Skip to main content

हल्लीच काय खरेदी केलंत ?

लेखक गवि यांनी बुधवार, 08/03/2017 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
अमेझॉनकृपेने किंवा लोकल बाजारात काहीना काही खरेदी चालूच असते. रीटेल थेरपीचा वापर वाढतोच आहे. एखाद्या अतिभव्य मॉलपासून ते गावच्या आठवडी बाजारापर्यंत कुठेही काहीतरी खास हवं असलेलं मिळून जातं अतीव समाधान किंवा भ्रमनिरास होतो. कदाचित इकडेतिकडे चार रिव्ह्यूज टाकले जातात आणि ती वस्तू मागे पडते. तर एकंदरीत आपण खरेदी केलेल्या सामानाबद्दल काही सांगावंसं वाटलं तर इथे नोंदवून ठेवावं अशी इच्चा आहे. यामधे प्रत्यक्ष खरेदी केलेल्या वस्तू, विशलिस्टवर असलेल्या पण कुठे मिळतील हे माहीत नसलेल्या वस्तू, सर्व्हिसेस, वस्तूंविषयीचं चांगलंवाईट परखड मत, चालू आणि भावी "डील्स"ची / सेल्सची माहिती.. असं सगळं एकमेकांच्या फायद्यासाठी शेअर करावं. नव्या , सेकंडहँड, दुर्मिळ, जुन्या बाजारात मिळालेल्या, आउट ऑफ मार्केट झालेल्या पण कुठेतरी परत मिळालेल्या अशा सर्व वस्तूंविषयी येऊदे. .............. गेल्या काही काळात मी अमेझॉनवरुन कनौजमधलं "मिट्टी अत्तर" घेतलं. पावसातल्या मातीचा वास अर्करुपात कैद करुन ठेवलेला. अफलातून अ‍ॅडिक्टिव्ह... तापलेल्या मातीवर पाऊस पडल्याचा गंध. किंमत साडेनऊशे रुपयांत १० मिली. B शिवाय बरीच वर्षं घरात पडून असलेल्या एलपी रेकॉर्ड्ससाठी हा रेकॉर्डप्लेअर घेतला. अतिशय छान क्लियर आवाज. इनबिल्ट स्पीकर्स. बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी. तीस वर्षांनी बीटल्स, क्लिफ रिचर्ड्स, अ‍ॅबा, बोनीएम ऐकून नॉस्टाल्जियात बुडलो. आ

वाचने 43320
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

. हा बाराशे रुपयाचा स्पिकर घेतला. बेस्ट साऊंड, पोर्टेबिलीटी, तीन तास चालणारा रिचार्जेबल बॅटरी बॅक-अप (बॅटरी इन-बिल्ट) आणि रेडिओ अशी फिचर्स आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

मस्त दिसतोय. बाराशे ही किंमतही झकास. मी नुकतीच बोसची स्टार्टिंग रेंज पाहिली. ८-१० हजार या रेंजमधे: मल्टिमीडिया (कनेक्टेड) दोन स्पीकर्स असा एक ऑप्शन होता. ब्लूटूथ स्पीकरचा सिंगल ब्लॉक हा दुसरा ऑप्शन होता. मी मल्टिमीडिया स्पीकर घेऊन टीव्हीला जोडला. अक्षरशः थिएटरचा अनुभव. अर्थातच ही स्टार्टिंग रेंज आहे. बोसची वरची रेंज नक्कीच शतपट उजवी असणार. पण तरीही बोसची रेंज शेवटी...!!!

In reply to by गवि

मी मल्टिमीडिया स्पीकर घेऊन टीव्हीला जोडला. अक्षरशः थिएटरचा अनुभव.
मॉडेल नंबर वगैरे डिटेल्स सांगा ना. मी नुकताच बोसचा साउंड बार बघितला, जबरा अनुभव होता परंतु ७०००० रुपडे किंमत पाहून घेतला नाही. काही दिवस थांबून तोच घ्यावा असा विचार केलाय पण तुम्ही म्हणताय तो सुद्धा एकदा चेकवेन.

In reply to by संजय क्षीरसागर

हे मस्त आहे. मी पण परवाच घेतला हा स्पीकर. खणखणीत आवाज आणि रिचार्जेबल बॅटरी बॅकप असल्याने नंतर कसली खिटपिट नाही .

४-५ महिन्यापूर्वी बोसचे ब्ल्यूटूथ हेडफोन (साउंडलिंक २) घेतले. आत्तापर्यंतचा अनुभव उत्तम आहे. वजनाने हलके असल्यामुळे अतिशय कंफर्टेबल आहेत. आवाज बर्यापैकी न्युट्रल आणि क्लिअर आहे. बेस मात्र मध्यम आहे. बेस हेवी गाणी ऐकायला तितकिशी मजा येत नाही.

In reply to by सुमीत भातखंडे

भरपूर प्रकारच्या म्युझीक सिस्टीम वापरून या मतावर आलो कि, बेस मध्यमच असला पाहीजे. बीट्स् च्या हेडफोनचा बेस दोनचार गाणी ऐकताना छान वाटतो पण नंतर डोक्यात जायला लागतो. मग फायनल बोसच. कमी बेस = अवीट अनुभव.

जखमेवर मीठ भुरभुरणारा धागा. :( प्रत्यक्ष काय ऑनलाईन खरेदीलाही वेळ मिळत नाही हल्ली. तरी अ‍ॅमेझॉनवरुन डायपर्स आणि वेट वाईप्स मागवते हल्ली! :)

नुकतीच मी बोसची लाइफस्टाइल 535 अकोस्टिमस साऊंड सिस्टिम बघितलि. यूएईमध्ये रुपयात साधारणत: 180000 पर्यंत मिळतेय. भारतातील किंमत ३३१००० आहे. पण बोस - सॅमसंग टीव्ही कॉम्पॅटिबिलिटी बद्दल शंका आहे. एका मित्राकडे हारमन कार्डन आहे. मित्राच्या सल्ल्यानुसार दोघांची साऊंड क्वालिटी सेम आहे. पण मला बोस साऊंड सिस्टिम उजवी वाटते. हारमन कार्डन निम्म्या किमतीत मिळत आहे. पण मुंबईत हारमन कार्डनच सर्विस सेंटर नाही. बोसच आहे. मिपावरील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला हवाय.

In reply to by सावत्या

ते अकोस्टीमास तंत्रज्ञानाचे पैसे आहेत. आवाज अतिशय फिल्टर करून बॅलन्स केलेला आहे. तुमच्या बसण्याच्या जागेला तो नवीन ईन्स्टॉलेशनच्या वेळी टुयून करावा लागतो. अनुभव शब्दात सांगता येणार नाही. कितीही आवाज वाढवला तरी कानाला कर्कश्य वाटतच नाही. पैसे वसूल सिस्टीम आहे. आणि महत्वाचे - त्या सिस्टीमचं टिव्हीच्या ब्रॅडशी काहीही घेणं देणं नाहीये. ऑप्टीकल साऊंड ईनपुट असल्यास उत्तम.

In reply to by अकिलिज

ह्याला जोर्दार अनुमोदन. बोसची लाइफस्टाईल सिस्टिम घेतली आहे. ऑप्टिकल आउट्पुटला लावलेली असताना आवाज म्हणजे एक्दम तोड. नक्की समजावता येइल का महित नाही पण प्रयत्न करतो - टीव्हीत ट्रेन दाखवली असेल तर अक्षरशा: एका कानातुन आवाज जाउन दुसर्या कानातुन बाहेर आल्यासरखं फिलींग येतं. म्हणजे आत्ता या क्षणी ट्रेन आपल्या डाव्या बाजुने आली आणी आपल्या मागुन उजव्या बाजुला गेली असं वाटतं! :-)

In reply to by अंतु बर्वा

लाईफस्टाईल गेली ६ वर्षे वापरतोय. अप्रतिम हा एकच शब्द. पैसा दणकून घेतात पण एकदम वसूल. तुम्ही एरवी जी गाणी ऐकत असाल तीच या सिस्टिमवर अगदी नवी वाटतात. स्टीरिओचा खरा आनंद इतक्या उच्च दर्जाचा असू शकतो हे तेव्हाच समजतं! (बोसप्रेमी) रंगा

अ‍ॅमेझोनवर मिट्टीका अत्तर फारच महाग दिसतंय. पुण्यात बाजीराव रोडवर हे कनौजी अत्तर १०० रुपयात तोळाभर येतं. गंधही सुरेख, पहिल्या पावसानं भिजलेल्या ओल्या मातीचा.

In reply to by प्रचेतस

अमेझॉनवरही पुष्कळ स्वस्त पर्याय आहेत. कुठल्या प्रतीचं बेस ऑईल वापरलंय (रेंज : लिक्विड पॅरॅफिनपासून सँडल ऑईलपर्यंत) त्यावर किंमत ठरते. शिवाय ब्रँडवरही.

In reply to by प्रचेतस

प्रचेतस, याच्यापेक्षाही मोगर्‍याच्या गजर्‍याचा सुवास मस्त . तो सुद्धा मनगटाभोवती असलेला नव्हे तर वेणीत असलेला. :)))

टर्नटेबल Jensen या नावाने कुठेही शोधल्यावर सापडेल. काही तपशील: साधारण आठ हजाराला पडला. ५-६ हजारापासून पुढे ऑप्शन्स आहेत. सर्व आरपीएमच्या रेकॉर्ड चालतात. पीसीला जोडून एम्पीथ्री बनवता येतात. एक्स्टर्नल स्पीकर्स लावता येतात. आर्म हलका आहे. पण मॅग्नेट टाईपचा स्टायलस आहे. घरी बसून पूर्ण पोर्टेबल प्लेअरवर समाधानकारक स्पष्ट आवाजात जुन्या रेकॉर्ड ऐकण्यासाठी उत्तम आहे. अगदी साऊंड टेक्निशियन्स / इंजिनियर लोकांसाठी हा बनलेला नाही. कमी किंमत हे बलस्थान आहे. एकदम हाय एंड , थिएटर इफेक्टवाले, ७.१ चॅनल, इक्वलायझर इत्यादि अपेक्षा असतील तर किंमत लाखावर जाईल.

मस्त धागा! बर्‍याचदा मला कुणाला काय गिफ्ट द्यावं हे कळत नाही. आता ह्या धाग्यातुन बर्‍याच नव्या गोष्टी कळतील. जसं की हे अत्तर. माझी आई वेडी आहे मातीच्या सुगंधासाठी. तिला हे अत्तर दिलं तर जामच खुश होइल ती. धन्यवाद!!!

dashcam २ आठवड्या पूर्वी gearbest.com या site वरून हा डॅशकॅम मागवला. गाडी मध्ये पुढील काचेवर लावता येतो. गाडी चालताना हा व्हिडियो रेकॉर्ड करत राहतो. सध्याच्या ट्राफिक परिस्थितीत आपली चूक नसताना काही अपघात झाला तर आपल्या बाजूने काही असावा हा मुख्य उद्देश http://www.gearbest.com/car-dvr/pp_142025.html

In reply to by सस्नेह

इन्टरनेट - 3G आणि 4G VoLTE तपासले. चालते. मुळात मी रिलायन्स जिओचे 4G वापरता यावे म्हणून हा फोन घेतला. स्पीड - चांगला आहे. मी ३ वर्षांपूर्वी घेतलेल्या सॅमसंग ग्रँडवरुन अपग्रेड झाल्यामुळे मला अतिशय स्मुथ वाटला. स्टोअरेज - दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. ३ जीबी रॅम + ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज किंवा मग ४ जीबी रॅम + ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज. पहीला १६ हजारात तर दुसरा १८ हजारात येतो. कॅमेरा - मुख्य १६ एमपी तर फ्रंट कॅमेरा ८ एमपी Dimensions Width 75.35 mm Height 151.35 mm Depth 7.85 mm Weight 163 g काही वापरातून कळलेल्या गोष्टी: १. फोन जरी ड्युअल सिम असला तरी सेकंडरी स्लॉट हायब्रिड आहे. ज्यामध्ये एक तर सेकंडरी सिम टाकता येते किंवा मग मायक्रो एसडी कार्ड. दोन्ही एका वेळा वापरता येत नाहीत. २. बॅटरी लाईफ मोटोच्या याआधीच्या फोनच्या तुलनेत जरा कमी आहे. (3050 mAh) ३. फोनचे उभ्या कडांना थोडा स्लोप आहे. त्यामुळे बाजारातील सध्याच्या टेम्पर्ड ग्लासेस जर लावण्याच्या प्रयत्न केला तर दोन्ही उभ्या कडांना एअर गॅप राहते. ४. माझा फोन ६४ जीबीचा आहे. त्यातील १०.६२ जीबी अँड्रॉईडने घेतली आहे. हे जरा अती होतंय. कारण ३२ जीबीच्या फोनमध्येही जर हे होत असेल तर कमी मेमरी वापरायला उरेल.

In reply to by सतिश गावडे

फोन जरी ड्युअल सिम असला तरी सेकंडरी स्लॉट हायब्रिड आहे. ज्यामध्ये एक तर सेकंडरी सिम टाकता येते किंवा मग मायक्रो एसडी कार्ड. दोन्ही एका वेळा वापरता येत नाहीत.
अगदी याच कारणामुळे हा फोन रिजेक्ट केला . ड्युअल सिम +मेमरी कार्ड हे फिचर पाहिजेच . बाकी फोन एकदम जबरदस्त . मला हे एक कळत नाही की एवढाले मोठे स्क्रीन असतात फोनला मागे जागाही बरीच असते मग आताच या कंपन्यांनी हे हायब्रीड सिम चं फ्याड का काढलं ? खरं तर भारतीय पब्लिक सरावलीय ड्युअल सिम फोनला . फोनची इंटर्नल मेमरी कितीही असली तरी कमीच पडते .मेमरी कार्ड हे लागतेच.

In reply to by सतिश गावडे

तपशीलासाठी धन्यवाद ! मेमरी कार्ड बरे पडते बॅकप वगैरेसाठी. बाकी internal storage 50 GB भरपूर आहे. मोटो च्या battery life चाच problem आहे. शिवाय battery replacement किचकट व खर्चिक आहे. मुलाचा मोटो जी एकदा बॅटरी बदलूनही जेमतेम दोन वर्षे गेला .

In reply to by सस्नेह

आधीची चर्चा वाचून अ‍ॅमेझॉनच्या कार्ट्यात टाकलेला स्यामसंग राहू दिला व मोटो पहायला सुरुवात केली तर लोकांनी ब्याटरी व जीपीएसचा प्रॉब्लेम बराच सांगितलाय म्हटल्यावर पुन्हा स्यामसंगचा विचार करतिये.

In reply to by रेवती

वरील सर्व ड्रॉबॅक नसणारा Lenovo vibe P1 मस्त आहे. सुखद अनुभव. P1 ५००० mAh बॅटरी. फास्ट चार्जिंग (अर्ध्या तासात फुल). बॅटरी संपण्याची चिंताच नको. कोठार आहे ही बॅटरी. P1 ला हायब्रीड स्लॉट नसून वेगळे ड्युअल सिम स्लॉट्स आणि वेगळा १२८ जीबी मेमरी कार्ड स्लॉट. शिवाय एका बटणात फोनची सर्व स्मार्ट फीचर्स बंद करुन फक्त कॉल आणि एसेमेस चालू ठेवण्याची सोय (बेसिक फोन). बॅटरी कितीही कमी असली तरी या मोडमधे फोन पुढे अनेक दिवस चालू शकतो. बॅटरी उत्कृष्ट आहेच पण हा फोन खुद्द पॉवरबँक बनू शकतो इतर मोबाईल्ससाठी.

एवढ्यात अ‍ॅमेझॉनवर बर्‍याच वस्तू घेतल्यात. मोठ्या नाहीत पण लहानसान. मुलाचे ग्लव्हज हेड कंपनीचे. टचस्क्रीन असल्याने खेळताना मध्येच फोन आला तर उपयोगी. बॉल कंपनीच्या जार्सची कॅनिंगची झाकडे बदलून प्लास्टिकची घेतलीत. ती चांगली आहेत. एका बॉक्समध्ये ८ मिळाली. फुलांचा स्कार्फ आवडला. रोज एकदा घेऊ का नको असे वाटत होते. मग घेतला पण तो इन्फिनिटी स्कार्फ आहे हे वाचले नव्हते. तरी आवडलाच. स्कार्फ ट्रेडिंग इन्कॉ. यांच्याकडे भरपूर प्याटर्न्स उपलब्ध आहेत. नॉर्डिक वेअर यांचा अ‍ॅल्यूमिनिअम बेकींग ट्रे (हाफ शीट) ग्रेट दर्जाचा आहे. बाकी कपडे बिपडे आपापल्या पसंतीने होतात पण साधे लाँग स्लीव्हजचे टीशर्टस हे मेसिक विमेन्स चे बरे मिळाले. त्यात कमी रंग उपलब्ध आहेत पण मला हवे ते मिळाल्याने गप्प बसले. आणखी मागवायची वेळ आली तर मागवेन. बाकी स्वेटर वगैरे गोष्टी घेतल्या. वॉटरफॉल प्रकारातला स्वेटर ठीकठाक आहे. फ्याशनमार्क कंपनीचा. मांजराच्या पिलांचे चित्र असलेले किचन मॅट अ‍ॅन्टीस्लिप प्रकारातले आवडले. चांगले दिसतेय. असंच काय काय दुकानात न हिंडता घरपोच आल्याने शांत वाटतेय. ;)

नुकताच क्रोमा मधून फिलीप्सचा साऊंडबार खरेदी केला. http://www.philips.co.in/c-p/HTL2163B_12/soundbar-speaker अतिशय उत्तम क्वालिटी, होमथेअरचे फिलिंग आले. विषेश म्हणजे या साऊंडबार ला सगळे connectivity options आहेत. USB, Bluetooth, HDMI HRC, Optical आणि नॉर्मल ३.५ mm.... १२० W RMS आउटपुटमुळे सर्व प्रकारची गाणी ऐकायला छान वाटतात.

HD Vision Night Visor कोणी वापरते का गाडी चालवताना. विषेश म्हणजे रात्री गाडी चालवताना उलट्या दिशेने येणार्‍या गाड्यांच्या दिव्यांचा त्रास कमी होतो असे म्हणतात. कोणाला अनुभव आहे का याच्या वापराचा?

In reply to by गवि

hd night visor असे गूगलले तर इबे आणि बर्‍याच साईटवर दाखवते. युट्युबवर व्हीडीओपण आहेत. पण प्रत्यक्ष कोणी वापरले आहे का त्यांचा अनुभव हवा आहे.

सध्या मी चांगल्या प्रतीचं पण फार महाग नसलेलं आणि डिजिटली प्रोग्राम करता येऊ शकणारं कॉफी मेकर शोधते आहे. अमेझॉन वर बघते. काही सजेशन्स असतील तर प्लीझ द्या. एखादा वाईट अनुभव असेल तरी सांगा. दुसरं म्हणजे स्प्रिंग कोट ! ते ही अमेझॉन वर बघते. अजुन काही ऑनलाईन पर्याय आहेत का स्प्रिंग कोट साठी?

In reply to by स्रुजा

समजल्यास सांगीन पण मागील महिन्यात अ‍ॅमेझॉनवाल्यांकडे जो विंटर कोट मी मागितला ती ऑर्डर परस्पर त्यांनीच क्यान्सल केली होती.

मी काही दिवसांपुर्वी इन्स्टग्राम वरुन JBL चार्ज२+ हा स्पीकर घेत्ल ३००० मध्ये इन्स्टाग्रम वर Gadgetotic म्हणुन आहे. बर्‍याच इलेक्ट्रोनिक वस्तु first copy available आहेत

वेगवेगळे स्पीकर्स सध्या हॉट आयटेम दिसताहेत. मला एक प्रोजेक्टर घेऊन मोठ्या स्क्रीनवर टीव्ही बघायची इच्छा आहे. पण स्वस्त प्रोजेक्टर्सच्या ब्रँडची फॅन्सी नावं वाचून घ्यायचं धाडस होईना. एक मर्लिन म्हणून पॉकेट प्रोजेक्टर घेतला होता ११ हजार. पण फारच डीम आहे. मिट्ट काळोख केल्याशिवाय दिसत नाही. जरा लो बजेटमधे पण पूर्ण डार्करुमची गरज नसलेला ब्राईट दृश्य दाखवणारा प्रोजेक्टर कोणी सांगू शकेल का?

In reply to by किसन शिंदे

=))

@ योगि ९००, ते नाइट व्हिजन अतिशय फालतु आहे, काही उपयोग नाही. त्यापेक्षा ओरिजनल पोलोराइड गागल घ्या त्याचा उपयोग होतो ब-यापैकी. यापेक्षा वाईट आणि बेकायदेशीर उपाय म्हंजे, हेल्ला चे दोन फॉग लॅम्प लावुन घ्या समोर. @मी बरवा, हे गॅजेट फार कामाचे आहे, मी गेले दिड वर्षे वापरतो आहे, कायदेशीर पुरावा तर झालंच पण बाकी इतर वेळी म्हणजे अपघात, मारामारी, इ. मध्ये उपयोगी पडतो, हलता सिसिटिव्हि आहे, फक्त मेमरी लिमिट आहे, आणि रात्रि तुमच्याच गाडीच्या हेडलाईटने चमकल्यानं पुढच्या गाडीची नंबर प्लेट स्पष्ट दिसत नाही, याला काही उपाय नाही. ब-याच दिवसापुर्वी मी ए८ नावाचा हेड अप डिस्प्ले घेतला आहे, आता गाडीचं स्पिडोमिटर कडं बघायची गरज पडत नाही, डायरेक काचेवर , अगदी दिवसासुद्दहा स्पष्ट दिसतात सगळे पॅरामिटर. आता विशलिस्ट मध्ये टिपिएमेस आणि रेन सेन्सर आणि अ‍ॅटो लाईट सेन्सर आहे,

In reply to by ५० फक्त

आभारी आहे.. हेड अप डिस्प्लेचा उपयोग आणि गरज पुर्णपणे समजली नाही. जर गाडी मध्ये आलरेडी स्पीडोमीटर आहे तर काचेवर त्याचा परत डिस्प्ले कशाला? आणि त्या डिस्प्लेमुळे तुमची व्हीजीबीलेटी कमी नाही का होणार?

In reply to by योगी९००

Viaibility आजिबात कमी होत नाही. 50 रावांच्या गाडीत हा प्रकार बघून लैच आवडला. डॅशबोर्ड आणि उजवा कॉलमबार यांच्या फटीत हा डिस्प्ले बसतो आणि चार इंच बाय तीन इंच इतक्या भागात एक काळपट पण पारदर्शक चौकोनी टेप वर सगळे आकडे डिस्प्ले होतात.

In reply to by मोदक

मला यांच्या बरोब्बर उलटं करणारा प्रकार हवा आहे. म्हणजे ड्रायव्हरने टाईप केलेलं मागच्या स्क्रीनवर बाहेरच्या बाजूने उमटायला हवं आहे. कारचा मुख्य त्रास म्हणजे मागच्या लोकांना इफेक्टिवली शिव्या घालता येत नाहीत. या उलट्या स्क्रीनमुळे मागच्या हॉर्नमारक माणसाला "विमान घे ना भुकनळ्या" वगैरे म्हणता येईल.

In reply to by आदूबाळ

लै भारी! किंवा लै हार्न मारायलाय तर मागच्या स्क्रीनवर "मध्यमा" दिसेल अशीही सोय चालेल! ;) रास्पबेरी पाय वापरुन एखादा प्रोजेक्ट करता येईल का बघायला हवे! ;) -रंगा

In reply to by चतुरंग

लै भारी! किंवा लै हार्न मारायलाय तर मागच्या स्क्रीनवर "मध्यमा" दिसेल अशीही सोय चालेल! ;)
मला अशावेळी शक्य तेवढी साईड देत मागच्याला "जा बाळ..!" असा संदेश दाखवायची फार इच्छा होते.

In reply to by स्रुजा

नै हो. मी पुणे 30, 51 आणि 2 मध्ये ट्रेन्ड डायवर असल्याने दुसऱ्या देशात गाडी चालवून लोकांना टेनशन देत नाही.

In reply to by आदूबाळ

या यादीत पुणे ५१ वाचून डोळे पाणावले. पीक अवरला पुणे ५१ मध्ये वाहन चालवणे हा अतिशय दिव्य प्रकार आहे.

१) Xiaomi Redmi 3S 4G- SEAL PACKED- 2GB RAM, 16GB ROM, Dual Sim, HD Display, Grey Rs. 7,699 २) Columbus Tab-5005 Mesh Sports Shoes for Men Rs.499 ३) Prestige Omega Deluxe Induction Base Non-Stick Kitchen Set, 3-Pieces Rs.1,499

माझी पण थोडी खरेदी १. FM हेडफोन - TV साठी रात्री TV च्या आवाजाचा (इतरांना :)) त्रास न होता सिनेमा बघण्यासाठी. व्हॅल्यू फॉर मनी म्हणता येईल असा. ५०० रुपयात, तीन महिने वापरतोय विना तक्रार. आवाजाची क्वालिटी पण चांगली आहे https://www.amazon.in/gp/product/B00D6EG7FO/ref=oh_aui_detailpage_o08_s… २. ऑटोमॅटिक वॉटर प्रेशर पंप मी तळ मजल्यावर राहतो. टाकी पहिल्या मजल्यावर आहे. त्यामुळे बाथरूम मध्ये गॅस गिजर आणि शॉवर ला पाणीच येत नव्हते. सगळे प्लम्बिंग बदलून झाले पण प्रश्न कायम राहिला. शेवटी गुगल वर पर्याय बघितले आणि हा अमेझॉन वर दिसला. विजेवर चालणार हा पंप नळ सुरु केला कि सुरु होतो आणि बंद केल्यावर थांबतो. वीज पण जास्त जळत नाही. https://www.amazon.in/gp/product/B01BMSFFR6/ref=oh_aui_detailpage_o05_s…

In reply to by ओसु

त्यामुळे बाथरूम मध्ये गॅस गिजर आणि शॉवर लापाणीच च्या पाण्याला प्रेशर येत नव्हते.

In reply to by ओसु

>>माझी पण थोडी खरेदी १. FM हेडफोन - TV साठी रात्री TV च्या आवाजाचा (इतरांना :)) त्रास न होता सिनेमा बघण्यासाठी.>> - TV ला स्पिकर आउट पोर्ट नसले ,फक्त A/V out असले तर जोडायला येईल का?

१.४ ली ची आईस बकेट दुकानातून घेतली. एम आर पी पेक्षा १०% सवलत (२९० ल मिळाली) घेतल्या पासून अजून 'कार्यक्रम' केला नाही (हाय कमांडकडून अजून परवानगी मिळाली नसल्याने), पण एकदा बकेटमध्ये बर्फाचे खडे ठेवून प्रात्यक्षिक बघितले किमान पाच-सहा तास खडे अगदी चांगले राहिले होते..सोबत बर्फाचा खडा उचलण्यासाठीचा चिमटा (tong) आहे bucket

माझ्या सततच्या फिरतीला पुरक असा गोप्रो हिरो ५ घ्यावयाचा विचार करतो आहे. किंमत ३० ते ३५ हजार रू. च्या दरम्यान. हा कॅमेरा घ्यावा की आणखी कोणता घ्यावा हे कृपया सुचवावे. (अ‍ॅक्शन कॅमेर्‍यासाठी किंमत जास्त वाटत आहे पण SJ Cam १५ हजार पर्यंत येतो आहे आणि मला फारसा आवडला नाहीये, गोप्रोचे आणखी मॉडेल २५ ते २८ हजार पर्यंत जात आहेत, पण मग ते घेण्यापेक्षा लेटेस्ट आणि अनेक फिचर असलेला हाच चांगला वाटत आहे) . आणखी कोणता अ‍ॅक्शन कॅमेरा कोणी वापरला आहे का..? गोप्रोला एखादा चांगला ऑप्शन आहे का..?

In reply to by मोदक

अरे तुला घाई नसेल तर येता जाता कुणाच्या ही हातुन पाठवता येईल. तो जो पर्याय आहे तो पण बहुधा इथे स्वस्त असेल.