✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुलगी आता इकड़चि झालेली आहे

व
वैभव.पुणे यांनी
Mon, 10/17/2016 - 19:35  ·  लेख
लेख
मुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच! लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम! नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल! नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण! कोण मुद्दाम मुर्ख पणा करेल! आशे संस्कार ही नाहीत की सकख्या आई बापाचं बेधड़क अपमान होईल! आई बापन कोणत्या कष्टानिे आयुष्य बनवले, त्यामुळे त्यांचे पन देने आहे! मुलीला आपल्याच भारवश्यावर सासरी सोपवले आहे, आणि तिहि आपल्याच साठी आलेली आहे, तीचीही योग्य काळजी घेणे आहेच! नवर्याने बायकोसाठी आता परन्त काय दिले काय नाही हे बघताना, त्याच्या परिस्थिति नुसार जस जमेल तस केला आहे! सध्या अत्यंत खलाकिचि वाटेल, पण येणार काळ उत्तम असेल याची शाश्वती आहे! लग्न म्हणजे हकक नाही, त्यामुळे आपल्याला जैसे वाटेल तसे वागले तरी हरकत नाही, फ़क्त त्या वाग्न्यामुळे इतर लोकांना मुख्यतः स्वताच्याच् नवर्याला त्रास होऊ नए एवढेच! सून म्हणून सासरी एक अपेक्षा असते की, सुनने सासरी जास्त वेळ काढावा, तुम्हालाही सून आली की ऎसे वाटनारच! सुनेला फ़क्त ते ओझे वाटू नए! रागाच्या भरात माणूस काहीही बोलू शकतो! त्यामुळे आधीच शांत पाने बोलले तर तोच वांचू शकतो! लहान पणा पासूनचि तन तन करायची सवय आता तरी लग्न झाल्यावर निदान बंद करावी! आजु बाजूचे हाय प्रोफाइल दिसतात म्हणजे आपण पण तसेच वागले पाहिजे ऎसे नाहीच! नवर्याचे अश्रु चे कारण बायकोला कळलेच नाहीत तर त्या कालजाच काय उपयोग! शेवटी आपणही कुठल्या तरी लहान् गावतुनच एथ परन्त आलो आहोत! आणि अजुन तर परदेश पण गांठायचा आहे! आपल्या लोकांमुळेच तर आपण जगत आहोत. अद्चणीच्या वेळेस हेच लोक मदत कारणारे आहेत! मग त्यांचे पण भले करावे! आपला काय संपणारे का काय! **शेवटी सर्व गोष्टि वेळीच कळून चांगल्या झाल्या व् केल्या तर मज्जा आहे आयुष्यात**
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
मुक्तक
समाज
जीवनमान
राहणी
मौजमजा

प्रतिक्रिया द्या
28931 वाचन

💬 प्रतिसाद (143)

प्रतिक्रिया

हुश्श.. कुणाला तरी जाम शिव्या

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/20/2016 - 19:17 नवीन
हुश्श.. कुणाला तरी जाम शिव्या घालायच्या होत्याच ते करवाचौथ पाहुन.. बरा धागा मिळाला.. आता कसं गार गार वाटतंय!! वैभवभौ.. तुम्ही चालु द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

खफवर अजूनही पुरावा आहे.

रेवती
गुरुवार, 10/20/2016 - 19:34 नवीन
खफवर अजूनही पुरावा आहे. स्रुजाने मला कालच कडवाचौथीबद्दल बोलायला मनाई केलिये. कामाच्या ठिकाणी गुप्ताबाई वैतागलेली होती. तशी ती नेहमीच असते पण काल जास्तच! मी काय विचारायला जात नै, तिनंच येऊन सांगितलं पण स्रुजानं त्याबद्दल काही नको म्हटलं. तुझ्या त्या अपर्णा रामतीर्थकर बाई म्हणत असतात- १) (सुनांना उद्देश्यून) मुलींनो, आम्ही तुमच्या नवर्‍याला तळहाताच्या फोडासारखा जपलाय, प्रसंगी कर्ज काढून शिकवलाय. त्याचक्षणी मला साक्षात्कार झाला की माझे शिक्षण फुकटात झाले असून, माझ्या आईवडिलांनी मला तळहाताच्या फोडासारखे जपलेले नाही व मी तशीच मोठी झाले. २)बायांनो, आपण नवर्‍याआधी मरावं (अहेवपणी) अशी इच्छा धरू नका गं, तुमच्यानंतर त्या नवर्‍यानं कुठं जायचं? त्याला घरकामाची सवय नाही, तुम्ही काहीतरी करून घरात उपयोगी पडू शकता. त्यावेळी पुन्हा साक्शात्कार झाला (हो, असे एकामागोमाग होत असतात) की पुरुष घरकामाला उपयोगी नाहीत कारण त्यांनी कधी हिकडची काडी तिकडे केली नाही व कोणी आधी मरायचं हे आपण ठरवू शकतो. नैतर मला आधी वाटायचं की आपलं मरण आपल्या हातात नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

नवर्‍याची परवानगी घेतली होती

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/20/2016 - 20:09 नवीन
नवर्‍याची परवानगी घेतली होती का साक्षात्कार होण्याआधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अर्थात! अब्ला नारी असल्याने

रेवती
गुरुवार, 10/20/2016 - 20:35 नवीन
अर्थात! अब्ला नारी असल्याने तशी ती घेणे क्रमप्राप्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

काय चौकार- षटकार चालूएत गं

स्मिता चौगुले
Fri, 10/21/2016 - 12:31 नवीन
काय चौकार- षटकार चालूएत गं तुम्हा दोघिचे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

दोघींचेही प्रतिसाद

nanaba
गुरुवार, 10/20/2016 - 21:33 नवीन
योग्य आहेत.. मस्त आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

विचार रुपी तीर्थ पिऊन धन्य

पूर्वाविवेक
Sat, 10/22/2016 - 16:48 नवीन
विचार रुपी तीर्थ पिऊन धन्य झाले गो. मी तर माझ्या नवऱ्याच्या आधीच मरणार! कारण जाणून घ्यायचे असेल तर मला व्यनी करा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आमचा बोका गार करायला एखादी

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/20/2016 - 19:45 नवीन
आमचा बोका गार करायला एखादी "जावयाने काय करावं आणि काय करु नये" टाईप जिल्बी तरी पाडा.
आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

माझ्या आत्मरुपी बोक्याबद्दल

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/20/2016 - 20:06 नवीन
माझ्या आत्मरुपी बोक्याबद्दल बोलतेय हो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अपर्णाताई रामतीर्थकर आणि

मोदक
गुरुवार, 10/20/2016 - 20:09 नवीन
अपर्णाताई रामतीर्थकर आणि पिलीयनताई रायडरकर यांचा एखादा जंगी सामना आयोजीत करावा काय..? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

छे!!! आपली काय कुवत बाबा!!

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/20/2016 - 20:11 नवीन
छे!!! आपली काय कुवत बाबा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मला एकदम रिचर्ड डॉकिन्स

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 10/20/2016 - 22:05 नवीन
मला एकदम रिचर्ड डॉकिन्स विरुद्ध त्यो अल जझीरा वाला बाबा ह्यांच्यातील "वादविवाद" आठवला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अच्छा!

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/20/2016 - 21:20 नवीन
म्हणजे तुमच्या मनीचा बोका! (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तो सीट ओरखडणारा बोका तोच काय?

बॅटमॅन
Sat, 10/22/2016 - 17:27 नवीन
तो सीट ओरखडणारा बोका तोच काय? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

=))

पिलीयन रायडर
Sat, 10/22/2016 - 18:53 नवीन
=)) तोच!!! आणि बोकाभौ ह्या सगळ्यांचे आझम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काय तीच तीच चर्चा रे बाबा !

स्रुजा
गुरुवार, 10/20/2016 - 20:51 नवीन
काय तीच तीच चर्चा रे बाबा ! प्रतिसाद वाचुन च नेहमीसारखं मनोरंजन झालं. वैभव भाऊ, गुडलक हो ( तुम्हाला नाही हो, तुमच्या बायको ला गुडलक) ! रेवाक्का , मला काय माहिती तुझ्या पोतडीतुन वर्मीणबाईची ईष्टुरी निघणार आहे. म्हणुन नक्को म्हणलं गो.. पण तू ये बघु खफ वर.. सांग वर्मीणबाईंच्या सुरस कथा
  • Log in or register to post comments

यावर 1 उपाय आहे

सामान्य वाचक
गुरुवार, 10/20/2016 - 20:55 नवीन
2 मुलानीच एकमेकांशी लग्न करावे आणि एकमेकांच्या आई वडिलांचा आणि एकमेकांचा आदर करावा दोघेही पुरुष असल्याने अर्थातच समजूतदार, जबाबदार इ इ असणार पालकांनी कसे खस्ता खाल्ल्या , हे दोघांनाही चांगले माहित असणार बायकांसारखे ते असमजूतदार, बेजबाबदार इ इ नसणार त्यामुळे सगळीकडे आनंदीआनंद होणार
  • Log in or register to post comments

ख्यी ख्यी ख्यी! आवडलंय हे

पिशी अबोली
गुरुवार, 10/20/2016 - 21:00 नवीन
ख्यी ख्यी ख्यी! आवडलंय हे आपल्याला. जमतंय का बघा हो गांजलेले नव-नवरे धागाकर्ते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

पण मग ते वंशाला दिवा द्यायचं

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/20/2016 - 21:12 नवीन
पण मग ते वंशाला दिवा द्यायचं कसं जमावं?!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

लै डोसकं खाजवलं पण ह्ये काई

पिशी अबोली
गुरुवार, 10/20/2016 - 21:18 नवीन
लै डोसकं खाजवलं पण ह्ये काई सुचंना बगा.. बिच्चारे पुरुष..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अस्स कस्सं! द होल पॉईंट ऑफ

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/20/2016 - 21:26 नवीन
अस्स कस्सं! द होल पॉईंट ऑफ लग्न इज "आमच्या घराण्याचे नाव पुढे गेले पाहिजे". बरं आणि ते दोन दोन पुरुष असतील तर नक्की कुणाच्या घराण्याचं नाव पुढे नेणार? कोणती जात न धर्म मुलाला लावणार? म्हणुन स्त्री सोबत लग्न सोप्पंय. तिला आपल्या घरात आणायचं. तिचंच नाव बदलायचं. तिचे आईवडील सोडायला लावायचे, आपले पुजायला लावायचे. जमल्यास ह्यासाठी आपणच तिच्याकडुन हुंडा घ्यायचा. लेकराला सुद्धा आपलंच नाव, आपलीच जात..आपलाच धर्म.. आणि वर परत "नीट समजुन वागत नाही" असे लेख पण लिहायचे! मज्जाच मज्जा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

तुम्हाला काय कळणार पुरुषाच्या

संदीप डांगे
गुरुवार, 10/20/2016 - 21:39 नवीन
तुम्हाला काय कळणार पुरुषाच्या व्यथा, आवडतीशी लग्न होत नाही, करता येत नाही आईबापाने बघितलं तिच्याशी मुकाट सौंसार करायचा बायकोला फिरायला घेऊन गेलो तर आईबाप हिरमुस्तात आईबापाचे ऐकले तर बायको फुरगुंटून बसते बायकोची बाजू घेतली तर बायकोचा बैल म्हणतात पालकांची बाजू घेतली तर भक्त प्रल्हाद म्हणतात एवढे आईबाप प्रिय तर मग लग्न कशाला केलं म्हणतात बायकोचे लाड केले तर चार दिवसात नादी लावलं पोराला असं म्हणतात आलेला हुंडा कुठे जातो ते माहित नाही पोर झालं नाही की सासरचे संशयाने पाहतात सोबत राहायचे तर डोक्याची मंडई वेगळे राहायचे तर कृतघनपणाचे आरोप सोपं नाही हो नवरा होणे! मज्जा कुठे आहे तेच शोधत आहेत बरेच अभागी बिचारे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

डोळे भरुन आलो हो.. थांबा..

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/20/2016 - 21:41 नवीन
डोळे भरुन आलो हो.. थांबा.. विषण्ण झालेलं मन आधी थार्‍यावर येऊ देत, मग सांत्वनपर प्रतिसाद लिहीते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

शेवटी मुद्दा आलाच ना! भाऊ,

वैभव.पुणे
गुरुवार, 10/20/2016 - 21:49 नवीन
शेवटी मुद्दा आलाच ना! भाऊ, हीच ती खरी व्यथा रे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बाकी सगळ्या व्यथा आटोक्यात

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 10/20/2016 - 23:37 नवीन
बाकी सगळ्या व्यथा आटोक्यात राहू शकतात. पण बायकोने दर ४ महिन्यांनी निदान ८ दिवस तरी माहेरी जावे. यासाठी एखादा मंत्र किंवा अंगारा असेल तर कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मंत्र बिंत्र काही नाही हो,

वैभव.पुणे
Fri, 10/21/2016 - 10:54 नवीन
मंत्र बिंत्र काही नाही हो, आमच्याकडे तर माहेरच्या लोकांनी बोलावले कि बायको लगेच पळते माहेरी ! आणि गेल्यावर बायको म्हणते आय मिस यु म्हणून ! माहेरी काय बुद्धी जास्त सुचते का काय माहीत. !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

...

chitraa
Sat, 10/22/2016 - 19:00 नवीन
बघा.. एक संभाळता येईना आणि दोन बायका संभाळलेल्या बाबासाहेबांबद्दल अद्वात्द्वा बोलत होता. आमच्या बायकूचं टायमटेबल .. जूनमध्ये येणे ऑगस्टला गणपतीला जाणे पुन्हा येऊन पुन्हा दिवाळीला जाणे पुन्हा येऊन पुन्हा ख्रिस्मस न्ञु इअरला जाणे पुन्हा येऊन पुन्हा मार्च एप्रिलला गेले की पुढच्या वर्षी जून येण्याजाण्याचा टी ए डी ए बापाकडून घे , असे बोलल्यावर जरा फेर्‍या कमी झाल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

एक दुरुस्ती :

पूर्वाविवेक
Sat, 10/22/2016 - 16:51 नवीन
एक दुरुस्ती : भक्त प्रल्हाद नाही श्रावण बाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आय माय स्वारी बरंका!

संदीप डांगे
Sun, 10/23/2016 - 00:05 नवीन
आय माय स्वारी बरंका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पूर्वाविवेक

लोल... हे फार च भारीये.

स्रुजा
गुरुवार, 10/20/2016 - 21:13 नवीन
लोल... हे फार च भारीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

जबराच प्रतिसाद

nanaba
गुरुवार, 10/20/2016 - 21:34 नवीन
जबराच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

साहित्यमूल्य

चित्रगुप्त
गुरुवार, 10/20/2016 - 21:55 नवीन
हा हंत हंत.... शंभरावर प्रतिसाद गेले उलटून, तरी या धाग्याचे साहित्यमूल्य कोणीच असे जाणले नाही ?? कुणी लिहीणार का यावर ? की आम्हालाच कळफलक बडवावा लागणार त्यासाठी ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba

चित्रगुप्ता, आपणच पुढाकार

वैभव.पुणे
गुरुवार, 10/20/2016 - 22:33 नवीन
चित्रगुप्ता, आपणच पुढाकार घेऊन योग्य ते लिहा बुवा आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

सर्व बंधू भगिनींनो, हा माझा

वैभव.पुणे
गुरुवार, 10/20/2016 - 21:53 नवीन
सर्व बंधू भगिनींनो, हा माझा मुद्दा खेळचट वाटला असेल तर क्षमस्व. पण तुम्हा सर्वांमुळे, काय चांगले काय वाईट जाणून मनाला फार हलके वाटली. जे जे चांगले ते ते नीट करण्याचा प्रयत्न यातून नक्कीच करणार. स्वतःच्या ज्या ज्या चुका समजल्या, त्या त्या नक्कीच शिकून कमीत कमी मनाच्या चुका होतील याचा पण प्रयत्न करणार !! आभार !!
  • Log in or register to post comments

हा थोर धागा मिस झाल्याबद्दल

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 10/20/2016 - 22:07 नवीन
हा थोर धागा मिस झाल्याबद्दल मी २ सेकंदांचे मौन पाळून प्रायश्चित घेणार आहे
  • Log in or register to post comments

संपले 2 सेकंद

सामान्य वाचक
गुरुवार, 10/20/2016 - 22:18 नवीन
आता बोला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

तन तन

चित्रगुप्त
गुरुवार, 10/20/2016 - 23:13 नवीन
कालपासून या धाग्यासाठी मिपाला चिकटून राहिल्यामुळे आमची ही पण आता तन तन करू लागली आहे, तस्मात आता पळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

आता कळलं ना लेख का लिहिला ते

वैभव.पुणे
Fri, 10/21/2016 - 10:51 नवीन
आता कळलं ना लेख का लिहिला ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अशुद्धलेखन करण्याचं काही

संदीप डांगे
Fri, 10/21/2016 - 00:03 नवीन
अशुद्धलेखन करण्याचं काही विशेष कारण???
  • Log in or register to post comments

नेहमीचंच आपलं. प्रतिसादात

स्रुजा
Fri, 10/21/2016 - 01:04 नवीन
नेहमीचंच आपलं. प्रतिसादात विसरलेत ते आणि पूर्वजन्मीच्या सवयीने शुद्ध लिहायला लागले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

लेख परत नीट वाचुन पहा किती

पिलीयन रायडर
Fri, 10/21/2016 - 01:14 नवीन
लेख परत नीट वाचुन पहा किती कष्ट घेतलेत. ते नाही दिसत तुम्हाला. प्रतिसाद तेवढे दिसतात. केला तुम्ही विचार त्या कष्टांचा? नाही... तुम्ही फक्त स्वतःचा विचार करणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

मग काय तर !

वैभव.पुणे
Fri, 10/21/2016 - 10:51 नवीन
मग काय तर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

भगोलं???

एस
Sun, 10/23/2016 - 00:25 नवीन
भगोलं???
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा