Skip to main content

मराठा मोर्चा भाग 2

लेखक वाल्मिक यांनी सोमवार, 26/09/2016 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
मागील धागा मूळ उद्देशातून भटकला म्हणून परत काही प्रश्न 1) खरंच सध्याचा मोर्चा उत्स्फूर्त आहे का ? कोणत्याही नेतृत्वाशिवाय एवढे लोक जमणे शक्य आहे का ? 2) अदृश्य हात असेल तर कोणाचा ? 3) झेंडे ,फलके ह्यावर कोणी खर्च केला ? 4) जर नेतृत्व नाहीये तर अमुक तमुक ठिकाणी भेटायचे हे कसे ठरले ? 5) कसाब ला फाशी नेमक्याच वेळी झाली तसे उरण मध्ये ह्याचवेळी अतिरेकी आले हे शक्यता असू शकत का ? मुख्य 6) अमेरिकेचे प्रगती आरक्षण नसल्यामुळे झाली का ? जगात किती देशांमध्ये आरक्षण आहे ? https://goo.gl/YXEbrt

वाचने 100562
प्रतिक्रिया 363

प्रतिक्रिया

In reply to by भीडस्त

बाकी आम्हाला जे हवं ते योग्य मार्गांनी, स्वकष्टाने मिळवण्याची शिकवण आहे, त्यानुसार मिळवत आहोत, पुढेही मिळवू, कुठलेही आरक्षण आणि मोर्चांशिवाय, धन्यवाद.

मराठा समाजामध्ये सध्या दोन मुद्दे चर्चेत आहेत, पण स्पष्टपणे पुढे आलेले नाहीत. आरक्षण १. तामिळनाडूमध्ये १९९३ पासून एकूण ६९ % आरक्षण आहे. एकूण लोकसंख्येच्या ८७ % इतके पिछडे (६८ % मागासवर्गीय, १८ % अनुसूचित जाती आणि १ % अनुसूचित जमाती), असल्याचा आणि त्यासाठी जास्त आरक्षण गरजेचे असल्याचा तामिळनाडू सरकारचा युक्तिवाद सर्वोच्च न्यालयाने २०१३ मध्ये मान्य केलेला आहे आणि त्याचा घटनेत समावेशही झाला आहे. महाराष्ट्रातही मराठ्यांना १३ % आणि मुस्लिमांना ४ % आरक्षण असू शकते (एकूण ६९ %). पण सरकार योग्य वकील नेमून परिणामकारक युक्तिवाद करत नाही असा आंदोलकांचा समज (आरोप) आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ऍट्रॉसिटी कायदा, २. नवीन (२०१६) ऍट्रॉसिटी कायद्यानुसार लागू असलेल्या नुकसानभरपाई मुळे खोट्या केसेस वाढतायत. नवीन अनुसूचीत जाती आणि जनजाती अत्याचार प्रतिबंध कायदा संशोधन २०१६ नुसार या कायद्याअंतर्गत तक्रार करणाऱ्या प्रत्येक पीडित व्यक्तीला सरकारने नुकसानभरपाई (Relief Amount) द्यायची आहे. उदाहरणार्थ बलात्काराची तक्रार करणाऱ्या दलित स्त्रीला एकूण रु पाच लाख (गॅंग रेप मध्ये रु ८,५०,०००) एवढी रक्कम सरकारने द्यायची आहे. त्यापैकी १० टक्के रक्कम (रु. ७५,०००) तात्काळ द्यायची आहे. ५० टक्के म्हणजे रु २,५०,००० रक्कम वैद्यकीय तपासणी नंतर लगेच द्यायची आहे. आणि उर्वरित ४० टक्के नुकसानभरपाई गुन्हा सिद्ध झाल्यास लगेच द्यायची आहे. या कायद्या अंतर्गत इतर वर्णविद्वेषाच्या गुन्ह्यातही रु. ८५,००० पासून पुढे नुकसान भरपाई पीडित व्यक्तीला देण्याची तरतूद करण्यात आली आहे. FIR नोंदवणे टाळल्यास किंवा उशीर केल्यास पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा, ६० दिवसात तपास पूर्ण करून दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल करणे अनिवार्य, हे बदल आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे असे म्हणणे आहे की अनुसूचित जातीं सध्या याचा वापर करून पैसे उकळणे हे करतायत. काहीही झाले की लगेच ऍट्रॉसिटीची केस टाकतो असे धमकावले जाते आणि सरकार एवढे पैसे देते तर तुम्ही किती देणार असे चालले आहे, याचेपण एजंट टाईप लोक गावोगाव तयार होतायत. यामुळे कायद्यात बदल करावा ही मराठा समाजाची मागणी आहे. पण दलित मतांच्या धास्तीने कोणताही राजकीय पक्ष पुढे येऊन स्पष्ट भूमिका घेऊ शकत नाही त्यामुळे मराठा समाजाचे राजकीय नेतृत्व नसलेले मोर्चे निघतायत. (वरील विचार आणि मते माझी नसून मराठा समाजातील मोर्चे काढणाऱ्यांची आहेत. मी फक्त आपल्या समोर मांडतोय) टीप: - भारतीय दंड संहितेतील (IPC) रेप च्या नवीन व्याख्येनुसार प्रत्यक्ष क्रिया होण्याचीच गरज नसून स्त्रीच्या लैंगिक अवयवांना पुरुषाच्या लैंगिक अवयवांचा (तोंडाचा, बोटाचा ही) स्पर्श झाला तरी गुन्हा घडला असे आहे.

In reply to by संदीप ताम्हनकर

टीप: - भारतीय दंड संहितेतील (IPC) रेप च्या नवीन व्याख्येनुसार प्रत्यक्ष क्रिया होण्याचीच गरज नसून स्त्रीच्या लैंगिक अवयवांना पुरुषाच्या लैंगिक अवयवांचा (तोंडाचा, बोटाचा ही) स्पर्श झाला तरी गुन्हा घडला असे आहे. ^^^ ह्याबद्दल काही तक्रार आहे काय? मला तर योग्यच वाटत आहे.

हा घ्या पहिला साद्यंत अहवाल मोर्चातील उपस्थितीचा दुसरा आला की यथावकाश पाठवला जाईलच तुमची लावा तुम्ही मती आणि करा गणती हा हन्त!'मिसळपाव'वरची प्रजा 'नेणती' मोर्चा

In reply to by आदूबाळ

आमच्या पंढरपुरी मित्राची प्रतिक्रीया. "आषाढीत ६-७ लाखात बडव्यांच्या घरासहित आख्खे गांव पॅक होतय" अर्थात पंढरी आणि पुण्यात फरक आहेच म्हणा.

In reply to by अभ्या..

अर्थात पंढरी आणि पुण्यात फरक आहेच म्हणा
पुण्यपत्तनाची महती आपणास इष्टसमयी उमगली हे मात्र बरें झांले काढा पंढरपुरी आन मळा पघु येक येक ईडा आपल्या दोघान्ना

In reply to by आदूबाळ

असू शकेल पण ती रस्त्यावर आलेल्या गर्दीची. राहिलेली गर्दी घरात बसूनच मोर्चात सहभागी झालेली असू शकते ना आबासाहेब .. हे तुम्ही एव्हाना ध्यानात घ्यायला हवे होतेत .

In reply to by sagarpdy

वीस हजार कि मी वरनं आकाशातून ज्याला घराबाहेरलं मोजता येतं त्याला घराआतलं मोजता यायला कायच अडचण येऊच शकत नाही बरंका सागरराव

In reply to by भीडस्त

बरोब्बर. आणि घरातली किती मंडळी सपोर्ट मध्ये आहेत ते पण वीस हजार फुटांवरून ओळखता येतेच. आपली न्यायालयच नार्को टेस्ट वगैरे फालतू प्रकार करतात. मी म्हणतो इसरो ने नासा बरोबर भागीदारी करावी, महिनाभरात भारत भ्रष्टाचारमुक्त करू.

In reply to by sagarpdy

भागीदारीचा लयिच वंगाळ आण्भव ह्ये..... सगळं नुसतं भागीले होत रहातं आपण आपली 'गोबेल्सा' टाईप नावाची नवीनच संस्था काढलेली जास्त श्रेयस्कर

In reply to by भीडस्त

  • वा, नासा ने मराठीत अहवाल काढला हे पाहून कौतुक वाटले. मराठी माणूस म्हणून उर भरून आला.
  • दुसरी अभिमानास्पद बाब अशी कि 40 मी रुंद रस्ते (अथवा रस्त्यालगत मोकळी जागा) आता पुण्यात आहेत. या मार्गदर्शिकेप्रमाणे चौपदरी रस्ता बनवून शहरातील वाहतूककोंडी लवकरच संपुष्टात येऊ शकेल - बजेट पाहिजे फक्त.
तर तुमच्या 1 चौ.मीटर म्हंणजे 10 चौ. फुटात जास्तीत जास्त 4 लोक राहतात. बस-रेल्वे साठी आरक्षण हवेच. एकूण संख्या किती म्हणीलये ती ?

In reply to by भीडस्त

अमेरिकवासी मिपाकरांना कळकळीची विनंती आहे की, पुढच्या वेळी भारतात परत येताना नासाच्या दुकानातून लांबी मोजायची एक टेप माझ्यासाठी आणि दुसरी गुगल साठी घेऊन या. खर्च आधीच सांगा. पावती पुस्तक छापून घेतोय.

In reply to by भीडस्त

आता तुम्ही पण आकडे लावायला लागलात? एक कळलं नाही. मोर्चा म्हणजे कुठेतरी सुरू होतो आणि कुठेतरी संपतो. म्हणजे लोक चालत जातात. हे तुम्ही वर दिलेय तो एरिया प्रचंड मोठा आहे. म्हणजे या सगळ्या एरियातले रस्ते भरून माणसे फक्त उभी होती का? न चालता? मग बाकी पुणेरी ट्रॅफिकचे काय झाले?

In reply to by अनुप ढेरे

माझा मित्र गेला होता मोर्च्याला दुपारी १२ नंतर जे जिथे आहेत तिथेच थांबावे लाग्ले कारण पुढे जाण्य्साठी जागा नव्हती असे म्हणाला. शिवाय पुण्याच्या सर्व बाजूने पण विधानभवनाकडे जाणारे रस्ते व्यापले होते.मूळ नियोजनानुसार फक्त लक्ष्मी रस्त्यावरून निघणारा मोर्चा पर्यायी मार्गावरूनही काढावा लागला असेही त्याने सांगीतले. मोर्च्याच्या विशालतेबद्दल अजिबात दुमत नाही माझे फक्त नासाने इतकी अचूक आकडेवारी कशी मोजली त्याचे कुतूहल आहे,तसेही माझे गणित आणि भूमीती फारसे चांगले नाही म्हणून विचारले. कारण कुठल्याही वर्तमानपत्राने इतका मोठा आकडा दिलेला नाही,शिवाय रस्त्यांची क्षमता (भले वाहतूक बंद ठेवली तरी) इतका समुदाय सामावून घेण्याची क्षमता आहे का याचाही विचार केला गेला पाहिजे. बाकी मोर्चा शांततेत काढल्याबद्दल आणि स्त्रियांच्या लक्षणीय सहभागाबद्दल कौतुकास नक्कीच पात्र आहे.(फक्त दोन दिवसांनी धमकीवजा पत्रक काढण्याचे कारण नव्हते) नेमस्त नाखु

In reply to by पैसा

म्हणजे या सगळ्या एरियातले रस्ते भरून माणसे फक्त उभी होती का? -- होय न चालता? -- सुरुवात झाल्यावर मोर्चा पुढे सरकत होता. लोक येत गेले तसतसा तो stagnate होत गेला ... मग बाकी पुणेरी ट्रॅफिकचे काय झाले?--- महत्त्वाच्या रस्त्यांवरची वाहतूक वळविण्यात आली होती कुतूहल दाखवल्याबद्दल धन्यवाद

In reply to by भीडस्त

हा घ्या पहिला साद्यंत अहवाल मोर्चातील उपस्थितीचा दुसरा आला की यथावकाश पाठवला जाईलच तुमची लावा तुम्ही मती आणि करा गणती हा हन्त!'मिसळपाव'वरची प्रजा 'नेणती'
कितीही कोटींची उपस्थिती असलेले कितीही मोर्चे कितीही वेळा निघाले तरी प्रचलित कायद्यांनुसार मराठा जातीला राखीव जागा मिळणे आणि दलित अत्याचारविरोधी कायदा रद्द होणे किंवा त्यात दुरूस्ती होणे अशक्य आहे. या गोष्टी हव्या असतील तर संसदेत यासंबंधी प्रचलित असलेल्या कायद्यांमध्ये घटनादुरूस्ती व्हायला हवी. लोकसभा व राज्यसभा मिळून महाराष्ट्राचे किमान ६० खासदार संसदेत आहेत. त्यापैकी किमान ३० खासदार मराठा जातीचे असावेत. त्या ३० खासदारांपैकी कोणीही वरील कायद्यात दुरूस्ती करणारे विधेयक संसदेत मांडून ते मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा मोर्चे काढून हातात काहीही येणार नाही. फडणविसांनी दडपणाखाली येऊन मराठ्यांना राखीव जागा द्यायचा कायदा महाराष्ट्रात केला तरी तो प्रचलित घटनेविरूद्ध असल्याने न्यायालय लगेच त्याला स्थगिती देईल.

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी मग मोर्चे काढायचेच नाही का??? आणि मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा तर स्वतः म्हणतात की मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. तुमच्या मते ते असेच मोघम बोलत असतील नाही? जाऊ द्या फक्त 2-3 मोर्चे राहिलेत नंतर होईल शांत सगळं, अगदी तुमच्या मनासारखा.....

In reply to by विशुमित

मोर्चे काढायला कोण नाही म्हणतंय? मोर्चे काढून काहीही उपयोग नाही असं मी म्हणतोय. एखाद्या जातीने केलेल्या विशिष्ट मागण्यांना कोणीही तोंडावर विरोध करू शकत नाही. तसे करणे राजकीयदॄष्ट्या चुकीचे असते. मराठ्यांना राखीव जागा मिळणे अशक्य आहे हे सर्व पक्षांना व नेत्यांना माहिती आहे. परंतु मतपेटी गमावण्याच्या भीतिने तसे कोणीही उघड सांगू शकत नाही. माजी न्यायाधीश प. बा. सावंत यांची २ दिवसांपूर्वी मुलाखत पाहिली. सध्याच्या कायदे व घटनेनुसार मराठ्यांना राखीव जागा मिळणे अशक्य आहे असे त्यांनी सांगितले. अजून एका वेगळ्या कार्यक्रमात, "आरक्षणाचा पोपट मेलेला आहे, परंतु तसे सांगण्याचे धैर्य कोणाकडेच नाही", असे अजून एकाने सांगितले. मोर्चात सहभागी होणार्‍यांना वस्तुस्थितीची जाणीव करून ने देता आरक्षणाचे गाजर दाखवून भुलविले जात आहे व त्यांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या जात आहेत. राखीव जागा मिळणे शक्य नाही हे मराठा जातीतील कोळसे पाटील, उज्ज्वल निकम, हर्षद निंबाळकर, सतीश मानेशिंदे इ. मराठा कायदेतज्ज्ञांनी व जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण इ. मवाळ मराठा नेत्यांनी मोर्चेकर्‍यांना समजावून सांगितले पाहिजे. परंत ते सर्वजण गप्प आहेत. आरक्षण मिळणार नाही हा जेव्हा न्यायालयातून पुन्हा एकदा निर्णय होईल तेव्हा आत्यंतिक निराशेतून याच लोकभावनेचा उद्रेक होऊन अशांतता निर्माण होण्याची भीति वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

काल ची माहिती अशी की महाराष्ट्रातील सत्ता पैसा १५९ मराठा कुटुम्बाच्या हातात एकवटली आहे मराठा समाज खरोखरच गरीब आहे एरवी. पण भारतातील आरक्षणाचे मूळ सामाजिक मागासलेपणात आहे आर्थिक मागासलेपणात नाही. मराठा ही सामाजिक मागासलेले आहेत हे मुख्य्मंत्र्यांची संख्या आमदारांची संख्या खासदारांची संख्या यापासून शिवाजी राजांपर्यत मागे गेले तरी सामाजिक मागासलेपण सिद्ध करणे कठीण आहे.

P1 पुण्याच्या रस्त्यांची रुंदी बघण्यासाठी आम्ही गूगल नकाशा पहिला आणि दिसले कि विधान भावनांचा रास्ता तर 20 च मीटर्स चा आहे 40 मीटर चे रस्ते दिसलेच नाहीत ! आजपासून मराठा गूगल वापरणार नाही !! आणि नासा ने हि लिंक काढून टाकली .. आज नासा त ले सर्व मराठे राजीनामा देणार - अमेरिकेचे गुरु ग्रहावर जाण्याचे स्वप्न भंग !! लिंक - http://i1304.photobucket.com/albums/s530/hemantwaghe/Pune%20Map%201_zps…

मागच्या 'मोर्च्यात' माहिती मिळाली की अनेक कार्यकर्ते ३ ते ४ ठिकाणी सहभागी झाले होते, काही तर सर्व आणि यात भाडोत्री कार्यकर्तेही भेट्ले (प्रवास+जेवण्+ १००रु) त्यामुळे सर्व मोर्च्यामधे सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांची एकूण संख्या हि मराठा समाज्याच्या लोकसंख्ये पेक्षा (कितीतरी) जास्त असणार कदाचीत.... आणि हे मोजतोय कोण ??.. कार्यकर्तेच की कोंबड्या झुंजवणारे मिडीयावाले. पार्कींगबघा या मोर्च्यांचे (विषेशतः एखाद्या हॉटेल शेजारी कारण हे लोक चांगल्या हॉटेल मधे "स्वखर्चाने" राहतात) बुलेट, आय २०, स्कॉरपीओ, सुमो, सफारी, एसयुव्ही, मर्क आणि बि.एम.ड्ब्लु ही. याचा पैसा कोठुन आला....चोराच्या उलट्या .......

In reply to by आर्य

पार्कींगबघा या मोर्च्यांचे (विषेशतः एखाद्या हॉटेल शेजारी कारण हे लोक चांगल्या हॉटेल मधे "स्वखर्चाने" राहतात) बुलेट, आय २०, स्कॉरपीओ, सुमो, सफारी, एसयुव्ही, मर्क आणि बि.एम.ड्ब्लु ही. याचा पैसा कोठुन आला>>>> ---तुमचा प्रॉब्लेम मोर्चा बद्दल आहे का त्यांच्या गाड्यांबद्दल? तुमचे डोळे खूपच संकुचित भाग पाहतात राव! चोराच्या उलट्या >>>> - हे तुम्ही कसे ठरवले? सगळ्या गाड्या चोरीच्या होत्या? आणि सभ्य संकेत स्थळावरती आला आहात कृपया थोडा सभ्यपणा दाखवा. डोक्यावरचा बर्फ वितळून द्यायचा नाही त्यामुळे तूर्तास तुम्हाला इग्नोर...!!

मोर्च्यात कीती लोक सहभागी झाले,कीती जण फक्त घरातून सहभागी झाले हे मोजण्यासाठी नासा उद्या नवीन सॅटेलाईट सोडणार आहे!!!!! "एक मराठा लाख मराठा "असे स्टीकरही शॅटेलाईट लावल्याने कोणतिच शमस्या येणार नाय ,असे नासाचे अध्यक्ष "हंबीराराव तात्यासाहेब ठाले पाटील " यांनी सांगुणच ठेवले आहे.

आन्ना(आमचें ड्याडी ) आनी दादा(मोठे चुलते) ड्याडी शेरात नौकरी,आर्थ शास्त्र शिकवत्यात आनी दादा गावाकडं आस्तेत,शेती करातेत गावात क्रान्ती मोर्च्या होता आम्ही दाहा बारा जन रेडी झालो....गाड्या बिड्या काल्ढ्या आमची गरीबाची हिरो होंडा...पन एक सान्गतो गड्या,बुलेट ती बुलेट राव.. सगळ्या गाड्यांची रानी सहज दादा ला फोन लावला,मोर्च्याला येता का म्हनुन.... अंगावर वास्सकन वराडले ना भाऊ.... xxx,हित पाऊस झालाय श्येती चे काम बघु का तुझ्या मोर्च्यात बोंबलत फिरू? मग आम्हीच मोर्च्यात गेल्तो,मन शांत झालं राव. कूट तोडफोड नाई कूट बोंबाबोब नाई आन्ना च्या कृपेनं सुखी आहे पन दादा च्ये पोरं....आजून धस्कटं वेचालेत

आमच्या घराचं फाटक ऐन पौड रस्त्यावर. रैवारी सकाळी बाहेर खुर्ची टाकून बसलो तर रस्त्यावर हे भगवे लावलेल्या बड्या बड्या ४ चाक्या आणि दुचक्या. ४ चाक्यांच्या काळ्या काचेतून आतल्या साहेब-भाऊ-नाना-तात्या-दादांचं काय दर्शन घडलं नाही. पण दुचाक्यांवरचं एक समान दृष्यं असंं की बहुतेक दुचाक्यांवर तिघे दुचाकीवीर स्वार (गंध वाले सफेद बगळे). पोलिसांनी काय मोर्चासेवकांसाठी विषेश सवलती दिलेल्या काय? पोलिस नावाची यंत्रणा अस्तित्वात नाहीच्चे अशा अविर्भावात ही मंडळी दिसत होती. असो. बाकीच्या शहरात मोर्चा फार्फार शिस्तीचा झाला असं ऐकलेलं त्याची झलक मिळाली.

नासा घराच्या आतले बघू शकते? चायला प्रायवसी नावाची काही गोष्ट अस्ते की नाही...बाकी पुण्यात ४० मीटर आणि १२० मीटर "रुंद" रस्ते आहेत हे वाचून पुण्यातल्या लोकांची लांबी रुंदीची एककेसुद्दा जगावेगळी असतील असे वाटले

मुक मोर्चाने सामील लोकांना काही मिळालं नाही मिळालं ती गोष्ट वेगळी पण ह्या मोर्चापायी जिवाभावाची काही मंडळी विनाकारण दुरावली. नाशिक मोर्चाच्या एक दिवस आधी एका मराठा पदाधिकार्‍याने वंजारा समाज्याच्या मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचाराबद्द्ल जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार्या पाच मुलींनाही काही बोलावसं वाटलं नसेल????????

नारायण राणे यानी आज " राजकीय हाराकिरी होईल म्हणून उद्धवने माफी मागितली " अशा अर्थाचे विधान केले आहे. या मोर्चाचे नेत्रूत्व कोणाकडे आहे याचा प्रश्न पडण्याचे आता कारणच नाही. हा सामाजिक मोर्चा असता तर राजकीय सोय वा गैर सोय हे पहाण्याचे कोणाच राजकीय नेत्याला कारणच नव्हते. आज साहेबांचा राणे ना फोन जाईल " राणे कशाला उगीच थु़ंकलात...आपले सर्वांचे ठरले होते ना हा सामाजिक मोर्चाच वाटला पाहिजे म्हणून ?"

In reply to by चौकटराजा

मराठा सोडून सगळ्याना खरी कारणे समजली आहेत ६० वर्षे सत्ता उपभोगलेल्यान्ची तडफड आहे ही मात्र हा समाज ज्या पद्धतीने वर्षानुवर्ष वापरला जातोय ते पाहता याना मदतीची गरज नक्कीच आहे पण ज्या पद्धतीने सुशिक्षीत तरूण वर्ग या मोर्चात सामिल झाला व मी मराठा इइ जाहिरपणे मिरवले गेले ते पाहता शिक्शणाने काय फरक पडणार असेच वाटते. अर्थात सर्व जाती धर्मात असे लोक आहेतच. फक्त या वेळी ज्या पद्धतीने उघड उघड जात मिरवली गेली आपला समाज पुन्हा १०० वर्ष मागे गेला. मोर्चा समर्थक म्हणतील आन्दोलन जाट आणि पटेल आन्दोलनासारखे हिन्सक नाही झाले तल खरच हे महाराष्ट्राचे भाग्यच. काल रात्री एक लोणारी लाख लोणारी असा फलक व गुलाबी झेन्डा लावलेल्या दोन गाड्या पाहिल्या. लोणारी अशी जात असते हे कळले. अशी जातीन्ची परन्परा जपावी हेच खरे

In reply to by सुखीमाणूस

जाट आंदोलन आणि पटेल आंदोलन देखील शांतीतच सुरू झालेलं. डायरेक जाळपोळ नाही सुरू केली त्यांनीपण.

In reply to by अनुप ढेरे

लोणारी जात ओबीसी मध्ये मोडते. लोणारी जातीचा पूर्वी चुना आणि रंग विकायचं व्यवसाय होता. असा म्हंटलं जातं शिवाजी महाराजांनी बांधलेल्या बहुतांशी किल्याना लोणारी समाजाने चुना पुरवला आहे. जी आताची पुण्याची रविवार पेठ आहे, तिथे पूर्वी सर्व लोणारी समाज चुना आणि रंग विकायचा व्यवसाय करायचे. कालांतराने चुन्याच्या भट्या शहरातून बाहेर काढण्यात आल्या आणि त्यांच्या व्यवसायाला खूप मोठा धक्का बसला. या अडचणीत असतानाच, त्यांनी लक्ष्मी रोड आणि रविवार पेठेतील जागा जैन मारवाड्यानं विकल्या. मान, सांगोला, म्हसवड, आटपाडी, येवला, मिरज, इंदापूर, बारामतीतील तालुक्यातील काही गावं च्या गावं लोणारी समाजाचे आहेत. त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत ते मला आता ज्ञात नाहीत. माहिती मिळवून टंकतो...

कुणबी लोकांना आरक्षण ऑलरेडी आहे. आणि मराठा लोकांना कुणबी असल्याचं सर्टिफिकेट सहज मिळवता येतं. (बहुधा नावावर फक्त जमीन असावी लागते. कितीही आकाराची.) सो मराठा जातीला आरक्षण आत्ताही आहे. पण स्वत:ला उघड मागास म्हणवून घेता येत नाही.

मराठा जातीसंबंधी काही प्रश्न आहेत. जाणकारांनी ज्ञान द्यावे. १) ९६ कुळी मराठे म्हणजे नक्की कोणते मराठे? ९६ कुळी मराठ्यांमध्ये कोणत्या आडनावाचे मराठे असतात? ९६ कुळी मराठे इतर मराट्यांपेक्षा स्वतःला उच्च समजतात का? ९६ हा आकडा कोठून आला? २) ब्राह्मणांमध्ये देशस्थ, चित्पावन, कर्‍हाडे इ. प्रकार आहेत. माळी जातीतही १५-१६ उपजाती आहेत असे वाचले होते. मराठ्यांमध्ये असे प्रकार आहेत का व असल्यास कोणते? ३) मराठ्यामधील शिसोदे, मोरे, चव्हाण इ. आडनावे मूळ सिसोदिया, मौर्य, चौहान इ. राजपूत आडनावांचा अपभ्रंश आहे असे म्हणतात हे खरे आहे का? माझ्या ओळखीचा पाटील नावाचा एक जण आपण मूळचे राजस्थानी आहोत असे सांगायचा. मराठ्यांमधील काही जण मूळचे राजस्थानातील राजपूत होते का? त्यामुळेच ते स्वतःला क्षत्रिय मानतात का? ४) कुणबी मराठा ही वेगळी जात आहे का? कुणबी व मराठ्यांचा आपापसात काय संबंध आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पहिल्या तीनची उत्तरे देण्यास असमर्थ आहे (अज्ञान दुसरे काय/) कुणबी ही कगदोपत्री (निवडणुकीसाठी आरक्षीत जागेवर घुसखोरी करण्यासाठी राजकीय सोय आहे)

कागदोपत्री कुणबी बेटी-लग्न-समारंभात फक्त आणि फक्त ९६ कुळी मराठ्ठा असा आहे.

आणि हे जवळून पाहिले आहे. ता.क.(मोर्चा बाहेर ही मराठा समाज आहे आणि तो माझ्या मित्रपरिवारात आहे)

Prabhu - बुधवार, 5 ऑक्टोबर 2016 - 04:37 PM IST तुम्ही रस्त्याने जात आहात आणि तुमच्या एकंदरीत दिसण्यावरून तुम्ही गरीब आहात असे समजून जर कोणी तुम्हाला पैसे देऊ केलेत तर तुम्ही काय कराल 1. आनंदाने पैसे घेऊन रस्त्याच्या कडेला बसून भीक मागणे सुरु कराल ? 2. पैसे नाकारून, आपलं काय चुकतंय ते नीट तपासून स्वतःला नीटनेटकं कराल? पहिला मार्ग निवडणे म्हणजे आपण आहोत तसेच राहून त्याचेच भांडवल करून ढोल वाजवणे. दुसरा मार्ग म्हणजे स्वतःच्या चुका सुधारून, आळशीपणा झुगारून स्वतःला परिस्थितीच्या वर उचलणे कुठल्याही जाती धर्मासाठी असो, आरक्षण 'घेणे' अथवा 'मागणे' हे लांच्छन आहे, जन्मसिद्ध अधिकार नव्हे. ते म्हणजे वर दिलेल्याप्रमाणे पहिला मार्ग निवडणे आहे. परिस्थिती सर्वांसाठीच व्यक्तिशः वर खाली बदलतच असते. त्यावर मात करून परिश्रमाने सभोवतालच्या परिस्थितीतून आणि एकंदरीत समाजातून वर आलेली उदाहरणे सर्वच जाती धर्मातून पाहायला मिळतात. त्यांच्या कडून स्फूर्ती न घेता, ज्याला काहीही न करता आयतं हवं असतं तोच आरक्षणाची भीक मागतो.

In reply to by नावातकायआहे

मस्त! आर्थिक बाबीवर आरक्षण हा मुद्दाच भोंगळ आहे! तसे असेल तर वैद्यकीय सेवांपासून अनेक गोष्टीत आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना खूप सहन करायला लागतं, सरकारी इस्पितळात जातीचा दाखला मागून उपचार केले जात नाहीत हे लक्षात घ्यावे!

अवांतर : श्रीगुरुजी,
४) कुणबी मराठा ही वेगळी जात आहे का? कुणबी व मराठ्यांचा आपापसात काय संबंध आहे.
या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. पण कुणप म्हणजे प्रेत असा नवनाथ भाक्तिसारात उल्लेख आहे. कुणबी हा शब्द कुणपी तर नसेल? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नै हो, भलते अर्थ लावू नकासा, कुणबी चा अर्थ कूळ ह्याच्याशी संबंधित आहे, ज्यादा माहिती ब्याटोबा देऊ शकतील..

In reply to by गामा पैलवान

नै हो, भलते अर्थ लावू नकासा, कुणबी चा अर्थ कूळ ह्याच्याशी संबंधित आहे, जमीन कसणारे असाही आहे, अतिशय वाह्यात अर्थही ऐकलाय, पण प्रेत हा अर्थ नाही, ज्यादा माहिती ब्याटोबा देऊ शकतील..

मराठा स्वतः ला जर मागासलेले समजून आरक्षण मागत असतील, तर ते खरोखरच मागासलेले आहेत का? नेदरलॅंड्स मध्ये 'विश्वविजयी मराठा' नावाचा मोर्चा निघाला. आधी एक ठरावा की तुम्ही मागासलेले आहात की विश्व विजयी? बार बाकीच्या जाती या न्यूज ला डिसलाईक का करतायत हे ही विचारतायत. बाकीच्या जातींनी काय नाचायचं काय, तुम्ही एक झाला म्हणून? खालील प्रतिक्रिया तरी पहा किती माजोरड्या आहेत ते. आता बसा, देतायत बाकीच्या जाती तुम्हाला नोकरीच्या संधी. एक वेळ नॉर्थ इंडियन चालतील पण हे नको असं म्हणायची पाळी आणणार हे लोक. खुळ्याची चावडी आहे सगळी. स्वतः: च्या पायावर धोंडा पाडून घेणार मराठे. आरक्षण तर कोर्ट मंजूर करणारच नाही आणि बाकीच्या जाती मध्ये पण स्वतः: विषयी अविश्वास बनवून ठेवला. ok

In reply to by पिनाक

मग north Indian परवडले. आणि हैदराबाद पण मस्त आहे lots of job opportunities and cosmopolitian environment. पुण्यापेक्शा मागासलेले वाटते पण आता महाराष्ट्र जाती मिरवणारा मागास झालाय किवा चेहरा नसलेले मुम्बइ बेस्ट.

लै म्हणजे लैच हसु येवु रायलेना नेदरलँड मधला मुक मोर्चा बघुन.

लोकहो, मराठा मोर्चे निघाले ते आरक्षणासाठी हे कोणी आणि केंव्हा सांगितलं? मुख्यमंत्री म्हणाले की मराठ्यांना आरक्षण देणार, पण आरक्षण ही मागणी आहेच कुठे मुळातून? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा. आ.न., -गा.पै.