माननीय मनमोहनसिंगजी,
मोदी सरकारने रु ५०० आणि रु १००० या नोटांचे निर्मुल्यन केल्या संबंधाने आपण आपले राज्यसभेतील टिकात्मक भाषण वाचनाचा योग आला. रु ५०० आणि रु १००० या नोटांचे निर्मुल्यनाच्या उद्दीष्टांबद्दल आपणास शंका नसल्याचे आपण म्हटले आहे. प्रश्न केवळ इंप्लीमेटॅशन (अमलबजावणी) मधील त्रुटींचा आहे या त्रुटी म्हणजे भलेमोठे गैरव्यवस्थापन आहे असे आपण आपल्या भाषणातून म्हटले आहे. दोन आठवडे कालावधीनंतरी ज्या प्रमाणात सामान्य जनतेस चलन उपलब्ध होणे अवघड जात आहे ते पाहता अमलबजावणी आणि व्यवस्थापनात त्रुटी शिल्लक राहील्या हे निश्चित.
जुने चलन बाद केल्यानंतर नवे चलन किती लागेल आणि नव्या चलनाच्या छपाईस किती वेळ लागेल इत्यादी गणिते इकॉनॉमीक सेक्रेटरी आणि रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर यांच्या बोटावर असणार त्या गणितात ते खूप चुकले असतील अशी संभावना कमी आहे. कॅश वाहून नेण्यास सुरक्षा रक्षकांसहीत सक्षम वाहने किती आहेत आणि १००च्या नोटांसाठी अधिक वाहने अधिक सुरक्षा रक्षक लागतील का ? एटीएमचे रि कॅलिब्रेशन करण्यासाठी अधिक अधिक इंजिनीअर्स आणि तंत्रज्ञांचा ताफा लागेल का ? डिजीटल तंत्रज्ञानाकडे किती ट्रँझॅक्शन्स वळवावे लागेल आणि सामान्य सजनेस डिजीटल तंत्रज्ञान डेबीट कार्ड इत्यादी वापराची जागरूकता अभियानाच्या गरजा काय असू शकतील ? या मुद्द्यांवर काम करण्यास सध्याचे सरकार कुठेतरी कमी पडले हे स्प्ष्ट दिसतच आहे. यातील डिजीटल तंत्रज्ञानाचा भाग अलिकडचा गेल्या दशकाभरातला याला काही क्षणासाठी बाजूला ठेऊ. जे गैरव्यवस्थापन आणि त्रुटी शिल्लक राहील्या त्याचे मोदी सरकारचे आणि सध्याच्या आरबीआयच्या गव्हर्नरांचे माप त्यांच्या पदरात नक्कीच टाकू.
माननीय मनमोहनसिंगजी, आपण ज्ञान आणि अनुभवाने या सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहात आणि आपण महत्वाच्या प्रसंगी भारतीय अर्थव्यवस्थेस सावरुन धरण्यात मोठी कामगिरी बजावलीत त्या बद्दल आदरच आहे. आता आपण विरोधीपक्षात आहात, विरोधीपक्षात बसून दोष दिग्दर्शनाची जबाबदारीही (उत्तमपणे ?) निभावताय आणि विरोधीपक्ष जिवंत असल्याचे दिसते आहे हे पाहून बरेच वाटते पण प्रश्न राहतो तो नोटांचे निर्मुल्यन करून नवीन नोटा व्यवहारात उपलब्ध करुन देताना राहीलेल्या त्रुटींच्या जबाबदारींची चर्चा करताना मागील सरकारांची आणि आरबीआय मध्ये मागील काळात जे कामास होते त्यांची सुद्धा जबाबदारी निश्चीत करण्याचा.
माननीय मनमोहनसिंगजी, भारतातील काळ्या पैशाचा रोग अती जूना आहे आणि चलन न्रिर्मुल्यन हा त्यावरील एक महत्वाचा उपाय आहे हे आपल्यापेक्षा अधिक चांगले कुणास ठाऊक असेल ? मोदी सरकारने चलन निर्मुल्यन आत्ताच करावे एवढी इमर्जन्सी आत्ता होती किंवा नव्हती हा कदाचित वादाचा विषय असेल याचा निकाल काळाच्या ओघात इतिहास देईलच पण इकॉनॉमीक इमर्जन्सी विवीध कारणाने जगातल्या कोणत्याही देशा च्या कोणत्याही सरकार समोर येऊ शकतात याची आपणास कल्पना नसेल असेही संभवत नाही. असे चलन निर्मुल्यन अचानक करावे लागले तर ऐनवेळेची पळापळ नको म्हणून त्यासाठी काय पुर्वतयारी असावयास हव्यात आणि त्या किमान प्रमाणावर प्रत्येक सरकारने केलेल्या असावयास हव्यात की नको ?
माननीय मनमोहनसिंगजी, आपण १९७० -७६ असा दीर्घकाळ भारत सरकारच्या सल्लागारपदांच्या विवीध पदांवर काम केलेले आहे, १९८२ ते ८५ आरबीआयचे गव्हर्नर होता, चलन निर्मुल्यनाच्यावेळी काय स्वरुपाची यंत्रणा लागते त्याचा तुम्हाला तेव्हा आढावा घेण्याची संधी येऊन गेली असेल, १९८५ ते १९८७ या कालावधीत नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद आपण भूषवले आहे त्या कालावधीत आवश्यक यंत्रणेसाठी लागणार्या तरतूदी करून ठेवण्याची आपणाकडे संधी होती, १९९१ ते १९९६ तब्बल पाच वर्षे आपण अर्थमंत्री पद सांभाळले आणि २००४ ते २०१४ एवढा मोठा काळ पंतप्रधानपद सांभाळले ज्या काळात यंत्रणेच्या गरजा तपासणे, आर्थिक आणि व्यवस्थापन विषयक नियोजनाची तयारी करुन ठेवणे आपणास निश्चित शक्य असावे किमानपक्षी आता आल्या आहेत तशा अडचणी येऊ शकतात याची आपण कुठे तरी नोंद करून ठेवलेली असणे अभिप्रेत असावे आणि म्हणून जे काही गैरव्यवस्थापन झाले आहे त्यात मोदी सरकारच्या सोबतच नैतीक जबाबदारीचे हक्कदार म्हणून अंशतः तरी आपल्याकडे का पाहू नये ?
आम्ही सामान्य नागरीक सत्ताधारी अथवा विरोधीपक्षात नाही आहोत टिका करावयाची म्हणून टिका यात रस नाही. भारतासाठी अण्वस्त्र सज्जतेसाठी पुर्वाश्रमीच्या काँग्रस सरकारांनी परिश्रम घेऊन ठेवले आणि निर्णय घेण्याच्या वेळी भाजपा सरकार होते आम्ही क्रेडीट दोन्ही पक्षाच्या सरकारांना दिले. जी व्यवस्थापन विषयक पुर्वतयारीत अण्वस्त्र आणि कदाचित इतरही अजून बर्याच गोष्टीत काँग्रेस सरकारांनी आणि आपण केली असेलही त्या बद्दल नावे ठेवण्याचा उद्देश नाही, पण चलन निर्मुल्यनासाठीच्या पुर्व तयारीच्या सहभागात आपण आणि काँग्रेस कुठे कमी पडली नाही ना ही सामान्य नागरीक म्हणून आलेली शंका आहे.
विषय निघालाच आहे तर १९९१ ते १९९६ या काळात आपण जाचक आयातकर अत्यंत वेगाने कमी करत नेले याचा आयात वस्तु विकणारा एक सामान्य विक्रीप्रतिनिधी म्हणून मी आठवण जतन केली आहे त्या काळात अर्थमंत्र्यांचे बजेट भाषण सुट्टी टाकून ऐकत असे आणि नंतर वाचत असे त्याच कालावधीत वस्तुंच्या उत्पादनावरील कर आपल्या सरकारने त्याच प्रमाणात का कमी केले नाहीत भारतात निर्मित वस्तु पेक्षा आयात वस्तु स्वस्त होऊ देण्या मागील आपली भूमिका आजतागायात मला व्यक्तीशः समाधानकारकपणे उलगडलेली नाही.
आम्ही सामान्य नागरीक आपल्या ज्ञान आणि अनुभवाएवढी उंची गाठू शकत नाही मनात शंका येणे स्वाभाविक असते या शंकांसाठी आपल्याकडे निश्चित उत्तरे असतील. मिसळपावसारख्या संस्थळावर तेही मराठीतून उत्तरे देणे आपणास शक्य असणार नाही त्यामुळे माझेच लेखन बरोबर असा माझा कोणताही अट्टाहास नाही चुक भूल देणे घेणे.
माननीय मनमोहन सिंगजी, एकुण मनाला सलणारी हि शंका शिल्लक आहे, आपल्या टिकेतील गैरव्यवस्थापनाचे माप अंशतःतरी आपल्याही पदरात पडत नाही का?
आभार
आपला आदर करणारा भारताचा एक सामान्य नागरीक
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
60257
प्रतिक्रिया
203
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोल्हेकुई
In reply to मनमोहन सिंग यांचे कालचे भाषण by श्रीगुरुजी
मनमोहनसिंग = भीष्म ?
In reply to कोल्हेकुई by सुबोध खरे
टोकाची मते बनवताना निश्कर्षघाई टाळावी
In reply to मनमोहनसिंग = भीष्म ? by गामा पैलवान
देशद्रोही, देशभक्त फारच
In reply to टोकाची मते बनवताना निश्कर्षघाई टाळावी by माहितगार
टेररिस्ट फायनान्सिंग आणि देशद्रोह
In reply to देशद्रोही, देशभक्त फारच by संदीप डांगे
तुम्हाला उद्देशून नाही, जनरली
In reply to टेररिस्ट फायनान्सिंग आणि देशद्रोह by गामा पैलवान
जेलामंदी जायच्या भीतीनंच तर त्ये कावळं वराडतंय. आ.न., -गा.पै.
In reply to तुम्हाला उद्देशून नाही, जनरली by संदीप डांगे
काय राव? कोणी वराडतंय म्हणून
In reply to जेलामंदी जायच्या भीतीनंच तर त्ये कावळं वराडतंय. आ.न., -गा.पै. by गामा पैलवान
हाहाहा
In reply to काय राव? कोणी वराडतंय म्हणून by संदीप डांगे
मनमोहन सिंग एक अर्थतज्ञ
परवाच्या भाषणात मनमोहन सिंग
बँकेत जाऊन आपल्या खात्यातील
In reply to परवाच्या भाषणात मनमोहन सिंग by श्रीगुरुजी
UPA १/२ मध्ये कलमाडी सोडले तर
In reply to बँकेत जाऊन आपल्या खात्यातील by संदीप डांगे
खूप मोठी यादी आहे. मनमोहन
In reply to UPA १/२ मध्ये कलमाडी सोडले तर by विशुमित
कलमाडी सोडले तर जेल मध्ये
In reply to खूप मोठी यादी आहे. मनमोहन by श्रीगुरुजी
गम्मत भारी
In reply to कलमाडी सोडले तर जेल मध्ये by विशुमित
असं नाही जा. तुम्हाला
In reply to गम्मत भारी by llपुण्याचे पेशवेll
बॅन्केकडे कॅश असेल तर तेवढे
In reply to बँकेत जाऊन आपल्या खात्यातील by संदीप डांगे
न्यायालयांचा संथ कारभार असे
In reply to बॅन्केकडे कॅश असेल तर तेवढे by श्रीगुरुजी
सहमत... मी तर सुतळी बॉम्ब
In reply to न्यायालयांचा संथ कारभार असे by संदीप डांगे
माझ्या मते.....
In reply to न्यायालयांचा संथ कारभार असे by संदीप डांगे
जसे भुजबळ साहेब आत आहेत तसे
In reply to माझ्या मते..... by चौकटराजा
टाळ्या...!!!
In reply to जसे भुजबळ साहेब आत आहेत तसे by संदीप डांगे
टाळ्या मोदींच्या भाषणासाठी
In reply to टाळ्या...!!! by मोदक
टाळ्या मोदींच्या भाषणासाठी
In reply to टाळ्या मोदींच्या भाषणासाठी by संदीप डांगे
टाळ्या मोदींच्या भाषणासाठी जपून ठेवा, इतकी भाषणं होतायत कि टाळ्या आयात करायचं टेंडर काढायला लागेल :))काढा टेंडर, तुम्हाला याचाही फर्स्टहँड अनुभव असेलच..! ;)का बुवा सुटावा? तेलगी, मेहता, भुजबळ, सहाराश्री कुठे सुटलेत?चष्मा काढून प्रतिसाद वाचा. "तात्पुरता जामीनावर" हे महत्वाचे शब्द सोयीस्कररीत्या विसरला आहात. तसेच तेलगी, (हर्षद) मेहता आणि सहाराश्री नेते होते या अमूल्य माहितीबद्दल धन्यवाद. पण ही माहिती (नेहमीप्रमाणे) चुकीची आहे. भुजबळ आंत आहेत - त्यांच्यावर केस कधी सुरू झाली आणि कधी आत गेले याचा अभ्यास करावा किंवा किती नेत्यांवर केस झाल्या आणि किती आत गेले असेही अॅनालिसीस करावे.होऊ देत की, का घाबरायचं त्याला? आपल्याकडे बहुमत आहे, कोण काय वाकडं करील आपलेकोण घाबरलंय..? असले निर्णय घ्यायला धाडसी नेतृत्व लागते. ते सध्या केंद्रात आहे याचे समाधान आहे. एका कुटुंबाची सेवा करताना देशाची प्रगती रोखणार्या विद्वान अर्थतज्ञ पंतप्रधानापेक्षा चहावाला का असेना पण चांगले काम करणारा पंतप्रधान लाख वेळा परवडला. ..आणि कोण काय वाकडे करणार..? पाकिस्तानच्या दारात मदतीची भीक मागायला जाणार की अमेरिकेकडे पत्रं लिहून कागाळ्या करणार..?पब्लिक ला सर्व कळतं कोण खोटं कोण खरं!तेच तर..! भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या काळ्या पैशांचा कचरा झाला म्हणून कोण कोण थयथयाट करत आहे ते उघड आहेच.लगे हात एक सर्वे घेऊन सिद्ध करायचं की लोक खुश आहेत. ;)लोकं खुश आहेत की नाही ते २०१९ ला कळेलच..!~ मिपावर आहेत का पेड प्रतिसादक? तुम्हाला बरीच माहिती आहे, बरोबर आहे तुम्ही पब्लिक आहात नैका? विसरलोच! ;(पेड प्रतिसादक "मिपावर" आहेत की नाही त्याची कल्पना नाही. मात्र ज्या पद्धतीने लोकं मुद्यांना समर्थन देताना खोट्या लिंका देतात, सरकारच्या नसलेल्या चुका दाखवतात किंवा अल्पसंख्यांकांची गळचेपी होते असे नक्राश्रू ढाळतात त्यावरून प्रतिसाद लिहिण्यासाठी काहीतरी नक्की मिळत असावे अशी शंका आल्यावाचून राहत नाही. बाकी मला जी माहिती असते ती शक्यतो खरी असते आणि मी सोर्स चेकवून माहिती देतो. ज्या माहितीच्या सत्यतेबद्दल शंका आहे अशी माहिती किंवा असंबद्ध माहिती माझ्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ देवून पब्लीक कडून धुलाई करून घेण्याची वेळ (सुदैवाने) आलेली नाही. जर माहिती नसली तर मी हवेत गोळ्या मारत नाही किंवा बुद्धीभेद करण्यासाठी खोट्या लि़ंका देत नाही.टेराबायटी कंगव्याने निवडणुकीत मतांचा भांग पाडता येत नाही असे माहितगार साहेब बोललेत. माझं त्यांच्याशी एकमत आहे. :)अरे व्वा. अभिनंदन..!दंगा? अहो, विरोधात इथे मी एकटाच बोलतोय. एकट्याचं बोलणं 'इतका दंगा' वाटतोय?हा हा.. फारच विनोदी प्रतिसाद. आख्खे मिपा नोटाबंदीच्या व्यवस्थापनाचे समर्थन करत आहे आणि फक्त व फक्त तुम्हीच एकांडे शिलेदार दोन्ही हातात तलवारी घेवून प्रतिवाद करत आहात असे काही मत असले तर अभ्यास वाढवा. अनेक लोकांनी आक्षेप नोंदवले आहेत आणि अनेकांनी (खर्या) अडचणी मांडल्या आहेत.म्हणजे तपस करून नेमके चोर पकडण्यापेक्षा सर्व नागरिकांना आपण चोर नाही हे पोलिसात जाऊन सिद्ध करून सर्टिफिकेट घ्यावे ह्या योजनेला आपला पाठिंबा आहे तर!हा हा.. पुन्हा सिलेक्टीव्ह रिडींग. (तुम्हाला नक्की कुठे असे ट्रेनिंग मिळाले आहे त्या ठिकाणच्या गुरूंना आमचा पण प्रणाम सांगा, नै म्हणजे काय आहे.. असे कै च्या कै निष्कर्ष काढून कांगावा करायचे तुमचे स्किल वाखाणण्यासारखे आहे म्हणून..) :)) मग वरील प्रकरणाच्या अनुषंगाने भ्रष्ट नेत्यांमधील ९०% लोकांवरील कारवाईला महत्व मिळेल की १०% संदिग्ध गुन्हेगारांच्या मूलभूत हक्कांना..? येथे काळे-पिवळे केलेल्या भागामध्ये दोन शब्द लिहिले आहेत. दोनच आहेत पण ते वाचा. मुद्द्याचे ते वगळून बाकी वाक्य वाचायचे आणि त्यावरून निष्कर्ष काढायचे म्हणजे राहुल गांधीची मुलाखत ऐकल्यासारखे वाटत आहे. असो, मोठे व्हा.जर मला भारत खरंच मनापासून स्वच्छ हेतूने स्वच्छ करायचा आहेच तर मी अशा प्रश्नांकडे लक्षच देणार नाही, नरेंद्र मोदी सध्या तेच करत आहेत आणि त्याला तुमचा पाठिंबा आहे. मग इथेच का सर्व चिंता प्रश्न निर्माण होतात? कार्ड पेमेंट, online ट्रान्सफर च्या उपदेशाचे डॉस पाजता इथलं पब्लिक थकत नाहीये, समस्या असतात मार्ग काढायला हवेत असं हस्तिदंती प्रक्षेपण होतंय, मग इथेच का घोडं पेंड खातं महाराजा? :))नक्की घोडे कुठे पेंड खात आहे ते नीट सांगा बघू. मग मी उत्तर देतो.न्यायालयांचा संथ कारभार असे
In reply to न्यायालयांचा संथ कारभार असे by संदीप डांगे
There's a long list of
In reply to न्यायालयांचा संथ कारभार असे by श्रीगुरुजी
न्यायाधीशांनी ठरविले तर खटला
In reply to There's a long list of by संदीप डांगे
याकूब मेमन???
In reply to न्यायाधीशांनी ठरविले तर खटला by श्रीगुरुजी
गुन्हा घडल्यानंतर तब्बल २२
In reply to याकूब मेमन??? by संदीप डांगे
रात्री न्यायालयाचे दरवाजे
In reply to गुन्हा घडल्यानंतर तब्बल २२ by श्रीगुरुजी
उदाहरण पूर्ण चुकले आहे. या
In reply to रात्री न्यायालयाचे दरवाजे by संदीप डांगे
कसाब?? चार वर्षात लटकावले
In reply to गुन्हा घडल्यानंतर तब्बल २२ by श्रीगुरुजी
कसाबचा खटला कोट्यावधी
In reply to कसाब?? चार वर्षात लटकावले by संदीप डांगे
तर भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा
In reply to कसाबचा खटला कोट्यावधी by श्रीगुरुजी
बरोबर आहे. आजवर कोणत्याही
In reply to तर भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा by संदीप डांगे
ऑक्टोबर २०१४ मध्ये सुप्रिम
In reply to न्यायालयांचा संथ कारभार असे by संदीप डांगे
ऑक्टोबर २०१४ मध्ये सुप्रिम कोर्टाने काळापैसावाल्यांची नावे जाहीर करायला तुम्हाला काय अडचण आहे असं सरकारला विचारलं होतं, दोन वर्षे होऊन गेलीत त्याला. पुढे काय झालं?स्विस सरकारकडून ती नावे मिळविण्याचा करार करताना तात्कालिक (युपीए) सरकारने, "त्या लोकांना कोर्टाने गुन्हेगार ठरविण्याच्या अगोदर त्यांची नावे सार्वजनिक केल्यास करार रद्द होईल व भविष्यात स्विस सरकार नवीन नावे देण्यासाठी बांधील राहणार नाही." असे कलम मंजूर केले होते. या कलमामुळेच एनडिए सरकारनेही ती नावे सार्वजनिकरित्या उघड केली नव्हती. फक्त कोर्टालाच त्या नावांची गुप्त (सिक्रेट) यादी दिलेली आहे. कोर्टाच्या हे निदर्शनाला आल्यावर त्यानेही परत हा मुद्दा काढला नाही. ही बातमी माध्यमात आल्यावर तिची फार चर्चा होऊन आपले पितळ उघडे पडेल या भितीने युपीए मधले कोणीच आता तो मुद्दा पुढे आणत नाही. हा मुद्दा वित्तमंत्री जेटली यांनीही एका राष्ट्रीय वाहिनीवरच्या मुलाखतीत स्पष्ट केला होता. याशिवाय, सगळेच स्विस बॅंक अकाऊंट बेकायदेशीर असतात असे नाही. भारतीयांनी कायदेशीररित्या उघडलेल्या स्विस अकाऊंटबद्दल काही कारवाई करण्याची गरजच नाही. त्यामुळे, पुरेसे पुरावे गोळा केल्याशिवाय कोणाची नावे जगजाहीर करण्याने, सरकारवर अनेक $दशलक्षचे अब्रूनुकसानीचे खटले स्विस कोर्टात दाखल होऊ शकतील. त्या नंतर तर स्विस सरकारचे सहकार्य मिळवणे अधिकच कठीण होईल. ही वरची युपीए सरकारने स्वतःच्या हाताने तयार केलेली सगळी पार्श्वभूमी नीट माहीत असूनही व स्वतःच्या शासनकाळात नावे प्रसिद्ध न करता, एनडीए सरकारला "करा, करा स्विस अकाउंटवाल्याची नावे सार्वजनिक करा" असे म्हणणे किती कांगावाखोरपणाचे आणि जनतेची दिशाभूल करणारे होते, हे सांगायला हवेच का ? जनता सनसनाटी प्रश्न लक्षात ठेवते. त्याची उत्तरे तेवढी सनसनाटी नसल्याने कोठेतरी कोपर्यात बारीक अक्षरांत किंवा टीव्हीवरची धावत्या बातमीच्या स्वरूपात येतात व जनतेचे तिच्याकडे तेवढेसे लक्ष जात नाही. हे कांगावा करणार्यांच्या फायद्याचेच असते. जनतेची दिशाभूल करून केवळ सरकारला अडचणीत आणण्याच्या उद्देशाने, कोणताही विधिनिषेध न बाळगता; अतिरेकी, पाकिस्तान व काळाबाजार्यांना मदत करतील अशी विधाने, भारतीय राजकारणी सतत करताना दिसतात, त्यातलेच हे एक.यासंबंधी आता गडबडीत हा
In reply to ऑक्टोबर २०१४ मध्ये सुप्रिम by डॉ सुहास म्हात्रे
सद्य सरकारने वरच्या
In reply to यासंबंधी आता गडबडीत हा by डॉ सुहास म्हात्रे
जनतेची दिशाभूल करून केवळ
In reply to ऑक्टोबर २०१४ मध्ये सुप्रिम by डॉ सुहास म्हात्रे
"जनतेची" दिशाभूल करत तसे आरोप
In reply to जनतेची दिशाभूल करून केवळ by संदीप डांगे
ओके. मला पडलेला प्रश्न मी
In reply to "जनतेची" दिशाभूल करत तसे आरोप by डॉ सुहास म्हात्रे
'प्रत्येक गोष्ट राजकारणीच
In reply to ओके. मला पडलेला प्रश्न मी by संदीप डांगे
'प्रत्येक गोष्ट राजकारणीच भरवतात म्हणून जनता विचारते' असे समजणे गैर आहे.तो गैरसमज होऊ नये म्हणुनच वर...(अ) मनात उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे विचारणारे...हे मुद्दाम लिहिले आहे. दर वेळेस अगदी किचकटपणे तसे लिहायचे म्हटले तर मोठे पाल्हाळ होईल. तसे पाहिले तर, असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण करून त्यांचा गोंघळ उडवून, आपली पोळी भाजून घेण्यात राजकारणी आघाडीवर आहेत हेही सत्य आहेच. तुमच्या-माझ्यापेक्षा हे जग फार मोठे आहे. मी कोणाबद्दल व्यक्तीगत सहसा लिहीत नाही आणि लिहायचेच असले तर आडून वार न करता मी तडक तसा उल्लेख करून लिहितो. त्यामुळे परत असा गैरसमज करून घेऊ नये. असे दोनदा झाले म्हणुन हे खास लिहावे लागत आहे. :)डांगे अण्णा
In reply to न्यायालयांचा संथ कारभार असे by संदीप डांगे
आमची कामं करायला सरकार निवडून
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
एक फास्टर दॅन फास्टेस्ट ट्रॅक
In reply to आमची कामं करायला सरकार निवडून by संदीप डांगे
ते विधान काय आहे ते मी नंतर
In reply to एक फास्टर दॅन फास्टेस्ट ट्रॅक by सुबोध खरे
फाटे फोडू नका
In reply to ते विधान काय आहे ते मी नंतर by संदीप डांगे
खरे साहेब, जो आरोप करतो
In reply to फाटे फोडू नका by सुबोध खरे
विधान तुम्ही केलं आहे ते
In reply to खरे साहेब, जो आरोप करतो by संदीप डांगे
सटासट प्रकरणे निकाली काढता
In reply to विधान तुम्ही केलं आहे ते by सुबोध खरे
कसाबला रंगे हात पकडलं
In reply to सटासट प्रकरणे निकाली काढता by सुबोध खरे
खरे साहेब, आता माझा प्रतिसाद
In reply to कसाबला रंगे हात पकडलं by सुबोध खरे
We will set-up an effective Lokpal institution. Corruption at any level will be dealt with firmly and swiftly.
भाजपच्या निवडणूक जाहिरनाम्यातलं हे पान क्रमांक अठरावरचं वाक्य आहे. १. ह्यातल्या swiftly ह्या शब्दाचा अर्थ ऑक्सफर्ड डिक्शनरी नुसार खाली https://en.oxforddictionaries.com/definition/swift Definition of swift in English: swift adjective 1Happening quickly or promptly: ‘a remarkably swift recovery’ 1.1 Moving or capable of moving at high speed: ‘the water was very swift’ ‘the swiftest horse in his stable’ adverb literary Swiftly: ‘streams which ran swift and very clear’ ‘a swift-acting poison’ स्विफ्टली चा अर्थ बोलीभाषेत फटाफट किंवा मी वापरला तसा सटासट घेतला जातो. तुमच्या मते तो तसा नसेल तर तुमचा आरोप रद्द होतो. रद्द झालेला चालणार असेल तर पुढे वाचू नका. बिनबुडाचा आरोप केल्याबद्दल माफी मागू शकता. अन्यथा पुढे वाचा. २. एक फास्टर दॅन फास्टेस्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करुन सटासट प्रकरणं निकाली काढणे काय फार मोठी गोष्ट नाही. हे माझं विधान आणि भाजपाच्या जाहिरनाम्यातलं We will set-up an effective Lokpal institution. Corruption at any level will be dealt with firmly and swiftly. हे विधान तुलनात्मकदृष्ट्या, अर्थाच्या अनुषंगाने कुठेच विसंगत नाही असे माझे मत आहे. मूळ आशय आणि अर्थ एकच आहे. भाषेचा आणि शैलीचा फरक सोडला तर. ३. हे लक्षात घेता, बेजबाबदार विधानं, तेही देशाच्या सर्वोच्च शक्तीच्या संसदेसाठी लढवल्या जाणार्या निवडणुकीतल्या जाहिरनाम्यात जिंकून येण्याच्या दृष्टीने, राष्ट्रीय पातळीवरला सर्वात महत्त्वाच्या दोन पक्षांपैकी एक असतांना निवडून आल्यावर काय करु याचे आश्वासन म्हणून देण्यासाठी वापरणे जास्त धक्कादायक आहे. ४. तर माझं विधान आणि भाजपचं जाहिरनाम्यातलं विधान यात काहीही फरक नसल्याने जर ते भाजपचे विधान तुम्हाला बेजबाबदार वाटत असेल (सटासट प्रकरणे निकाली काढता येत नाहीत हे शेंबडं पोरही सांगेल.- हे आपलं विधान) तर माझेही विधान बेजबाबदार आहे असे कबूल करायला मी तयार आहे. निवडणूक जाहिरनामा लिहिणारे व प्रसिद्ध करणारे, त्यावर निवडून येणारे हे शेंबड्या पोराहून गयेगुजरे आहेत असा आपल्या विधानाचा अर्थ होतोय. ५. मूळ पूर्ण वाक्य व त्याचा मला अभिप्रेत असलेला अर्थः विद्यमान पंतप्रधानांची धडाकेबाज 'नियत' बघता अशा केसेस साठी एक फास्टर दॅन फास्टेस्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करुन सटासट प्रकरणं निकाली काढणे काय फार मोठी गोष्ट नाही. माझा संपूर्ण रोख पंतप्रधानांच्या 'नियत' पक्षी 'हेतू' वर होता. सदर नोटबंदीचा निर्णय घेण्यामागे काळापैसा, भ्रष्टाचार दूर करण्याबद्दल खंबीर असलेल्या 'हेतू'बद्दल बरेच लोक बोलत आहेत, भाजपनेते सुद्धा संसदेत स्टेटमेंट देतांना असेच 'प्रधानमंत्रीजी की नियत पर कैसे शक कर सकते है' असं काहीसं बोलले. तर मूळ मुद्दा होता पंतप्रधानांची नियत. नियत जर साफ असेल व खरी असेल तर जसा नोटबंदीचा निर्णय राजकिय दुष्परिणामांची पर्वा न करता केवळ जनतेच्या भल्यासाठी घेतला तसाच निर्णय हे खटले स्विफ्टली व फर्मली मार्गी लावण्यासाठी आपल्या जाहिरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे मोदी घेतील तर काय मोठी गोष्ट आहे? जनता आनंदाने दिवाळी साजरी करेल, (मी तर सगळ्यात पुढे असेन) वरिल विधान हे संपूर्ण आहे, उगाच कुठलाही सोयिस्कर तुकडा उचलून लिहिणार्याच्या अंगावर आरोपांची फेकाफेक करु नये. (स्पष्टीकरण पटले असल्यास काय केले पाहिजे हे तुम्हासारख्या उच्चविद्याविभूषित सेनानी डॉक्टर सदस्यास मजसारख्या फुटकळ सदस्याने सांगायची गरज नाही. पटले नसल्यास प्रतिवाद करावा, तुम्ही केलेला बेजबाबदारपणाचा आरोप मागे घेईपर्यंत प्रतिसाद देत राहीन. - टेराबायटीचे कारण पुढे करुन आवराआवर केलेली चालणार नाहीच :)) - ) धन्यवाद!भाजपाचा २०१४ निवडणुक
In reply to खरे साहेब, आता माझा प्रतिसाद by संदीप डांगे
Corruption at any level will
In reply to खरे साहेब, आता माझा प्रतिसाद by संदीप डांगे
मी आधीच म्हटल्याप्रमाणे आपण
In reply to Corruption at any level will by सुबोध खरे
का उगाच पुड्या सोडताय आपल्या
In reply to मी आधीच म्हटल्याप्रमाणे आपण by संदीप डांगे
मी मुद्दा धरूनच बोलत आहे,
In reply to का उगाच पुड्या सोडताय आपल्या by सुबोध खरे
डॉक, कशाला पातळी सोडताय?
In reply to का उगाच पुड्या सोडताय आपल्या by सुबोध खरे
मोदक शेट
In reply to डॉक, कशाला पातळी सोडताय? by मोदक
फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय?
In reply to मोदक शेट by सुबोध खरे
कोपर्डी प्रकरणात लक्षावधी
In reply to फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय? by संदीप डांगे
स्वत: बँकेत गेलात तर चेक
In reply to बॅन्केकडे कॅश असेल तर तेवढे by श्रीगुरुजी
मनमोहनसिंग स्वतःच्या बॅन्केचा
In reply to स्वत: बँकेत गेलात तर चेक by संदीप डांगे
आता तर 24000 रूपये पण देत
In reply to परवाच्या भाषणात मनमोहन सिंग by श्रीगुरुजी
कधीतरी रोख पगार देण्याऐवजी
In reply to आता तर 24000 रूपये पण देत by याॅर्कर
सहमत, हे आवाहन अगदीच राजकीय
In reply to कधीतरी रोख पगार देण्याऐवजी by श्रीगुरुजी
रबी हंगामासाठीची पेरणी
गावात गव्हाच्या पेरण्या ३-४
In reply to रबी हंगामासाठीची पेरणी by गॅरी ट्रुमन
नोटाबंदी केल्यामुळे रबीच्या
In reply to रबी हंगामासाठीची पेरणी by गॅरी ट्रुमन