Skip to main content

हल्लीच काय खरेदी केलंत ?

लेखक गवि यांनी बुधवार, 08/03/2017 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
अमेझॉनकृपेने किंवा लोकल बाजारात काहीना काही खरेदी चालूच असते. रीटेल थेरपीचा वापर वाढतोच आहे. एखाद्या अतिभव्य मॉलपासून ते गावच्या आठवडी बाजारापर्यंत कुठेही काहीतरी खास हवं असलेलं मिळून जातं अतीव समाधान किंवा भ्रमनिरास होतो. कदाचित इकडेतिकडे चार रिव्ह्यूज टाकले जातात आणि ती वस्तू मागे पडते. तर एकंदरीत आपण खरेदी केलेल्या सामानाबद्दल काही सांगावंसं वाटलं तर इथे नोंदवून ठेवावं अशी इच्चा आहे. यामधे प्रत्यक्ष खरेदी केलेल्या वस्तू, विशलिस्टवर असलेल्या पण कुठे मिळतील हे माहीत नसलेल्या वस्तू, सर्व्हिसेस, वस्तूंविषयीचं चांगलंवाईट परखड मत, चालू आणि भावी "डील्स"ची / सेल्सची माहिती.. असं सगळं एकमेकांच्या फायद्यासाठी शेअर करावं. नव्या , सेकंडहँड, दुर्मिळ, जुन्या बाजारात मिळालेल्या, आउट ऑफ मार्केट झालेल्या पण कुठेतरी परत मिळालेल्या अशा सर्व वस्तूंविषयी येऊदे. .............. गेल्या काही काळात मी अमेझॉनवरुन कनौजमधलं "मिट्टी अत्तर" घेतलं. पावसातल्या मातीचा वास अर्करुपात कैद करुन ठेवलेला. अफलातून अ‍ॅडिक्टिव्ह... तापलेल्या मातीवर पाऊस पडल्याचा गंध. किंमत साडेनऊशे रुपयांत १० मिली. B शिवाय बरीच वर्षं घरात पडून असलेल्या एलपी रेकॉर्ड्ससाठी हा रेकॉर्डप्लेअर घेतला. अतिशय छान क्लियर आवाज. इनबिल्ट स्पीकर्स. बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी. तीस वर्षांनी बीटल्स, क्लिफ रिचर्ड्स, अ‍ॅबा, बोनीएम ऐकून नॉस्टाल्जियात बुडलो. आ

वाचने 43320
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

In reply to by मोदक

आजच एक जण गेला की रे भारतात. थोडं आधी कळवलं असतंस तर नक्की पाठवला असता मी. आता कुणी सापडलं तर कळवेन.

In reply to by गवि

हा वॉटरप्रूफ कॅमेरा असतो आणि आपल्या डोक्यावर / कपाळावर / छातीवर तसेच साईकलवर / बाईकच्या समोरच्या चाकाजवळ / अक्षरशः कुठेही माऊंट करता येतो. उदा. . हा कॅमेरा वापरून खाली दिसत आहेत तसे अफलातून व्हिडीओ शूट करता येतात. मी म्हणतो आहे ते मॉडेल तर ड्रोनला सुद्धा बसवू शकता. डॅनी मॅकास्किल (तोच तो "द रिज" वाला) मॅक्स युअर डेज

In reply to by मोदक

लोल .. आहे, आहे .. पण चेक करत राहा बाबा. इथलं आयुष्य क्षण भंगुर आहे ;) तर, मिळालेली माहिती अशी: की तो ९९ $ ना इथे मिळतो (पर्याय) पण ती डिस्काऊंटेड प्राईस आहे. रीटेल थोडी जास्त पण ४५०$ पेक्षा (गो प्रो ची किंमत) कमीच आहे . रिव्यु असा आहे की पाण्याखाली हा गो-प्रो अ‍ॅड्जेसंट फार भारी रीझल्ट्स देतो. पाण्याबाहेर खुप भारी नाही तरी चांगले देतो . आता शेवटची माहिती राहिली आहे - नाव आणि मोडेल नंबर( नेमकी ती इन्फो आज दिवसभरात मिळेल - मी माझं बुकमार्क पेज हरवलं )- ज्याने वापरलं आहे त्याने आज नक्की सांगतो असं सांगितलं आहे.

In reply to by स्रुजा

..तर मी गार्मिन वर्ब एलिट घेतला. मित्राने वर्षभर वापरलेला कॅमेरा मला स्वस्तात मिळाला म्हणून घेतला. सध्या टेस्टिंग सुरू आहे. मागच्या आठवड्यातील एका इव्हेंटला ट्राय केला. माऊंट आणि कॅमेर्‍याचा फोकस थोडा खालच्या दिशेने हवा आहे हे कळाले.

हा धागा अशासाठी आवडला की कोणकोणत्या वस्तू॑शिवाय आपण आरामात जगू शकतो ते कळत जाते .

Xiaomi Redmi 3S 4G- SEAL PACKED- 2GB RAM, 16GB ROM, Dual Sim, HD Display, Grey Rs. 7,699 हा मोबाईल मी घेतलाय कारण हा उत्तम फोटो काढणारा आहे. मला एप्रिल मे मधे युरोपात इटली स्वीस फ्रान्स असे स्वतंत्र भटकायचे असल्याने एरवीच्या १६ एक्स कॅमेर्या बरोबर हवाच. बाकी मला भारतात बसून युरोपात काही गोष्टींचे बुकिंग त्यांच्या पैशात करायचे आहे . उदा .व्हर्साय चे आगाउ बुकिंग . ते करण्यासाठी उत्तम उपाय काय ? नेट बॅन्किंग वापरले तर प्री लोडेड फोरेक्स कार्ड चालते का ?

In reply to by चौकटराजा

मीही नुकताच मि मॅक्स आणि नोकिआ १३० घेतला ! (पण खरं सांगु का , एकुणच मोबाईल ही संकल्पनाच अनावश्यक वाटायला लागली आहे गेल्या महिन्याभरात . )

जानेवारीत माझा पहिला स्मार्टफोन - मोटो जी ४ प्ले अ‍ॅमेझॉनवरून घेतला. दोन जीबी रॅम, १६ जीबी अंगभूत साठवणक्षमता (इंटर्नल मेमरी) आहे, याच्या जोडीला ३२ जीबीचं साठवणकार्डही घेतलं. अंगभूत 'मार्शमेलो' प्रणाली आहे. फोनमधला कॅमेरा ही माझी कधीच मुख्य गरज नव्हती, त्यामुळे या फोनला असलेल्या ८ एमपी / ५ एमपी अशा 'कमी' क्षमतेच्या कॅमेर्‍याबद्दल तक्रार नाही. (तरी फोटो छान येतात.) माझी गरज भागते, मस्त, मी समाधानी आहे. ता.क. : २६ जानेवारीपूर्वी आठ हजारला मिळाला, आज अ‍ॅमेझॉनवर सहज पाहिलं तर ८९९९ रुपये किंमत दिसते आहे. १०००० एमएएच्या दोन पॉवरबँकही प्रत्येकी ७९९ रुपयाला घेतल्या. अनुभव - फोन रपारप चार्ज होतो. त्यापूर्वी लिनोव्हो योगा ८" टॅब घेतला. सर्वोत्कृष्ट!! आता त्याची किंमतही खूपच कमी - साडेबारा हजार इतकी - झाली आहे. तेव्हा कुणाला टॅब घ्यायचा असेल, तर नक्की याचा विचार करा. अवांतर - @गवि : शिवाय बरीच वर्षं घरात पडून असलेल्या एलपी रेकॉर्ड्ससाठी हा रेकॉर्डप्लेअर घेतला. अतिशय छान क्लियर आवाज. इनबिल्ट स्पीकर्स. बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी. तीस वर्षांनी बीटल्स, क्लिफ रिचर्ड्स, अ‍ॅबा, बॉनीएम ऐकून नॉस्टाल्जियात बुडलो. : हे वाचून जळून खाक झालो आहे याची नोंद घेणे. एकट्याने नॉस्टॅल्जियात बुडणे ई ना चॉलबे. आता हे सर्व ऐकण्यासाठी कधीतरी तुमच्या घरी येऊन धडकणार, ही आगाऊ (!.. या शब्दाचे दोन्ही अर्थ घेणे.) सूचना देऊन ठेवतो.

गोप्रो चा रिव्ह्यु cnbc आवाज चानेलच्या टेकगुरू कार्रक्रमात झाला होता तो युट्युबवर आहे पाहा. # स्पिकरमध्ये/ फ्रिक्वन्सी रिस्पॅान्स डेटा दिलेला असतो. 100 Hz च्यापेक्षा कमी 30Hz, 60Hz दिलेली असेल तर { आणि मूळ रिकॅार्डिंगमध्ये दाबून टाकलेली नसेल supressed} तरच Bass आवाज उत्तम येण्याची अपेक्षा ठेवू शकतो.

आजवर एकदाही on line शॉपिंग केलेलं नाही. अजूनही प्रत्यक्ष बघून, वस्तू आणि किंमत यांची तुलना करून मगच काही खरेदी करते. त्यामुळे हा धागा आणि त्यावरील चर्चा वाचून बरच काही समजलं. धन्यवाद!

मी काही दिवसापुर्वी हा नाईफ शार्पनर घेतला अमेझोन वरुन : w https://www.amazon.com/dp/B01FVW3DUA/ref=sr_ph_1?ie=UTF8&qid=1489178349… अमेरिकेत सुरीला धार काढून देणार कोणी नाही.. त्यामुळे सुरुवातीला सुरी ची धार कमी झाल्यावर पुन्हा नवीन सुरी घ्यायच्या ऐवजी शार्पनर घेऊन बघूया असा विचार केला आणि त्याचा आत्तापर्यंत खूपच छान उपयोग झाला आहे.

In reply to by सही रे सई

https://www.amazon.com/gp/product/B008M5U1C2/ref=od_aui_detailpages00?i… $२९ ला सेल वर होती म्हणून. आता इतकी धारदार सुरी आणल्यामुळे जास्तीच काळजीपूर्वक कापाकापी करून जवळपास दुप्पट वेळ लागतोय काहीही चिरायला. म्हटले त्या शेफ लोकांसारखे कापून बघू भाज्या म्हणून youtube वर बघून प्रयोग करायला गेलो तर बोट कापून घेतले.

पुणे व मुंबई असे एम रेडिओ स्टेशन स्वच्छ आवाजात बेडरुम मधे ऐकता येतील असा रेडिओ हवा आहे. पुर्वी ते व्हॉल्व चे रेडिओ लै भारी होते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

तुम्हाला MW म्हणायचे आहे का ? मी पण अशा चांगल्या रेडीओच्या शोधात आहे. एक कारण म्हणजे आकाशवाणीकडे शास्त्रिय संगीताचा खजाना आहे आणि सातत्याने तेच लोक शास्त्रिय संगीत क्षेपीत करत असतात पण रीसीव्हर्स चांगले नसल्याने आनंद घेता येत नाही. खाली AM रेडीओ ची एक लिंक मीळाली आहे , पण अनुभव नाही. http://www.amazon.in/Crane-CCRadio-EP-Analog-Radio-CEP/dp/B004GAKIKW?ta…
पुर्वी ते व्हॉल्व चे रेडिओ लै भारी होते
अगदी. वर्षानुवर्ष विनातक्रार चालयचे . त्यांना एक लांब जाळीचा अँटेना असयचा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

काही वर्षांपूर्वी मिताशीचा सिक्स-इन-वन घेतला, त्यात एएमवर मुंबई ब, विविध भारती, मुंबई अ चांगले ऐकता येतात. याव्यतिरिक्त त्यात एफएम रेडिओ, सीडी/डीव्हीडी प्लेयर, कॅसेट प्लेयर याही सोई, तसंच मेमरी कार्ड, पेन ड्राइव्ह वापरूनही ऑडिओ/व्हिडिओ ऐकता-बघता येतात. (अर्थातच, व्हिडिओ बघण्यासाठी तो टीव्हीला जोडायचा.) पूर्वी ते व्हॉल्वचे रेडिओ लै भारी होते. : सहमत. आमच्या घरी माझ्या वडिलांनी स्वतः बनवलेला दोन स्पीकरवाला व्हॉल्व रेडिओ होता, त्याची आठवण झाली.

kichibo कंपनीचे दहा बँडचे रसत्यावरही मिळतात. एएम एफेम दणदणीत. घराजवळून टिव्ही केबल गेल्या असल्यास गोंगाट येतो एएम ला.

रविवारी झारा मधून ४ परफ्युम्स घेतले . झारा ९.०, सेउल,ट्यूबरोज (निशिगंध), रोज (गुलाब) . मीट्टी अत्तर च्या प्रेमात पडलेल्यानी झाराचे फिग परफ्यूम वापरुन पहावे. परफ्युम्स एकदम स्वस्त आणि मस्त आहेत.

माझ्याकडे पण फार जूना एल् पी प्लेयर आहे. तो नूसता हाताने फिरवला तरी गाणे ऐकू येते. एक सुई काळ्या खाचेत घासून संगीत ऐकवते म्हणजे तंत्र नक्की काय आहे ? कुणाला माहिती आहे कां ?

In reply to by संजय क्षीरसागर

मी VU चाच ५५ इंचाचा फुल एच डी टी व्ही फ्लिपकार्ट वरून आत्ताच दोन महिन्यापूर्वी घेतला ४१ ९९०/- ला. चित्राचा दर्जा सुंदर आहे. विशेषतः एच डी चॅनल माझ्या कडे ४२ इंचाचा फिलिप्स चा टीव्ही आहे. दोघांच्या दर्जात काहीच फरक जाणवलेला नाही. SNOB VALUE ची आणि नावाची किंमत असते. हवी तर अजून दोन वर्षाची वॉरंटी विकत घेता येईल. एक आगाऊ सूचना -- बजेट मध्ये बसेल असा सर्वात मोठा आकाराचा टी व्ही विकत घ्या. आकाराची तुलना बाकी गोष्टींशी(स्मार्ट टीव्ही इ) होत नाही.

In reply to by सुबोध खरे

आताच हा टिवी शोरुमला बघून आलो. मला फार आवडला. पिक्चर मॅट फिनिश आणि क्लिअर आहे. सोनीचा त्याच्या शेजारीच लावला होता. त्याची पिक्चर क्वालिटी सेम सेटींग्जला फार ब्राईट होती. पत्नी सोनीच्या टिवीला भाळली (किंमत ४५.०००!) पण सेल्समन भला माणूस होता. तो म्हणाला, इतकं ब्राईट पिक्चर तुम्हाला फार वेळ पाहावणार नाही ! तुमच्या या प्रतिसादामुळे चित्राचा दर्जा सुंदर आहे. विशेषतः एच डी चॅनल निर्णय पक्का केला आहे ! मी टिवी पाहात नाही. तो आईच्या बेडरुममधे असतो. त्या रुम साइजला ४०" एकदम स्युटेबल आहे. पुनश्च धन्यवाद !

In reply to by संजय क्षीरसागर

सोनी वाल्यांचे सर्व टीव्ही शोरूम मधे दाखविताना रेकॉर्डेड कन्टेन्ट्स दाखवितात . सोनीची खरी पारख करताना ट्रन्समिटेड सिग्नलस कसे दिसतात ते पाहूनच तुलना करणे योग्य. सोनीवाले ते कधीच दाखवीत नाहीत. घरी आल्यावर खरे चित्र कसे दिसते हे कळते.

In reply to by किसन शिंदे

सोनी ब्राविया बद्दल सहमत... अतिशय बेभरवशाचे टीवी.. तीन वर्षे चालले तर पैसे वसूल... सर्व सदस्यांना कळकळीची सुचवणी. बाकी काहीघ्या... सोनी बिल्कूल घेऊ नका.. सोनी ब्राविया ४० इन्ची घेतला होता... साधारण तिसर्‍या वर्षाच्या सुरुवातीला वरच्या भागात आडवा पॅच अंधुकसा यायला लागला... नंतर दोनेक वर्षात जरा जास्त वाढला.. जालावर चेक केले तेव्हा ही समस्या खूप खुप लोकांना आहे असे कळलं, कैकांना तर एक वर्ष झाल्याझाल्या भलेथोरले पॅचेस आल्याचे दिसले. स्क्रीन बदल्ण्याची किंमत २२हजार रुपये. (टीवी ६५हजार) स्क्रीन बदल्ण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा तो मी ओएलक्स वरुन २१ हजाराला विकून टाकला. त्यापेक्षा उन्नीस-बीस क्वालिटी असलेले शामसंग-एल्जी वगैरे घ्यावेत.. दणकट आणी वर्षानुवर्षे बिनदिक्कत चालतात. खरेसाहेबांना अनुमोदन. बजेटमध्ये मोठ्यातलामोठा स्र्कीन घ्यावा. पण बैठकीचे व टीवीचे अंतर किमान १० फूट हवे. ८ फूट असेल तर ३२इन्चीपर्यंत ठिक १० फूट असेल तर ४० इन्ची ठिक १२-१५ फूट असेल तर ५५ वगैरे ठिक

In reply to by संदीप डांगे

सोनी ब्राविया ४० इन्ची घेतला होता... साधारण तिसर्‍या वर्षाच्या सुरुवातीला वरच्या भागात आडवा पॅच अंधुकसा यायला लागला... नंतर दोनेक वर्षात जरा जास्त वाढला.. जालावर चेक केले तेव्हा ही समस्या खूप खुप लोकांना आहे असे कळलं, कैकांना तर एक वर्ष झाल्याझाल्या भलेथोरले पॅचेस आल्याचे दिसले. स्क्रीन बदल्ण्याची किंमत २२हजार रुपये. (टीवी ६५हजार) स्क्रीन बदल्ण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा तो मी ओएलक्स वरुन २१ हजाराला विकून टाकला.
माझ्या स्वत:च्या ओळखीत चार पाच जणांकडे ही समस्या अनुभवली. माझा स्वत:चा एलईडी चार वर्षे उत्तम टिकला, पण त्याची स्क्रीन गेल्यावर मात्र ती बदलण्याच्या भानगडीत न पडता एलजीचा नवीन एलईडी घेतला.

In reply to by संदीप डांगे

वरील गुणोत्तर आता टीव्ही चे रेझोल्यूशन वाढल्यामुळे बदलले आहे. To determine the maximum size TV screen you would divide the length of your viewing distance by 1.5. म्हणजेच जर तुम्ही ८ फुटावर(९६ इंच) बसत असलात तर ६४ इंची आणि १० फुटावर(१२० इंच) बसत असलात तर ८० इंचाचा टीव्ही घ्यावा http://blog.coldwellbanker.com/3-simple-tips-for-choosing-the-right-siz… माझ्या बेडरूम मध्ये बेडची लांबी ६ फूट अधिक ३ फुटावर भिंत असे ९ फूट होत होते त्यासाठी ७२ इंचाचा टीव्ही चालला असता. पण तेवढा माझ्या बजेट मध्ये नव्हता म्हणून परवडणारा ५५ इंचाचा घेतला. शिवाय जितका मोठा टीव्ही असेल तितके त्याचे रेझोल्यूशन चांगले हवे म्हणजेच ४० इंचापेक्षा जास्त असेल तर फुल्ल एच डी टीव्हीच घ्यावा full HD, offers 1920 by 1080 pixels. ४० इंचापेक्षा कमी असेल तर एच डी चालू शकेल. (a 720p HDTV gives you 1024 by 768 pixels,) खरं तर आता एच दि किंवा एच डी रेडी टीव्ही घेऊच नये कारण ते येत्या एक ते दोन वर्षात नक्कीच कालबाह्य होणार आहेत आत्ताच जवळ जवळ ५० एच डी चॅनल उपलब्ध आहेत

In reply to by सुबोध खरे

या ४०" व्यू टिवीचं Screen Resolution:1920 x 1080 आहे ! शिवाय हे २०१७ चं मॉडेल आहे, त्यात तीन वर्षाची वॉरंटी किंमतीतच इन्क्लूडेड आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

झकास तीन वर्षे डोक्याला त्रास नाही.

In reply to by सुबोध खरे

फुल एचडी एलजीचा एलसीडी टीव्ही गे ७/८ वर्ष घरी वापरतोय. एकदाही प्रॉब्लेम नाही, अत्युच्च दर्जाचे चित्र आहे. सोबत ब्लू रे प्लेयर असल्याने फुल एचडी सिनेमे बघताना अधिकच बहार येते.

In reply to by संदीप डांगे

सम्सुन्ग-एल्जी पेक्षा पॅनासॉनिक अधिक दणकट आणि स्वस्त आहे. शिवाय दर्जाही उत्तम. मायक्रोमॅक्स चे टीव्ही आणखीन स्वस्त आहेत. पण दर्जाबद्दल माहीती नाही.

In reply to by किसन शिंदे

माझ्याकडील सोनी ब्राविया अनेक वर्षे चालू आहे. उलट नातेवाईकांकडील सॅमसंग दोन वर्षात बिघडला.

In reply to by अभ्या..

तसं असेल तर तुम्ही चार पाच हजारात मिळणारा प्रोजेकटर घ्या. लाखाचा प्रश्नच नाही आणि इंचही जास्त. मग आयुष्यात बहार तर येईलच, पण त्याबरोबर दृकश्राव्य अनुभवाचा महोत्सवही होईल.

In reply to by सतिश गावडे

चार पाच हजारात प्रोजेक्टरही मिळत नाही. कमीत कमी २५-३० हजारात एपसोन किंव इन-फोकसचे चांगले प्रोजेक्टर मिळू शकतात ज्यांची ल्युमिन्स क्वॉलिटी चांगली असते.

In reply to by किसन शिंदे

>>चार पाच हजारात प्रोजेक्टरही मिळत नाही. तुमचा सध्याचा पत्ता द्या आणि माझ्या अकौंटला पाच हजार पाठवा. पाच हजाराचा प्रोजेकटर घरपोच मिळेल ;)

In reply to by सतिश गावडे

सात आठ हजारात वापरलेला किंवा कारखान्यातील सेकंड्स चा टीव्ही सात आठ हजारात मिळेल. आणि एक वर्षात त्यांचा परत विकला तर ७०% पैसेही परत मिळतील https://www.gozefo.com/mumbai/category/TV?filter&filter.sortBy=price_low हाकानाका

गॅस (म्हणजे: gadget acquisition syndrome ) असलेले समसुखी लोक्स बघून आनंद झाला. आठवड्यापुर्वी आंघोळ करतांना गाणी ऐकण्यासाठी सोनी एक्स बी२ हा निलदंती स्पिकर घेतला. एक्स बी ३ लाऊड वाटलेला. बोस साउंडलिंकचा बास कमी वाटलेला. जेबीएलशी वैयक्तिक वाकडं आहे, मागं एकदा सर्विसच्या बाबतीत लै कडकड करावी लागलेली. कॅणॉनच्या १०-१८ आणि १०-२२ कडे डोळा ठेवून आहे. कोणी यांपैकी कोणती/ कोणतीही रूंद कोन असलेली वापरली असल्यास अनुभव्/कंपेरिझन/प्यारलल लेन्स सुचवल्यास मंडळ आभारी राहील.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

आपल्या खिशातल्या फोनवर गाणी कां ऐकत नाही..? एक जागा बनवायची जेथे शॉवरचे पाणी पोचणार नाही - बस्स.. मी पांच / सहा वर्षांपूर्वी अशा प्रकारचे स्पीकर शोधले होते.. पण नंतर लक्षात आले की फोननेही काम चालेल..! (मी मुख्यत: भाषणे / कथाकथने MP3 मध्ये साठवतो व ऐकतो आणि गाणी ऐकलीच तर आहे त्या फोनवर काम चालून जाते.) विचित्र वाटली तरी ही सवय खूप कॉमन आहे, सचिन तेंडुलकरही शाळेत असताना वायर अणि स्पीकरवाला वॉकमन बाथरूम मध्ये नेऊन अशी गाणी ऐकायचा. :D

In reply to by संजय क्षीरसागर

मला संगीतक्षेत्राचा गळा नसला तरी थोडाफार कान आहे आणि माझा कान माझ्याच गळ्याला गप्प बसायला भाग पाडतो. :-D

In reply to by मोदक

पण आपला आवाज (कसाही असला तरी) एकमेव आहे हे समजून स्वतःचं गाणं ऐकायला लागलं की गळा कानावर मात करुन जातो !

सर्वांनी धाग्यावर खूप माहिती दिली. थँक्स. आता १२० कॉमेंट्स झाल्याने कोणीतरी कृपया पुढचा भाग नवीन धागारुपात काढावा.