✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट
ट्रेड मार्क यांनी
Tue, 11/08/2016 - 21:38  ·  लेख
लेख
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत

प्रतिक्रिया द्या
307038 वाचन

💬 प्रतिसाद (1112)

प्रतिक्रिया

कशाला म्हणतात उंटा वरचे शहाणे

सतिश गावडे
Wed, 11/16/2016 - 22:27 नवीन
कशाला म्हणतात उंटा वरचे शहाणे
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

उत्तम

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 11/17/2016 - 10:09 नवीन
अंबानी अडानी व मोठ्या उद्योगपतींना ही आधीच माहित होते वा कळवण्यात आले होते. https://www.youtube.com/watch?v=RuwaFm5bgBs भाजपाच्या आमदाराची कबूली! जे लोक पक्षाला आर्थिक मदत देतात वा विमानाच्या प्रवासाचा खर्च करतात त्यांना नरेंद्र्,अरूण अंधारात ठेवतील हे संभवत नाही असे हे गेल्या आठवड्यातच म्हणाले होते.

असे असेल तर आमच्या गावाच्या

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/17/2016 - 10:32 नवीन
असे असेल तर आमच्या गावाच्या पतसंस्थेत खाते आहे अंबानी चे चेक करावे लागेल किती अब्ज टाकलेत ते.
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, नोटाबंदीचा झटका

हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 11/17/2016 - 10:34 नवीन
माईसाहेब, नोटाबंदीचा झटका बसलेल्यात भाजपचेही आहेत हे लक्षात असू द्यावे!
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

https://www.youtube.com/watch

सतिश गावडे
गुरुवार, 11/17/2016 - 23:20 नवीन
https://www.youtube.com/watch?v=RuwaFm5bgBs
हा व्हिडीओ काढून टाकला आहे =))
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मज्जानु लाईफ..

पुंबा
Sat, 11/19/2016 - 10:57 नवीन
मज्जानु लाईफ..
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

एकंदरीत सरकारचे समर्थक जोरात

शब्दबम्बाळ
गुरुवार, 11/17/2016 - 11:40 नवीन
एकंदरीत सरकारचे समर्थक जोरात दिसत आहेत! म्हणजे त्रास होतोय असे एखाद्याने नुसते म्हटले तरी तो काळा पैसेवाला, देशाभिमान नसलेला, भ्रष्टाचाराच्या विरोधात नसलेला होतोय!! ६ दिवस झाले भारतात येऊन. विमानतळावर नोटा बदलून घेण्याची कोणतीही सोया नव्हती(बंगलोर). तिथल्या अधिकाऱ्यांना विचारल्यावर त्यांनी इथे ATM बंद आहे आणि नोटा बदलून मिळणार नाहीत इतकेच उत्तर दिले! त्यांना प्रधानमंत्री स्वतः अशी सोय देणार बोलले आहेत असे सांगितल्यावर, "हम को मत पूछो" उत्तर मिळाले. विमान पहाटे आल्यामुळे ओला उबेर च्या टॅक्सी ऑनलाईन दिसत नव्हत्या. १-२ तास थांबल्यावर मिळाली आणि मग पुढे निघालो. बरेच लोक याच परिस्थितीत होते पण चिडचिड नाही केली. पैसे काढायची किंवा बदलून घ्यायची घाई नव्हती त्यामुळे उगाच गर्दीत भर नको म्हणून ३ दिवस ATM किंवा बँक इकडे गेलोच नाही. या दरम्यान १०० रुपये होते ते संपले. गेले २ दिवस ATM मधून पैसे मिळत आहेत का बघत आहे २-३ वेळा रांगेत उभा राहिलो पण तिथले पैसे संपल्याने निघावे लागले. बँकेत सांगण्यात आले कि ३:३० पर्यंत नोटा बदलून देणार. आता ऑफिस करू कि पैसे घेऊ हा प्रश्न पडला पण एका मित्राने थोडी दया दाखवून त्याच्याकडचे ३०० रुपये उधार दिले. इथे देखील छोट्या दुकानांमध्ये रोख पैसेच द्यावे लागतात. अगदी काही जीवघेणे संकट नाही आले पण आता निर्णय होऊन जवळपास १० दिवस होत आलेत तरीही रांगा संपत नाहीयेत. शनिवार रविवारी पुन्हा मोठ्या रांगा लागण्याची शक्यता आहे. याला ढिसाळ नियोजन म्हटले तर काही चुकले का? ५०० च्या नोटा काल उपलब्ध झाल्यात म्हणे मग २००० च्या नोटा घेऊन काय व्यापार खेळायचा होता का लोकांनी? १०० च्या इतक्या नोटा आहेत का कि एखाद्याने २००० दिल्यावर सुटे देता येतील. बर इतके सगळे चाललेय त्यात त्या रेड्डीने ५०० कोटी खर्चून मुलीचं लग्न लावून दिल!! बहुतेक सगळा स्वच्छपणे कमावलेला पैसा असेल कदाचित! आणि राजकीय पक्षांमध्ये 'भाजप'वालेच फक्त स्वच्छ राहिलेत ना सध्या... बाकी सगळे चोर लुटारू पण भाजप म्हणजे साधू संतांचा पक्ष असेच चाललंय जणू!

भाजपाच्या

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 11/17/2016 - 15:33 नवीन
भाजपाच्या मण्त्र्याच्या मुलीचे लग्न टी.वी.वर पाहिले रे शब्दबण्बाळा.भाजपा व कॉन्ग्रेसच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.ईतका प्रचण्ड काळा पैसा असणार्या माणसाबद्दल ना भाजपावाले काही बोलत ना कॉन्ग्रेस्वाले. ईकडे ए.टी.एम.च्या लायनीत उभे रहायला त्रास होतो म्हंटले तर हे फडणवीस देशभक्ती शिकवता आहेत जगाला.
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

अश्या लोकांची पक्ष, पक्षातील

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 11/17/2016 - 22:00 नवीन
अश्या लोकांची पक्ष, पक्षातील स्थान, इ कडे दुर्लक्ष करून चौकशी करून, खटला भरून योग्य ती शिक्षा ठोठावायला हवी.
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

बँकेतल्या रांगा.

राही
गुरुवार, 11/17/2016 - 22:22 नवीन
आज बँक ऑफ इण्डियाच्या तीन ब्रॅन्चेसमध्ये कॅशव्यतिरिक्त इतर काही कामांसाठी जावे लागले. तीनही ठिकाणी भल्या मोठ्या रांगा होत्या. विलेपारलेसारख्या सुशिक्षित सुसंस्कृत लोकांच्या वस्तीतही शंभर-दीडशे(अंदाजे) माणसांच्या रांगा होत्या याचे आश्चर्य वाटले. लोक सकाळी सहापासून रांगेत उभे राहातात असे तिथल्या शिपायाने सांगितले. दिंडोशीलाही रांगेने वळणे वळणे (झिग झॅग) घेतली होती. टोकन्स दुपारी १.४५ पर्यंत रांगेत असलेल्यांना मिळतील असा काहीसा बोर्ड लावला होता तो जवळ जाउन वाचण्याचा प्रयत्न गर्दीमुळे केला नाही. पारले येथे एटीएम् बंद होते. रांगेत आपापसात भांडणे होत होती. एनकेजीएसबीची एक ब्रॅन्च दिसली तिथे रांग फारशी नव्हती. आठदहा माणसेच होती.

हेतू

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 11/17/2016 - 23:00 नवीन
सरकारचा हेतू चांगला होता रे राही पण अंमलबजावणी साफ गंडली असे हयांचे मत. नविन नोटा आल्यावर काळा पैश्यावर नियंत्रण कसे येणार हे काही अजूनही कळले नाही.
↩ प्रतिसाद: राही

विलेपारलेसारख्या सुशिक्षित

पुंबा
Sat, 11/19/2016 - 11:17 नवीन
विलेपारलेसारख्या सुशिक्षित सुसंस्कृत लोकांच्या वस्तीतही शंभर-दीडशे(अंदाजे) माणसांच्या रांगा होत्या याचे आश्चर्य वाटले.
हे कळलं नाही. उपरोध असेल तर ठीक आहे. पण नसेल तर,माझे प्रश्न.. सुसंस्कृत लोक रांगा लावत नाहीत? रांगा लावणारे सुसंस्कृत नाहीत? सुसंस्कृत लोकांनीं रांगा लावू नयेत? रांगा लावणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे? बँकेत रांग लागली असेल तरी लोकांनी आपला सुसंस्कृतपणा दाखवण्यासाठी रांगेत उभं राहू नये? माझे मत: रांग हि एक सोय आहे, तिचे फायदे सर्वांना मिळतात जर प्रत्येकाने तिचे नियम पाळले तर. नियम पाळणे, त्यांना बायपास करून आपले काम करून घेणे हे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.
↩ प्रतिसाद: राही

उपरोध?

राही
Sat, 11/19/2016 - 13:55 नवीन
छे छे. उपरोध अजिबातच नाही. मला खरेखुरे आश्चर्य वाटले. कारण रोज सहा वाजल्यापासून मोठ्य सख्येने रांगा लावायला येणे, रांगेमध्ये भांडणे होणे हे मला अधिरेपणाचे(इम्पेशन्स) आणि लोक कावल्याचे लक्षण वाटले. पार्ल्यातले लोक कावतील, इम्पेशन्ट असतील असे वाटले नव्हते. दिन्डोशी, कांदिवलीचा क्राउड वेगळा आहे. तिथे शाब्दिकच काय, प्रत्यक्ष मारामारीसुद्धा घडू शकते. या आणि इतर स्थळांवरच्या चर्चांमध्ये काहींची 'लोकांनी धीर धरायला हवा, उगीच गर्दी करू नये' अशी मते आणि आवाहने वाचली होती. म्हणून.
↩ प्रतिसाद: पुंबा

Adani and Ambani are not

श्रीगुरुजी
Fri, 11/18/2016 - 08:44 नवीन
Adani and Ambani are not standing in the queue to exchange notes. They must have aleady changed all notes. - Kejriwal Couldn't agree more. But Kejriwal, Vadra, Ratan Tata, Narayan Murty'Lalu, Kalmadi, Anna Hajare etc. are not standing in the queue as well to exchange notes. Seems they too were aware of this decision well in advance.

आठवडाभर निष्कारण छळ होऊन आणि

आबा
Fri, 11/18/2016 - 12:29 नवीन
आठवडाभर निष्कारण छळ होऊन आणि 47 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा याला चांगला निर्णय म्हणणारे असंवेदनशिलतेच्याही पलिकडे पोचलेले आहेत. आणि नोटा बदलून काळ्या पैश्यावर नियंत्रण आणू पाहणार्यांच्या बुद्धिसाठी तर मराठी मध्ये विशेषणही नाही

अडीज लाख

राही
Fri, 11/18/2016 - 14:46 नवीन
संततीच्या लग्नासाठी एकदाच अडीज लाख रुपये बँकेतून मिळू शकतील अशी सवलत सरकारने दिली आहे अशी आज किंवा कालची बातमी आहे. या विषयी एक दोन शंका आहेत. तर कुणी जाणकार खुलासा करेल काय? १) हे कर्ज असणार आहे की आपल्याच खात्यातून काढण्याची परवानगी आहे? २)सध्या खातेदाराने मागणी करूनही बँका ठराविक रक्कमच प्रत्येकाला देऊ शकत आहेत, कारण त्यांच्याकडे रोकड नाही. त्या मानाने अडीज लाख ही खूपच मोठी रक्कम आहे; तर ती कशी काय देणार? ३) मुला/मुलीचे लग्न आहे याचा पुरावा काय द्यावा लागेल? ४) समजा लग्न अचानक रद्द झाले किंवा ठरवल्या तारखेस होऊ शकले नाही, पुढे ढकलले गेले, तर पैसे परत बँकेत भरावे लागतील का? प्रश्न प्रामाणिक आहेत. उत्तरही तसेच असावे अशी अपेक्षा आहे.

आता मंगळवाल्यांचीही लग्न

मार्मिक गोडसे
Fri, 11/18/2016 - 14:53 नवीन
आता मंगळवाल्यांचीही लग्न पटापट जमतील.
↩ प्रतिसाद: राही

तुम्ही पुरेसे पैसे असलेल्या

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 11/18/2016 - 18:35 नवीन
लग्नाच्या मान्य पुराव्यासह (पुराव्यासंबंधी बँकेत चौकशी करा) आणि पुरेसे पैसे असलेल्या खात्यावरचा (जास्तीत जास्त रु२.५ लाखाचा) बेअरर चेक द्या, बँक नोटांच्या स्वरूपात चेकवर लिहिलेले पैसे तुम्हाला देईल.
↩ प्रतिसाद: राही

रडारड करणाऱ्या लोकांबद्दल काय

सुबोध खरे
Fri, 11/18/2016 - 19:14 नवीन
रडारड करणाऱ्या लोकांबद्दल काय बोलावे. परवा मी बँकेच्या रांगेत एक तास बसून १३. ५६ ते १४. ५३( होय बँकेने बाहेर प्लॅस्टिकच्या खुर्च्या ठेवल्या होत्या) आपले पैसे भरले. काही जुन्या नोटा होत्या काही नव्या नोटा होत्या.( दोन्ही रुग्णांकडून आलेल्या). सगळं शिस्तबद्ध होतं. बँकेच्या शिपायाने लोकांना पाणी सुद्धा दिलं. तेथे असलेल्या जवळ जवळ १०० लोकांपैकी एकही माणूस बोम्ब मारत नव्हता. तीन वेगवेगळ्या रांगा होत्या. एक पैसे भरण्यासाठी एक पैसे काढण्यासाठी आणि एक नोटा बदली करण्यासाठी. वरिष्ठ नागरिकांना रांग नव्हती. एकदा तुम्ही मानसिक तयारी केली कि काहीही त्रास होत नाही. इंडिया टुडे चा अंक घेऊन गेलो आणि व्हाट्स अँप होतंच. रांगेत आत गेल्यावर एक "प्रिव्हिलेज" कस्टमर मला वेगळी "सोय" हवी, रांगेत उभा राहणार नाही म्हणून फोन वर वाद घालत होता. आणि बँकेच्या कर्मचारी बाई त्यांना शांतपणे असे शक्य नाही म्हणून सांगत होत्या. काही लोक हुच्च्भ्रू असतात आणि त्यांना लोण्यावरच चालायची सवय असते. हा उद्या इंग्रजीत "डीमॉनेटायझेशन" ला शिव्या घालणार असे दिसते.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

शिव्या

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 11/18/2016 - 23:09 नवीन
डीमॉनेटायझेशनला कोणीच शिव्या घालणार नाही. पण जे काही नियोजन होते ते ढिसाळ होते हे मान्य करणार की नाही? रांगेत उभे राहण्याचा व देशप्रेमाचा संबण्ध लावणार्या फडणवीस्,राम माधव ह्या मंडळींबद्दल काय बोलणार? हेच कॉन्ग्रेसच्या राज्यात झाले असते तर हेच लोक 'लोकांकडून पैसा घेऊन तो ईटालीला पाठवत आहेत' म्हणाले असते व आर.बी.आय.समोर रास्ता रोको केले असते.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माईसाहेब

ट्रेड मार्क
Sat, 11/19/2016 - 00:53 नवीन
नियोजन फारसे चांगले नव्हते किंवा करता आले नाही हे मान्य केले तरी १००% लोकांना खूष करेल आणि काही त्रास होणार नाही असे नियोजन कसे करायचे ते सांगा. मुळात क्रियाच बऱ्याच लोकांना त्रासदायक होती त्यामुळे ते दंगा करणार हे गृहीतच आहे. तुमच्या ह्यांना पण फुलप्रूफ प्लॅन विचारा. अजून दोघे तिघे पण प्लॅन देणार होते/ आहेत (त्यांची मुदत उलटून गेली आहे पण आम्ही आशा सोडलेली नाही) तर सगळे मिळून किंवा वेगवेगळे प्लॅन द्या. आपण त्यावर चर्चा करू आणि चांगला असेल तर PMO ला कळवू. कसे?
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

थोडा

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 11/19/2016 - 08:52 नवीन
थोडा त्रास सहन करायला काहीच हरकत नाही रे ट्रेड्मार्का. लोक तो सहन करता आहेतच.काळा पैसा जमवणारे मुख्य्त्वे असतात हॉटेल्वाले,सोनार्,किराणा मालाचे व्यापारी,आय.ए.एस.,आय.पी.एस.,कस्टमवाले. ह्या लोकाण्ची आता अडचण होते की हे लोक २०००च्या नव्या नोटांनी पुनःश्च हरिओम करतात ते येणारा काळ सांगेल.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

माईसाहेब

सुबोध खरे
Sat, 11/19/2016 - 12:54 नवीन
माईसाहेब व्यापारी व्यावसायिक किंवा उद्योजक हे मुळात काळा पैसा जमा का करतात हे पाहिले पाहिजे. मी जर सचोटीने सगळे पैसे बँकेत भरून त्यावर कर भरत असेन पण माझे काम करण्यासाठी माझ्या घामाच्या पैशातून सरकार दरबारी काम करण्यासाठी लाच द्यावी लागत असेल किंवा मला घर घ्यायचे असेल तर तेथे काळा पैस द्यावा लागत असेल तर तो मी कुठून आणायचा? हि घाण साफ झाली तर वरील तीन श्रेणीतील माणसे काळ्या पैशाच्या मागे कमी लागतील. माणूस स्वार्थी आणि लोभी आहे त्यामुळे काही टक्के लोक तरीही कर चुकवेपणा करण्याचा प्रयत्न करणारच. कर भरण्यामुळे कोणता फायदा होणार असेल तर लोक तो भरतील यापेक्षा कर चुकवल्यामुळे आपले काहीच बिघडत नाही हे लक्षात आल्यामुळे लोकांना कर न भरता पैसा घरात ठेवावासा वाटतो. शिवाय आजूबाजूची माणसे मी इतका पैसा कर ना भरता वाचवला हि फुशारकी मारताना दिसतात आणि त्यांचे आतापर्यंत काहीच वाकडे होत नव्हते यामुळे प्रामाणिक माणसाला एक फसवले गेल्याची भावना होती. आता एका फटक्यात अशा लोकांचा तोंडाला फेस आलेला पाहून जे लोक मुळात प्रामाणिक आहेत अशा लोकांना दिलासा मिळाला आहे. असे लोक आपला कर प्रामाणिकपणे भरण्यास नक्की तयार आहेत. येणाऱ्या काळात जर सरकारने काळा पैसा असणाऱ्या लोकांवर सज्जड कारवाई केली तर यातील बरेच लोक परत असा पैसे बाळगण्यास कचरतील. निर्ढावलेले लोक तरीही कर चुकवण्याचा प्रयत्न करतीलच. राहिली गोष्ट खाबू सरकारी अधिकारी, स्मगलर गुंड आणि अंडर वर्ल्डचे लोक यांची त्यांचे उत्पन्न मुळातच अनैतिक आहे त्यामुळे त्यांच्या कडे काळा पैसे येतच राहणार.साकारणे कितीही कार्यवाही केली तरी हे लोक नवीन नवीन भ्रष्ट मार्ग शोधून काढत राहणारच. आणि हा मांजर उंदराचा खेळ अनंत कला पर्यंत चालूच राहील. या लोकांवर किती सक्तीने आणि निष्ठेने सरकार कार्यवाही करेल त्यावर या समांतर अर्थव्यवस्थेत किती काळा पैसे येईल हे अवलंबून असेल. परंतु मानवाची स्वार्थी आणि लोभी वृत्ती जोवर बदलत नाही टोकावर काळा पैसे जमा होणारच. देश भ्रष्टाचार "मुक्त" होईल हे कधीही शक्य नाही. भ्र्रष्टाचार आणि काळा पैसे जितका कमी तितकी देशाची प्रगती जास्त होईल हि वस्तुस्थिती.
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

बँकेत चौकशी

राही
Sat, 11/19/2016 - 12:55 नवीन
बँकेत गर्दी असल्याने कर्मचारी तपशीलवार उत्तरे देत नाहीयेत. शिवाय काही नोटिफिकेशन्स त्यांच्याकडेसुद्धा लगेच पोचत नसावीत. महत्त्वाचे म्हणजे मिपावर लोक आपल्याला माहीत असेल तर त्वरित माहिती देतात. त्यामुळे विचारले. आज मुश्किलीने एका बँकेत प्रवेश मिळवताना बाहेर अशी माहिती मिळाली की ती योजना रद्द केली गेली आहे. अर्थात हे हिअरसे. आतमध्ये गेल्यावर माझे काम संपल्यावर संबंधित अधिकार्‍याला विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याला आधीच काही जणांनी भंडावून सोडल्याचे त्याच्या बोलण्यावरून समजले. अशा बातम्या पेपर आणि टीवीवर आम्हाला समजण्याआधी येतात आणि लगेचच लोक इथे येवून सतावतात, असे काहीसे तो बोलला. आणि बॅंक एका आठवड्यात जास्तीत जास्त २४००० (चौवीस हजार) देते आहे हे तिथे कळले. कदाचित ही चौवीस हजारांची बातमी अगोदर प्रसिद्ध झाली होतीही असेल.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

ता. क.

राही
Sat, 11/19/2016 - 12:58 नवीन
डॉक्टर साहेब,(सुहास म्हात्रे) बँकेतून पैसे कसे काढावे याचे मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.
↩ प्रतिसाद: राही

मी आज माझ्या युको बॅन्कमध्ये

निओ१
Sat, 11/19/2016 - 01:07 नवीन
मी आज माझ्या युको बॅन्कमध्ये दुपारी गेलो, विचारले थोडी रक्क्म हवी आहे कशी काढता येईल, एटीएम बंद आहे. त्या ताईंनी एक फॉर्म दिला व म्हणाली द्या भरून. दिले, हवे असलेले पैसे मिळाले व मी बाहेर आलो. शुन्य गर्दी! परत आत आलो व विचारले की येथे गर्दी कशी नाही? उत्तर मिळाले, तुम्ही उशीर केलात, २-३ दिवस आधी आला असता तर... असे म्हणत फुठलेल्या काचेच्या दरवाज्याकडे बोट दाखवले व एका कर्मचारीच्या हातातवर असलेल्या जख्मेवर. काहीच न बोलतो बाहेर आलो व परत मनात आले म्हणून परत गेलो व सर्वांना एकू जाईल या आवाजात म्हणालो, तुम्ही लोकांनी या काही दिवसात खूप कष्ट व खूप काही भोगले असेल, त्याबद्दल मी समाजाच्यावतीने माफी मागतो व प्लीज याबद्दल लोकांच्या बाबतीत राग मनात ठेऊ नका. जश्या तुम्हाला अडचणी येत आहेत, त्यापेक्षा जास्त इतरांना देखील येत आहेत. बाकी अजून काही लिहणे योग्य नाही.

संदिप डांगे,

मोदक
Sat, 11/19/2016 - 01:35 नवीन
संदिप डांगे, लोकांची दिशाभूल कोण करत आहे आणि असंबद्ध प्रतिसाद कोण देत आहे हे नोटा बंदी व परिणाम या धाग्यात उघडकीस आले आहेच त्यामुळे "आपण काय लिहीत आहोत याचा विचार करून प्रतिसाद लिहावेत" हा सल्ला आणखी एकदा देत आहे. सर्वप्रथम, हा देश कुणाच्या एकाच्या मालकीचा नाही. सर्वांचा आहे. सर्वांचाच या देशावर समान हक्क आहे. 10%-90% अशी विभागणी करणे देशभक्तीचे ठिसूळ दृश्य उभे करत आहे हे ध्यानात घ्यावे. येथे १०%-९०% अशी विभागणी कोणी केली..? तुम्ही केलीत. तुम्ही ही विभागणी 'होणार्‍या त्रासाच्या अनुषंगाने' केली. हे ही मान्य. मात्र नंतर दोन दोन प्रतिसादात लिहिलेले वाक्य "१०% लोकांना त्रास होतो आहे ही परिस्थिती कोणीच नाकारणार नाही." हे तुम्ही वाचले नाहीत की सोयीस्कररीत्या याकडे दुर्लक्ष केलेत..? त्यामुळे सुरूवातीला आपण विभागणी करायची आणि त्यावरील प्रतिवादाचे उत्तर स्वतःकडे नसेल तर देशभक्ती पणाला लावून "संविधान खतरे में..!" अशा आरोळ्या देण्याचे कारण कळाले नाही. "देशाच्या सर्व नागरिकांच्या सोयीसुविधांची जबाबदारी सरकारची असते, ह्यात सरकार कुठेही कमी पडत असेल तर त्याचा जाब विचारण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे. त्यात सरकारी निर्णयामुळे कुणाचीही कसलीही गैरसोय होऊ नये हे बघणे सरकारचे काम आहे, त्यात काहीही कमतरता येत असेल तर त्याबद्दल जाब विचारणे नागरिकांचा हक्क आहे, ह्यात कोणतेही % मांडू शकत नाही. सहमत - म्हणूनच तुम्ही १०% - ९०% अशी विभागणी करणे अयोग्य आहे. सरकार आपल्या वचनबद्धतेत कुठेतरी कमी पडतंय म्हणून त्याला देशभक्ती, ग्रेटर गुड अशा गोडगोड दिशाभूल करणाऱ्या शब्दांनी झाकण्याचा प्रयत्न करणे ही सरकारची संवेदनशीलता, जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा नसल्याचे लक्षण आहे. अशा सरकारला समर्थन करणारे नागरिकही तितकेच असंवेदनशील म्हणवले जातील यावर थोडा विचार करून प्रतिसाद देईन - इसे उधार रखिये. "अशा सरकारला किंचितही विरोध करणारे, किंवा सरकारी पक्षाच्या विचारसरणीला विरोध करणारे हे राष्ट्रद्रोही, आतंकवादी-नक्षलवाद्यांचे पाठीराखे, गैरव्यवहाराला समर्थन देणारेच आहेत असा कांगावा करणे, त्यांनी मांडलेले मुद्दे हे निरर्थक रडारड आहेत असा उच्चरवात सतत बोलत राहणे हे लोकशाहीस खचित उत्तम नाही. लोकशाही व्यवस्थेत विरोधकही ह्याच देशाचे नागरिक आहेत, त्यांनाही जगण्याचा, आपले मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे, ते मांडत असलेले मुद्दे हे उचित असो वा नसो त्यांना तो मांडण्याचा अधिकार आहेच" कोण कांगावा करत आहे..? "तुम्ही मांडलेल्या एकांगी विचारांचा आम्ही केलेला प्रतिवाद म्हणजे कांगावा" असे काही आहे का..? तुम्ही दिलेल्या रवीश कुमारच्या बातमीचे म्हात्रे सरांनी परिक्षण केले, ट्रक ड्रायव्हरकडे असलेल्या २० लाखाचा पंचनामा झाला. बँकेत लावलेल्या पत्रकाचा फायदा घेऊन तुम्ही केलेली दिशाभूल उघडकीस आली आणि असंबद्ध लिंकांचाही लोकांनी समाचार घेतला म्हणून तुम्ही असले भावनीक आवाहन करून सहानुभूती गोळा करत आहात का..? तुम्हाला मुद्दे मांडण्यापासून कोणी अडवले आहे..? "डांगे तुम्ही आणि तुम्ही मांडलेले मुद्दे फ्रॉड आहेत, काँग्रेसचे दलाल नकोत मिपावर" अशी भाषा कोणी वापरली आहे का..? (ही भाषा तुम्ही पूर्वी वापरली आहे, त्यावेळी तुमच्या मतांच्या विरोधकांचे नागरिकत्व, देशाशी बांधिलकी, मत मांडण्याचे हक्क वगैरे गोष्टी सोयीस्कररीत्या विसरला होतात का..?) ह्या देशातल्या 125 कोटी नागरिकांमधल्या एकाही नागरिकाला सरकारी धोरणामुळे गैरसोय होत असेल तर सरकार त्या जबादारी पासून अंग चोरून घेऊ शकत नाही. सहमत. तुम्ही तिघेही ज्यापद्धतीने हि मांडणी करत आहात ते बघता अल्पसंख्य मतांना, त्यांच्या जीवनाला कोणतेच महत्त्व नाही असा भयावह विचार आंतरप्रवाही दिसत आहे. हे एक प्रचंड काळजीचे लक्षण आहे. किती खोटेपणा करणार आहात डांगे..? ही असली भावनीक आव्हाने अश्रू ढाळत कॅमेर्‍यासमोर केली असती तर थोडा टीआरपी तरी मिळाला असता. मिपासारख्या फोरमवर काय उपयोग नाही असल्या नक्राश्रूंचे. ;) अल्पसंख्यांकांच्या जीवाला कोण किंमत देत नाहीये..? अल्पसंख्यांकांच्या मतांचा अनादर म्हणजे लगेच त्यांना कापून काढावे अशी काही थिअरी तुम्ही बनवली आहे का..? मुळात मी हेच विचार मांडत आहे की तुम्ही केलेल्या १०%-९०% विभागणीमध्ये जर १०% लोकांना त्रास होत असेल तर त्यासाठी ९०% लोकांच्या अधिकारावर / हक्कावर गदा आणणे चुकीचे आहे. १०% लोकांचे त्रास दूर करणे सरकारचेच काम आहे पण ९०% लोकांना त्रास होत नसेल तर तो का होत नाहीये याचा विचार १०% लोकांनीही करणे आवश्यक आहे. विशेषतः सरकारने शक्य त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही जर त्याचा उपयोग करून न घेतल्याने १०% लोकांना त्रास होत असेल तर याची जबाबदारीही सरकारची कशी काय असणार आहे..? येथे मी किंवा म्हात्रे सरांनी किंवा खरे साहेबांनी कोठेही १०% लोकांना त्रास नाकारला आहे का..? किंवा त्यांनी त्रासाची तक्रार करू नये असे कोठेही प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरीत्या ध्वनीत केले आहे का..? १०% लोकांना त्रास होत आहे या गृहीतकाची दुसरी बाजू "९०% लोकांना त्रास होत नाहीये" हे तुम्ही सोयीस्कररीत्या विसरत आहात का..? (तुमचे रेल्वेचे उदाहरण इथे लागू करून वरील प्रतिसाद आणखी एकदा वाचलात तरी चालेल.) भाजपने काँग्रेसच्या प्रत्येक धोरणाचा कडाडून विरोध केलेला आहे, आधार, मनरेगा, एफडीआय, इत्यादी. हि काही फार 1857ची गोष्ट नाही, गेल्या दहा-बारा वर्षातलीच. तेव्हा काँग्रेसच्या प्रत्येक धोरणाला विरोधक म्हणून विरोध करणारा भाजप हा देशद्रोही, इत्यादी नव्हता काय, आज तेच सारे निर्णय नाव बदलून किंवा कायम ठेवून भाजप सरकार काम करत आहे. कारण हे सर्व भारतासाठी आहे, कोण्या पार्टीच्या समर्थक विरोधकांसाठी नाही. दुसऱ्या कोणाही विरोधी पार्टीच्या समर्थकांना थेट देशद्रोही, देशाच्या भल्याच्या विरोधात म्हणणे हे अतिशय संकुचित विचाराचे व अधीर भीतीचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत ग्रेटर गुड, देशभक्तीच्या संकल्पना बेगडी आणि फक्त स्वार्थी असतात. ओके.

प्रतिसाद वाचल्याची नोंद!

संदीप डांगे
Sat, 11/19/2016 - 01:41 नवीन
प्रतिसाद वाचल्याची नोंद!
↩ प्रतिसाद: मोदक

तर्काची कमाली(नी)ची निसटती बाजू

माहितगार
Sat, 11/19/2016 - 12:03 नवीन
सरकार आपल्या वचनबद्धतेत कुठेतरी कमी पडतंय म्हणून त्याला देशभक्ती, ग्रेटर गुड अशा गोडगोड दिशाभूल करणाऱ्या शब्दांनी झाकण्याचा प्रयत्न करणे ही सरकारची संवेदनशीलता, जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा नसल्याचे लक्षण आहे. अशा सरकारला समर्थन करणारे नागरिकही तितकेच असंवेदनशील म्हणवले जातील
संदिपरावांचे सर्व प्रासंगिक प्रतिसाद आणि चर्चा वाचलेल्या नाहीत त्यामुळे माझ्या या प्रतिसादात उणीव राहू शकते नाही असे नाही पण ढोबळ मानाने संदिपराव मोदी सरकारच्या निर्मुल्यकरणाचा निर्णय किंवा त्याची अंमलबजावणी या बद्दल साशंक असावेत. भारतातील निरक्षरता आणि साधनांची कमतरता हे त्यांचे मुद्दे समजण्यासारखे आहेत नाही असे नाही. पण संदिपरावांच्या वरील परिच्छेदातून व्यक्त होणारा मोदी सरकारवरील बेजबाबदारीचा आरोप तर्कावर टिकतो का या बद्दल साशंकता वाटते. बेजबाबदारी कशास म्हणावे ? जबाबदारी न घेण्यास अथवा जबाबदारी न निभावण्यास; जिथपर्यंत नरेंद्र मोदी सरकारची चलन निर्मुल्यनाची कृती केवळ जबाबदारी घेणारीच नव्हे तर त्यांच्या पक्षाच्या व्यावसायिक वर्गासही ह्या निर्णयाचा फटका बसू शकतो त्यांच्या भविष्यातील पाठींब्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तरीही देश हिताचा निर्णय घेण्याची जबाबदारी घेतलेली दिसते, जगाच्या इतिहासातील कदाचित आता पर्यंतच्या सर्वात मोठ्या निर्मुल्यन कार्यात अडचणी आल्या असतील तर त्यात नवल नाही पण अडचणी निवारण्यात यंत्रणेत यशापयशही येईल पण म्हणून त्यांनी जबाबदारीच नाकारली आहे असा सरसकट अर्थ कसा काढता येतो आणि सरकारला बेजबाबदार कसे ठरवता येते हे उमगलेले नाही.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

प्रतिसादाची नोंद घेतली आहे!

संदीप डांगे
Sat, 11/19/2016 - 13:03 नवीन
प्रतिसादाची नोंद घेतली आहे!
↩ प्रतिसाद: माहितगार

धाग्याचे १००० व्हावे हीच

jp_pankaj
Sat, 11/19/2016 - 11:44 नवीन
धाग्याचे १००० व्हावे हीच गांधी बाबा चरणी प्रार्थना. बाकी सगळ्यांना माझ्यासारख्या गरीबाकडुन सत्कार भेट. Image removed.

चायनीज मालांच्या किमतीवर परिणाम

दुर्गविहारी
Sat, 11/19/2016 - 17:34 नवीन
एक नवलाची बातमी Make in india will boom नोटांवरील बंदीमुळे चायनीज मालांच्या किमती वाढल्या. हा एक नवीनच पैलु समोर आला आहे.

नोटबंदीमुळे CCD बरिस्ता

साधा मुलगा
Tue, 11/29/2016 - 13:21 नवीन
नोटबंदीमुळे CCD बरिस्ता स्टारबक्स, आणि overpriced मल्टिप्लेक्स आणि तेथील खाद्यपदार्थ यावर फरक पडला का हो? मला तर येथे येणारे सर्व पब्लिक कडे नं. २ चा पैसे आहे असे राहून राहून वाटते. ५-१० रुपयाची कोफि चक्क १५०-४०० च्या रेंज मध्ये लावणे आणि लोक त्यावर खर्च करणे आणि फेसबुक वर प्रदर्शन करणे हे काही समाजत नाही, कि उगाच फुकाचा स्टेटस सिम्बॉल?

नोटबंदीमुळे

महेन्द्र ढवाण
Sun, 12/04/2016 - 19:02 नवीन
दिनांक ८ ला विमानतळावर उतरलो रात्री ११.३० ला समजले ५०० व १००० च्या नोटा बंद आहेत , थोडे रियाल बदलून घेतले आरामात पुण्यात पोहचलो , १५ ला बँकेत गेलो जवळील सर्व ५०० व १००० बँकेत जमा केले व अकाउंट मधून २४००० काढले , गर्दी अजिबात नव्हती , बँकेने १०,२०, ५० च्या सुट्ट्या नोटात पैसे दिले अजिबात त्रास झाला नाही .

११ pages फक्त ??

अभिजित - १
Sat, 08/18/2018 - 18:00 नवीन
भक्तांनी सत्य स्वीकारायला नकार देऊन जोरदार धुमाकूळ घातला !! पण श्री नमो यांनी १५ ऑगस्ट 2018 ला जे निवडणुकी पूर्वी शेवटचे म्हणून जे भाषण केले त्यात या महान नोटबंदीचा उल्लेख हि केला नाही ?? देशाचे १.२८ लाख कोटी ( cost of demonetization ) पाण्यात घालवले. निष्पन्न काय ? एक मोठठे शून्य !! https://www.loksatta.com/agralekh-news/pm-narendra-modi-speech-from-red-fort-on-72nd-independence-day-1732145/ या भाषणात पंतप्रधानांनी आपल्या गेल्या चार वर्षांतील यशदायी योजनांचा, निर्णयांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते योग्यच. परंतु त्यात निश्चलनीकरणाचा मुद्दा मात्र सुटून गेला, असे दिसते. हे अनवधानाने झाले की या निर्णयाचा अपेक्षित लाभ दिसून न आल्यामुळे त्याचा उल्लेख टाळला, हे समजणे अवघड. परंतु निश्चलनीकरणाची अनुपस्थिती लक्षणीय होती. त्याचप्रमाणे गेल्या तीन भाषणांत असलेला भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या ‘यशा’चाही उल्लेख पंतप्रधानांच्या यंदाच्या भाषणात नव्हता. --------------------------------------------- आता इथेच थांबा रे बाबानो .. नाहीतर मोदी बोलले नाहीत नोटबंदी बद्दल म्हणून काय झाले ? ती यशस्वी झाली म्हणजे झालीच करून वाद वाढवू नका. केवळ एक पूर्वानुलोकन म्हणून हा जुना टॉपिक वर आणलाय. कोणाच्या जखमेवर मीठ चोळायला नाही हे नीट लक्षात घ्या :) :) आपले लोक असेच आहेत. त्यांनी नोटबंदी हणून पाडली वगैरे बोलू नका. जनते तुन आलेल्या नेत्याला आपली जनता कशी आहे ? काय करू शकते ? हे पूर्ण माहित पाहिजे . इतके मोठे निर्णय घ्या पूर्वी .

Income Tax collection in the

सुबोध खरे
Sat, 08/18/2018 - 18:32 नवीन
Income Tax collection in the country stood at a record Rs 10.03 lakh crore. during 2017-18 a record number of 6.92 crore I-T returns were filed, which was 1.31 crore more than 5.61 crore returns filed in 2016-17. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/65441783.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst हे कशामुळे झालं म्हणायचं? कदाचित लोक स्वतःहून प्रामाणिक झाले असावेत. बेंबट्या हिंदुस्थानी लोकांच्या ढुंगणावर हंटरच पाहिजे-- इति पु ल
↩ प्रतिसाद: अभिजित - १

उगाच पु ल , व पु इ इ मोठ्या

अभिजित - १
Sat, 08/18/2018 - 18:42 नवीन
उगाच पु ल , व पु इ इ मोठ्या साहित्यिकांची वचने उद्धृत केली कि आपण काढलेल्या चुकीच्या / अर्धवट निष्कर्ष ना पण एक नैतिक अधिष्ठान प्राप्त होते , असे तुम्हाला वाटत असेल तर बर बुवा , तसेच ..
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आमचा निष्कर्ष साफ चूक आहे असं

सुबोध खरे
Sat, 08/18/2018 - 20:45 नवीन
आमचा निष्कर्ष साफ चूक आहे असं समजा आणि पुलंचं हि सोडून द्या. नैतिक अधिष्ठानहि बाजूला ठेवू पण आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत २३% वाढ कशामुळे झाली आणि जवळ जवळ १७ % अधिक कर मिळकत कशामुळे वाढली हे सांगता येईल का? (हे आकडे सर्व वृत्तपत्रात उपलब्ध आहेत). भारतीय लोकांना एकदम उपरती झाली आणि ते लगेच प्रामाणिकपणे आयकर भरायला लागले काय?
↩ प्रतिसाद: अभिजित - १

२०१६-१७ मध्ये १५-१६च्या

नितिन थत्ते
Sat, 08/18/2018 - 21:02 नवीन
२०१६-१७ मध्ये १५-१६च्या तुलनेत मोठी वाढ दिसते आहे पण १५-१६ मध्ये अ‍ॅक्च्युअली पर्सनल इन्कमटॅक्स कलेक्शन १४-१५ पेक्षा कमी झाले होते. २०१४-१५ च्या १८८३ बिलियनच्या तुलनेत १६-१७ मधील २१५० बिलियनचे कलेक्शन फार वाढलेले नाही.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भारतीय लोकांना एकदम उपरती

मार्मिक गोडसे
Tue, 08/21/2018 - 12:12 नवीन
भारतीय लोकांना एकदम उपरती झाली आणि ते लगेच प्रामाणिकपणे आयकर भरायला लागले काय? ह्यापूर्वी आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ कधीच झाली नव्हती का? घट वाढ होतच असते. नोटबंदीचे मुख्य उद्दिष्ट करदाते वाढवणे हाच असेल ,तर करदाते वाढविण्यासाठी ह्या सरकारने नोटबंदी पूर्वी काय प्रयत्न केले? किंवा भविष्यात कोणते मार्ग अवलंबले जाणार आहेत? की प्रत्येकवेळी नवीन करदाते वाढविण्यासाठी नोटबंदी हाच पर्याय वापरणार? (तसा समज करून घेतल्यामुळे) नोटबंदीची मुख्य उद्दिष्टे साध्य करण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे हे स्पष्ट झाल्याने मोदी आता कुठेही नोटबंदीचा उल्लेख करत नाहीत.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

घट

सुबोध खरे
Tue, 08/21/2018 - 19:14 नवीन

घट

वाढ होतच असते. हायला गोडसे बुवा तुम्ही एवढा मोठा विनोद कराल असे वाटले नव्हते. १९४७ साली आपली लोकसंख्या ३६ कोटी होती आता ती साडे तीन पट झाली आहे. शिवाय भारताची आर्थिक प्रगती पण बऱयापैकी झाली आहे असे असूनही आपण आयकर दात्यांच्या संख्येत घट वाढ होतच असते म्हणताय ह ह पु वा बाकी आपला एकंदर प्रतिसाद हास्यास्पदच आहे तेंव्हा तो सोडूनच देऊ या आपला एकंदर प्रतिसाद म्हणजे पूर्वग्रहदूषित आणि अभ्यासाविना केलेले आरोप आहेत त्यामुळे मी आपल्या कोणत्याच वाक्याचा प्रतिवाद करु इच्छित नाही.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

असे असूनही आपण आयकर

मार्मिक गोडसे
Tue, 08/21/2018 - 19:50 नवीन
असे असूनही आपण आयकर दात्यांच्या संख्येत घट वाढ होतच असते म्हणताय दरवर्षी करदात्यांच्या वाढीचा दर हा कायम चढाच राहील असं तुमचं गृहितक असेल तर धन्य आहे. अडचणीच्या प्रश्नांना बगल देण्याची कला आत्मसात केल्याबद्दल अभिनंदन.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी आपल्या कोणत्याच वाक्याचा

सुबोध खरे
Tue, 08/21/2018 - 20:20 नवीन
मी आपल्या कोणत्याच वाक्याचा प्रतिवाद करु इच्छित नाही.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

पुन्हा हास्यास्पद तर्क

ट्रेड मार्क
Sun, 08/19/2018 - 06:46 नवीन
नोटबंदी फेल झाल्यामुळे त्याचा उल्लेख केला नाही हा तर्क पण हास्यास्पद आहे. खरे साहेबांनी लिहिल्याप्रमाणे कधी नव्हे ते करवसुलीत बरीच वाढ झाली आहे. शेल कंपन्या बंद झाल्या, त्याचे कर्ते करविते जाळ्यात अडकले. सामान्य माणसाला याचा त्रास झाला हे कोणीच नाकारत नाहीये. पण म्हणून सरसकट फेल झाली असे म्हणणे चुकीचे आहे. तसेच फक्त नोटबंदी हे एक कृती घेऊन मोजमाप न करता त्याच्या पाठोपाठ आलेल्या जीएसटी चा निर्णय हे दोन्ही किंबहुना तुमच्या दुसऱ्या धाग्यात चर्चिले जात असलेले FRDI बिल हे सगळे विचारात घ्यायला पाहिजे. आता निवडणूक फार लांब नाही. तुम्ही मोदींना मत देणार नाही हे तर स्पष्टच आहे, पण बाकी जनता काय म्हणते ते त्या निकालातून कळेलच. पण एक मित्रत्वाचा सल्ला देतो. व्यक्तीद्वेष करू नका, कारण त्यामुळे त्या व्यक्तीच्या सगळ्याच कृती चुकीच्या वाटू लागतात. तुमच्या बहुतांशी लेखांतून व प्रतिसादांमधून तुमचा मोदीद्वेष दिसून येतो. कुठलीच गोष्ट पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट असत नाही.
↩ प्रतिसाद: अभिजित - १

करवसुलीतील वाढ ही नोटबंदीमुळे

नितिन थत्ते
Sun, 08/19/2018 - 08:31 नवीन
करवसुलीतील वाढ ही नोटबंदीमुळे किती आणि जीएसटीमुळे किती? जीएसटीच्या फॉरवर्ड बॅकवर्ड इंटिग्रेशनमुळे आणि क्रेडिट मिळवण्याचे बर्डन अ‍ॅसेसीवर टाकल्यामुळे करसंकलनात वाढ झाली. हे जीएसटीचे क्रेडिट आहेच. पण ते क्रेडिट नोटबंदीचे म्हणून दाखवण्यासाठी जीएसटी घाईघाईने राबवण्यात आला.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

धन्यवाद नितीन थत्ते सर !!

अभिजित - १
Sun, 08/19/2018 - 17:23 नवीन
धन्यवाद नितीन थत्ते सर !!
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

शेल कंपन्या बंद झाल्या, त्याचे कर्ते करविते जाळ्यात अडकले. ???

अभिजित - १
Sun, 08/19/2018 - 17:55 नवीन
पैसे पांढरे केले आणि कंपन्या बंद केल्या किंवा टॅक्स फाईल करणे बंद केले इतकेच झाले आहे. मुख्य कर्ता कधीच शेल कंपनीचा डायरेक्टर नसतो. तो काही बकरे गाठतो. त्यांना डायरेक्टर बनवतो. त्यांना महिना काही पैसे देतो. ते पण खुश , कर्ता ( झोल मास्टर ) पण खुश. जरा माहिती घ्या. कोणी अनुभवी माहितगार CS कंपनी सेक्रेटरी शी बोला. तोच फक्त तुमचे भाबडे समज दूर करू शकतो. निरव मोदी ने हेच केले, पेपर मध्ये आले होते. आत्ता लिंक मिळत नाहीए. पण दुसरी तशीच लिंक खाली ( second link ) देतो. ती वाचा. हे सगळे प्रकार फार पूर्वी पासून चालत आले आहेत. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/govt-identifies-16-5k-entities-as-shell-companies-another-80000-under-lens/articleshow/64515593.cms (RoCs) have identified and removed the names of 2.26 lakh companies with close to 3.1 lakh directors getting disqualified. Another 2.26 lakh companies have been identified for not filing returns. पैसा फिरवून झाला. काम झालं. कंपनी बंद करायची असेल तर CS कडे जाऊन form भरावे लागतात. विविध सोपस्कार असतात. त्याला पैसे पडतात !! त्या पेक्षा सोडून द्या. नाहीतरी डायरेक्टर्स डमी, regd ऑफिस पण डमी !! https://www.firstpost.com/politics/gadkaris-purti-group-gets-murkier-driver-is-director-of-six-companies-499380.html Gadkari's Purti group gets murkier: driver is director of six companies
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

अरे वा

ट्रेड मार्क
Wed, 08/22/2018 - 00:35 नवीन
मुख्य कर्ता कधीच शेल कंपनीचा डायरेक्टर नसतो. तो काही बकरे गाठतो. त्यांना डायरेक्टर बनवतो. त्यांना महिना काही पैसे देतो. ते पण खुश , कर्ता ( झोल मास्टर ) पण खुश. जरा माहिती घ्या. झोल मास्टरबद्दल बरीच माहिती दिसतेय. तिकडे FRDI च्या धाग्यावर पण जरा आपले ज्ञानकण पसरवा. तर गेली कित्येक वर्षे या कंपन्यांमार्फत बेनामी व्यवहार बोनभोबाट चालू होते का नाही? आता मोदी काकांनी काहीतरी उद्योग करून यावर उपाय करायचा प्रयत्न केला. आता काहींच्या मते काही निर्णय चुकीचे असतील. पण जर सगळे निर्णय, म्हणजे नोटबंदी, जीएसटी, रेरा वगैरे सगळ्यांचा एकत्रित परिणाम बघितला तर काय चित्र दिसतंय? २-३ तिमाही जीडीपी खाली गेला होता पण नंतर वर आला. घरांच्या बेसुमार वाढणाऱ्या किमती स्टेबल किंवा थोड्याफार कमी तरी झाल्या. बँकेतले व्यवहार वाढले. जरी ९९% पैसे बँकेत परत आले असतील तर त्याचा अर्थ काय होतो? रिझर्व्ह बँकेकडे त्यांनी किती नोटा बाजारात पाठवल्या आहेत त्याची नोंद असते. समजा यातील ७० टक्केच नोटा चलनात असतील, म्हणजे बाकी कुठेतरी दडून बसलेल्या असतील तर? या ३०% पैश्यांचा उपयोग फक्त टेरर फंडिंग मध्ये नसून बाकी कितीतरी अनैतिक गोष्टींमध्ये होत असतो उदा. अवैध लॉटरी/ सट्टा, अवैध दारू, बेनामी प्रॉपर्टीचे व्यवहार, स्थानिक गुंडगिरी, कर चुकवेगिरी ईई. जर १००% वाटलेल्या नोटांपैकी ९९% परत आल्या म्हणजे हे दडून बसलेले धन परत लीगल सिस्टिम मध्ये आले ना? अर्थात याच्या मुळे हे सगळे अवैध धंदे संपूर्णपणे बंद झाले का? तर नक्कीच नाही. जे काही बंद झाले ते कायमचे बंद झाले का? तर नक्कीच नाही. कारण हा चोर पोलिसांचा खेळ आहे तो अनंत काळापर्यंत चालूच राहणार. पण म्हणून मग पोलिसांनी कारवाई करणे थांबवावे का? आता निदान या २-३ निर्णयांमुळे थोडी फार तरी जरब बसली असेल? ऑपेरेशन करताना डॉक्टरने कट दिल्यावर जर कोणी म्हणू लागले की हे काय तू तर नुसताच कट दिलाय, तर ती प्रिमॅच्युअर कमेंट असेल ना? संपूर्ण ऑपेरेशनचा परिणाम बघायला पाहिजे. तसेच ऑपरेशन झाल्यानंतर थोडा काळ त्रास होणारच. पण एकदा रिकव्हरी झाली की मग तब्येत वेगाने सुधारते. आता कॅन्सरचा पेशंट असेल तर ऑपरेशन करून, रेडिएशन देऊनहे जर योग्य ती काळजी घेतली नाही तर तो परत उद्भवणारच. मग परत ऑपरेशनची गरज भासू शकते. बाकी मी काही दुवे वगैरे देणार नाही कारण ते तुम्ही योग्य ते कीवर्डस टाकले की गूगलमध्ये मिळतात. Bad effects of demonetization असं टाकण्याऐवजी effects of demonetization असा टाकलं की बरेच पॉसिटीव्ह आणि निगेटिव्ह धागे मिळतील. सगळ्याचा नीट अभ्यास करा आणि मग जर तरी मोदी चुकलेच आहेत अश्या मतावर तुम्ही ठाम असाल तरी ठीकच आहे. मोदी आपल्या कर्माची फळे भोगतीलच!
↩ प्रतिसाद: अभिजित - १

कोणाला समजवताय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/19/2018 - 10:22 नवीन
भक्तांनी सत्य स्वीकारायला नकार देऊन जोरदार धुमाकूळ घातला !! पण श्री नमो यांनी १५ ऑगस्ट 2018 ला जे निवडणुकी पूर्वी शेवटचे म्हणून जे भाषण केले त्यात या महान नोटबंदीचा उल्लेख हि केला नाही ?? देशाचे १.२८ लाख कोटी ( cost of demonetization ) पाण्यात घालवले. निष्पन्न काय ? एक मोठठे शून्य !!
एकवेळ दोनहजाराच्या नोटेत चीप सापडेल पण भक्तांच्या डोक्यात मेंदू सापडणे अशक्य आहे. काहीही उपयोग नाही. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: अभिजित - १

एकवेळ दोनहजाराच्या नोटेत चीप

गब्रिएल
Sun, 08/19/2018 - 13:00 नवीन
एकवेळ दोनहजाराच्या नोटेत चीप सापडेल पण भक्तांच्या डोक्यात मेंदू सापडणे अशक्य आहे. यकदम बर्रोबर डॉसायेब. मलाबी त्येच वाटून र्‍हायतंय बगा पप्पूभक्त बगून ! पप्पूभक्त भ्येटला की मी त्येला तुजा पोरगा बी पप्पूसारकाच ग्र्येट व्हवू दे म्हंतो. तेवा ते रागानं काळंनिळं व्हत्यात. काब्रे ?! ;)
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • «
  • ‹
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा