✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हल्लीच काय खरेदी केलंत ?

ग
गवि यांनी
Wed, 03/08/2017 - 12:11  ·  लेख
लेख
अमेझॉनकृपेने किंवा लोकल बाजारात काहीना काही खरेदी चालूच असते. रीटेल थेरपीचा वापर वाढतोच आहे. एखाद्या अतिभव्य मॉलपासून ते गावच्या आठवडी बाजारापर्यंत कुठेही काहीतरी खास हवं असलेलं मिळून जातं अतीव समाधान किंवा भ्रमनिरास होतो. कदाचित इकडेतिकडे चार रिव्ह्यूज टाकले जातात आणि ती वस्तू मागे पडते. तर एकंदरीत आपण खरेदी केलेल्या सामानाबद्दल काही सांगावंसं वाटलं तर इथे नोंदवून ठेवावं अशी इच्चा आहे. यामधे प्रत्यक्ष खरेदी केलेल्या वस्तू, विशलिस्टवर असलेल्या पण कुठे मिळतील हे माहीत नसलेल्या वस्तू, सर्व्हिसेस, वस्तूंविषयीचं चांगलंवाईट परखड मत, चालू आणि भावी "डील्स"ची / सेल्सची माहिती.. असं सगळं एकमेकांच्या फायद्यासाठी शेअर करावं. नव्या , सेकंडहँड, दुर्मिळ, जुन्या बाजारात मिळालेल्या, आउट ऑफ मार्केट झालेल्या पण कुठेतरी परत मिळालेल्या अशा सर्व वस्तूंविषयी येऊदे. .............. गेल्या काही काळात मी अमेझॉनवरुन कनौजमधलं "मिट्टी अत्तर" घेतलं. पावसातल्या मातीचा वास अर्करुपात कैद करुन ठेवलेला. अफलातून अ‍ॅडिक्टिव्ह... तापलेल्या मातीवर पाऊस पडल्याचा गंध. किंमत साडेनऊशे रुपयांत १० मिली. B शिवाय बरीच वर्षं घरात पडून असलेल्या एलपी रेकॉर्ड्ससाठी हा रेकॉर्डप्लेअर घेतला. अतिशय छान क्लियर आवाज. इनबिल्ट स्पीकर्स. बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी. तीस वर्षांनी बीटल्स, क्लिफ रिचर्ड्स, अ‍ॅबा, बोनीएम ऐकून नॉस्टाल्जियात बुडलो. आ
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
43173 वाचन

💬 प्रतिसाद (128)

प्रतिक्रिया

प्रचंड धन्यवाद !

संजय क्षीरसागर
Wed, 03/15/2017 - 20:41 नवीन
आताच हा टिवी शोरुमला बघून आलो. मला फार आवडला. पिक्चर मॅट फिनिश आणि क्लिअर आहे. सोनीचा त्याच्या शेजारीच लावला होता. त्याची पिक्चर क्वालिटी सेम सेटींग्जला फार ब्राईट होती. पत्नी सोनीच्या टिवीला भाळली (किंमत ४५.०००!) पण सेल्समन भला माणूस होता. तो म्हणाला, इतकं ब्राईट पिक्चर तुम्हाला फार वेळ पाहावणार नाही ! तुमच्या या प्रतिसादामुळे चित्राचा दर्जा सुंदर आहे. विशेषतः एच डी चॅनल निर्णय पक्का केला आहे ! मी टिवी पाहात नाही. तो आईच्या बेडरुममधे असतो. त्या रुम साइजला ४०" एकदम स्युटेबल आहे. पुनश्च धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सोनी व इतर ...

चौकटराजा
गुरुवार, 03/16/2017 - 10:52 नवीन
सोनी वाल्यांचे सर्व टीव्ही शोरूम मधे दाखविताना रेकॉर्डेड कन्टेन्ट्स दाखवितात . सोनीची खरी पारख करताना ट्रन्समिटेड सिग्नलस कसे दिसतात ते पाहूनच तुलना करणे योग्य. सोनीवाले ते कधीच दाखवीत नाहीत. घरी आल्यावर खरे चित्र कसे दिसते हे कळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सोनी ब्रॅवियाचा अनुभव घेऊन

किसन शिंदे
गुरुवार, 03/16/2017 - 10:58 नवीन
सोनी ब्रॅवियाचा अनुभव घेऊन पाहीलाय. अतिशय बेभरवशाचे एलईडी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सोनी ब्राविया बद्दल सहमत...

संदीप डांगे
गुरुवार, 03/16/2017 - 11:24 नवीन
सोनी ब्राविया बद्दल सहमत... अतिशय बेभरवशाचे टीवी.. तीन वर्षे चालले तर पैसे वसूल... सर्व सदस्यांना कळकळीची सुचवणी. बाकी काहीघ्या... सोनी बिल्कूल घेऊ नका.. सोनी ब्राविया ४० इन्ची घेतला होता... साधारण तिसर्‍या वर्षाच्या सुरुवातीला वरच्या भागात आडवा पॅच अंधुकसा यायला लागला... नंतर दोनेक वर्षात जरा जास्त वाढला.. जालावर चेक केले तेव्हा ही समस्या खूप खुप लोकांना आहे असे कळलं, कैकांना तर एक वर्ष झाल्याझाल्या भलेथोरले पॅचेस आल्याचे दिसले. स्क्रीन बदल्ण्याची किंमत २२हजार रुपये. (टीवी ६५हजार) स्क्रीन बदल्ण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा तो मी ओएलक्स वरुन २१ हजाराला विकून टाकला. त्यापेक्षा उन्नीस-बीस क्वालिटी असलेले शामसंग-एल्जी वगैरे घ्यावेत.. दणकट आणी वर्षानुवर्षे बिनदिक्कत चालतात. खरेसाहेबांना अनुमोदन. बजेटमध्ये मोठ्यातलामोठा स्र्कीन घ्यावा. पण बैठकीचे व टीवीचे अंतर किमान १० फूट हवे. ८ फूट असेल तर ३२इन्चीपर्यंत ठिक १० फूट असेल तर ४० इन्ची ठिक १२-१५ फूट असेल तर ५५ वगैरे ठिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

सोनी ब्राविया ४० इन्ची घेतला

किसन शिंदे
गुरुवार, 03/16/2017 - 11:33 नवीन
सोनी ब्राविया ४० इन्ची घेतला होता... साधारण तिसर्‍या वर्षाच्या सुरुवातीला वरच्या भागात आडवा पॅच अंधुकसा यायला लागला... नंतर दोनेक वर्षात जरा जास्त वाढला.. जालावर चेक केले तेव्हा ही समस्या खूप खुप लोकांना आहे असे कळलं, कैकांना तर एक वर्ष झाल्याझाल्या भलेथोरले पॅचेस आल्याचे दिसले. स्क्रीन बदल्ण्याची किंमत २२हजार रुपये. (टीवी ६५हजार) स्क्रीन बदल्ण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा तो मी ओएलक्स वरुन २१ हजाराला विकून टाकला.
माझ्या स्वत:च्या ओळखीत चार पाच जणांकडे ही समस्या अनुभवली. माझा स्वत:चा एलईडी चार वर्षे उत्तम टिकला, पण त्याची स्क्रीन गेल्यावर मात्र ती बदलण्याच्या भानगडीत न पडता एलजीचा नवीन एलईडी घेतला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

वरील गुणोत्तर आता टीव्ही चे

सुबोध खरे
गुरुवार, 03/16/2017 - 12:15 नवीन
वरील गुणोत्तर आता टीव्ही चे रेझोल्यूशन वाढल्यामुळे बदलले आहे. To determine the maximum size TV screen you would divide the length of your viewing distance by 1.5. म्हणजेच जर तुम्ही ८ फुटावर(९६ इंच) बसत असलात तर ६४ इंची आणि १० फुटावर(१२० इंच) बसत असलात तर ८० इंचाचा टीव्ही घ्यावा http://blog.coldwellbanker.com/3-simple-tips-for-choosing-the-right-size-tv-for-your-room/ माझ्या बेडरूम मध्ये बेडची लांबी ६ फूट अधिक ३ फुटावर भिंत असे ९ फूट होत होते त्यासाठी ७२ इंचाचा टीव्ही चालला असता. पण तेवढा माझ्या बजेट मध्ये नव्हता म्हणून परवडणारा ५५ इंचाचा घेतला. शिवाय जितका मोठा टीव्ही असेल तितके त्याचे रेझोल्यूशन चांगले हवे म्हणजेच ४० इंचापेक्षा जास्त असेल तर फुल्ल एच डी टीव्हीच घ्यावा full HD, offers 1920 by 1080 pixels. ४० इंचापेक्षा कमी असेल तर एच डी चालू शकेल. (a 720p HDTV gives you 1024 by 768 pixels,) खरं तर आता एच दि किंवा एच डी रेडी टीव्ही घेऊच नये कारण ते येत्या एक ते दोन वर्षात नक्कीच कालबाह्य होणार आहेत आत्ताच जवळ जवळ ५० एच डी चॅनल उपलब्ध आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बरोबरे !

संजय क्षीरसागर
गुरुवार, 03/16/2017 - 12:42 नवीन
या ४०" व्यू टिवीचं Screen Resolution:1920 x 1080 आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बरोबरे !

संजय क्षीरसागर
गुरुवार, 03/16/2017 - 12:44 नवीन
या ४०" व्यू टिवीचं Screen Resolution:1920 x 1080 आहे ! शिवाय हे २०१७ चं मॉडेल आहे, त्यात तीन वर्षाची वॉरंटी किंमतीतच इन्क्लूडेड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

झकास

सुबोध खरे
गुरुवार, 03/16/2017 - 12:58 नवीन
झकास तीन वर्षे डोक्याला त्रास नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

फुल एचडी एलजीचा एलसीडी टीव्ही

प्रचेतस
Fri, 03/17/2017 - 08:09 नवीन
फुल एचडी एलजीचा एलसीडी टीव्ही गे ७/८ वर्ष घरी वापरतोय. एकदाही प्रॉब्लेम नाही, अत्युच्च दर्जाचे चित्र आहे. सोबत ब्लू रे प्लेयर असल्याने फुल एचडी सिनेमे बघताना अधिकच बहार येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सम्सुन्ग-एल्जी पेक्षा

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 03/16/2017 - 17:31 नवीन
सम्सुन्ग-एल्जी पेक्षा पॅनासॉनिक अधिक दणकट आणि स्वस्त आहे. शिवाय दर्जाही उत्तम. मायक्रोमॅक्स चे टीव्ही आणखीन स्वस्त आहेत. पण दर्जाबद्दल माहीती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

माझ्याकडील सोनी ब्राविया अनेक

रेवती
गुरुवार, 03/16/2017 - 15:55 नवीन
माझ्याकडील सोनी ब्राविया अनेक वर्षे चालू आहे. उलट नातेवाईकांकडील सॅमसंग दोन वर्षात बिघडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

ओ प्लीज ना. अशा ईंचाच्या अन

अभ्या..
गुरुवार, 03/16/2017 - 13:07 नवीन
ओ प्लीज ना. अशा ईंचाच्या अन लाखालाखाच्या गोष्टी करु नकात ना. कॉम्प्लेक्स येतो आम्हा गरीबांना. :(
  • Log in or register to post comments

हो ना! मला तर वाटायले अजून

संदीप डांगे
गुरुवार, 03/16/2017 - 13:56 नवीन
हो ना! मला तर वाटायले अजून चार-पाच वर्षे फिरकू नये मिपावर... :-) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तसं असेल तर तुम्ही चार पाच

सतिश गावडे
गुरुवार, 03/16/2017 - 13:56 नवीन
तसं असेल तर तुम्ही चार पाच हजारात मिळणारा प्रोजेकटर घ्या. लाखाचा प्रश्नच नाही आणि इंचही जास्त. मग आयुष्यात बहार तर येईलच, पण त्याबरोबर दृकश्राव्य अनुभवाचा महोत्सवही होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हा हा हा =))

अनुप ढेरे
गुरुवार, 03/16/2017 - 14:03 नवीन
हा हा हा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

चार पाच हजारात प्रोजेक्टरही

किसन शिंदे
गुरुवार, 03/16/2017 - 16:37 नवीन
चार पाच हजारात प्रोजेक्टरही मिळत नाही. कमीत कमी २५-३० हजारात एपसोन किंव इन-फोकसचे चांगले प्रोजेक्टर मिळू शकतात ज्यांची ल्युमिन्स क्वॉलिटी चांगली असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

एखादा फ्लेक्स नायतर वॉलपेपर

अभ्या..
गुरुवार, 03/16/2017 - 16:46 नवीन
एखादा फ्लेक्स नायतर वॉलपेपर लावावा, म्हशीचे नायतर हरणाचे चित्र लावणारे मी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मी गुणवत्तेबद्दल बोललो नाही

सतिश गावडे
गुरुवार, 03/16/2017 - 16:55 नवीन
>>चार पाच हजारात प्रोजेक्टरही मिळत नाही. तुमचा सध्याचा पत्ता द्या आणि माझ्या अकौंटला पाच हजार पाठवा. पाच हजाराचा प्रोजेकटर घरपोच मिळेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

सात आठ हजारात वापरलेला किंवा

सुबोध खरे
गुरुवार, 03/16/2017 - 19:20 नवीन
सात आठ हजारात वापरलेला किंवा कारखान्यातील सेकंड्स चा टीव्ही सात आठ हजारात मिळेल. आणि एक वर्षात त्यांचा परत विकला तर ७०% पैसेही परत मिळतील https://www.gozefo.com/mumbai/category/TV?filter&filter.sortBy=price_low हाकानाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

गॅस (म्हणजे: gadget

लॉरी टांगटूंगकर
Fri, 03/17/2017 - 10:38 नवीन
गॅस (म्हणजे: gadget acquisition syndrome ) असलेले समसुखी लोक्स बघून आनंद झाला. आठवड्यापुर्वी आंघोळ करतांना गाणी ऐकण्यासाठी सोनी एक्स बी२ हा निलदंती स्पिकर घेतला. एक्स बी ३ लाऊड वाटलेला. बोस साउंडलिंकचा बास कमी वाटलेला. जेबीएलशी वैयक्तिक वाकडं आहे, मागं एकदा सर्विसच्या बाबतीत लै कडकड करावी लागलेली. कॅणॉनच्या १०-१८ आणि १०-२२ कडे डोळा ठेवून आहे. कोणी यांपैकी कोणती/ कोणतीही रूंद कोन असलेली वापरली असल्यास अनुभव्/कंपेरिझन/प्यारलल लेन्स सुचवल्यास मंडळ आभारी राहील.
  • Log in or register to post comments

आपल्या खिशातल्या फोनवर गाणी

मोदक
Fri, 03/17/2017 - 12:02 नवीन
आपल्या खिशातल्या फोनवर गाणी कां ऐकत नाही..? एक जागा बनवायची जेथे शॉवरचे पाणी पोचणार नाही - बस्स.. मी पांच / सहा वर्षांपूर्वी अशा प्रकारचे स्पीकर शोधले होते.. पण नंतर लक्षात आले की फोननेही काम चालेल..! (मी मुख्यत: भाषणे / कथाकथने MP3 मध्ये साठवतो व ऐकतो आणि गाणी ऐकलीच तर आहे त्या फोनवर काम चालून जाते.) विचित्र वाटली तरी ही सवय खूप कॉमन आहे, सचिन तेंडुलकरही शाळेत असताना वायर अणि स्पीकरवाला वॉकमन बाथरूम मध्ये नेऊन अशी गाणी ऐकायचा. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

त्यापेक्षा बाथरुममधे स्वतःच गाणी का म्हणत नाही ?

संजय क्षीरसागर
Fri, 03/17/2017 - 12:20 नवीन
बिनखर्चाची आणि अफाट आनंदाची गोष्टे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मला संगीतक्षेत्राचा गळा नसला

मोदक
Fri, 03/17/2017 - 12:39 नवीन
मला संगीतक्षेत्राचा गळा नसला तरी थोडाफार कान आहे आणि माझा कान माझ्याच गळ्याला गप्प बसायला भाग पाडतो. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ती प्रत्येकाचीच व्यथा आहे

संजय क्षीरसागर
Fri, 03/17/2017 - 13:13 नवीन
पण आपला आवाज (कसाही असला तरी) एकमेव आहे हे समजून स्वतःचं गाणं ऐकायला लागलं की गळा कानावर मात करुन जातो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बाथरूम मध्ये कोण येतो..ऐकायला

हेमंत८२
Fri, 03/17/2017 - 17:25 नवीन
तिथे गाणे म्हणून सुद्धा काही थोर गायक झाले आहेत..
  • Log in or register to post comments

सर्वांनी धाग्यावर खूप माहिती

गवि
Fri, 03/17/2017 - 17:41 नवीन
सर्वांनी धाग्यावर खूप माहिती दिली. थँक्स. आता १२० कॉमेंट्स झाल्याने कोणीतरी कृपया पुढचा भाग नवीन धागारुपात काढावा.
  • Log in or register to post comments

हा धागा वाचनमात्र करा आता.

मोदक
गुरुवार, 03/30/2017 - 17:51 नवीन
हा धागा वाचनमात्र करा आता.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा