✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

...मग असे द्या पैसे!

न
निनाद यांनी
Tue, 11/15/2016 - 03:21  ·  लेख
लेख
कालच एकात्मिक भरणा पद्धती हा लेख मराठी विकिवर टाकला तोच येथे ही देत आहे. प्राप्त परिस्थितीत त्याचा उपयोग होईल असे वाटते. एकात्मिक भरणा पद्धती हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस या इंग्रजी नावाचे भाषांतर आहे. यापेक्षा चपखल शब्द सुचत असतील तर जरूर द्या. तसेच या लेखात भर घालण्यासाठी स्वागत आहे! दुवा: https://mr.wikipedia.org/wiki/युनिफाईड_पेमेंट_इंटरफेस (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A1_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8) ----------- एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. दि. ११ एप्रिल २०१६ पासून भारतीय रिझर्व बॅंक व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही सुविधा वापरून एकावेळी किमान रु. ५० व कमाल एक लाख रुपये इतका भरणा तत्काळ करता येतो. यासाठी लाभार्थींच्या बॅंकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासारखी कोणतीही माहिती आवश्‍यक नसते. युनिफाईड पेमेंट इंटरफेस सुविधा वापरल्याने कोणत्याही व्यक्तीला कोणालाही पैसे देणे शक्य आहे. तसेच कोणाकडूनही पैसे घेता येणार आहेत. याशिवाय विविध बिले ऑनलाईन देता येणे शक्य आहे. या सुविधेचा उपयोग ऑनलाइन शॉपिंग साठीही करता येणार आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरण्यासाठी फक्त संबंधिताचा व्हर्च्युअल पेमेंट अड्रेस (व्हीपीए) माहीत असणे आवश्‍यक असते. यूपीआय वापरासाठी नोंदणी - रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी यूपीआय ऍप उतरवून घ्यावे. व आपल्या बॅंकेशी जोडावे. ( कसे जोडावे या विषयी या विभागात मुळ लेखात अधिक माहिती आवश्यक आहे) याचे फायदे:
  • सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
  • चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
  • अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
  • पैसे आपल्या बॅंक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.
या पद्धतीची माहिती आपल्या जवळच्या दुकानदाराला आणि व्यावसायिकाला द्या. तत्काळ पैसे देण्यासाठी याच उपयोग होईल. अगदी चहा ते भाजीवालाही असे पैसे स्विकारू शकेल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
तंत्र
अर्थकारण
अर्थव्यवहार
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
42954 वाचन

💬 प्रतिसाद (144)

प्रतिक्रिया

लेख आवडला..

पुंबा
Mon, 11/21/2016 - 19:19 नवीन
लेख आवडला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

UPI वापरले तर प्रत्येक

पुंबा
Tue, 11/22/2016 - 16:35 नवीन
UPI वापरले तर प्रत्येक transaction मागे imps चा charge द्यावा लागत आहे. जर प्रत्येक छोट्या मोठ्या payment मागे 3-5 रु. जाऊ लागले तर लोक UPI का वापरतील? त्यापेक्षा पेटीएम फुकटात हि सर्व्हिस देते, त्यांच्याकडेच वळणार नाहीत का? वास्तविक, पेटीएम मध्ये, दोघांकडेही ते ऍप असण्याची गरज आहे UPI मध्ये तसे नाही, तेव्हा बँकांनी एका ठराविक रकमेच्या नंतर imps charges लागू करावेत जेणेकरून दैनंदिन खर्चासाठी, खरेदीसाठी UPI वापरता येईल.
  • Log in or register to post comments

पेटीएम पूर्ण फुकट नाही

अनुप ढेरे
Wed, 11/23/2016 - 11:31 नवीन
पेटीएम वॉलेट ते बँक अकाउंट त्रांस्फर करायला पैसे घेते. १% बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

काही शंका

माहितगार
Wed, 11/23/2016 - 11:39 नवीन
पेटीएम वॉलेट ते बँक अकाउंट त्रांस्फर करायला पैसे घेते. १% बहुधा
मी वाचलेल्या वृत्तपत्रीय बातमीत ही टक्केवारी अधिक म्हणजे ५ टक्क्याच्या आसपास होती. कुणी पेटीएम वापरकर्ते ५० -१०० चे ट्रायल ट्रँझॅक्शन करुन कन्फर्म सांगू शकतील का ? १) इन एनी केस वॉलेट टू बँक याला चार्जेस असेल तर कंपल्सरी कंझम्प्शन चा पॅटर्न राबवला जातो आणि भविष्यातील महागाईत तांत्रिक भर पड्ण्यास साहाय्यभूत असेल का ? असा एक प्रश्न २) आणि वॉलेट टू वॉलेट ट्रांसफर बँकेतून अथवा आरबीआय ट्रॅक होते का ? होत नसेल तर अन अकाऊंटेड ट्रँझॅक्शन या माध्यमातूनही होऊ शकती किंवा कसे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

आत्ताच पल्याड हा प्रतिसाद

अनुप ढेरे
Wed, 11/23/2016 - 11:41 नवीन
आत्ताच पल्याड हा प्रतिसाद लिहिला. " मोबाईल वॉलेटवर RBI नियंत्रण आहे. RBI नियमांप्रमाणे पेटीएम किंवा तत्सम वॉलेटमध्ये १००००पेक्षा जास्तं रक्कम ठेवता येत नाही. त्याहून जास्तं रक्कम ठेवायची असेल तर पेटीमला नेहेमीच्या बँकेसारखी KYC कृती करणं बंधनकारक आहे. १०००० हजार पर्यंत रक्कम ठेवायला फोन नंबर व्हेरिफिकेशन पुरेसं आहे. "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

होय. 1 टक्का आकार आहे पैसे

पुंबा
Wed, 11/23/2016 - 13:22 नवीन
होय. 1 टक्का आकार आहे पैसे wallet मधून खात्यात वळते करायला. ही पैसे घेणाऱ्याच्या दृष्टीने गैरसोय आहे खरंच. पण देणार्याला परवडते paytm. जर upi मध्येच त्यांनी imps transactions काही मर्यादेपर्यंत फुकट करू दिले तर छोटे व्यवहार upi मधून करतील लोक. त्यामुळे दोन्हीचा मध्य काढायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

बडोदा बॅंकेत IMPS व रेल्वे

पुष्कर जोशी
Sat, 12/03/2016 - 15:49 नवीन
बडोदा बॅंकेत IMPS व रेल्वे बुकिंग फुकट आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

कोणतीही वस्तू ही पैसे या

कंजूस
Tue, 11/22/2016 - 19:52 नवीन
कोणतीही वस्तू ही पैसे या स्वरुपात वापरावर रिझर्व ब्यान्केची परवानगी नाही. म्हणजे असं की हॅाटेलात आपण गल्ल्यावर प्रिपेड कुपन्स घेतली आणि काउंटरवरती वेटर/ला देऊन खाण्याचे पदार्थ/पेयं बदल्यात घेतो. हे एकवेळ तात्पुरता वापर चालतो.पण ती कुपन्स एकमेकाला पैशाच्याएंवजी देऊन चालत नाहीत. पुर्वी बेस्ट बसची सुट्ट्या पैशांची कुपन्स काढलेली त हॅाटेल्सवाले वापरू लागले ते गैर होतं.
  • Log in or register to post comments

एस बी आय

बोका
Wed, 11/23/2016 - 13:51 नवीन
एस बी आय चे UPI APP आले आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.sbi.upi&hl=en
  • Log in or register to post comments

पेटीएम

धर्मराजमुटके
Wed, 11/23/2016 - 14:06 नवीन
पेटीएम वगैरे कितीही चांगले वाटले तरी माझ्या गाठीशी दोन वेगवेगळ्या केसेस मधे आयडेंटीटी थेफ्टचा अनुभव आहे. त्यामुळे ई-वॉलेटच्या भानगडीत सध्या पडणार नाही. सध्या तरी मी बँकेच्या अधिकृत अ‍ॅपचाच वापर करत आहे.
  • Log in or register to post comments

आयचीआयचीआयचे अधिकृत मोबाईल

टवाळ कार्टा
Wed, 11/23/2016 - 14:10 नवीन
आयचीआयचीआयचे अधिकृत मोबाईल पाकिट आहे...आणि त्याचे कार्डसुद्धा मागवता येते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

+१

पैसा
Wed, 11/23/2016 - 14:17 नवीन
आपले बँक कार्ड डिटेल्स तिसर्‍या पार्टीला द्यावेत असे वाटत नाही. मी आमच्या बँकेचे अधिकृत मोबाईल अ‍ॅप वापरते आणि बाकी ठिकाणी ओटीपी वाले क्रेडिट कार्ड. अमेझॉनवर क्रेडिट कार्ड सेव्ह करतात. ते ताबडतोब डिलिट करून टाकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

बँकेचेच अधिकृत अ‍ॅप असावे

संदीप डांगे
Wed, 11/23/2016 - 14:23 नवीन
बँकेचेच अधिकृत अ‍ॅप असावे किंवा तसे सर्वच बॅन्कांना कम्पलसरी असावे असे वाटते. थर्डपार्टीकडे आप्ले डिटेल्स असणे हे आयडेन्टीटी थेफ्ट सोबतच अनेक प्रायवसी समस्या निर्माण करत असतात. सामान्य ग्राहकाला त्या कळत नाहीत (किंवा समजवून सांगितल्यात तरी धुडकावून लावतात.) नुकत्याच झालेल्या ८२ लाख कार्ड हॅकिंगबद्दलचे दुष्परिणाम अजून अबेकांना कळलेले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

Update: आत्ताच प्रयोग म्हणून

पुंबा
Wed, 11/23/2016 - 15:07 नवीन
Update: आत्ताच प्रयोग म्हणून 10 रु. Phonepe या UPI ऍप वरून पाठवले. Extra charge गेला नाही. कसे ते माहित नाही.
  • Log in or register to post comments

Update: आत्ताच प्रयोग म्हणून

पुंबा
Wed, 11/23/2016 - 15:07 नवीन
Update: आत्ताच प्रयोग म्हणून 10 रु. Phonepe या UPI ऍप वरून पाठवले. Extra charge गेला नाही. कसे ते माहित नाही.
  • Log in or register to post comments

युपीआय सध्यातरी मोफत आहे

बोका
Sun, 11/27/2016 - 10:47 नवीन
युपीआय सध्यातरी मोफत आहे. आयसीआयसीआय बँकेच्या पानावर तसा उल्लेख आहे. मी बँक ऑफ महाराष्ट्र युपीआय वरून अनेक व्यवहार केले. चार्जेस लागले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

Hdfc बँकेतून व्यवहार केले

पुंबा
Sun, 11/27/2016 - 11:21 नवीन
Hdfc बँकेतून व्यवहार केले तरीदेखील imps चा अधिक आकार पडला नाही. हे चांगले पाऊल वाटते. तरीदेखील सरकारी पातळीवरून अजून मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात नाही याचे कारण काय आहे माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका

सगळ्या बँका नाहीत

पैसा
Sun, 11/27/2016 - 11:52 नवीन
सगळ्या बँका अजून यात सामील नाहीत. माझी syndicate बँक upi enabled नसल्याने मला upi इच्छा असून वापरता येत नाही. तरी बँकेचे मोबाईल बँकिंग आणि क्रेडिट कार्ड यावर बरेचसे काम होते. पीक कर्ज निमित्ताने ग्रामीण बँकेत saving खाते उघडून रूपे डेबिट कार्ड घेतले पण atm वर पैसे काढण्याव्यतिरिक्त त्याचा काही उपयोग नाही. ग्रामीण बँक खात्याला केलेली neft दुसऱ्या दिवशी पोचते त्यामुळे ते imps मध्येही कव्हर होत नाही. या ग्रामीण बँकेत चौकशी केली आणि नेट बँकिंग मिळेल का विचारले तेव्हा बँक atm सोडून इतर गोष्टींना कनेक्टेड नाही असे कळले. आता ज्या लोकांची खाती फक्त ग्रामीण बँकेत आहेत ते सध्या तरी कॅशलेस होऊ शकणार नाहीत असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

स्मार्टफोन किंवा इंटरनेटची गरज नाही

पैसा
Sat, 11/26/2016 - 13:03 नवीन
९९# सर्व्हिसवरून पेमेंट करता येते. फक्त आधी आपल्या बॅंकेत जाऊन मोबाईल बँकिंग सुरू केलेले असले पाहिजे. http://www.npci.org.in/documents/FAQs-NUUP.pdf
  • Log in or register to post comments

माझ्या बँकेत हे प्रत्येक

संदीप डांगे
Sat, 11/26/2016 - 13:27 नवीन
माझ्या बँकेत हे प्रत्येक ग्राहकाला सांगत होते मागच्या आठवड्यात. पेटीयम व इतर ऍप्स पेक्षा हे जास्त सुटसुटीत आहे असे दिसते, याचा प्रसार करायला हवा. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अजून

निनाद
Tue, 11/29/2016 - 03:43 नवीन
अजून माहिती काढून पैसे वळते करताना काही चार्जेस लागले का ते कळवाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सुरक्षा = ?

गामा पैलवान
Sat, 11/26/2016 - 14:06 नवीन
पैसाताई, जर सिमची नक्कल केली तर खात्याची सुरक्षा गोत्यात येईल ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

याचे उत्तर तिथेच आहे

पैसा
Sat, 11/26/2016 - 14:10 नवीन
याचे उत्तर तिथेच आहे. शिवाय पैशाची देवाण घेवाण आहे तिथे mpin/otp लागतो. सिम कॉपी केले तरी mpin/otp हॅक केल्याशिवाय पैसे चोरता येणार नाहीत. ट्रॅन्झॅक्शनची कमाल मर्यादा १०००० दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

रोचक पद्धती आहे.

गामा पैलवान
Sat, 11/26/2016 - 19:58 नवीन
पैसाताई, हा रोचक प्रकार दिसतोय. थोडी माहिती मिळवून पाहतो. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

*९९# वापरून पैसे देण्याची पद्धती

निनाद
Tue, 11/29/2016 - 03:26 नवीन
भारतात पैसे देण्यासाठीसाठी सरकारी बँक स्तरावर *९९# हा कोड वापरून ही सेवा दिली जाते. मराठी भाषेत ही सेवा उपलब्ध आहे. यासाठी *९९*२८# असा कोड आहे. पद्धत - आपल्या बॅंकेशी आपला मोबाईल क्रमांक जोडून घ्या - आपल्या बॅंकेचे तिन अक्षरी नाव टाका जसे SBI (अथवा IFSC कोड किंवा बॅंकेचा दोन आकडी कोड वापरता येतो) - काय सेवा हवी आहे ते निवडा - जसे स्टेटमेंट किंवा MMID वापरून पैसे देणे - ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक आणि MMID भरा - आवश्यक असलेली रक्कम आणि तुमचा MPIN भरा मग एक स्पेस सोडा व तुमच्या खाते क्रमांकाचे शेवटचे चार आकडे भरा. हे झाले की आपले पैसे त्या खात्यात दिले जातील. यात आधार कार्डाचा क्रमांक वापरूनही पैसे दिले जाउ शकतात. माझ्या अंदाजाने त्यात MMID ऐवजी आधार कार्ड क्रमांक टाकावा लागतो. आधार कार्ड बँकेशी संलग्न असल्याने पैसे त्या खात्यात वळते होतात. अधिक माहितीसाठी आजच लिहिलेला ताजा विकि लेख https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%A1%E0%A5%80 लेखात भर घालण्यास स्वागत आहेच!
  • Log in or register to post comments

पैसाताई

निनाद
Tue, 11/29/2016 - 03:27 नवीन
ही माहिती एकत्र करण्यास उद्युक्त केल्याबद्दल पैसाताईंना धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

मोबाइल पेमेंटसचा उत्साह

कंजूस
Tue, 11/29/2016 - 05:14 नवीन
मोबाइल पेमेंटसचा उत्साह आतातरी संपलाय कारण दुकानदारच घेण्याची मशिन्स लावण्यास तयार नाहीत.
  • Log in or register to post comments

समजतंय

निनाद
Tue, 11/29/2016 - 06:03 नवीन
कंजुस काका, समजतंय हो, पण या विषयावर मराठीमध्ये लिखाणच नाहीये. किमान ज्यांना व्यवहार करायचे आहेत ते तर करतील? एका व्यवहाराला जरी उपयोग झाला तरी भरून पावलो! उदा. निओ१ यांना माहितीचा उपयोग झाला असे त्यांनी लेखात कळवले. हे वाचून मनापासून आनंद झाला होता. काहीच नाही तर अशी सुविधा आहे/होती याची मराठी भाषेत नोंद झाली, हा दिलासा मनाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

पटलय. लेखातल्या माहितीबद्दल

कंजूस
Sat, 12/03/2016 - 11:03 नवीन
पटलय. लेखातल्या माहितीबद्दल खुशच आहे.आमच्याकडूनही तयार आहोतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

टोलः रोजच्या रोज जिथे फक्त

मराठी_माणूस
Wed, 11/30/2016 - 15:09 नवीन
टोलः रोजच्या रोज जिथे फक्त आणि फक्त रोकड व्यवहार होतो तिथे काय पर्याय आहे? मासीक पास (ईटीसी टॅग) साठी तरी कार्ड ने पैसे का घेतले जात नाहीत ? कॅशलेस च्या गप्प मारण्यात काही अर्थ नाही. हे व्यक्तीगत कोणासाठी नसुन वस्तुस्थीती काय आहे ते निदर्शनास आणण्यासाठी आहे. आज महीना अखेर आहे , पास रीन्यु करावा लागणार आहे. पैसे काढण्यासाठी रांगा लावा मग ते पैसे भरुन रीन्यु करण्यासाठी रांगा लावा , कारण तिथे रोकड्या शिवाय चाक एक मिमि. पण पुढे सरकु शकत नाही. निश्चलीकरणा मुळे पैसे न भरण्याची सवलत फक्त २ डीसे. पर्यंत आहे. सवलत बंद होईल तेंव्हा रोकडा तयार ठेवावा लगेल. आधुनिक तंत्रज्ञानाने पैसे भरण्याची कोणताही पर्याय अजुन पर्यंत दिलेला नाही.
  • Log in or register to post comments

अरेरे!

निनाद
गुरुवार, 12/01/2016 - 02:46 नवीन
अरेरे! व्यवस्थापनाने याबाबत काहीहे करू नये हे, खरोखर दुर्दैवी आहे. टोल घेण्यासाठी एक क्षणही थांबण्याची गरज लागता कामा नये. ज्यांना टोल वापरायचा आहे त्यांचे इलेक्ट्रॉनिक खाते असावे. या खात्यात लागतील तसे इ वॉलेट सारखे पैसे जमा करण्याची तरतूद असावी. एक आर एफ आय डी गाडीला लावलेला असावा. ज्या वेळी गाडी टोल मधून जाईल तेव्हा आर एफ आय डी ची नोंद घेऊन खात्यातून आपोआप पैसे वळते व्हावेत. इतकी सोपी आणि पारदर्शक व्यवस्था लावणे शक्य आहे. परंतु... मात्र सध्या अत्यंत चीड येईल असे याचे व्यवस्थापन आहे. तरी काही बदल होतील अशी आशा ही आहे. येथे http://www.indiantollways.com/category/etc/ म्हंटले आहे की इलेक्ट्रॉनिक टोल वर काम चालले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

टोलनाके हे काळापैसा

संदीप डांगे
Fri, 12/02/2016 - 22:21 नवीन
टोलनाके हे काळापैसा निर्मितीचे महत्त्वाची केंद्रे आहेत. त्यांची कार्यपद्धती बघता ते सहज कळून येते. कार्डपेमेंट ची व्यवस्था झाली असती तर पारदर्शकता आली असती. कोणकोणत्या टोलनाक्यावर कार्डपेमेंट ची सोय आहे? असल्यास इथे अपडेट करावे. आता थोड्या बातम्या येत आहेत की टोलनाके कॅशलेस झाले आहेत, होणार आहेत अशा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

शेवटी कॅश देउनच पास चे

मराठी_माणूस
Fri, 12/09/2016 - 10:51 नवीन
शेवटी कॅश देउनच पास चे नुतनीकरण करावे लागले. आता असे म्हणतात की जेव्हडे दीवस टोल बंद होता , तेव्हढे दीवस आकारणी वाढ्वुन मिळेल . प्रश्न असा आहे की , ज्यांनी नोव्हे. मधे पास काढला होता त्यांचे जमा झालेले पैसे टोल कं ला अतिरीक्त मिळणार कारण मागील महीन्यात २० दीवस टोल आकरणी बंद होती. ह्या वर एक करता आले असते , ज्यांचा नोव्हे. चा पास होता त्यांच्याकडुन पैसे न घेता पास चे नुतनीकरण करुन द्यायला हवे होते. पण टोळधाडीच्या बाबतीत कुठलेही गणीत काम करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

Paytm च्या साईटवर Nearby हा दुवा आहे

मोग्याम्बो
Wed, 11/30/2016 - 15:44 नवीन
Paytm च्या साईटवर Nearby हा दुवा आहे. तो वापरून तुम्ही आपल्या जवळचे कोणते दुकानदार Paytm मार्फत पैसे स्वीकारत आहेत ते कळते. सध्या ह्याचा वापर करून काम चालवू शकता.
  • Log in or register to post comments

आज सकाळी आय एम पी एस चा वापर

सुबोध खरे
Sat, 12/03/2016 - 19:37 नवीन
आज सकाळी आय एम पी एस चा वापर करून एका रुग्ण कडून पैसे घेतले. त्यांचे आय सी आय सी आय बँकेत खाते आहे तेथून माझ्या एच डी एफ सी बँकेच्या खात्यात त्वरित पैसे आले. अजून तरी काही चार्ज लावलेला दिसत नाही. वापरणे सोयीचे आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

my mobile is samsung duos GT

प्रकाश घाटपांडे
Fri, 12/09/2016 - 11:12 नवीन
my mobile is samsung duos GT-S7562 my android version is 4.0.4 ice cream sandwich. आता याला युपीआय अ‍ॅप सपोर्ट करत नाही. मोबाईल वर पुढचे अँड्रॉईड व्हर्जन टाकता येत नाहि. इंटरनेटच्या मदतीशिवाय पैसे त्वरीत मोबाईलवरुन देता आले पाहिजेत. अर्थात मोबाईलला त्या ठिकाणी सिग्नल स्ट्रेंथ असणे आवश्यक आहे. जर रेंजच नसेल तर काय उप्योग
  • Log in or register to post comments

यु पी आय ची गरज नाही

पैसा
Fri, 12/09/2016 - 11:46 नवीन
साधे मोबाईल बँकिंग अ‍ॅप पुरेसे आहे. घेणार्‍याकडे यु पी आय नसले तरी चालते. IMPS किंवा MMID वापरून बँक अकाउंट असलेल्या कोणालाही पैसे देता येतात. मोबाईल रेंज नसेल तरी *99# सेवेद्वारे पैसे पाठवता येतात. या सेवेसाठी ३१ जानेवारीपर्यंत तरी एसेमेस चार्जेस रद्द केल्याचा मेसेज बी एस एन एल कडून आला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

*९९# द्वारे बरीच सर्कस करावी

प्रकाश घाटपांडे
Fri, 12/09/2016 - 12:41 नवीन
*९९# द्वारे बरीच सर्कस करावी लागते. त्यातूनही तांत्रिक अडचणी येतात असे प्रात्यक्षिक केल्यावर समजले. दुकानदार भाजीवाले रिक्षावाले मोलकरीण यांना सहज पेमेंट करता आले पाहिजे. दुकानात पेटीएम एकवेळ सोपे जाते शहरी भागात. पेटीएम नेटशिवाय पेमेंट ची सोय करणार आहे असे वाचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तुमच्या बँकेचे *९९#

पैसा
Fri, 12/09/2016 - 13:10 नवीन
तुमच्या बँकेचे *९९# अ‍ॅप आलं असेल बघा. बहुतेक बँकानी काढली आहेत. ती ऑफलाईन चालतात असे ऐकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

या बातमीत दिलेला *६७ हा नंबर

माहितगार
Fri, 12/09/2016 - 18:15 नवीन
या बातमीत दिलेला *६७ हा नंबर चुकीचा असेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हो

पैसा
Fri, 12/09/2016 - 21:40 नवीन
९९ पाहिजे ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

युएसएसडी *९९# या प्रणालीच्या

माहितगार
Fri, 12/09/2016 - 18:18 नवीन
युएसएसडी *९९# या प्रणालीच्या सुरक्षेची स्थिती कितपत विषयी काही ठाऊक आहे का ? (मला हा पर्याय आकर्षक वाटतोय पण सुरक्षे बद्दल माहिती हवी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ओटीपी आहे

पैसा
Fri, 12/09/2016 - 18:38 नवीन
ओटीपी आहे, तेव्हा भीती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

हा धागा नजरेत आला नव्हता...

मदनबाण
Fri, 12/09/2016 - 21:30 नवीन
हा धागा नजरेत आला नव्हता... दुसर्‍या धाग्यात दिलेला प्रतिसाद इथेही चिकटवतो. QSAM (Query Service on Aadhaar Mapper) or *99*99# *99# PowerPoint Presentation QSAM (Query Service on Aadhaar Mapper) or *99*99#

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- DJ Snake (ft. Justin Bieber) - Let Me Love You | Tum Hi Ho (Vidya Vox Mashup Cover)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा