Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वाल्मिक on Mon, 09/26/2016 - 12:10
मागील धागा मूळ उद्देशातून भटकला म्हणून परत काही प्रश्न 1) खरंच सध्याचा मोर्चा उत्स्फूर्त आहे का ? कोणत्याही नेतृत्वाशिवाय एवढे लोक जमणे शक्य आहे का ? 2) अदृश्य हात असेल तर कोणाचा ? 3) झेंडे ,फलके ह्यावर कोणी खर्च केला ? 4) जर नेतृत्व नाहीये तर अमुक तमुक ठिकाणी भेटायचे हे कसे ठरले ? 5) कसाब ला फाशी नेमक्याच वेळी झाली तसे उरण मध्ये ह्याचवेळी अतिरेकी आले हे शक्यता असू शकत का ? मुख्य 6) अमेरिकेचे प्रगती आरक्षण नसल्यामुळे झाली का ? जगात किती देशांमध्ये आरक्षण आहे ? https://goo.gl/YXEbrt
  • Log in or register to post comments
  • 100219 views

प्रतिक्रिया

Submitted by रायबा तानाजी मालुसरे on Wed, 09/28/2016 - 16:18

In reply to रातामा सर by भीडस्त

Permalink

अरेच्या...

अरेच्या... दुवा चुकला काय? असो. हा दुरूस्ती केलेला दुवा घ्या. बाकी तुमची दिशाभूल आम्ही ती काय करणार? तुमची दिशा तुमच्या पोष्टीतून दिसतेय. 'नासा माहिती आहे का?' असं म्हणून जी अत्यंत मनोरंजक (दादा कोंडके श्टाईल मनोरंजन) माहिती तुम्ही दिली, ती वाचून आम्ही खूपच खिदळलो. आणि बाकी मंडळीना अजुन कसं काय लक्षात आलं नाही बुवा... अशा विचारात आम्ही अजाणतेपणे काडी केली. तेव्हा आमच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमची क्रांती अशीच चालू ठेवा. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 16:35

In reply to अरेच्या... by रायबा तानाजी मालुसरे

Permalink

यल्गार

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही जागते रहो
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Wed, 09/28/2016 - 15:33

In reply to नासा by रायबा तानाजी मालुसरे

Permalink

??

?? भौतेक चुकून दिलीत? भलतीच माहिती दिसतेय तिथे..
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 09/28/2016 - 15:03

In reply to काय म्हणता?? by रायबा तानाजी मालुसरे

Permalink

एकदा स्पेस दिली की एरॉटिक

एकदा स्पेस दिली की एरॉटिक गोष्टी घडणं अपरिहार्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 15:39

In reply to एकदा स्पेस दिली की एरॉटिक by आदूबाळ

Permalink

म्हणजे काय

हे जरा open करून सांगितलं तर बरं होईन
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Wed, 09/28/2016 - 16:06

In reply to एकदा स्पेस दिली की एरॉटिक by आदूबाळ

Permalink

मिपा वर दगडफेक व्हायची :P

मिपा वर दगडफेक व्हायची :P
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 16:20

In reply to मिपा वर दगडफेक व्हायची :P by sagarpdy

Permalink

?????

असे का बरें म्हणता महोदय आपण ?? 'शहाणे करून सोडावे सकळ जन' हे वाचन आपणास ज्ञात नाही काय बरें
  • Log in or register to post comments

Submitted by वरुण मोहिते on Wed, 09/28/2016 - 21:55

In reply to एकदा स्पेस दिली की एरॉटिक by आदूबाळ

Permalink

लोल

कडक प्रतिसाद !
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Wed, 09/28/2016 - 14:39

In reply to अतिशय पूर्वग्रहदूषित प्रतिसाद by भीडस्त

Permalink

ह ह पु वा

अशक्य करमणूक होते आहे माझी सासू एकदा माझा मामा गोड गप्पा मारून बाहेर पडल्यावर "पक्का सन्घ्या दिसतोय " म्हणाली होती त्याची आठवण झाली• मला ना अकारण म आणि ठ वापरून तयार होणारे शब्द आठवत आहेत•
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 09/28/2016 - 15:55

In reply to अतिशय पूर्वग्रहदूषित प्रतिसाद by भीडस्त

Permalink

अगदी 'भिडस्त' प्रतिसाद!

अगदी 'भिडस्त' प्रतिसाद!
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 16:31

In reply to अगदी 'भिडस्त' प्रतिसाद! by अजया

Permalink

तुम्हीच राहिला होतात

ड्येन्ट्यालिष्ट कुठल्या
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 09/28/2016 - 17:21

In reply to तुम्हीच राहिला होतात by भीडस्त

Permalink

अरे काय चाल्लंय काय!

आजचा दिवस मिपावर सत्कारणी लागला. किती बकरे सापडले? त्यात मातीचे किती?
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 18:10

In reply to अरे काय चाल्लंय काय! by पैसा

Permalink

ओ मॅडम

माझाच बकरा झाला प्रतिसाद टायपून टायपून
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 09/28/2016 - 18:12

In reply to ओ मॅडम by भीडस्त

Permalink

बरं बरं

माणणीय टवाळजी कार्टा यांचा सल्ला विसरू नका हां. आणि मोर्चाला यायचं बरं का. नासाला शूटिंगचं कॉट्यक्ट दिलंय आपण. हयगय नाय.
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 18:48

In reply to बरं बरं by पैसा

Permalink

ह्ये काय

आत्ताच उराकलि कनि मीटिन्ग नासाबराबर्चि. त्य्हान्च्या मान्सान्ना यष्टित बसुन्सनि धिलं न लगोलग यानं क्यालं इथं समदं टापोटाप करु म्हन्गालेत त्ये.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 09/28/2016 - 17:57

In reply to तुम्हीच राहिला होतात by भीडस्त

Permalink

अनाहितांशी पंगा...जल्दीही

अनाहितांशी पंगा...जल्दीही तेरा नंबर लगेगा =))
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 18:37

In reply to अनाहितांशी पंगा...जल्दीही by टवाळ कार्टा

Permalink

अरेरे वाघूर तुम्हालाही नडलं की

ड्येन्ट्यालिष्ट म्याडम आनिक आम्हि The Klan चे नेम्बर ह्येत्.... तेव्हा अनाहिताला भीत नसतो सरजी. आमचाही एक ऑकल्ट कंपू आहे. अवातर : अजया मॅडम, ऑकल्ट हा शब्द वापरायचा योग थेट पाव शतकानंतर आला आज प्रतिसाद प्रतिसाद खेळताना डेव्हिडसन साहेबाची याद ताजा झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 09/28/2016 - 19:16

In reply to अरेरे वाघूर तुम्हालाही नडलं की by भीडस्त

Permalink

:) आॅकल्टको आॅकल्टही रहने दो!

:) आॅकल्टको आॅकल्टही रहने दो!
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 19:34

In reply to :) आॅकल्टको आॅकल्टही रहने दो! by अजया

Permalink

आमीन

खरं आहे पर्दानशींच बरं
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 09/27/2016 - 23:05

Permalink

एक शंका.

मराठा मोर्चाचा मिपावरील पहिला धागा उडवला आहे काय? मी प्रवासात असल्याने वाचायचा हुकलाय.. नसल्यास कुणी लिंकदान करेल का? मला सापडत नाहिये. दे दान, सुटे गिर्‍हाण...
  • Log in or register to post comments

Submitted by थॉर माणूस on Tue, 09/27/2016 - 23:45

In reply to एक शंका. by आनंदी गोपाळ

Permalink

काळजी नसावी... असल्या

काळजी नसावी... असल्या धाग्यांवर सकस चर्चा कमी आणि धुळवड जास्त चालते. तिथली हुकली असेल तर इथे पहा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Wed, 09/28/2016 - 10:17

In reply to एक शंका. by आनंदी गोपाळ

Permalink

वाचण्यासारखे काहीच नव्हते

वाचण्यासारखे काहीच नव्हते त्यात. http://www.maayboli.com/node/54402 याबद्दल तुमचा फिडब्याक जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Wed, 10/05/2016 - 13:21

In reply to वाचण्यासारखे काहीच नव्हते by एमी

Permalink

या विषयावर माबोवर आलेल्या

या विषयावर माबोवर आलेल्या तीनही धाग्यांवर चांगली चर्चा झाली. वर लिंक दिलेल्या लेखातील एक मुद्दा 'खाजगी कॉलेजमधील ८०% अॅडमिशन सरकारी नियमाने कशा काय होतात ब्वॉ?' त्याबद्दल अधिक शोध घेत असताना DTE च्या अॅडमिशन ब्रोशरमधे खालील मुद्दा सापडला: 1.1 c) Competent Authority shall also effect admissions to certain number of seats in Unaided Engineering colleges, for which such institutions have given consent. तर सर्व मराठा शिक्षणसम्राटांनी हा कंसेंट काढून घ्यावा, एकत्र येऊन 'मराठा विद्यापीठ' स्थापन करावं आणि आपापल्या कॉलेजसाठीच्या अॅडमिशनचे नियम आपणच बनवावेत. मग त्यात १००% जागा केवळ मराठा जातीला असतील किंवा वोट बँक म्हणून सध्या आहे तसे ५०% आरक्षण आणि बाकीचे केवळ मराठा असतील. हे केल्यानंतर कॉलेजचे स्टँडर्ड वाढवण्यावर भर द्यावा आणि आपल्या विद्यापीठातून वर्डक्लास विद्यार्थी बाहेर पडतील हे पहावे. जर सध्या असलेल्या घटना, कायदे या मार्गातून आरक्षण मिळत नसेल तर हा पर्यायी मार्ग नक्की विचार करण्यासारखा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 10/05/2016 - 14:34

In reply to या विषयावर माबोवर आलेल्या by एमी

Permalink

ब्वॉर्र...... कळवतो..

ब्वॉर्र...... कळवतो..
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 10/05/2016 - 14:34

In reply to या विषयावर माबोवर आलेल्या by एमी

Permalink

ब्वॉर्र...... कळवतो..

ब्वॉर्र...... कळवतो..
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 10/05/2016 - 15:16

In reply to या विषयावर माबोवर आलेल्या by एमी

Permalink

1.1 c) Competent Authority

1.1 c) Competent Authority shall also effect admissions to certain number of seats in Unaided Engineering colleges, for which such institutions have given consent.
विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांना जास्तीत जास्त २०% जागा व्यवस्थापन कोट्यातून (म्हणजेच किमान ७-८ लाख रूपये देणगी घेऊन) भरता येतात. उर्वरीत ८०% जागा सरकारी नियमानुसार भरल्या जातात. सर्व मराठा शिक्षणसम्राटांनी मराठा विद्यापीठ स्थापन केले तरी जास्तीत जास्त २०% जागा मराठ्यांना देता येतील. उर्वरीत ८०% जागा सरकारी नियमांनुसार भराव्या लागतील.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on गुरुवार, 10/06/2016 - 00:36

In reply to 1.1 c) Competent Authority by श्रीगुरुजी

Permalink

सर्व मराठा शिक्षणसम्राटांनी

सर्व मराठा शिक्षणसम्राटांनी मराठा विद्यापीठ स्थापन केले तरी जास्तीत जास्त २०% जागा मराठ्यांना देता येतील. उर्वरीत ८०% जागा सरकारी नियमांनुसार भराव्या लागतील. >> का बरं? असा कोणता कायदा आहे जो खाजगी कॉलेजातील जागा कशा भरायच्या याचे नियम बनवतो? === तुम्ही तो धागा आणि त्याखालचे प्रतिसाद वाचले का? मी काय म्हणतेय ते तुम्हाला कळले नाही असे वाटतेय. थोडक्यात परत इथे सांगते: शाळा, कॉलेज आणि नोकर्यांचे खाजगी आणि सरकारी असे दोन प्रकार करता येतील. त्यातल्या सरकारी प्रकारात काय करायचे याचे नियम पुर्णपणे सरकार बनवते. जे ठीकच आहे. खाजगी प्रकारातमात्र घोळ आहे. शाळांसाठी २५% RTE, नोकर्यांत ०%, कॉलेजातमात्र ८०% सरकारी लुडबुड. हा एवढा इंटरफिअरन्स खाजगी कॉलेज कसा काय चालवून घेतात त्याचा शोध घेत होते. तेव्हा वरचा कंसेंटचा मुद्दा सापडला. खाजगी कॉलेजांनी हा कंसेंटच काढून घ्यावा. CET, CAP सगळ्यातूनच बाहेर पडावे असे मी म्हणतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Fri, 10/07/2016 - 00:09

In reply to 1.1 c) Competent Authority by श्रीगुरुजी

Permalink

श्रीगुरुजी, तुम्ही उत्तर दिले

श्रीगुरुजी, तुम्ही उत्तर दिले नाहीत. 1. 'घटना किंवा कायद्यातील शैक्षणिक आरक्षण हे केवळ सरकारी कॉलेजांसाठी सक्तीचे आहे; खाजगी कॉलेजांसाठी नाही. त्यांनी वॉलंटरी कंसेंट देऊन त्यात सहभाग घेतला' हे माझे आकलन चूकीचे आहे का? 2. हा कंसेंट काढून घेऊन पुर्णपणे खाजगी कॉलेज, विद्यापीठ तयार करणे भारतात शक्य आहे की नाही? मला वाटतं सिंबायोसीस पुर्ण खाजगी आहे. चूभूद्याघ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Fri, 10/07/2016 - 01:25

In reply to श्रीगुरुजी, तुम्ही उत्तर दिले by एमी

Permalink

www.thehindu.com/2005/08/13

www.thehindu.com/2005/08/13/stories/2005081307770100.htm www.timesofindia.com/city/allahabad/No-reservation-in-pvt-unaided-self-finance-institutes-says-HC/articleshow/7497375.cms https://www.quora.com/Are-reservations-applied-to-private-education-institutions
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 10/07/2016 - 14:18

In reply to श्रीगुरुजी, तुम्ही उत्तर दिले by एमी

Permalink

३ प्रकारच्या शैक्षणिक संस्था

३ प्रकारच्या शैक्षणिक संस्था असतात. पूर्णपणे सरकारने चालविलेल्या (उदा. सीओईपी), सरकारकडून परवानगी घेऊन सरकारी नियमानुसार शिक्षणसम्राटांनी चालविलेल्या (उदा. भारती विद्यापीठ, सिंहगड इ.) व पूर्णपणे खाजगी (अ‍ॅमिटी विद्यापीठ, ज्ञानेश्वर विद्यापीठ, शारदा विद्यापीठ इ.). यातील पूर्ण खाजगी संस्थांना सरकारमान्यता नाही व सरकारचे कोणतेही नियम लागू नाहीत. त्यामुळे तिथे राखीव जागा नसतात. सिंहगड, भारती इ. संस्थांना व पूर्ण सरकारी असलेल्या संस्थांना शैक्षणिक शुल्क, अभ्यासक्रम, राखीव जागा, मूल्यमापन इ. बाबतीत सर्व सरकारी नियम पाळावे लागतात. अशांना आरक्षण हा ऐच्छिक कंसेंट नसून तसे असणे सक्तीचे आहे. सिंबायोसिस ही पूर्णपणे खाजगी शैक्षणिक संस्था नाही. ही स्वायत्तता असलेली व सरकारने न चालविलेली परंतु सरकारी नियमांनुसार चालविली जाणारी संस्था आहे. वर दिलेल्यांपैकी शारदा, अ‍ॅमिटी इ. पूर्णपणे खाजगी शिक्षणसंस्था आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Fri, 10/07/2016 - 16:35

In reply to ३ प्रकारच्या शैक्षणिक संस्था by श्रीगुरुजी

Permalink

यातील पूर्ण खाजगी संस्थांना

यातील पूर्ण खाजगी संस्थांना सरकारमान्यता नाही व सरकारचे कोणतेही नियम लागू नाहीत. त्यामुळे तिथे राखीव जागा नसतात. >> पहिल्या प्रतिसादात मी हेच करायला सुचवलेलं. 'सर्व मराठा शिक्षणसम्राटांनी एकत्र येऊन 'मराठा विद्यापीठ' स्थापन करावं आणि आपापल्या कॉलेजसाठीच्या अॅडमिशनचे नियम आपणच बनवावेत. मग त्यात १००% जागा केवळ मराठा जातीला असतील किंवा वोट बँक म्हणून सध्या आहे तसे ५०% आरक्षण आणि बाकीचे केवळ मराठा असतील.' तर त्यावर तुम्ही 'सर्व मराठा शिक्षणसम्राटांनी मराठा विद्यापीठ स्थापन केले तरी जास्तीत जास्त २०% जागा मराठ्यांना देता येतील. उर्वरीत ८०% जागा सरकारी नियमांनुसार भराव्या लागतील.' असे म्हणालात. === सिंहगड, भारती इ. संस्थांना व पूर्ण सरकारी असलेल्या संस्थांना शैक्षणिक शुल्क, अभ्यासक्रम, राखीव जागा, मूल्यमापन इ. बाबतीत सर्व सरकारी नियम पाळावे लागतात. अशांना आरक्षण हा ऐच्छिक कंसेंट नसून तसे असणे सक्तीचे आहे. >> आय डोंट थिंक सो. मी दिलेल्या बातम्यातूनतरी तसं वाटत नाहीय. अजून थोडा शोध घेते. === बाकी सिंबी, शारदा वगैरे माहितीसाठी आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Fri, 10/07/2016 - 17:22

In reply to यातील पूर्ण खाजगी संस्थांना by एमी

Permalink

सरकारी विद्यापीठांशी सलग्न

सरकारी विद्यापीठांशी सलग्न मायनॉरीटी कॉलेजमधे आरक्षण नाही हे माहीत असेलच. DTE ब्रोशरमधुन 3.1 Note 1. The reservation for backward class candidates shall not be available in Unaided Minority colleges. म्यानेजमेंट कोटा किती आणि मायनॉरीटी कोटा किती ते पुर्णपणे कॉलेज ठरवणार. राहिलेल्या जागा पुर्णपणे ओपन. त्यातल्या १५% AIEEE आणि बाकीच्या CET. === मी जी TOI ची लिंक दिलीय त्यातली private unaided and self-finance educational institutes म्हणजे काय? Deen Dayal Upadhaya Gorakhpur University हे उत्तरप्रदेशातलं सरकारी विद्यापीठच आहे ना? === मी लिंक दिलेल्या द हिंदुच्या बातमीमधुन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल: * Unaided minority and non-minority institutions have absolute rights to establish, administer and admit students of their choice * These institutions can have their own admission procedures * `No' to capitation fees * 15 per cent quota for NRI students
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 10/07/2016 - 23:54

In reply to सरकारी विद्यापीठांशी सलग्न by एमी

Permalink

म्यानेजमेंट कोटा किती आणि

म्यानेजमेंट कोटा किती आणि मायनॉरीटी कोटा किती ते पुर्णपणे कॉलेज ठरवणार. राहिलेल्या जागा पुर्णपणे ओपन. त्यातल्या १५% AIEEE आणि बाकीच्या CET.
मॅनेजमेंट कोटा हा २०% असेल असे न्यायालयानेच निर्णय दिला आहे. कॉलेज तो कमी करू शकेल, पण वाढवू शकणार नाही. मायनॉरीटी कोटा फक्त अल्पसंख्य संस्था असा दर्जा मिळालेल्या संस्थाच ठरवू शकतात. इतर संस्था (उदा. सिंहगड) आपल्या संस्थेत मायनॉरीटी कोटा ठेवू शकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Mon, 10/10/2016 - 10:51

In reply to म्यानेजमेंट कोटा किती आणि by श्रीगुरुजी

Permalink

सरकारी मान्यता 'नसलेल्या'

सरकारी मान्यता 'नसलेल्या' खाजगी कॉलेज, विद्यापीठबद्दल सहमती झाली आहे. आता सरकारी मान्यता 'असलेल्या' खाजगी कॉलेज, विद्यापीठांबद्दल बोलू. यात दोन प्रकार आहेत: 1. नॉनमायनॉरीटी 2. मायनॉरीटी === 1. नॉनमायनॉरीटी सिंहगड, भारती इ. संस्थांना......हा ऐच्छिक कंसेंट नसून तसे असणे सक्तीचे आहे. >> या तुमच्या प्रतिसादातून तुम्हाला असंच म्हणायचं होतं ना की 'सरकारी मान्यता हवी असेल तर आरक्षण+खुलावर्ग अशा एकूण ८०% जागा सरकारी नियमानेच भराव्या लागतील'? त्यावर मी तुम्हाला a. मी जी TOI ची लिंक दिलीय त्यातली private unaided and self- finance educational institutes म्हणजे काय? b. Deen Dayal Upadhaya Gorakhpur University हे उत्तरप्रदेशातलं सरकारी विद्यापीठच आहे ना? हे दोन प्रश्न विचारले. तसेच द हिंदुच्या बातमीमधुन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पेस्टवला * Unaided minority and non-minority institutions have absolute rights to establish, administer and admit students of their choice * These institutions can have their own admission procedures' ही अजूनेक लिंक पहा http://prayatna.typepad.com/education/2005/08/summary_of_the_.html त्यातले ठळक मुद्दे: Reservation policy: Neither the policy of reservation can be enforced by the State nor any quota or percentage of admissions can be carved out to be appropriated by the State in a minority or non-minority unaided educational institution. Minority institutions are free to admit students of their own choice including students of non-minority community as also members of their own community from other States, both to a limited extent only and not in a manner and to such an extent that their minority educational institution status is lost. So far as appropriation of quota by the State and enforcement of its reservation policy is concerned, we do not see much of difference between non-minority and minority unaided educational institutions. The State cannot insist on private educational institutions which receive no aid from the State to implement State's policy on reservation for granting admission on lesser percentage of marks, i.e. on any criterion except merit . Merely because the resources of the State in providing professional education are limited, private educational institutions, which intend to provide better professional education, cannot be forced by the State to make admissions available on the basis of reservation policy to less meritorious candidate. Unaided institutions, as they are not deriving any aid from State funds, can have their own admissions if fair, transparent, non-exploitative and based on merit. यासगळ्यातून मला हाच अर्थ लागतोय की 'सिंहगड कॉलेज असो की भारती विद्यापीठ; सरकारकडून मान्यता असली, सरकारी विद्यापीठांशी सलग्न असले तरीही ते वॉलंटरी कंसेंटनेच ८०% जागा भरतायत; सक्तीने नाही.' === 2. मायनॉरीटी मी लिहलंय की सरकारी विद्यापीठांशी सलग्न मायनॉरीटी कॉलेजमधे आरक्षण नाही हे माहीत असेलच. DTE ब्रोशरमधुन 3.1 Note 1. The reservation for backward class candidates shall not be available in Unaided Minority colleges. म्यानेजमेंट कोटा किती आणि मायनॉरीटी कोटा किती ते पुर्णपणे कॉलेज ठरवणार. राहिलेल्या जागा पुर्णपणे ओपन. त्यातल्या १५% AIEEE आणि बाकीच्या CET. त्यावर तुम्ही म्हणताय: मॅनेजमेंट कोटा हा २०% असेल असे न्यायालयानेच निर्णय दिला आहे. कॉलेज तो कमी करू शकेल, पण वाढवू शकणार नाही. >> नाह २०% लिमीट नॉनमायनॉरीटीसाठी आहे मायनॉरीटीसाठी असे कोणतेही लिमीट नाही DTE ब्रोशरमधला 2.1 टेबलमधला 5वा रो बघा. टेबलखाली #CAP seats = sanctioned intake - (minority seats + institute level seats)* (*as decided by the r espective minority institute) असे लिहिले आहे. 2.4 टेबलमधला रो 2 आणि 3 कंपेअर करा तिथे नॉनमायनॉरीटीला 20% of the sanctioned intake capacity of each course लिहलंय तर मायनॉरीटीला As decided by the respective minority institute असे आहे. 2.6.1 टेबलमधेदेखील हेच दिसेल.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 10/10/2016 - 15:21

In reply to सरकारी मान्यता 'नसलेल्या' by एमी

Permalink

सरकारी कॉलेजे, विनानुदीत

सरकारी कॉलेजे, विनानुदीत सरकारमान्य खाजगी कॉलेजे, अल्पसंख्याकांनी चालविलेली कॉलेजे व पूर्णतः खाजगी संस्था याविषयी व त्या संस्थात प्रवेश मिळण्याच्या नियमांविषयी अनेक प्रतिसादात सविस्तर लिहिले आहे. आता नवीन लिहिण्यासारखे काहीही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 09/28/2016 - 09:30

Permalink

आजच्या लोकसत्ताला बातमी आलीये

आजच्या लोकसत्ताला बातमी आलीये, मोठ्या साहेबांनी सरकारला तातडीने निर्णय घ्यायला सांगितले आहे म्हणे
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 09/28/2016 - 09:38

In reply to आजच्या लोकसत्ताला बातमी आलीये by टवाळ कार्टा

Permalink

त्यांनी आधीच सांगितलय की परवा

http://scroll.in/latest/817480/maratha-reservation-guaranteed-says-devendra-fadnavis-as-protests-for-quota-continue-in-maharashtra सुप्रीम कोर्टात लढा देणार आहेत म्हणे. http://www.livemint.com/Politics/UTDd7Jmx4l3BotaxqIablM/Devendra-Fadnavis-says-govt-committed-to-providing-reservati.html
  • Log in or register to post comments

Submitted by जिमहेश on Wed, 09/28/2016 - 09:50

Permalink

या सगल्यातुन जतियता वर्धनास

या सगल्यातुन जतियता वर्धनास लागेल. एक सत्यघटना स्थल : एक रहिमतपुर, खासगी क्लास,१०वी वर्गात २० मुली बहुताम्श मराठा व ओबिसि. मराठा मोर्च्यापुर्वी सर्व मिलुन मिसलुन. आता सरल सरल दोन गट. पुर्वीच्या मैत्रीत वितुश्ट. हे प्रतिनिधिक उदाहरन आहे. जनरलायझेशन नाहि. ( ळ : कसा लिहावा ?) ( ळ :हा चोपुपेस्त आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 09/28/2016 - 10:07

In reply to या सगल्यातुन जतियता वर्धनास by जिमहेश

Permalink

येडछाप आहेत ते विद्यार्थी

येडछाप आहेत ते विद्यार्थी ळ = L
  • Log in or register to post comments

Submitted by जिमहेश on Wed, 09/28/2016 - 10:28

In reply to येडछाप आहेत ते विद्यार्थी by टवाळ कार्टा

Permalink

धन्यवाद टका

धन्यवाद टका येडछाप आहेत ते विद्यार्थी : या बाबत सहमत. परन्तु बीज पेरले जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Wed, 09/28/2016 - 10:21

In reply to या सगल्यातुन जतियता वर्धनास by जिमहेश

Permalink

हम्म

हेच व्हायला नको• म्हणून जातीच्या नावावर लोकाना एकत्र आणू नये कोणीच•
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 09/28/2016 - 10:15

Permalink

हे फक्त ज्यांना

वाचायचेच आहे त्यांच्या साठी

लोकसंख्येत मराठा जातसमूहाची बहुसंख्या असल्याने अर्थातच त्यात भूमिहीन कष्टकरी, अल्पभूधारक, असंघटित- असुरक्षित शहरी कामगार, अशिक्षित व अर्धशिक्षित बेरोजगारांची संख्याही मोठी आहे. तथापि आर्थिक दुर्भिक्ष्यात असले तरी त्यांच्यात जातिश्रेष्ठत्वाची भावना त्याहीपेक्षा प्रबळ असल्याने खेडोपाडी दलितांवर अत्याचार करण्यात ते अग्रस्थानी असतात हे दुर्लक्षिता येत नाही. हे तेच लोक आहेत ज्यांना कधीकाळी महानगरातील सुपारीबाज पक्षांनी कामगार- कष्टकऱ्यांच्या चळवळी फोडण्यासाठी ‘सैनिक’ म्हणून वापरून घेतले. हे तेच लोक आहेत जे धर्माध- जमातवादी- भांडवली शक्तींकडून मुसलमानविरोधी दंगलीत रस्त्यावर उतरवले गेले. तसेच हे तेच लोक आहेत जे जातीच्या अस्मितेपोटी आजवर सातत्याने आपल्या मातब्बर जातबांधवांना सत्तेत बसवीत आले. कधी त्यांनी भांडवली पक्षांना आपलेसे मानले; तर कधी त्यांनी धर्माध-जमातवादी शक्तींना सत्तेत नेऊन बसविले. हे दोन्ही पर्याय स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड हाणून घेणारे असूनही ते वर्षांनुवर्षे त्याचीच पुनरावृत्ती करीत आहेत.

संपुर्ण वाचण्यासाठी इथे टिच्का आप्ल्याच जातीबांधवानी केलेल्या शोषणासाठी/हेळ्सांडीसाठी मुक्तपणे दुस्र्याला शिव्या देणे,ज्बाबदार धरणे हे अकलेचे दिवाळे निघाल्याचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by sandeepn on Wed, 09/28/2016 - 12:17

Permalink

हि लिंक बघा

http://www.thehindu.com/news/national/other-states/in-pune-marathas-march-in-silence/article9146945.ece
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 09/28/2016 - 15:19

Permalink

'सामना'त रविवारी छापून

'सामना'त रविवारी छापून आलेल्या एका व्यंगचित्रावर उगाचच आरडाओरडा सुरू आहे. त्या व्यंगचित्रात भावनाबिवना दुखावण्यासारखे काहीही नाही. लोकांनी व्यंगचित्राकडे व्यंगचित्र म्हणूनच बघण्यास शिकायला हवे. हे व्यंगचित्र खालील पानावर बघता येईल. http://www.ibtimes.co.in/shiv-sena-insults-maratha-protests-over-reservations-cartoon-saamana-newspaper-695526
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 09/29/2016 - 14:50

In reply to 'सामना'त रविवारी छापून by श्रीगुरुजी

Permalink

श्रीगुरुजी...

<<<<<<<सामना'त रविवारी छापून आलेल्या एका व्यंगचित्रावर उगाचच आरडाओरडा सुरू आहे. त्या व्यंगचित्रात भावनाबिवना दुखावण्यासारखे काहीही नाही. लोकांनी व्यंगचित्राकडे व्यंगचित्र म्हणूनच बघण्यास शिकायला हवे. हे व्यंगचित्र खालील पानावर बघता येईल.>>>>>> तुमचं मन खूपच खंबीर आहे, सॅल्यूट...!! एम एफ हुसेन यांच्या चित्रांबद्दल पण तुमचे हेच मत असेल. शेवटी कला ही कला असते. ते व्यंग चित्र मला समजला नाही कृपया तुमच्या भाषेत समजावून सांगता का ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 09/29/2016 - 15:22

In reply to श्रीगुरुजी... by विशुमित

Permalink

एम एफ हुसेन यांच्या

एम एफ हुसेन यांच्या चित्रांबद्दल पण तुमचे हेच मत असेल. शेवटी कला ही कला असते.
हुसेनने जी चित्रे काढली होती ती व्यंगचित्रे नव्हती. ती चित्र म्हणजे इतिहासाचे विकृतीकरण होतेच, पण चित्रे म्हणून सुद्धा ती चित्रे अत्यंत हिडीस होती.
ते व्यंग चित्र मला समजला नाही कृपया तुमच्या भाषेत समजावून सांगता का ?
ते व्यंगचित्र म्हणजे "मुका" या अनेकार्थी शब्दाच्या एका अर्थाचा वापर करून काढलेले एक साधारण व्यंगचित्र होते. व्यंगचित्र म्हणून ते फालतू असले तरी त्यात तसे काही आक्षेपार्ह नव्हते.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 09/29/2016 - 15:26

In reply to एम एफ हुसेन यांच्या by श्रीगुरुजी

Permalink

<<<<<<<<<<<ते व्यंगचित्र

<<<<<<<<<<<ते व्यंगचित्र म्हणजे "मुका" या अनेकार्थी शब्दाच्या एका अर्थाचा वापर करून काढलेले एक साधारण व्यंगचित्र होते. >>>>>>> --तुम्हाला काय अर्थ लागला कृपया तो थोडा विस्कटून सांगाल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 09/29/2016 - 15:27

In reply to <<<<<<<<<<<ते व्यंगचित्र by विशुमित

Permalink

"मुका" या शब्दाचे किती अर्थ

"मुका" या शब्दाचे किती अर्थ तुम्हाला माहिती आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 09/29/2016 - 15:42

In reply to "मुका" या शब्दाचे किती अर्थ by श्रीगुरुजी

Permalink

माझ्या अल्पशा माहिती प्रमाणे

माझ्या अल्पशा माहिती प्रमाणे वृत्तपत्रातील व्यंगचित्रे सहसा एखाद्या घटनेचा आधार घेऊन विडंबनात्मक रेखाटली जातात. "काही अति उत्साही मोर्चेकऱ्यांनी याचा अर्थ भलताच घेतलेला दिसतो" असा हा मजकूर आहे... कोणत्या मोर्चा मध्ये असे करण्यात आले होते जे त्या महा मूर्ख कलाकाराच्या सुपीक मेंदू मध्ये असली कल्पना आली? फक्त व्यंगचित्र फालतू म्हणून तुम्ही पळवाट शोधून निसटायचं पाहत आहात. असे करून तुम्ही एक प्रकारे त्याच निर्लज समर्थन च करत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 09/29/2016 - 15:45

In reply to माझ्या अल्पशा माहिती प्रमाणे by विशुमित

Permalink

<<<<<<<<<"मुका" या शब्दाचे

<<<<<<<<<"मुका" या शब्दाचे किती अर्थ तुम्हाला माहिती आहेत?>>>>>>> --दोन.... 1) मुका ज्याला बोलता येत नाही 2) मुका चुंबन
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com