✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठा मोर्चा भाग 2

व
वाल्मिक यांनी
Mon, 09/26/2016 - 12:10  ·  लेख
लेख
मागील धागा मूळ उद्देशातून भटकला म्हणून परत काही प्रश्न 1) खरंच सध्याचा मोर्चा उत्स्फूर्त आहे का ? कोणत्याही नेतृत्वाशिवाय एवढे लोक जमणे शक्य आहे का ? 2) अदृश्य हात असेल तर कोणाचा ? 3) झेंडे ,फलके ह्यावर कोणी खर्च केला ? 4) जर नेतृत्व नाहीये तर अमुक तमुक ठिकाणी भेटायचे हे कसे ठरले ? 5) कसाब ला फाशी नेमक्याच वेळी झाली तसे उरण मध्ये ह्याचवेळी अतिरेकी आले हे शक्यता असू शकत का ? मुख्य 6) अमेरिकेचे प्रगती आरक्षण नसल्यामुळे झाली का ? जगात किती देशांमध्ये आरक्षण आहे ? https://goo.gl/YXEbrt
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
100215 वाचन

💬 प्रतिसाद (363)

प्रतिक्रिया

<<<<<<पार्कींगबघा या

विशुमित
गुरुवार, 09/29/2016 - 15:07 नवीन
<<<<<<पार्कींगबघा या मोर्च्यांचे (विषेशतः एखाद्या हॉटेल शेजारी कारण हे लोक चांगल्या हॉटेल मधे "स्वखर्चाने" राहतात) बुलेट, आय २०, स्कॉरपीओ, सुमो, सफारी, एसयुव्ही, मर्क आणि बि.एम.ड्ब्लु ही. याचा पैसा कोठुन आला>>>> ---तुमचा प्रॉब्लेम मोर्चा बद्दल आहे का त्यांच्या गाड्यांबद्दल? तुमचे डोळे खूपच संकुचित भाग पाहतात राव! <<<<<चोराच्या उलट्या >>>> - हे तुम्ही कसे ठरवले? सगळ्या गाड्या चोरीच्या होत्या? आणि सभ्य संकेत स्थळावरती आला आहात कृपया थोडा सभ्यपणा दाखवा. डोक्यावरचा बर्फ वितळून द्यायचा नाही त्यामुळे तूर्तास तुम्हाला इग्नोर...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आर्य

मोर्च्यात कीती लोक सहभागी

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
गुरुवार, 09/29/2016 - 13:36 नवीन
मोर्च्यात कीती लोक सहभागी झाले,कीती जण फक्त घरातून सहभागी झाले हे मोजण्यासाठी नासा उद्या नवीन सॅटेलाईट सोडणार आहे!!!!! "एक मराठा लाख मराठा "असे स्टीकरही शॅटेलाईट लावल्याने कोणतिच शमस्या येणार नाय ,असे नासाचे अध्यक्ष "हंबीराराव तात्यासाहेब ठाले पाटील " यांनी सांगुणच ठेवले आहे.
  • Log in or register to post comments

आमच्ये दादा आनी आम्ही

वडगावकर
गुरुवार, 09/29/2016 - 13:38 नवीन
आन्ना(आमचें ड्याडी ) आनी दादा(मोठे चुलते) ड्याडी शेरात नौकरी,आर्थ शास्त्र शिकवत्यात आनी दादा गावाकडं आस्तेत,शेती करातेत गावात क्रान्ती मोर्च्या होता आम्ही दाहा बारा जन रेडी झालो....गाड्या बिड्या काल्ढ्या आमची गरीबाची हिरो होंडा...पन एक सान्गतो गड्या,बुलेट ती बुलेट राव.. सगळ्या गाड्यांची रानी सहज दादा ला फोन लावला,मोर्च्याला येता का म्हनुन.... अंगावर वास्सकन वराडले ना भाऊ.... xxx,हित पाऊस झालाय श्येती चे काम बघु का तुझ्या मोर्च्यात बोंबलत फिरू? मग आम्हीच मोर्च्यात गेल्तो,मन शांत झालं राव. कूट तोडफोड नाई कूट बोंबाबोब नाई आन्ना च्या कृपेनं सुखी आहे पन दादा च्ये पोरं....आजून धस्कटं वेचालेत
  • Log in or register to post comments

एक ऑब्झर्व्हेशन :-

रायबा तानाजी मालुसरे
गुरुवार, 09/29/2016 - 15:32 नवीन
आमच्या घराचं फाटक ऐन पौड रस्त्यावर. रैवारी सकाळी बाहेर खुर्ची टाकून बसलो तर रस्त्यावर हे भगवे लावलेल्या बड्या बड्या ४ चाक्या आणि दुचक्या. ४ चाक्यांच्या काळ्या काचेतून आतल्या साहेब-भाऊ-नाना-तात्या-दादांचं काय दर्शन घडलं नाही. पण दुचाक्यांवरचं एक समान दृष्यं असंं की बहुतेक दुचाक्यांवर तिघे दुचाकीवीर स्वार (गंध वाले सफेद बगळे). पोलिसांनी काय मोर्चासेवकांसाठी विषेश सवलती दिलेल्या काय? पोलिस नावाची यंत्रणा अस्तित्वात नाहीच्चे अशा अविर्भावात ही मंडळी दिसत होती. असो. बाकीच्या शहरात मोर्चा फार्फार शिस्तीचा झाला असं ऐकलेलं त्याची झलक मिळाली.
  • Log in or register to post comments

नासा घराच्या आतले बघू शकते?

टवाळ कार्टा
गुरुवार, 09/29/2016 - 15:32 नवीन
नासा घराच्या आतले बघू शकते? चायला प्रायवसी नावाची काही गोष्ट अस्ते की नाही...बाकी पुण्यात ४० मीटर आणि १२० मीटर "रुंद" रस्ते आहेत हे वाचून पुण्यातल्या लोकांची लांबी रुंदीची एककेसुद्दा जगावेगळी असतील असे वाटले
  • Log in or register to post comments

असतातच!

पैसा
गुरुवार, 09/29/2016 - 15:48 नवीन
असतातच! शंका आहे का काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

म्हणजे पुण्यात २ किलो दूध

टवाळ कार्टा
गुरुवार, 09/29/2016 - 15:52 नवीन
म्हणजे पुण्यात २ किलो दूध पिशवित बांधून नेतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

:)

समी
गुरुवार, 09/29/2016 - 15:58 नवीन
खीक :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अगागा!

पैसा
गुरुवार, 09/29/2016 - 16:06 नवीन
सगळ्या प्रश्णांची उत्तरे द्यायला माझा जीव काय वर आला नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=))))

अजया
Sat, 10/01/2016 - 21:10 नवीन
=))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बाकी

इरसाल
गुरुवार, 09/29/2016 - 16:12 नवीन
मुक मोर्चाने सामील लोकांना काही मिळालं नाही मिळालं ती गोष्ट वेगळी पण ह्या मोर्चापायी जिवाभावाची काही मंडळी विनाकारण दुरावली. नाशिक मोर्चाच्या एक दिवस आधी एका मराठा पदाधिकार्‍याने वंजारा समाज्याच्या मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचाराबद्द्ल जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार्या पाच मुलींनाही काही बोलावसं वाटलं नसेल????????
  • Log in or register to post comments

एक शंका

चौकटराजा
Sat, 10/01/2016 - 21:04 नवीन
नारायण राणे यानी आज " राजकीय हाराकिरी होईल म्हणून उद्धवने माफी मागितली " अशा अर्थाचे विधान केले आहे. या मोर्चाचे नेत्रूत्व कोणाकडे आहे याचा प्रश्न पडण्याचे आता कारणच नाही. हा सामाजिक मोर्चा असता तर राजकीय सोय वा गैर सोय हे पहाण्याचे कोणाच राजकीय नेत्याला कारणच नव्हते. आज साहेबांचा राणे ना फोन जाईल " राणे कशाला उगीच थु़ंकलात...आपले सर्वांचे ठरले होते ना हा सामाजिक मोर्चाच वाटला पाहिजे म्हणून ?"
  • Log in or register to post comments

राजकारण आहे बाबा

सुखीमाणूस
Sat, 10/01/2016 - 22:25 नवीन
मराठा सोडून सगळ्याना खरी कारणे समजली आहेत ६० वर्षे सत्ता उपभोगलेल्यान्ची तडफड आहे ही मात्र हा समाज ज्या पद्धतीने वर्षानुवर्ष वापरला जातोय ते पाहता याना मदतीची गरज नक्कीच आहे पण ज्या पद्धतीने सुशिक्षीत तरूण वर्ग या मोर्चात सामिल झाला व मी मराठा इइ जाहिरपणे मिरवले गेले ते पाहता शिक्शणाने काय फरक पडणार असेच वाटते. अर्थात सर्व जाती धर्मात असे लोक आहेतच. फक्त या वेळी ज्या पद्धतीने उघड उघड जात मिरवली गेली आपला समाज पुन्हा १०० वर्ष मागे गेला. मोर्चा समर्थक म्हणतील आन्दोलन जाट आणि पटेल आन्दोलनासारखे हिन्सक नाही झाले तल खरच हे महाराष्ट्राचे भाग्यच. काल रात्री एक लोणारी लाख लोणारी असा फलक व गुलाबी झेन्डा लावलेल्या दोन गाड्या पाहिल्या. लोणारी अशी जात असते हे कळले. अशी जातीन्ची परन्परा जपावी हेच खरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

जाट आंदोलन आणि पटेल आंदोलन

अनुप ढेरे
Sat, 10/01/2016 - 23:10 नवीन
जाट आंदोलन आणि पटेल आंदोलन देखील शांतीतच सुरू झालेलं. डायरेक जाळपोळ नाही सुरू केली त्यांनीपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस

लोणारी समाजा विषयी काही माहिती..!!

विशुमित
Mon, 10/03/2016 - 10:43 नवीन
लोणारी जात ओबीसी मध्ये मोडते. लोणारी जातीचा पूर्वी चुना आणि रंग विकायचं व्यवसाय होता. असा म्हंटलं जातं शिवाजी महाराजांनी बांधलेल्या बहुतांशी किल्याना लोणारी समाजाने चुना पुरवला आहे. जी आताची पुण्याची रविवार पेठ आहे, तिथे पूर्वी सर्व लोणारी समाज चुना आणि रंग विकायचा व्यवसाय करायचे. कालांतराने चुन्याच्या भट्या शहरातून बाहेर काढण्यात आल्या आणि त्यांच्या व्यवसायाला खूप मोठा धक्का बसला. या अडचणीत असतानाच, त्यांनी लक्ष्मी रोड आणि रविवार पेठेतील जागा जैन मारवाड्यानं विकल्या. मान, सांगोला, म्हसवड, आटपाडी, येवला, मिरज, इंदापूर, बारामतीतील तालुक्यातील काही गावं च्या गावं लोणारी समाजाचे आहेत. त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत ते मला आता ज्ञात नाहीत. माहिती मिळवून टंकतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

कुणबी लोकांना आरक्षण ऑलरेडी

अनुप ढेरे
Sat, 10/01/2016 - 23:09 नवीन
कुणबी लोकांना आरक्षण ऑलरेडी आहे. आणि मराठा लोकांना कुणबी असल्याचं सर्टिफिकेट सहज मिळवता येतं. (बहुधा नावावर फक्त जमीन असावी लागते. कितीही आकाराची.) सो मराठा जातीला आरक्षण आत्ताही आहे. पण स्वत:ला उघड मागास म्हणवून घेता येत नाही.
  • Log in or register to post comments

मराठा जातीसंबंधी काही प्रश्न

श्रीगुरुजी
Mon, 10/03/2016 - 14:14 नवीन
मराठा जातीसंबंधी काही प्रश्न आहेत. जाणकारांनी ज्ञान द्यावे. १) ९६ कुळी मराठे म्हणजे नक्की कोणते मराठे? ९६ कुळी मराठ्यांमध्ये कोणत्या आडनावाचे मराठे असतात? ९६ कुळी मराठे इतर मराट्यांपेक्षा स्वतःला उच्च समजतात का? ९६ हा आकडा कोठून आला? २) ब्राह्मणांमध्ये देशस्थ, चित्पावन, कर्‍हाडे इ. प्रकार आहेत. माळी जातीतही १५-१६ उपजाती आहेत असे वाचले होते. मराठ्यांमध्ये असे प्रकार आहेत का व असल्यास कोणते? ३) मराठ्यामधील शिसोदे, मोरे, चव्हाण इ. आडनावे मूळ सिसोदिया, मौर्य, चौहान इ. राजपूत आडनावांचा अपभ्रंश आहे असे म्हणतात हे खरे आहे का? माझ्या ओळखीचा पाटील नावाचा एक जण आपण मूळचे राजस्थानी आहोत असे सांगायचा. मराठ्यांमधील काही जण मूळचे राजस्थानातील राजपूत होते का? त्यामुळेच ते स्वतःला क्षत्रिय मानतात का? ४) कुणबी मराठा ही वेगळी जात आहे का? कुणबी व मराठ्यांचा आपापसात काय संबंध आहे.
  • Log in or register to post comments

पहिल्या तीन

नाखु
Wed, 10/05/2016 - 14:43 नवीन
पहिल्या तीनची उत्तरे देण्यास असमर्थ आहे (अज्ञान दुसरे काय/) कुणबी ही कगदोपत्री (निवडणुकीसाठी आरक्षीत जागेवर घुसखोरी करण्यासाठी राजकीय सोय आहे)

कागदोपत्री कुणबी बेटी-लग्न-समारंभात फक्त आणि फक्त ९६ कुळी मराठ्ठा असा आहे.

आणि हे जवळून पाहिले आहे. ता.क.(मोर्चा बाहेर ही मराठा समाज आहे आणि तो माझ्या मित्रपरिवारात आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

उत्तरे तुम्हास माहित आहेत.

याॅर्कर
गुरुवार, 10/06/2016 - 19:06 नवीन
उत्तरे तुम्हास माहित आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नेदरलँड्समध्ये एक मराठा, विश्वविजयी मराठा

नावातकायआहे
Wed, 10/05/2016 - 15:25 नवीन
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=BBGLXu अलस्का मध्ये पण एक होउन जाउ दे
  • Log in or register to post comments

सकाळ मधली प्रतिक्रिया....बाडिस

नावातकायआहे
Wed, 10/05/2016 - 16:59 नवीन
Prabhu - बुधवार, 5 ऑक्टोबर 2016 - 04:37 PM IST तुम्ही रस्त्याने जात आहात आणि तुमच्या एकंदरीत दिसण्यावरून तुम्ही गरीब आहात असे समजून जर कोणी तुम्हाला पैसे देऊ केलेत तर तुम्ही काय कराल 1. आनंदाने पैसे घेऊन रस्त्याच्या कडेला बसून भीक मागणे सुरु कराल ? 2. पैसे नाकारून, आपलं काय चुकतंय ते नीट तपासून स्वतःला नीटनेटकं कराल? पहिला मार्ग निवडणे म्हणजे आपण आहोत तसेच राहून त्याचेच भांडवल करून ढोल वाजवणे. दुसरा मार्ग म्हणजे स्वतःच्या चुका सुधारून, आळशीपणा झुगारून स्वतःला परिस्थितीच्या वर उचलणे कुठल्याही जाती धर्मासाठी असो, आरक्षण 'घेणे' अथवा 'मागणे' हे लांच्छन आहे, जन्मसिद्ध अधिकार नव्हे. ते म्हणजे वर दिलेल्याप्रमाणे पहिला मार्ग निवडणे आहे. परिस्थिती सर्वांसाठीच व्यक्तिशः वर खाली बदलतच असते. त्यावर मात करून परिश्रमाने सभोवतालच्या परिस्थितीतून आणि एकंदरीत समाजातून वर आलेली उदाहरणे सर्वच जाती धर्मातून पाहायला मिळतात. त्यांच्या कडून स्फूर्ती न घेता, ज्याला काहीही न करता आयतं हवं असतं तोच आरक्षणाची भीक मागतो.
  • Log in or register to post comments

मस्त!

संदीप डांगे
Sat, 10/08/2016 - 08:38 नवीन
मस्त! आर्थिक बाबीवर आरक्षण हा मुद्दाच भोंगळ आहे! तसे असेल तर वैद्यकीय सेवांपासून अनेक गोष्टीत आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना खूप सहन करायला लागतं, सरकारी इस्पितळात जातीचा दाखला मागून उपचार केले जात नाहीत हे लक्षात घ्यावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

अवांतर : कुणबी = ?

गामा पैलवान
Wed, 10/05/2016 - 20:28 नवीन
अवांतर : श्रीगुरुजी,
४) कुणबी मराठा ही वेगळी जात आहे का? कुणबी व मराठ्यांचा आपापसात काय संबंध आहे.
या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. पण कुणप म्हणजे प्रेत असा नवनाथ भाक्तिसारात उल्लेख आहे. कुणबी हा शब्द कुणपी तर नसेल? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

नै हो, भलते अर्थ लावू नकासा,

संदीप डांगे
Wed, 10/05/2016 - 20:57 नवीन
नै हो, भलते अर्थ लावू नकासा, कुणबी चा अर्थ कूळ ह्याच्याशी संबंधित आहे, ज्यादा माहिती ब्याटोबा देऊ शकतील..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

नै हो, भलते अर्थ लावू नकासा,

संदीप डांगे
Wed, 10/05/2016 - 20:58 नवीन
नै हो, भलते अर्थ लावू नकासा, कुणबी चा अर्थ कूळ ह्याच्याशी संबंधित आहे, जमीन कसणारे असाही आहे, अतिशय वाह्यात अर्थही ऐकलाय, पण प्रेत हा अर्थ नाही, ज्यादा माहिती ब्याटोबा देऊ शकतील..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मराठा स्वतः ला जर मागासलेले

पिनाक
गुरुवार, 10/06/2016 - 13:00 नवीन
मराठा स्वतः ला जर मागासलेले समजून आरक्षण मागत असतील, तर ते खरोखरच मागासलेले आहेत का? नेदरलॅंड्स मध्ये 'विश्वविजयी मराठा' नावाचा मोर्चा निघाला. आधी एक ठरावा की तुम्ही मागासलेले आहात की विश्व विजयी? बार बाकीच्या जाती या न्यूज ला डिसलाईक का करतायत हे ही विचारतायत. बाकीच्या जातींनी काय नाचायचं काय, तुम्ही एक झाला म्हणून? खालील प्रतिक्रिया तरी पहा किती माजोरड्या आहेत ते. आता बसा, देतायत बाकीच्या जाती तुम्हाला नोकरीच्या संधी. एक वेळ नॉर्थ इंडियन चालतील पण हे नको असं म्हणायची पाळी आणणार हे लोक. खुळ्याची चावडी आहे सगळी. स्वतः: च्या पायावर धोंडा पाडून घेणार मराठे. आरक्षण तर कोर्ट मंजूर करणारच नाही आणि बाकीच्या जाती मध्ये पण स्वतः: विषयी अविश्वास बनवून ठेवला. ok
  • Log in or register to post comments

नाहीतरी महाराष्ट्राचा बिहार करायला निघाले आहेतच

सुखीमाणूस
गुरुवार, 10/06/2016 - 19:16 नवीन
मग north Indian परवडले. आणि हैदराबाद पण मस्त आहे lots of job opportunities and cosmopolitian environment. पुण्यापेक्शा मागासलेले वाटते पण आता महाराष्ट्र जाती मिरवणारा मागास झालाय किवा चेहरा नसलेले मुम्बइ बेस्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिनाक

भारीच मोर्चा

इरसाल
गुरुवार, 10/06/2016 - 15:36 नवीन
लै म्हणजे लैच हसु येवु रायलेना नेदरलँड मधला मुक मोर्चा बघुन.
  • Log in or register to post comments

=)) =)) =)) =)) =))

संदीप डांगे
गुरुवार, 10/06/2016 - 16:16 नवीन
=)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

मराठ्यांना मागासलेले कोण ठरवतोय?

गामा पैलवान
गुरुवार, 10/06/2016 - 17:41 नवीन
लोकहो, मराठा मोर्चे निघाले ते आरक्षणासाठी हे कोणी आणि केंव्हा सांगितलं? मुख्यमंत्री म्हणाले की मराठ्यांना आरक्षण देणार, पण आरक्षण ही मागणी आहेच कुठे मुळातून? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मूळ मोर्चा अरक्षणासाठीच

संदीप डांगे
गुरुवार, 10/06/2016 - 17:43 नवीन
मूळ मोर्चा अरक्षणासाठीच निघणार होता, कोपरडी घडले नसते तरी, बस और क्या बोलू? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हे घ्या जाणत्या राजांचे

नाखु
Sat, 10/08/2016 - 08:56 नवीन
मत (आणि हो ते किंवा त्याचे पोसलेले मराठा म्हासंघ्/बिग्रेड्/छावा या मोर्च्यात बिल्कुल नाहीत बरे) अता त्यांनी सांगीतले ना कशासाठी मोर्चे निघालेत ते,मग सगळ्यांनी फक्त हो हो म्हणायचे . दांडगा अनुभव आहे त्यांना महाराष्ट्राला जातीत-पातीत जखडून ठेवण्याचा. इतका दानशूर्/कर्मवीर्/जाणता राजा खोटं का म्हणून बोलेल. दोन धाग्यांच्या काथ्याकुटाला एका उत्तराने सांक्षात्कार दिला.. खरी ओळख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

तुम्हाला कशात पण काहीही दिसतं..

विशुमित
Sat, 10/08/2016 - 15:06 नवीन
या बातमीत काय खरी ओळख दिसली तुम्हाला? मुख्यमंत्रांवर रोष आहे म्हणून की त्यांच्या कारभारावर रोष आहे म्हणून मोर्चे निघालेत? आरोपपत्र दाखल करायला 3 महिने का बरं लागले असावेत? जात पातीचे गुराळ सोडा वो, जो तो ते अगदी कसोशीने पळतच असतो, फक्त आव आणला जात असतो की मी जात, धर्म विरहित आहे. तसं असतं तर हा पार्ट 2 धागा एवढ्यापुढे सरकलाच नसता. आणि तुमच्या सारखे मिपावरील चोखंदळ सदस्य ही इथे प्रतिक्रिया देयाला धावले नसते. मराठा क्रांती मोर्चा बद्दल विरोधी किंवा वेगळ मत असणाऱ्या एकाने सुद्धा मराठा समाजाला सबुरीने समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसला नाही. उलट मराठ्यांना कसा माज आहे, आरक्षण कशी भीक आहे, ब्राह्मण मुख्यमंत्री कसा खुपतो आहे, असंबंध मोर्चाला पवारसाहेबांचं कनेक्शन दाखवण्याचा प्रयत्न, मोर्चाला होणार खर्च आणि मोर्चे च्या आकड्यावरुन केलेली खिचाई. (नाखु साहेब- तुमची आमची परिस्थिती खूप समाधानकारक आहे म्हणून आपल्याला आरक्षण भीक वाटते, एक उदाहरण देतो-माझ्या एक मित्राची अशिक्षित वृद्ध आई मोर्चाला निघाली होती, मित्र नको जाऊ म्हणाला खूप उन्ह आहे आहे आणि लय चालावं लागेल, पण ती माउली म्हणाली बाबा आम्ही तुम्हाला नाही तुमच्या मनासारखा शिकवू शकलो, पण या मोर्चाने तुझ्या पोराबाळाला फायदा झाला तर झाला. तिची विचार करण्याची कुवत बाजूला ठेवू पण एक सल कुठे तर काळजात असल्याशिवाय कोणी एकत्र येत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मुख्यमंत्रांवर रोष आहे म्हणून

श्रीगुरुजी
Sat, 10/08/2016 - 15:56 नवीन
मुख्यमंत्रांवर रोष आहे म्हणून की त्यांच्या कारभारावर रोष आहे म्हणून मोर्चे निघालेत?
रोष असण्याचे अनेक मुद्दे आहेत. त्यातील प्रमुख मुद्दे म्हणजे 'खालच्या' जातीतील मुलांनी 'वरच्या' जातीतील मुलीवर अत्याचार केले व 'आपल्या' जातीचा मुख्यमंत्री नसून तो 'दुसर्‍याच' जातीचा आहे. आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी, शेतकरी, शिवस्मारक इ. मुद्दे तोंडीलावण म्हणून घुसडण्यात आले.
आरोपपत्र दाखल करायला 3 महिने का बरं लागले असावेत?
घाईघाईत आरोपपत्र दाखल केले तर आरोपपत्रात अनेक त्रुटी रहायची शक्यता असते व त्यातून आरोपी सुटण्याची किंवा त्यांना कमी शिक्षा होण्याची शक्यता असते. या आरोपींची ब्रेन मॅपिंग चाचणी झाली आहे, नार्को चाचणी झाली आहे, डीएनए चाचणी झाली आहे. या सर्व चाचण्यांचे निकाल येऊन त्यात सातत्यता दाखवून पुढे जावे लागते. जर दोन चाचण्यांच्या निष्कर्षात थोडीशी तफावत असली तरी त्याचा फायदा आरोपींचे वकील उचलतात. कोपर्डी प्रकरण घडल्यानंतर सुरवातीचे १५-१६ दिवस तिथे नेत्यांची रीघ लागली होती. त्यामुळे पोलिसांना तपास वेगाने पूर्ण करणे शक्य नव्हते. अत्याचारीत मुलीचे नातेवाईक अत्यंत धक्का लागण्याच्या मानसिक अवस्थेत असल्याने त्यांची जबानी घेण्यास वेळ लागला. सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून असल्यामुळे, दोन वेगवेगळ्या जातींचे हितसंबंध यात गुंतल्याने, अनेक पक्षांनी यात जातीयवादी राजकारण घुसवून दबाव आणल्याने पोलिसांना मोठ्या अतिशय काळजीपूर्वक तपास करावा लागला. आरोपपत्रात किरकोळ चूक जरी राहिली व त्याचा फायदा आरोपींना मिळाला तर सर्व खापर पोलिसांवर व सरकारवर फोडले जाईल. त्यामुळेच आरोपपत्र घाईघाईत दाखल न करता काळजीपूर्वक तपास करून दाखल करण्यात आले आहे.
मराठा क्रांती मोर्चा बद्दल विरोधी किंवा वेगळ मत असणाऱ्या एकाने सुद्धा मराठा समाजाला सबुरीने समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसला नाही. उलट मराठ्यांना कसा माज आहे, आरक्षण कशी भीक आहे, ब्राह्मण मुख्यमंत्री कसा खुपतो आहे, असंबंध मोर्चाला पवारसाहेबांचं कनेक्शन दाखवण्याचा प्रयत्न, मोर्चाला होणार खर्च आणि मोर्चे च्या आकड्यावरुन केलेली खिचाई.
मराठा समाजाला सबुरीने समजावून घ्यायचे म्हणजे काय करायचे? कोपर्डी घटना अत्यंत घृणास्पद आहे हेच सर्वांचे मत आहे. कोपर्डी गुन्हेगारांना एक महिन्यात फाशी द्या ही मोर्चेकर्‍यांची मागणी व्यावहारिक नाही हे त्यांनाचा समजायला हवे. इतरांनी त्यात काय समजून घ्यायचे? अ‍ॅट्रॉसिटीची भीति फक्त मराठ्यांनाचा का वाटते हे त्यांनीच समजावून सांगायला हवं. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याने त्यांना राखीव जागा हव्यात ही मागणी तर अजिबात समर्थनीय नाही. जी जात गेली शेकडो वर्षे राज्य करीत होती व ज्या जातीचे महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात प्राबल्य आहे त्यांना राखीव जागा देणे अजिबात समर्थनीय योग्य नाही. पटत नसेल तर आम्हा सर्वांना या मोर्चेकर्‍यांची भूमिका व त्यांच्या मागण्यांमागील तर्क समजावून सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

कोपर्डी घटना अत्यंत घृणास्पद

मार्मिक गोडसे
Sat, 10/08/2016 - 16:05 नवीन
कोपर्डी घटना अत्यंत घृणास्पद आहे हेच सर्वांचे मत आहे. कोपर्डी गुन्हेगारांना एक महिन्यात फाशी द्या ही मोर्चेकर्‍यांची मागणी व्यावहारिक नाही हे त्यांनाचा समजायला हवे.
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पुन्हा सांगतो मागण्या रस्त असतीलही

नाखु
Sat, 10/08/2016 - 16:13 नवीन
पण वेळ आणि पद्धत चुकीची निवडून न कळत पवारांच्या हातातले खेळणे बनले आहेत हे (सामाजीक हेळ्सांड व शिक्षण्संधीची परवड झालेले लोक) आठवून पहा जरा अर्जुन सिनेमा अगदी तसा तरूणाईचा वापर करून घेतला आहे. आरक्षण द्या नाहीतर खुर्ची सोडा ही घोषणा कशाचे द्योतक आहे.आरक्षण देणे एकट्या मुख्यमंत्रयाचा हातात आहे का? ओबीसीत समावेश करण्यसाठी सर्व संबधीताचे एक्मत होणे गरजेचे आहे हेही माहीत आहे. दौर्यातील प्रत्येक निषेध मोर्चाला मुम स्वतः निवेदन घेऊनही मोर्चाचे निमित्त जाण्ता राजा आणि कन्या फक्त मुख्यमंत्र्याम्वर (सरकारवर) रोष म्हणून दाखवते. खरेच हा मोर्चा स्वयंस्फुर्तीचा आणि पक्षीय पाठबळाचा नसेल तर तसे पदाधिकार्यांनी राजकीय श्रेयापासून नेत्यांना रोखले पाहिजे. मूक्संमती आणि पडद्याआडचे म्होरके बोलायला लागले की चांगल्या हेतुबद्दलही शंका येणे स्वाभावीक आहे. माझे अगदी जीवा भावाचे दोन मित्र मोर्चात सक्रीय होते त्यांच्याशीही माझा घनघोर वाद झाला आहे.(अजूअन्ही संबध चांगले आहेत आणि राहतीलही) प्र्त्यक्षात सुरुवातीला मोर्चा निघेपर्यंत आरक्षण हा विषय होता (कोपर्डीने अस्मितेवर फुंकर घातली गेली इतकेच काय ते) पण मोर्चाचा प्रतिसाद पाहून जाणत्या राज्यांच्या हस्तकांनी (माराठा महासंघ विखारी विंग आणि ब्रिगेड यांनी हे सरकार ब्राह्मणधार्जीणे आणि मराठा विरोधात आहे हे पद्धत्शीर्पणे पसरविले) काही व्हाटसप पोष्ट वाचवणार नाहीत अश्या भडकाऊ आणि अर्वाच्य आहेत. त्याने आधिच कोपर्डीच्या (अन्याय्य ग्रस्त असल्याच्या) आगीत तेल ओतले गेले. ही आगलावण्याची झळ नक्की कुणाला बसेल ते माहीत नाही पण शहरात ब्राह्मण-मराठा, आणि गावाकडे मराठा-मराठेतर बहुजन यांच्यात असलेले सौदार्ह आणि सलोखा काळवंडला गेला आहे हे नक्की. अ‍ॅट्रोसिटीच्या ज्या खोट्या केसेस असतील त्यांच्या "खर्या गुन्हेगारांचे नाव" शरद पवार आणि मंडळींनी शोधून काढावीत पण ते करण्या ऐवजी माथे भडकविण्याचे काम जरूर केले जाते. हुंडाबळी कायद्याचाही दुरुपयोग होतो आहे आणि हुंडाबळीही होत आहेत्,अंमलबजावणी यंत्रणेचे खापर कायद्यावर फोड्णे अगदी सोपे असते तेच इथे होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

या मोर्चा मागे पवार साहेब

विशुमित
Sat, 10/08/2016 - 16:50 नवीन
या मोर्चा मागे पवार साहेब आहेत हेच मुळी मला मान्य नाही. भले सुप्रिया ताई किंवा अन्य राष्ट्रवादीचे नेते किंवा इतर पक्षातील मराठा नेते काही ही प्रतिक्रिया देवोत, अजून तरी त्यांचा मोर्चा वर विपरीत परिणाम झालेला नाही. महत्वाचे म्हणजे अजून तरी कोणत्याच मोर्चा मध्ये कोणाला ही पदाधिकारी म्हणून बहुमान दिला नाही. बाकी तुम्ही व्हाट्सअप पोस्ट, तुमच्या मित्रांचे अनुभव, ब्रिगेडी, मराठा संघ यांची उदाहरणे दिलीत तरी सुद्धा या मोर्चाने माथ्यावरचा बर्फ वितळून नाही दिला. तुम्ही जी भीती व्यक्त करताय ज्याने सौदार्ह संपुष्टात येईल ही अनाठायी आहे. कारण हा समाजामध्ये बहुतांशी लोक खूप सृजनशील, सुसंस्कृत, जीवाला जीव देणारी, मैत्रीसाठी वाट्टेल ते करणारी आणि हळवी सुद्धा आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

ते नसतील तर शंभर टक्के आनंद वाटेल.

नाखु
Sat, 10/08/2016 - 16:55 नवीन
मूक मोर्च्यातील मित्रांना सामाजीक अभिसरणाचा फायदा मिळावा हीच माझीही ईच्छा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

धन्यवाद...!!

विशुमित
Sat, 10/08/2016 - 16:57 नवीन
धन्यवाद...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

+1

एमी
Mon, 10/10/2016 - 10:57 नवीन
+1 आरक्षणाची गरज नसणारा, अॅट्रोसिटीशी संबध न येणारा, मध्यम+ वर्गातला, शहरी मराठा या मोर्चात का सामील होतोय हे ज्यांना जाणून घ्यायचंय त्यांनी माबोवरचा समीर गायकवाड यांचा धागा वाचावा. विरोधी मतं कशी मांडावीत हे जाणण्यासाठी limbutimbu यांच्या धाग्यावरचे भरत., केदार जाधव, अल्पना, दिमित्रि यांचे प्रतिसाद वाचावे. आरक्षणाबद्दल सर्वसामान्यांच्या आक्षेपावर काही उपाय शोधता येतील का यासाठी अॅमीचा धागा वाचा. लिंक स्वबळावर शोधा किंवा गुगलकडून भिक घ्या ;-) जोपर्यंत मोर्चा अहिंसक मार्गाने, शांततेत चाललाय तोपर्यंत माझा त्याला पुर्ण सपोर्ट आहे. मनापासून शुभेच्छा! (आणि धाग्यावरून रजा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

जाणत्या राजाला डोके बाजूला

टवाळ कार्टा
Fri, 10/07/2016 - 16:08 नवीन
जाणत्या राजाला डोके बाजूला ठेउन पाठिंबा द्यायला पर डे रेट काय आहे सध्ध्या? साईड बिझनेसम्हणून काम करायला हरकत नै
  • Log in or register to post comments

कोपर्डी केसचे आरोपपत्र

सुबोध खरे
Sat, 10/08/2016 - 10:27 नवीन
कोपर्डी केसचे आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले. http://www.business-standard.com/article/pti-stories/charge-sheet-filed-in-kopardi-gangrape-case-116100701034_1.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

काळीज चिरलं गेलं हो ....!

गामा पैलवान
Sat, 10/08/2016 - 12:14 नवीन
अगगागा, मराठा मोर्च्यांमुळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या सरकारचे काळीजच पार चिरले गेले हो. आणि काय निघालं बरं त्या चिरलेल्या काळजातून? अर्थात, मराठा आरक्षण. याला म्हणतात भीषण विनोद! -गा.पै.
  • Log in or register to post comments

मुंबईतील मोर्चा

हेमन्त वाघे
Sat, 10/08/2016 - 13:00 नवीन
मुंबई मोर्चा एक कोटी लोक सहभागी होणार आहेत. पूर्ण महाराष्ट्र राज्यातील लोक येणार आहेत. प्रत्येकी 500 ₹ जायचा यायचा खर्च पकडा, होतात 500 कोटी. एक वेळचे जेवण, कमीत कमी 100 कोटी इतर खर्च (बॅनर्स, चहा पाणी, टी शर्ट ) मिळून ₹ 700 ते 800 कोटी रुपयांचे बजेट आहे. अजून काहींचा "जास्तीचा" खर्च - तर 1000 करोड ला मरण नाही कोण करणार एवढा खर्च ??? आरक्षण मागणारे गरीब मराठे ??? एवढा खर्च करू शकतो असा एकच माणूस महाराष्ट्रात आहे, तो म्हणजे ..... भ्रष्टाचारशिरोमणी ............
  • Log in or register to post comments

लोक स्वतःच्या खिशातून खर्च

विशुमित
Sat, 10/08/2016 - 15:17 नवीन
लोक स्वतःच्या खिशातून खर्च करून मोर्चाला येत आहेत. ज्यांच्या कडे चारचाकी आहे ते गावातील ज्या लोकांना मोर्चाला यायचा आहे त्यांना मोफत बरोबर घेऊन जात आहे. जाणारे सुद्धा फुकटे नाहीत ते सुद्धा त्यांच्या परीने चहा-पाणी करत आहेत गाडीतील लोकांना. ज्यांच्या कडे आर्थिक सुबकता आहे ते आर्थिक मदत करत आहेत, जोर जबरदस्ती नाही गणपती मंडळांसारखी. मागील काळात जे मोर्चे निघत होते ज्यामुळे सरकारी मालमत्तेची आणि वाहनांची नास धूस करून होणाऱ्या खर्च पेक्षा नक्कीच हा मोर्चा खूप स्वस्त आहे. भ्रष्टाचारशिरोमणी... खडसे की मुंडे की गडकरी ---यातील कोण नाही समजलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

तुम्ही एव्हढी बाजु लढवतात,

श्री गावसेना प्रमुख
Sat, 10/08/2016 - 15:44 नवीन
तुम्ही एव्हढी बाजु लढवतात, तुम्हाला काय वाटते मुख्यमंत्री जातील आणी आरक्षण मिळेल,?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

मुख्यमंत्र्याना घालवण्यासाठी

विशुमित
Sat, 10/08/2016 - 16:19 नवीन
मुख्यमंत्र्याना घालवण्यासाठी हा मोर्चा निघत आहे हे सपशेल झूट आहे. आणि ब्राह्मण मुख्यमंत्र्यांचं पिल्लू सोडून कथित भक्त समर्थक मोर्चाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण तरीही मोर्चा अधिक जोमाने निघत जाणार आहे. आरक्षण नक्की मिळेल, हा माझा विश्वास आहे. ते जर मिळालं तर नक्की सर्व मिपा सदस्यांना माझ्या कुवती नुसार स्नेह भोजनाला आमंत्रित करेन. आणि हो जो पर्यंत हा मोर्चा शांततेत चालू आहे तो पर्यंत मी या मोर्चाचा खंदा समर्थक असणार आहे, यात वाद नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

श्रीगुरूजी आणि नाखु,

याॅर्कर
Sat, 10/08/2016 - 18:34 नवीन
श्रीगुरूजी आणि नाखु, 1) ब्राह्मण मुख्यमंत्री हटवणे. 2) भ्रष्ट मराठा नेत्यांना वाचवण्यासाठी खेळलेली राजकीय खेळी. >>> वरीलपैकि एकही मुद्दा मोर्चेकरी मंडळींच्या डोक्यातच काय? पण स्वप्नातही नाही. त्यांच्या काहीतरी मागण्या आहेत,त्यात थोडा अभिनिवेश आहे,थोडी जातीय अस्मिता आहे(सगळ्यांनाच असते तशी),आणि थोडं विषमतेच दुखणं आहे.इतकेच पण श्रीगुरूजींची तर्कबुद्धी पार पल्याड गेली आहे, अर्थात ते म्हणतायत म्हणजे 100% बरोबरच असेल कदाचित पवारांच्या सभेला लोक जमायची पंचाईत! आणि ते मोर्चा कशाला अरेंज करतील?
  • Log in or register to post comments

एक छोटीशी विसंगती

राही
Sun, 10/09/2016 - 17:30 नवीन
हे मोर्चे मराठ्यांच्या प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात आहेत, प्रस्थापित नेतृत्वाने आम मराठ्यांच्यासाठी काहीच केले नाही त्यामुळे त्याविरोधात असंतोष आहे हे मत इथे आणि इतरत्र मांडले गेलेले वाचले. त्याच वेळी श्री शरद पवार हेच या मोर्चांचे सूत्रधार आहेत असेही मत हिरिरीने इथे आणी इतरत्र मांडले गेलेले वाचले. म्हणजे एक तर शरद पवार हे प्रस्थापित नेतृत्वात मोडत नाहीत किंवा दुसरी बाजू म्हणजे ते या मोर्चांचे कर्तेकरविते नाहीत. जर ते प्रस्थापित नेते असतील तर स्वतःच्याच विरोधात मोर्चे कशाला काढतील?
  • Log in or register to post comments

वरील सर्वांशी सहमत

नाखु
Mon, 10/10/2016 - 08:55 नवीन
होऊनही या प्रश्नाचे उत्तर कुणी देईना ते, अगदी ताजी बातमी

औरंगाबाद - हिवाळी अधिवेशनाचे निमित्त साधून 14 डिसेंबरला नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या घरावर मराठा क्रांती मूक मोर्चा धडकणार आहे. यशवंत स्टेडियमवरून मोर्चा निघेल. नागपुरातील मोर्चावर राज्य सरकारच्या पवित्र्यानंतर मुंबई मोर्चाबाबत भूमिका स्पष्ट करण्यात येईल. तूर्तास मुंबई मोर्चा स्थगित केल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत औरंगाबाद जिल्हा मोर्चाच्या समन्वयकांनी दिली.

संपुर्ण बातमी इथे आता मुख्यमंत्र्यांच्या घरावर धडक. आजतगायत कुठला मोर्चा तात्कालीन मुख्यमंत्र्याच्या घरावर गेला होता आणि मराठा आरक्षण तात्काळ लागू करणे कुठल्या मुख्यमंत्र्याना शक्य आहे (प्रकरण न्य्याय प्रविष्ठ असताना) एकूण व्यक्तीगत रोख पाहता हा मोर्चा हायजॅक होण्याची शकयता वाढीस लागली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा