परदेस मत जैय्यो...! (बट व्हाय नॉट?)
बर्याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये.
माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत.
सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ.
आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही.
इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो.
मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे.
पण दुसर्या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल.
हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते.
परदेशात असणार्यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.
वर्गीकरण
वाचने
119441
वाचनखूण
प्रतिक्रिया
340
मोठा विषय आहे, सवडीने उत्तर
आपल्याकडच्या सीबीएससी शाळांचा
In reply to आपल्याकडच्या सीबीएससी शाळांचा by खटपट्या
परदेशी रहावे का
In reply to परदेशी रहावे का by दिगोचि
+१
In reply to +१ by मराठी कथालेखक
बराचसा सहमत. नमस्ते लंडन
In reply to +१ by मराठी कथालेखक
आपला प्रतिसाद मनापासून आवडला.
In reply to आपला प्रतिसाद मनापासून आवडला. by सचिन काळे
धन्यवाद
डॉलरवाल्यांचा प्रश्न असं नाही हो
In reply to डॉलरवाल्यांचा प्रश्न असं नाही हो by फेदरवेट साहेब
नमनाला घडाभर तेल ही माझी
In reply to नमनाला घडाभर तेल ही माझी by पिलीयन रायडर
नाही म्हणलं तरी माझ्या मुलाला
In reply to नाही म्हणलं तरी माझ्या मुलाला by फेदरवेट साहेब
मी विचार करुनही समजलं नाही की
In reply to नमनाला घडाभर तेल ही माझी by पिलीयन रायडर
आपल्या आणि त्यांच्या
In reply to आपल्या आणि त्यांच्या by स्रुजा
शाळांमध्ये फरक पडत चाललाय हे
In reply to नमनाला घडाभर तेल ही माझी by पिलीयन रायडर
'मला प्रामाणिकपणे सांगायचं तर
परदेस आणि भारत हे दोन संपूर्णपणे विभक्त विकल्प आहेत
In reply to परदेस आणि भारत हे दोन संपूर्णपणे विभक्त विकल्प आहेत by संजय क्षीरसागर
सर्वप्रथम दोन्हीतली कंपॅरीजन
In reply to सर्वप्रथम दोन्हीतली कंपॅरीजन by पिलीयन रायडर
अनिर्णयाचं कारणंच कंपॅरिजन आहे !
In reply to अनिर्णयाचं कारणंच कंपॅरिजन आहे ! by संजय क्षीरसागर
मला कधी नव्हे ते तुम्ही काय
In reply to मला कधी नव्हे ते तुम्ही काय by पिलीयन रायडर
एका झटक्यात निर्णय होतो !
बघा एक सांगतो
धागा आणि प्रतिसाद वाचत आहे.
पिराताई एक सांगू का?
In reply to पिराताई एक सांगू का? by आदूबाळ
हे ही पटतंय की सतत पालकाच्या
मला पण हा प्रश्न नेहमी पडतो
In reply to मला पण हा प्रश्न नेहमी पडतो by खग्या
काही काही गोष्टींशी असहमत.
In reply to काही काही गोष्टींशी असहमत. by स्रुजा
४) आरक्षण - हा अमान्य. इकडे
बराच मोठा विषय आहे, उत्तर सुद्धा तसंच मोठं असणार
या लेखात मांडलेल्या काही
Pira,
म्हात्रेकाकांच्या प्रतिसादात
In reply to म्हात्रेकाकांच्या प्रतिसादात by स्रुजा
या प्रतिसादात असे दिसून येत
In reply to म्हात्रेकाकांच्या प्रतिसादात by स्रुजा
भारतात परत गेल्यावर
पिरा, माझे नाव तेवढे लेखातून
In reply to पिरा, माझे नाव तेवढे लेखातून by रेवती
वोक्के!
मला वाटते आजचा दिवस इथे आहेत तर जगून घ्या.
पिरा तु मुलाच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून हे प्रश्न मांडले आहेस
कॉलिंग मुक्तविहारी काका!
फॉर हियर ओर टू गो
अमेरिकेत किंवा इतर ठिकाणी
In reply to अमेरिकेत किंवा इतर ठिकाणी by कायरा
....तर त्यांनी मुलांच्या भविष्यातव्यासाठी कुठे रहावे?
तुमच्या संभ्रमाचे शिक्षण व
In reply to तुमच्या संभ्रमाचे शिक्षण व by वेल्लाभट
प्रतिसाद आवडला.
या धाग्यावर अवांतर होईल म्हणून जाऊ देत पण
In reply to या धाग्यावर अवांतर होईल म्हणून जाऊ देत पण by धर्मराजमुटके
इयत्ता चौथी
In reply to इयत्ता चौथी by वेल्लाभट
वेगळा धागा काढावा
In reply to वेगळा धागा काढावा by धर्मराजमुटके
काढा की
पण २ महिन्यासाठी आलो ते गेले
पिरा, भारत किंवा परदेश कुठे
In reply to पिरा, भारत किंवा परदेश कुठे by पद्मावति
ती म्हण आहे नं वळचणीचे पाणी (
In reply to ती म्हण आहे नं वळचणीचे पाणी ( by अभ्या..
येनीवे, टेक लाईट पद्माक्का.
येनीवे, टेक लाईट पद्माक्का. अळवावरचे अन वळचणीचे पाणी वेगवेगळे असते. अर्थही खूप वेगळावेगळा आहे. ;)ऊप्स..=)) म्हणींमधे मी नेहमी कन्फ्यूज़्ड असते :) आक्च्युयली मला हे म्हणायचे आहे की आपण जसं वागतो, विचार करतो ते मुलं त्यांच्या आणि आपल्या कळत नकळत स्प्न्ज सारखी अब्ज़ॉर्ब करत असतात. आपले संस्कार, विचार सरणी त्यांच्यामधेही येतेच खूप प्रमाणात. आई वडिलांची भारताशी असलेली ओढ मुलं सुद्धा बर्याच प्रमाणात उचलतात.In reply to येनीवे, टेक लाईट पद्माक्का. by पद्मावति
वळणाचे पाणी वळणावरच जाते
In reply to पिरा, भारत किंवा परदेश कुठे by पद्मावति
म्हणजे मी योग्य दीशेने जात आहे.
मला स्वतःला आयुष्यात वारेमाप
In reply to मला स्वतःला आयुष्यात वारेमाप by अभिजीत अवलिया
पूर्ण सहमत
मी १९९१ ते १९९८ या काळात
In reply to मी १९९१ ते १९९८ या काळात by श्रीगुरुजी
साधारण असेच माझेही मत आहे.
In reply to मी १९९१ ते १९९८ या काळात by श्रीगुरुजी
+१
In reply to +१ by आजानुकर्ण
हे पण मुद्दे पटले. सहमत आहे.
In reply to +१ by आजानुकर्ण
मुद्दा क्र १ बद्दल शंका :
In reply to मुद्दा क्र १ बद्दल शंका : by सही रे सई
मुद्दा क्र १ बद्दल शंका :
In reply to मुद्दा क्र १ बद्दल शंका : by आजानुकर्ण
आता तर नवीन एच-१ घेणे पण
Education option
फारच समर्पक सल्ले ! मिपावर
In reply to फारच समर्पक सल्ले ! मिपावर by सस्नेह
१. तुम्हाला निर्णय
१. तुम्हाला निर्णय-स्वातंत्र्य आहे, ही फार मोलाची आणि भाग्याची गोष्ट आहे, याची जाणीव असूदे .फार कमी लोकांना अशी संधी मिळते.+ १००० हा निर्णय कायम करण्यासाठीचा पहिला मुद्दा होऊ शकत नाही, पण निर्णयप्रक्रियेत त्याला विसरण्याची चूक करू नये इतका महत्वाचा मुद्दा नक्कीच आहे.रहायला मजा येतेय ना अमेरिकेत.
In reply to रहायला मजा येतेय ना अमेरिकेत. by गवि
x=x+1 सिंड्रोम काय आहे ?
In reply to x=x+1 सिंड्रोम काय आहे ? by संजय क्षीरसागर
x=x+1 सिंड्रोम काय आहे ?
x=x+1 सिंड्रोम काय आहे ?अहो पुण्यात म्हणतात ना, पुढच्या वेळी आल्यावर जेवायलाच या. त्याचीच आवृत्ती आहे ही. पुढच्या वर्षी भारतात कायमचं परत जाऊ असं दरवर्षी म्हणायचं.In reply to x=x+1 सिंड्रोम काय आहे ? by आजानुकर्ण
हे भारीये !
In reply to हे भारीये ! by संजय क्षीरसागर
बरोबर. तसेच बर्याचदा मनात
In reply to बरोबर. तसेच बर्याचदा मनात by मराठी_माणूस
हे पण बरोबरे !
In reply to x=x+1 सिंड्रोम काय आहे ? by संजय क्षीरसागर
if ‘X’ is the current year,
In reply to if ‘X’ is the current year, by पुष्करिणी
पुनश्च आभार्स !
Since ‘X’ is a changing variable, the objective is never reached.पण कोणताही निर्णय घेणं अवघड होण्याचं कारण फार मजेशीर आहे . मनाला निर्णय घेता येत नाही , त्याचं काम फक्त वेगवेगळे विकल्प मांडणं आहे . निर्णय कायम व्यक्तीलाच घ्यावा लागतो पण व्यक्ती मनाकडे कौल मागते . मग मन पुन्हा नवनवे विकल्प देतं त्यानं व्यक्ती आणखी कन्फ्युज होते . खरं तर मेंटल अॅक्टिविटी पूर्ण थांबल्याशिवाय निर्णय असंभव असतो . पण व्यक्ती मनाला कायम टरकून असते, न जाणो एखादा निर्णय चुकला तर मन पुन्हा म्हणणार ' मी त्याच वेळी सांगितलं होतं ! घातला ना घोळ ? आता निस्तरा ! ' त्यामुळे व्यक्तिला वाटतं निर्णयाचं काम बेटर मनावरच सोपवा. मग व्यक्ति मनाकडे पाहाते आणि मन व्यक्तिला पुन्हा स्वतःच्या मेरी गो राऊंड मधे बसवतं ! हा खरा X -> Y सिंड्रोम आहे ! Where X is mind & Y is you . The dilema is tossing the Ball to each other & the result is an unending game which makes any outcome impossible.In reply to पुनश्च आभार्स ! by संजय क्षीरसागर
हो, होतं असं. खरं तर प्रत्येक
In reply to हो, होतं असं. खरं तर प्रत्येक by पुष्करिणी
बरोब्बरे !
In reply to रहायला मजा येतेय ना अमेरिकेत. by गवि
हो हो, हमारे आहल पर हमे छोड दो.
वरती सगळ्यांनी भरपूर चर्चा घडवलेलीच आहे
शिक्षणाचा मुद्दा निर्विवादपणे
In reply to शिक्षणाचा मुद्दा निर्विवादपणे by पिलीयन रायडर
झेंड्याशी निष्ठा?
In reply to झेंड्याशी निष्ठा? by आजानुकर्ण
हे बघा.. त्याचं असंय की देशात
In reply to हे बघा.. त्याचं असंय की देशात by पिलीयन रायडर
याचे उत्तर तुझ्याकडेच आहे
In reply to हे बघा.. त्याचं असंय की देशात by पिलीयन रायडर
जसे तू भारतात जास्त राहिलीस
In reply to शिक्षणाचा मुद्दा निर्विवादपणे by पिलीयन रायडर
मी अमेरिका सोडून इंग्लंड
In reply to मी अमेरिका सोडून इंग्लंड by अभिजीत अवलिया
सहमत
In reply to शिक्षणाचा मुद्दा निर्विवादपणे by पिलीयन रायडर
अजून काही मुद्दे
In reply to अजून काही मुद्दे by Jack_Bauer
गुड़
In reply to अजून काही मुद्दे by Jack_Bauer
'रोज फ्रोज़न फुड खाणे'या
In reply to 'रोज फ्रोज़न फुड खाणे'या by पद्मावति
रोज फ्रोज़न फुड खाणे'या अर्बन मीथ्स वाटतात
In reply to 'रोज फ्रोज़न फुड खाणे'या by पद्मावति
सहमत
पिराताई, तुमचा वरचा प्रतिसाद
In reply to पिराताई, तुमचा वरचा प्रतिसाद by संदीप डांगे
फार फेच्ड नाही बोलताय तुम्ही.
In reply to फार फेच्ड नाही बोलताय तुम्ही. by पिलीयन रायडर
अमेरिका आणि भारताचे युद्ध
संरक्षण खात्यात जन्माने अमेरिकन नसलेले लोक घेतात का?घेत असावेत. पण अगदी खूप वरच्या हुद्द्यावर जाण्यासाठी वेगळे निकष असतील.शेवटी
फार छान विषय आणि त्यावरची
In reply to फार छान विषय आणि त्यावरची by सही रे सई
जपून
In reply to जपून by अनरँडम
अर्थात.. पब्लिक मध्ये नाहीच
In reply to फार छान विषय आणि त्यावरची by सही रे सई
विठोबा आणि रखुमाई
चांगली चर्चा!
My article on experience of coming back
सई शी बर्याच अंशी सहमत (
In reply to सई शी बर्याच अंशी सहमत ( by स्रुजा
लग्नाचय बाबतीत सहमत. ते काही
In reply to लग्नाचय बाबतीत सहमत. ते काही by पिलीयन रायडर
नोकरीच्या जागी सुख
बऱ्याच लोकांनी बरीच मते दिली
In reply to बऱ्याच लोकांनी बरीच मते दिली by शब्दबम्बाळ
माझ्या मनातले मांडले अगदी!
In reply to बऱ्याच लोकांनी बरीच मते दिली by शब्दबम्बाळ
+१
In reply to बऱ्याच लोकांनी बरीच मते दिली by शब्दबम्बाळ
छान...
In reply to छान... by अभिदेश
थोडं जास्त नाही का झालं हे?
In reply to थोडं जास्त नाही का झालं हे? by पिलीयन रायडर
वैयक्तिक
In reply to वैयक्तिक by अभिदेश
तुम्ही कोण मला सांगणारे की
In reply to तुम्ही कोण मला सांगणारे की by पिलीयन रायडर
प्रतिसादातला काही भाग संपादित
In reply to तुम्ही कोण मला सांगणारे की by पिलीयन रायडर
बरं..
हे विश्वचि माझे घर
थोडी वेगळी मते
वाचतोय. उगाचच मनाला लावून न
निर्णय
जर मुलासाठीच निर्णय घ्यायचा
परदेशात कधीही न गेलेला असलो (
अमेरीकेतली नोकरी
In reply to अमेरीकेतली नोकरी by धर्मराजमुटके
और ये लगा सिक्सर....!!! =))
In reply to अमेरीकेतली नोकरी by धर्मराजमुटके
मराठी माणसाचं इन जनरल माहिती
In reply to मराठी माणसाचं इन जनरल माहिती by पिलीयन रायडर
स्वतःचा स्टार्टअप असणार्
In reply to स्वतःचा स्टार्टअप असणार् by रुपी
प्रतिसाद लिहीताना माझ्या
मी मिपाची नवीन सदस्य... ही
In reply to मी मिपाची नवीन सदस्य... ही by Snow White
प्रामाणिक प्रतिसाद आवडला.
वाचतेय..
काही अनुभवाने बनलेली व्यक्तिगत मते
In reply to काही अनुभवाने बनलेली व्यक्तिगत मते by समर्पक
वाह
In reply to काही अनुभवाने बनलेली व्यक्तिगत मते by समर्पक
हा एक नितांत सुंदर व्यनि
In reply to हा एक नितांत सुंदर व्यनि by पिलीयन रायडर
+१
In reply to काही अनुभवाने बनलेली व्यक्तिगत मते by समर्पक
आणि हि जागरूकता नसेल तर
In reply to काही अनुभवाने बनलेली व्यक्तिगत मते by समर्पक
अप्रतिम प्रतिसाद आहे ! हॅट्स
असेच
मस्त चालू आहे चर्चा.
निर्णय घ्यावा आणि त्यानुसार योजना करावी ..
हम्म
हम्म
हम्म
In reply to हम्म by विटेकर
कुडन्ट अॅग्री मोअर.
In reply to कुडन्ट अॅग्री मोअर. by गवि
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+10000
In reply to कुडन्ट अॅग्री मोअर. by गवि
मुलगी अपत्य असली
In reply to कुडन्ट अॅग्री मोअर. by गवि
मला एक कळत नाही की ह्यातलं
In reply to मला एक कळत नाही की ह्यातलं by पिलीयन रायडर
धूळ, पोलुशन, ट्राफिक, दगदग
In reply to धूळ, पोलुशन, ट्राफिक, दगदग by संदीप डांगे
गैरच आहे. पण पर्यायच तेच आहेत
In reply to गैरच आहे. पण पर्यायच तेच आहेत by पिलीयन रायडर
वैयक्तिक निर्णयामागे वैयक्तिक
In reply to मला एक कळत नाही की ह्यातलं by पिलीयन रायडर
मला एक कळत नाही की ह्यातलं
In reply to मला एक कळत नाही की ह्यातलं by गवि
नेमके.
In reply to नेमके. by मराठी_माणूस
बरोबर..
In reply to कुडन्ट अॅग्री मोअर. by गवि
मुलगी अपत्य असली की काही
In reply to मुलगी अपत्य असली की काही by रेवती
१. स्वतःच्या बारातेरा
In reply to १. स्वतःच्या बारातेरा by गवि
या ज्या स्टडीज असतात ना ते "