नक्की कौलारु का छप्पर हे सांगता यायचा नाही. पण सुर्य मात्र पिल्यासारखा तिरपा उगवायचा. अडगळीला एक ठोंबा होता. त्याच्यावर ब्याटरी मारायचा. मग म्हादू उठायचा. अडगळीचा ठोंबा उचलून आईला द्यायचा. मग त्याची आई "लवकर उठलास की रे ठोंब्या" असं म्हणायची.
घराच्या शेजारीच एक मोठा गोठा होता. तिथल्या म्हशीसारखी म्हैस कोणी बघितली नसावी. ती ओट्यावर येऊन पो टाकायची. त्या पो सारखा पो कोणी बघितला नसावा.
पडवीत एक मोठा गणपती होता. येता जाता म्हादू त्याच्या बेंबीत हात घालायचा. गणपतीला ठेवलेला निवद सगळ्यात आधी तोच खायचा. बराच प्रयत्न करुन त्याने तिथला उंदीरही चोरला.
सवंगड्यांना गोळा करुन म्हादू गोट्या खेळायचा. एकदा त्याने एक खिळा आणला आणि बरोबर गणपतीच्या बेंबीत ठोकला. हे कमी म्हणून की काय, त्याने बापाचा वस्तरा आणून म्हैसपण निम्मी भादरली होती.
फारंच आपुलकीच घर होतं ते. त्या घरात काहितरी जादू होती . कारण ते घर म्हादूचं होतं. पण ते एवढ्या लवकर कसं काय पडलं कोण जाणे.
पण त्या बरोबर जगातला सर्वात सुंदर ठोंबा, अतिशय अगम्य आकारात पडलेला म्हशीचा पो, आणि अतिशय आवडीच्या गोट्या, सगळंच हरवलं. आता फक्त वस्तरेच दिसतात स्वप्नात. आणि भादरलेल्या म्हशीच्या आठवणी. फक दॅट.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाय आवडल.
नाय आवडल.
दर वेळेस पो टाकलाच पायजे अस नाय.
आज पहिल्यांदाच मी कुणाच्यातरी
In reply to नाय आवडल. by जेपी
आज पहिल्यांदाच मी कुणाच्यातरी प्रतिक्रियेला फाट्यावर मारत आहे.
असो..
as you wish.!
In reply to आज पहिल्यांदाच मी कुणाच्यातरी by जव्हेरगंज
as you wish.!
nothing personal.
खल्लास लिहिलंय...
खल्लास लिहिलंय...
हा हा...
हा हा...
बाकी ठोंबा म्हणजे काय ? जमल्यास चित्र टाका
ख्या ख्या
कवितांचं विडंबन वाचलं होतं आतापर्यंत.
तुम्ही तर गद्याचंपण केलं की हो....विडंबन.
लघु शंका: दोन्ही आयडी तुमचेच तर नाहीत ना हो :))
लै भारी
लै भारी जव्हेर भाऊ, गावाकडची आठवण आली.
कडक!
'फक दॅट' आठवणिंना होता कि विडंबनाच्या प्रयत्नाला? :)
विरामचिन्हविषयक उगाचच दोन शंका -
१.
इथे शेवटी स्वल्पविराम कि अर्धविराम?
मराठीत ह्या विषयी काय नियम आहे?
इंग्रजीमध्ये कदाचित इथे अर्धविराम (सेमीकोलन) वापरता गेला/आला असता, नै?
२.
त्या 'पो' व 'आणि' मधल्या स्वल्पविरामाच्या प्रयोगाला काही नाव आहे का?
इंग्रजीत त्याला 'ऑक्सफर्ड कॉमा' म्हणतात
आपण 'पुणेरी अल्पविराम' म्हणूयात का?