✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठा मोर्चा भाग 2

व
वाल्मिक यांनी
Mon, 09/26/2016 - 12:10  ·  लेख
लेख
मागील धागा मूळ उद्देशातून भटकला म्हणून परत काही प्रश्न 1) खरंच सध्याचा मोर्चा उत्स्फूर्त आहे का ? कोणत्याही नेतृत्वाशिवाय एवढे लोक जमणे शक्य आहे का ? 2) अदृश्य हात असेल तर कोणाचा ? 3) झेंडे ,फलके ह्यावर कोणी खर्च केला ? 4) जर नेतृत्व नाहीये तर अमुक तमुक ठिकाणी भेटायचे हे कसे ठरले ? 5) कसाब ला फाशी नेमक्याच वेळी झाली तसे उरण मध्ये ह्याचवेळी अतिरेकी आले हे शक्यता असू शकत का ? मुख्य 6) अमेरिकेचे प्रगती आरक्षण नसल्यामुळे झाली का ? जगात किती देशांमध्ये आरक्षण आहे ? https://goo.gl/YXEbrt
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
100216 वाचन

💬 प्रतिसाद (363)

प्रतिक्रिया

व्यंगचित्रे किंवा विनोद

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/29/2016 - 16:01 नवीन
व्यंगचित्रे किंवा विनोद अतिशयोक्तीशिवाय होतच नाही. एखाद्या घडलेल्या प्रसंगावरून एखादा विनोद किंवा व्यंगचित्र जन्माला येते. बर्‍याचदा व्यंगचित्रातून खेळकरपणे किंवा उपरोधिक टीका असते. त्यात कोणाचीही निंदानालस्ती नसते. तसेच विनोद किंवा व्यंगचित्रातील दाखविलेली घटना काल्पनिक असते. धर्मेंद्रच्या चित्रपटातील संवादावरून जन्माला आलेला "कुत्ते कमी ने" हा एका चोरावरील काल्पनिक विनोद हे याचे एक उदाहरण आहे. या विनोदावरून धर्मेंद्रची बदनामी होते असे स्वतः धर्मेंद्र सुद्धा म्हणणार नाही. "काहीही हं श्री" ही काही महिन्यांपूर्वी पसरलेली पंचलाईन हे अजून एक उदाहरण. ही पंचलाईन म्हणजे त्या मालिकेची किंवा मालिकेतील पात्रांची बदनामी नसून सतत संवादात येणार्‍या या शब्दांवरून एक विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. "हमे देखना है" हे वाक्य राजीव गांधी भाषणात वारंवार उच्चारायचे. हे वाक्य वापरून अनेक व्यंगचित्रे व विनोद निर्माण केले गेले होते. त्यामुळे राजीव गांधींची बदनामी झाली असे कोणीही म्हटले नव्हते. इंदिरा गांधींचे मोठे टोकदार नाक किंवा नरसिंहरावांची वेगळ्या प्रकारची जिवणी हा व्यंगचित्रकारांचा आवडता विषय होता. त्यांच्यावरील व्यंगचित्रात त्यांची नाकावरून किंवा जिवणीवरून बदनामी झाली असे कोणीही म्हटले नव्हते. डोक्यावर कायम फरकॅप घालणार्‍या वि. प्र. सिंगांवरील व्यंगचित्रात त्यांची टोपी कायम डो़ळ्यावर आलेली दाखवायचे. त्याबद्दलही कोणी आगपाखड केली नव्हती. सामनातील व्यंगचित्र हे घडलेल्या घटनेवरून काढले आहे किंवा मोर्चात मुका घेण्याचे प्रकार होतात व त्या प्रकारावरील ही तिरक्स टीका आहे हे कोणी सांगितले? "मुका मोर्चा" या शब्दातील "मुका या शब्दाच्या दुसर्‍या अर्थावरून व्यंगचित्रात एक विनोद निर्माण करण्याचा क्षीण प्रयत्न केला आहे. एवढाच त्याचा अर्थ आहे. मोर्चात मुके घेतले जातात असे व्यंगचित्रावरून दाखविले गेले किंवा मुका मोर्चा काढणार्‍यांची ही बदनामी आहे ही राजकारण्यांच्या विकृत डोक्यातून आलेली मूर्खपणाची कल्पना आहे. व्यंगचित्राकडे व्यंगचित्र म्हणून पहायला शिका. त्यातून गूढ अर्थ, बदनामी, निंदानालस्ती इ. शोधायला जाल तर कायम डोक्याला ताप होईल. हा व्यंगचित्राचा अनाहूत वाद काँग्रेस/राष्ट्रवादीच्या निरूद्योगी नेत्यांनी जाणीवपूर्वक निर्माण केला आहे. वातावरण भडकावणे हाच त्यामागचा उद्देश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

चला म्हणजे मोर्चामध्ये सामील

विशुमित
गुरुवार, 09/29/2016 - 16:28 नवीन
चला म्हणजे मोर्चामध्ये सामील झालेल्या महिला वर्गावर शिंडतोडे उडवणाऱ्या व्यंगचित्राला तुमचे ही समर्थनच म्हणायचे....!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

शिंतोडे? काहीतरीच काय.

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/29/2016 - 20:28 नवीन
शिंतोडे? काहीतरीच काय. माझ्यामते व्यंगचित्राचे २ प्रकार असतात. १) घडलेल्या घटनेवर खेळकर भाषेत उपरोधिक भाष्य करणारी व्यंगचित्रे (राजकीय व्यंगचित्रे या प्रकारात मोडतात). २) निखळ आनंदाकरीता निर्माण केलेली विनोदी/चावट व्यंगचित्रे (शि. द. फडणीसांची व्यंगचित्रे किंवा "आवाज"च्या दिवाळी अंकातील खिडक्यावाली व्यंगचित्रे) "सामना"तील व्यंगचित्र दुसर्‍या प्रकारात मोडते. अर्थात ते फारसे जमलेले नाही. त्यात राजकारणावर टीका किंवा उपरोधिक भाष्य नाही. परंतु त्यात काहीही आक्षेपार्ह नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

सन्माननीय भोळा भाबडा यांस

नाखु
Wed, 09/28/2016 - 15:31 नवीन
मराठा म्हणजे पवार आणि पवार म्हणजे राष्ट्रवादी हे समीकरण तुमच्या डोक्यात फिट्ट झालयं आता त्याला माझ्याकडे औषध नाय.
मी सगळ्या मराठ्यांना यात धरीत नाही पण मोर्चाचा चालविता आणि बोलविता मेंदू म्हणून भ्र्ष्टवादी पक्षाकडे नक्कीच बघेन.त्यांनी पोसलेली पिल्लावळ या मोर्चामागे आहे,जरा सकाळ सोडून इतर वर्तमानपत्रेही वाचत जा महाराष्ट्र टाईम्स्मध्ये शनिवारी एक मखलाषी लेख आला आहे मराठा महासंघाच्या माजी अध्यक्षांचा आणि छावा संघटनेच्याही नेत्याचा.(बातमी नाही त्यांनीच लिहिलेला लेख आहे)त्यात लिहिले आहे की मराठ्यांश्ये आणि दलितांंअध्ये इतरांनी भांडणे लाव्ली आम्चा दलिंतांवर राग नाही. अता मराठा म्हासंघाशी आणि छाव्याशी संबध नाही हे तुम्ही पुण्यातला (रातोरात हलवलेल्या) दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणातील राजमाता जिजाऊंची शपथ घेऊन सांगू शकता. सांगायला काय मीही मिपावर २१ लाख सभासद आहेत असे सांगू शकतो कुणी पुरावा थोडीच मागतोय इथे? तेव्हा धाग्यावरचा अंतिम प्रतिसाद. आम्चे मिपा स्न्हेही आणि कायमस्वरूपी हितचिंतक रा रा वल्ली सर यांना दिलेल्या शब्दानुसार तूर्त अश्या धुळवडीत उतरणार नाही.
  • Log in or register to post comments

नाखु साहेब---

विशुमित
गुरुवार, 09/29/2016 - 14:52 नवीन
पवार साहेबच या मोर्चा मागे आहेत. म्हणून तर....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अजून पण कोणी तरी असेल

वाल्मिक
Fri, 09/30/2016 - 13:34 नवीन
अजून पण कोणी तरी असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

करा की guess ...

विशुमित
Fri, 09/30/2016 - 16:16 नवीन
करा की guess ... पण बॉस फक्त पवार साहेबच त्यात काही वाद नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

भिडस्त यांचा 'सारकाजम' सरकून

संदीप डांगे
Wed, 09/28/2016 - 15:59 नवीन
भिडस्त यांचा 'सारकाजम' सरकून पार 'वरून' गेला बॉ!!! नासाच्या सॅटेलाईट च्याही वरून!!!
  • Log in or register to post comments

हे हे हे

भीडस्त
Wed, 09/28/2016 - 16:15 नवीन
आपलीच कृपा म्हणायचं तुम्हाला 'नीलायम'ची तंदुरी नाय तं भुजबळची मटण भाकरी भेट देण्याचे 'निच्छित' झाले आहे कधी जायचे बोला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अशक्य विनोदी धागा !!

नीलमोहर
Wed, 09/28/2016 - 18:58 नवीन
खूप छान करमणूक झाली, ती एक म्हण आठवली, कुठलासा बाजार अन कसलासा पाऊस =))
  • Log in or register to post comments

करमणूक काय यात

भीडस्त
Wed, 09/28/2016 - 19:18 नवीन
तुमच्या काय मागण्या आहेत का ते सांगा असल्या तर नवीन मोर्चासत्र चालू करू आपण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

प्रतिसाद भारी विनोदी आहेत,

नीलमोहर
Wed, 09/28/2016 - 20:01 नवीन
बाकी आम्हाला जे हवं ते योग्य मार्गांनी, स्वकष्टाने मिळवण्याची शिकवण आहे, त्यानुसार मिळवत आहोत, पुढेही मिळवू, कुठलेही आरक्षण आणि मोर्चांशिवाय, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त

आभारी आहे

भीडस्त
Wed, 09/28/2016 - 22:11 नवीन
स्पृहणीय प्रतिसादावर सविस्तर मत सकाळी देतो मोबाईलवर जास्त लिहिता येणार नाही म्हणून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

मराठा समाजामध्ये सध्या दोन मुद्दे चर्चेत आहेत

संदीप ताम्हनकर
Wed, 09/28/2016 - 20:49 नवीन
मराठा समाजामध्ये सध्या दोन मुद्दे चर्चेत आहेत, पण स्पष्टपणे पुढे आलेले नाहीत. आरक्षण १. तामिळनाडूमध्ये १९९३ पासून एकूण ६९ % आरक्षण आहे. एकूण लोकसंख्येच्या ८७ % इतके पिछडे (६८ % मागासवर्गीय, १८ % अनुसूचित जाती आणि १ % अनुसूचित जमाती), असल्याचा आणि त्यासाठी जास्त आरक्षण गरजेचे असल्याचा तामिळनाडू सरकारचा युक्तिवाद सर्वोच्च न्यालयाने २०१३ मध्ये मान्य केलेला आहे आणि त्याचा घटनेत समावेशही झाला आहे. महाराष्ट्रातही मराठ्यांना १३ % आणि मुस्लिमांना ४ % आरक्षण असू शकते (एकूण ६९ %). पण सरकार योग्य वकील नेमून परिणामकारक युक्तिवाद करत नाही असा आंदोलकांचा समज (आरोप) आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ऍट्रॉसिटी कायदा, २. नवीन (२०१६) ऍट्रॉसिटी कायद्यानुसार लागू असलेल्या नुकसानभरपाई मुळे खोट्या केसेस वाढतायत. नवीन अनुसूचीत जाती आणि जनजाती अत्याचार प्रतिबंध कायदा संशोधन २०१६ नुसार या कायद्याअंतर्गत तक्रार करणाऱ्या प्रत्येक पीडित व्यक्तीला सरकारने नुकसानभरपाई (Relief Amount) द्यायची आहे. उदाहरणार्थ बलात्काराची तक्रार करणाऱ्या दलित स्त्रीला एकूण रु पाच लाख (गॅंग रेप मध्ये रु ८,५०,०००) एवढी रक्कम सरकारने द्यायची आहे. त्यापैकी १० टक्के रक्कम (रु. ७५,०००) तात्काळ द्यायची आहे. ५० टक्के म्हणजे रु २,५०,००० रक्कम वैद्यकीय तपासणी नंतर लगेच द्यायची आहे. आणि उर्वरित ४० टक्के नुकसानभरपाई गुन्हा सिद्ध झाल्यास लगेच द्यायची आहे. या कायद्या अंतर्गत इतर वर्णविद्वेषाच्या गुन्ह्यातही रु. ८५,००० पासून पुढे नुकसान भरपाई पीडित व्यक्तीला देण्याची तरतूद करण्यात आली आहे. FIR नोंदवणे टाळल्यास किंवा उशीर केल्यास पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा, ६० दिवसात तपास पूर्ण करून दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल करणे अनिवार्य, हे बदल आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे असे म्हणणे आहे की अनुसूचित जातीं सध्या याचा वापर करून पैसे उकळणे हे करतायत. काहीही झाले की लगेच ऍट्रॉसिटीची केस टाकतो असे धमकावले जाते आणि सरकार एवढे पैसे देते तर तुम्ही किती देणार असे चालले आहे, याचेपण एजंट टाईप लोक गावोगाव तयार होतायत. यामुळे कायद्यात बदल करावा ही मराठा समाजाची मागणी आहे. पण दलित मतांच्या धास्तीने कोणताही राजकीय पक्ष पुढे येऊन स्पष्ट भूमिका घेऊ शकत नाही त्यामुळे मराठा समाजाचे राजकीय नेतृत्व नसलेले मोर्चे निघतायत. (वरील विचार आणि मते माझी नसून मराठा समाजातील मोर्चे काढणाऱ्यांची आहेत. मी फक्त आपल्या समोर मांडतोय) टीप: - भारतीय दंड संहितेतील (IPC) रेप च्या नवीन व्याख्येनुसार प्रत्यक्ष क्रिया होण्याचीच गरज नसून स्त्रीच्या लैंगिक अवयवांना पुरुषाच्या लैंगिक अवयवांचा (तोंडाचा, बोटाचा ही) स्पर्श झाला तरी गुन्हा घडला असे आहे.
  • Log in or register to post comments

टीप: - भारतीय दंड संहितेतील

संदीप डांगे
Wed, 09/28/2016 - 21:50 नवीन
टीप: - भारतीय दंड संहितेतील (IPC) रेप च्या नवीन व्याख्येनुसार प्रत्यक्ष क्रिया होण्याचीच गरज नसून स्त्रीच्या लैंगिक अवयवांना पुरुषाच्या लैंगिक अवयवांचा (तोंडाचा, बोटाचा ही) स्पर्श झाला तरी गुन्हा घडला असे आहे. ^^^ ह्याबद्दल काही तक्रार आहे काय? मला तर योग्यच वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप ताम्हनकर

शंकासुरहो हा सूर्य आणि हा जयद्रथ

भीडस्त
गुरुवार, 09/29/2016 - 11:08 नवीन
हा घ्या पहिला साद्यंत अहवाल मोर्चातील उपस्थितीचा दुसरा आला की यथावकाश पाठवला जाईलच तुमची लावा तुम्ही मती आणि करा गणती हा हन्त!'मिसळपाव'वरची प्रजा 'नेणती' Image removed.
  • Log in or register to post comments

71.50 ही गर्दीची कमाल संख्या

आदूबाळ
गुरुवार, 09/29/2016 - 11:45 नवीन
71.50 ही गर्दीची कमाल संख्या असू शकते. बरोबर ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त

आमच्या पंढरपुरी मित्राची

अभ्या..
गुरुवार, 09/29/2016 - 11:59 नवीन
आमच्या पंढरपुरी मित्राची प्रतिक्रीया. "आषाढीत ६-७ लाखात बडव्यांच्या घरासहित आख्खे गांव पॅक होतय" अर्थात पंढरी आणि पुण्यात फरक आहेच म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आंगाश्शी

भीडस्त
गुरुवार, 09/29/2016 - 12:14 नवीन
अर्थात पंढरी आणि पुण्यात फरक आहेच म्हणा
पुण्यपत्तनाची महती आपणास इष्टसमयी उमगली हे मात्र बरें झांले काढा पंढरपुरी आन मळा पघु येक येक ईडा आपल्या दोघान्ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आमाला भगव्याची मांदियाळी, मंग

अभ्या..
गुरुवार, 09/29/2016 - 12:20 नवीन
आमाला भगव्याची मांदियाळी, मंग कुटं बी असना. पटतीच बघा. घ्या इडा. चुना राजेशचा हाय बरका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त

आसुंद्या

भीडस्त
गुरुवार, 09/29/2016 - 12:30 नवीन
चालातय वले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हम्म

भीडस्त
गुरुवार, 09/29/2016 - 12:02 नवीन
असू शकेल पण ती रस्त्यावर आलेल्या गर्दीची. राहिलेली गर्दी घरात बसूनच मोर्चात सहभागी झालेली असू शकते ना आबासाहेब .. हे तुम्ही एव्हाना ध्यानात घ्यायला हवे होतेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

नासा ने घराच्या आतले लोक

sagarpdy
गुरुवार, 09/29/2016 - 12:25 नवीन
नासा ने घराच्या आतले लोक मोजले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त

अहो लादेन ला पण त्यांनीच

वाल्मिक
गुरुवार, 09/29/2016 - 12:27 नवीन
अहो लादेन ला पण त्यांनीच शोधले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

च्यायला तो स्नोडेन एकदम बरोबर

sagarpdy
गुरुवार, 09/29/2016 - 12:30 नवीन
च्यायला तो स्नोडेन एकदम बरोबर आहे. लग्न केलंच नाही पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

बोलूच नका

भीडस्त
गुरुवार, 09/29/2016 - 12:39 नवीन
वीस हजार कि मी वरनं आकाशातून ज्याला घराबाहेरलं मोजता येतं त्याला घराआतलं मोजता यायला कायच अडचण येऊच शकत नाही बरंका सागरराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

बरोब्बर. आणि घरातली किती

sagarpdy
गुरुवार, 09/29/2016 - 12:44 नवीन
बरोब्बर. आणि घरातली किती मंडळी सपोर्ट मध्ये आहेत ते पण वीस हजार फुटांवरून ओळखता येतेच. आपली न्यायालयच नार्को टेस्ट वगैरे फालतू प्रकार करतात. मी म्हणतो इसरो ने नासा बरोबर भागीदारी करावी, महिनाभरात भारत भ्रष्टाचारमुक्त करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त

नको नको

भीडस्त
गुरुवार, 09/29/2016 - 15:24 नवीन
भागीदारीचा लयिच वंगाळ आण्भव ह्ये..... सगळं नुसतं भागीले होत रहातं आपण आपली 'गोबेल्सा' टाईप नावाची नवीनच संस्था काढलेली जास्त श्रेयस्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

मस्त

sagarpdy
गुरुवार, 09/29/2016 - 12:00 नवीन
  • वा, नासा ने मराठीत अहवाल काढला हे पाहून कौतुक वाटले. मराठी माणूस म्हणून उर भरून आला.
  • दुसरी अभिमानास्पद बाब अशी कि 40 मी रुंद रस्ते (अथवा रस्त्यालगत मोकळी जागा) आता पुण्यात आहेत. या मार्गदर्शिकेप्रमाणे चौपदरी रस्ता बनवून शहरातील वाहतूककोंडी लवकरच संपुष्टात येऊ शकेल - बजेट पाहिजे फक्त.
तर तुमच्या 1 चौ.मीटर म्हंणजे 10 चौ. फुटात जास्तीत जास्त 4 लोक राहतात. बस-रेल्वे साठी आरक्षण हवेच. एकूण संख्या किती म्हणीलये ती ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त

नासाने अहिराणी मध्ये अहवाल

वाल्मिक
गुरुवार, 09/29/2016 - 12:28 नवीन
नासाने अहिराणी मध्ये अहवाल काढायला पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

सागरभो

भीडस्त
गुरुवार, 09/29/2016 - 15:26 नवीन
टेप बदला विचार बदलतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

अमेरिकवासी मिपाकरांना कळकळीची

sagarpdy
गुरुवार, 09/29/2016 - 16:17 नवीन
अमेरिकवासी मिपाकरांना कळकळीची विनंती आहे की, पुढच्या वेळी भारतात परत येताना नासाच्या दुकानातून लांबी मोजायची एक टेप माझ्यासाठी आणि दुसरी गुगल साठी घेऊन या. खर्च आधीच सांगा. पावती पुस्तक छापून घेतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त

ओ आसं काय करत्याय

भीडस्त
गुरुवार, 09/29/2016 - 16:23 नवीन
तीन टेप करा बघू ते आधी दोनच का म्हणून आमचीही टेप बदलायची वेळ आली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

अरेच्चा!

पैसा
गुरुवार, 09/29/2016 - 14:25 नवीन
आता तुम्ही पण आकडे लावायला लागलात? एक कळलं नाही. मोर्चा म्हणजे कुठेतरी सुरू होतो आणि कुठेतरी संपतो. म्हणजे लोक चालत जातात. हे तुम्ही वर दिलेय तो एरिया प्रचंड मोठा आहे. म्हणजे या सगळ्या एरियातले रस्ते भरून माणसे फक्त उभी होती का? न चालता? मग बाकी पुणेरी ट्रॅफिकचे काय झाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त

या वरच्या आकडेमोडीबद्दल

अनुप ढेरे
गुरुवार, 09/29/2016 - 14:28 नवीन
या वरच्या आकडेमोडीबद्दल माहिती नाही पण अनेक रस्ते बंद होते. आणि ते रस्ते फक्त माणसांनी भरलेले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

होय

नाखु
गुरुवार, 09/29/2016 - 14:45 नवीन
माझा मित्र गेला होता मोर्च्याला दुपारी १२ नंतर जे जिथे आहेत तिथेच थांबावे लाग्ले कारण पुढे जाण्य्साठी जागा नव्हती असे म्हणाला. शिवाय पुण्याच्या सर्व बाजूने पण विधानभवनाकडे जाणारे रस्ते व्यापले होते.मूळ नियोजनानुसार फक्त लक्ष्मी रस्त्यावरून निघणारा मोर्चा पर्यायी मार्गावरूनही काढावा लागला असेही त्याने सांगीतले. मोर्च्याच्या विशालतेबद्दल अजिबात दुमत नाही माझे फक्त नासाने इतकी अचूक आकडेवारी कशी मोजली त्याचे कुतूहल आहे,तसेही माझे गणित आणि भूमीती फारसे चांगले नाही म्हणून विचारले. कारण कुठल्याही वर्तमानपत्राने इतका मोठा आकडा दिलेला नाही,शिवाय रस्त्यांची क्षमता (भले वाहतूक बंद ठेवली तरी) इतका समुदाय सामावून घेण्याची क्षमता आहे का याचाही विचार केला गेला पाहिजे. बाकी मोर्चा शांततेत काढल्याबद्दल आणि स्त्रियांच्या लक्षणीय सहभागाबद्दल कौतुकास नक्कीच पात्र आहे.(फक्त दोन दिवसांनी धमकीवजा पत्रक काढण्याचे कारण नव्हते) नेमस्त नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

'आकडी' आणणारे प्रश्न

भीडस्त
गुरुवार, 09/29/2016 - 15:16 नवीन
म्हणजे या सगळ्या एरियातले रस्ते भरून माणसे फक्त उभी होती का? -- होय न चालता? -- सुरुवात झाल्यावर मोर्चा पुढे सरकत होता. लोक येत गेले तसतसा तो stagnate होत गेला ... मग बाकी पुणेरी ट्रॅफिकचे काय झाले?--- महत्त्वाच्या रस्त्यांवरची वाहतूक वळविण्यात आली होती कुतूहल दाखवल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हा घ्या पहिला साद्यंत अहवाल

श्रीगुरुजी
Fri, 09/30/2016 - 14:32 नवीन
हा घ्या पहिला साद्यंत अहवाल मोर्चातील उपस्थितीचा दुसरा आला की यथावकाश पाठवला जाईलच तुमची लावा तुम्ही मती आणि करा गणती हा हन्त!'मिसळपाव'वरची प्रजा 'नेणती'
कितीही कोटींची उपस्थिती असलेले कितीही मोर्चे कितीही वेळा निघाले तरी प्रचलित कायद्यांनुसार मराठा जातीला राखीव जागा मिळणे आणि दलित अत्याचारविरोधी कायदा रद्द होणे किंवा त्यात दुरूस्ती होणे अशक्य आहे. या गोष्टी हव्या असतील तर संसदेत यासंबंधी प्रचलित असलेल्या कायद्यांमध्ये घटनादुरूस्ती व्हायला हवी. लोकसभा व राज्यसभा मिळून महाराष्ट्राचे किमान ६० खासदार संसदेत आहेत. त्यापैकी किमान ३० खासदार मराठा जातीचे असावेत. त्या ३० खासदारांपैकी कोणीही वरील कायद्यात दुरूस्ती करणारे विधेयक संसदेत मांडून ते मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा मोर्चे काढून हातात काहीही येणार नाही. फडणविसांनी दडपणाखाली येऊन मराठ्यांना राखीव जागा द्यायचा कायदा महाराष्ट्रात केला तरी तो प्रचलित घटनेविरूद्ध असल्याने न्यायालय लगेच त्याला स्थगिती देईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त

गुर्जी मग मोर्चे काढायचेच

विशुमित
Fri, 09/30/2016 - 16:14 नवीन
गुर्जी मग मोर्चे काढायचेच नाही का??? आणि मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा तर स्वतः म्हणतात की मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. तुमच्या मते ते असेच मोघम बोलत असतील नाही? जाऊ द्या फक्त 2-3 मोर्चे राहिलेत नंतर होईल शांत सगळं, अगदी तुमच्या मनासारखा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मोर्चे काढायला कोण नाही

श्रीगुरुजी
Sat, 10/01/2016 - 15:00 नवीन
मोर्चे काढायला कोण नाही म्हणतंय? मोर्चे काढून काहीही उपयोग नाही असं मी म्हणतोय. एखाद्या जातीने केलेल्या विशिष्ट मागण्यांना कोणीही तोंडावर विरोध करू शकत नाही. तसे करणे राजकीयदॄष्ट्या चुकीचे असते. मराठ्यांना राखीव जागा मिळणे अशक्य आहे हे सर्व पक्षांना व नेत्यांना माहिती आहे. परंतु मतपेटी गमावण्याच्या भीतिने तसे कोणीही उघड सांगू शकत नाही. माजी न्यायाधीश प. बा. सावंत यांची २ दिवसांपूर्वी मुलाखत पाहिली. सध्याच्या कायदे व घटनेनुसार मराठ्यांना राखीव जागा मिळणे अशक्य आहे असे त्यांनी सांगितले. अजून एका वेगळ्या कार्यक्रमात, "आरक्षणाचा पोपट मेलेला आहे, परंतु तसे सांगण्याचे धैर्य कोणाकडेच नाही", असे अजून एकाने सांगितले. मोर्चात सहभागी होणार्‍यांना वस्तुस्थितीची जाणीव करून ने देता आरक्षणाचे गाजर दाखवून भुलविले जात आहे व त्यांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या जात आहेत. राखीव जागा मिळणे शक्य नाही हे मराठा जातीतील कोळसे पाटील, उज्ज्वल निकम, हर्षद निंबाळकर, सतीश मानेशिंदे इ. मराठा कायदेतज्ज्ञांनी व जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण इ. मवाळ मराठा नेत्यांनी मोर्चेकर्‍यांना समजावून सांगितले पाहिजे. परंत ते सर्वजण गप्प आहेत. आरक्षण मिळणार नाही हा जेव्हा न्यायालयातून पुन्हा एकदा निर्णय होईल तेव्हा आत्यंतिक निराशेतून याच लोकभावनेचा उद्रेक होऊन अशांतता निर्माण होण्याची भीति वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

काल

चौकटराजा
Sat, 10/01/2016 - 21:12 नवीन
काल ची माहिती अशी की महाराष्ट्रातील सत्ता पैसा १५९ मराठा कुटुम्बाच्या हातात एकवटली आहे मराठा समाज खरोखरच गरीब आहे एरवी. पण भारतातील आरक्षणाचे मूळ सामाजिक मागासलेपणात आहे आर्थिक मागासलेपणात नाही. मराठा ही सामाजिक मागासलेले आहेत हे मुख्य्मंत्र्यांची संख्या आमदारांची संख्या खासदारांची संख्या यापासून शिवाजी राजांपर्यत मागे गेले तरी सामाजिक मागासलेपण सिद्ध करणे कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मराठा मोर्चा भाग 2

वडगावकर
गुरुवार, 09/29/2016 - 11:17 नवीन
विषय थोडा गहन आहे थोडा अभ्यास करून येतो मंडळी....
  • Log in or register to post comments

नासा ची लिंक द्या जिकडे गणती

वाल्मिक
गुरुवार, 09/29/2016 - 11:26 नवीन
नासा ची लिंक द्या जिकडे गणती केली आहे
  • Log in or register to post comments

ना सा हाफीसाला सुट्टी

नाखु
गुरुवार, 09/29/2016 - 11:51 नवीन
आहे सध्या ! भारतात बर्याच ठिकाणी वेग्वेगळ्या कारणाने गर्दी होत आहे म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

बराबर यक्दम

भीडस्त
गुरुवार, 09/29/2016 - 12:26 नवीन
समद्या सुपार्या पेंडिंग ह्येत आझूक बारामती दिल्ली रशिया तव्हा हापिसं उघाड्ल्यावं समदि गानी वाजतीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मराठाविरोघी गुगळे चा निषेध

हेमन्त वाघे
गुरुवार, 09/29/2016 - 12:33 नवीन
Image removed. पुण्याच्या रस्त्यांची रुंदी बघण्यासाठी आम्ही गूगल नकाशा पहिला आणि दिसले कि विधान भावनांचा रास्ता तर 20 च मीटर्स चा आहे 40 मीटर चे रस्ते दिसलेच नाहीत ! आजपासून मराठा गूगल वापरणार नाही !! आणि नासा ने हि लिंक काढून टाकली .. आज नासा त ले सर्व मराठे राजीनामा देणार - अमेरिकेचे गुरु ग्रहावर जाण्याचे स्वप्न भंग !! लिंक - http://i1304.photobucket.com/albums/s530/hemantwaghe/Pune%20Map%201_zpsqeln0m6v.jpg
  • Log in or register to post comments

हे मात्र बरं केलंत

भीडस्त
गुरुवार, 09/29/2016 - 12:46 नवीन
आता हे 'मक्रांमुमो'च्या सगळ्या ग्रुपला तत्काळ पाठविण्यात येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

=)))))))

अजया
गुरुवार, 09/29/2016 - 14:00 नवीन
=)))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

अँपल चा नकाशा बघा आता

वाल्मिक
गुरुवार, 09/29/2016 - 14:20 नवीन
अँपल चा नकाशा बघा आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मोर्चा संख्या फसवी !

आर्य
गुरुवार, 09/29/2016 - 13:18 नवीन
मागच्या 'मोर्च्यात' माहिती मिळाली की अनेक कार्यकर्ते ३ ते ४ ठिकाणी सहभागी झाले होते, काही तर सर्व आणि यात भाडोत्री कार्यकर्तेही भेट्ले (प्रवास+जेवण्+ १००रु) त्यामुळे सर्व मोर्च्यामधे सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांची एकूण संख्या हि मराठा समाज्याच्या लोकसंख्ये पेक्षा (कितीतरी) जास्त असणार कदाचीत.... आणि हे मोजतोय कोण ??.. कार्यकर्तेच की कोंबड्या झुंजवणारे मिडीयावाले. पार्कींगबघा या मोर्च्यांचे (विषेशतः एखाद्या हॉटेल शेजारी कारण हे लोक चांगल्या हॉटेल मधे "स्वखर्चाने" राहतात) बुलेट, आय २०, स्कॉरपीओ, सुमो, सफारी, एसयुव्ही, मर्क आणि बि.एम.ड्ब्लु ही. याचा पैसा कोठुन आला....चोराच्या उलट्या .......
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा