रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ठरलं तर मग
कुठला तरी (काल्पनिक?)
!
बिरुटे सर
>>निर्णय १ - कसा चुकला आणि
चाचा
अहो पण त्यांनी केली ना
एक उद्दिष्ट असू शकेल जे
मोदींचं उद्दिष्ट काही का असेना
हे सगळे प्रॉब्लेम सोडा, वन
अहो थत्तेसाहेब
तुम्ही मोदींनी काय केलं ते सोडा.
वन टाईम नोटबंदी करून यातले काही प्रॉब्लेम तरी सुटतील असा समज आहे का तुमचा?माझा असा समज आहे की तुम्ही, प्रा. डॉ. वगैरे हुशार मंडळी सहज हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक मस्त प्लॅन देऊन शकाल. कृपया हा समज चुकीचा ठरवू नका. मोदींच्या कृतीला मास्टर स्ट्रोक म्हणून वाहवा करणारे, स्वतः मोदी, त्यांचे तथाकथित पेड मीडिया वाले, संघी, भाजपावाले, मिपावरील मोदींचे समर्थन करणारे सगळे बाजूला ठेवा. ते मूर्ख आहेत असं तुमचं पक्कं मत आहे ना? मग कशाला उगाच त्यांच्या नादी लागताय?वाद नाहीचे, आपलं उद्दिष्ट फक्त प्लॅन तयार करणे
कपिलमुनी ??
पण असं का?
असं लॉजिक असेल तर…
शिक्के मारत नाहीये
उनको साठ साल दिये, मुझे ६० महिने दीजिये असं त्यांनी सांगितलं. ते त्यांना दिलेत.दिलेत ना? मग त्यांच्या वकुबाप्रमाणे त्यांनी केलं आणि करत आहेत. मी आधीच म्हणल्याप्रमाणे त्यांना (त्यांना म्हणण्यापेक्षा त्यांच्या कृतीला) नावं ठेवण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार सुद्धा आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की, नोटबदली वगैरे निर्णय जे चुकले असं तुम्ही म्हणताय तर त्याबदल्यात काय करता आलं असतं हे तुम्ही सांगावं. आता कोणी जर चुकीची कृती केली असेल तर त्याला आपण नुसतं तू चूक केली असं सांगून काय होणार? बरोबर काय ते पण सांगायला पाहिजे ना? मी काय म्हणतो, प्रयत्न तर करून बघायला काय हरकत आहे? प्लॅन चुकला तर चुकला, असं म्हणतात जो काहीतरी करतो त्याच्याकडूनच चुका होतात. मग कोण स्वीकारतंय चॅलेंज?विराट कोहलीला काय अक्कल आहे
हाहाहाहा
हायला
हायला
ह्या नियमाने तर काथ्याकूट बंद करुन रोजची काकडाआरती ते शेजारती धागा चालु करायला काही हरकत नाहीये.हे काही कळलं नाही. इथे कोणीच कुठला नियम घालून दिलेला नाहीये. पाहिजे तसे आणि पाहिजे तसे (अर्थात मिपाच्या नियमात बसतील असे) धागे आपल्या सर्वांनाच काढता येतात.मी काहीहि लिहिणार, ते बरोबरच असणार, मी प्रतिवाद करणार नाही, माझी तो करायची इच्छा नाही.आजकाल याला फॅसिस्ट वृत्ती म्हणतात. बऱ्याच जणांचा हा पण आरोप आहे की मोदी असंच करतात.उदित नारायण मोड: वाह! क्या
गैरसमज
तेच ना, बाहेर जाणार्या
तुम्हाला साधारणपणे
मूर्खपणाला विरोध केला
?????
बा द वे त्या तुमच्या
एक शहाणा ( उंटावरचा)
गोडसे साहेब
नोटबंदी फेल गेल्याचं बरंच जिव्हारी लागलेलं दिसतंय.फेल गेली हे सिद्ध करा. केवळ मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणात उल्लेख केला नाही म्हणून फेल झाली असं म्हणणं हा मूर्खपणा आहे.मूर्खपणाला विरोध केला हे चुकीचे नव्हते हे सिद्ध झालेच आहे.मूर्खपणा हा सापेक्ष असतो. तुम्ही ज्याला मूर्खपणा समजताय त्याला शहाणपणा (मास्टरस्ट्रोक?) समजणारे लोक पण बरेच आहेत. त्यांना ते मूर्ख कसे आहेत हे समजावून द्यायला, काय चुकलं आणि बरोबर काय होतं किंवा कसं चांगल्या पद्धतीने करता आलं असतं/ येईल हे सांगा. हेच मी गेले २ दिवस सांगतोय की प्लॅन द्या, तर सगळे झुडुपाच्या आजूबाजूला मारत बसलेत.तूम्ही दिलेले प्रॉब्लेम सोडविण्यासाठी एकमेव फुलप्रूफ प्लॅन असूच शकत नाही.दिलेली यादी मुख्यत्वे पैश्यांशी निगडित अडचणींची आहे. ते सोडवण्यासाठी एकच प्लॅन द्या असं कुठे म्हणलंय, एक द्या किंवा एका पेक्षा जास्त प्लॅन द्या. पण द्या तर खरं! पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर नोटबंदी हेच एकमेव पाऊल मोदींनी उचललंय असं दाखवून आरडाओरडा होतोय ना?सरकारने फक्त देशातील सर्व लोकप्रतिनिधी व सरकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्रोत तपासले तर बराच काळा पैसा बाहेर येईल. काळा पैसा निर्मितीत आणि मुरवण्यात हेच आघाडीवर आहेत.यात हे मुख्य असले तरी बाकी पण बरेच लोक सामील आहेत. आम्ही बँकेच्या वसुलीला गेलो असताना एकाने नोटा भरलेली एक खोली उघडून दाखवली होती. म्हणजेच त्याच्याकडे पैसे होते पण बँकेत भरायचे नव्हते. रोख होते म्हणजे अनैतिक मार्गानेच मिळवले असणार. आता हा एक माणूस झाला, असे देशात किती असतील विचार करा. हे पैसे कसे बाहेर काढायचे?फुलप्रूफ चा दावा मी कधीच केला नव्हता.फुलप्रूफ राहूदे, पण प्लॅन तर द्या. मग आपण चर्चा करू. काय?>>म्हणजेच त्याच्याकडे पैसे
चाचाजी
नसली दिलीत तर काळा पैसा नष्ट व्हावा अशी तुमचीही इच्छा नाही असे दिसते किंवा हा खोलीभर नोटावाला भाजपचा असेल किंवा ही खोलीभर नोटांची ष्टोरी बंडल आहे असे म्हणावे लागेल.स्टोरी काँग्रेसच्या काळातली आहे आणि पैसे साठवून ठेवणारा काँग्रेसचा नगरसेवक होता. त्यामुळे तक्रार करून काही फायदा नव्हता आणि त्यावेळेला सरकारने भ्रष्टाचाऱ्यांची माहिती द्या असे काही आवाहनही केले नव्हते कारण संपूर्ण सरकारच भ्रष्टाचारी होते.१. नोटाबंदीनंतर "काळा पैसा असणारे लोक बँकेत भरणार नाहीत कारण प्रश्न विचारले जातील" असं जेटली म्हणाले. म्हणजे काळा पैसा नष्ट होईल अशी सरकारची अपेक्षा होती. २ आणि ३ हे मुद्दे...पहिले काळा पैसा म्हणजे काय ते बघा. जे व्यवहार कर चुकवण्यासाठी रोखीत केले जातात आणि त्यातून मिळालेला पैसा ना बँकेत भरला जातो ना कुठे नोंद होतो. म्हणजे जर रिझर्व्ह बँकेने एकूण बाजारात १६ लाख कोटी वितरित केले असतील पण त्यातले फक्त १२ लाख कोटीच चलनवलनात असतील. म्हणजे ४ लाख कोटी कुठे तरी दडून बसले आहेत आणि त्याचा वापर अवैध गोष्टींसाठी होतो आहे. हे पैसे जर बँकेत जमा झाले तर परत चलनात आले ना? तुम्हाला आठवत असेल तर रोख बँकेत भरण्यासाठी या धनदांडग्यांनी लोकांना नियुक्त केलं होतं. अशी अचानक पैसे भरली जाणारी खाती सरळ सरळ बाजूला काढता आली. आपल्या लोकांची एक खासियत आहे, करू नका सांगितलं की करायचं. म्हणजे बँकेत भरणार नाहीत असं म्हणलं की लोकांनी बँकेत भारण्यासाठीचे उपाय शोधून काढले. कुठल्या का मार्गाने होईना पण हा दडून बसलेला पैसा बाहेर तर आला!४. टीव्हीवर सांगितलेल्या उद्दिष्टांपैकी टेरर फायनान्सिंग वाला भाग तात्पुरता यशस्वी झालेला दिसला. पण एकुणात दहशतवादावर काही विशेष परिणाम झाला नाही.तुमची काय अपेक्षा होती की एक फक्त कारवाई केली की दहशतवाद पूर्णपणे थांबेल? तरी पण बराच फरक पडला आहे हे तर तुम्हीच मान्य करताय. काश्मीर मधील दगडफेक आता किती प्रमाणात होतेय? नक्षलवाद पण बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. हे या सरकारच्या आधी कधी झाल्याचं आठवत असेल तर पुरावे द्या.सर्व बाबी नोटबंदी फेल झाली असेच दर्शवतात.अहो मग मी गेले २-४ दिवस तेच तर म्हणतोय की तुम्हाला फेल झाली असं वाटतंय तर मग या प्रतिसादात सांगितलेल्या प्रॉब्लेम्स ना सोडवण्यासाठी एक किंवा अनेक प्लॅन तर द्या. नसेल तर हार मान्य करा, काय?फेल गेली हे सिद्ध करा.
ट्रेड मार्क साहेब
तुझं माझं जमेना अन्
डॉक्टरसाहेब
मोदीं भाजप किंवा रा स्व
मार्मिक
यशस्वी झाल्याचे तुम्हीच सिद्ध करा.वर चाचाजींना दिलेला प्रतिसाद वाचा.जगात एक समुदाय आहे जो पृथ्वी गोल नसून चपटी आहे असा दावा करतो.तुम्ही या समुदायात मोडताय असं वाटतंय. वर्ल्ड बँक, आयएमएफ यासारख्या संस्थांनी मोदींच्या निर्णयांची पाठराखण केली आहे. जसे नासाने जरी पृथ्वी गोल आहे म्हणून सांगितले तरी पृथ्वी चपटी आहे म्हणणारा समुदाय ऐकत नाही तसेच जागतिक तज्ज्ञांनी सांगूनसुद्धा तुम्ही ऐकत नाही.एकात्मिक कीडनियंत्रणासाठी उपलब्ध अनेक पर्याय वापरले जातात , ज्यामुळे कीड संपूर्ण नष्ट जरी होत नसली तरी बरीच आटोक्यात येते. हेच काम सरकारने करायचे आहे, लाचलुचपत, प्राप्तिकर, सुरक्षा यंत्रणांना कामाला लावून नियंत्रणात आणायचे आहे.बरोबर. पण मग जर कीड नष्ट करण्यासाठी काहीच कीडनाशक न फवारता नष्ट करता येईल का? लाचलुचपत, प्राप्तिकर, सुरक्षा यंत्रणा हे सगळे बऱ्याच वर्षांपासून होते पण त्याचा काय उपयोग होत होता? Pesticide Paradox हे कधी ऐकले नसेल तर गुगलून पहा. अश्या वेळेला काय करायला लागतं हे पण शोधा.चहावाला, पकोडे विकणारा ह्यांचे व्यवहार रोखीत होतात, शेतकऱ्याला सुद्धा शेतमाल विक्रीतून रोख पैसे मिळतात ,मग तो पैसा अनैतिक होतो का?पैसा अनैतिक नसतो तर तो मिळवण्याचा मार्ग अनैतिक असू शकतो. जर मिळकत उत्पन्न म्हणून न दाखवता कर चुकवला तर तो काळा पैसा होतो. उदाहरण म्हणून - पुण्यातला एक वडापाववाला रोज दोन एक हजार तरी वडापाव विकत असेल, १० रुपयांना एक वडापाव म्हणलं तर २०,००० रुपये रोज रोख जमा होतात. हा माणूस कच्चा माल रोखीत घेतो, कामगारांना पण रोखीत पैसे देतो. यातलं कोणीच कर भरत नाही. हे सगळे लोक त्यांना घरी लागणाऱ्या वस्तू पण रोखीत घेतात. मालक त्याच्या बायकोला सोन्याचे दागिने घेतो ते पण रोखीत घेतो. बिल नको असं सांगितल्याने त्याचे कराचे पैसे वाचतात. हा माणूस फ्लॅट घ्यायला जातो तेव्हा जास्तीत जास्त रोखीत पैसे देतो. आता बरीच वर्ष धंदा करत असल्याने बरीच रोख जमा झाली आहे, मग गुंतवणूक म्हणून हा नवीन हाऊसिंग स्कीम मध्ये पैसा लावतो, म्हणजे काय करतो तर नुसती स्कीम जाहीर केली की १० फ्लॅट ची बुकिंग अमाऊंट भरतो. जसं जसं बांधकाम चालू होतं तसा भाव वाढत जातो मग हा चढ्या भावाने हक्क विकून अजून पैसे मिळवतो. अशी ही सगळी रोखीची साखळी तयार होते. यात नुसतं कर नुकसान होतं असं नाही तर मधेच कोणीतरी इतर अवैध धंद्यात असतो तो या रोखीचा वापर तिकडे करू लागतो. बिल्डर गुंडांना रोख देऊन एखादी जमीन हडपतो. ईई. हेच जर या वडापाव वाल्याने हे रोख पैसे बँकेत भरले आणि सरळ सरळ जे उत्पन्न मिळतंय त्यावर कर भरला तर हा सगळा प्रश्नच येणार नाही काय. म्हणजे फक्त नोकरदार लोक जे नाईलाज म्हणून कर भरतात त्यात हे असे व्यावसायिक पण कर भरायला लागून करसंकलन वाढेल. हे सगळं सांगतोय मी पण आता तुम्ही तो प्लॅन द् यायचं तर बघा.२०१९ आल !! आता तरी कंबर कसुन
Please read these 5 comments.
अभिजित बुवा
नोटबंदी झाली. नंतर टॅक्स
एकदा लाल चष्मा लावला कि असे
डॉ.खरेच काय बीजेपीचे आयटी
मी आपल्या कोणत्याच वाक्याचा
ब्वॉर .
सगळे गायबले का
४
३
२