✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट
ट्रेड मार्क यांनी
Tue, 11/08/2016 - 21:38  ·  लेख
लेख
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत

प्रतिक्रिया द्या
307040 वाचन

💬 प्रतिसाद (1112)

प्रतिक्रिया

ठरलं तर मग

ट्रेड मार्क
Mon, 08/20/2018 - 22:46 नवीन
मोदींनी लालकिल्ल्यावरच्या भाषणात नोटबंदीचा उल्लेखही केला नाही, त्यामुळे नोटबंदी फेल झाली यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याची शिक्षा म्हणून २०१९ मध्ये कोणीही भाजपाला मतदान करू नये. आम्हाला कित्येक लाख कोटी भ्रष्टाचारामुळे राजकारण्यांच्या खात्यात गेले तरी चालतील पण यापुढे मोदी आणि भाजप नको.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुठला तरी (काल्पनिक?)

नितिन थत्ते
Tue, 08/21/2018 - 06:49 नवीन
कुठला तरी (काल्पनिक?) भ्रष्टाचार होऊ नये म्हणून काहीही चुत्यागिरी चालवून घ्यावी हे लॉजिक बाकी भारी आहे.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

!

माहितगार
Tue, 08/21/2018 - 20:31 नवीन
एकवेळ अबकड सापडेल पण हळक्षज्ञच्या डोक्यात मेंदू सापडणे अशक्य आहे. काहीही उपयोग नाही.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर

ट्रेड मार्क
Wed, 08/22/2018 - 00:42 नवीन
तुम्ही साक्षात प्रा. डॉ. असल्याने तुमच्या सारखा मेंदू कुठल्या भक्ताच्या डोक्यात सापडणे अवघडच आहे. पण तुमच्या हुशारीचा उपयोग करून नोटबंदीऐवजी काय करायला पाहिजे होते हे सांगा बघू. किंवा नोटबंदीचे व्यवस्थापन नीट केले नव्हते असे म्हणणे असेल तर मग कसा अमलात आणायला पाहिजे होता याचा एक मस्त प्लॅन द्या. एक छान धागा काढा ज्यात मोदींचा निर्णय १ - कसा चुकला आणि त्याऐवजी दुसरं काय केलं असतं तर इप्सित साध्य होऊनही समस्त जनतेला काही त्रास झाला नसता. निर्णय २ - कसा चुकला आणि त्याऐवजी दुसरं काय केलं असतं तर इप्सित साध्य होऊनही समस्त जनतेला काही त्रास झाला नसता. असे किंवा तुम्हाला पाहिज तश्या फॉरमॅट मध्ये तुम्ही लिहा. काय म्हणता? घेता चॅलेंज? एक माननीय सदस्य देणार होते पण नंतर ते गायबलेच. तुम्ही द्याल अशी आशा करतो.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>निर्णय १ - कसा चुकला आणि

नितिन थत्ते
Wed, 08/22/2018 - 10:31 नवीन
>>निर्णय १ - कसा चुकला आणि त्याऐवजी दुसरं काय केलं असतं तर इप्सित साध्य होऊनही समस्त जनतेला काही त्रास झाला नसता. इप्सित काय होतं हे मोदीजी स्वतः निश्चितपणे सांगू शकले तरी पुष्कळ झालं......
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

चाचा

ट्रेड मार्क
Wed, 08/22/2018 - 18:52 नवीन
मोदी जाऊ दे हो, तुमच्यामते चायवाला तर आहेत ते. असे कितीसे हुशार असणार? तेव्हा उगाच कशाला अपेक्षा ठेवताय? पण आमच्या तुमच्यासारख्या दिग्गजांकडून अपेक्षा आहेत, तेवढ्या पूर्ण करा. चॅलेंज स्वीकारा!
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अहो पण त्यांनी केली ना

नितिन थत्ते
Wed, 08/22/2018 - 19:03 नवीन
अहो पण त्यांनी केली ना नोटाबंदी? त्यांचं काय इप्सित होतं हे मी कसं सांगणार? त्यांनी नोटाबंदी करताना काही उद्दिष्ट सांगितली. त्यातली कुठलीच पूर्ण झाली नाहीत. थोड्या दिवसांनी कॅशलेस-लेसकॅश हे उद्दिष्ट सांगितलं तेही खरं वाटत नाही. कारण बाजारातली कॅश पुन्हा मूळ पदाला आली आहे. https://economictimes.indiatimes.com/news/economy/finance/after-16-months-currency-in-circulation-back-to-pre-demonetisation-levels/articleshow/63304790.cms त्यांचं उद्दिष्ट बहुधा सांगितलेल्यापैकी काहीच नव्हतं. केवळ मी कायपण करू शकतो असं दाखवण्याचं असावं,
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

एक उद्दिष्ट असू शकेल जे

नितिन थत्ते
Wed, 08/22/2018 - 19:07 नवीन
एक उद्दिष्ट असू शकेल जे यशस्वी झाले असेल. "काळा पैसा सुलभतेने साठवता यावा म्हणून लहान आकाराच्या आणि मोठ्या किंमतीच्या नोटा पुरवणे" पण हे उद्दिष्ट नसावं असं मी म्हणतो कारण थोर लोक म्हणून गेलेत की "डोण्ट अ‍ॅट्रिब्यूट मॅलिस टू व्हॉट कॅन बी एक्स्प्लेन्ड अ‍ॅज स्टुपिडिटी".
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

मोदींचं उद्दिष्ट काही का असेना

ट्रेड मार्क
Wed, 08/22/2018 - 20:13 नवीन
अहो पण मी म्हणतोय मोदींचं उद्दिष्ट काही का असेना, त्यांना तसेही स्टुपिड समजताय मग त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्षच करून टाका. तुमच्या मते हा उपदव्याप काळा पैसा सुलभतेने साठवता यावा म्हणून लहान आकाराच्या आणि मोठ्या किंमतीच्या नोटा पुरवणे असो किंवा सामान्य लोकांना त्रास देण्यासाठी असो. तुम्हाला साधारणपणे प्रॉब्लेम्स माहित आहेत जे सोडवायचे आहेत जसे की लोकांनी रोखीत साठवून ठेवलेला पैसा बाहेर काढणे, रोखीत होणारे अवैध व्यवहार थांबवणे, रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात चालू असलेले रोखीतले व्यवहार आटोक्यात आणणे, शक्य तेवढा पैसा बँकिंग सिस्टीम मध्ये आणून त्यांना कराच्या जाळ्यात ओढणे, खोट्या नोटांना आळा घालणे, जरी कॅश व्यवहार केले तरी वैध बिल देणे/ घेणे याची लोकांना सवय लावणे, रोख पैश्यांच्या जीवावर चाललेल्या अतिरेकी कारवायांना तसेच गुंडगिरीला आळा घालणे. तर ही आपली उद्दिष्टे आहेत. कोण आणि कधी देताय फुलप्रूफ प्लॅन? याच बरोबर हे पण महत्वाचे आहे की हा प्लॅन सगळ्यांना आवडला पाहिजे. वरची उद्दिष्टे निदान ९०% तरी साध्य झाली पाहिजेत आणि अमलात आणताना/ आणल्यावर कोणीही नाराज नाही झालं पाहिजे, अमलात आणल्यावर लगेच त्याचे रिझल्ट्स दिसले पाहिजेत.
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

हे सगळे प्रॉब्लेम सोडा, वन

नितिन थत्ते
Wed, 08/22/2018 - 22:01 नवीन
हे सगळे प्रॉब्लेम सोडा, वन टाईम नोटबंदी करून यातले काही प्रॉब्लेम तरी सुटतील असा समज आहे का तुमचा? मोठ्या नोटा रद्द करून काळा पैसा साठवणे, फिरवणे या गोष्टी अवघड करता येतात हे खरे आहे. पण त्यासाठी एका झटक्यात नोटबंदी करावी लागत नाही. वाईट गोष्ट ही की त्यात सामान्यांच्या सामान्य व्यवहारात असलेल्या ५०० च्या नोटा बंद करून (काळे पैसेवाल्यांसोबतच सामान्य) सर्वांचे कंबरडे मोडले. आणि दुसरी वाईट गोष्ट (की स्टुपिड गोष्ट) म्हणजे वापरण्यासारख्या ५०० च्या नोटा प्रथम न आणता २००० च्या नोटा प्रथम बाजारात आणल्या. त्याने दिसायला रीमोनेटायझेशन लवकर झाल्यासारखे दिसले तरी त्या साधारण व्यवहारायोग्य नोटा नसल्याने व्यवहारास येणार्‍या अडचणी अधिक काळ चालू राहिल्या. >>त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्षच करून टाका. काय आहे; त्यांच्या स्टुपिडिटीला मास्टरस्ट्रोक म्हणून वाहवा करणारे आहेत. माझ्या नात्यातल्या आणि ओळखीतल्या बहुतांश सुशिक्षित लोकांचा "नोटबंदीने काळा पैसा नष्ट झाला" यावर दृष विश्वास आहे. मुळात असलेल्याइतकी कॅश पुन्हा बाजारात आली असेल तर "रोखीत होणारे अवैध व्यवहार थांबवणे" हे उद्दिष्ट तर ढगातच गेलं ना? पण असो. मास्टरस्ट्रोक इज मास्टर स्ट्रोक.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

अहो थत्तेसाहेब

स्वधर्म
Wed, 08/22/2018 - 23:42 नवीन
काय तुम्ही पण! एकदा अापलं ठरलंय ना, की मास्टरस्ट्रोक? मग पुन्हा परत परत कशाला वाद घालताय? ह. घ्या. असो, माझ्यापुरते बोलायचे तर, नोटबंदी अाधी केंव्हातरी अर्थक्रांती काकांचे भाषण ऐकले होते अाणि सरकार ते एवढ्या सिरियसली घेतेय याचा धक्काच बसलेला. सुखद होता तो. पण लागलीच दोन हजाराची नोट काढली अाणि सरकारच्या हेतूंवरचा पूर्ण विश्वास उडाला. तेव्हापासून मी नोटबंदीचे समर्थन फक्त ऐकतो. श्रध्दावानांना पटवणं खूप अवघड असतं सर!
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

तुम्ही मोदींनी काय केलं ते सोडा.

ट्रेड मार्क
गुरुवार, 08/23/2018 - 00:40 नवीन
तुम्ही मोदींनी काय केलं ते सोडा. मी जे प्रॉब्लेम सांगितलेत ते रिअल लाईफ प्रॉब्लेम्स आहेत, हे तर मान्य आहे?. ते आपल्याला सोडवायचेत, तर एक प्लॅन मोदींनी दिला तो तुम्ही फालतू आहे म्हणून फाडून टाकलात. मग आता तुम्ही एक असा प्लॅन द्या जो सगळे प्रॉब्लेम्स तर सोडवेल पण दिलेल्या सगळ्या कंडिशन्स पण पूर्ण करेल. वन टाईम नोटबंदी करून यातले काही प्रॉब्लेम तरी सुटतील असा समज आहे का तुमचा? माझा असा समज आहे की तुम्ही, प्रा. डॉ. वगैरे हुशार मंडळी सहज हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक मस्त प्लॅन देऊन शकाल. कृपया हा समज चुकीचा ठरवू नका. मोदींच्या कृतीला मास्टर स्ट्रोक म्हणून वाहवा करणारे, स्वतः मोदी, त्यांचे तथाकथित पेड मीडिया वाले, संघी, भाजपावाले, मिपावरील मोदींचे समर्थन करणारे सगळे बाजूला ठेवा. ते मूर्ख आहेत असं तुमचं पक्कं मत आहे ना? मग कशाला उगाच त्यांच्या नादी लागताय?
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

वाद नाहीचे, आपलं उद्दिष्ट फक्त प्लॅन तयार करणे

ट्रेड मार्क
गुरुवार, 08/23/2018 - 00:47 नवीन
तुम्हाला पाहिजे असल्यास अभिजित - १, स्वधर्म, मार्मिक गोडसे, कपिलमुनी वा इतर कुठल्याही मिपासदस्याची किंवा मिपावर उपस्थित नसलेल्या कोणाची मदत घ्यायची असेल तर घेऊ शकता. आपलं उद्दिष्ट फक्त एकच आहे - फुलप्रूफ प्लॅन तयार करणे.
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

कपिलमुनी ??

कपिलमुनी
गुरुवार, 08/23/2018 - 08:58 नवीन
तुमच्या चर्चेत माझे नाव घेउ नका. तुमचे शिक्के तुमच्यापाशी ठेवा.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

पण असं का?

नितिन थत्ते
गुरुवार, 08/23/2018 - 10:10 नवीन
पण असं का? ममोसिंग अणि कं मूर्ख आहेत असं हे गृहस्थ सगळीकडे सांगत फिरत होते. आता मी आलोय आणि सगळे प्रॉब्लेम सोडवणाराय असं यांनी सांगितलं. त्याच्यावर विश्वास ठेवून बर्‍याच लोकांनी त्यांच्यावर "हे काम सोपवलं आहे". ती त्यांचीच जबाबदारी आहे. उनको साठ साल दिये, मुझे ६० महिने दीजिये असं त्यांनी सांगितलं. ते त्यांना दिलेत.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

असं लॉजिक असेल तर…

स्वधर्म
गुरुवार, 08/23/2018 - 11:40 नवीन
>> माझा असा समज आहे की तुम्ही, प्रा. डॉ. वगैरे हुशार मंडळी सहज हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक मस्त प्लॅन देऊन शकाल. कृपया हा समज चुकीचा ठरवू नका. >> तुम्हाला पाहिजे असल्यास अभिजित - १, स्वधर्म, मार्मिक गोडसे, कपिलमुनी वा इतर कुठल्याही मिपासदस्याची किंवा मिपावर उपस्थित नसलेल्या कोणाची मदत घ्यायची असेल तर घेऊ शकता. आपलं उद्दिष्ट फक्त एकच आहे - फुलप्रूफ प्लॅन तयार करणे. सर, अापण हे कुठलं लॉजिक लावताय? समजा एखाद्या रुग्णाला डॉक्टरचा गुण अाला नाही म्हणून जर तो डॉ.ना सांगू लागला, की बरं वाटत नाही अजून, अौषध लागू झालं नाही. तर डॉ.नी असं म्हणायचं का, की चल, तू बरा करून दाखव रोग, मगच मला बोलायला ये! जर तुला अौषध माहीत नसेल तर माझ्यावर टीका करण्याचा तुला अाधिकारच नाही. अाणि हो, मी कुठे सरसकट मोदी विरोध केला ते दाखवा. कपिलमुनी म्हणतात तसे शिक्के नकाच मारू.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

शिक्के मारत नाहीये

ट्रेड मार्क
गुरुवार, 08/23/2018 - 20:15 नवीन
मी शिक्के मारत नाहीये पण स्वधर्म यांच्या या प्रतिसादावरून त्यांना सुद्धा नोटबंदी/ नोटबदली आवडलेली नाही असं दिसतंय. मुनिवर्य, गोडसे याच्या एकूण प्रतिसादांचा रोख मोदींच्या विरुद्धच असतो, म्हणून म्हणलं तुम्हालासुद्धा आमंत्रित करावं. पण ठीक आहे हे चॅलेंज स्वीकारणं सगळ्यांनाच जमेल असं नाही. त्यामुळे चॅलेंज स्वीकारायचं का नाही हे तुम्ही ठरवा. मी फक्त आमंत्रित केलं. @थत्ते साहेब - उनको साठ साल दिये, मुझे ६० महिने दीजिये असं त्यांनी सांगितलं. ते त्यांना दिलेत. दिलेत ना? मग त्यांच्या वकुबाप्रमाणे त्यांनी केलं आणि करत आहेत. मी आधीच म्हणल्याप्रमाणे त्यांना (त्यांना म्हणण्यापेक्षा त्यांच्या कृतीला) नावं ठेवण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार सुद्धा आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की, नोटबदली वगैरे निर्णय जे चुकले असं तुम्ही म्हणताय तर त्याबदल्यात काय करता आलं असतं हे तुम्ही सांगावं. आता कोणी जर चुकीची कृती केली असेल तर त्याला आपण नुसतं तू चूक केली असं सांगून काय होणार? बरोबर काय ते पण सांगायला पाहिजे ना? मी काय म्हणतो, प्रयत्न तर करून बघायला काय हरकत आहे? प्लॅन चुकला तर चुकला, असं म्हणतात जो काहीतरी करतो त्याच्याकडूनच चुका होतात. मग कोण स्वीकारतंय चॅलेंज?
↩ प्रतिसाद: स्वधर्म

विराट कोहलीला काय अक्कल आहे

सुबोध खरे
गुरुवार, 08/23/2018 - 20:22 नवीन
विराट कोहलीला काय अक्कल आहे का? बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅट लावली आणि आऊट झाला. मूर्ख लेकाचा. ता क:- याचा वरच्या लेखनाशी काहीही संबंध नाही हे कृपया ध्यानात घ्यावे.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

हाहाहाहा

ट्रेड मार्क
गुरुवार, 08/23/2018 - 20:44 नवीन
परफेक्ट बॉल पडलाय!
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हायला

अभ्या..
गुरुवार, 08/23/2018 - 21:01 नवीन
हायला, ह्या नियमाने तर काथ्याकूट बंद करुन रोजची काकडाआरती ते शेजारती धागा चालु करायला काही हरकत नाहीये. बर्‍याच आयडींना ते करण्यासाठी डूआयडीचा सहारा तरी घ्यावा लागणार नाही. . असो... मी काहीहि लिहिणार, ते बरोबरच असणार, मी प्रतिवाद करणार नाही, माझी तो करायची इच्छा नाही.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

हायला

ट्रेड मार्क
गुरुवार, 08/23/2018 - 22:30 नवीन
ह्या नियमाने तर काथ्याकूट बंद करुन रोजची काकडाआरती ते शेजारती धागा चालु करायला काही हरकत नाहीये. हे काही कळलं नाही. इथे कोणीच कुठला नियम घालून दिलेला नाहीये. पाहिजे तसे आणि पाहिजे तसे (अर्थात मिपाच्या नियमात बसतील असे) धागे आपल्या सर्वांनाच काढता येतात. मी काहीहि लिहिणार, ते बरोबरच असणार, मी प्रतिवाद करणार नाही, माझी तो करायची इच्छा नाही. आजकाल याला फॅसिस्ट वृत्ती म्हणतात. बऱ्याच जणांचा हा पण आरोप आहे की मोदी असंच करतात.
↩ प्रतिसाद: अभ्या..

उदित नारायण मोड: वाह! क्या

शब्दबम्बाळ
Fri, 08/24/2018 - 00:03 नवीन
उदित नारायण मोड: वाह! क्या गाया है मैंने!! :D
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

गैरसमज

ट्रेड मार्क
Fri, 08/24/2018 - 02:15 नवीन
कोणाचा असा समज झाला असेल की डॉ. खरे आणि मी एकच व्यक्ती आहोत तर तो चुकीचा आहे. मी सरळसरळ एक चॅलेंज दिलं आहे, ते स्वीकारायचं सोडून उगाच फाटे फोडत काय बसलात?
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

तेच ना, बाहेर जाणार्‍या

थॉर माणूस
Tue, 08/28/2018 - 00:38 नवीन
तेच ना, बाहेर जाणार्‍या चेंडूला बॅट लावणे हा खरंतर मास्टरस्ट्रोकच. पण हे नतद्रष्ट लोक तरीही त्याला चूकच म्हणणार. मी काय म्हणतो, आपण अशा लोकांना चॅलेंज द्यायला पाहीजे... तुम्ही कुठला शॉट मारला असता ते करून दाखवा म्हणून.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुम्हाला साधारणपणे

मार्मिक गोडसे
Fri, 08/24/2018 - 11:09 नवीन
तुम्हाला साधारणपणे प्रॉब्लेम्स माहित आहेत जे सोडवायचे आहेत जसे की लोकांनी रोखीत साठवून ठेवलेला पैसा बाहेर काढणे, रोखीत होणारे अवैध व्यवहार थांबवणे, रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात चालू असलेले रोखीतले व्यवहार आटोक्यात आणणे, शक्य तेवढा पैसा बँकिंग सिस्टीम मध्ये आणून त्यांना कराच्या जाळ्यात ओढणे, खोट्या नोटांना आळा घालणे, जरी कॅश व्यवहार केले तरी वैध बिल देणे/ घेणे याची लोकांना सवय लावणे, रोख पैश्यांच्या जीवावर चाललेल्या अतिरेकी कारवायांना तसेच गुंडगिरीला आळा घालणे. नोटबंदी फेल गेल्याचं बरंच जिव्हारी लागलेलं दिसतंय. मूर्खपणाला विरोध केला हे चुकीचे नव्हते हे सिद्ध झालेच आहे. तूम्ही दिलेले प्रॉब्लेम सोडविण्यासाठी एकमेव फुलप्रूफ प्लॅन असूच शकत नाही. उदा: अतिरेकी कारवाया किंवा गुंडगीरी रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक कार्यक्षम असणे गरजेचे आहे, त्यांची अचानकपणे आर्थिक कोंडी केल्याने तात्पुरता कारवाया थंड होऊ शकतात, कायमच्या नाही. सरकारने फक्त देशातील सर्व लोकप्रतिनिधी व सरकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्रोत तपासले तर बराच काळा पैसा बाहेर येईल. काळा पैसा निर्मितीत आणि मुरवण्यात हेच आघाडीवर आहेत. आणि हो, फुलप्रूफ चा दावा मी कधीच केला नव्हता.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

मूर्खपणाला विरोध केला

सुबोध खरे
Fri, 08/24/2018 - 12:15 नवीन
मूर्खपणाला विरोध केला आपला पगार किती आणि आपले बोलणे किती ?
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

?????

मार्मिक गोडसे
Fri, 08/24/2018 - 14:21 नवीन
आपला पगार किती मराठीत सांगितलेलं कळतं नाही का?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बा द वे त्या तुमच्या

नितिन थत्ते
Fri, 08/24/2018 - 15:25 नवीन
बा द वे त्या तुमच्या प्रतिसादाला उत्तर म्हणून खरे साहेबांनी जो प्रतिसाद दिला होता - भाजप खासदारांना म्हणे आपल्या व्यवहारांची माहिती अमित शहांना कळवायला सांगितली होती- त्याची पुढे काय प्रगती झाली ते अजून कळलं नाही. (आणि त्या सो कॉल्ड ८० लाख खात्यांची सुद्धा).
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

एक शहाणा ( उंटावरचा)

सुबोध खरे
Fri, 08/24/2018 - 20:18 नवीन
एक शहाणा ( उंटावरचा) विराट कोहलीला काय अक्कल आहे का? बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅट लावली आणि आऊट झाला. मूर्ख लेकाचा. ता क:- याचा वरच्या लेखनाशी काहीही संबंध नाही हे कृपया ध्यानात घ्यावे.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

गोडसे साहेब

ट्रेड मार्क
Sat, 08/25/2018 - 03:07 नवीन
नोटबंदी फेल गेल्याचं बरंच जिव्हारी लागलेलं दिसतंय. फेल गेली हे सिद्ध करा. केवळ मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणात उल्लेख केला नाही म्हणून फेल झाली असं म्हणणं हा मूर्खपणा आहे. मूर्खपणाला विरोध केला हे चुकीचे नव्हते हे सिद्ध झालेच आहे. मूर्खपणा हा सापेक्ष असतो. तुम्ही ज्याला मूर्खपणा समजताय त्याला शहाणपणा (मास्टरस्ट्रोक?) समजणारे लोक पण बरेच आहेत. त्यांना ते मूर्ख कसे आहेत हे समजावून द्यायला, काय चुकलं आणि बरोबर काय होतं किंवा कसं चांगल्या पद्धतीने करता आलं असतं/ येईल हे सांगा. हेच मी गेले २ दिवस सांगतोय की प्लॅन द्या, तर सगळे झुडुपाच्या आजूबाजूला मारत बसलेत. तूम्ही दिलेले प्रॉब्लेम सोडविण्यासाठी एकमेव फुलप्रूफ प्लॅन असूच शकत नाही. दिलेली यादी मुख्यत्वे पैश्यांशी निगडित अडचणींची आहे. ते सोडवण्यासाठी एकच प्लॅन द्या असं कुठे म्हणलंय, एक द्या किंवा एका पेक्षा जास्त प्लॅन द्या. पण द्या तर खरं! पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर नोटबंदी हेच एकमेव पाऊल मोदींनी उचललंय असं दाखवून आरडाओरडा होतोय ना? सरकारने फक्त देशातील सर्व लोकप्रतिनिधी व सरकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्रोत तपासले तर बराच काळा पैसा बाहेर येईल. काळा पैसा निर्मितीत आणि मुरवण्यात हेच आघाडीवर आहेत. यात हे मुख्य असले तरी बाकी पण बरेच लोक सामील आहेत. आम्ही बँकेच्या वसुलीला गेलो असताना एकाने नोटा भरलेली एक खोली उघडून दाखवली होती. म्हणजेच त्याच्याकडे पैसे होते पण बँकेत भरायचे नव्हते. रोख होते म्हणजे अनैतिक मार्गानेच मिळवले असणार. आता हा एक माणूस झाला, असे देशात किती असतील विचार करा. हे पैसे कसे बाहेर काढायचे? फुलप्रूफ चा दावा मी कधीच केला नव्हता. फुलप्रूफ राहूदे, पण प्लॅन तर द्या. मग आपण चर्चा करू. काय?
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

>>म्हणजेच त्याच्याकडे पैसे

नितिन थत्ते
Sat, 08/25/2018 - 09:31 नवीन
>>म्हणजेच त्याच्याकडे पैसे होते पण बँकेत भरायचे नव्हते. रोख होते म्हणजे अनैतिक मार्गानेच मिळवले असणार. आता हा एक माणूस झाला, असे देशात किती असतील विचार करा. हे पैसे कसे बाहेर काढायचे? याबाबतीत ओरिजिनली मी आणि नंतर अलिकडे सरकारने "तुम्हाला माहिती असलेल्या भ्रष्टाचार्‍यांची माहिती द्या" असे आवाहन केले होते. तुम्ही या खोलीभर नोटावाल्याची खबर सरकारला दिलीत का? नसली दिलीत तर काळा पैसा नष्ट व्हावा अशी तुमचीही इच्छा नाही असे दिसते किंवा हा खोलीभर नोटावाला भाजपचा असेल किंवा ही खोलीभर नोटांची ष्टोरी बंडल आहे असे म्हणावे लागेल. आता नोटाबंदी फेल झाली याचं थोडं विश्लेषण करू..... १. नोटाबंदीनंतर "काळा पैसा असणारे लोक बँकेत भरणार नाहीत कारण प्रश्न विचारले जातील" असं जेटली म्हणाले. म्हणजे काळा पैसा नष्ट होईल अशी सरकारची अपेक्षा होती. २. सुमारे चार लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा होणार नाहीत अशी अपेक्षा असल्याचं अ‍ॅटर्नी जनरलनी न्यायालयाला सांगितलं. https://www.hindustantimes.com/india-news/sc-refuses-to-stay-demonetisationmove-govt-hopeful-of-recovering-rs-10l-cr/story-6w7uzKFZ2UkrY863aFONUO.html ३. शेवटी ऑलमोस्ट सर्व रद्द नोटा बँकेत जमा झाल्या असं रिझर्व बँकेने कबूल केलं. ४. टीव्हीवर सांगितलेल्या उद्दिष्टांपैकी टेरर फायनान्सिंग वाला भाग तात्पुरता यशस्वी झालेला दिसला. पण एकुणात दहशतवादावर काही विशेष परिणाम झाला नाही. ५. काळा पैसा नष्ट झालाच नाही आणि पकडलाही गेला नाही. तसेही नोटाबंदी हा केवळ कॅश स्वरूपात असणार्‍या काळ्या पैशावरचा हल्ला असू शकत होता. जो साधारण ४-६ टक्के असतो असे आयकर खात्याला आधीपासून ठाऊक होते. सर्व बाबी नोटबंदी फेल झाली असेच दर्शवतात. नोटबंदी नंतरच्या काळात कॅशलेसचा जो गवगवा झाला तोही फुकाचाच होता. आधीच्या काळात होत्या तितक्या नोटा सरकारने स्वतःच बाजारात पुन्हा सोडल्या. नोटबंदीचा एकमेव फायदा झालेला दिसला तो म्हणजे पूर्वी क्रेडिट कार्ड सर्व दुकानदार स्वीकारत नसत ते आता स्वीकारतात (म्हणजे नाही म्हणत नाहीत- बाकी कार्ड चालत नाही, नेटवर्क नाही वगैरे नुस्खे ते वापरतातच).
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

चाचाजी

ट्रेड मार्क
Sat, 08/25/2018 - 19:06 नवीन
नसली दिलीत तर काळा पैसा नष्ट व्हावा अशी तुमचीही इच्छा नाही असे दिसते किंवा हा खोलीभर नोटावाला भाजपचा असेल किंवा ही खोलीभर नोटांची ष्टोरी बंडल आहे असे म्हणावे लागेल. स्टोरी काँग्रेसच्या काळातली आहे आणि पैसे साठवून ठेवणारा काँग्रेसचा नगरसेवक होता. त्यामुळे तक्रार करून काही फायदा नव्हता आणि त्यावेळेला सरकारने भ्रष्टाचाऱ्यांची माहिती द्या असे काही आवाहनही केले नव्हते कारण संपूर्ण सरकारच भ्रष्टाचारी होते. १. नोटाबंदीनंतर "काळा पैसा असणारे लोक बँकेत भरणार नाहीत कारण प्रश्न विचारले जातील" असं जेटली म्हणाले. म्हणजे काळा पैसा नष्ट होईल अशी सरकारची अपेक्षा होती. २ आणि ३ हे मुद्दे... पहिले काळा पैसा म्हणजे काय ते बघा. जे व्यवहार कर चुकवण्यासाठी रोखीत केले जातात आणि त्यातून मिळालेला पैसा ना बँकेत भरला जातो ना कुठे नोंद होतो. म्हणजे जर रिझर्व्ह बँकेने एकूण बाजारात १६ लाख कोटी वितरित केले असतील पण त्यातले फक्त १२ लाख कोटीच चलनवलनात असतील. म्हणजे ४ लाख कोटी कुठे तरी दडून बसले आहेत आणि त्याचा वापर अवैध गोष्टींसाठी होतो आहे. हे पैसे जर बँकेत जमा झाले तर परत चलनात आले ना? तुम्हाला आठवत असेल तर रोख बँकेत भरण्यासाठी या धनदांडग्यांनी लोकांना नियुक्त केलं होतं. अशी अचानक पैसे भरली जाणारी खाती सरळ सरळ बाजूला काढता आली. आपल्या लोकांची एक खासियत आहे, करू नका सांगितलं की करायचं. म्हणजे बँकेत भरणार नाहीत असं म्हणलं की लोकांनी बँकेत भारण्यासाठीचे उपाय शोधून काढले. कुठल्या का मार्गाने होईना पण हा दडून बसलेला पैसा बाहेर तर आला! ४. टीव्हीवर सांगितलेल्या उद्दिष्टांपैकी टेरर फायनान्सिंग वाला भाग तात्पुरता यशस्वी झालेला दिसला. पण एकुणात दहशतवादावर काही विशेष परिणाम झाला नाही. तुमची काय अपेक्षा होती की एक फक्त कारवाई केली की दहशतवाद पूर्णपणे थांबेल? तरी पण बराच फरक पडला आहे हे तर तुम्हीच मान्य करताय. काश्मीर मधील दगडफेक आता किती प्रमाणात होतेय? नक्षलवाद पण बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. हे या सरकारच्या आधी कधी झाल्याचं आठवत असेल तर पुरावे द्या. सर्व बाबी नोटबंदी फेल झाली असेच दर्शवतात. अहो मग मी गेले २-४ दिवस तेच तर म्हणतोय की तुम्हाला फेल झाली असं वाटतंय तर मग या प्रतिसादात सांगितलेल्या प्रॉब्लेम्स ना सोडवण्यासाठी एक किंवा अनेक प्लॅन तर द्या. नसेल तर हार मान्य करा, काय?
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

फेल गेली हे सिद्ध करा.

मार्मिक गोडसे
Sat, 08/25/2018 - 12:18 नवीन
फेल गेली हे सिद्ध करा. यशस्वी झाल्याचे तुम्हीच सिद्ध करा. मूर्खपणा हा सापेक्ष असतो. तुम्ही ज्याला मूर्खपणा समजताय त्याला शहाणपणा (मास्टरस्ट्रोक?) समजणारे लोक पण बरेच आहेत. जगात एक समुदाय आहे जो पृथ्वी गोल नसून चपटी आहे असा दावा करतो. त्यांना उपग्रहाद्वारे काढलेला पृथ्वीचा फोटो दाखविला तर ते म्हणतात ,गोल आहे हे मान्य,परंतू चेंडुसारखी नाही तर चपाती सारखी गोल आणि चपटी आहे. अशांच्या नादी न लागणे हाच शहाणपणा आहे. एकात्मिक कीडनियंत्रणासाठी उपलब्ध अनेक पर्याय वापरले जातात , ज्यामुळे कीड संपूर्ण नष्ट जरी होत नसली तरी बरीच आटोक्यात येते. हेच काम सरकारने करायचे आहे, लाचलुचपत, प्राप्तिकर, सुरक्षा यंत्रणांना कामाला लावून नियंत्रणात आणायचे आहे. म्हणजेच त्याच्याकडे पैसे होते पण बँकेत भरायचे नव्हते. रोख होते म्हणजे अनैतिक मार्गानेच मिळवले असणार. चहावाला, पकोडे विकणारा ह्यांचे व्यवहार रोखीत होतात, शेतकऱ्याला सुद्धा शेतमाल विक्रीतून रोख पैसे मिळतात ,मग तो पैसा अनैतिक होतो का?
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

ट्रेड मार्क साहेब

सुबोध खरे
Sat, 08/25/2018 - 13:38 नवीन
ट्रेड मार्क साहेब का उगाच बहिऱ्या लोकांना संगीत साधनेचा फायदा सांगण्याचा प्रयत्न करत आहात? शेतीचे उत्पन्न म्हणून रोख पैसे मिळाले तरी ते करमुक्त असून ते उत्पन्नात दाखवल्यास त्यावर कर लागत नाही आणि असे आपले उत्पन्न दाखवले तर नडी अडचणीला बँकेतून कर्ज मिळते अन्यथा सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते हे लोकांना समजूनच घ्यायचे नाही. चहा पकोडा वाला खिशात भरपूर पैसे असले तरी बँकेत कर्जासाठी उभा राहिला तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो हे माहित असूनही चहा पकोड्याचीच अर्थव्यवस्था चांगली आहे असे मानणाऱ्या लोकांना का काही समजावून सांगायचे? मोदीं भाजप किंवा रा स्व संघाने काहीही केलं तरी ते चूकच असे मानणाऱ्या कम्युनिस्ट लोकांना समजावून काहीच फायदा नसतो कारण आपली विचारसरणी गंडलेली आहे हे जगभर सिद्ध झाले तरी रशियात पाऊस पडला कि इकडे छत्री उघडणारे लोक ते ते कसे सुधारणार? सोडून द्या.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

तुझं माझं जमेना अन्

मार्मिक गोडसे
Sat, 08/25/2018 - 13:59 नवीन
तुझं माझं जमेना अन् तुझ्याविना करमेना.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डॉक्टरसाहेब

ट्रेड मार्क
Sat, 08/25/2018 - 21:08 नवीन
प्लॅन देता येत नाही म्हणून हे कसे इकडून तिकडे उड्या मारत आहे ते बघतोय. ते करत आहेत तो कुठलाच दावा त्यांना सिद्ध करता येत नाहीये. तसेच नुसती नावं ठेवायला काय लागतंय, त्याला काही पर्याय, उपाय किंवा कसं चांगल्या तर्हेने करता आलं असतं हे पण ते सांगू शकत नाहीयेत. ध्रुव राठी आणि तत्सम लोकांचे व्हिडिओ बघून हे मत बनवतात. ते विडिओ बघतानाच त्यात काय गफलत करत आहेत हे पण यांच्या लक्षात येत नाही याचे एकमेव कारण म्हणजे आधीच माईंडसेट ठरवलेला असतो. बघू तरी कसे आणि किती वेळ उड्या मारतात.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मोदीं भाजप किंवा रा स्व

मार्मिक गोडसे
Tue, 08/28/2018 - 13:51 नवीन
मोदीं भाजप किंवा रा स्व संघाने काहीही केलं तरी ते चूकच असे मानणाऱ्या कम्युनिस्ट लोकांना समजावून काहीच फायदा नसतो https://www.misalpav.com/comment/743055#comment-743055 आता ही योजना कोणाची? आणि तिचे स्वागत कोणी केले? जरा पूर्वग्रह आणि शिक्के बाजूला ठेवा तुमचे.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मार्मिक

ट्रेड मार्क
Sat, 08/25/2018 - 20:25 नवीन
तुम्ही जरा मार्मिक टिपण्णी करायला पण शिकायला पाहिजे. यशस्वी झाल्याचे तुम्हीच सिद्ध करा. वर चाचाजींना दिलेला प्रतिसाद वाचा. जगात एक समुदाय आहे जो पृथ्वी गोल नसून चपटी आहे असा दावा करतो. तुम्ही या समुदायात मोडताय असं वाटतंय. वर्ल्ड बँक, आयएमएफ यासारख्या संस्थांनी मोदींच्या निर्णयांची पाठराखण केली आहे. जसे नासाने जरी पृथ्वी गोल आहे म्हणून सांगितले तरी पृथ्वी चपटी आहे म्हणणारा समुदाय ऐकत नाही तसेच जागतिक तज्ज्ञांनी सांगूनसुद्धा तुम्ही ऐकत नाही. एकात्मिक कीडनियंत्रणासाठी उपलब्ध अनेक पर्याय वापरले जातात , ज्यामुळे कीड संपूर्ण नष्ट जरी होत नसली तरी बरीच आटोक्यात येते. हेच काम सरकारने करायचे आहे, लाचलुचपत, प्राप्तिकर, सुरक्षा यंत्रणांना कामाला लावून नियंत्रणात आणायचे आहे. बरोबर. पण मग जर कीड नष्ट करण्यासाठी काहीच कीडनाशक न फवारता नष्ट करता येईल का? लाचलुचपत, प्राप्तिकर, सुरक्षा यंत्रणा हे सगळे बऱ्याच वर्षांपासून होते पण त्याचा काय उपयोग होत होता? Pesticide Paradox हे कधी ऐकले नसेल तर गुगलून पहा. अश्या वेळेला काय करायला लागतं हे पण शोधा. चहावाला, पकोडे विकणारा ह्यांचे व्यवहार रोखीत होतात, शेतकऱ्याला सुद्धा शेतमाल विक्रीतून रोख पैसे मिळतात ,मग तो पैसा अनैतिक होतो का? पैसा अनैतिक नसतो तर तो मिळवण्याचा मार्ग अनैतिक असू शकतो. जर मिळकत उत्पन्न म्हणून न दाखवता कर चुकवला तर तो काळा पैसा होतो. उदाहरण म्हणून - पुण्यातला एक वडापाववाला रोज दोन एक हजार तरी वडापाव विकत असेल, १० रुपयांना एक वडापाव म्हणलं तर २०,००० रुपये रोज रोख जमा होतात. हा माणूस कच्चा माल रोखीत घेतो, कामगारांना पण रोखीत पैसे देतो. यातलं कोणीच कर भरत नाही. हे सगळे लोक त्यांना घरी लागणाऱ्या वस्तू पण रोखीत घेतात. मालक त्याच्या बायकोला सोन्याचे दागिने घेतो ते पण रोखीत घेतो. बिल नको असं सांगितल्याने त्याचे कराचे पैसे वाचतात. हा माणूस फ्लॅट घ्यायला जातो तेव्हा जास्तीत जास्त रोखीत पैसे देतो. आता बरीच वर्ष धंदा करत असल्याने बरीच रोख जमा झाली आहे, मग गुंतवणूक म्हणून हा नवीन हाऊसिंग स्कीम मध्ये पैसा लावतो, म्हणजे काय करतो तर नुसती स्कीम जाहीर केली की १० फ्लॅट ची बुकिंग अमाऊंट भरतो. जसं जसं बांधकाम चालू होतं तसा भाव वाढत जातो मग हा चढ्या भावाने हक्क विकून अजून पैसे मिळवतो. अशी ही सगळी रोखीची साखळी तयार होते. यात नुसतं कर नुकसान होतं असं नाही तर मधेच कोणीतरी इतर अवैध धंद्यात असतो तो या रोखीचा वापर तिकडे करू लागतो. बिल्डर गुंडांना रोख देऊन एखादी जमीन हडपतो. ईई. हेच जर या वडापाव वाल्याने हे रोख पैसे बँकेत भरले आणि सरळ सरळ जे उत्पन्न मिळतंय त्यावर कर भरला तर हा सगळा प्रश्नच येणार नाही काय. म्हणजे फक्त नोकरदार लोक जे नाईलाज म्हणून कर भरतात त्यात हे असे व्यावसायिक पण कर भरायला लागून करसंकलन वाढेल. हे सगळं सांगतोय मी पण आता तुम्ही तो प्लॅन द् यायचं तर बघा.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

२०१९ आल !! आता तरी कंबर कसुन

डँबिस००७
Sat, 08/18/2018 - 21:03 नवीन
२०१९ आल !! आता तरी कंबर कसुन तयारी करा !! आपल्या लाडक्या युवराजाला देशाची सुत्र सांभाळायची आहेत !! जे जाणार आहेत ! ज्यांनी देशाची वाट लावली असा तुम्ही दावा केला मग , 2014 नंतर सुरु झालेल ईव्हळण अजुन बंद का होत नाही ?

Please read these 5 comments.

अभिजित - १
Tue, 08/21/2018 - 17:16 नवीन
डॉ खरे - नोटबंदी मुळे IT रिटर्न्स वाढले. 18 Aug 2018 - 6:32 pm | सुबोध खरे ट्रेडमार्क - नोटबंदी मुळे शेल कंपन्या बंद पडल्या. त्याचे करते करविते जाळ्यात अडकले. 19 Aug 2018 - 6:46 am | ट्रेड मार्क वरील दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. हे इथे सिद्ध झालेलं आहे. वाचा नितीन थत्ते यांचे GST & IT रिटर्न्स हा प्रतिसाद. 19 Aug 2018 - 8:31 am & 18 Aug 2018 - 9:02 pm माझा - शेल कंपन्या वरील मेसेज - 19 Aug 2018 - 5:55 pm चा मेसेज उद्या समजा मोदी म्हणाले कि माझे चुकले, तरीही भक्त काही ते मान्य करणार नाहीत . मोदी कसे बरोबरच आहेत हे ते मोदींनाच पटवून द्यायचा प्रयत्न करतील !! याला शुद्ध इंग्लिश मध्ये म्हणतात - LOYAL THAN KING !! तर अशा लोकांना सोडून द्या. पण जे लोक स्वतंत्र बुद्धीने विचार करतात त्यांनी वरील हे ५ प्रतिसाद वाचून पाहावेत. कोण चूक / कोण बरोबर हे त्यांनाच कळेल.

अभिजित बुवा

सुबोध खरे
Tue, 08/21/2018 - 19:22 नवीन
अभिजित बुवा थत्ते चाचा वाममार्गी आहेत तेंव्हा श्री मोदिंचा अंध विरोध ते करणारच. त्यामुळे त्यांनी काहीही पुड्या सोडल्या तर तुम्ही खऱ्या मानणार काय? Demonetisation effect: Income tax returns rise by 25%, collections up by 41% https://www.businesstoday.in/current/economy-politics/demonetisation-effect-income-tax-return-rise-by-25-percent-collections-up-by-41-percent/story/257943.html हा लेख २५ सप्टेंबर २०१७ चा आहे जेंव्हा थत्ते चाचा म्हणतात तसे जी एस टी चे फॉरवर्ड बॅकवॉर्ड इंटिग्रेशन काही झालेले नव्हते. तेंव्हा क्रेडिट मिळवण्याचे बर्डन अ‍ॅसेसीवर टाकल्यामुळे करसंकलनात वाढ झाली.हे म्हणणे धादांत खोटे आहे. एकदा लाल चष्मा लावला कि असे होते. ता क. -- लेख पूर्ण वाचून पाहावा हि विनंती. तो शुद्ध इंग्रजीतच आहे.
↩ प्रतिसाद: अभिजित - १

नोटबंदी झाली. नंतर टॅक्स

अभिजित - १
Tue, 08/21/2018 - 19:42 नवीन
नोटबंदी झाली. नंतर टॅक्स collection "वाढले" . ठीक आहे. पण ते नोटबंदी मुळेच ? कसे काय ? कारण काळ्या पैशावाल्यानी तर आपला पैसा बँक मध्ये भरून पांढरा केलाच कि. आणि मोदी हे सांगायला घाबरले ? tax collection increase as of DeMo ? जे एखाद्या टॉयलेट प्रकल्पाची ( भले आत पाणी नसले तरी) पण घसा फोडून तो कसा यशस्वी झालाय त्याची जाहिरातबाजी करतात. ते इतके मोठे साध्य ( increase इन IT returns ) गाठूनही गप्प ?? तेही देशातील लाखो लोक त्यांना ऐकत असताना ?? म्हणजे टॅक्स रिटर्न्स प्रमाण वाढवायचे असेल तर नोटबंदी करावी ? दुसरे काही solution नाही ? नोटबंदी करण्या मागचे उद्दिष्ट हेच होते ? टॅक्स returns वाढवणे ? कि काळा पैसा बाहेर काढणे ? 1.28 Lakh crores waste of money. https://www.khabarindiatv.com/paisa/business-pm-modi-says-no-problem-for-anyone-till-dec-30-you-will-get-what-is-yours-546254 नई दिल्ली। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने शनिवार को नोटबंदी के फैसले के बाद पहली बार बोलते हुए कहा कि 30 दिसंबर के बाद कालाधन रोकने के लिए और भी बड़े कदम उठाए जाएंगे। मोदी ने कहा कि नोट बंदी का असर देखने को मिलने लगा है। जो लोग पहले गंगा में चवन्नी भी नहीं डालते थे आज अपने काला धन का पैसा बहा रहे हैं। किसी को बख्शा नहीं जाएगा अगर किसी ने कालाधन बैंक में यह सोचकर जमा किया तो देखा जाएगा तो, उसे छोड़ा नहीं जाएगा। जो मुझे जानते हैं, वह समझदार हैं। ऐसे लोग अब सोचते हैं कि गंगाजी में बहाना बेहतर है। :) :) :) पैसे मिले न मिले, पुण्य तो मिल जाएगा। ईमानदार लोगों के लिए मेरी सरकार सबकुछ करेगी, बेईमान का हिसाब बराबर किया जाएगा। सगळा पैसा बँक मध्ये परत आला रे. वेडा बनवला रे मोदीला काळ्या पैशा वाल्यानी !! डॉ खरे यावर काही बोला.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एकदा लाल चष्मा लावला कि असे

सुबोध खरे
Tue, 08/21/2018 - 20:22 नवीन
एकदा लाल चष्मा लावला कि असे होते.
↩ प्रतिसाद: अभिजित - १

डॉ.खरेच काय बीजेपीचे आयटी

मार्मिक गोडसे
Tue, 08/21/2018 - 20:06 नवीन
डॉ.खरेच काय बीजेपीचे आयटी सेलवालेही सध्या ह्याला उत्तर देत नाहीत, फेविक्विक लागलीय.

मी आपल्या कोणत्याच वाक्याचा

सुबोध खरे
Tue, 08/21/2018 - 20:23 नवीन
मी आपल्या कोणत्याच वाक्याचा प्रतिवाद करु इच्छित नाही.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

ब्वॉर .

मार्मिक गोडसे
Tue, 08/21/2018 - 20:53 नवीन
ब्वॉर .
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सगळे गायबले का

ट्रेड मार्क
Mon, 08/27/2018 - 23:01 नवीन
सगळे गायबले का प्लॅन बनवायचं काम जोरात सुरु आहे? कधी बघायला मिळेल प्लॅन?

४

प्रसाद गोडबोले
Tue, 08/28/2018 - 02:34 नवीन
४

३

प्रसाद गोडबोले
Tue, 08/28/2018 - 02:35 नवीन
३
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

२

प्रसाद गोडबोले
Tue, 08/28/2018 - 02:35 नवीन
२
  • «
  • ‹
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा