म्हादूचं घर
प्रेरणा
नक्की कौलारु का छप्पर हे सांगता यायचा नाही. पण सुर्य मात्र पिल्यासारखा तिरपा उगवायचा. अडगळीला एक ठोंबा होता. त्याच्यावर ब्याटरी मारायचा. मग म्हादू उठायचा. अडगळीचा ठोंबा उचलून आईला द्यायचा. मग त्याची आई "लवकर उठलास की रे ठोंब्या" असं म्हणायची.
घराच्या शेजारीच एक मोठा गोठा होता. तिथल्या म्हशीसारखी म्हैस कोणी बघितली नसावी. ती ओट्यावर येऊन पो टाकायची. त्या पो सारखा पो कोणी बघितला नसावा.
पडवीत एक मोठा गणपती होता. येता जाता म्हादू त्याच्या बेंबीत हात घालायचा. गणपतीला ठेवलेला निवद सगळ्यात आधी तोच खायचा. बराच प्रयत्न करुन त्याने तिथला उंदीरही चोरला.
सवंगड्यांना गोळा करुन म्हादू गोट्या खेळायचा. एकदा त्याने एक खिळा आणला आणि बरोबर गणपतीच्या बेंबीत ठोकला. हे कमी म्हणून की काय, त्याने बापाचा वस्तरा आणून म्हैसपण निम्मी भादरली होती.
फारंच आपुलकीच घर होतं ते. त्या घरात काहितरी जादू होती . कारण ते घर म्हादूचं होतं. पण ते एवढ्या लवकर कसं काय पडलं कोण जाणे.
पण त्या बरोबर जगातला सर्वात सुंदर ठोंबा, अतिशय अगम्य आकारात पडलेला म्हशीचा पो, आणि अतिशय आवडीच्या गोट्या, सगळंच हरवलं. आता फक्त वस्तरेच दिसतात स्वप्नात. आणि भादरलेल्या म्हशीच्या आठवणी. फक दॅट.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
नाय आवडल.
आज पहिल्यांदाच मी कुणाच्यातरी
as you wish.!
खल्लास लिहिलंय...
हा हा...
ख्या ख्या
लै भारी
कडक!