✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हल्लीच काय खरेदी केलंत ?

ग
गवि यांनी
Wed, 03/08/2017 - 12:11  ·  लेख
लेख
अमेझॉनकृपेने किंवा लोकल बाजारात काहीना काही खरेदी चालूच असते. रीटेल थेरपीचा वापर वाढतोच आहे. एखाद्या अतिभव्य मॉलपासून ते गावच्या आठवडी बाजारापर्यंत कुठेही काहीतरी खास हवं असलेलं मिळून जातं अतीव समाधान किंवा भ्रमनिरास होतो. कदाचित इकडेतिकडे चार रिव्ह्यूज टाकले जातात आणि ती वस्तू मागे पडते. तर एकंदरीत आपण खरेदी केलेल्या सामानाबद्दल काही सांगावंसं वाटलं तर इथे नोंदवून ठेवावं अशी इच्चा आहे. यामधे प्रत्यक्ष खरेदी केलेल्या वस्तू, विशलिस्टवर असलेल्या पण कुठे मिळतील हे माहीत नसलेल्या वस्तू, सर्व्हिसेस, वस्तूंविषयीचं चांगलंवाईट परखड मत, चालू आणि भावी "डील्स"ची / सेल्सची माहिती.. असं सगळं एकमेकांच्या फायद्यासाठी शेअर करावं. नव्या , सेकंडहँड, दुर्मिळ, जुन्या बाजारात मिळालेल्या, आउट ऑफ मार्केट झालेल्या पण कुठेतरी परत मिळालेल्या अशा सर्व वस्तूंविषयी येऊदे. .............. गेल्या काही काळात मी अमेझॉनवरुन कनौजमधलं "मिट्टी अत्तर" घेतलं. पावसातल्या मातीचा वास अर्करुपात कैद करुन ठेवलेला. अफलातून अ‍ॅडिक्टिव्ह... तापलेल्या मातीवर पाऊस पडल्याचा गंध. किंमत साडेनऊशे रुपयांत १० मिली. B शिवाय बरीच वर्षं घरात पडून असलेल्या एलपी रेकॉर्ड्ससाठी हा रेकॉर्डप्लेअर घेतला. अतिशय छान क्लियर आवाज. इनबिल्ट स्पीकर्स. बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी. तीस वर्षांनी बीटल्स, क्लिफ रिचर्ड्स, अ‍ॅबा, बोनीएम ऐकून नॉस्टाल्जियात बुडलो. आ
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
43170 वाचन

💬 प्रतिसाद (128)

प्रतिक्रिया

मस्त धागाये गवि !

संजय क्षीरसागर
Wed, 03/08/2017 - 13:02 नवीन
Image removed. हा बाराशे रुपयाचा स्पिकर घेतला. बेस्ट साऊंड, पोर्टेबिलीटी, तीन तास चालणारा रिचार्जेबल बॅटरी बॅक-अप (बॅटरी इन-बिल्ट) आणि रेडिओ अशी फिचर्स आहेत.
  • Log in or register to post comments

मस्त दिसतोय. बाराशे ही

गवि
Wed, 03/08/2017 - 13:09 नवीन
मस्त दिसतोय. बाराशे ही किंमतही झकास. मी नुकतीच बोसची स्टार्टिंग रेंज पाहिली. ८-१० हजार या रेंजमधे: मल्टिमीडिया (कनेक्टेड) दोन स्पीकर्स असा एक ऑप्शन होता. ब्लूटूथ स्पीकरचा सिंगल ब्लॉक हा दुसरा ऑप्शन होता. मी मल्टिमीडिया स्पीकर घेऊन टीव्हीला जोडला. अक्षरशः थिएटरचा अनुभव. अर्थातच ही स्टार्टिंग रेंज आहे. बोसची वरची रेंज नक्कीच शतपट उजवी असणार. पण तरीही बोसची रेंज शेवटी...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मी मल्टिमीडिया स्पीकर घेऊन

गणामास्तर
Wed, 03/08/2017 - 14:38 नवीन
मी मल्टिमीडिया स्पीकर घेऊन टीव्हीला जोडला. अक्षरशः थिएटरचा अनुभव.
मॉडेल नंबर वगैरे डिटेल्स सांगा ना. मी नुकताच बोसचा साउंड बार बघितला, जबरा अनुभव होता परंतु ७०००० रुपडे किंमत पाहून घेतला नाही. काही दिवस थांबून तोच घ्यावा असा विचार केलाय पण तुम्ही म्हणताय तो सुद्धा एकदा चेकवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हे मस्त आहे. मी पण परवाच

विशाल कुलकर्णी
Tue, 03/14/2017 - 15:47 नवीन
हे मस्त आहे. मी पण परवाच घेतला हा स्पीकर. खणखणीत आवाज आणि रिचार्जेबल बॅटरी बॅकप असल्याने नंतर कसली खिटपिट नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बोस

सुमीत भातखंडे
Wed, 03/08/2017 - 15:03 नवीन
४-५ महिन्यापूर्वी बोसचे ब्ल्यूटूथ हेडफोन (साउंडलिंक २) घेतले. आत्तापर्यंतचा अनुभव उत्तम आहे. वजनाने हलके असल्यामुळे अतिशय कंफर्टेबल आहेत. आवाज बर्यापैकी न्युट्रल आणि क्लिअर आहे. बेस मात्र मध्यम आहे. बेस हेवी गाणी ऐकायला तितकिशी मजा येत नाही.
  • Log in or register to post comments

जास्त बेस काही वेळातच डोकं दुखवतो.

अकिलिज
Tue, 03/14/2017 - 15:55 नवीन
भरपूर प्रकारच्या म्युझीक सिस्टीम वापरून या मतावर आलो कि, बेस मध्यमच असला पाहीजे. बीट्स् च्या हेडफोनचा बेस दोनचार गाणी ऐकताना छान वाटतो पण नंतर डोक्यात जायला लागतो. मग फायनल बोसच. कमी बेस = अवीट अनुभव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत भातखंडे

.

कवितानागेश
Wed, 03/08/2017 - 15:57 नवीन
जखमेवर मीठ भुरभुरणारा धागा. :( प्रत्यक्ष काय ऑनलाईन खरेदीलाही वेळ मिळत नाही हल्ली. तरी अ‍ॅमेझॉनवरुन डायपर्स आणि वेट वाईप्स मागवते हल्ली! :)
  • Log in or register to post comments

त्या मस्त टर्नटेबल चे

मराठी_माणूस
Wed, 03/08/2017 - 16:01 नवीन
त्या मस्त टर्नटेबल चे डीटेल्स काय ?
  • Log in or register to post comments

बोस की इतर पर्याय

सावत्या
Wed, 03/08/2017 - 16:18 नवीन
नुकतीच मी बोसची लाइफस्टाइल 535 अकोस्टिमस साऊंड सिस्टिम बघितलि. यूएईमध्ये रुपयात साधारणत: 180000 पर्यंत मिळतेय. भारतातील किंमत ३३१००० आहे. पण बोस - सॅमसंग टीव्ही कॉम्पॅटिबिलिटी बद्दल शंका आहे. एका मित्राकडे हारमन कार्डन आहे. मित्राच्या सल्ल्यानुसार दोघांची साऊंड क्वालिटी सेम आहे. पण मला बोस साऊंड सिस्टिम उजवी वाटते. हारमन कार्डन निम्म्या किमतीत मिळत आहे. पण मुंबईत हारमन कार्डनच सर्विस सेंटर नाही. बोसच आहे. मिपावरील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला हवाय.
  • Log in or register to post comments

महंगा है, लेकीन अच्छा है...

अकिलिज
Tue, 03/14/2017 - 16:15 नवीन
ते अकोस्टीमास तंत्रज्ञानाचे पैसे आहेत. आवाज अतिशय फिल्टर करून बॅलन्स केलेला आहे. तुमच्या बसण्याच्या जागेला तो नवीन ईन्स्टॉलेशनच्या वेळी टुयून करावा लागतो. अनुभव शब्दात सांगता येणार नाही. कितीही आवाज वाढवला तरी कानाला कर्कश्य वाटतच नाही. पैसे वसूल सिस्टीम आहे. आणि महत्वाचे - त्या सिस्टीमचं टिव्हीच्या ब्रॅडशी काहीही घेणं देणं नाहीये. ऑप्टीकल साऊंड ईनपुट असल्यास उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सावत्या

ह्याला जोर्दार अनुमोदन. बोसची

अंतु बर्वा
Wed, 03/15/2017 - 21:15 नवीन
ह्याला जोर्दार अनुमोदन. बोसची लाइफस्टाईल सिस्टिम घेतली आहे. ऑप्टिकल आउट्पुटला लावलेली असताना आवाज म्हणजे एक्दम तोड. नक्की समजावता येइल का महित नाही पण प्रयत्न करतो - टीव्हीत ट्रेन दाखवली असेल तर अक्षरशा: एका कानातुन आवाज जाउन दुसर्या कानातुन बाहेर आल्यासरखं फिलींग येतं. म्हणजे आत्ता या क्षणी ट्रेन आपल्या डाव्या बाजुने आली आणी आपल्या मागुन उजव्या बाजुला गेली असं वाटतं! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अकिलिज

बोसची सराउंड साउंड

चतुरंग
गुरुवार, 03/16/2017 - 02:33 नवीन
लाईफस्टाईल गेली ६ वर्षे वापरतोय. अप्रतिम हा एकच शब्द. पैसा दणकून घेतात पण एकदम वसूल. तुम्ही एरवी जी गाणी ऐकत असाल तीच या सिस्टिमवर अगदी नवी वाटतात. स्टीरिओचा खरा आनंद इतक्या उच्च दर्जाचा असू शकतो हे तेव्हाच समजतं! (बोसप्रेमी) रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा

अ‍ॅमेझोनवर मिट्टीका अत्तर

प्रचेतस
Wed, 03/08/2017 - 16:21 नवीन
अ‍ॅमेझोनवर मिट्टीका अत्तर फारच महाग दिसतंय. पुण्यात बाजीराव रोडवर हे कनौजी अत्तर १०० रुपयात तोळाभर येतं. गंधही सुरेख, पहिल्या पावसानं भिजलेल्या ओल्या मातीचा.
  • Log in or register to post comments

अमेझॉनवरही पुष्कळ स्वस्त

गवि
Wed, 03/08/2017 - 16:48 नवीन
अमेझॉनवरही पुष्कळ स्वस्त पर्याय आहेत. कुठल्या प्रतीचं बेस ऑईल वापरलंय (रेंज : लिक्विड पॅरॅफिनपासून सँडल ऑईलपर्यंत) त्यावर किंमत ठरते. शिवाय ब्रँडवरही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

याच्या पेक्षाही.,....

चौकटराजा
Fri, 03/10/2017 - 09:36 नवीन
प्रचेतस, याच्यापेक्षाही मोगर्‍याच्या गजर्‍याचा सुवास मस्त . तो सुद्धा मनगटाभोवती असलेला नव्हे तर वेणीत असलेला. :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=)) हिरवट काका

प्रचेतस
Fri, 03/10/2017 - 09:55 नवीन
=)) हिरवट काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

=))

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 03/30/2017 - 15:21 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दुकानाचे नांव कळेल काय?

आनंदी गोपाळ
Wed, 04/19/2017 - 10:54 नवीन
दुकानाचे नांव कळेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

टर्नटेबल

मी बरवा
Wed, 03/08/2017 - 16:31 नवीन
टर्न टेबल ची लिन्क डकवाल का?
  • Log in or register to post comments

टर्नटेबल Jensen या नावाने

गवि
Wed, 03/08/2017 - 16:45 नवीन
टर्नटेबल Jensen या नावाने कुठेही शोधल्यावर सापडेल. काही तपशील: साधारण आठ हजाराला पडला. ५-६ हजारापासून पुढे ऑप्शन्स आहेत. सर्व आरपीएमच्या रेकॉर्ड चालतात. पीसीला जोडून एम्पीथ्री बनवता येतात. एक्स्टर्नल स्पीकर्स लावता येतात. आर्म हलका आहे. पण मॅग्नेट टाईपचा स्टायलस आहे. घरी बसून पूर्ण पोर्टेबल प्लेअरवर समाधानकारक स्पष्ट आवाजात जुन्या रेकॉर्ड ऐकण्यासाठी उत्तम आहे. अगदी साऊंड टेक्निशियन्स / इंजिनियर लोकांसाठी हा बनलेला नाही. कमी किंमत हे बलस्थान आहे. एकदम हाय एंड , थिएटर इफेक्टवाले, ७.१ चॅनल, इक्वलायझर इत्यादि अपेक्षा असतील तर किंमत लाखावर जाईल.
  • Log in or register to post comments

Gavi, tumhi 8k la ghetlelya

विहंग
Wed, 03/08/2017 - 22:06 नवीन
Gavi, tumhi 8k la ghetlelya turntable chi link dakvaal ka?
  • Log in or register to post comments

http://www.amazon.in/gp/aw/d

गवि
Wed, 03/08/2017 - 22:42 नवीन
http://www.amazon.in/gp/aw/d/B00BCA4116/ref=mp_s_a_1_1?ie=UTF8&qid=1488993083&sr=8-1&pi=AC_SX118_SY170_FMwebp_QL65&keywords=jensen+record+player
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विहंग

मस्त धागा! बर्‍याचदा मला

पिलीयन रायडर
Wed, 03/08/2017 - 22:11 नवीन
मस्त धागा! बर्‍याचदा मला कुणाला काय गिफ्ट द्यावं हे कळत नाही. आता ह्या धाग्यातुन बर्‍याच नव्या गोष्टी कळतील. जसं की हे अत्तर. माझी आई वेडी आहे मातीच्या सुगंधासाठी. तिला हे अत्तर दिलं तर जामच खुश होइल ती. धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments

उत्तम धागा. वाचते आहे.

स्रुजा
Wed, 03/08/2017 - 22:42 नवीन
उत्तम धागा. वाचते आहे.
  • Log in or register to post comments

माझी खरेदी

मी बरवा
Wed, 03/08/2017 - 23:07 नवीन
Image removed. २ आठवड्या पूर्वी gearbest.com या site वरून हा डॅशकॅम मागवला. गाडी मध्ये पुढील काचेवर लावता येतो. गाडी चालताना हा व्हिडियो रेकॉर्ड करत राहतो. सध्याच्या ट्राफिक परिस्थितीत आपली चूक नसताना काही अपघात झाला तर आपल्या बाजूने काही असावा हा मुख्य उद्देश http://www.gearbest.com/car-dvr/pp_142025.html
  • Log in or register to post comments

चूक दुरुस्ती

मी बरवा
Wed, 03/08/2017 - 23:09 नवीन
"आपल्या बाजूने काही पुरावा असावा हा मुख्य उद्देश "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी बरवा

कालच माझा नविन मोटो एम आला...

सतिश गावडे
Wed, 03/08/2017 - 23:35 नवीन
Image removed. Different looks better अशी टॅगलाईन असलेला हा फोन अफलातून आहे. लाल पेनाची रिफील संपली ;)
  • Log in or register to post comments

घ्यावा म्हणतेय..

सस्नेह
गुरुवार, 03/09/2017 - 17:17 नवीन
इन्टरनेट, स्पीड, स्टोअरेज वगैरे कसे आहे ? स्लिमनेस आणि डायमेन्शन्स किती mm ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

इन्टरनेट - 3G आणि 4G VoLTE

सतिश गावडे
Sat, 03/11/2017 - 21:32 नवीन
इन्टरनेट - 3G आणि 4G VoLTE तपासले. चालते. मुळात मी रिलायन्स जिओचे 4G वापरता यावे म्हणून हा फोन घेतला. स्पीड - चांगला आहे. मी ३ वर्षांपूर्वी घेतलेल्या सॅमसंग ग्रँडवरुन अपग्रेड झाल्यामुळे मला अतिशय स्मुथ वाटला. स्टोअरेज - दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. ३ जीबी रॅम + ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज किंवा मग ४ जीबी रॅम + ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज. पहीला १६ हजारात तर दुसरा १८ हजारात येतो. कॅमेरा - मुख्य १६ एमपी तर फ्रंट कॅमेरा ८ एमपी Dimensions Width 75.35 mm Height 151.35 mm Depth 7.85 mm Weight 163 g काही वापरातून कळलेल्या गोष्टी: १. फोन जरी ड्युअल सिम असला तरी सेकंडरी स्लॉट हायब्रिड आहे. ज्यामध्ये एक तर सेकंडरी सिम टाकता येते किंवा मग मायक्रो एसडी कार्ड. दोन्ही एका वेळा वापरता येत नाहीत. २. बॅटरी लाईफ मोटोच्या याआधीच्या फोनच्या तुलनेत जरा कमी आहे. (3050 mAh) ३. फोनचे उभ्या कडांना थोडा स्लोप आहे. त्यामुळे बाजारातील सध्याच्या टेम्पर्ड ग्लासेस जर लावण्याच्या प्रयत्न केला तर दोन्ही उभ्या कडांना एअर गॅप राहते. ४. माझा फोन ६४ जीबीचा आहे. त्यातील १०.६२ जीबी अँड्रॉईडने घेतली आहे. हे जरा अती होतंय. कारण ३२ जीबीच्या फोनमध्येही जर हे होत असेल तर कमी मेमरी वापरायला उरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

फोन जरी ड्युअल सिम असला तरी

रॉजरमूर
Sun, 03/12/2017 - 23:54 नवीन
फोन जरी ड्युअल सिम असला तरी सेकंडरी स्लॉट हायब्रिड आहे. ज्यामध्ये एक तर सेकंडरी सिम टाकता येते किंवा मग मायक्रो एसडी कार्ड. दोन्ही एका वेळा वापरता येत नाहीत.
अगदी याच कारणामुळे हा फोन रिजेक्ट केला . ड्युअल सिम +मेमरी कार्ड हे फिचर पाहिजेच . बाकी फोन एकदम जबरदस्त . मला हे एक कळत नाही की एवढाले मोठे स्क्रीन असतात फोनला मागे जागाही बरीच असते मग आताच या कंपन्यांनी हे हायब्रीड सिम चं फ्याड का काढलं ? खरं तर भारतीय पब्लिक सरावलीय ड्युअल सिम फोनला . फोनची इंटर्नल मेमरी कितीही असली तरी कमीच पडते .मेमरी कार्ड हे लागतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तपशीलासाठी धन्यवाद !

सस्नेह
Mon, 03/13/2017 - 01:21 नवीन
तपशीलासाठी धन्यवाद ! मेमरी कार्ड बरे पडते बॅकप वगैरेसाठी. बाकी internal storage 50 GB भरपूर आहे. मोटो च्या battery life चाच problem आहे. शिवाय battery replacement किचकट व खर्चिक आहे. मुलाचा मोटो जी एकदा बॅटरी बदलूनही जेमतेम दोन वर्षे गेला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आधीची चर्चा वाचून अ

रेवती
Mon, 03/13/2017 - 06:40 नवीन
आधीची चर्चा वाचून अ‍ॅमेझॉनच्या कार्ट्यात टाकलेला स्यामसंग राहू दिला व मोटो पहायला सुरुवात केली तर लोकांनी ब्याटरी व जीपीएसचा प्रॉब्लेम बराच सांगितलाय म्हटल्यावर पुन्हा स्यामसंगचा विचार करतिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

वरील सर्व ड्रॉबॅक नसणारा

गवि
Mon, 03/13/2017 - 08:12 नवीन
वरील सर्व ड्रॉबॅक नसणारा Lenovo vibe P1 मस्त आहे. सुखद अनुभव. P1 ५००० mAh बॅटरी. फास्ट चार्जिंग (अर्ध्या तासात फुल). बॅटरी संपण्याची चिंताच नको. कोठार आहे ही बॅटरी. P1 ला हायब्रीड स्लॉट नसून वेगळे ड्युअल सिम स्लॉट्स आणि वेगळा १२८ जीबी मेमरी कार्ड स्लॉट. शिवाय एका बटणात फोनची सर्व स्मार्ट फीचर्स बंद करुन फक्त कॉल आणि एसेमेस चालू ठेवण्याची सोय (बेसिक फोन). बॅटरी कितीही कमी असली तरी या मोडमधे फोन पुढे अनेक दिवस चालू शकतो. बॅटरी उत्कृष्ट आहेच पण हा फोन खुद्द पॉवरबँक बनू शकतो इतर मोबाईल्ससाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

बघते.

रेवती
Tue, 03/14/2017 - 03:20 नवीन
बघते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

एवढ्यात अ‍ॅमेझॉनवर बर्‍याच

रेवती
गुरुवार, 03/09/2017 - 06:33 नवीन
एवढ्यात अ‍ॅमेझॉनवर बर्‍याच वस्तू घेतल्यात. मोठ्या नाहीत पण लहानसान. मुलाचे ग्लव्हज हेड कंपनीचे. टचस्क्रीन असल्याने खेळताना मध्येच फोन आला तर उपयोगी. बॉल कंपनीच्या जार्सची कॅनिंगची झाकडे बदलून प्लास्टिकची घेतलीत. ती चांगली आहेत. एका बॉक्समध्ये ८ मिळाली. फुलांचा स्कार्फ आवडला. रोज एकदा घेऊ का नको असे वाटत होते. मग घेतला पण तो इन्फिनिटी स्कार्फ आहे हे वाचले नव्हते. तरी आवडलाच. स्कार्फ ट्रेडिंग इन्कॉ. यांच्याकडे भरपूर प्याटर्न्स उपलब्ध आहेत. नॉर्डिक वेअर यांचा अ‍ॅल्यूमिनिअम बेकींग ट्रे (हाफ शीट) ग्रेट दर्जाचा आहे. बाकी कपडे बिपडे आपापल्या पसंतीने होतात पण साधे लाँग स्लीव्हजचे टीशर्टस हे मेसिक विमेन्स चे बरे मिळाले. त्यात कमी रंग उपलब्ध आहेत पण मला हवे ते मिळाल्याने गप्प बसले. आणखी मागवायची वेळ आली तर मागवेन. बाकी स्वेटर वगैरे गोष्टी घेतल्या. वॉटरफॉल प्रकारातला स्वेटर ठीकठाक आहे. फ्याशनमार्क कंपनीचा. मांजराच्या पिलांचे चित्र असलेले किचन मॅट अ‍ॅन्टीस्लिप प्रकारातले आवडले. चांगले दिसतेय. असंच काय काय दुकानात न हिंडता घरपोच आल्याने शांत वाटतेय. ;)
  • Log in or register to post comments

साऊंडबार

योगी९००
गुरुवार, 03/09/2017 - 08:26 नवीन
नुकताच क्रोमा मधून फिलीप्सचा साऊंडबार खरेदी केला. http://www.philips.co.in/c-p/HTL2163B_12/soundbar-speaker अतिशय उत्तम क्वालिटी, होमथेअरचे फिलिंग आले. विषेश म्हणजे या साऊंडबार ला सगळे connectivity options आहेत. USB, Bluetooth, HDMI HRC, Optical आणि नॉर्मल ३.५ mm.... १२० W RMS आउटपुटमुळे सर्व प्रकारची गाणी ऐकायला छान वाटतात.
  • Log in or register to post comments

night visor

योगी९००
गुरुवार, 03/09/2017 - 08:30 नवीन
HD Vision Night Visor कोणी वापरते का गाडी चालवताना. विषेश म्हणजे रात्री गाडी चालवताना उलट्या दिशेने येणार्‍या गाड्यांच्या दिव्यांचा त्रास कमी होतो असे म्हणतात. कोणाला अनुभव आहे का याच्या वापराचा?
  • Log in or register to post comments

हा उपयोगी प्रश्न आहे

सतिश गावडे
गुरुवार, 03/09/2017 - 10:59 नवीन
मी ही असं काहीतरी शोधतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

कसे असतात नेमके हे वायजर?

गवि
गुरुवार, 03/09/2017 - 11:09 नवीन
कसे असतात नेमके हे वायजर? फोटो आहे का जालावर कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

इबेेवर आहे

योगी९००
गुरुवार, 03/09/2017 - 17:21 नवीन
hd night visor असे गूगलले तर इबे आणि बर्‍याच साईटवर दाखवते. युट्युबवर व्हीडीओपण आहेत. पण प्रत्यक्ष कोणी वापरले आहे का त्यांचा अनुभव हवा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

खरोखर असलं काम करू शकतं का हे

सस्नेह
गुरुवार, 03/09/2017 - 17:20 नवीन
खरोखर असलं काम करू शकतं का हे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

सध्या मी चांगल्या प्रतीचं पण

स्रुजा
गुरुवार, 03/09/2017 - 11:55 नवीन
सध्या मी चांगल्या प्रतीचं पण फार महाग नसलेलं आणि डिजिटली प्रोग्राम करता येऊ शकणारं कॉफी मेकर शोधते आहे. अमेझॉन वर बघते. काही सजेशन्स असतील तर प्लीझ द्या. एखादा वाईट अनुभव असेल तरी सांगा. दुसरं म्हणजे स्प्रिंग कोट ! ते ही अमेझॉन वर बघते. अजुन काही ऑनलाईन पर्याय आहेत का स्प्रिंग कोट साठी?
  • Log in or register to post comments

समजल्यास सांगीन पण मागील

रेवती
गुरुवार, 03/09/2017 - 16:25 नवीन
समजल्यास सांगीन पण मागील महिन्यात अ‍ॅमेझॉनवाल्यांकडे जो विंटर कोट मी मागितला ती ऑर्डर परस्पर त्यांनीच क्यान्सल केली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

मी काही दिवसांपुर्वी

प्रफुल्ल
गुरुवार, 03/09/2017 - 12:46 नवीन
मी काही दिवसांपुर्वी इन्स्टग्राम वरुन JBL चार्ज२+ हा स्पीकर घेत्ल ३००० मध्ये इन्स्टाग्रम वर Gadgetotic म्हणुन आहे. बर्‍याच इलेक्ट्रोनिक वस्तु first copy available आहेत
  • Log in or register to post comments

वेगवेगळे स्पीकर्स सध्या हॉट

गवि
गुरुवार, 03/09/2017 - 13:06 नवीन
वेगवेगळे स्पीकर्स सध्या हॉट आयटेम दिसताहेत. मला एक प्रोजेक्टर घेऊन मोठ्या स्क्रीनवर टीव्ही बघायची इच्छा आहे. पण स्वस्त प्रोजेक्टर्सच्या ब्रँडची फॅन्सी नावं वाचून घ्यायचं धाडस होईना. एक मर्लिन म्हणून पॉकेट प्रोजेक्टर घेतला होता ११ हजार. पण फारच डीम आहे. मिट्ट काळोख केल्याशिवाय दिसत नाही. जरा लो बजेटमधे पण पूर्ण डार्करुमची गरज नसलेला ब्राईट दृश्य दाखवणारा प्रोजेक्टर कोणी सांगू शकेल का?
  • Log in or register to post comments

९५० च अत्तर. बाब्बौ. हौसेला मोल नाही.

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 03/09/2017 - 13:47 नवीन
मला ६ फूट बाय ३ फूटचा जुना बेड विकायचा आहे. कोणाला पाहिजे असल्यास कळवा व्यनितून.
  • Log in or register to post comments

=))

किसन शिंदे
गुरुवार, 03/09/2017 - 17:36 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

=))

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 03/30/2017 - 15:23 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

@ योगि ९००, ते नाइट व्हिजन

५० फक्त
गुरुवार, 03/09/2017 - 16:43 नवीन
@ योगि ९००, ते नाइट व्हिजन अतिशय फालतु आहे, काही उपयोग नाही. त्यापेक्षा ओरिजनल पोलोराइड गागल घ्या त्याचा उपयोग होतो ब-यापैकी. यापेक्षा वाईट आणि बेकायदेशीर उपाय म्हंजे, हेल्ला चे दोन फॉग लॅम्प लावुन घ्या समोर. @मी बरवा, हे गॅजेट फार कामाचे आहे, मी गेले दिड वर्षे वापरतो आहे, कायदेशीर पुरावा तर झालंच पण बाकी इतर वेळी म्हणजे अपघात, मारामारी, इ. मध्ये उपयोगी पडतो, हलता सिसिटिव्हि आहे, फक्त मेमरी लिमिट आहे, आणि रात्रि तुमच्याच गाडीच्या हेडलाईटने चमकल्यानं पुढच्या गाडीची नंबर प्लेट स्पष्ट दिसत नाही, याला काही उपाय नाही. ब-याच दिवसापुर्वी मी ए८ नावाचा हेड अप डिस्प्ले घेतला आहे, आता गाडीचं स्पिडोमिटर कडं बघायची गरज पडत नाही, डायरेक काचेवर , अगदी दिवसासुद्दहा स्पष्ट दिसतात सगळे पॅरामिटर. आता विशलिस्ट मध्ये टिपिएमेस आणि रेन सेन्सर आणि अ‍ॅटो लाईट सेन्सर आहे,
  • Log in or register to post comments

आभारी आहे.

योगी९००
गुरुवार, 03/09/2017 - 17:28 नवीन
आभारी आहे.. हेड अप डिस्प्लेचा उपयोग आणि गरज पुर्णपणे समजली नाही. जर गाडी मध्ये आलरेडी स्पीडोमीटर आहे तर काचेवर त्याचा परत डिस्प्ले कशाला? आणि त्या डिस्प्लेमुळे तुमची व्हीजीबीलेटी कमी नाही का होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा