✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हल्लीच काय खरेदी केलंत ?

ग
गवि यांनी
Wed, 03/08/2017 - 12:11  ·  लेख
लेख
अमेझॉनकृपेने किंवा लोकल बाजारात काहीना काही खरेदी चालूच असते. रीटेल थेरपीचा वापर वाढतोच आहे. एखाद्या अतिभव्य मॉलपासून ते गावच्या आठवडी बाजारापर्यंत कुठेही काहीतरी खास हवं असलेलं मिळून जातं अतीव समाधान किंवा भ्रमनिरास होतो. कदाचित इकडेतिकडे चार रिव्ह्यूज टाकले जातात आणि ती वस्तू मागे पडते. तर एकंदरीत आपण खरेदी केलेल्या सामानाबद्दल काही सांगावंसं वाटलं तर इथे नोंदवून ठेवावं अशी इच्चा आहे. यामधे प्रत्यक्ष खरेदी केलेल्या वस्तू, विशलिस्टवर असलेल्या पण कुठे मिळतील हे माहीत नसलेल्या वस्तू, सर्व्हिसेस, वस्तूंविषयीचं चांगलंवाईट परखड मत, चालू आणि भावी "डील्स"ची / सेल्सची माहिती.. असं सगळं एकमेकांच्या फायद्यासाठी शेअर करावं. नव्या , सेकंडहँड, दुर्मिळ, जुन्या बाजारात मिळालेल्या, आउट ऑफ मार्केट झालेल्या पण कुठेतरी परत मिळालेल्या अशा सर्व वस्तूंविषयी येऊदे. .............. गेल्या काही काळात मी अमेझॉनवरुन कनौजमधलं "मिट्टी अत्तर" घेतलं. पावसातल्या मातीचा वास अर्करुपात कैद करुन ठेवलेला. अफलातून अ‍ॅडिक्टिव्ह... तापलेल्या मातीवर पाऊस पडल्याचा गंध. किंमत साडेनऊशे रुपयांत १० मिली. B शिवाय बरीच वर्षं घरात पडून असलेल्या एलपी रेकॉर्ड्ससाठी हा रेकॉर्डप्लेअर घेतला. अतिशय छान क्लियर आवाज. इनबिल्ट स्पीकर्स. बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी. तीस वर्षांनी बीटल्स, क्लिफ रिचर्ड्स, अ‍ॅबा, बोनीएम ऐकून नॉस्टाल्जियात बुडलो. आ
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
43174 वाचन

💬 प्रतिसाद (128)

प्रतिक्रिया

Viaibility आजिबात कमी होत

मोदक
Sun, 03/12/2017 - 21:04 नवीन
Viaibility आजिबात कमी होत नाही. 50 रावांच्या गाडीत हा प्रकार बघून लैच आवडला. डॅशबोर्ड आणि उजवा कॉलमबार यांच्या फटीत हा डिस्प्ले बसतो आणि चार इंच बाय तीन इंच इतक्या भागात एक काळपट पण पारदर्शक चौकोनी टेप वर सगळे आकडे डिस्प्ले होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

मला यांच्या बरोब्बर उलटं

आदूबाळ
Mon, 03/13/2017 - 02:20 नवीन
मला यांच्या बरोब्बर उलटं करणारा प्रकार हवा आहे. म्हणजे ड्रायव्हरने टाईप केलेलं मागच्या स्क्रीनवर बाहेरच्या बाजूने उमटायला हवं आहे. कारचा मुख्य त्रास म्हणजे मागच्या लोकांना इफेक्टिवली शिव्या घालता येत नाहीत. या उलट्या स्क्रीनमुळे मागच्या हॉर्नमारक माणसाला "विमान घे ना भुकनळ्या" वगैरे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

=))

पिलीयन रायडर
Mon, 03/13/2017 - 05:19 नवीन
=)) मलाही द्या! मी टु व्हिलरवर मागे अशी काच बसवुन घेईन खास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हा हा हा!

चतुरंग
Mon, 03/13/2017 - 06:39 नवीन
लै भारी! किंवा लै हार्न मारायलाय तर मागच्या स्क्रीनवर "मध्यमा" दिसेल अशीही सोय चालेल! ;) रास्पबेरी पाय वापरुन एखादा प्रोजेक्ट करता येईल का बघायला हवे! ;) -रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

लै भारी! किंवा लै हार्न

गवि
Mon, 03/13/2017 - 08:01 नवीन
लै भारी! किंवा लै हार्न मारायलाय तर मागच्या स्क्रीनवर "मध्यमा" दिसेल अशीही सोय चालेल! ;)
मला अशावेळी शक्य तेवढी साईड देत मागच्याला "जा बाळ..!" असा संदेश दाखवायची फार इच्छा होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

असली उत्पादन ऑलरेडी मार्केट

सुखी
Fri, 03/17/2017 - 08:26 नवीन
असली उत्पादन ऑलरेडी मार्केट मध्ये आहेत :) https://www.motormood.com/ http://www.thinkgeek.com/product/d138/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

इन ऑल सिरियसनेस, रंगापा - हे

आदूबाळ
Mon, 03/13/2017 - 21:15 नवीन
इन ऑल सिरियसनेस, रंगापा - हे प्रॉडक्ट बनवण्यात मला लैच इन्ट्रेस्ट आहे. (स्टीव जॉब्जच की नै मी...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हाहाहा

स्रुजा
Mon, 03/13/2017 - 08:23 नवीन
हाहाहा हाँकिंग करतात राणीच्या हुच्च देशात? अरारारा.. काय मॅनर्स !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

नै हो. मी पुणे 30, 51 आणि 2

आदूबाळ
Mon, 03/13/2017 - 13:43 नवीन
नै हो. मी पुणे 30, 51 आणि 2 मध्ये ट्रेन्ड डायवर असल्याने दुसऱ्या देशात गाडी चालवून लोकांना टेनशन देत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

या यादीत पुणे ५१ वाचून डोळे

सतिश गावडे
गुरुवार, 03/16/2017 - 09:34 नवीन
या यादीत पुणे ५१ वाचून डोळे पाणावले. पीक अवरला पुणे ५१ मध्ये वाहन चालवणे हा अतिशय दिव्य प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मार्च खरेदी

मोल
गुरुवार, 03/09/2017 - 17:05 नवीन
१) Xiaomi Redmi 3S 4G- SEAL PACKED- 2GB RAM, 16GB ROM, Dual Sim, HD Display, Grey Rs. 7,699 २) Columbus Tab-5005 Mesh Sports Shoes for Men Rs.499 ३) Prestige Omega Deluxe Induction Base Non-Stick Kitchen Set, 3-Pieces Rs.1,499
  • Log in or register to post comments

चांगले आहेत का ?

इरसाल कार्टं
Sat, 03/11/2017 - 14:02 नवीन
२) Columbus Tab-5005 Mesh Sports Shoes for Men Rs.499
चांगले आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोल

मस्त धागा

ओसु
गुरुवार, 03/09/2017 - 18:04 नवीन
माझी पण थोडी खरेदी १. FM हेडफोन - TV साठी रात्री TV च्या आवाजाचा (इतरांना :)) त्रास न होता सिनेमा बघण्यासाठी. व्हॅल्यू फॉर मनी म्हणता येईल असा. ५०० रुपयात, तीन महिने वापरतोय विना तक्रार. आवाजाची क्वालिटी पण चांगली आहे https://www.amazon.in/gp/product/B00D6EG7FO/ref=oh_aui_detailpage_o08_s00?ie=UTF8&psc=1 २. ऑटोमॅटिक वॉटर प्रेशर पंप मी तळ मजल्यावर राहतो. टाकी पहिल्या मजल्यावर आहे. त्यामुळे बाथरूम मध्ये गॅस गिजर आणि शॉवर ला पाणीच येत नव्हते. सगळे प्लम्बिंग बदलून झाले पण प्रश्न कायम राहिला. शेवटी गुगल वर पर्याय बघितले आणि हा अमेझॉन वर दिसला. विजेवर चालणार हा पंप नळ सुरु केला कि सुरु होतो आणि बंद केल्यावर थांबतो. वीज पण जास्त जळत नाही. https://www.amazon.in/gp/product/B01BMSFFR6/ref=oh_aui_detailpage_o05_s00?ie=UTF8&psc=१
  • Log in or register to post comments

एक खुलासा

ओसु
गुरुवार, 03/09/2017 - 18:11 नवीन
त्यामुळे बाथरूम मध्ये गॅस गिजर आणि शॉवर लापाणीच च्या पाण्याला प्रेशर येत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओसु

>>माझी पण थोडी खरेदी

कंजूस
Sat, 03/11/2017 - 20:53 नवीन
>>माझी पण थोडी खरेदी १. FM हेडफोन - TV साठी रात्री TV च्या आवाजाचा (इतरांना :)) त्रास न होता सिनेमा बघण्यासाठी.>> - TV ला स्पिकर आउट पोर्ट नसले ,फक्त A/V out असले तर जोडायला येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओसु

मिल्टन आईस पॅक

मराठी कथालेखक
गुरुवार, 03/09/2017 - 18:09 नवीन
१.४ ली ची आईस बकेट दुकानातून घेतली. एम आर पी पेक्षा १०% सवलत (२९० ल मिळाली) घेतल्या पासून अजून 'कार्यक्रम' केला नाही (हाय कमांडकडून अजून परवानगी मिळाली नसल्याने), पण एकदा बकेटमध्ये बर्फाचे खडे ठेवून प्रात्यक्षिक बघितले किमान पाच-सहा तास खडे अगदी चांगले राहिले होते..सोबत बर्फाचा खडा उचलण्यासाठीचा चिमटा (tong) आहे Image removed.
  • Log in or register to post comments

माझ्या सततच्या फिरतीला पुरक

मोदक
Fri, 03/10/2017 - 00:22 नवीन
माझ्या सततच्या फिरतीला पुरक असा गोप्रो हिरो ५ घ्यावयाचा विचार करतो आहे. किंमत ३० ते ३५ हजार रू. च्या दरम्यान. हा कॅमेरा घ्यावा की आणखी कोणता घ्यावा हे कृपया सुचवावे. (अ‍ॅक्शन कॅमेर्‍यासाठी किंमत जास्त वाटत आहे पण SJ Cam १५ हजार पर्यंत येतो आहे आणि मला फारसा आवडला नाहीये, गोप्रोचे आणखी मॉडेल २५ ते २८ हजार पर्यंत जात आहेत, पण मग ते घेण्यापेक्षा लेटेस्ट आणि अनेक फिचर असलेला हाच चांगला वाटत आहे) Image removed. आणखी कोणता अ‍ॅक्शन कॅमेरा कोणी वापरला आहे का..? गोप्रोला एखादा चांगला ऑप्शन आहे का..?
  • Log in or register to post comments

गो प्रो ला एक चांगला आणि

स्रुजा
Fri, 03/10/2017 - 00:41 नवीन
गो प्रो ला एक चांगला आणि स्वस्त पर्याय आहे, तुला संध्याकाळी सांगते विचारुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हो चालेल. वाट बघतो.

मोदक
Fri, 03/10/2017 - 00:44 नवीन
हो चालेल. वाट बघतो. हाच कॅमेरा अमेरिकेत ४०० $ ला म्हणजे २६ हजाराच्या दरम्यान आहे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

अरे तुला घाई नसेल तर येता

स्रुजा
Fri, 03/10/2017 - 00:48 नवीन
अरे तुला घाई नसेल तर येता जाता कुणाच्या ही हातुन पाठवता येईल. तो जो पर्याय आहे तो पण बहुधा इथे स्वस्त असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हे शक्य झाले तर सोन्याहून

मोदक
Fri, 03/10/2017 - 01:00 नवीन
हे शक्य झाले तर सोन्याहून पिवळे..!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

आजच एक जण गेला की रे भारतात.

पिलीयन रायडर
Fri, 03/10/2017 - 03:44 नवीन
आजच एक जण गेला की रे भारतात. थोडं आधी कळवलं असतंस तर नक्की पाठवला असता मी. आता कुणी सापडलं तर कळवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तो जो पर्याय आहे तो ??

कपिलमुनी
Tue, 03/14/2017 - 13:06 नवीन
कोणता पर्याय कळेल का ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

अरे हो.. पर्याय सांगा..

मोदक
Tue, 03/14/2017 - 15:15 नवीन
अरे हो.. पर्याय सांगा.. तसेच Garmin Virb Elite बद्दल काय मत आहे ..? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अॅक्शन कॅमेरा म्हणजे काय?

गवि
Fri, 03/10/2017 - 00:48 नवीन
अॅक्शन कॅमेरा म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हा वॉटरप्रूफ कॅमेरा असतो आणि

मोदक
Fri, 03/10/2017 - 01:12 नवीन
हा वॉटरप्रूफ कॅमेरा असतो आणि आपल्या डोक्यावर / कपाळावर / छातीवर तसेच साईकलवर / बाईकच्या समोरच्या चाकाजवळ / अक्षरशः कुठेही माऊंट करता येतो. उदा. Image removed. हा कॅमेरा वापरून खाली दिसत आहेत तसे अफलातून व्हिडीओ शूट करता येतात. मी म्हणतो आहे ते मॉडेल तर ड्रोनला सुद्धा बसवू शकता. डॅनी मॅकास्किल (तोच तो "द रिज" वाला) मॅक्स युअर डेज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

भन्नाट आहेत तिन्ही व्हिडो !

चौथा कोनाडा
Sun, 03/12/2017 - 21:18 नवीन
भन्नाट आहेत तिन्ही व्हिडो ! मोदका, डोळे गोड केलेस रे बाबा ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

म्याडम... आहात इथे की आयडी

मोदक
Wed, 03/15/2017 - 21:13 नवीन
म्याडम... आहात इथे की आयडी उडाला..? :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

लोल .. आहे, आहे .. पण चेक

स्रुजा
Wed, 03/15/2017 - 21:39 नवीन
लोल .. आहे, आहे .. पण चेक करत राहा बाबा. इथलं आयुष्य क्षण भंगुर आहे ;) तर, मिळालेली माहिती अशी: की तो ९९ $ ना इथे मिळतो (पर्याय) पण ती डिस्काऊंटेड प्राईस आहे. रीटेल थोडी जास्त पण ४५०$ पेक्षा (गो प्रो ची किंमत) कमीच आहे . रिव्यु असा आहे की पाण्याखाली हा गो-प्रो अ‍ॅड्जेसंट फार भारी रीझल्ट्स देतो. पाण्याबाहेर खुप भारी नाही तरी चांगले देतो . आता शेवटची माहिती राहिली आहे - नाव आणि मोडेल नंबर( नेमकी ती इन्फो आज दिवसभरात मिळेल - मी माझं बुकमार्क पेज हरवलं )- ज्याने वापरलं आहे त्याने आज नक्की सांगतो असं सांगितलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

..तर मी गार्मिन वर्ब एलिट

मोदक
गुरुवार, 03/30/2017 - 17:46 नवीन
..तर मी गार्मिन वर्ब एलिट घेतला. मित्राने वर्षभर वापरलेला कॅमेरा मला स्वस्तात मिळाला म्हणून घेतला. सध्या टेस्टिंग सुरू आहे. मागच्या आठवड्यातील एका इव्हेंटला ट्राय केला. माऊंट आणि कॅमेर्‍याचा फोकस थोडा खालच्या दिशेने हवा आहे हे कळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

आवडण्यास कारण की .....

अनन्त्_यात्री
Fri, 03/10/2017 - 09:31 नवीन
हा धागा अशासाठी आवडला की कोणकोणत्या वस्तू॑शिवाय आपण आरामात जगू शकतो ते कळत जाते .
  • Log in or register to post comments

+1111111111111111111111111111

इरसाल कार्टं
Sat, 03/11/2017 - 14:05 नवीन
+1111111111111111111111111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

+१११

पुंबा
गुरुवार, 03/30/2017 - 15:08 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल कार्टं

+१

साहेब..
Wed, 04/19/2017 - 11:11 नवीन
मलापण असंच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

मोबाईल

चौकटराजा
Fri, 03/10/2017 - 09:47 नवीन
Xiaomi Redmi 3S 4G- SEAL PACKED- 2GB RAM, 16GB ROM, Dual Sim, HD Display, Grey Rs. 7,699 हा मोबाईल मी घेतलाय कारण हा उत्तम फोटो काढणारा आहे. मला एप्रिल मे मधे युरोपात इटली स्वीस फ्रान्स असे स्वतंत्र भटकायचे असल्याने एरवीच्या १६ एक्स कॅमेर्या बरोबर हवाच. बाकी मला भारतात बसून युरोपात काही गोष्टींचे बुकिंग त्यांच्या पैशात करायचे आहे . उदा .व्हर्साय चे आगाउ बुकिंग . ते करण्यासाठी उत्तम उपाय काय ? नेट बॅन्किंग वापरले तर प्री लोडेड फोरेक्स कार्ड चालते का ?
  • Log in or register to post comments

Xiaomi

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 03/30/2017 - 15:37 नवीन
मीही नुकताच मि मॅक्स आणि नोकिआ १३० घेतला ! (पण खरं सांगु का , एकुणच मोबाईल ही संकल्पनाच अनावश्यक वाटायला लागली आहे गेल्या महिन्याभरात . )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

माझा पहिला स्मार्टफोन

सुधांशुनूलकर
Fri, 03/10/2017 - 11:26 नवीन
जानेवारीत माझा पहिला स्मार्टफोन - मोटो जी ४ प्ले अ‍ॅमेझॉनवरून घेतला. दोन जीबी रॅम, १६ जीबी अंगभूत साठवणक्षमता (इंटर्नल मेमरी) आहे, याच्या जोडीला ३२ जीबीचं साठवणकार्डही घेतलं. अंगभूत 'मार्शमेलो' प्रणाली आहे. फोनमधला कॅमेरा ही माझी कधीच मुख्य गरज नव्हती, त्यामुळे या फोनला असलेल्या ८ एमपी / ५ एमपी अशा 'कमी' क्षमतेच्या कॅमेर्‍याबद्दल तक्रार नाही. (तरी फोटो छान येतात.) माझी गरज भागते, मस्त, मी समाधानी आहे. ता.क. : २६ जानेवारीपूर्वी आठ हजारला मिळाला, आज अ‍ॅमेझॉनवर सहज पाहिलं तर ८९९९ रुपये किंमत दिसते आहे. १०००० एमएएच्या दोन पॉवरबँकही प्रत्येकी ७९९ रुपयाला घेतल्या. अनुभव - फोन रपारप चार्ज होतो. त्यापूर्वी लिनोव्हो योगा ८" टॅब घेतला. सर्वोत्कृष्ट!! आता त्याची किंमतही खूपच कमी - साडेबारा हजार इतकी - झाली आहे. तेव्हा कुणाला टॅब घ्यायचा असेल, तर नक्की याचा विचार करा. अवांतर - @गवि : शिवाय बरीच वर्षं घरात पडून असलेल्या एलपी रेकॉर्ड्ससाठी हा रेकॉर्डप्लेअर घेतला. अतिशय छान क्लियर आवाज. इनबिल्ट स्पीकर्स. बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी. तीस वर्षांनी बीटल्स, क्लिफ रिचर्ड्स, अ‍ॅबा, बॉनीएम ऐकून नॉस्टाल्जियात बुडलो. : हे वाचून जळून खाक झालो आहे याची नोंद घेणे. एकट्याने नॉस्टॅल्जियात बुडणे ई ना चॉलबे. आता हे सर्व ऐकण्यासाठी कधीतरी तुमच्या घरी येऊन धडकणार, ही आगाऊ (!.. या शब्दाचे दोन्ही अर्थ घेणे.) सूचना देऊन ठेवतो.
  • Log in or register to post comments

गोप्रो चा रिव्ह्यु cnbc आवाज

कंजूस
Fri, 03/10/2017 - 17:58 नवीन
गोप्रो चा रिव्ह्यु cnbc आवाज चानेलच्या टेकगुरू कार्रक्रमात झाला होता तो युट्युबवर आहे पाहा. # स्पिकरमध्ये/ फ्रिक्वन्सी रिस्पॅान्स डेटा दिलेला असतो. 100 Hz च्यापेक्षा कमी 30Hz, 60Hz दिलेली असेल तर { आणि मूळ रिकॅार्डिंगमध्ये दाबून टाकलेली नसेल supressed} तरच Bass आवाज उत्तम येण्याची अपेक्षा ठेवू शकतो.
  • Log in or register to post comments

आजवर एकदाही on line शॉपिंग

ज्योति अळवणी
Sat, 03/11/2017 - 01:01 नवीन
आजवर एकदाही on line शॉपिंग केलेलं नाही. अजूनही प्रत्यक्ष बघून, वस्तू आणि किंमत यांची तुलना करून मगच काही खरेदी करते. त्यामुळे हा धागा आणि त्यावरील चर्चा वाचून बरच काही समजलं. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मी काही दिवसापुर्वी हा नाईफ

सही रे सई
Sat, 03/11/2017 - 02:13 नवीन
मी काही दिवसापुर्वी हा नाईफ शार्पनर घेतला अमेझोन वरुन : Image removed. https://www.amazon.com/dp/B01FVW3DUA/ref=sr_ph_1?ie=UTF8&qid=1489178349&sr=sr-1&keywords=Knife+Sharpeners अमेरिकेत सुरीला धार काढून देणार कोणी नाही.. त्यामुळे सुरुवातीला सुरी ची धार कमी झाल्यावर पुन्हा नवीन सुरी घ्यायच्या ऐवजी शार्पनर घेऊन बघूया असा विचार केला आणि त्याचा आत्तापर्यंत खूपच छान उपयोग झाला आहे.
  • Log in or register to post comments

नुकतीच ही प्रचंड धारदार सुरी घेतली

लंबूटांग
Tue, 03/14/2017 - 02:44 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई

नुकतीच ही प्रचंड धारदार सुरी घेतली

लंबूटांग
Tue, 03/14/2017 - 02:45 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई

नुकतीच ही प्रचंड धारदार सुरी घेतली

लंबूटांग
Tue, 03/14/2017 - 02:46 नवीन
https://www.amazon.com/gp/product/B008M5U1C2/ref=od_aui_detailpages00?ie=UTF8&psc=1 $२९ ला सेल वर होती म्हणून. आता इतकी धारदार सुरी आणल्यामुळे जास्तीच काळजीपूर्वक कापाकापी करून जवळपास दुप्पट वेळ लागतोय काहीही चिरायला. म्हटले त्या शेफ लोकांसारखे कापून बघू भाज्या म्हणून youtube वर बघून प्रयोग करायला गेलो तर बोट कापून घेतले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई

पुणे व मुंबई असे एम रेडिओ

प्रकाश घाटपांडे
Mon, 03/13/2017 - 10:07 नवीन
पुणे व मुंबई असे एम रेडिओ स्टेशन स्वच्छ आवाजात बेडरुम मधे ऐकता येतील असा रेडिओ हवा आहे. पुर्वी ते व्हॉल्व चे रेडिओ लै भारी होते.
  • Log in or register to post comments

तुम्हाला MW म्हणायचे आहे का

मराठी_माणूस
Tue, 03/14/2017 - 11:38 नवीन
तुम्हाला MW म्हणायचे आहे का ? मी पण अशा चांगल्या रेडीओच्या शोधात आहे. एक कारण म्हणजे आकाशवाणीकडे शास्त्रिय संगीताचा खजाना आहे आणि सातत्याने तेच लोक शास्त्रिय संगीत क्षेपीत करत असतात पण रीसीव्हर्स चांगले नसल्याने आनंद घेता येत नाही. खाली AM रेडीओ ची एक लिंक मीळाली आहे , पण अनुभव नाही. http://www.amazon.in/Crane-CCRadio-EP-Analog-Radio-CEP/dp/B004GAKIKW?tag=googinhydr18418-21&tag=googinkenshoo-21&ascsubtag=9bc88922-cd07-45da-8e89-8ec77e485b5f
पुर्वी ते व्हॉल्व चे रेडिओ लै भारी होते
अगदी. वर्षानुवर्ष विनातक्रार चालयचे . त्यांना एक लांब जाळीचा अँटेना असयचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

मिताशीचा पोर्टेबल बूमबॉक्स

सुधांशुनूलकर
गुरुवार, 03/16/2017 - 19:17 नवीन
काही वर्षांपूर्वी मिताशीचा सिक्स-इन-वन घेतला, त्यात एएमवर मुंबई ब, विविध भारती, मुंबई अ चांगले ऐकता येतात. याव्यतिरिक्त त्यात एफएम रेडिओ, सीडी/डीव्हीडी प्लेयर, कॅसेट प्लेयर याही सोई, तसंच मेमरी कार्ड, पेन ड्राइव्ह वापरूनही ऑडिओ/व्हिडिओ ऐकता-बघता येतात. (अर्थातच, व्हिडिओ बघण्यासाठी तो टीव्हीला जोडायचा.) पूर्वी ते व्हॉल्वचे रेडिओ लै भारी होते. : सहमत. आमच्या घरी माझ्या वडिलांनी स्वतः बनवलेला दोन स्पीकरवाला व्हॉल्व रेडिओ होता, त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

kichibo कंपनीचे दहा बँडचे

कंजूस
Mon, 03/13/2017 - 16:41 नवीन
kichibo कंपनीचे दहा बँडचे रसत्यावरही मिळतात. एएम एफेम दणदणीत. घराजवळून टिव्ही केबल गेल्या असल्यास गोंगाट येतो एएम ला.
  • Log in or register to post comments

परफ्युम्स

वेदांत
Tue, 03/14/2017 - 14:52 नवीन
रविवारी झारा मधून ४ परफ्युम्स घेतले . झारा ९.०, सेउल,ट्यूबरोज (निशिगंध), रोज (गुलाब) . मीट्टी अत्तर च्या प्रेमात पडलेल्यानी झाराचे फिग परफ्यूम वापरुन पहावे. परफ्युम्स एकदम स्वस्त आणि मस्त आहेत.
  • Log in or register to post comments

एल् पी चे तंत्र नक्की काय आहे ?

अकिलिज
Tue, 03/14/2017 - 15:45 नवीन
माझ्याकडे पण फार जूना एल् पी प्लेयर आहे. तो नूसता हाताने फिरवला तरी गाणे ऐकू येते. एक सुई काळ्या खाचेत घासून संगीत ऐकवते म्हणजे तंत्र नक्की काय आहे ? कुणाला माहिती आहे कां ?
  • Log in or register to post comments

मी VU चाच ५५ इंचाचा फुल एच डी

सुबोध खरे
Wed, 03/15/2017 - 20:23 नवीन
मी VU चाच ५५ इंचाचा फुल एच डी टी व्ही फ्लिपकार्ट वरून आत्ताच दोन महिन्यापूर्वी घेतला ४१ ९९०/- ला. चित्राचा दर्जा सुंदर आहे. विशेषतः एच डी चॅनल माझ्या कडे ४२ इंचाचा फिलिप्स चा टीव्ही आहे. दोघांच्या दर्जात काहीच फरक जाणवलेला नाही. SNOB VALUE ची आणि नावाची किंमत असते. हवी तर अजून दोन वर्षाची वॉरंटी विकत घेता येईल. एक आगाऊ सूचना -- बजेट मध्ये बसेल असा सर्वात मोठा आकाराचा टी व्ही विकत घ्या. आकाराची तुलना बाकी गोष्टींशी(स्मार्ट टीव्ही इ) होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा