✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

...मग असे द्या पैसे!

न
निनाद यांनी
Tue, 11/15/2016 - 03:21  ·  लेख
लेख
कालच एकात्मिक भरणा पद्धती हा लेख मराठी विकिवर टाकला तोच येथे ही देत आहे. प्राप्त परिस्थितीत त्याचा उपयोग होईल असे वाटते. एकात्मिक भरणा पद्धती हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस या इंग्रजी नावाचे भाषांतर आहे. यापेक्षा चपखल शब्द सुचत असतील तर जरूर द्या. तसेच या लेखात भर घालण्यासाठी स्वागत आहे! दुवा: https://mr.wikipedia.org/wiki/युनिफाईड_पेमेंट_इंटरफेस (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A1_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8) ----------- एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. दि. ११ एप्रिल २०१६ पासून भारतीय रिझर्व बॅंक व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही सुविधा वापरून एकावेळी किमान रु. ५० व कमाल एक लाख रुपये इतका भरणा तत्काळ करता येतो. यासाठी लाभार्थींच्या बॅंकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासारखी कोणतीही माहिती आवश्‍यक नसते. युनिफाईड पेमेंट इंटरफेस सुविधा वापरल्याने कोणत्याही व्यक्तीला कोणालाही पैसे देणे शक्य आहे. तसेच कोणाकडूनही पैसे घेता येणार आहेत. याशिवाय विविध बिले ऑनलाईन देता येणे शक्य आहे. या सुविधेचा उपयोग ऑनलाइन शॉपिंग साठीही करता येणार आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरण्यासाठी फक्त संबंधिताचा व्हर्च्युअल पेमेंट अड्रेस (व्हीपीए) माहीत असणे आवश्‍यक असते. यूपीआय वापरासाठी नोंदणी - रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी यूपीआय ऍप उतरवून घ्यावे. व आपल्या बॅंकेशी जोडावे. ( कसे जोडावे या विषयी या विभागात मुळ लेखात अधिक माहिती आवश्यक आहे) याचे फायदे:
  • सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
  • चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
  • अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
  • पैसे आपल्या बॅंक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.
या पद्धतीची माहिती आपल्या जवळच्या दुकानदाराला आणि व्यावसायिकाला द्या. तत्काळ पैसे देण्यासाठी याच उपयोग होईल. अगदी चहा ते भाजीवालाही असे पैसे स्विकारू शकेल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
तंत्र
अर्थकारण
अर्थव्यवहार
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
42954 वाचन

💬 प्रतिसाद (144)

प्रतिक्रिया

बिनधास्त वापर

पैसा
Wed, 11/16/2016 - 05:40 नवीन
बिनधास्त वापर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

तुम्ही उत्तम माहिती दिली आहे.

निओ१
Sun, 11/20/2016 - 01:06 नवीन
तुम्ही उत्तम माहिती दिली आहे. माझे मत आहे, माझ्या सुविधेसाठी जर मला एक हजार रु. मागे काही पैसे द्यावे लागले तर मी ते का नाकारावेत? अनेक जागी आपण गाडी पार्क करण्यासाठी १० ते २० रु देतो ना ते देखील काही तासासाठी? मला हे लोकांचे लॉजिक समजत नाही, ते का पैसे घेतात? अहो! सेवा आली की सेवेचे मुल्यपण असते! हे आपला समाज का विसरतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सामान्य भावना आहे, लोकांना

संदीप डांगे
Sun, 11/20/2016 - 02:35 नवीन
सामान्य भावना आहे, लोकांना कुठेही पैसे फुकट द्यावे वाटत नाहीत.दुकानदार स्वतःच पक्क्या बिलाशिवाय वस्तू विकू शकत नाहीच अशी व्यवस्था झाल्यास - माझ्याकडे कॅश आहे ती देऊन मी पक्के बिल घेऊ शकतो हे सामान्य कायदेशीर उदाहरण. ह्यात वस्तू व सेवेवर जो काही सरकार निर्धारित कर आहे तो लागणारच, तो कर अंतर्भूत करूनच विक्री किंमत दुकानदार सांगेन. यात कायदेशीररित्या सुटका नाही व झक मारून ग्राहकाला ती सर्व किंमत वस्तू सेवा हवी असेल तर द्यावीच लागते. हाच व्यवहार एकही शिल्लक पैसा न देता रोखीने वा कार्ड swipe करून होतो, तेव्हा ग्राहक किंवा दुकानदार खळखळ करत नाही. पूर्वी 2.5 पर्यन्त कार्ड पेमेंट अधिभार घ्यायचे त्यामुळे कार्ड पेमेंट टाळण्याकडेच जोर होता. आता हे दोन मार्ग (एकही पैसा अधिक न देता) उपलब्ध असतांना हा पैसेवाला प्रकार लोकप्रिय होणारच नाही. त्यामुळे सरकारने अशा सेवांवर कोणतेही चार्जेस लावू नये व बँकांना त्यांच्या प्रत्येक ग्राहकाला चेकबुक एटीएम कार्ड सारखेच मोबाईल app देणे, sms transaction व त्याची सर्व सुविधा, लोकशिक्षण, प्रचार प्रसार मोफत पुरवणे बंधनकारक करावे. तसेच याप्रकारे व्यवहार करण्यावर करातूनच काही सूट दिली तर प्रोत्साहन मिळेल. म्हणजे रोख बिल घेतले तर 100+18% टॅक्स होत असेल तर तो 16.5 किंवा 17 करावा. याद्वारे जास्तीत जास्त व्यवहार होऊन प्रत्यक्षात करसंकलन वाढेल. उठसुठ फक्त 'पीएमोला पाठवू पीएमोला पाठवू' चा रतीब घालणाऱ्यानी सदर संकल्पनेला पीएमो पर्यंत पोचवण्याचा व तिथून अंमलबजावणी होईल असे बघण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१

सेवा आली की सेवेचे मुल्यपण असते! हे आपला समाज का विसरतो?

Nitin Palkar
Fri, 12/09/2016 - 20:48 नवीन
सेवा मूल्य अथवा कर वाचवणे हेच काळा पैसा निर्माण होण्याचे मुख्य कारण आहे हे आपण विसरतो. लाख दोन लाखाचे दागिने करताना सुधा दोन चार हजार रुपये कर वाचवण्याकरता पक्के बिल नको म्हणून सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१

काय कमाल आहे . इतके सोपे असते होय. सामान्य माणूसच दोषी ?

अभिजित - १
Fri, 12/09/2016 - 21:43 नवीन
BMC कचरा घोटाळा फक्त - ९०० कोटी रु. , जकात घोटाळा - १ वर्षात ६००० कोटी रु अंदाजे राज्य सरकार - तोल वसुली पूर्ण होऊन हि तोल काढायला नकार. मुंबई पुणे एक्सप्रेस वे. आता तर आठ पदरी करायच्या नावाखाली २०३५ पर्यंत टोल जनतेच्या मानगुटीवर बसवणार . हे सगळे सरकारी घोटाळे तुम्हाला दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar

नितीन पालकर - तुम्ही कोणाचे एजन्ट ?

अभिजित - १
Fri, 12/09/2016 - 21:56 नवीन
टोल वाल्या लोकांचे ? कि सरकारी बाबू लोकांचे ? कारण तुम्हाला करप्शन च्या समुद्रातील देव मासे दिसत नाहीत. चिल्लर असलेला सामान्य माणूस हाच खरा दोषी वाटतोय म्हणून म्हटले असे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar

शेवटी काय ठरलं?

कंजूस
Tue, 11/15/2016 - 18:01 नवीन
शेवटी काय ठरलं? काळाची गरज काय? NFC वाला स्मार्टफोन का/ 4G वाला स्मार्टफोन ?उपयुक्त
  • Log in or register to post comments

दोन्ही

निनाद
Wed, 11/16/2016 - 02:30 नवीन
दोन्ही असलेला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अतिशय उपयुक्त धागा.

अजया
Tue, 11/15/2016 - 19:32 नवीन
अतिशय उपयुक्त धागा. पैसाताई फार छान संकलन दिले आहेस. अजिबात माहिती नव्हती या प्रकाराची.धन्यवाद.
  • Log in or register to post comments

भारतात पेपाल चालतं का?

गामा पैलवान
Wed, 11/16/2016 - 00:30 नवीन
लोकहो, भारतात पेपाल चालतं का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

हो, चालतं

संदीप डांगे
Wed, 11/16/2016 - 00:42 नवीन
हो, चालतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

धन्यवाद!

गामा पैलवान
Wed, 11/16/2016 - 02:29 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद! मला वाटतं इमेल व आधार कार्डशी संलग्न असलेलं कुठलंही मोबाईल अॅप बँकिंगसाठी चालू शकेल. एकात्मिक भरणा पद्धती अशीच काहीशी दिसते आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

पे-पाल भारतात चालते पण त्याला

निओ१
Sun, 11/20/2016 - 01:10 नवीन
पे-पाल भारतात चालते पण त्याला भरपूर सरकारी नियमाचा सेट पुर्ण करावा लागतो. त्यामुळे पे-पाल रोजच्या वापरासाठी सध्यातरी भारतात योग्य पर्याय नाही आहे. मी गेली ६-७ वर्षे पे-पाल वापरत आहे व आठवडी आज ही वापरतो, बाहेर देशातून कामाचे पैसे घेण्यासाठी वापरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

खरडफळ्यावर ११ नोव्हेंबरला

कंजूस
Wed, 11/16/2016 - 06:07 नवीन
खरडफळ्यावर ११ नोव्हेंबरला मोबाइल पेमेंट्सबद्दल जी चर्चा झाली होती ती साठवली होती. ती इथे द्यावी का? चर्चा तांत्रिक आहे तरीपण खफ फक्त सभासदांसाठी आहे म्हणून विचारतो.निनादच्या खरडवहीत लिहू का?
  • Log in or register to post comments

इथेच लिहा की

पैसा
Wed, 11/16/2016 - 08:05 नवीन
इथेच लिहा की. सगळे बरे वाईट मुद्दे एकत्र असू देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मोबाइल पेमेंट अॅप्स

कंजूस
Wed, 11/16/2016 - 08:30 नवीन
मोबाइल पेमेंट अॅप्स कंजूस Fri, 11/11/2016 - 15:00 पेटीम वगैरे मोबाइल पेमेंट्सवर लेख टा का कुणीतरी. १)कोणती अॅप्स २)कुठे चालतात(!) ३)इंटरनेट लागते का?/ नाही लागले तर पेमेंट करता येते का? --- कंजूस Fri, 11/11/2016 - 16:06 ओके नाव न घेता कोणत्या सोयी असतात/असाव्यात, एका अॅपमधून दुसय्राला ट्रान्स्फर होते का ,अॅप्स फ्री असतात का? टॅक्स,सर्विस टॅक्स असतो का?नेट ब्यान्किंग,एसेमेस यांत काय फरक आहे हे तरी लिहा.वापर केलेल्यांनी अनुभव लिहा. संदीप डांगे Fri, 11/11/2016 - 16:09 पेटीम बद्दल लिहा राव. मला तर कायबी म्हाईत नाही त्यातली. बरीच शोधायचा प्रयत्न केला पण काही समजली नाही ही व्यवस्था कशी वापरायची ते. पेपाल सारखं आहे काय? सतिश गावडे Fri, 11/11/2016 - 16:34 पेटीयमचे खाते काढून त्या खात्याचा माध्यमातून पैसे चुकते करणे हा पर्याय ज्यांना "ऑफर" हव्या असतात त्यांच्यासाठी कामाचे आहे त्यांनाच फायद्याचे आहे. जे गरजेच्या वस्तू आहे त्या भावाला खरेदी करतात त्यांनी थेट इंटरनेट ब्यांकिंग वापरणे सोयीस्कर ---- मंदार भालेराव Fri, 11/11/2016 - 16:52 पेटिम किंवा तत्सम ऍप हे सध्या पेमेंट गेटवे सारखं काम करतात. या मध्ये आपण भरपूर सुविधा वापरू शकतो. उदा. पेटीमचा वापर आपण खालील गोष्टीसाठी करू शकतो करू शकतो. रिचार्ज :- मोबाईल, डीटीएच,डेटाकार्ड बिल भरणा :- गॅस, लाईट, फोन तिकीट बुकिंग :- बस, मेट्रो,रेल्वे , विमान, चित्रपट, एम्युसमेंट पार्क, इव्हेंट्स इ... विविध खरेदी : वाहन, सोने, ग्रोसरी, ऑनलाईन शॉपिंग साईट वरच्या वस्तू इ ... इन्शुरन्स, इमआय पेमेंट अशा अनेक गोष्टींसाठी करू शकतो. मोबाईल वॉलेट : कोणत्याही साईट वरून खरेदी केल्यास पेमेंट करतांना आपल्याला डेबिट/क्रेडिट कार्ड नेट बँकिंग आणि मोबाईल वॉलेट असे पर्याय येतात. आता मोबाईल वॉलेट म्हणजे असे पाकीट ज्यात तुम्ही आधीच पैसे जमा करून ठेवू शकता आणि तुमच्या गरजे प्रमाणे वापरू शकता. उदा. मी पेटीम वरून २५० rs चे रिचार्ज केलं आता पेमेंट करतांना पेटीम तुम्हाला वरचे ३ पर्याय देईल. त्यात तुम्ही नेट बँकिंग निवडले तर पेटिट तुम्हाला उपलब्ध बँकांचे पर्याय दाखवते. त्यात तुमची बँक असेल तर ती निवडायची . हि निवड केल्यावर पेटीम तुम्हाला बँकेच्या साईटवर रिडायरेक्ट करेल/ नेईल. तुमच्या बँकेच्या साईट वर आल्यास तुम्ही तुमचे नेहमी प्रमाणे प्रकिया पूर्ण करून पैसे भरू शकता. आता जर तुम्ही मोबाईल वॉलेट निवडलं असेल तर पैसे तुमच्या मोबाईल वॉलेट मधून कट होतील. पण त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या वॉलेट मध्ये पैसे भरणे गरजेचे असते. हे पैसे तुम्ही नेट बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड द्वारे वॉलेट मध्ये भरू शकता. तुम्ही जर मोबाईल वॉलेट द्वारे पैसे भरत असाल तर विविध साईट तुम्हाला कॅशबॅकच्या ऑफर पण देतात. हे कॅशबॅक तुमच्या मोबाईल वॉलेट मध्येच जमा होते. --- अभिजीत अवलिया Fri, 11/11/2016 - 17:01 पेटिम प्रमाणेच मोबिक्विक देखील चांगले आहे. --- गॅरी ट्रुमन Fri, 11/11/2016 - 17:13 पेटीएमवर एक गोष्ट चांगली आहे. मधूनमधून कॅशबॅक मिळतो.मी उबरचा बराच वापर करतो. पेटीएम २२२ किंवा ५५५ रूपयांनी रिचार्ज करा आणि उबरसाठी पेटीएम वापरून पैसे भरा आणि २५% (७५ रूपयांपर्यंत) कॅशबॅक मिळवा अशाप्रकारच्या ऑफर्स पेटीएम मधूनमधून देते. त्या ऑफर्स किती दिवस चालतील हे माहित नाही पण चालू आहेत तोपर्यंत वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायचे ----- बोका-ए-आझम Fri, 11/11/2016 - 17:25 PAYTM वर एक अत्यंत मोठा फायदा म्हणजे समोरच्याचा मोबाईल नंबर माहित असेल आणि त्याच्याकडेही PAYTM असेल तर सरळ पैसे transfer करु शकता. टॅक्सी आणि रिक्षासाठी अत्यंत फायदेशीर. कालपासून एका टॅक्सीवाल्याला आणि दोन रिक्षावाल्यांना PAYTM ने पैसे दिलेले आहेत. हे पैसे तुमच्या PAYTM account मधून तुमच्या bank account मध्ये IFSC code वापरून transfer करता येतात. त्यामुळे इतरत्र पैसे पाठवण्याची मोठीच सोय झालेली -- बोका-ए-आझम Fri, 11/11/2016 - 17:28 सगा, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण netbanking मध्ये दर transaction ला one time password घेणं (ते सर्वात सुरक्षित आहे) कदाचित वैतागवाडी ठरू शकतं. त्याऐवजी e-wallet बरं. बिलं भरण्यासाठी netbanking सर्वोत्तम आहे. --- मंदार भालेराव Fri, 11/11/2016 - 17:29 फक्त पेटीम च नाही तर इतर अनेक ऍप्स आहेत जी चांगली आहेत आणि ऑफर्स देतात.प्रॉब्लेम फक्त एक यांचे ऍप मोबल्यात खूप जागा खातात. त्यामुळे नको वाटते. डिजिटल मनी (पैसा )ची हि बाकी सुविधा झकास आहे. पण अनेक जण या ऍप मध्ये कॅश लोड करायला घाबरतात, त्यात मी पण येतो. कारण एकच या कंपन्या कधी बंद पडतील याची भीती. ---- पैसा Fri, 11/11/2016 - 17:34 पेटीएम बद्दल मिपावर एक लेख आला होता मधे. एकूणात सुरक्षित नाही असा निष्कर्ष निघाला होता. क्रेडिट कार्डाने ऑटीपी वापरून वस्तू घेणे उत्तम. कालच अमेझॉनवरून १००० रु च्या वस्तू मागवल्या. चहा, साबण, पेस्ट, क्लीनर इ. त्यावर २०० रुपये गिफ्ट सर्टिफिकेटच्या रूपात डिस्काउंट मिळाला. स्नॅपडीलवरही सध्या क्रेडिट डेबिट कार्ड पेमेंटला १०% डिस्काउंट आहे. ४/८ दिवसात लागतील अशा गोष्टी तिथून थेट मागवलेल्या उत्तम. ----- पैसा Fri, 11/11/2016 - 17:37 एअर्टेल मनीवाल्यानी क्रेडिट कार्डला ओटीपी नव्हता त्या काळात माझ्या क्रेडिट कार्डाचे पिन बदलून घेऊन पैसे काढले होते. माझा अपराध हा की मी एअरटेलचे पोस्ट पेड बिल भरायला क्रेडिट कार्ड लावून दिले होते. त्यानंतर कानाला खडा. एकही अकाउंट कनेक्ट करत नाही. ---- संदीप डांगे Fri, 11/11/2016 - 17:40 पैतै, अगदी अगदी. ह्याचमुळे इ-वॅलेट पासून दूर आहे. ------ पैसा Fri, 11/11/2016 - 17:46 नशीब की मी लिमिट ५००० ठेवली होती. आणि पिन बदलल्याचा एसेमेस येताच मी कार्ड ब्लॉक केले. कार्ड ब्लॉक करीपर्यंत ५ मिनिटात त्यानी ४८०० काढून दुसर्या मोबाईलला ट्रान्सफर केले होते. त्या नंबराला फोन करून मी मनसोक्त शिव्या घातल्या होत्या. त्याच एअरटेल फोनवरून. उत्तर प्रदेश गाझियाबादचा नंबर होता. पण ट्रॅम्झॅक्शन झाले तो आयपी आणि मोबाईल नंबर सगळे पोलिसाना देऊनही त्याना काही फायदा नसल्याने सगळे तसेच सोडून दिले. तेव्हा ऑनलाईन क्रेडिट कार्ड कसे वापरतात यावर पोलिस स्टेशनातल्या लोकांची शाळा घेतली होती. =)) जर का लिमिट ठेवली नसती तर मला बराच मोठा चुना लागला असता. ------ अन्नू Fri, 11/11/2016 - 18:15 पे-टीएम बाबतची कळालेली बातमी- २०१५ ची ।।http://economictimes.indiatimes.com/industry/banking/finance/banking/ali... आणि ही २०१६ ची ।।http://economictimes.indiatimes.com/small-biz/startups/alibaba-staff-fro... पेटीएममध्ये चायनाची ४०% गुंतवणूक!! -- ।।अभिजीत अवलिया Fri, 11/11/2016 - 18:39 ही लिंक पहा रेवतीताई. ।।http://www.sbs.com.au/yourlanguage/hindi/en/article/2016/11/09/4-ways-no... तुमच्या नोटांचे स्थानिक चलनात रूपांतर करून टाकणे हाच एक सगळ्यात बरा उपाय दिसतोय
  • Log in or register to post comments

माझ्या अ‍ॅक्सिस बँकेचे हे

प्रकाश घाटपांडे
Wed, 11/16/2016 - 11:16 नवीन
माझ्या अ‍ॅक्सिस बँकेचे हे युपीआय साठी असलेले अ‍ॅक्सेस पे हे अ‍ॅप माझ्या मोबाईलला सपोर्ट करत नाही. माझा मोबाईल अगदीच दगड नाही. सॅमसंग ड्यऑस आहे
  • Log in or register to post comments

सॅमसंग गुगलचे android वापरते,

कंजूस
Wed, 11/16/2016 - 13:27 नवीन
सॅमसंग गुगलचे android वापरते, जाहिराती त्यांच्या साइट्सना डाइवर्ट करते .गुगल सर्चला नाही. तसेच त्यांचे पे न वापरता सॅमसंगचे डेवलप केलय.हा सर्व धपला सुंदर पिचाईने दाखवला त्याबद्दल त्याला बढती मिळाली यावर लेख आले होते. आरोप नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

एस बी आय. मिंगलची कुणाला कल्पना आहे का ?

माहितगार
Wed, 11/16/2016 - 12:02 नवीन
एस बी आय. च्या अलिकडील वृत्तपत्रीय जाहीरातीतून सोशल नेटवर्क वापरून आर्थीक व्यवहार पद्धतीसाठी 'एस बी आय. मिंगल' चा उल्लेख होता, हे काय आहे या बद्दल कुणाला काही माहिती आहे का ?
  • Log in or register to post comments

स्पेसिफिकेशन

बोका
Wed, 11/16/2016 - 12:17 नवीन
युपीआय चे टेक्निकल स्पेसिफिकेशन उपलब्ध आहे. त्यात देवाण-घेवाणीची काही छान उदाहरणे दिली आहेत. npci.org.in/documents/Technical_Specifications.pdf जर कोणाला अ‍ॅप लिहिता येत असेल तर मला वाटते हे स्पेसिफिकेशन वापरुन कोणीही अ‍ॅप लिहू शकेल.
  • Log in or register to post comments

IMPS is better option but

अभ्या..
Wed, 11/16/2016 - 13:09 नवीन
IMPS is better option but Axis Bank charges Rs.5 per transaction for me. plus service tax. in emergency it's better than NEFT. I also use axis pay and simple to use. Vodafone pesa is also best option. sometimes I have to deposit money in axis acount for cheque clearance after 5.oo pm. there is no CDM outside the bank. then Vodafone pesa helped me. bcoz mobile stores time is till 10.00. I can recharge mpesa account from there and transfer to bank account within minute. without charges. Vodafone also Cashback UpTo 50 rupees per month. it's another benefit.
  • Log in or register to post comments

या केस मध्ये IMPS बेस्ट ऑपशन

संजय पाटिल
Wed, 11/16/2016 - 13:34 नवीन
या केस मध्ये IMPS बेस्ट ऑपशन आहे एका सेकंदात ट्रांसफर होते अमाउंट ... पण कमिशन(: ज्या ब्यँका IMPS ला कमिशन लावत नाहित अश्या ब्यँकेत खातं उघडावं म्ह्ण्तो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बडोदा बॅंक... IMPS आणि रेल्वे

पुष्कर जोशी
Sat, 12/03/2016 - 15:40 नवीन
बडोदा बॅंक... IMPS आणि रेल्वे बुकिंग दोन्ही फुकट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

सेवा मूल्य अथवा कर वाचवणे हेच काळा पैसा निर्माण होण्याचे मुख्य क

Nitin Palkar
Fri, 12/09/2016 - 20:59 नवीन
सेवा मूल्य अथवा कर वाचवणे हेच काळा पैसा निर्माण होण्याचे मुख्य कारण आहे हे आपण विसरतो. लाख दोन लाखाचे दागिने करताना सुधा दोन चार हजार रुपये कर वाचवण्याकरता पक्के बिल नको म्हणून सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

एकदा का मोबाइल पेमेंट्स

कंजूस
Wed, 11/16/2016 - 13:21 नवीन
एकदा का मोबाइल पेमेंट्स सुरळीत झालं की साडेसाती मागे लागणारच. साडेसात टक्के टॅक्स.
  • Log in or register to post comments

कसला?

निनाद
Sat, 11/19/2016 - 17:20 नवीन
हा अजुन कोणता कर? जीएसटी येतो आहे ना??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

सत्यनारायण पुजेसाठी छोटा मंडप

कंजूस
Sat, 11/19/2016 - 19:02 नवीन
सत्यनारायण पुजेसाठी छोटा मंडप घालून बिल घेतले तर पाच हजारावर साडेसातशे रुपये सर्विस टॅक्स आहे.जो पुर्वी अजिबात नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

हेच

निनाद
Mon, 11/21/2016 - 02:26 नवीन
हेच तर गडबड होते आहे ना... म्हणजे मंडप घालण्याची अधिकृत किंमत पाच हजार नसून ५७५० आहे हे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक वस्तुची किंमत तेव्हाच पुर्ण होते जेव्हा सर्व कर भरून मग व्यवहार पुर्ण होतो. 'कर तर द्यायचा नाही' असे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

प्रतिसाद लेखक "कंजूस" आहेत

निओ१
Mon, 11/21/2016 - 02:42 नवीन
प्रतिसाद लेखक "कंजूस" आहेत म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

छोटे दुकानदार आपल्याला जी

कंजूस
Mon, 11/21/2016 - 06:04 नवीन
छोटे दुकानदार आपल्याला जी वस्तू छापील किंमत १०० रु असलेली देतात तेव्हा त्यांना १०रु सुटतात (मार्जिन). मोबाइलपेमेंट्सवर एक टक्का टॅक्स लावला तर ९ रु सुटतील.साडेसात टक्के कर बहुतेक नाही लावणार ही आशा आहे. ((# गेली दहा वर्षे आपण फोन बिलावर पंधरा टक्के कर देत आहोत. # मोबाइलचा वापर २०१० पासून वाढत जाऊन आता दर महिन्याला ( १०० कोटी ग्राहक दर महिन्याला १०० रुपयांचा रिचार्ज करत असतील असे धरले तर १५००कोटी रु कर??))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१

हे सर्व कर

निनाद
Mon, 11/21/2016 - 07:10 नवीन
हे इतर सर्व कर जी एस टी आल्यावर रद्द होतील. फक्त एकच कर राहील. यामुळे प्रणाली सुलभ होइल. मग हा प्रश्न नसेल ना? प्रश्नचिन्ह वाचून कुतुहल वाढले. म्हणजे कर गोळा होऊ नये असे म्हणणे आहे का? माझ्या मते जितका कर गोळा होतोय ते चांगलेच आहे. क्रयशक्ती असेल तसा कर गोळा होईल. कर परत अर्थव्यवस्थेत अधिकृत पैश्याच्या स्वरुपात येईल. मग अजून क्रयशक्ती वाढेल, तसा अजून लोक कर भरतील. - अधिकस्य अधिकम... मग कराची रक्कम कमी होईल. की माझे तर्क चुकीचे आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

साडेसाती

Nitin Palkar
Fri, 12/09/2016 - 21:07 नवीन
जर खरोखरी समग्र अर्थक्रांती यशस्वी झाली तर सर्व कर बंद होऊ शकतील. फक्त ‘बँकिंग व्यवहार कर’ हा एकच कर राहू शकेल. ज्याचे सर्वात वरचे टोक साडेसात टक्के असेल. सध्या हे सर्व स्वप्नवत वाटतंय पण काही काळ तरी सकारात्मक आशावादी असायला काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कार्ड स्वाईप मशिन किंवा सध्या ज्याला पीओएस मर्चंट टर्मिनल

निनाद
Sat, 11/19/2016 - 17:11 नवीन
कार्ड स्वाईप मशिन किंवा सध्या ज्याला पीओएस मर्चंट टर्मिनल म्हणतात,
  • ते घेण्याची काय पद्धती आहे?
  • किती पैसे लागतात?
  • बँक किती पैसे एका व्यवहाराला चार्ज करते?
  • महिन्याचे भाडे किती असते?
  • इतर काय अडचणी आहेत?
  • कोणत्या प्रकारे सगळ्यात कमी पैशात, भाड्यात हे बसवता येते?
  • त्यातल्या त्यात चांगली बँक कोणती?
  • कायदेशीररित्या पुर्णपणे फुकट बसवण्याची काही क्लुप्ति?
कुणी माहिती देईल का?
  • Log in or register to post comments

Www.payumoney.com

पुष्कर जोशी
Sat, 12/03/2016 - 15:42 नवीन
Www.payumoney.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

पीओएस मर्चंट टर्मिनल

Nitin Palkar
Fri, 12/09/2016 - 21:22 नवीन
पिओएस यंत्रे ई-बे अथवा इंडिया मार्ट या संस्थळांवर ३०००/- ते २५०००/- रुपयांना मिळतात. याचे भाडे नसते मात्र हमी काल संपल्यानंतर मामुली वार्षिक देखभाल खर्च असतो. व्यावसायिकाचे खाते असलेल्या बँकेशी ते संलग्न करता येते. याकरता लागणारी सर्व सेवा बहुतेक बँका मोफत देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

E-wallet प्रकाराला कायदेशीर

संदीप डांगे
Mon, 11/21/2016 - 11:36 नवीन
E-wallet प्रकाराला कायदेशीर आधार नाही असे वाचले, ह्या कंपन्या ऑनलाईन असून आपल्या अटीशर्ती वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे सामान्य ग्राहकाला त्याची कल्पना असेलच असे नाही, या बद्दल अधिक व खात्रीशीर माहिती इथे कुणाला असल्यास द्यावी.
  • Log in or register to post comments

E-wallet प्रकाराला कायदेशीर

टवाळ कार्टा
Mon, 11/21/2016 - 14:24 नवीन
E-wallet प्रकाराला कायदेशीर आधार नाही असे वाचले
=)) कुठे वाचले म्हणे असे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मी कुठे वाचले ते जाऊ द्या.

संदीप डांगे
Mon, 11/21/2016 - 14:31 नवीन
मी कुठे वाचले ते जाऊ द्या. एका समस्येवर उत्तर माहित असेल तर द्या, तसेही वरच्या प्रतिसादात शंकाच विचारलेली आहे. पैसाताईंचे ऐरटेल मनीवाल्यांनी पैसे खाल्ले, ह्या प्रकरणात काय कायदेशीर आधार किंवा मदत मिळेल/मिळते? इ-वॉलेट वाल्यांसाठी ट्राय सारखी रेगुलेटरी संस्था आहे काय? कायदेशीररित्या ह्या कंपन्यांचे उत्तरदायित्व काय आहे ह्याबद्दल कुठे माहिती मिळेल? काहीही डिस्पुट झाले तर किंवा झाले असतील तर त्यासंबंधात काही माहिती आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मी कुठे वाचले ते जाऊ द्या.

टवाळ कार्टा
Mon, 11/21/2016 - 17:45 नवीन
मी कुठे वाचले ते जाऊ द्या.
म्हणाजे हे पण ट्रकवाल्यासारखेच आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हे पण ट्रक सारखे जाणून बुजून

संदीप डांगे
Mon, 11/21/2016 - 18:34 नवीन
हे पण ट्रक सारखे जाणून बुजून भलतीकडे न्यायचे आहे काय? आपली मर्जी, पवन दुग्गल हे नाव तुम्हाला तरी माहिती असेलच, त्यांनी वरील प्रतिपादन केले आहे. आजच्या लोकमतमध्ये 8व्या पानावर बॉटम राईट ला बातमी आहे, (आता समजा 9व्या किंवा 7 व्या पेजवर, अगदीच बॉटम ला नाही तीन इंच वर बातमी सापडली तर मी खोटे बोलतो म्हणून काही लोक दिशाभूल, इत्यादी करत छाती पिटत येतीलच, तेव्हा बातमीतले प्रश्न महत्त्वाचे कि अनावश्यक डिटेल्स महत्त्वाचे याचा ज्यानेत्याने विचार करावा) तुमची शंका दूर झाली असल्यास, वेळ मिळाल्यास माझ्याही शंका दूर कराव्यात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कोणी लक्ष देत नाही

पैसा
Mon, 11/21/2016 - 19:17 नवीन
पैसाताईंचे ऐरटेल मनीवाल्यांनी पैसे खाल्ले, ह्या प्रकरणात काय कायदेशीर आधार किंवा मदत मिळेल/मिळते?
तेव्हा असे झाले की मी एअरटेल मनी कधीच वापर्त नाही, नव्हते. माझे आयसीआयसीआय च्या क्रेडिट कार्डाला एअरटेल पोस्टपेड बिलाच्या पेमेंटची स्टँडिंग इन्स्ट्रक्शन असल्याने कार्ड डिटेल्स त्यांच्याकडे होते. त्यानी सीव्हीव्ही मिळवून पिन बदलला आणि जेवढी क्रेडिट लिमिट होती तेवढे दुसर्‍या एअरटेल फोनला एअरटेल मनीमधे रु. ४८०० वळते केले. तेव्हा ओटीपी ची पद्धत नव्हती. मी पोलीस कंप्लेंट सुद्धा केली होती. पण इथल्या पोलिसाना सायबर क्राईमबद्दल काही माहिती नाही. पैसे काढून घेणार लोक उत्तर प्रदेशात म्हणजे त्यांच्या लिमिटच्या बाहेर होते. ऑनलाईन पेमेंट वगैरेचा पोलिसाना गंधही नव्हता. पोलिसांची पद्धत अशीच आहे की रक्कम चिल्लर असल्याने त्याना केस सोडवून काही फायदा नव्हता त्यामुळे त्यानी दुर्लक्ष केले. व्हिसा गेटवे वाल्यानी मात्र मला आयपी आणि मोबाईल नंबर वगैरे शोधून दिला होता. पण पुढे काहीच झाले नाही. मी ताबडतोब कार्ड ब्लॉक केले म्हणून थोडक्यात निभावले. एका कलीगचे तेव्हाच २ लाख रुपये केवळ कार्डाला लिमिट नसल्याने काढले गेले होते. त्याचे पैसे परत मिळाले नाहीत. सीव्हीव्ही वगैरे व्यवस्थित वापरून पैसे काढल्यामुळे पेमेंट स्वीकारणार्‍या दुकाने आणि साईट्स वर काही कारवाई होऊ शकत नाही असे तेव्हा कळले होते. फसवणुकीची केस वगैरे होउ शकत असावी. नक्की माहीत नाही. इवॉलेटवाले काही प्रमाणात बँकिंग सेवा देतात. हे खरे तर बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टखाली येत असावे. पण नेमके काय आहे ते मला माहीत नाही. शोधावे लागेल. बँकांच्या स्वतःच्या युपीआय, मोबाईल बँकिंगला कायद्याने काही अडचण दिसत नाही. पण पेटीएम, चिल्लर वगैरे खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांबद्दल माहिती काढावी लागेल. कंप्लेंट्सचे आंतरजालीय फोरम्स असतात. फसवणूक वगैरे झाली असेल तर तिथे माहिती मिळू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

त्यानी सीव्हीव्ही मिळवून पिन

निओ१
Wed, 11/23/2016 - 00:48 नवीन
त्यानी सीव्हीव्ही मिळवून पिन बदलला आणि जेवढी क्रेडिट लिमिट होती तेवढे दुसर्‍या एअरटेल फोनला एअरटेल मनीमधे रु. ४८०० वळते केले. तेव्हा ओटीपी ची पद्धत नव्हती. हे कसे शक्य झाले? एअरटेल मनी ईत्यादी तर २०१५-१६ ला सुरु झाले व ओटीपी २०१४-१५ ला. तरी तुमची Bank त्यासाठी तयार नसेल तरी, पेमेन्ट ईमेल तर २०१२ पासून सुरु आहेत. त्यानी सीव्हीव्ही मिळवून पिन बदलला आणि फक्त CVC मिळाला किंवा माहिती असला तरी पीन एवढ्या सहज नाही बदलू शकत कोणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मार्च 2014

पैसा
Wed, 11/23/2016 - 08:36 नवीन
मार्च 2014. otp त्यानंतर सुरु झाले. icici आणि airtel मनी वाल्यांचे काहीतरी घोटाळे connection तयार झाले होते. toll फ्री सारखा नंबर वापरून ते icici कडून बोलतोय असे भासवत आणि कार्ड security साठी डिटेल्स कन्फर्म करतोय म्हणत. कार्ड व्हिसा का मास्टर कार्ड due date सगळे त्यांच्याकडे असायचे. जन्मतारीख कन्फर्म केली की संपले. ती dob वापरून तेव्हा वाटेल ते डिटेल्स फोनवरून बदलता येत होते. आधी autho फोन नंबर आणि पिन असे icici ला फोन करून बदलता येत होते. हे प्रकार उघडकीला आले त्यानंतर otp सुरु झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१

Can you share link please?

निओ१
Wed, 11/23/2016 - 00:54 नवीन
आरबीचे नोटीफिकेशन आणि डिटेल नियम नेटवर उपलब्ध आहेत. "Master Circular – Policy Guidelines on Issuance and Operation of Pre-paid Payment Instruments in India" थोडे सर्च केले की आपल्याला उपयुक्त अशी योग्य माहिती भेटेल, सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

थोडे सर्च केले की आपल्याला

संदीप डांगे
Wed, 11/23/2016 - 11:20 नवीन
थोडे सर्च केले की आपल्याला उपयुक्त अशी योग्य माहिती भेटेल, सर. ह्या वाक्याची गरज नव्हती निनाद सर!. कोणाला माहीती असेल तर द्यावी ह्यासाठीच इथे शंका विचारली. अनावश्यक टोमणे टाळलेत तर धाग्याचे वातावरण योग्य राहिल. सर्वांनी सर्चच करायचे तर ह्या अशा धाग्यांची, प्रतिसादांची, एकूण काथ्याकूटांची गरज भासत नाही. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१

निनाद नव्हे तो

पैसा
Wed, 11/23/2016 - 13:54 नवीन
निनाद नव्हे तो. निओ१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हाय्ला, व्हय की,

संदीप डांगे
Wed, 11/23/2016 - 14:13 नवीन
हाय्ला, व्हय की, आय माय स्वारी बरंका निनाद सर, चुकलो म्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

यात माझे काय चुकले सर ?

निओ१
गुरुवार, 11/24/2016 - 03:06 नवीन
यात माझे काय चुकले सर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

Thank you!

निनाद
गुरुवार, 11/24/2016 - 03:38 नवीन
Thank you!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

इ-वॉलेट आणि UPI दोन्हींच्या

माहितगार
Mon, 11/21/2016 - 14:37 नवीन
इ-वॉलेट आणि UPI दोन्हींच्या मर्यादांची चर्चा करणारा पवन गोयलांचा लेख दखल जिज्ञासूंनी घेण्या जोगा वाटला. बाकी स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या UPI अ‍ॅपची जाहीरात आज वृत्तपत्रात होती, त्या संबंधी बातमी या दुव्यावर वाचली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा