✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट
ट्रेड मार्क यांनी
Tue, 11/08/2016 - 21:38  ·  लेख
लेख
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत

प्रतिक्रिया द्या
307026 वाचन

💬 प्रतिसाद (1112)

प्रतिक्रिया

ओके, मग मी थांबते काही दिवस.

पिशी अबोली
Sat, 11/12/2016 - 16:26 नवीन
ओके, मग मी थांबते काही दिवस. पुढच्या आठवड्यात जाईन.
↩ प्रतिसाद: पैसा

नमस्कार

प्रसाद_१९८२
Sat, 11/12/2016 - 16:42 नवीन
मला bearer चेकने रु. २०,००० बॅंकेतून विड्रावल करायचे असतील तर, सध्या मला संपूर्ण वीस हजार रुपये मिळतील की चार हजार ?
↩ प्रतिसाद: पैसा

बँक अकाउंट विड्रॉवल लिमिट

पिशी अबोली
Sat, 11/12/2016 - 17:11 नवीन
बँक अकाउंट विड्रॉवल लिमिट 10000ची आहे बहुतेक.
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

वीस हजार

पैसा
Sat, 11/12/2016 - 17:12 नवीन
खात्यात पैसे असताना चेक रिटर्न करता येत नाही (If the cheque is otherwise in order). अर्थात चेक दुसर्‍या माणसाने दिलेला आहे हे गृहीत धरत आहे. स्वतःच्या खात्यातून पैसे काढण्यावर दहा हजाराची लिमिट घतली आहे सध्या. मात्र त्याविरोधात लोक भांडू शकतात.
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

धन्यवाद,

प्रसाद_१९८२
Sat, 11/12/2016 - 17:22 नवीन
धन्यवाद !
↩ प्रतिसाद: पैसा

एका दिवसाला रु१०,०००

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 11/12/2016 - 18:21 नवीन
एका दिवसाला रु१०,००० विथड्रॉवल लिमीट आहे आणि एका आठवड्याला रु२०,००० आहे. दोन दिवस, प्रत्येकी रु १०,००० असे, रु२०,००० काढू शकता.
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

अत्यंत उत्कृष्ठ माहीतीपुर्ण प्रतिसाद

मारवा
Fri, 11/11/2016 - 19:51 नवीन
या धाग्यातले अनेक प्रतिसाद अत्यंत माहीतीपुर्ण व अनेक नविन बाबींची ओळख करुन देणारे आहेत. एकंदरीत मोदी सरकारने उचललेले हे पुढचे पाऊल आहे. अत्यंत धाडसी निर्णय अत्यंत सुनियोजित अगोदर जनधन नंतर इनकम डिक्लरेशन स्कीम्स इ. मोंदींचे या निर्णयासाठी जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. आता यापुढील टप्पे ही योग्य रीतीने अमलात आणले जावोत ही सदिच्छा आज प्रामाणिक माणसाच्या चेहर्‍यावर अनेक वर्षानंतर एक स्मित दिसत आहे. आज त्याला आपण प्रामाणिक आहोत याचाही काही फायदा असतो हा दिलासा मिळतोय. अत्यंत श्रेष्ठ निर्णय !!!!

राही, माझ्याकडे सुद्धा दोन

जयन्त बा शिम्पि
Fri, 11/11/2016 - 20:17 नवीन
राही, माझ्याकडे सुद्धा दोन बाया कामाला आहेत. त्यांना जी बचत करावीशी वाटली, त्यासाठी मी त्यांना, बँकेत बचत खाते, स्वतः फॉर्म भरुन, माझी ओळख दाखवून उघडून दिलेत.सुरवातीला एक दोन वेळा सौ.ला त्यांचेबरोबर, बॅंकेत पाठविले. आता त्या स्वतःहुन बॅंकेत जाऊन व्यवहार करीतात. सुरक्षित बचत.त्याचप्रमाणे , आमच्या सोसायटीत , सफाई कामगारांना, कुणीतरी , गावाकडे पैसे पाठविण्यासाठी, फसविले होते.अक्षरशः तीन हजार रुपये पाठविण्यासाठी, पाचशे रुपये ऊकळले होते. मी त्यांना, रुपये वीस हजार सुद्धा, फक्त ५ रु.१२ पैशात , बॅंकेतील NEFT योजनेद्वारा पाठविता येतात, हे सोदाहरण दाखवून दिले. त्यांचेही त्याच बॅंकेत,बचत खाते उघडून दिले.आता ते स्वतंत्रपणे व्यवस्थित बॅंक व्यवहार करीत आहेत. त्यामुळे सरकारमान्य ' राजमार्ग ' हाच चांगला मार्ग असतो , हे मला तरी पटलेले आहे.

४००

अन्नू
Fri, 11/11/2016 - 20:44 नवीन
कंप्लीट! ;)

सगळे प्रतिसाद वाचले.. खरंच

विशुमित
Fri, 11/11/2016 - 20:47 नवीन
सगळे प्रतिसाद वाचले.. खरंच डोळे पाणावले. ऑफिसच्या कामा निमित्त ५-६ दिवसांपासून लखनौ मध्ये आहे. २ दिवसात काही घटना पाहिला मिळाल्या १) सामान्य लोकांकडून दुकानदार रु.१००० च्या नोटेच्या बदल्यात रु.६०० सुट्टे पैसे देत होते. लोक सुद्धा ते मान्य करत होते. कारण ब्यांक आणि पोस्ट ऑफिसमध्ये इतकी प्रचंड गर्दी आहे की कामगार लोक एक दिवसाचा खडा नाही करू शकत. किती तरी लोकांकडे ATM च कार्ड नाहीये. २) गल्ल्यां गल्ल्यांमध्ये २-3 जणांचं टोळकं रु.१०० च्या २०-2५ हजारच्या नोटा घेऊन बसले आहेत जे सामान्य लोकांना रु.१००० नोटे मागे ७००-८०० आणि आणि रु.५०० मागे ३०० देत आहेत (आवर्जून सामान्य म्हणतोय कारण त्यातील आमच्या फॅक्टरी मधील कामगार आहेत) ३)मला अकाउंट्स वाल्याने रु. ५०० च्या ५ नोटा बदलून दिल्या. त्याने कशी रिस्क घेतली हे विचारलं तर म्हणाला "Don't Worry Be Happy Sir" 4) चौथी घटना माझ्या घरातील आहे. आमचे एक खूप जवळचे नातेवाईक नगरसेवक आहेत (राष्ट्रवादीचे नाहीत). त्यांना मी मागच्या महिन्यामध्ये रु.२,००,००० नवीन घर खरीदी करण्यासाठी कमी पडत होते म्हणून परत देण्याच्या बोलीने मागितले होते पण येणाऱ्या निवडणुकेचे कारण देऊन काही तरी व्यवस्था करता आली तर देतो म्हणून आश्वासन दिले. काल संध्याकाळी ते रु.२००००० घेऊन घरी आले होते. ते त्यांनी आमच्या बंधूंकडे दिले. बंधूंना अंदाज आला होता की १००० आणि ५०० च असणार आणि त्या होत्या सुद्धा. बंधूंना म्हणाले शेती उत्पन्न दाखवून बँकेत भर आणि जेव्हा माघारी द्यायचेत तेव्हा दे. बंधू काही बोलण्याच्या आधीच फॉर्च्युनरला किक मारली आणि बुंगाट. (बंधू फ़ोन करून माझा सल्ला विचारात होते ) या घटना वरून माझ्या काही शंका होत्या जाणकारांनी कृपया सोडवाव्यात- ---१ & २ मध्ये काळा पैश्याच्या स्रोत बंद होयचा सोडून त्यामुळे दलाली करणारे सामान्य लोकांची आणखी पिळवणूक करत आहेत. -- ३ मध्ये मला ऑफिस मधल्या अकाउंटंट ने ५ नोटा बदलून दिल्या अश्या त्याने किती जणांना बदलून दिल्या असतील. मालक लोंकांचे काय गणित असेल? हे तर विचारायलाच नको. --- ४ मध्ये रु. २००००० घरात आहेत. बंधूंना जाम टेन्शन आलाय पण याच नातेवाईकांनी गावात आणखी ३-४ जणांना असे पैसे दिले आहेत याची कुणकुण लागली आहे.आणि ते सर्व जण शेती उत्पन्न दाखवणार आहेत. आमच्याकडे सुद्धा पर्याय आहे शेती उत्पन्न दाखवण्याचा, देश भक्ती दाखवू की बहती गंगा मे हात धुवू? (मिपाकर सल्ला सगळे इमानदारीचाच देणार त्यात काही वाद नाही) --

४. नगरसेवकांची रीतसर तक्रार

मृत्युन्जय
Sat, 11/12/2016 - 23:33 नवीन
४. नगरसेवकांची रीतसर तक्रार करा पोलिसांमध्ये. २०००० पेक्षा जासत रोखीचे व्यवहार करणे आणी शिवाय " शेती उत्पन्न दाखवणे " हे दोन्ही गुन्हे आहेत. आपल्याल अडचणीचे भासत असल्यास. आम्हाला नाव पत्ता द्या. आम्ही गुन्हा दाखल करवतो (अर्थात विटनेस म्हणून तुमचेही नाव पत्ता लागेल ही गोष्ट वेगळी). बाकी लखनऊ मध्ये कायदा व्यवस्था पार कोलमडली आहे हे सिद्द्ध होते. आमच्याइकडे पुण्यात किमान इतके उघड उघड असले प्रकार होत नाही आहेत. तिकडे बारामतीत काय चालले आहे माहिती नाही.
↩ प्रतिसाद: विशुमित

सामान्य लोकांकडून दुकानदार रु

सुबोध खरे
Fri, 11/11/2016 - 20:52 नवीन
सामान्य लोकांकडून दुकानदार रु.१००० च्या नोटेच्या बदल्यात रु.६०० सुट्टे पैसे देत होते. ये बात कुछ हजम नही हुई. सामान्य माणूस लखनौ मध्ये ४०० रुपयांसाठी नक्कीच बँकेच्या रांगेत उभा राहील. असामान्य लोकांची गोष्टच वेगळी

खरे साहेब-

विशुमित
Fri, 11/11/2016 - 21:11 नवीन
खरे साहेब- मी खरंच माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. आणि मला सुद्धा बदलून हव्या होत्या ५०० च्या नोटा पण माझी खरंच छाती नाही झाली ४०० चा लॉस सोसण्याचा. माझी सोय अकाउंटंट ने केली तो भाग निराळा आहे.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

असुद्या हो विशुमित साहेब!

संदीप डांगे
Fri, 11/11/2016 - 21:20 नवीन
असुद्या हो विशुमित साहेब! तुम्ही खोटं बोलताय बास!
↩ प्रतिसाद: विशुमित

ओके... तलवार म्यान...

विशुमित
Fri, 11/11/2016 - 21:23 नवीन
ओके... तलवार म्यान...
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

=)) =))

अन्नू
Fri, 11/11/2016 - 21:36 नवीन
मुंबईमध्ये आमच्या इकडे (असं ऐकून आहे की-) पाचशेला शंभर कट असा हिशेब आहे. मथुरेलाही हाच दर आहे बहुतेक (पर सेंट २० म्हणजे प्रत्येकी शंभराला वीस रुपये)
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आता लखनौ मध्ये मिठा बाबत अफवा

विशुमित
Fri, 11/11/2016 - 22:53 नवीन
आता लखनौ मध्ये मिठा बाबत अफवा उठत आहेत. बरेच लोक मिठाची पोती च्या पोती घेऊन जात आहे. सगळा गोंधळ चालू आहे... इंडिया टीव्ही वर पाहू शकता आता..
↩ प्रतिसाद: अन्नू

=))

अन्नू
Fri, 11/11/2016 - 23:15 नवीन
गेल्यावेळी लखनौमध्ये राहिलो होतो लय पिडलं त्या लखनौ नं- एका हॉटेलवाल्याला पैसे देऊन ठरवला. शाकाहारी दे म्हणून सांगितलं तर त्याचं नुसतंच आपलं रोजचं- बटाट्याची भाजी- बटाट्याची आमची- बटाट्याचा रस्सा असं सुरु झालं. कंटाळून एकदा जेवणात काहीतरी वेगळं कर म्हणून सांगितलं तर त्या दिवशी बहाद्दरानं बटाट्याचा पुलाव करुन आणला! :( त्यात एके दिवशी सुट्टीला आमचे सिनिअर सर- 'तुंम्हाला मस्त चिकन घेऊन देतो' म्हणून आंम्हाला तिथल्या मोठ्या बाजारात घेऊन गेले. मला वाटलं आज तरी झणझणीत नॉनवेज खायला भेटेल, पण नंतर समजलं चिकन म्हणजे तिथलं सुप्रसिद्ध कापड होतं ते! :(
↩ प्रतिसाद: विशुमित

मला तर पहिल्यांदा वाटलं चिकन

विशुमित
Sat, 11/12/2016 - 13:14 नवीन
मला तर पहिल्यांदा वाटलं चिकन पासून कपडे बनतात की काय? आलू ने तर बेजार झालो आहे. उद्या निघतोय माघारी..
↩ प्रतिसाद: अन्नू

आता लखनौ मध्ये मिठा बाबत अफवा

अन्नू
Sat, 11/12/2016 - 09:32 नवीन
आता लखनौ मध्ये मिठा बाबत अफवा उठत आहेत >>>>>> तुमची बातमी भेटली. आता ती बातमी मुंबईतपण पसरु लागली आहे. लोकांकडून सुट्टे पैसे उकळण्यासाठी काढलेली ती शक्कल आहे ;) https://www.youtube.com/watch?v=5rahtSkjWbc
↩ प्रतिसाद: विशुमित

बंधू काही बोलण्याच्या आधीच

सचु कुळकर्णी
Sat, 11/12/2016 - 00:54 नवीन
बंधू काही बोलण्याच्या आधीच फॉर्च्युनरला किक मारली आणि बुंगाट.
ज्जे बात किक वाली फॉर्च्युनर ;)
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बाकि काहि असो...

अर्धवटराव
Fri, 11/11/2016 - 21:33 नवीन
काहि गोष्टी नक्की झाल्या आहेत... १) काळा पैसा अनेक रुपाने फिरतो, जमिनीत, सोन्यात मुरतो वगैरे कितीही खरं असलं तरी अल्टीमेटली करन्सी नावाचा पेपर कोणाच्या तरी हाती स्थिरावतो. त्याची व्हॅल्यु शुण्य होण्यापासुन रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याची सफेदी शाबीत करा. फुल्लस्टॉप. येनेकेण प्रकारेण तो पैसा पांढरा झाला म्हणजे यानंतर किमान पहिल्या व्यवहारात त्याचा पांढरा पैसा म्हणुनच उपयोग होणार. त्यावरची आजवर जमलेली काजळी दूर झाली. प्रदुषीत वातावरणातली घाण फिल्टर करायला तो पैसा सज्ज झाला. २) या प्रयोगातुन सरकार दरबारी प्रचंड माहिती नव्याने जमा झाली. आधुनीक अर्थव्यवस्थेत असे नोट रद्द करायचे उपाय, त्याचा काळ्या पैशावर होणारा परिणाम, जनतेची प्रतिक्रीया, राजकीय उलथापालथी, गुप्त आणि उघड शत्रुंवर पडणारी टाच, एकुणच जनतेचा काळ्या-पाढर्‍या पैशाकडे बघण्याचा दृष्टीकोन, करन्सी व्यतिरीक्त इतर संपत्ती मार्गांप्रती जनतेची अपेक्षा (आणि उपेक्षा), राज्यकर्त्यांची निर्णयक्षमता वापरायची तयारी बघुन जनतेचा राजकारणाप्रति वाढलेला-घसरलेला विश्वास/अविश्वास... एक ना दोन, हजारो बाबी एकसाथ टच केल्या या नोटबंदीने ... केवळ टच नाहि तर किंबहुना धक्का/हादरे बसले काहि बाबतीत. त्याचे परिणाम सर्वत्र होतील. ३) मिपाकर सर्वज्ञ आहेत हे परत शाबीत झालं :)

+११

नाखु
Sat, 11/12/2016 - 09:19 नवीन
आमच्या इथेही उच्चविद्याविभूषीत अगदी सनदी लेखापाल शेखी मिरवतायत की गावकडे (त्यांचे व्यापारी बंधू) नोकराकरवी रोज किमान ४ हजार बदली करून घेऊ शकतात आणि ३० डिसेंबर पर्यंत ७-८ ला़ख (काळ्याचे पांढरे) करू शकतात. त्या अनुषंगाने कालच एक बातमी वाचली एका व्यक्तीने जर नोटा बदलून घेतल्या आणि तो वारंवार (वेगवेगळ्या बँकामधून) घेतल्याचे निदर्शनास आले तर नक्की त्यांच्या (बँकेच्या/आयकर खात्याच्या) रडारवर येणारच .आणि तो ससेमिरा नंतर चालू होईल. सोनारांकडची होणारी उलाढाल आणि रेल्वे बुकींगच्या माध्यमातून करणार्या "रंगसफेदी"वर ही लक्ष आहे.(आणि हा हनी ट्रॅप आहे हे नक्की,सोनारांनी तब्बल ४-५ महिने संप करून सरकारच्या करांचा (आठमुठेपणाने) विरोध हे मिपाकर विसरले असतील पण सरकार विसरले नाही हे नक्की. संघटीत क्षेत्रातील काळ्या पैशापेक्षा (अंबानी-बिर्ला-अदानी) अंसघटीत क्षेत्रात काळा पैसा जास्त किमान तितका तर नक्की असावा. आम्च्याच भागात गुढग्याला बाशींग बांधलेल्या (भावी) नगरसेवकांकडेच किमान २०-२५ कोटी रोकड रक्कम आहे (अर्थात बे हिशेबी).ज्याम्चा लग्न संमरंभ पंचक्रोशीत गाजला (ओवाळनी करणार्यां सुवासनींना ३० स्कूटी जावयाला जग्वार्)किती असेल त्याचा अंदाज लावावा. पिंचि आणि पुण्यातला निवडणूकीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे बाहेर आले होते त्यांचे काय होईल ते पाहणे रोचक ठरेल. कालच बँकेत लोकांचा आततायीपणा,आठमुठेपणा आणि बँक कर्मचार्यांची भोंगळ व्य्वस्था पाहून आलेला आणि निव्वळ त्यामुळेच (तब्बल तीन साडे तीन तास खर्ची टाकलेला) नाखु पांढरपेशा आततायीपणा,पुर्ण माहीती न वाचताच, एकाचे वेळी चार चारजणांचे फोर्म घेउन आलेले. काही म्हाभाग तिथेच पुर्ती करण्याचा अट्टाहास करीत होते. आठमुठेपणा शंभरच्याच नोटापाहेजेत बदलून दोन हजाराच्या घेणार नाही भोंगळ व्य्वस्था कुणाचा पाय्पोस कुणाला नाही, अतिरिक्त कौंटर नाहीत, शाखा व्य्वस्थापकाला मिळालेल्या (बदली करिता ) अंदाज नाही. किमान टोकन देऊन उरलेल्या लोकांना उद्या या सांगायचे सौजन्य+तरतूद नाही.
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

म्हणे सगळी तयारी का नाही केली

डँबिस००७
Fri, 11/11/2016 - 22:59 नवीन
म्हणे सगळी तयारी का नाही केली ? ईतकी गुप्तता का पाळली गेली ? च्यायला पोलिस स्टेशनातुन पोलिस टीम घेऊन, दारुच्या अड्यावर धाड टाकायला जायच्या अगोदर दारुच्या अड्याच्या मालकाला कळवलेल असायच की आता धाड पडणार आहे, सामसुम करुन ठेव !! हे मी बोलतोय १९८० - १९९० सालच जेंव्हा मोबाईल फोन नव्हते !! आता तर व्हॉटसअ‍ॅप वरच संदेश मिळाला असता गुप्तता पाळली नसती तर !!

गुप्तता :

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 11/12/2016 - 00:10 नवीन
गुप्तता : १. योजनेची माहिती देण्याच्या कॅबिनेट मिटिंगला मंत्र्यांना मोबाईल आणू दिले नाही. २. त्यांनंतर मोदी राष्ट्रपतींना माहिती देण्यासाठी गेले व नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्र्यांना मिटिंगरूममध्ये बसवून ठेवले होते.
↩ प्रतिसाद: डँबिस००७

लोक बँकेत एवढी गर्दी का करत आहेत?

ट्रेड मार्क
Fri, 11/11/2016 - 23:42 नवीन
लगेच पैसे बदलून घेण्याची एवढी घाई का करत आहेत? जरूर असेल तर पाहिजे तेवढे पैसे काढावेत पण अगदी यानंतर पैसे मिळणारच नाहीत वा बदलून मिळणारच नाहीत असं समजून एवढे हातघाईवर का येत आहेत? वर विशुमित साहेब म्हणतायेत की सामान्य माणसं ४०० रुपयांचा तोटा सहन करून १००० च्या नोटा बदलून घेत होती. पण मग ते बँकेत का जात नव्हते? एखाद्याला तुम्ही विचारलंत का की एवढा तोटा सहन करून त्या दुकानदाराकडूनच बदलायचं कारण काय? कामावर खाडा करू शकत नाहीत हे मान्य पण मग त्या दिवसाचे जे पैसे मिळतील ते १०० च्या नोटांमध्ये मिळतील ना? तुमच्या फॅक्टरीतल्या कामगारांना कोणीच सांगितलं नाही का की ३० डिसेंबरपर्यंत नोटा बदलून मिळतील? बँका शनिवार व रविवारी पण चालू राहणार आहेत. काही लोक म्हणतात की त्यांच्याकडे खर्चाला सुद्धा पैसे नाहीत किंवा जे आहेत ते ५००/ १००० च्या नोटांमध्ये आहेत. मला तर हेच कळलं नाही की लोकांकडे अजिबात सुट्टे पैसे कसे नाहीत. मी एक महिना भारतात आलो होतो तर जाताना १०/२०/५०/१०० च्या खूप प्रमाणात नोटा होत्या माझ्याकडे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापराने हे दोन्ही पर्याय असताना लोक फक्त ५०० ची नोट कोणी घेत नाही म्हणून उपासमार झाली असं म्हणतात हे कसे काय? तुमच्याकडे अगदीच पैसे नाहीत, सगळी कार्ड ब्लॉक झाली असं समजलं तरी तुमचा नेहमीचा किराणामालवाला, हॉटेलवाला, बेकरीवाला तुम्हाला २ दिवसाचं क्रेडिट देत नाही? काहीही केलं तरी नावं ठेवायची वृत्ती कधी जाणार? बरं नुसतीच नावं ठेवायची पण मग पर्याय काय किंवा अजून काय करायचं हे मात्र सांगायचं नाही. एकूण संधीचा जमेल तसा जमेल तितका फायदा घेण्याची भारतीय मानसिकता बदलायला पाहिजे पण त्याला अजून काही दशकं तरी जायला लागतील असं वाटतंय.

काहीही केलं तरी नावं ठेवायची

मोदक
Sat, 11/12/2016 - 00:22 नवीन
काहीही केलं तरी नावं ठेवायची वृत्ती कधी जाणार? बरं नुसतीच नावं ठेवायची पण मग पर्याय काय किंवा अजून काय करायचं हे मात्र सांगायचं नाही. हे झाले तर विचारवंत कसे म्हणवून घेणार..? मार्ग काढायचेच तर अनेक मार्ग निघू शकतात, पण मोदी सरकारने घेतलेला निर्णय आहे तर मग फोडा फाटे; करा टीका. बर्र.. यांच्या मुद्द्यांना प्रत्युत्तर मिळाले की असहिष्णुता वाढली म्हणून बोंब ठोकायची आणि दुर्लक्ष केले गेले तर मुद्दे नाहीत म्हणून प्रत्युत्तर आले नाही असली मखलाशी. काँग्रेसच्या रामराज्यात यांचे आवाज नक्की कशा कशाने बंद केले गेले हा ही एक संशोधनाचा मुद्दा आहे.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

सहमत

पद्माक्षी
Sun, 11/13/2016 - 13:31 नवीन
तुम्ही काय वाटेल ते करा पण मी चोऱ्या करणारच असे म्हंटले तर विषयच संपला. मग १०० मोदीसुद्धा काही करू शकणार नाहीत. काल मी गावात गेले होते तेव्हा येता जाता किमान १०-१५ ATM पहिली. कुठेही २०-२५ लोकांपेक्षा मोठी रांग दिसली नाही.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

गंभीर उलटसुलट चर्चेत थोडे

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 11/12/2016 - 00:22 नवीन
गंभीर उलटसुलट चर्चेत थोडे विनोदी मध्यांतर जरूर आहे. नवीन २००० रुपयांच्या नोटेत हाय-टेक चिप बसवली आहे अश्या अनेक वावड्या माध्यमांत पसरल्या आहेत. खुद्द अर्थमंत्र्यांनी त्याचा इन्कार केल्यावरही कायप्पाकर चूप बसायला तयार नाहीत. चिपची अनेक अतिशयोक्तीपूर्ण वैशिष्ट्ये वाचून वैतागलेल्या काहींनी त्यांच्यावर वरताण करून वचपा घ्यायला सुरुवात केली. त्या संग्रहातले हे दोन हिरे... एक 2000 के नोट में ये फीचर्स होंगे। 1. GPS वाली चिप होगी। 2. सायरन होगा। 3. फ्रंट कैमरा होगा। 4. AMOLED डिस्प्ले। 5. और रिश्वत लेने पर गांधी जी खुद बहार निकल के मारेंगे। दोन नवीन नोटां मधले काही खास वैशिष्ट्य - कान फाडून ऐका -नवीन नोटा ह्या तिच्या प्रत्येक मालकाचं नाव आणि हाताचे ठसे संकलित करून ठेवणार आहेत. -नवीन नोटा पावसाळ्यात आपोआप वॉटर प्रूफ होतील. -नवीन नोटांचा सिरीयल नंबर डायल केल्यास त्या नोट वर फोन करता येणार. -नवीन नोटेवर असलेला लाल किल्ला दिवाळीत आपोआप लायटिंग लावल्या सारखा चमकणार. -नवीन नोट स्वतः उडत उडत बँकेत जाऊ शकेल. -कंटाळा आल्यास तुम्ही नवीन नोटांमध्ये गाणे देखील ऐकू शकतात. -नोटेचा गैरवापर झाल्यास गांधीजी तुमच्यावर ओरडू शकतात अशी सोय आहे. -लॉकर मध्ये नोटा ठेवताना स्वीच ऑफ करून ठेवाव्या लागतील ह्याची नागरिकांनी दाखल घ्यावी. आता पुन्हा जर कोणी म्हणाले ना की नवीन नोटांमध्ये न्यानो चिप आहे तर त्याला त्या नोटेवरच्या मंगळ यानात बसवून मंगळावर पाठवण्यात येईल...

लोल....

अन्नू
Sat, 11/12/2016 - 00:40 नवीन
=)) =)) =)) रात्री साडेबारावाजता वेड्यासारखा हसत सुटलोय!!
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

या कल्पकतेचा॑ फायदा...

चौकटराजा
Sat, 11/12/2016 - 08:06 नवीन
या कल्पकतेचा फायदा देशाने करून घेतला पाहिजे . या जिनियस ला गडकरींच्या जागी नेमा . गंगा कावेरी प्रकल्य पूर्ण होईल. बाकी भारतात इनोदी लोक्सना तोटा नाही.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

:))

शाम भागवत
Sat, 11/12/2016 - 08:34 नवीन
:))
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सोन्यावरुन आठवलं. साधारण

पिलीयन रायडर
Sat, 11/12/2016 - 01:46 नवीन
सोन्यावरुन आठवलं. साधारण मार्च एप्रिल मध्ये सोनारांचा संप झाला होता. तेव्हा त्यांच्यावर बरेच नियम लादण्यात आले होते. संपाला कुणी दाद दिली नाही तर तात्पुरती दुकानं सुरु झाली होती. पुढे त्याचं काय झालं? आज सोनार बॅक डेटेड पावत्या करु नयेत म्हणुन तेव्हा काही नवे नियम आणले होते का? जर ते नियम लागु नसतील आणि बॅकडेटेड पावत्या घेऊन लोक सोन्यात पैसे गुंतवत असतील तर इतकं करुन काय फायदा झाला?

आज सोनार बॅक डेटेड पावत्या

मार्मिक गोडसे
Sat, 11/12/2016 - 11:25 नवीन
आज सोनार बॅक डेटेड पावत्या करु नयेत म्हणुन तेव्हा काही नवे नियम आणले होते का? जर ते नियम लागु नसतील आणि बॅकडेटेड पावत्या घेऊन लोक सोन्यात पैसे गुंतवत असतील तर इतकं करुन काय फायदा झाला?
फक्त सोनारांचे व्यवहार बंद ठेवणे योग्य झाले असते. बाकीचे व्यवहार चालू ठेवले असते तरी चालले असते. निदान लोकांना नवीन चलन घ्यायला बँकेकडे धावावे तरी लागले नसते.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

विकले खरे पण आता पचवणार कसे

पद्माक्षी
Sun, 11/13/2016 - 13:34 नवीन
सोनारांनी दुप्पट भावाने सोने विकले तर आहे पण हा पैसा पचवणे बरेच अवघड जाणार आहे त्यांना. आयकर खात्याने धाडी टाकायला चालू केले आहेच.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

बँक ATM वर खरच ऐवढी गर्दी करण्या आवश्यकता आहे का ?

महेश श्री देशमुख
Sat, 11/12/2016 - 05:56 नवीन
माझे वैयक्तीक अनुभव : १) पेट्रोल डेबीट कार्ड ने टाकले २) दुध भाज्या किराणा तुर्तास तरी डिमार्ट मधून डेबिट कार्ड ने घेतले ३) चेक देवून एका शेतकऱ्याकडून बियाणे घेतले (सांगण्याचा मुद्दा हा की त्याचे पण बँकेत खाते आहे) मला वाटते की जिवनावश्यक वस्तुु मिळवण तितकास अवघड नाही

स्वीकारणारे अजून फार कमी

चित्रगुप्त
Sat, 11/12/2016 - 06:32 नवीन
चेकबुक आणि डेबिट कार्ड वापरणारे आणि त्याहूनही स्वीकारणारे अजून फार कमी लोक आहेत. लहान शहरात/गावात तर अगदीच कमी. मी दिल्लीजवळील फरिदाबादमधे रहातो. इथे भाजी, दूध, किराणा, हार्ड्वेयर, विजेचे सामान, शिंपी, कपड्याची दुकाने, खेळणी, धान्य, हलवाई, वगैरेंचे शेकडो दुकानदार आहेत, त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्यांकडे कार्ड वापरण्याचे यंत्र आहे. भाजीसाठी मॉलमधे वा रिलायन्स फ्रेश आदिमधे फारच कमी लोक जातात, आणि तिथे मंडईसारखी ताजी भाजी मिळत नाही. मुळात डेबिट कार्ड नावाची वस्तूच अनेक ग्राहकांना ठाऊक नाही, ही वस्तुस्थिती आहे.
↩ प्रतिसाद: महेश श्री देशमुख

गैरफायद्याच्या वाईट सवईं

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 23:14 नवीन
गैरफायद्याच्या वाईट सवईं बदलण्यासाठीही जनतेवर जरासा दबाव टाकावाच लागतो. Old habits die hard हे बर्‍याचदा फायदेशीपणामुळे नाही तर अंगी बाणलेल्या सवईमुळे असते :)
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अजून एक प्रश्न जो मला बऱ्याच

एस
Sat, 11/12/2016 - 07:17 नवीन
अजून एक प्रश्न जो मला बऱ्याच वर्षांपासून पडला आहे तो म्हणजे बनावट नोटा ओळखण्याची यंत्रणा सरकार जागोजागी का उपलब्ध करून देत नाही? पेट्रोल पंप, बँकांच्या सर्व शाखा, एटीम केंद्रे इत्यादी ठिकाणी अशी यंत्रे ठेवली पाहिजेत आणि सर्वसामान्यांना त्यांचा वापर निःशुल्क करू दिला पाहिजे. म्हणजे व्यवहारात येणाऱ्या बनावट नोटा जास्त लवकर उघडकीस येऊ शकतील.

ग्राहकाला कळून फायदा नाही, तो

खेडूत
Sat, 11/12/2016 - 11:50 नवीन
ग्राहकाला कळून फायदा नाही, तो ती इतरत्र खपवायला बघेल. बँकेत कशी, ती जप्त होते आणि जादा भरणा करायला लावला जातो. दुकानदार फक्त नाकारून परत करतील. नोट फिरत राहील.
↩ प्रतिसाद: एस

हीच समस्या आहे. हजार रुपयाची

संदीप डांगे
Sat, 11/12/2016 - 12:35 नवीन
हीच समस्या आहे. हजार रुपयाची खोटी नोट आपल्याच खिशात आली तर आपल्यालाच विनाकारण फटका बसतो. खोटी नोट त्याचे मूल्य न घालवता बदलून देणे सरकारचे काम नाही आहे का?
↩ प्रतिसाद: खेडूत

आज दुसऱ्यांचे काळे पैसे बँकेत

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 11/12/2016 - 19:17 नवीन
आज दुसऱ्यांचे काळे पैसे बँकेत जमा करून पांढरे करण्यासाठी तयार असणारे, खोटे पैसे सरकारकडून खरे करून द्यायला उभे राहातीलच!
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

खोटे पैसे सरकारकडून खरे करून

मार्मिक गोडसे
Fri, 11/18/2016 - 21:00 नवीन
खोटे पैसे सरकारकडून खरे करून द्यायला उभे राहातीलच!
मग ह्या नोटाबंदीला काहीच अर्थ उरत नाही.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

ग्राहकांकडे बनावट नोट

एस
Sat, 11/12/2016 - 14:27 नवीन
ग्राहकांकडे बनावट नोट येण्यापूर्वीच ते त्या नोटेच्या वैधतेबद्दल अशा यंत्रांच्या साहाय्याने खात्री करून घेऊ शकतील. आजच्या पद्धतीत ग्राहकांकडे नोटा आल्यानंतर जेव्हा ते बँकेसारख्या ठिकाणी भरणा करायला जातात तेव्हाच त्यांना त्या बनावट असल्याचे समजते. साहजिकच त्यांना भुर्दंड पडतो. असा भुर्दंड या यंत्रणेच्या मदतीने टाळता येऊ शकतो.
↩ प्रतिसाद: खेडूत

जोवर ती नोट बँक सिस्टीम मधे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 11/13/2016 - 09:32 नवीन
जोवर ती नोट बँक सिस्टीम मधे आहे तोवर करता येईल अशी व्यवस्था. पण बनावट नोटा देशकंटक बँकेच्या मार्गाने नक्कीचं आणत नाहीत. ते थेट वितरणव्यवस्थेमधे हा पैसा आणतात.
↩ प्रतिसाद: एस

काही सुविद्य, सर्वज्ञ लोकांचे

संदीप डांगे
Sat, 11/12/2016 - 08:32 नवीन
काही सुविद्य, सर्वज्ञ लोकांचे प्रश्न वाचून "ब्रेड नै मिळत तर केक का खात नै तुम्ही लोक?" हा सुप्रसिद्ध प्रश्न आठवला!

ही अशी वाक्ये हवेत आरोप

मोदक
Sat, 11/12/2016 - 08:40 नवीन
ही अशी वाक्ये हवेत आरोप करायला चांगली असतात, पण यामुळे साध्य काहीच होत नाही. त्यापेक्षा तुम्हाला विचारलेल्या नेमक्या प्रश्नांची उत्तरे का देत नाही?
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

देतो कि, चार दिवस थांबा तर...

संदीप डांगे
Sat, 11/12/2016 - 09:35 नवीन
देतो कि, चार दिवस थांबा तर... तूर्तास, एका ने बँकेतून एका फटक्यात 9 हजाराच्या नोटा दहा मिनिटात आणल्या, म्हणाला माझी 25 लाख अमाउंट बँकेत आहे, मॅनेजर नाही देणार तर काय करील... बाकी तुम्ही अंदाज लावा और भी है, जस्ट वेट सर!
↩ प्रतिसाद: मोदक

मग??

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 11/12/2016 - 19:32 नवीन
मग??
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

२५ लाखाला बॅंक हिंग लावुन

मृत्युन्जय
Sat, 11/12/2016 - 22:29 नवीन
२५ लाखाला बॅंक हिंग लावुन विचारत नाही. विश्वास ठेवा माझ्यावर तुमच्या मित्राने तुम्हाला चुना लावलाय. बाकी १० मिनिटात ८००० माझ्या ऑफिसमधल्या प्युन ने पण आणले. फार काही अवघड नाही त्यात
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा