समजले. तुम्ही कर्जमाफीबद्दल विचारले म्हणून आठवले तेवढे सांगितले. बाकी तुमच्या साहेबांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. भाव वाढले तर लोकक्षोभ होऊन निवडणुकीत फटका बसेल या भीतिने सरकार स्वतःहून भाव कमी करण्याचा प्रयत्न करते. लोक चिडले तर आपली सत्ता जाईल या भीतिने सरकार स्वतःहूनच हस्तक्षेप करते.>> -- तेच तर म्हणालो ना त्यांना कटोरा घेऊन बसायची गरज नाही त्यांना घरपोच भीक मिळते . बिगरशेतकरी जनता भिकारी असेल तर त्यांच्यात शेतकरी सुद्धा येतात कारण शेतकरी हे ग्राहक सुद्धा आहेत. ज्या भावाने बिगरशेतकर्‍यांना वस्तू मिळतात त्याच दराने शेतकर्‍यांना सुद्धा मिळतात. गळ्यात कांद्याचे हार घालणे इ. प्रकार आमदार वगैरे करतात.>> -- कर्ज माफी पण आमदारच मागत आहेत. हाईट म्हणजे सरकार मध्ये असणारे भाजपचे पण आमदार घोषणा देत होते. आम्ही काय त्याच्या वरच नाही बसलो. आम्ही आमची सोय केली आहे. ही मागणी फक्त आमदारांची नाही. मराठा मूक मोर्चातील मागण्यांपैकी 'शेतकर्‍यांना कर्जमाफी' ही एक प्रमुख मागणी होती. २५-३० शहरातून निघालेले प्रत्येकी ३०-४० लाखांचे मोर्चे पाहिले तर महाराष्ट्रातील यच्चयावत सर्व शेतकर्‍यांनी ही मागणी केली होती असे म्हणता येईल. वीजबिल न भरणे, वीज महामंडळाच्या अधिकार्‍यांना मारहाण करणे, त्यांना कोंडून ठेवणे, आकडा टाकून वीज चोरणे इ. प्रकार बहुसंख्य सामान्य जनता करत नाही.>>> -- वरील सगळे प्रकार बहुसंख्य सामान्य शेतकरी सुद्धा नाही करत. अभ्यास वाढवा. चष्मे बदला. अशा बातम्या वाहिन्यांवर पाहिल्यात आणि माध्यमातून सुद्धा वाचल्यात.

In reply to by श्रीगुरुजी

अशा बातम्या वाहिन्यांवर पाहिल्यात आणि माध्यमातून सुद्धा वाचल्यात. ==>> शेती बाबतची तुमची बरीचशी गृहीतके वाहिन्या आणि वर्तमानपत्रांवर आधारित आहेत. म्हणून आपल्या दोघांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. ही दरी कमी करण्याचा नेहमी प्रयत्न असेल.

In reply to by विशुमित

हेच आहे. केवळ सनसनाटी बातम्यांवर अवलंबून काही लोक मते बनवतात आणि मग शेतकर्‍यांच्या नावाने शिमगा करतात. असो. गुरुजींना सरकारने भाव कमी ठेवण्यासाठी केलेला हस्तक्षेप योग्य वाटतो मात्र त्याचाच भाग म्हणून त्यासाठीच केली जाणारी विजमाफी, कर्जमाफी, वगैरे सुविधा शेतकर्‍यांना द्यायला नको वाटतात. हे म्हणजे अतिच झाले. शेतकर्‍यांच्या सर्व सोयीसुविधा काढून सरकारने भाव कमी ठेवून दाखवावे, किंबहुना बाजारात माल आणूनच दाखवावा. चिंधीभर इन्कमटॅक्सच्या जोरावर किती त्या उड्या मारायच्या? एकिकडे गुरुजी म्हणतात की लोक निमूटपणे सगळं विकत घेतात कीतीही भाव वाढले तरी, दुसरीकडे म्हणतात भाववाढीने लोक चिडतील याची भीती सरकारला वाटते. दोनपैकी एक काहीतरी खरे असले पाहिजे.

In reply to by विशुमित

एन्रॉन प्रकल्प तर शेतकरी कैवारी अरबी समुद्रात बुडवणार होते , पण रिबेका मार्क बाई आल्या अन सगळेच बारगळलेन.....

In reply to by श्रीगुरुजी

==>आयकर- म्हणजे आयकर भरत नाही म्हणून कसे पण रेटणार. आता त्या कक्षेमध्ये नाही म्हणून शेतकरी तो भरत नाही. त्या कक्षेत सरकार ने आणला तर १००% भरणार.(घर भाड्याची खोटी बिले सादर करून आयकर वाचवणारे निर्लज्ज खूप पाहिले आहेत.) ==>वीजबिल- ऐकीव माहिती वर तुमचा असा समज झालेला दिसतोय की प्रत्येक शेतकरी वीज बिल भरत नाही/वीज चोरी करतो. असे जर असते तर वीज मंडळाला कधीच टाळे ठोकावे लागले असते. जिथे सरकारी वीजमंडळाचे अधिकारी/कर्मचारी काम चुकार आणि भ्रष्ट आहे तिथेच हा प्रकार चालू असतो आणि तो पण काही %. वीज बिले थकीत असू शकतात पण वसूल केले जातात. त्यामुळे सगळेच शेतकरी चोर/ बुडवे आहेत असले थेट आरोप करू नका. (कृपया तुमच्या पाह्ण्यातल्या नातेवाईकांची उदाहरणे देऊ नका.) ==> कर्जाची परतफेड- पुन्हा सरसकटीकरण करू नका. मार्च एन्ड चालू आहे. वसुली साठी कर्ज थकीतदारांच्या दारात रोज बँक-पतसंस्था- सोसायट्यांची पथके येत आहेत. किडूकमिडूक गोळा करून सगळे व्याज-हफ्ते भरले जातात. काही मोजके लोक कर्ज परतफेड करत नाहीत ते पण बडे धेंडे, अव्यावहारिक आणि ज्याची खरंच कुवत नाही. कर्ज माफी द्या असे प्रत्येक रामू अण्णा नाही म्हणत. गावपुढाऱ्यांना कामे नाहीत. फटका बसू द्या की सगळ्यांनाच. ९०'च्या दशकांतील जागतिकारणाच्या वेळेस पण भारतीय उद्योगांनी ओरड केली होती. पण प्रत्येक्षात आता काय चित्र आहे? खेदाने म्हणू इच्छितो की सरकारने त्याची भिकारी प्रजा सांभाळण्यासाठी अन्न-धान्य आयात केले तरी चालेल. असल्या भिकारी लोकांबद्दल आस्था ठेवण्यात काय हाशील. ऐपत नसेल तर सरकारी सुकडी खावे त्यांनी. काय म्हणता ?

In reply to by विशुमित

व्यापाऱ्यांशी संलग्न होऊन देशात माल न विकता, परदेशातून ज्यादा पैका कमावला तर इतरांची हरकत नसावी, काय म्हणता?
अगदी बरोबर! आयात-निर्यात खुल्या ठेवा. आयात साखर/डाळ इथे पिकवलेल्यापेक्षा स्वस्त मिळते म्हणे. साखरेशिवाय होणारी पाण्याची बचत वायलीच.

असे

काही इतर अडचणी..... शेतीमालाच्या बाबतीत मार्केटमध्ये शेकडो खेळाडू असतात. एक्स्ट्रीम कॉम्पिटिशन. तसेच या शेकडो खेळाडूंजवळ सामान्यतः एकाच दर्जाचा माल असतो. नो डिस्टिन्क्शन. डिस्टिन्क्शन निर्माण करणे शक्य आहे का?

In reply to by मोदक

चिल माडी.... शेतकरी आपल्या मालात काही खासियत "दाखवू" शकतील का? असं म्हणतो आहे मी !!! म्हणजे शहरातल्या बाजारात एम पी सिहोर गहू विकणारे दहा व्यापारी असतील. पण कुणी म्हणतो माझ्याकडच्या गव्हात खडे नसतात. दुसरा म्हणतो मी फोनवरून ऑर्डर घेऊन घरपोच माल पाठवतो. वगैरे.....

In reply to by नितिन थत्ते

डिस्टिन्क्शन च काय घेऊन बसलात. मागच्या वर्षी सुरवातीला उन्हाळी हंगामातील टोमॅटोला नगण्य दर होता. बिरी बाजूला फेकून नवा माल एकदम रसरशीत एका आकाराचा टुमदार. तरी बाजारात कोणी विचारात नव्हते. १० दिवसांनी बाजार वाढला. व्यापाऱ्यांनी आमच्या शेतातील फेकून दिलेली बिरी पुन्हा निवडून बाजारात नेली. ग्राहकाची झुंबड उडाली. नेहमी प्रश्न पडतो ग्राहक चांगला माल असतो, किंमत कमी असते त्यावेळेस विकत घेत नाहीत आणि सडक्या मालावर तुटून पडतात. यंदा मटार चे पाळे झाले. एक नंबरचा वाटाणा रु. १० /किलो ने ग्राहकांना मिळत होता. एक बहाद्दर तरी रु.८ ने द्या म्हणून तकदा लावत होता. हाईट झाली राव...!!

विशुमितजी भाजीपाला-कांदा-धान्य विकायला दारात येणार नाही असे जर शेतकऱ्याने ठणकावून सांगितले तर शेपटी सरळ ठेवणार का? अजिबात दारात येऊ नका ... व्यापाऱ्यांशी संलग्न होऊन देशात माल न विकता, परदेशातून ज्यादा पैका कमावला तर इतरांची हरकत नसावी, काय म्हणता? परदेशात माल जरूर विका ... पण एकदा विचार करा ... . तुम्ही मुक्त अर्थव्यवस्था (Deregulated) मागत आहात. ही दुधारी तलवार आहे. . तुम्हाला माहिती असेलच ... भारताने WTO trade facilitation agreement for agriculture वर सही केलेली नाही .. कारण या करारानुसार तुम्हाला जगात कुठेही तुमचा शेतमाल विकत येईल ... पण त्याच बरोबर जगातले कोणीही भारतात त्यांचा शेतमाल विकू शकेल. तसेच शेतीविषयक सर्व सबसिडी बंद कराव्या लागतील (target within १०%). याबद्दल खूप काही बोलता येईल तुम्ही शेतकरी आहात ... तुम्हाला या सगळ्याची माहिती असेलच ... तेंव्हा deregulated मार्केट जरूर मागा .. पण त्याचा सर्व फायद्या / तोट्या शकत ... hope you get what you wish for

In reply to by अमर विश्वास

माहिती बद्दल धन्यवाद..!! तुमचे म्हणणे १००% पटते आहे पण.. जरी ह्या अग्रीमेंट केल्या आहेत तरी याचा फायदा शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही ना. बरेच जण सल्ला देतात की हा व्यवसाय अट्या बटयाचा आहे, जमत नसेल तर सोडून द्या. त्यावर आगाऊ सल्ले भीक मागू नका. आयकर-वीज बिले-कर्जे भरा. नाही जमलं तर सोडून देतील शेती लोक. जनतेने आपला भार सरकार वर वाहवा. ते करतील काय करायचे ते. काय आहे एकत्र कुटुंब पद्धतीत ही अशीच भीती दाखवली जाते. वेगळे राहिले तर असे होईल, हाल होतील, फायदे मिळणार नाही, तोटे होतील असे सांगून राबवून घेतले जाते. फायदा करून घेणारे मज्जा मारणारे मारून घेतात आणि शेळोप्याचा बाता मारतात. प्रत्येक्षात वेगळे झालेल्या ची प्रगती बरेच काही सांगून जाते. अमर जी, शेतकऱ्यांचा खरा प्रॉब्लेम खेळतं भांडवल आणि आयात निर्यात धोरणे एवढाच आहे. ते सोडवायचे सोडून रामू अण्णाची पोरं फिल्टर-अस्वच्छता मधेच वेळ दवडत आहेत.

काही नेहमीचे यशस्वी कलाकार दिसले पण चर्चा एकूण छान चालू आहे. धन्यवाद!

विशुमितजीं ... तुमचे याआधीचेही प्रतिसाद वाचले ... तुमचा राग समजू शकतो .. पण तरीही टोकाच्या प्रतिक्रिया टाळा खेळतं भांडवल आणि आयात निर्यात धोरणे हे प्रश्न आहेतच पण एव्हडेच प्रश्न आहेत हे पटत नाही . काही वर्षांपूर्वी कामाच्या निमित्ताने महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील (विशेषतः: पंजाब मधील) शेती / ग्रामीण उद्योगधंदे अभ्यासण्याची संधी मिळाली तसेच अमुल चा उपक्रमही अभ्यासला (Case study) आपण खुप काही शिकण्यासारखे आहे. महाराष्ट्रातल्या शेतीसंबंधी एव्हडेच म्हणतो : आपण Professional होणे गरजेचे आहे. म्हणजे सुट-बुट के सरकार नाही .. पण प्रत्येकाने शेतीकडे एक व्यवसाय म्हणुन बघितले पाहिजे. म्हणजे त्यातली भावनिक गुंतवणुक दूर ठेवली पाहिजे शेती म्हणजे शेतीची संपुर्ण मुल्य साखळी (Value Chain) अजिबात विकसित झालेली नाही ... जोपर्यंत एखादे "अमूल" शेतीत येत नाही तोपर्यंत शेती हा पारंपारिक व्यवसाय राहील व सगळ्या समस्या कमी अधिक प्रमाणात तशाच राहतील

In reply to by अमर विश्वास

तसेच अमुल चा उपक्रमही अभ्यासला (Case study) आपण खुप काही शिकण्यासारखे आहे. याबद्दल अजुन थोडे लिहाल का..? वेगळी लेखमाला झाली तरी हरकत नाही.

In reply to by अमर विश्वास

तुमचे याआधीचेही प्रतिसाद वाचले ... तुमचा राग समजू शकतो .. पण तरीही टोकाच्या प्रतिक्रिया टाळा>>> -- कोणी ही उठसूट शेतकरी भिकारी आहेत, कटोरा घेऊन फिरतात, कर्जे फेडत नाहीत, वीज चोरी करतात, ते उद्धट आहेत इतकाच काय त्यांना काडीची अक्कल नाही इथं पर्यंत मजल गेली आहे. अशा लोकांना एक तर नक्की समस्या काय आहे हे माहित नाही, ती कशी सोडवायची हे तर आणखी दूर. आपल एकच घिसीपिटी कॅसेट लावून द्याची. खेळतं भांडवल आणि आयात निर्यात धोरणे हे प्रश्न आहेतच पण एव्हडेच प्रश्न आहेत हे पटत नाही .>>> -- हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत आणि महत्वाची बाब हे दोन्ही प्रश्न सरकारच्या हातात आहेत. बाकी जे प्रश्न आहेत त्यासाठीचे कष्ट आणि जोखीम उचलायला शेतकरी कधी ही समर्थ आहे. (मागच्या वर्षी माझा गहू एकदम जोरदार आला होता. गहू मळणीचे मशीन मिळाले नाही म्हणून दुसऱ्या दिवसावर काढणी ढकलली. त्या रात्री महाभयंकर गारपीट झाली. डोळ्यात टच पाणी आले पण डोक्यावर पांघरून घेऊन झोपून टाकले.) आपण Professional होणे गरजेचे आहे.>> -- माझा एका प्रतिसादात शेतकऱ्यांनी काय सुधारणा केल्या आहेत ते लिहले आहे. लय हुशार लोक आहेत शेतीत. त्यांचे औषधाचे, बी बियाणांचे, खतांचे, बाजारभावाची, आवाक जावक आणि हवामानाचा अभ्यास जर पाहिला तर भले भले तज्ज्ञ तोंडात बोटे घालतील. म्हणजे त्यातली भावनिक गुंतवणुक दूर ठेवली पाहिजे>>> -- असे कसे म्हणता भावनिक गुंतवणूक दूर ठेवली पाहिजे. पोटच्या लेकरा प्रमाणे जपावा लागतं शेतीला. मागे एका जालीकुट्टूच्या धाग्या मध्ये खोंडाना पळवेल नाही तर कापीन असे म्हंटले तर झोंबले लोकांना. शेती म्हणजे शेतीची संपुर्ण मुल्य साखळी (Value Chain) अजिबात विकसित झालेली नाही>>> -- ही मूल्य साखळी चा बराच सा भाग सरकारच्या हातात आहे. त्याला फक्त शेतकरीच जवाबदार नाहीत. जोपर्यंत एखादे "अमूल" शेतीत येत नाही तोपर्यंत शेती हा पारंपारिक व्यवसाय राहील>>> -- शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे ह्या समजुतीच्या कोषातून लोक बाहेरच येत नाहीत. शेतकरी खूप बदलले आहेत. जागतिकरणामध्ये त्यांनी कधीच शिरकाव केला आहे. कृपया त्यांना अडाणी समजू नका.

विशुमितजी जोपर्यंत एखादे "अमूल" शेतीत येत नाही तोपर्यंत शेती हा पारंपारिक व्यवसाय राहील>>> -- शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे ह्या समजुतीच्या कोषातून लोक बाहेरच येत नाहीत. शेतकरी खूप बदलले आहेत. जागतिकरणामध्ये त्यांनी कधीच शिरकाव केला आहे. कृपया त्यांना अडाणी समजू नका. माझ्या एका तरी प्रतिसादात मी शेतकरी अडाणी आहे असे दुरान्वयाने तरी म्हणाल्याचे दाखवून द्यावे .. पण एकदा तुम्ही सोडून बाकी सर्व जण शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत असे गृहित धरले असेल तर अधिक काय बोलणे ... तसेच ही मूल्य साखळी चा बराच सा भाग सरकारच्या हातात आहे असे आपण म्हणता .... अमुल पूर्वी दुग्ध व्यवसायाबद्दल लोकांचे हेच मत होते शेतीत "अमुल" येणे याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ थोडा वेगळा आहे .. अमुल चे खरे यश हे त्यांनी सर्व दुधउत्पादकांना एकत्र आणले व नाशवंत मालावर प्रक्रिया करुन दुधाचे शेल्फ लाईफ वाढवले हे नाही. अमुलच्या आधीही दुध डेअऱ्या होत्याच व मिल्क पावडर व इतर उत्पादने बनत होतीच. अमुल नी उत्तम वितरण व्यवस्था उभी केली व आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत योग्य पद्धतीने पोचवली. त्यापूर्वीच्या दुध डेअऱ्या मुख्यत्वे पुरवठ्याकडे (Supply side) लक्ष केंद्रित करत होत्या .. अमुल ने मागणी कडे (Demand Side) लक्ष पुरवले. आज शेतीत डिमांड साईड कडे (विपणन, वितरण, वाहतुक) लक्ष पुरवणारे शेतकरी किती? याबाबतीत बरेचदा परावलंबित्व दिसते पण जाऊ दे विशुमितजीं .. आपणास हे पटणार नाही .. कारण आपण सोडुन बाकी सर्व शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत ... जाताजाता ... आम्हीही धरणग्रस्त शेतकरी आहोत. पवना धरणात आमची बरीच जमीन गेली. आज इतक्या वर्षात पूर्ण मोबदला मिळालेला नाही ... तारीही पवना धरणाचे पाणी पिणाऱ्या पिंपरी चिंचवाडकरांना आम्ही शत्रू मनात नाही ... इति लेखनसीमा ... ऑल द बेस्ट

In reply to by अमर विश्वास

माझ्या एका तरी प्रतिसादात मी शेतकरी अडाणी आहे असे दुरान्वयाने तरी म्हणाल्याचे दाखवून द्यावे >> -- तुमचा काही तरी गैरसमज होतोय. माझा लेखन दोष असेल कदाचित. जरी मी तुमच्या प्रतिसादाला प्रतिउत्तर दिले असले तरी हि टिपणी तुमच्यासाठी नसून शेतकऱ्यांना अडाणी समजणाऱ्याना होती. तुमच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व..!! पण एकदा तुम्ही सोडून बाकी सर्व जण शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत असे गृहित धरले असेल तर अधिक काय बोलणे >>> -- मी जरी माझ्या वरील प्रतिसादांमध्ये शेतकरी आणि बिगर शेतकरी अशी विभागणी केली ती फक्त सरसकट शेतकऱ्यांना फुकटे/चोर म्हणाऱ्यांसाठी होती. त्यांना प्रश्न सोडवायचा नाहीय फक्त पक्षीय कंड कुरवाळायचा आहे. मी अशांच्या विरोधात आहे. तुम्ही जे अमूल चे उदाहरण देत आहात ते पूर्ण मान्य आहे. पण ते पुन्हा सहकारी तत्वावर चालू करणार का? हे चालू सरकारला सहकार मान्य आहे का? जाताजाता ... आम्हीही धरणग्रस्त शेतकरी आहोत. पवना धरणात आमची बरीच जमीन गेली. आज इतक्या वर्षात पूर्ण मोबदला मिळालेला नाही ... तारीही पवना धरणाचे पाणी पिणाऱ्या पिंपरी चिंचवाडकरांना आम्ही शत्रू मनात नाही>>> -- माझ्यामुळे तुम्ही खूपच भावनिक झाला. पण एवढे सांगू इच्छितो आम्ही पण खूप दिलदार आहोत. अजून तरी आयुष्यात एक पण शत्रू नाही तयार केला. इति लेखनसीमा >> -- तुम्ही पण प्रश्न अर्धवट सोडून निघून चालला. असो. ऑल द बेस्ट साठी धन्यवाद..!!

श्रीगुरुजी,
जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा फटका शेतकर्‍यांनाही बसतोच. त्यामुळेच सरकारला हस्तक्षेप करावा लागतो.
या युक्तिवादात तार्किक लघुमंडळ ( = लॉजिकल शॉर्टसर्किट) झाले आहे असे वाटतेय. आ.न., -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, शासनाने भावात (उदा. कांदा) हस्तक्षेप केल्यावर शेतकऱ्याला एक ग्राहक म्हणून थोडाफार फायदा होईल. त्याचबरोबर अगोदर पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने तोटा होईल. आता हा फायदा नगण्य आहे. गोळाबेरीज घाट्याची आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

यालाच तार्किक लघुमंडळ ( = लॉजिकल शॉर्टसर्किट) म्हणतात की काय? कांद्याचे भाव प्रमाणाबाहेर वाढल्यानंतर सरकार कमी दराने बाहेरून कांदा आयात करून भाव कमी आणू शकते. जागतिक स्पर्धेत असे होणे अपरिहार्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, वाढीव भावात जसा शासन हस्तक्षेप करतं तसा पाडीव भावातही करावा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अन्नधान्यांच्या काही उत्पादनांसाठी सरकार आधारभूत किंमत जाहीर करते. भाव एका ठराविक किंमतीच्या खाली येऊ नये यासाठी केलेला हा एक प्रकारचा शासकीय हस्तक्षेपच आहे. अर्थात आधारभूत किंमत कितपत पाळली जाते याविषयी कल्पना नाही. ज्याप्रमाणे रिक्षा किंवा प्रवासी वाहनांचे प्रति किमी दर सरकारने ठरवून दिले असले तरी जास्त दराने नाडण्याचे प्रकार घडतात. तसेच आधारभूत किंमत असली तरी त्यापेक्षा कमी भावाने खरेदी करण्याचेही प्रकार घडत असणार.

मी वर काही प्रश्न दिले आहेत . उत्तरे मिळाली नाहीत . उत्तरे देण्यासाठी अडचण काय आहे पेपर त्तर साधा सोपा आहे. पुन्हा प्रश्न देत आहे. या आत्महत्या फक्त महाराष्ट्रात होतात की भारतात सर्वत्र ? लघूउद्योजक आत्महत्या का करीत नाहीत ? सर्वच विकसनशील राष्ट्रात हे हमी भाव प्रकरण चालू आहे का ? गुगल अर्थ मधे पाहिले तर परदेशात प्रचंड आकाराची शेते का दिसतात ? कोणते उत्पादन करायचे याचे शेतकरर्याचे स्वातंत्र्यच काढून घेतले तर कांदा एके कांदा उस एके ऊस कापूस एके कापूस हा प्रकार बम्द होऊन देश सुखी होईल काय ? थेट माल ग्राहकापर्यंत आणलेला शेतकरी माल जरा तरी सवलतीत का विकत नाही ?

...या सगळ्या चर्चांमधे विज्ञान या जमातीला कोणी विचारात घेतेलेले दिसत नाही. ज्या प्रकारे शास्त्रज्ञ विचार करतात व संकटांचा फायदा उठवून नवनवीन शोध लावतात किंवा फायदा उठवितात असे म्हणण्यापेक्षा त्या संकटावर मात करतात, त्याचा विचार करता अजून काही वर्षात लोकसंख्या अतोनात वाढल्यावर अन्नाच्या टेबलेटस् तयार झाल्यातर आश्चर्य वाटायला नको. मग शेती, त्याला लागणारे पाणी, शेतमाल, जमीन...त्याचे होणारे तुकडे, खते, बाजार, बाजारभाव इत्यादि गोष्टी इतिहासजमा होतील असा अंदाज आहे... मग त्यावेळेस ताज्या भाज्या व अन्न ही गरज न राहता चैन असेल व त्यासाठी जनता पाहिजे तेवढे पैसे मोजण्यास तयार होईल... शेतकर्‍यांना सुखाचे दिवस येतील....

या संवादात मध्ये कुठेतरी 'अमूल'च्या यशाचा उल्लेख वाचला. 'अमूल' मॉडेल यशस्वी ठरले असले तरी त्याचे अनुकरण इतर ठिकाणी झालेले फारसे आढळले नाही. खरे तर इतक्या दैदीप्यमान यशोमार्गाची आतापर्यंत चाकोरी निर्माण व्हायला हवी होती. पण तसे झालेले नाही. इतकेच नव्हे तर त्याच लोकांनी आणि धर्तीवर काढलेला 'धारा' हा शेंगदाण्याच्या तेलाचा ब्रॅण्डही सुरुवातीच्या थोड्याफार यशानंतर आता चाचपडतोच आहे. तेव्हा 'अमूल'च्या यशाच्या अनुकरणात काही अडथळे असावेत. अन्यथा तो आतापर्यंत एक राजमार्ग ठरला असता.

In reply to by राही

एका धंद्यातील मॉडेल दुसर्‍या धंद्यात रेप्लिकेट करता येईलच असे नाही. धारा हे तेलबाजारातील मार्केट स्टॅबिलायझेशनचे सरकारी मॉडेल होते. सरकारचा त्यातला रस संपला तेव्हा ते बंद झाले-मागे पडले. अमूलच्या बाबतीत मात्र कित्येक वर्षे ऑपरेशन फ्लडच्या माध्यमातून सरकारी मदत येत राहिली दुधाची उपलब्धता वाढवणे हा सरकारचा स्वतःचा कार्यक्रम होता. एकप्रकारे अमूलचे यश हे सातत्यपूर्ण सरकारी मदतीमुळे आहे असे म्हणता येईल. अमूलचे अनुकरण केलेले गोकुळसुद्धा बर्‍यापैकी यशस्वी झाले आहे. अमूल देशभर पसरले आहे परंतु राज्याराज्यातील सहकारी दूध संस्था आता व्हॅल्यू अ‍ॅडेड उत्पादने बनवून विकत आहेत. एक्झॅक्ट अनुकरण शक्य असणारच नाही. मुख्य तत्व- उत्पादनाचे शेल्फ लाइफ वाढवणे; व्हॅल्यू अ‍ॅडेड उत्पादने बनवणे आणि ग्राहकाच्या शक्य तितके जवळ पोचणे. ही तत्त्वे पाळणे जितके जमेल तितके यश मिळेल. लाउड थिंकिंग- नाही म्हटले तरी दूध उत्पादन हा शेतकर्‍यांचा जोड धंदा आहे. त्याउलट कापूस, तूर वगैरे उत्पादन हे जोड धंदे नाहीत. मुख्य धंदे आहेत. दुध उत्पादक शेतकरी त्या बाबतीत डिस्ट्रेसमध्ये नसेल असे वाटते. शेतकर्‍याला डिस्ट्रेसमधून आधी बाहेर निघावे लागेल. ते कसे जमवता येईल ते पहायला पाहिजे.

In reply to by नितिन थत्ते

नेमके विवेचन. एक यशस्वी मॉडेल दुसर्‍या उत्पादनासाठी आणि वेगळ्या स्थळकाळात तंतोतंत लागू पडेल असे नाही हेच ठसवायचे होते.

In reply to by राही

राहीजी माझा डिटेल प्रतिसाद वाचावा. धारा हा अमूल चा ब्रँड नाही ... कृपया प्रतिसाद पूर्ण वाचावा हे विनंती. नुसत्या अमूलच्या उल्लेखावर जाऊ नका मी कुठेही अमूलचे मॉडेल कॉपी करावे असे लिहिलेले नाही अमुल ने मागणी कडे (Demand Side) लक्ष पुरवले हे मला अधोरेखित करावयाचे आहे खाली दिलेला प्रतिसाद पुर्ण वाचावा हि विनंती

In reply to by नितिन थत्ते

नितीन थत्ते जी अमूल हा सरकारी ब्रँड आहे ही नवीन माहिती आहे .... ही माहिती आपणास कोठे मिळाली ? तसेच अमूल ला सातात्यत्याने सरकारी मदत मिळाली हा शोध कुठून लावलात ? धारा हे तेलबाजारातील मार्केट स्टॅबिलायझेशनचे सरकारी मॉडेल होते. सरकारचा त्यातला रस संपला तेव्हा ते बंद झाले-मागे पडले.>>> हा पण अजब शोध आहे. धारा मागे पडले ते खुल्या आयात धोरणानंतर. माझा खालचा डिटेल प्रतिसाद वाचावा. अमूल व धारा बद्दल अधिक माहिती घेऊन प्रतिसाद लिहहवा ... का हा प्रतिसाद पण तुमचा वरील "कॉर्पोरेट शेती" प्रमाणे गंमतीत दिलेला प्रतिसाद समजायचं का ?

In reply to by अमर विश्वास

अमूल हा सरकारी ब्रॅण्ड नाही. मी तसे कुठेही सुचवलेले नाही. >>अमूल ला सातात्यत्याने सरकारी मदत मिळाली हा शोध कुठून लावलात पण अमूलचे यश सरकारच्या छत्रछायेवर बरेच अवलंबून होते. आज दुग्धोत्पादनविषयक सरकारी धोरणांवर अमूल प्रभाव पाडू शकते. आपले शेतकरी जे म्हणत आहेत- सरकारी हस्तक्षेप शेतकर्‍याच्या विरोधी असतो- त्याच्या उलट परिस्थिती अमूलची आहे. अमूलकडे सरप्लस दूध असेल तर सरकार दूधभुकटी आयात करण्यास बंदी घालते. म्हणाजे इतरांना दूधभुकटी अमूलकडूनच खरेदी करावी लागते. उलट अमूलला दुधाची टंचाई निर्माण झाली तर अमूलला दूधभुकटी आयात करण्याची परवानगी मिळते. आज पंधरा हजार कोटीच्या उलाढालीनंतरही अमूलच्या डेअरीजना नवीन यंत्रसामुग्री घेण्यास अल्प दराने कर्ज उपलब्ध करून देणे वगैरे सरकारी मदत मिळत असते. तरीही अमूलचे यश फॉरवर्ड इंटिग्रेशनमुळे मिळाले आहे हे मीही म्हणतोच आहे.

In reply to by नितिन थत्ते

आज पंधरा हजार कोटीच्या उलाढालीनंतरही अमूलच्या डेअरीजना नवीन यंत्रसामुग्री घेण्यास अल्प दराने कर्ज उपलब्ध करून देणे वगैरे सरकारी मदत मिळत असते. फक्त सरकारी मदत मिळाली म्हणून १५ हजार कोटींचा पल्ला गाठला की पंधरा हजार कोटींमुळे सरकारी मदत मिळते..?

In reply to by नितिन थत्ते

नितीन थत्तेजी एकदा काय म्हणायचे ते नक्की ठरावा पहिल्या प्रतिसादात तुम्ही लिहिता अमूलच्या बाबतीत मात्र कित्येक वर्षे ऑपरेशन फ्लडच्या माध्यमातून सरकारी मदत येत राहिली वाढवणे हा सरकारचा स्वतःचा कार्यक्रम होता. एकप्रकारे अमूलचे यश हे सातत्यपूर्ण सरकारी मदतीमुळे आहे>>> अमूल ब्रँड चे स्थापना १९४६ ला झाली व ऑपरेशन फ्लडची सुरुवात झाली त्यांनतर २० वर्षांनी ... मुळात अमूल चे यश पाहूनच NDDB व पराशन फ्लड ची सुरवात केली. त्यामुळे आपले अमूलचे यश हे सातत्यपूर्ण सरकारी मदतीमुळे आहे हे मत फारसे बरोरबर नाही पुढच्या प्रतिसादात आपण लिहिता आज दुग्धोत्पादनविषयक सरकारी धोरणांवर अमूल प्रभाव पाडू शकते. आपले शेतकरी जे म्हणत आहेत- सरकारी हस्तक्षेप शेतकर्‍याच्या विरोधी असतो- त्याच्या उलट परिस्थिती अमूलची आहे. अमूलकडे सरप्लस दूध असेल तर सरकार दूधभुकटी आयात करण्यास बंदी घालते. म्हणाजे इतरांना दूधभुकटी अमूलकडूनच खरेदी करावी लागते. >> याला काही पुरावा आहे का ? अमूल ला सरकारने कोणती अशी मदत केली जी नियंमाना धरून नव्हती ? किंवा बाकीच्या कॉमपन्यांना केली नाही ? एकतरी उदाहरण देऊ शकाल ? NDDB & GCMMF यामधील वाद आपणास ठाऊक असतीलच. जर अमूल ला झुकते माप मिळत असेल तर या दोन संस्थांमध्ये वाद होण्याचे कारण ?

In reply to by अमर विश्वास

एनडीडीबी स्थापन होण्यापूर्वी अमूलला सरकारी मदत मिळत नव्हती असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?

In reply to by नितिन थत्ते

नितीनजी अमूलच्या बाबतीत मात्र कित्येक वर्षे ऑपरेशन फ्लडच्या माध्यमातून सरकारी मदत येत राहिली >> असे आपणच लिहिले आहे याचा प्रतिवाद करताना मी ऑपरेशन फ्लडचा इतिहास सांगितला आता तुम्ही म्हणताय एनडीडीबी स्थापन होण्यापूर्वी अमूलला सरकारी मदत मिळत नव्हती असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? तेंव्हा एकदा नक्की ठरावा अमूलला सरकारी मदत नक्की कधी मिळाली ? ऑपरेशन फ्लडच्या आधी का नंतर ? माझा परत तोच प्रश आहे : याला काही पुरावा आहे का ? अमूल ला सरकारने कोणती अशी मदत केली जी नियंमाना धरून नव्हती ? किंवा बाकीच्या कंपन्यांना केली नाही ?

In reply to by अमर विश्वास

अमूलला सरकारी मदत स्थापनेपासून निदान २०११ पर्यंत मिळत होती. एनडीडीबीच्या स्थापनेचा अमूलशी काही संबंध नाही. (माहितीचा सोर्स मी सांगू शकत नाही. ते माझ्यासाठी प्रोफेशनल मिसकण्डक्ट होईल).

In reply to by नितिन थत्ते

एकप्रकारे अमूलचे यश हे सातत्यपूर्ण सरकारी मदतीमुळे आहे असे म्हणता येईल. या न्यायाने सरकार शेतीलाही सातत्यपूर्ण मदत करत आहेच की. मग..? एनडीडीबीच्या स्थापनेचा अमूलशी काही संबंध नाही. The National Dairy Development Board was created to promote, finance and support producer-owned and controlled organisations. NDDB's programmes and activities seek to strengthen farmer cooperatives and support national policies that are favourable to the growth of such institutions. Fundamental to NDDB's efforts are cooperative principles and cooperative strategies. हे खुद्द NDDB च्या वेबसाईटवरून घेतले आहे. हे वर्णन तंतोतंत लागू पडेल असा अमुलशिवाय वेगळा असा आणखी कोणता उद्योग त्यावेळी अस्तित्वात होता..? तसेच NDDB च्या Genesis या भागामध्ये आणंद पॅटर्न आणि ऑपरेशन फ्लड असे दोन मुख्य अमुलशी संबंधित / अमुलचा पुढाकार असलेले विषय दिसत आहेत. मग अमुलच्या यशाला सरकारी मदतीच्या कुबड्या लावणे किंवा NDDB च्या यशामधील अमुलचा सहभाग नाकारण्याचा तुमचा नेमका उद्देश काय आहे..? ओढून ताणून अमुलच्या यशाचे श्रेय फक्त काँग्रेसला द्यायचे असेल (डॉ. कुरीयन आणि सहकार्‍यांना वगळून) तर तसे सांगा. आपण सरळ त्या मुद्द्यावर येवून चर्चा करूया. युवराजांनी तसेही अमुलचे श्रेय "गुजरातकी महिलाओंको" दिलेले आहेच. बाकी NDDB च्या वेबसाईटवरील त्यांची फिल्म बघा. आणि अमुलने अशी फिल्म काढली असती तर नक्की काय वेगळी सुरूवात केली असती ते ही सांगा.

In reply to by मोदक

>>ओढून ताणून अमुलच्या यशाचे श्रेय फक्त काँग्रेसला द्यायचे असेल मी या धाग्यावरून रजा घेत आहे.

In reply to by अनुप ढेरे

ओके - तो भाग चर्चेपासून बाजुला ठेवूया. अमुल आणि NDDB चा परस्पर सहयोग उघड असताना तो नाकारण्याचा उद्देश काय..? (मी प्रतिसादात वस्तुस्थिती दिली आहे)

In reply to by राही

अरेरे, मिपावर असहिष्णुता वाढली आहे याचा खेद वाटतो. अमुलसारख्या अनेक उद्योगांचा पाया घालणार्‍या यशस्वी सहकारी योजनेचा NDDB मधला सहभाग नाकारणे किंवा मी विचारलेल्या नेमक्या प्रश्नाला** बगल देण्याचा तिरकसपणा सोयीस्कररीत्या विसरलात का..? **अमुलच्या यशाला सरकारी मदतीच्या कुबड्या लावणे किंवा NDDB च्या यशामधील अमुलचा सहभाग नाकारण्याचा तुमचा नेमका उद्देश काय आहे..? (बाकी ऑपरेशन फ्लड आणि अमुलच्या एकंदर यशाबद्दल तत्कालीन मंत्र्यांनी पार चौकशी आयोग वगैरे नेमले होते, वर्तमान पत्रातून अमुलला बदनामही केले होते. असे असताना "अमूलला सरकारी मदत स्थापनेपासून निदान २०११ पर्यंत मिळत होती" ही वस्तुस्थिती रोचक आहे.)

In reply to by अमर विश्वास

कदाचित लोक पण कॅलरी कॉन्शस झाल्याने इतर तेलांकडे वळले , अन धारा मागे पडले ते. पण शेंगदाणा तेलातल्या भाज्या म्हणजे निव्वळ सुख हो.

In reply to by कुंदन

अगदी अगदी, सर्व प्रकारची तेले वापरल्यावर गेल्या तीन चार वर्षांपासून बॅक टू शेंगदाना तेल, तेही धाराच. निव्वळ सुख!

राहीजी धारा हा अमुलचा ब्रँड नाही धारा चे उत्पादन NDDB (national dairy development board) करते NDDB आणि अमूल एकाच का? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे कारण दोन्हीचे मुख्यालय "आनंद" येथेच आहे व डॉ. वर्गिस कुरियन दोन्हीचे अध्यक्ष होते. पण प्रत्यक्षात NDDB ची स्थापना १९६५ साली संसदेत विधेयक पास होऊन झाली. NDDB चा दुग्धजन्य पदार्थाचा ब्रँड "mother dairy" हा आहे व तो अमूलचा प्रतिस्पर्धी आहे. आता डेअरी बोर्डाने तेलाचा ब्रँड का लाँच करावा ? मुळात डेअरी बोर्डाने "Operation Golden Flow" का चालवावा ? सरकारी संस्थांना असे प्रश्न विचारायचे नसतात :) :) :) तरीही धारा हा यशस्वी ब्रँड असून १९८८ साली हा लाँच झाला व १९९० साली धारा हा भारतातला खाद्यतेलाचा सर्वात मोठा ब्रँड होता. त्यानंतर १९९८ मध्ये खाद्यतेलाच्या खुल्या आयातीला परवानगी मिळाल्यानंतर धारा चा खप कमी झाला. त्यानंतर २०१३ मध्ये धारा चे नव्या स्वरूपात रिलाँन्च झाले ... हा धाराचा इतिहास आहे दुसरा मुद्दा : मी माझ्या प्रतिसादात स्पष्ट लिहिले आहे ते परत लिहितो : अमुल चे खरे यश हे त्यांनी सर्व दुधउत्पादकांना एकत्र आणले व नाशवंत मालावर प्रक्रिया करुन दुधाचे शेल्फ लाईफ वाढवले हे नाही. अमुलच्या आधीही दुध डेअऱ्या होत्याच व मिल्क पावडर व इतर उत्पादने बनत होतीच. अमुल नी उत्तम वितरण व्यवस्था उभी केली व आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत योग्य पद्धतीने पोचवली. त्यापूर्वीच्या दुध डेअऱ्या मुख्यत्वे पुरवठ्याकडे (Supply side) लक्ष केंद्रित करत होत्या .. अमुल ने मागणी कडे (Demand Side) लक्ष पुरवले. आज शेतीत डिमांड साईड कडे (विपणन, वितरण, वाहतुक) लक्ष पुरवणारे शेतकरी किती? याबाबतीत बरेचदा परावलंबित्व दिसते तेंव्हा अमूल ची जशीच्या तशी कॉपी अपेक्षित नाहे माझा रोख हा व्हॅल्यू चेन मधल्या outbound logistics विकसित करण्याकडे होता