लाल टांगेवाला

रासपुतीन's picture
रासपुतीन in जनातलं, मनातलं
22 Mar 2017 - 12:44 pm

नमस्कार मिपाकरहो,

मी वाचलेल्या आणि न वाचलेल्या पुस्तकांची त्यांच्या प्रकारानुसार (आत्मचरित्रे, विनोदी, कादंबरी ई.) गूगल शीट/वर्कशीट/स्प्रेडशीट बनवत आहे.
यामध्ये पाहिलेले अन अजून परत पाहण्याची इच्छा असलेले, आवडलेले अन न आवडलेले मराठी/हिंदी/इंग्रजी/तेलगु/कन्नड्/भोजपुरी चित्रपट
ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे.
आवडत्या/नावडत्या डिशेस व होटेल्स ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे.
तसंच केलेला आणि न केलेला व्यायाम सुद्धा प्रकारानुसार (पोहणे/पळणे/सायकलिंग) असा ऍप मधला डाटा एकत्र करत आहे. .
तुम्ही पण तुमचा डेटा मला द्या.
सगळ्या माहीतीचा उपयोग करुन मिळालेले निष्कर्ष अत्यंत अभिनव पध्दतीने मांडण्यात येणार आहेत.
चला तर मग, हलवा तो माऊस आणि द्या हा डेटा.
धन्यवाद.

लाल धूळ उडवित आला लाला टांगेवाला

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतपाकक्रियाबालकथाप्रेमकाव्यबालगीतउखाणेव्युत्पत्तीशब्दक्रीडासामुद्रिकमौजमजाचित्रपटप्रकटनविचार

प्रतिक्रिया

हायला, टांगा पलटी घोडे फरार.
.
हे कोणतरी खिलाडी आयडी आहे शुअर.

टवाळ कार्टा's picture

22 Mar 2017 - 1:02 pm | टवाळ कार्टा

ख्या ख्या ख्या...नुकतीच एका कायप्पा ग्रुपवर अश्या लाल्यांची चर्चा झालेली =))

कंजूस's picture

22 Mar 2017 - 5:08 pm | कंजूस

केवढा तो आवाका!!

अभ्या..'s picture

22 Mar 2017 - 5:10 pm | अभ्या..

बघा की कंकाका, आव तर विष्वकोशाचा आणलाय अगदी,
ह्यासाठी सर्व्हर कुठला घ्यावा हे विचारले नै नशीब. ;)

अप्पा जोगळेकर's picture

22 Mar 2017 - 5:17 pm | अप्पा जोगळेकर

सगळ्या माहीतीचा उपयोग करुन मिळालेले निष्कर्ष अत्यंत अभिनव पध्दतीने मांडण्यात येणार आहेत.
म्हणजे काय डेटा वेअर हाउस बनवणार का.
तुमचा डेटा सायंटिस्टपणा इकडे काय करायचाय ?
बळच.

ज्योति अळवणी's picture

22 Mar 2017 - 8:46 pm | ज्योति अळवणी

उगाच काहीतरी

धाग्यातला मजकूर गंभिर वाटतो आणि खाली लेखनप्रकारात -बालगीत,बालकथा,पाकक्रिया ......... . . . .
एकदम विनोदी केलं