✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नोटबंदी गैरव्यवस्थापन माजी पंतप्रधानांची जबाबदारी ?

म
माहितगार यांनी
गुरुवार, 11/24/2016 - 16:07  ·  लेख
लेख
माननीय मनमोहनसिंगजी, मोदी सरकारने रु ५०० आणि रु १००० या नोटांचे निर्मुल्यन केल्या संबंधाने आपण आपले राज्यसभेतील टिकात्मक भाषण वाचनाचा योग आला. रु ५०० आणि रु १००० या नोटांचे निर्मुल्यनाच्या उद्दीष्टांबद्दल आपणास शंका नसल्याचे आपण म्हटले आहे. प्रश्न केवळ इंप्लीमेटॅशन (अमलबजावणी) मधील त्रुटींचा आहे या त्रुटी म्हणजे भलेमोठे गैरव्यवस्थापन आहे असे आपण आपल्या भाषणातून म्हटले आहे. दोन आठवडे कालावधीनंतरी ज्या प्रमाणात सामान्य जनतेस चलन उपलब्ध होणे अवघड जात आहे ते पाहता अमलबजावणी आणि व्यवस्थापनात त्रुटी शिल्लक राहील्या हे निश्चित. जुने चलन बाद केल्यानंतर नवे चलन किती लागेल आणि नव्या चलनाच्या छपाईस किती वेळ लागेल इत्यादी गणिते इकॉनॉमीक सेक्रेटरी आणि रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर यांच्या बोटावर असणार त्या गणितात ते खूप चुकले असतील अशी संभावना कमी आहे. कॅश वाहून नेण्यास सुरक्षा रक्षकांसहीत सक्षम वाहने किती आहेत आणि १००च्या नोटांसाठी अधिक वाहने अधिक सुरक्षा रक्षक लागतील का ? एटीएमचे रि कॅलिब्रेशन करण्यासाठी अधिक अधिक इंजिनीअर्स आणि तंत्रज्ञांचा ताफा लागेल का ? डिजीटल तंत्रज्ञानाकडे किती ट्रँझॅक्शन्स वळवावे लागेल आणि सामान्य सजनेस डिजीटल तंत्रज्ञान डेबीट कार्ड इत्यादी वापराची जागरूकता अभियानाच्या गरजा काय असू शकतील ? या मुद्द्यांवर काम करण्यास सध्याचे सरकार कुठेतरी कमी पडले हे स्प्ष्ट दिसतच आहे. यातील डिजीटल तंत्रज्ञानाचा भाग अलिकडचा गेल्या दशकाभरातला याला काही क्षणासाठी बाजूला ठेऊ. जे गैरव्यवस्थापन आणि त्रुटी शिल्लक राहील्या त्याचे मोदी सरकारचे आणि सध्याच्या आरबीआयच्या गव्हर्नरांचे माप त्यांच्या पदरात नक्कीच टाकू. माननीय मनमोहनसिंगजी, आपण ज्ञान आणि अनुभवाने या सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहात आणि आपण महत्वाच्या प्रसंगी भारतीय अर्थव्यवस्थेस सावरुन धरण्यात मोठी कामगिरी बजावलीत त्या बद्दल आदरच आहे. आता आपण विरोधीपक्षात आहात, विरोधीपक्षात बसून दोष दिग्दर्शनाची जबाबदारीही (उत्तमपणे ?) निभावताय आणि विरोधीपक्ष जिवंत असल्याचे दिसते आहे हे पाहून बरेच वाटते पण प्रश्न राहतो तो नोटांचे निर्मुल्यन करून नवीन नोटा व्यवहारात उपलब्ध करुन देताना राहीलेल्या त्रुटींच्या जबाबदारींची चर्चा करताना मागील सरकारांची आणि आरबीआय मध्ये मागील काळात जे कामास होते त्यांची सुद्धा जबाबदारी निश्चीत करण्याचा. माननीय मनमोहनसिंगजी, भारतातील काळ्या पैशाचा रोग अती जूना आहे आणि चलन न्रिर्मुल्यन हा त्यावरील एक महत्वाचा उपाय आहे हे आपल्यापेक्षा अधिक चांगले कुणास ठाऊक असेल ? मोदी सरकारने चलन निर्मुल्यन आत्ताच करावे एवढी इमर्जन्सी आत्ता होती किंवा नव्हती हा कदाचित वादाचा विषय असेल याचा निकाल काळाच्या ओघात इतिहास देईलच पण इकॉनॉमीक इमर्जन्सी विवीध कारणाने जगातल्या कोणत्याही देशा च्या कोणत्याही सरकार समोर येऊ शकतात याची आपणास कल्पना नसेल असेही संभवत नाही. असे चलन निर्मुल्यन अचानक करावे लागले तर ऐनवेळेची पळापळ नको म्हणून त्यासाठी काय पुर्वतयारी असावयास हव्यात आणि त्या किमान प्रमाणावर प्रत्येक सरकारने केलेल्या असावयास हव्यात की नको ? माननीय मनमोहनसिंगजी, आपण १९७० -७६ असा दीर्घकाळ भारत सरकारच्या सल्लागारपदांच्या विवीध पदांवर काम केलेले आहे, १९८२ ते ८५ आरबीआयचे गव्हर्नर होता, चलन निर्मुल्यनाच्यावेळी काय स्वरुपाची यंत्रणा लागते त्याचा तुम्हाला तेव्हा आढावा घेण्याची संधी येऊन गेली असेल, १९८५ ते १९८७ या कालावधीत नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद आपण भूषवले आहे त्या कालावधीत आवश्यक यंत्रणेसाठी लागणार्‍या तरतूदी करून ठेवण्याची आपणाकडे संधी होती, १९९१ ते १९९६ तब्बल पाच वर्षे आपण अर्थमंत्री पद सांभाळले आणि २००४ ते २०१४ एवढा मोठा काळ पंतप्रधानपद सांभाळले ज्या काळात यंत्रणेच्या गरजा तपासणे, आर्थिक आणि व्यवस्थापन विषयक नियोजनाची तयारी करुन ठेवणे आपणास निश्चित शक्य असावे किमानपक्षी आता आल्या आहेत तशा अडचणी येऊ शकतात याची आपण कुठे तरी नोंद करून ठेवलेली असणे अभिप्रेत असावे आणि म्हणून जे काही गैरव्यवस्थापन झाले आहे त्यात मोदी सरकारच्या सोबतच नैतीक जबाबदारीचे हक्कदार म्हणून अंशतः तरी आपल्याकडे का पाहू नये ? आम्ही सामान्य नागरीक सत्ताधारी अथवा विरोधीपक्षात नाही आहोत टिका करावयाची म्हणून टिका यात रस नाही. भारतासाठी अण्वस्त्र सज्जतेसाठी पुर्वाश्रमीच्या काँग्रस सरकारांनी परिश्रम घेऊन ठेवले आणि निर्णय घेण्याच्या वेळी भाजपा सरकार होते आम्ही क्रेडीट दोन्ही पक्षाच्या सरकारांना दिले. जी व्यवस्थापन विषयक पुर्वतयारीत अण्वस्त्र आणि कदाचित इतरही अजून बर्‍याच गोष्टीत काँग्रेस सरकारांनी आणि आपण केली असेलही त्या बद्दल नावे ठेवण्याचा उद्देश नाही, पण चलन निर्मुल्यनासाठीच्या पुर्व तयारीच्या सहभागात आपण आणि काँग्रेस कुठे कमी पडली नाही ना ही सामान्य नागरीक म्हणून आलेली शंका आहे. विषय निघालाच आहे तर १९९१ ते १९९६ या काळात आपण जाचक आयातकर अत्यंत वेगाने कमी करत नेले याचा आयात वस्तु विकणारा एक सामान्य विक्रीप्रतिनिधी म्हणून मी आठवण जतन केली आहे त्या काळात अर्थमंत्र्यांचे बजेट भाषण सुट्टी टाकून ऐकत असे आणि नंतर वाचत असे त्याच कालावधीत वस्तुंच्या उत्पादनावरील कर आपल्या सरकारने त्याच प्रमाणात का कमी केले नाहीत भारतात निर्मित वस्तु पेक्षा आयात वस्तु स्वस्त होऊ देण्या मागील आपली भूमिका आजतागायात मला व्यक्तीशः समाधानकारकपणे उलगडलेली नाही. आम्ही सामान्य नागरीक आपल्या ज्ञान आणि अनुभवाएवढी उंची गाठू शकत नाही मनात शंका येणे स्वाभाविक असते या शंकांसाठी आपल्याकडे निश्चित उत्तरे असतील. मिसळपावसारख्या संस्थळावर तेही मराठीतून उत्तरे देणे आपणास शक्य असणार नाही त्यामुळे माझेच लेखन बरोबर असा माझा कोणताही अट्टाहास नाही चुक भूल देणे घेणे. माननीय मनमोहन सिंगजी, एकुण मनाला सलणारी हि शंका शिल्लक आहे, आपल्या टिकेतील गैरव्यवस्थापनाचे माप अंशतःतरी आपल्याही पदरात पडत नाही का? आभार आपला आदर करणारा भारताचा एक सामान्य नागरीक
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थकारण
अर्थव्यवहार
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिक्रिया
मत

प्रतिक्रिया द्या
59988 वाचन

💬 प्रतिसाद (203)

प्रतिक्रिया

५०० व १००० च्या नोटा रद्द करून

अमर विश्वास
गुरुवार, 11/24/2016 - 20:38 नवीन
५०० व १००० च्या नोटा रद्द करून तितक्याच किंमतीच्या नवीन नोटा छापतील असे वाटत नाही ... (म्हणजे circulation मध्ये आणणार नाहीत ) मी जे वाचाले / ऐकले त्यावरुन नवीन नोटांची एकुण किंमत जुन्या नोटांपेक्षा कमी असेल...
  • Log in or register to post comments

आमेन ..

चौकटराजा
गुरुवार, 11/24/2016 - 20:45 नवीन
असेच होवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

किती कमी व का?

मार्मिक गोडसे
गुरुवार, 11/24/2016 - 20:53 नवीन
किती कमी व का?
  • Log in or register to post comments

का व किती ?

अमर विश्वास
Fri, 11/25/2016 - 00:28 नवीन
मार्मिकजी का व किती ? यातील किती चे उत्तर माझ्याकडे नाही कारण डिमॉनिटायझेशनच्या कन्सेप्ट मध्ये याचा उल्लेख होता पण अजून रिझर्व्ह बँकेने या बद्दल Official स्टॅमेंट दिलेले नाही. का? या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो... डिमॉनिटायझेशनच्या आधी ५०० आणि १००० च्या नोटांचे एकूण मूल्य, सगळ्या चाल मुल्याच्या ८५% होते . हे प्रमाण इतर कुठल्याही अर्थव्यवस्थेपेक्षा खूप जास्त होते. हे प्रमाण कमी करण्याची ही उत्तम संधी आहे मी आधीही एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे डिमॉनिटायझेशन मुळे बँक मनी मध्ये थोड्या प्रमाणात वाढ होईल . (आत्ता जमा झालेला सगळा पैसा तसाच बँकेत राहणार नाही त्याचप्रमाणे सगळा पैसे परत रोख रकमेच्या स्वरूपातही राहणार नाही ) त्यामुळें रिझर्व्ह बँक २००० च्या नोटा कमी करून अप्रत्यक्षरित्या रोख रक्कम कमी करायला हातभार लावू शकते. अर्थात अजून या पातळीपर्यंत पोचायला खूप वेळ आहे. सध्या रोख रक्कमेची कमतरता आहे ... त्यामुळें अजून महिनाभर तरी रिझर्व्ह बँकेचे मुख्य उद्दिष्ट पुरेशा प्रमाणात रोख रक्कम पुरवणे हेच राहणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

मनमोहनसिंग आणि स्वाभिमान

गामा पैलवान
गुरुवार, 11/24/2016 - 21:21 नवीन
डॉक्टर सुहास म्हात्रे,
एखादा उत्तम भूतकाळ असलेला अभिमानी माणूस राजिनामा देवून मंत्रीपरिषदेतून (किंबहुना राजकारणातून) बाहेर पडला असता. ते मनमोहन सिंग यांना का जमले नाही, हा यक्षप्रश्न आहेच.
माझ्या मते याचं कारण काय आहे ते सांगतो. मनमोहनसिंगांच्या आडून सोनियाला राज्यकारभार हाकायचा होता. जर सिंगांनी राजीनामा दिला असता तर सोनियाने त्यांची अंडीपिल्ली बाहेर काढली असती. मनमोहनसिंगांची अंडीपिल्ली काय आहेत? त्यांनी रिझर्व बँकेचे संचालक असतांना १९८३ (किंवा आसपास) बीसीसीआय नामे एका बदनाम बँकेस भारतात व्यवहार करावयास परवानगी (= बँकिंग लायसन्स) दिली होती. याच्या बदल्यात त्यांच्या एका मुलीला ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला. आता बीसीसीआय ही अफरातफर करून जगभरातला पैसा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय कडे वळवणारी बँक आहे हे सगळ्यांना माहीत होतं. तरीपण मनमोहन भुलले आणि टेररिस्ट फायनान्सिंग करून बसले. त्याची फळं भारतीयांना भोगावी लागली. कशी ते सगळ्यांना माहितीये. :-( आ.न., -ग.पै.
  • Log in or register to post comments

बापरे!!!

सानझरी
Fri, 11/25/2016 - 11:43 नवीन
बापरे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

बीसीसीआय

प्रदीप
Fri, 11/25/2016 - 16:00 नवीन
१९९१ सालपर्यंत जगात सर्वत्र अधिकृतरीत्या व्यवहार करत होती. त्यासाली तिच्यावर रन झाला व ती बुडली. १९८३ साली तिच्याबद्दलचे ड्यू डिलीजन्स करून कुणाला तिची खरी परिस्थिती समजली असती, तर त्यानंतर ती जगातील सर्वच फायनॅन्शियल सेंटर्समधे पुढील इतकी वर्षे कशी कार्यरत राहिली असती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

प्रश्न समर्पक आहे

गामा पैलवान
Fri, 11/25/2016 - 21:03 नवीन
प्रदीप, तुमचा प्रश्न समर्पक आहे. नेमका अशाच तऱ्हेचा प्रश्न संसदेत मनमोहनसिंगांना विचारला होता. त्यावर माननीय सिंगसाहेब मिठाची गुळणी धरून बसले होते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

अहो काय वाटेल ते बोलत आहात

वरुण मोहिते
गुरुवार, 11/24/2016 - 21:34 नवीन
मुली च्या ऍडमिशन साठी कोण असं करेल का?? टीका जरूर करा पण काहीपण आरोप कशाला
  • Log in or register to post comments

संसदेतली चर्चा

गामा पैलवान
Fri, 11/25/2016 - 02:20 नवीन
वमो, मुलीला मिळालेला प्रवेश हे केवळ बक्षीस आहे. यामागचं खरं कारणं टेररिस्ट फायनान्सिंग आहे. यासंबंधी संसदेत झालेली चर्चा इथे आहे : http://parliamentofindia.nic.in/ls/lsdeb/ls10/ses1/13070891.htm आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

गापै तुमची आद्याक्षराने संबोधण्याची शैली रोचक आहे

मारवा
Fri, 11/25/2016 - 10:22 नवीन
यातुन येणारे रीझल्ट रोचक आहेत. यातुन टफी वमो असे आले एखादा नमो येइल कधी तरी मला काय मावा संबोधाल का गापै ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

रोचक शैली? हाहाहा!

गामा पैलवान
Fri, 11/25/2016 - 13:38 नवीन
अहो, निव्वळ आळस आहे हो! :-) तुम्ही फक्त मा. = माननीय बरंका. उगीच भलतेसलते अर्थ काढू नका बरें. ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

(No subject)

अनुप ढेरे
Fri, 11/25/2016 - 09:44 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

चपखल !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 11/25/2016 - 10:41 नवीन
चपखल ! भाषणातली भाषा पाहता, माझ्या मते मनमोहन सिंग यांना दुसर्‍या कोणी लिहीलेले भाषण वाचण्याची सक्ती केलेली दिसते. तसे पाहिले तर मनमोहन सिंग यांच्यावर काहीही करण्याची/ बोलण्याची (किंवा न करण्याची / न बोलण्याची) सक्ती करणे फारसे कठीण नाही, हे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत दिसून आलेच आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

ते बोलले हे महत्वाचे. काय

मृत्युन्जय
Fri, 11/25/2016 - 12:49 नवीन
ते बोलले हे महत्वाचे. काय बोलले हे तितकेसे महत्वाचे नाही कारण अखेर ते देखील राजधर्माने बांधील आहेत. सरकारी धोरणांवर टीका करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. पण पाच वर्षात ज्या माणसाचे शब्द ऐकणे ही दुर्मीळ गोष्ट होती तो माणुस अखेर बोलला यामुळेच भारतीय जनतेला धक्का बसला असेल. कद्दाचित मैन सोडण्याचे वरुन आदेश आले असावेत. पण टीका करताना इतक्या विद्वान माणसाने अंमलबजावणीतल्या त्रुटींवर चर्चा केली असती तर ते जास्त योग्य झाले असते. पण माजी पंतप्रधान वदले "organised loot and legalised plunder". नुसते लूटमार झाली म्हणुन आरडाओरडा केला की झाले. यात नक्की लूटमार कशी झाली हे काही केल्या कळत नाही आहे. २जी, कोल्जी, दामादजी या सगळ्यांवर "मौन" हाच एक मुखवटा धारण करणारे नोटाबंदीला "organised loot " म्हणतात तेव्हा सखेद आश्चर्य वाटल्यावाचुन राहवत नाही. फारतर एखादा माणूस म्हणेल की हा निर्णय "उपयोगशून्य आहे", "यातुन काहीही होणार नाही" पण तरीही ही "संघटित लूटमार" कशी आहे ते कळेना. मनमोहन सिंगांनी अजुन एक फारच स्फोटक विधान केले ""Those who say demonetisation is good in the long run should recall the quote: 'In the long run we are all dead'." ममोंच्या या वक्तव्याचा अर्थ असा होतो की भवितव्याचा विचार करुन कुठलेही काम करु नका. कारण एकुणात काय आपण मरणारच आहोत. त्यामुळे अजुन २५ वर्षांनी आपण अर गेल्यावर समाजाला काही फायदा होणार असेल तर त्याचा विचार कशाला करा? यानिमित्ताने एक बोधकथा आठवली: " सत्तरीतले एक आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेउन बागेत आंब्याचे झाड लावत होते. नातवाने निरागसपणे विचारले की मग पुढच्या महिन्यात तुम्ही या झाडाला लागलेले आंबे खाणार का? आजोबा सस्मित उत्तरले "नाही बाळा. झाडाला आंबे लागायला तर कैक वर्षे लागतील. तोवर कदाचित मी नसेन. " नातवाने आश्चर्याने विचारले की मग तुम्ही झाड का लावत आहात. त्यावर आजोबांनी दिलेले उत्तर फार मार्मिक होते "बाळा या झाडाचे आंबे तु खाऊ शकशील. असे बघ सध्या आपणा ज्या झाडाचे आंबे खातो ते माझ्या आजोबा / पणजोबांनी लावले होते." पण बहुधा मनमोहन सिंगांना असे सुचवायचे असावे की प्रत्येकाने आपल्यापुरते बघावे. फ्युचर गया भाड मे. क्योकि " इन द एंड वी ऑल विल बी डेड इन द लॉंग रन" मनमोहन सिंग आज ८४ वर्षाचे आहेत. जेव्हा ते पंप्र झाले तेव्हा देखील ७२ वर्षांचे होते आणि पाय उतार झाले तेव्हा ८२ वर्षांचे. जर त्यांचा दृष्टीकोन 'In the long run we are all dead' असाच असेल तर त्यांच्या काळात ते इतके निष्क्रिय का होते याचे उत्तर कदाचित त्यांच्या विचारसरणीतच असु शकेल. असो. असोच.
  • Log in or register to post comments

काय बोलले हे तितकेसे महत्वाचे

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 11/25/2016 - 13:40 नवीन
काय बोलले हे तितकेसे महत्वाचे नाही कारण अखेर ते देखील राजधर्माने बांधील आहेत. या एका वाक्यात सद्याचा भारतीय राजधर्म किती नीच पातळीवर पोचला आहे हेच सुचीत होत नाही काय ? असंबधित, विपर्यास करणारे, अर्धसत्य, इतकेच काय सरळ सरळ असत्य बोलणे हे सर्व राजकारणाच्या नावाखाली खपून जाऊ लागले आहे. यामागे, एकतर "मला कोणी काहीही करू शकत नाही" ही गुर्मी आहे, किंवा "बुद्दू भारतिय नागरिकांना काहीही/कसेही सांगून ते खपवता येते आणि त्यातून आपला स्वार्थ साधता येतो" असा विश्वास आहे. ही सद्य भारतीय राजकारणातील दुर्दैवी पण सत्य परिस्थिती आहे. मुख्य म्हणजे याबाबतीत तथाकथित अशिक्षित व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेतेच नव्हे तर; विचारी, तज्ञ आणि उच्चविद्याविभूषित (यांना मी सुशिक्षित म्हणू शकत नाही) समजले जाणारे नेतेही हिरीरीने पुढे आहेत ! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

टाळ्या!

पैसा
Fri, 11/25/2016 - 12:54 नवीन
मनमोहनसिंगांना बोलता येते हे सिद्ध झाले ना!
  • Log in or register to post comments

मनमोहन सिंगांच्या अर्थविषयक

पुंबा
Fri, 11/25/2016 - 13:06 नवीन
मनमोहन सिंगांच्या अर्थविषयक ज्ञानावर लोकांचा विश्वास आहेच. अर्थसुधारणांचे जनक या नात्याने त्यांच्या मताला सामन्यांत, तसेच थोडेबहुत अर्थसाक्षर, वाचणाऱ्यांत, विचार करणाऱ्यांत आणि वरिष्ठ मध्यमवर्गीय यांच्यात देखील किंमत आहे. सध्या दिसतंय असं कि सर्वसामान्यांना सगळ्यात जास्त त्रास होतोय मात्र ते इतके नाखूष नाहीयेत या निर्णयावर. त्यांना याचे दूरगामी परिणाम चांगले असतील असा विश्वास आहे म्हणूनच इतका fiasco होऊनदेखील सरकारची authority शाबूत आहे. गरीब, निम्न मध्यमवर्गीय लोकांना हा त्रास असह्य वाटत नाहीये मात्र मध्यमवर्गीय अधीर झालेत. या सगळ्यामुळे काँग्रेस ने असा विचार केला की मनमोहन सिंगांनी जर authoratatively या निर्णयाच्या विरोधात भाष्य केले तर सरकारची legitimacy आपण धोक्यात आणू शकतो कारण gdp 2 टक्क्यांनी कमी होईल हि खूप अपशकुनी भविष्यवाणी आहे. यामुळे मध्यमवर्गीयांत सरकारविषयी संशय निर्माण होऊ शकतो. ममता, केजरीवाल असल्या अडाण्यांचं लोक ऐकत नाहीत मात्र सिंग बोलले तर परिणाम होऊ शकेल अशी आशा काँग्रेस ला आहे. जर खरंच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाले तर bjp साठी परिस्थिती अवघड होईल मात्र जर posotive परिणाम दिसले, ज्याची शक्यता जास्त आहे, तर मात्र मनमोहन सिंगांची क्रेडिबिलिटी ढासळेल काँग्रेसला काही फरक पडणार नाही. त्यामुळे मनमोहन सिंग हे नेहमीप्रमाणेच काँग्रेस साठी प्यादे बनले. Queen is the real power, this man is nobody.
  • Log in or register to post comments

+१

NiluMP
Fri, 11/25/2016 - 21:36 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

मनमोहन सिंग यांचे कालचे भाषण

श्रीगुरुजी
Fri, 11/25/2016 - 15:42 नवीन
मनमोहन सिंग यांचे कालचे भाषण बघून अत्यंत वाईट वाटले. ते भाषण मनमोहन सिंग या अर्थतज्ज्ञाचे नसून गांधी घराण्याच्या निष्ठावंत सेवेकर्‍याचे होते असेच वाटत राहिले. ५००/१००० च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला "संघटित लूट" म्हणणे हे पराकोटीचा विपर्यास होता. 'In the long run we are all dead' हे ऐकल्यावर हे मनमोह्न सिंगच बोलत आहेत का त्यांच्या मुखातून साक्षात पप्पू किंवा केजरीवाल किंवा संजय निरूपम बोलत आहेत अशीच शंका आली. भविष्यात आपण नसू त्यामुळे आता काहीही करू नका असेच त्यांचा सांगायचे होते का? तसे असेल तर भविष्यातील पर्यावरण, राहणीमान, देशाचे संरक्षण, देश नावाची संकल्पना इ. सर्वांनी विसरूनच जायला हवे कारण तेव्हा आपण नसू. नोटा रद्द करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीतील त्रुटी न दाखविता किंवा त्यावर सुधारणा न सुचविता, या निर्णयाला 'संघटित लूट' म्हणणे हे अत्यंत संतापजनक होते. यांच्याच काळात देशात 'राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा', '२ जी घोटाळा', 'कोळसा खाणीवाटप घोटाळा', 'ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा', 'आदर्श घोटाळा', ..... असे असंख्य घोटाळे झाले. ते सर्व घोटाळे म्हणजे 'असंघटित लूट' होती का? हे सर्व घोटाळे यांच्या डोळ्यांसमोर यांच्याच आशिर्वादाने होत असताना हे एखाद्या नि:संग ढुढ्ढाचार्यासारखे डोळे मिटून स्वस्थ बसून होते. आपण ज्या पदावर आहोत त्या पदाला देशात सर्वोच्च अधिकार असताना हे घोटाळे न थांबविता फक्त 'मी त्यात नाही' यातच हे समाधान मानत होते. २००४ ते २०१४ या काळात यांच्याबद्दलचा आदर खूपच कमी झाला होता. आता तो आदर जवळपास नष्ट झाला आहे. सत्ता आणि एखाद्या घराण्याशी बांधिलकी एखाद्या विद्वानाचे किती अधःपतन करू शकते याचे मनमोहन सिंग हे जळजळीत उदाहरण आहे. भ्रष्टाचार्‍यांच्या संगतीत राहून यांची विचारसरणी देखील भ्रष्ट झालेली दिसते.
  • Log in or register to post comments

कोल्हेकुई

सुबोध खरे
Fri, 11/25/2016 - 18:29 नवीन
कर्जे दिली कुणी आणि कशाला आणि ती बुडीत झाली त्याचा मूळ लेख जोखा पहा. "मल्ल्याची धन करायला नोटबंदी केली" अशी कोल्हेकुई काँग्रेसने करावी याचे आश्चर्य मुळीच वाटत नाही. डॉ मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असले तरीही त्यांचे आडाखे साफ कसे चुकले याचे विवरण वाचून घ्या. http://www.businesstoday.in/opinion/delhi-durbar/sorry-mr-manmohan-singh-we-were-dead-in-flat-three-years-demonetisation/story/241029.html मिठाला जागण्यासाठी विधाने केल्याने शेवटी डॉ मनमोहन सिंग यांचा "भीष्म" झाला असेच खेदाने म्हणावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मनमोहनसिंग = भीष्म ?

गामा पैलवान
Sat, 11/26/2016 - 02:11 नवीन
काहीही हं खरे डॉक्टर! मनमोहन सिंगाची तुलना चक्क भीष्मचार्यांशी? अहो, कुठे भीष्मप्रतिज्ञा करणारा तो पितृव्रती पराक्रमी देवव्रत आणि कुठे टेररिस्ट फायनान्सिंग करणारा तो मातृदेशद्रोही मनमोहन सिंग! पाकिस्तानला भारतात थेट गुंतवणुकीचा राजरस्ता खोलून देणाऱ्या टेररिस्ट फायनान्सर मनमोहन सिंगाचं हे उदाहरण पाहून घ्याच : http://www.thehindu.com/business/Economy/article3310677.ece आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

टोकाची मते बनवताना निश्कर्षघाई टाळावी

माहितगार
Sat, 11/26/2016 - 11:35 नवीन
एकवेळ व्यक्तिगत टिका ठिक, पण देशद्रोही सारखी विशेषणे लावण्याची सहसा घाई न केलेली बरी हे माझे व्यक्तिगत मत बाकी आपली मर्जी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

देशद्रोही, देशभक्त फारच

संदीप डांगे
Sat, 11/26/2016 - 11:57 नवीन
देशद्रोही, देशभक्त फारच स्वस्त शब्द झालेत आजकाल, त्यांचं महत्त्व हरवत चाललंय, दुसऱ्याला देशद्रोही म्हटलं की आपण फार देशभक्त ठरतो असा काही सुप्त भाव प्रचलित झालाय जणू! राजकारणाची हि नवीन परिभाषा रुळते आहे, जनतेचे सेवक, जनतेच्या भल्यासाठी असे जुने शब्द फारसे परिणाम करत नाहीत, बोथट झालेत, त्याऐवजी देश, राष्ट्र वैगेरे शब्द वापरले जात आहेत, कालांतराने तेही बोथट होतीलच,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

टेररिस्ट फायनान्सिंग आणि देशद्रोह

गामा पैलवान
Sat, 11/26/2016 - 14:14 नवीन
संदीप डांगे, १.
दुसऱ्याला देशद्रोही म्हटलं की आपण फार देशभक्त ठरतो असा काही सुप्त भाव प्रचलित झालाय जणू!
हे विधान मला उद्देशून आहे का? २.
देशद्रोही, देशभक्त फारच स्वस्त शब्द झालेत आजकाल, त्यांचं महत्त्व हरवत चाललंय,
एकदम बरोबर बोललात बघा. नेमक्या याच कारणासाठी खरे देशद्रोही कसे असतात ते दाखवून द्यायला हवं. टेररिस्ट फायनान्सिंगास देशद्रोह नाही तर दुसरं काय म्हणायचं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

तुम्हाला उद्देशून नाही, जनरली

संदीप डांगे
Sat, 11/26/2016 - 14:41 नवीन
तुम्हाला उद्देशून नाही, जनरली सगळीकडेच (इथेच मिपावर नाही) देशभक्त-देशद्रोही चा सढळहस्ते जो वापर चाललाय ते बघून म्हटलंय.. टेररीस्ट फायनान्सिंग केलंय तर ते गजाआड का नाहीत? विरोधी पक्ष तरी का शांत बसलेत अजूनही..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

जेलामंदी जायच्या भीतीनंच तर त्ये कावळं वराडतंय. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान
Sat, 11/26/2016 - 16:34 नवीन
‌
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

काय राव? कोणी वराडतंय म्हणून

संदीप डांगे
Sat, 11/26/2016 - 16:52 नवीन
काय राव? कोणी वराडतंय म्हणून त्याला जेलमंदी टाकत न्हाय व्हय? काहीतरी कॉन्क्रीट बोला की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हाहाहा

गामा पैलवान
Sun, 11/27/2016 - 04:15 नवीन
हाहाहा ! हीहीही !! हुहुहू !!! आदुगर त्या मणमोहण्याला सांगा कांकरीट बोला म्हून. मंग म्या बोलेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मनमोहन सिंग एक अर्थतज्ञ

औरंगजेब
Sat, 11/26/2016 - 13:23 नवीन
मनमोहन सिंग एक अर्थतज्ञ म्हणुन उत्तम होते आहेत आणी राहतिलही.पण २००४-२०१२ त्यांना त्यांचे कर्तृत्व दाखवायची संधीच मिळाली नाही. किंबहुना मिळू दिली नाही. काहीही असो डॉ. सिंगांबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. आणी तेच फक्त काँग्रेसमधले माझे आवडते नेते आहेत.
  • Log in or register to post comments

परवाच्या भाषणात मनमोहन सिंग

श्रीगुरुजी
Sat, 11/26/2016 - 14:57 नवीन
परवाच्या भाषणात मनमोहन सिंग असे सुद्धा म्हणाले की आपल्याच खात्यातले पैसे काढायला परवानगी नाही असा जगात एकतरी देश आहे का? त्यांना इतके असत्य बोलण्याची का आवश्यकता आहे? तुमच्या खात्यातून धनादेश वापरून पैसे चुकविता येतात, डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करता येतो, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून खात्यातील पैसे वापरता येतात, बँकेत जाऊन आपल्या खात्यातील २४००० रूपये प्रत्येक आठवड्याला काढता येतात, एटीम वापरून दोन हजार रूपये काढता येतात ... तरीसुद्धा आपल्याच खात्यातले पैसे काढायला परवानगी नाही असे जाहीर सांगणे हा प्रचंड विपर्यास आहे. बादवे, आपल्या मंत्रीमंडळातील सर्व मंत्री मनसोक्त लूटमार करीत असताना व त्यांना लूटमार करण्यापासून प्रतिबंध करण्याचे संपूर्ण अधिकार हातात असताना सुद्द्धा जगातील कोणत्या देशाचा पंतप्रधान डोळे मिटून शांत बसून होता व त्यांना लूटमार करण्यासाठी मोकळे रान देत होता हे मनमोहन सिंग सांगतील का?
  • Log in or register to post comments

बँकेत जाऊन आपल्या खात्यातील

संदीप डांगे
Sat, 11/26/2016 - 15:18 नवीन
बँकेत जाऊन आपल्या खात्यातील २४००० रूपये प्रत्येक आठवड्याला काढता येतात, एटीम वापरून दोन हजार रूपये काढता येतात
बॅन्केकडे कॅश असेल तर तेवढे मिळतात, एटीएम चालू असेल तर पैसे काढता येतात. प्रत्येक ठिकाणी जरतर चा मामला आहे. माझ्या परिसरातलं एसबीआय सोडून सगळे बॅन्कांचे १८+ एटीएम कॅश नाही, सर्वर प्रॉब्लम मुळे कार्यरत नाहीत. आज सकाळीच सर्वत्र पायी फिरुन आलोय. एसबीआयला गर्दी इतकी, एक-दिड तास लागतो पैसे काढायला. ही आज २६ तारखेची परिस्थिती आहे. हे आपलेच पैसे काढायला आलेले निर्बंध आहेत. खोटं काय त्यात? त्यात परत 'तुम्हाला रोज अमूक इतके पैसे लागतातच कशाला' सारखे निरर्थक प्रश्न विचारण्यापासून 'देशाच्या भल्यासाठी'पर्यंतचे दाखले देणारे आहेतच. देशात सर्वत्रच आलबेल परिस्थिती नाही हे ऐकूनच घ्यायचे नाहीये. कारण ऐकून घेतले तर सरकार त्यावर काय उपाय करतंय हा प्रश्न येणार व मग पितळ उघडं पडणार. त्यापेक्षा प्रश्न विचारणारा आणि टिका करणाराच कसा नालायक आहे हे म्हटले की प्रश्न मिटतो. चालुदे! आरबीआय रोज नवीन नवीन नियम काढते, कालचा नियम आज रद्द करते, बॅन्का भंजाळल्यात ग्राहकांना उत्तरं देऊन देऊन. सरकार आपणच दिलेली आश्वासनं पाळत नाही. उंदीर कुठे घुसतोय ते पाहून नंतर बीळ बंद करायला धावाधाव करतायत. त्यांचंही चालुदे! बाकी ज्या मंत्र्यांनी मनसोक्त लूटमार केली त्यां सर्वांना नवनिर्वाचित सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खटला चालवून गजाआड घातले असेलच किंवा रक्कम तरी वसूल केली असेलच किंवा दोन्हीही. ह्यापैकी काही केलं असल्यास माहीती द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

UPA १/२ मध्ये कलमाडी सोडले तर

विशुमित
Sat, 11/26/2016 - 15:26 नवीन
UPA १/२ मध्ये कलमाडी सोडले तर आणखी कोणत्या काँग्रेस मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. जाणकार सांगू शकतील का? फक्त वद्राना काँग्रेस मध्ये सामील करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

खूप मोठी यादी आहे. मनमोहन

श्रीगुरुजी
Sat, 11/26/2016 - 15:37 नवीन
खूप मोठी यादी आहे. मनमोहन सिंग, विजय दर्डा, दासरी नारायण राव, पवनकुमार बन्सल, शीला दिक्षित, वीरभद्र सिंग, अश्वानी कुमार, शशी थरूर ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

कलमाडी सोडले तर जेल मध्ये

विशुमित
Sat, 11/26/2016 - 15:52 नवीन
कलमाडी सोडले तर जेल मध्ये एकदा पण गेले नाहीत अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गम्मत भारी

llपुण्याचे पेशवेll
Mon, 11/28/2016 - 17:22 नवीन
गम्मत आहे. आधी विचारले आरोप झाले, यादी दिल्यावर विचारत आहेत की आतमधे गेले. मजा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

असं नाही जा. तुम्हाला

मृत्युन्जय
Mon, 11/28/2016 - 20:18 नवीन
असं नाही जा. तुम्हाला फाट्यावर मारण्यात आले आहे. ठेंगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

बॅन्केकडे कॅश असेल तर तेवढे

श्रीगुरुजी
Sat, 11/26/2016 - 15:33 नवीन
बॅन्केकडे कॅश असेल तर तेवढे मिळतात, एटीएम चालू असेल तर पैसे काढता येतात. प्रत्येक ठिकाणी जरतर चा मामला आहे. माझ्या परिसरातलं एसबीआय सोडून सगळे बॅन्कांचे १८+ एटीएम कॅश नाही, सर्वर प्रॉब्लम मुळे कार्यरत नाहीत. आज सकाळीच सर्वत्र पायी फिरुन आलोय. एसबीआयला गर्दी इतकी, एक-दिड तास लागतो पैसे काढायला. ही आज २६ तारखेची परिस्थिती आहे. हे आपलेच पैसे काढायला आलेले निर्बंध आहेत. खोटं काय त्यात? त्यात परत 'तुम्हाला रोज अमूक इतके पैसे लागतातच कशाला' सारखे निरर्थक प्रश्न विचारण्यापासून 'देशाच्या भल्यासाठी'पर्यंतचे दाखले देणारे आहेतच. देशात सर्वत्रच आलबेल परिस्थिती नाही हे ऐकूनच घ्यायचे नाहीये. कारण ऐकून घेतले तर सरकार त्यावर काय उपाय करतंय हा प्रश्न येणार व मग पितळ उघडं पडणार. त्यापेक्षा प्रश्न विचारणारा आणि टिका करणाराच कसा नालायक आहे हे म्हटले की प्रश्न मिटतो. चालुदे!
काही एटीएम सुरू आहेत, काही नाहीत. स्वत: बँकेत गेलात तर चेक वापरून स्वतःच्या खात्यातील पैसे काढता येतात हा अनुभव मी ३ वेगवेगळ्या बँकेत घेतला आहे. मनमोहन सिंगांचा मूळ मुद्दा होता की खात्यातून पैसे काढायला बंदी आहे असा भारत एकमेव देश आहे. परंतु या आरोपात १०% सुद्धा तथ्य नाही.
आरबीआय रोज नवीन नवीन नियम काढते, कालचा नियम आज रद्द करते, बॅन्का भंजाळल्यात ग्राहकांना उत्तरं देऊन देऊन. सरकार आपणच दिलेली आश्वासनं पाळत नाही. उंदीर कुठे घुसतोय ते पाहून नंतर बीळ बंद करायला धावाधाव करतायत. त्यांचंही चालुदे!
१३० कोटी लोकसंख्येच्या देशात असा गोंधळ होणे अनिवार्य आहे.
बाकी ज्या मंत्र्यांनी मनसोक्त लूटमार केली त्यां सर्वांना नवनिर्वाचित सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खटला चालवून गजाआड घातले असेलच किंवा रक्कम तरी वसूल केली असेलच किंवा दोन्हीही. ह्यापैकी काही केलं असल्यास माहीती द्यावी.
विजय दर्डा, दासरी नारायण राव, मधू कोडा, नवीन जिंदाल, मारन बंधू, वीरभद्रसिंग अशा अनेक मंत्र्यांविरूद्ध न्यायालयात कारवाई सुरू आहे. दस्तुरखुद्द मनमोहन सिंगांचे नावही एका आरोपपत्रात आले होते. त्यांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात जाऊन खटल्याला बेमुदत काळापर्यंत स्थगिती मिळविली. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नसता तर एव्हाना खटल्याची सुनावणी सुरू झाली असती. न्यायालयांचा संथ कारभार बघता ही कारवाई अनेक वर्षे सुरू राहणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

न्यायालयांचा संथ कारभार असे

संदीप डांगे
Sat, 11/26/2016 - 16:48 नवीन
न्यायालयांचा संथ कारभार असे सांगणे ही शुद्ध पळवाट आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये सुप्रिम कोर्टाने काळापैसावाल्यांची नावे जाहीर करायला तुम्हाला काय अडचण आहे असं सरकारला विचारलं होतं, दोन वर्षे होऊन गेलीत त्याला. पुढे काय झालं? टेबल टेनिस सुरु आहे काय? विद्यमान पंतप्रधानांची धडाकेबाज 'नियत' बघता अशा केसेस साठी एक फास्टर दॅन फास्टेस्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करुन सटासट प्रकरणं निकाली काढणे काय फार मोठी गोष्ट नाही. नरेंद्र मोदींनी असे काही केले तर (विरोधक कितीही आदळआपट करु देत) सामान्य जनता (फार्सिकल अॅंपमधून समर्थन न देता) रस्त्यावर उतरुन दिवाळी साजरे करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सहमत... मी तर सुतळी बॉम्ब

विशुमित
Sat, 11/26/2016 - 16:50 नवीन
सहमत... मी तर सुतळी बॉम्ब फोडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

माझ्या मते.....

चौकटराजा
Sat, 11/26/2016 - 20:40 नवीन
निवडणूक प्रक्रिया बद्ल, न्यायदान प्रक्रिया बद्ल, शिक्षण पद्धति बदल ही तीन मुख्य आव्हाने देशासमोर आहेत पैकी एम ए आहे पण चहा करता येत् नाही असा माणूस॑ काय कामाचा असे म्हणून मोदीनी शिक्षणावर बरोबर भाष्य केले ते त्यांच्या लोक॑सभेतील पहिल्याच भाषणात पण इतर दोन विषयांवर आपण काम केले तर आपले प्रधानमंत्रीपदच भाजपाचे खासदार हिसकावून घेतील असे मोदीना वाटत असावे सबब ते त्यावर मौन बाळगून आहेत. मुख्य रोग न्यायदान पद्धति हाच आहे. लवकर न्यायदान झाले तर अनेक सुखराम आत जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

जसे भुजबळ साहेब आत आहेत तसे

संदीप डांगे
Sat, 11/26/2016 - 20:52 नवीन
जसे भुजबळ साहेब आत आहेत तसे सर्व राजकीय नेत्यांची चौकशी करून आत टाकले पाहिजे,ज्या दिवशी हे अचानक सर्जिकल स्ट्राईक होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने मेरा देश बदल रहा है म्हणता येईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

टाळ्या...!!!

मोदक
Mon, 11/28/2016 - 11:17 नवीन
टाळ्या...!!! (बादवे - भाषणाच्या शेवटी आभार मानायला विसरलात का..?) विद्यमान सरकारने असे काही केले आणि कायद्यातील पळवाटीचा फायदा घेवून एक जरी नेता तात्पुरता जामीनावर सुटला तरी हिटलरशाही, फॅसीझम, संविधान खतरे में वगैरे गोष्टींचा सोयीस्कर साक्षात्कार होईल आणि विकलेल्या मिडीया पासून ते पेड प्रतिसादकांपर्यंत सगळेजण चष्मे घालून टेराबायटी कांगावा सुरू करतील असे वाटत नाही का..? नोटबंदी व्यवस्थापनामुळे (समजा) १०% लोकांना त्रास झालेला असेल तर त्याचा इतका दंगा झाला (मिपावर सुद्धा). मग वरील प्रकरणाच्या अनुषंगाने भ्रष्ट नेत्यांमधील ९०% लोकांवरील कारवाईला महत्व मिळेल की १०% संदिग्ध गुन्हेगारांच्या मूलभूत हक्कांना..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

टाळ्या मोदींच्या भाषणासाठी

संदीप डांगे
Mon, 11/28/2016 - 11:48 नवीन
टाळ्या मोदींच्या भाषणासाठी जपून ठेवा, इतकी भाषणं होतायत कि टाळ्या आयात करायचं टेंडर काढायला लागेल :)) विद्यमान सरकारने असे काही केले आणि कायद्यातील पळवाटीचा फायदा घेवून एक जरी नेता तात्पुरता जामीनावर सुटला ~ का बुवा सुटावा? तेलगी, मेहता, भुजबळ, सहाराश्री कुठे सुटलेत? नकर्त्याचा वार शनिवार म्हणतात तसं आहे बघा! :) तरी हिटलरशाही, फॅसीझम, संविधान खतरे में वगैरे गोष्टींचा सोयीस्कर साक्षात्कार होईल ~होऊ देत की, का घाबरायचं त्याला? आपल्याकडे बहुमत आहे, कोण काय वाकडं करील आपले, पब्लिक ला सर्व कळतं कोण खोटं कोण खरं! लगे हात एक सर्वे घेऊन सिद्ध करायचं की लोक खुश आहेत. ;) आणि विकलेल्या मिडीया पासून ~ मीडिया विकला गेलाय, दोन्ही बाजूने. त्यामुळे परिणाम शून्य. ते पेड प्रतिसादकांपर्यंत ~ मिपावर आहेत का पेड प्रतिसादक? तुम्हाला बरीच माहिती आहे, बरोबर आहे तुम्ही पब्लिक आहात नैका? विसरलोच! ;( सगळेजण चष्मे घालून टेराबायटी कांगावा सुरू करतील असे वाटत नाही का..? ~ टेराबायटी कंगव्याने निवडणुकीत मतांचा भांग पाडता येत नाही असे माहितगार साहेब बोललेत. माझं त्यांच्याशी एकमत आहे. :) नोटबंदी व्यवस्थापनामुळे (समजा) १०% लोकांना त्रास झालेला असेल तर त्याचा इतका दंगा झाला (मिपावर सुद्धा). ~दंगा? अहो, विरोधात इथे मी एकटाच बोलतोय. एकट्याचं बोलणं 'इतका दंगा' वाटतोय? मग वरील प्रकरणाच्या अनुषंगाने भ्रष्ट नेत्यांमधील ९०% लोकांवरील कारवाईला महत्व मिळेल की १०% संदिग्ध गुन्हेगारांच्या मूलभूत हक्कांना..? ~ म्हणजे तपस करून नेमके चोर पकडण्यापेक्षा सर्व नागरिकांना आपण चोर नाही हे पोलिसात जाऊन सिद्ध करून सर्टिफिकेट घ्यावे ह्या योजनेला आपला पाठिंबा आहे तर! आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर: जर मला भारत खरंच मनापासून स्वच्छ हेतूने स्वच्छ करायचा आहेच तर मी अशा प्रश्नांकडे लक्षच देणार नाही, नरेंद्र मोदी सध्या तेच करत आहेत आणि त्याला तुमचा पाठिंबा आहे. मग इथेच का सर्व चिंता प्रश्न निर्माण होतात? कार्ड पेमेंट, online ट्रान्सफर च्या उपदेशाचे डॉस पाजता इथलं पब्लिक थकत नाहीये, समस्या असतात मार्ग काढायला हवेत असं हस्तिदंती प्रक्षेपण होतंय, मग इथेच का घोडं पेंड खातं महाराजा? :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

टाळ्या मोदींच्या भाषणासाठी

मोदक
Mon, 11/28/2016 - 16:22 नवीन
टाळ्या मोदींच्या भाषणासाठी जपून ठेवा, इतकी भाषणं होतायत कि टाळ्या आयात करायचं टेंडर काढायला लागेल :)) काढा टेंडर, तुम्हाला याचाही फर्स्टहँड अनुभव असेलच..! ;) का बुवा सुटावा? तेलगी, मेहता, भुजबळ, सहाराश्री कुठे सुटलेत? चष्मा काढून प्रतिसाद वाचा. "तात्पुरता जामीनावर" हे महत्वाचे शब्द सोयीस्कररीत्या विसरला आहात. तसेच तेलगी, (हर्षद) मेहता आणि सहाराश्री नेते होते या अमूल्य माहितीबद्दल धन्यवाद. पण ही माहिती (नेहमीप्रमाणे) चुकीची आहे. भुजबळ आंत आहेत - त्यांच्यावर केस कधी सुरू झाली आणि कधी आत गेले याचा अभ्यास करावा किंवा किती नेत्यांवर केस झाल्या आणि किती आत गेले असेही अ‍ॅनालिसीस करावे. होऊ देत की, का घाबरायचं त्याला? आपल्याकडे बहुमत आहे, कोण काय वाकडं करील आपले कोण घाबरलंय..? असले निर्णय घ्यायला धाडसी नेतृत्व लागते. ते सध्या केंद्रात आहे याचे समाधान आहे. एका कुटुंबाची सेवा करताना देशाची प्रगती रोखणार्‍या विद्वान अर्थतज्ञ पंतप्रधानापेक्षा चहावाला का असेना पण चांगले काम करणारा पंतप्रधान लाख वेळा परवडला. ..आणि कोण काय वाकडे करणार..? पाकिस्तानच्या दारात मदतीची भीक मागायला जाणार की अमेरिकेकडे पत्रं लिहून कागाळ्या करणार..? पब्लिक ला सर्व कळतं कोण खोटं कोण खरं! तेच तर..! भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या काळ्या पैशांचा कचरा झाला म्हणून कोण कोण थयथयाट करत आहे ते उघड आहेच. लगे हात एक सर्वे घेऊन सिद्ध करायचं की लोक खुश आहेत. ;) लोकं खुश आहेत की नाही ते २०१९ ला कळेलच..! ~ मिपावर आहेत का पेड प्रतिसादक? तुम्हाला बरीच माहिती आहे, बरोबर आहे तुम्ही पब्लिक आहात नैका? विसरलोच! ;( पेड प्रतिसादक "मिपावर" आहेत की नाही त्याची कल्पना नाही. मात्र ज्या पद्धतीने लोकं मुद्यांना समर्थन देताना खोट्या लिंका देतात, सरकारच्या नसलेल्या चुका दाखवतात किंवा अल्पसंख्यांकांची गळचेपी होते असे नक्राश्रू ढाळतात त्यावरून प्रतिसाद लिहिण्यासाठी काहीतरी नक्की मिळत असावे अशी शंका आल्यावाचून राहत नाही. बाकी मला जी माहिती असते ती शक्यतो खरी असते आणि मी सोर्स चेकवून माहिती देतो. ज्या माहितीच्या सत्यतेबद्दल शंका आहे अशी माहिती किंवा असंबद्ध माहिती माझ्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ देवून पब्लीक कडून धुलाई करून घेण्याची वेळ (सुदैवाने) आलेली नाही. जर माहिती नसली तर मी हवेत गोळ्या मारत नाही किंवा बुद्धीभेद करण्यासाठी खोट्या लि़ंका देत नाही. टेराबायटी कंगव्याने निवडणुकीत मतांचा भांग पाडता येत नाही असे माहितगार साहेब बोललेत. माझं त्यांच्याशी एकमत आहे. :) अरे व्वा. अभिनंदन..! दंगा? अहो, विरोधात इथे मी एकटाच बोलतोय. एकट्याचं बोलणं 'इतका दंगा' वाटतोय? हा हा.. फारच विनोदी प्रतिसाद. आख्खे मिपा नोटाबंदीच्या व्यवस्थापनाचे समर्थन करत आहे आणि फक्त व फक्त तुम्हीच एकांडे शिलेदार दोन्ही हातात तलवारी घेवून प्रतिवाद करत आहात असे काही मत असले तर अभ्यास वाढवा. अनेक लोकांनी आक्षेप नोंदवले आहेत आणि अनेकांनी (खर्‍या) अडचणी मांडल्या आहेत. म्हणजे तपस करून नेमके चोर पकडण्यापेक्षा सर्व नागरिकांना आपण चोर नाही हे पोलिसात जाऊन सिद्ध करून सर्टिफिकेट घ्यावे ह्या योजनेला आपला पाठिंबा आहे तर! हा हा.. पुन्हा सिलेक्टीव्ह रिडींग. (तुम्हाला नक्की कुठे असे ट्रेनिंग मिळाले आहे त्या ठिकाणच्या गुरूंना आमचा पण प्रणाम सांगा, नै म्हणजे काय आहे.. असे कै च्या कै निष्कर्ष काढून कांगावा करायचे तुमचे स्किल वाखाणण्यासारखे आहे म्हणून..) :)) मग वरील प्रकरणाच्या अनुषंगाने भ्रष्ट नेत्यांमधील ९०% लोकांवरील कारवाईला महत्व मिळेल की १०% संदिग्ध गुन्हेगारांच्या मूलभूत हक्कांना..? येथे काळे-पिवळे केलेल्या भागामध्ये दोन शब्द लिहिले आहेत. दोनच आहेत पण ते वाचा. मुद्द्याचे ते वगळून बाकी वाक्य वाचायचे आणि त्यावरून निष्कर्ष काढायचे म्हणजे राहुल गांधीची मुलाखत ऐकल्यासारखे वाटत आहे. असो, मोठे व्हा. जर मला भारत खरंच मनापासून स्वच्छ हेतूने स्वच्छ करायचा आहेच तर मी अशा प्रश्नांकडे लक्षच देणार नाही, नरेंद्र मोदी सध्या तेच करत आहेत आणि त्याला तुमचा पाठिंबा आहे. मग इथेच का सर्व चिंता प्रश्न निर्माण होतात? कार्ड पेमेंट, online ट्रान्सफर च्या उपदेशाचे डॉस पाजता इथलं पब्लिक थकत नाहीये, समस्या असतात मार्ग काढायला हवेत असं हस्तिदंती प्रक्षेपण होतंय, मग इथेच का घोडं पेंड खातं महाराजा? :)) नक्की घोडे कुठे पेंड खात आहे ते नीट सांगा बघू. मग मी उत्तर देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

न्यायालयांचा संथ कारभार असे

श्रीगुरुजी
Sat, 11/26/2016 - 23:24 नवीन
न्यायालयांचा संथ कारभार असे सांगणे ही शुद्ध पळवाट आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये सुप्रिम कोर्टाने काळापैसावाल्यांची नावे जाहीर करायला तुम्हाला काय अडचण आहे असं सरकारला विचारलं होतं, दोन वर्षे होऊन गेलीत त्याला. पुढे काय झालं? टेबल टेनिस सुरु आहे काय?
केंद्र सरकारने २९ ऑक्टोबर २०१४ लाच सर्वोच्च न्यायालयाला परदेशात खाते असलेल्या ६२७ खातेदारांची यादी दिली आहे. पुढे काय करायचे ते स्वतः सर्वोच्च न्यायालयच ठरविणार होते. सर्वोच्च न्यायालयाने या नावांची यादी दिल्यावर खालील सूचना दिल्या आहेत. "Whatever information you have received from foreign countries, pass it on to us. We will ask the CBI or some other agency to investigate and give us a report. Don't ask us to modify the earlier order (to reveal all the names). We will not change a word of it (the order). We take the responsibility of investigating the entire issue. We will ensure confidentiality of investigation," a bench comprising Chief Justice H L Dattu and Justices Ranjana P Desai and Madan B Lokur had said. या प्रकरणात टेबल टेनिस सुरू आहे का लॉन टेनिस हे सर्वोच्च न्यायालयानेच सांगायला हवे ना?
विद्यमान पंतप्रधानांची धडाकेबाज 'नियत' बघता अशा केसेस साठी एक फास्टर दॅन फास्टेस्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करुन सटासट प्रकरणं निकाली काढणे काय फार मोठी गोष्ट नाही. नरेंद्र मोदींनी असे काही केले तर (विरोधक कितीही आदळआपट करु देत) सामान्य जनता (फार्सिकल अॅंपमधून समर्थन न देता) रस्त्यावर उतरुन दिवाळी साजरे करेल.
भ्रष्टाचाराची प्रकरणे निकालात काढण्यासाठी जलदगती न्यायालये इसवी सन २००० पासूनच कार्यरत आहेत. मुळात गोगलगायीला कितीही वेगात पळवायचा प्रयत्न केला तरी ती जास्तीत जास्त किती वेगाने जाऊ शकेल? अक्षरशः कोट्यावधी खटले न्यायालयात अनेक दशके पडून आहेत. लालूविरूद्ध दाखल केलेल्या १९९७ मधील एका प्रकरणाचा निकाल तब्बल १६ वर्षांनी लागला (सन २००० पासून बिहारमध्ये अनेक जलदगती न्यायालये कार्यरत असताना ही स्थिती आहे). मनमोहन सिंग यांच्या विरूद्ध उच्च न्यायालयात खटला दाखल केल्यावर सर्वोच्च न्यायालयाने विनाकारण त्याला बेमुदत स्थगिती देऊन आता २० महिने होऊन गेले. स्थगिती का दिली, किती काळासाठी दिली, स्थगिती कधी उठविणार अशा प्रश्नांची उत्तरे द्यायला सर्वोच्च न्यायालय बांधील नाही. असे खटले पुढील ५० वर्षात सुद्धा निकाली निघणे अवघड आहे. अत्यंत संथ आणि कोणालाही उत्तरे द्यायला बांधील नसलेली न्यायव्यवस्था भारतात असल्याने असले खटले पिढ्यानपिढ्या सुरू राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

There's a long list of

संदीप डांगे
Sat, 11/26/2016 - 23:43 नवीन
There's a long list of excuses! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

न्यायाधीशांनी ठरविले तर खटला

श्रीगुरुजी
Sat, 11/26/2016 - 23:47 नवीन
न्यायाधीशांनी ठरविले तर खटला तुंबुन न देता अगदी थोड्या अवधीत निकाल देऊन खटला संपविणे सहज शक्य आहे. परंतु खटला संपवून निकाल देण्यास कोणतीही कायदेशीर कालमर्यादा न्यायाधीशांवर बंधनकारक नसल्याने व न्यायाधीश कोणालाही बांधील नसल्याने कोट्यावधी खटले रेंगाळत पडले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

याकूब मेमन???

संदीप डांगे
Sat, 11/26/2016 - 23:55 नवीन
याकूब मेमन???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गुन्हा घडल्यानंतर तब्बल २२

श्रीगुरुजी
Sun, 11/27/2016 - 09:07 नवीन
गुन्हा घडल्यानंतर तब्बल २२ वर्षे ५ महिने उलटल्यानंतर त्याला शिक्षा झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा