✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

म्हादूचं घर

ज
जव्हेरगंज यांनी
Mon, 02/06/2017 - 23:13  ·  लेख
लेख
प्रेरणा नक्की कौलारु का छप्पर हे सांगता यायचा नाही. पण सुर्य मात्र पिल्यासारखा तिरपा उगवायचा. अडगळीला एक ठोंबा होता. त्याच्यावर ब्याटरी मारायचा. मग म्हादू उठायचा. अडगळीचा ठोंबा उचलून आईला द्यायचा. मग त्याची आई "लवकर उठलास की रे ठोंब्या" असं म्हणायची. घराच्या शेजारीच एक मोठा गोठा होता. तिथल्या म्हशीसारखी म्हैस कोणी बघितली नसावी. ती ओट्यावर येऊन पो टाकायची. त्या पो सारखा पो कोणी बघितला नसावा. पडवीत एक मोठा गणपती होता. येता जाता म्हादू त्याच्या बेंबीत हात घालायचा. गणपतीला ठेवलेला निवद सगळ्यात आधी तोच खायचा. बराच प्रयत्न करुन त्याने तिथला उंदीरही चोरला. सवंगड्यांना गोळा करुन म्हादू गोट्या खेळायचा. एकदा त्याने एक खिळा आणला आणि बरोबर गणपतीच्या बेंबीत ठोकला. हे कमी म्हणून की काय, त्याने बापाचा वस्तरा आणून म्हैसपण निम्मी भादरली होती. फारंच आपुलकीच घर होतं ते. त्या घरात काहितरी जादू होती . कारण ते घर म्हादूचं होतं. पण ते एवढ्या लवकर कसं काय पडलं कोण जाणे. पण त्या बरोबर जगातला सर्वात सुंदर ठोंबा, अतिशय अगम्य आकारात पडलेला म्हशीचा पो, आणि अतिशय आवडीच्या गोट्या, सगळंच हरवलं. आता फक्त वस्तरेच दिसतात स्वप्नात. आणि भादरलेल्या म्हशीच्या आठवणी. फक दॅट.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन

प्रतिक्रिया द्या
3239 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

नाय आवडल.

जेपी
Mon, 02/06/2017 - 23:17 नवीन
नाय आवडल. दर वेळेस पो टाकलाच पायजे अस नाय.
  • Log in or register to post comments

आज पहिल्यांदाच मी कुणाच्यातरी

जव्हेरगंज
Mon, 02/06/2017 - 23:30 नवीन
आज पहिल्यांदाच मी कुणाच्यातरी प्रतिक्रियेला फाट्यावर मारत आहे. असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

as you wish.!

जेपी
Mon, 02/06/2017 - 23:47 नवीन
as you wish.! nothing personal.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

खल्लास लिहिलंय...

फेदरवेट साहेब
Tue, 02/07/2017 - 10:28 नवीन
खल्लास लिहिलंय...
  • Log in or register to post comments

हा हा...

मराठी कथालेखक
Tue, 02/07/2017 - 11:41 नवीन
हा हा... बाकी ठोंबा म्हणजे काय ? जमल्यास चित्र टाका
  • Log in or register to post comments

ख्या ख्या

अॅस्ट्रोनाट विनय
Tue, 02/07/2017 - 15:09 नवीन
कवितांचं विडंबन वाचलं होतं आतापर्यंत. तुम्ही तर गद्याचंपण केलं की हो....विडंबन. लघु शंका: दोन्ही आयडी तुमचेच तर नाहीत ना हो :))
  • Log in or register to post comments

लै भारी

Ranapratap
Tue, 02/07/2017 - 19:10 नवीन
लै भारी जव्हेर भाऊ, गावाकडची आठवण आली.
  • Log in or register to post comments

कडक!

आषाढ_दर्द_गाणे
Wed, 02/08/2017 - 00:30 नवीन
'फक दॅट' आठवणिंना होता कि विडंबनाच्या प्रयत्नाला? :) विरामचिन्हविषयक उगाचच दोन शंका - १.
".... पडलेला म्हशीचा पो, आणि अतिशय आवडीच्या गोट्या, सगळंच हरवलं"
इथे शेवटी स्वल्पविराम कि अर्धविराम? मराठीत ह्या विषयी काय नियम आहे? इंग्रजीमध्ये कदाचित इथे अर्धविराम (सेमीकोलन) वापरता गेला/आला असता, नै? २.
".... म्हशीचा पो, आणि अतिशय ..."
त्या 'पो' व 'आणि' मधल्या स्वल्पविरामाच्या प्रयोगाला काही नाव आहे का? इंग्रजीत त्याला 'ऑक्सफर्ड कॉमा' म्हणतात आपण 'पुणेरी अल्पविराम' म्हणूयात का?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा