Skip to main content

मराठा मोर्चा भाग 2

लेखक वाल्मिक यांनी सोमवार, 26/09/2016 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
मागील धागा मूळ उद्देशातून भटकला म्हणून परत काही प्रश्न 1) खरंच सध्याचा मोर्चा उत्स्फूर्त आहे का ? कोणत्याही नेतृत्वाशिवाय एवढे लोक जमणे शक्य आहे का ? 2) अदृश्य हात असेल तर कोणाचा ? 3) झेंडे ,फलके ह्यावर कोणी खर्च केला ? 4) जर नेतृत्व नाहीये तर अमुक तमुक ठिकाणी भेटायचे हे कसे ठरले ? 5) कसाब ला फाशी नेमक्याच वेळी झाली तसे उरण मध्ये ह्याचवेळी अतिरेकी आले हे शक्यता असू शकत का ? मुख्य 6) अमेरिकेचे प्रगती आरक्षण नसल्यामुळे झाली का ? जगात किती देशांमध्ये आरक्षण आहे ? https://goo.gl/YXEbrt

वाचने 100562
प्रतिक्रिया 363

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

मूळ मोर्चा अरक्षणासाठीच निघणार होता, कोपरडी घडले नसते तरी, बस और क्या बोलू? ;)

In reply to by संदीप डांगे

मत (आणि हो ते किंवा त्याचे पोसलेले मराठा म्हासंघ्/बिग्रेड्/छावा या मोर्च्यात बिल्कुल नाहीत बरे) अता त्यांनी सांगीतले ना कशासाठी मोर्चे निघालेत ते,मग सगळ्यांनी फक्त हो हो म्हणायचे . दांडगा अनुभव आहे त्यांना महाराष्ट्राला जातीत-पातीत जखडून ठेवण्याचा. इतका दानशूर्/कर्मवीर्/जाणता राजा खोटं का म्हणून बोलेल. दोन धाग्यांच्या काथ्याकुटाला एका उत्तराने सांक्षात्कार दिला.. खरी ओळख

In reply to by नाखु

या बातमीत काय खरी ओळख दिसली तुम्हाला? मुख्यमंत्रांवर रोष आहे म्हणून की त्यांच्या कारभारावर रोष आहे म्हणून मोर्चे निघालेत? आरोपपत्र दाखल करायला 3 महिने का बरं लागले असावेत? जात पातीचे गुराळ सोडा वो, जो तो ते अगदी कसोशीने पळतच असतो, फक्त आव आणला जात असतो की मी जात, धर्म विरहित आहे. तसं असतं तर हा पार्ट 2 धागा एवढ्यापुढे सरकलाच नसता. आणि तुमच्या सारखे मिपावरील चोखंदळ सदस्य ही इथे प्रतिक्रिया देयाला धावले नसते. मराठा क्रांती मोर्चा बद्दल विरोधी किंवा वेगळ मत असणाऱ्या एकाने सुद्धा मराठा समाजाला सबुरीने समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसला नाही. उलट मराठ्यांना कसा माज आहे, आरक्षण कशी भीक आहे, ब्राह्मण मुख्यमंत्री कसा खुपतो आहे, असंबंध मोर्चाला पवारसाहेबांचं कनेक्शन दाखवण्याचा प्रयत्न, मोर्चाला होणार खर्च आणि मोर्चे च्या आकड्यावरुन केलेली खिचाई. (नाखु साहेब- तुमची आमची परिस्थिती खूप समाधानकारक आहे म्हणून आपल्याला आरक्षण भीक वाटते, एक उदाहरण देतो-माझ्या एक मित्राची अशिक्षित वृद्ध आई मोर्चाला निघाली होती, मित्र नको जाऊ म्हणाला खूप उन्ह आहे आहे आणि लय चालावं लागेल, पण ती माउली म्हणाली बाबा आम्ही तुम्हाला नाही तुमच्या मनासारखा शिकवू शकलो, पण या मोर्चाने तुझ्या पोराबाळाला फायदा झाला तर झाला. तिची विचार करण्याची कुवत बाजूला ठेवू पण एक सल कुठे तर काळजात असल्याशिवाय कोणी एकत्र येत नाही)

In reply to by विशुमित

मुख्यमंत्रांवर रोष आहे म्हणून की त्यांच्या कारभारावर रोष आहे म्हणून मोर्चे निघालेत?
रोष असण्याचे अनेक मुद्दे आहेत. त्यातील प्रमुख मुद्दे म्हणजे 'खालच्या' जातीतील मुलांनी 'वरच्या' जातीतील मुलीवर अत्याचार केले व 'आपल्या' जातीचा मुख्यमंत्री नसून तो 'दुसर्‍याच' जातीचा आहे. आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी, शेतकरी, शिवस्मारक इ. मुद्दे तोंडीलावण म्हणून घुसडण्यात आले.
आरोपपत्र दाखल करायला 3 महिने का बरं लागले असावेत?
घाईघाईत आरोपपत्र दाखल केले तर आरोपपत्रात अनेक त्रुटी रहायची शक्यता असते व त्यातून आरोपी सुटण्याची किंवा त्यांना कमी शिक्षा होण्याची शक्यता असते. या आरोपींची ब्रेन मॅपिंग चाचणी झाली आहे, नार्को चाचणी झाली आहे, डीएनए चाचणी झाली आहे. या सर्व चाचण्यांचे निकाल येऊन त्यात सातत्यता दाखवून पुढे जावे लागते. जर दोन चाचण्यांच्या निष्कर्षात थोडीशी तफावत असली तरी त्याचा फायदा आरोपींचे वकील उचलतात. कोपर्डी प्रकरण घडल्यानंतर सुरवातीचे १५-१६ दिवस तिथे नेत्यांची रीघ लागली होती. त्यामुळे पोलिसांना तपास वेगाने पूर्ण करणे शक्य नव्हते. अत्याचारीत मुलीचे नातेवाईक अत्यंत धक्का लागण्याच्या मानसिक अवस्थेत असल्याने त्यांची जबानी घेण्यास वेळ लागला. सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून असल्यामुळे, दोन वेगवेगळ्या जातींचे हितसंबंध यात गुंतल्याने, अनेक पक्षांनी यात जातीयवादी राजकारण घुसवून दबाव आणल्याने पोलिसांना मोठ्या अतिशय काळजीपूर्वक तपास करावा लागला. आरोपपत्रात किरकोळ चूक जरी राहिली व त्याचा फायदा आरोपींना मिळाला तर सर्व खापर पोलिसांवर व सरकारवर फोडले जाईल. त्यामुळेच आरोपपत्र घाईघाईत दाखल न करता काळजीपूर्वक तपास करून दाखल करण्यात आले आहे.
मराठा क्रांती मोर्चा बद्दल विरोधी किंवा वेगळ मत असणाऱ्या एकाने सुद्धा मराठा समाजाला सबुरीने समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसला नाही. उलट मराठ्यांना कसा माज आहे, आरक्षण कशी भीक आहे, ब्राह्मण मुख्यमंत्री कसा खुपतो आहे, असंबंध मोर्चाला पवारसाहेबांचं कनेक्शन दाखवण्याचा प्रयत्न, मोर्चाला होणार खर्च आणि मोर्चे च्या आकड्यावरुन केलेली खिचाई.
मराठा समाजाला सबुरीने समजावून घ्यायचे म्हणजे काय करायचे? कोपर्डी घटना अत्यंत घृणास्पद आहे हेच सर्वांचे मत आहे. कोपर्डी गुन्हेगारांना एक महिन्यात फाशी द्या ही मोर्चेकर्‍यांची मागणी व्यावहारिक नाही हे त्यांनाचा समजायला हवे. इतरांनी त्यात काय समजून घ्यायचे? अ‍ॅट्रॉसिटीची भीति फक्त मराठ्यांनाचा का वाटते हे त्यांनीच समजावून सांगायला हवं. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याने त्यांना राखीव जागा हव्यात ही मागणी तर अजिबात समर्थनीय नाही. जी जात गेली शेकडो वर्षे राज्य करीत होती व ज्या जातीचे महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात प्राबल्य आहे त्यांना राखीव जागा देणे अजिबात समर्थनीय योग्य नाही. पटत नसेल तर आम्हा सर्वांना या मोर्चेकर्‍यांची भूमिका व त्यांच्या मागण्यांमागील तर्क समजावून सांगा.

In reply to by श्रीगुरुजी

कोपर्डी घटना अत्यंत घृणास्पद आहे हेच सर्वांचे मत आहे. कोपर्डी गुन्हेगारांना एक महिन्यात फाशी द्या ही मोर्चेकर्‍यांची मागणी व्यावहारिक नाही हे त्यांनाचा समजायला हवे.
सहमत.

In reply to by विशुमित

पण वेळ आणि पद्धत चुकीची निवडून न कळत पवारांच्या हातातले खेळणे बनले आहेत हे (सामाजीक हेळ्सांड व शिक्षण्संधीची परवड झालेले लोक) आठवून पहा जरा अर्जुन सिनेमा अगदी तसा तरूणाईचा वापर करून घेतला आहे. आरक्षण द्या नाहीतर खुर्ची सोडा ही घोषणा कशाचे द्योतक आहे.आरक्षण देणे एकट्या मुख्यमंत्रयाचा हातात आहे का? ओबीसीत समावेश करण्यसाठी सर्व संबधीताचे एक्मत होणे गरजेचे आहे हेही माहीत आहे. दौर्यातील प्रत्येक निषेध मोर्चाला मुम स्वतः निवेदन घेऊनही मोर्चाचे निमित्त जाण्ता राजा आणि कन्या फक्त मुख्यमंत्र्याम्वर (सरकारवर) रोष म्हणून दाखवते. खरेच हा मोर्चा स्वयंस्फुर्तीचा आणि पक्षीय पाठबळाचा नसेल तर तसे पदाधिकार्यांनी राजकीय श्रेयापासून नेत्यांना रोखले पाहिजे. मूक्संमती आणि पडद्याआडचे म्होरके बोलायला लागले की चांगल्या हेतुबद्दलही शंका येणे स्वाभावीक आहे. माझे अगदी जीवा भावाचे दोन मित्र मोर्चात सक्रीय होते त्यांच्याशीही माझा घनघोर वाद झाला आहे.(अजूअन्ही संबध चांगले आहेत आणि राहतीलही) प्र्त्यक्षात सुरुवातीला मोर्चा निघेपर्यंत आरक्षण हा विषय होता (कोपर्डीने अस्मितेवर फुंकर घातली गेली इतकेच काय ते) पण मोर्चाचा प्रतिसाद पाहून जाणत्या राज्यांच्या हस्तकांनी (माराठा महासंघ विखारी विंग आणि ब्रिगेड यांनी हे सरकार ब्राह्मणधार्जीणे आणि मराठा विरोधात आहे हे पद्धत्शीर्पणे पसरविले) काही व्हाटसप पोष्ट वाचवणार नाहीत अश्या भडकाऊ आणि अर्वाच्य आहेत. त्याने आधिच कोपर्डीच्या (अन्याय्य ग्रस्त असल्याच्या) आगीत तेल ओतले गेले. ही आगलावण्याची झळ नक्की कुणाला बसेल ते माहीत नाही पण शहरात ब्राह्मण-मराठा, आणि गावाकडे मराठा-मराठेतर बहुजन यांच्यात असलेले सौदार्ह आणि सलोखा काळवंडला गेला आहे हे नक्की. अ‍ॅट्रोसिटीच्या ज्या खोट्या केसेस असतील त्यांच्या "खर्या गुन्हेगारांचे नाव" शरद पवार आणि मंडळींनी शोधून काढावीत पण ते करण्या ऐवजी माथे भडकविण्याचे काम जरूर केले जाते. हुंडाबळी कायद्याचाही दुरुपयोग होतो आहे आणि हुंडाबळीही होत आहेत्,अंमलबजावणी यंत्रणेचे खापर कायद्यावर फोड्णे अगदी सोपे असते तेच इथे होत आहे.

In reply to by नाखु

या मोर्चा मागे पवार साहेब आहेत हेच मुळी मला मान्य नाही. भले सुप्रिया ताई किंवा अन्य राष्ट्रवादीचे नेते किंवा इतर पक्षातील मराठा नेते काही ही प्रतिक्रिया देवोत, अजून तरी त्यांचा मोर्चा वर विपरीत परिणाम झालेला नाही. महत्वाचे म्हणजे अजून तरी कोणत्याच मोर्चा मध्ये कोणाला ही पदाधिकारी म्हणून बहुमान दिला नाही. बाकी तुम्ही व्हाट्सअप पोस्ट, तुमच्या मित्रांचे अनुभव, ब्रिगेडी, मराठा संघ यांची उदाहरणे दिलीत तरी सुद्धा या मोर्चाने माथ्यावरचा बर्फ वितळून नाही दिला. तुम्ही जी भीती व्यक्त करताय ज्याने सौदार्ह संपुष्टात येईल ही अनाठायी आहे. कारण हा समाजामध्ये बहुतांशी लोक खूप सृजनशील, सुसंस्कृत, जीवाला जीव देणारी, मैत्रीसाठी वाट्टेल ते करणारी आणि हळवी सुद्धा आहेत.

In reply to by विशुमित

+1 आरक्षणाची गरज नसणारा, अॅट्रोसिटीशी संबध न येणारा, मध्यम+ वर्गातला, शहरी मराठा या मोर्चात का सामील होतोय हे ज्यांना जाणून घ्यायचंय त्यांनी माबोवरचा समीर गायकवाड यांचा धागा वाचावा. विरोधी मतं कशी मांडावीत हे जाणण्यासाठी limbutimbu यांच्या धाग्यावरचे भरत., केदार जाधव, अल्पना, दिमित्रि यांचे प्रतिसाद वाचावे. आरक्षणाबद्दल सर्वसामान्यांच्या आक्षेपावर काही उपाय शोधता येतील का यासाठी अॅमीचा धागा वाचा. लिंक स्वबळावर शोधा किंवा गुगलकडून भिक घ्या ;-) जोपर्यंत मोर्चा अहिंसक मार्गाने, शांततेत चाललाय तोपर्यंत माझा त्याला पुर्ण सपोर्ट आहे. मनापासून शुभेच्छा! (आणि धाग्यावरून रजा)

जाणत्या राजाला डोके बाजूला ठेउन पाठिंबा द्यायला पर डे रेट काय आहे सध्ध्या? साईड बिझनेसम्हणून काम करायला हरकत नै

अगगागा, मराठा मोर्च्यांमुळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या सरकारचे काळीजच पार चिरले गेले हो. आणि काय निघालं बरं त्या चिरलेल्या काळजातून? अर्थात, मराठा आरक्षण. याला म्हणतात भीषण विनोद! -गा.पै.

मुंबई मोर्चा एक कोटी लोक सहभागी होणार आहेत. पूर्ण महाराष्ट्र राज्यातील लोक येणार आहेत. प्रत्येकी 500 ₹ जायचा यायचा खर्च पकडा, होतात 500 कोटी. एक वेळचे जेवण, कमीत कमी 100 कोटी इतर खर्च (बॅनर्स, चहा पाणी, टी शर्ट ) मिळून ₹ 700 ते 800 कोटी रुपयांचे बजेट आहे. अजून काहींचा "जास्तीचा" खर्च - तर 1000 करोड ला मरण नाही कोण करणार एवढा खर्च ??? आरक्षण मागणारे गरीब मराठे ??? एवढा खर्च करू शकतो असा एकच माणूस महाराष्ट्रात आहे, तो म्हणजे ..... भ्रष्टाचारशिरोमणी ............

In reply to by हेमन्त वाघे

लोक स्वतःच्या खिशातून खर्च करून मोर्चाला येत आहेत. ज्यांच्या कडे चारचाकी आहे ते गावातील ज्या लोकांना मोर्चाला यायचा आहे त्यांना मोफत बरोबर घेऊन जात आहे. जाणारे सुद्धा फुकटे नाहीत ते सुद्धा त्यांच्या परीने चहा-पाणी करत आहेत गाडीतील लोकांना. ज्यांच्या कडे आर्थिक सुबकता आहे ते आर्थिक मदत करत आहेत, जोर जबरदस्ती नाही गणपती मंडळांसारखी. मागील काळात जे मोर्चे निघत होते ज्यामुळे सरकारी मालमत्तेची आणि वाहनांची नास धूस करून होणाऱ्या खर्च पेक्षा नक्कीच हा मोर्चा खूप स्वस्त आहे. भ्रष्टाचारशिरोमणी... खडसे की मुंडे की गडकरी ---यातील कोण नाही समजलं?

In reply to by विशुमित

तुम्ही एव्हढी बाजु लढवतात, तुम्हाला काय वाटते मुख्यमंत्री जातील आणी आरक्षण मिळेल,?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

मुख्यमंत्र्याना घालवण्यासाठी हा मोर्चा निघत आहे हे सपशेल झूट आहे. आणि ब्राह्मण मुख्यमंत्र्यांचं पिल्लू सोडून कथित भक्त समर्थक मोर्चाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण तरीही मोर्चा अधिक जोमाने निघत जाणार आहे. आरक्षण नक्की मिळेल, हा माझा विश्वास आहे. ते जर मिळालं तर नक्की सर्व मिपा सदस्यांना माझ्या कुवती नुसार स्नेह भोजनाला आमंत्रित करेन. आणि हो जो पर्यंत हा मोर्चा शांततेत चालू आहे तो पर्यंत मी या मोर्चाचा खंदा समर्थक असणार आहे, यात वाद नाही.

श्रीगुरूजी आणि नाखु, 1) ब्राह्मण मुख्यमंत्री हटवणे. 2) भ्रष्ट मराठा नेत्यांना वाचवण्यासाठी खेळलेली राजकीय खेळी. >>> वरीलपैकि एकही मुद्दा मोर्चेकरी मंडळींच्या डोक्यातच काय? पण स्वप्नातही नाही. त्यांच्या काहीतरी मागण्या आहेत,त्यात थोडा अभिनिवेश आहे,थोडी जातीय अस्मिता आहे(सगळ्यांनाच असते तशी),आणि थोडं विषमतेच दुखणं आहे.इतकेच पण श्रीगुरूजींची तर्कबुद्धी पार पल्याड गेली आहे, अर्थात ते म्हणतायत म्हणजे 100% बरोबरच असेल कदाचित पवारांच्या सभेला लोक जमायची पंचाईत! आणि ते मोर्चा कशाला अरेंज करतील?

हे मोर्चे मराठ्यांच्या प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात आहेत, प्रस्थापित नेतृत्वाने आम मराठ्यांच्यासाठी काहीच केले नाही त्यामुळे त्याविरोधात असंतोष आहे हे मत इथे आणि इतरत्र मांडले गेलेले वाचले. त्याच वेळी श्री शरद पवार हेच या मोर्चांचे सूत्रधार आहेत असेही मत हिरिरीने इथे आणी इतरत्र मांडले गेलेले वाचले. म्हणजे एक तर शरद पवार हे प्रस्थापित नेतृत्वात मोडत नाहीत किंवा दुसरी बाजू म्हणजे ते या मोर्चांचे कर्तेकरविते नाहीत. जर ते प्रस्थापित नेते असतील तर स्वतःच्याच विरोधात मोर्चे कशाला काढतील?

In reply to by राही

होऊनही या प्रश्नाचे उत्तर कुणी देईना ते, अगदी ताजी बातमी

औरंगाबाद - हिवाळी अधिवेशनाचे निमित्त साधून 14 डिसेंबरला नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या घरावर मराठा क्रांती मूक मोर्चा धडकणार आहे. यशवंत स्टेडियमवरून मोर्चा निघेल. नागपुरातील मोर्चावर राज्य सरकारच्या पवित्र्यानंतर मुंबई मोर्चाबाबत भूमिका स्पष्ट करण्यात येईल. तूर्तास मुंबई मोर्चा स्थगित केल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत औरंगाबाद जिल्हा मोर्चाच्या समन्वयकांनी दिली.

संपुर्ण बातमी इथे आता मुख्यमंत्र्यांच्या घरावर धडक. आजतगायत कुठला मोर्चा तात्कालीन मुख्यमंत्र्याच्या घरावर गेला होता आणि मराठा आरक्षण तात्काळ लागू करणे कुठल्या मुख्यमंत्र्याना शक्य आहे (प्रकरण न्य्याय प्रविष्ठ असताना) एकूण व्यक्तीगत रोख पाहता हा मोर्चा हायजॅक होण्याची शकयता वाढीस लागली आहे.

In reply to by नाखु

पवार साहेब महाराष्ट्रातील कोणत्याच जवाबदार पदावर नसताना सुद्धा अति महान शेतकरी नेते शेट्टी साहेब बारामतीला शेतकरी मोर्चा काढायला का बरं गेले असतील 2 वर्ष पूर्वी?

In reply to by विशुमित

त्याचं कारण असं की थोरले पवार केंद्रीय कृषीमंत्री होते, महाराष्ट्रात मुख्यमंत्री कॉंग्रेसचे होते तरी सर्व महत्त्वांची मंत्रीपदे राष्ट्रवादीच्या ताब्यात होती आणि शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचे जलसिंचन मंत्रीपद धाकट्या पवारांकडे होते. म्हणजे शेतीशी संबंधित सर्व गोष्टी बारामतीकरांकडे होत्या.

इथे ब्राह्मणांची बाजू हिरीरीने मांडणार्‍या लोकांना नम्रपणे सांगु इत्छीतो की "When you are in shit, keep your mouth shut". ३ टक्क्याच्या जीवावर ब्राह्मण लोकशाहीत काही करु शकत नाहीत. आवाज करायला गेले तर मार खाण्याची ( १९४८ सारखा ) शक्यता ( खरे तर खात्री ) आहे. ब्राह्मणांच्या बाजुनी तावातावानी बोलणार्‍यात देशात न रहाणारे लोक जास्त असण्याची शक्यता आहे. त्यांना इथे काही झाले तर काही फरक पडणार नाही, पण त्यांनी महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांच्या काळजीने आपले तोंड बंद ठेवावे. इंदिरा गांधींची हत्या झाल्यावर पुणेरी पेठांमधे पहिली भिती ही होती की मारणारा १९४८ सारखा कोणी ब्राह्मण तर नाही ना ही कुठला मुद्दा प्रुव्ह करायचा असेल तर कर्तृत्वाने करावा, वायफळ बडबडीने नको.

In reply to by गंम्बा

पण गप्प बसून मार खायचा वाचणार आहे का? मी मुंबई मधे cosmopolitan वातावरणात वाढले. कधीही जातीपाती मानत नाहीं. काही वर्षापूर्वी वाचनात पुरूषोत्तम खेडेकरान्चे ब्राह्मणविरोधी लेखन आले जे खूप विखारी होते आणि नन्तर त्याना पिन्ची महानगरपालिकेचा पुरस्कार मिळाला. तेव्हाच लक्शात आले की कुठल्याही विचारधारेचे followers असणारच पण हे छोट्या प्रमाणात होते तेव्हा काळजी नवती. हा मोर्चा ज्या पद्धतीने एका जातीसाठी निघाला म्हणून सन्शय येतो आहे की यामागे नक्की काय राजकारण आहे? त्यानिमित्ताने जे वाटले ते लिहिले. ज्यान्च्या बाजूने प्रश्न विचारले त्याना जर भीती वाटत असेल तर आवाज़ बन्द ठेवलेला बरा

याच विषयावर एक चांगला लेख - The Politics Of Victim-hood - The demands of the agitating Marathas are not reasonable या लेखातील खालील वाक्ये रोचक आहेत. History apart, are these demands feasible? The political class, including Chief Minister Devendra Fadnavis, who appears to be the target of the NCP, has supported the claims, notwithstanding the failure of earlier attempts to secure them. The Maratha community, which has complete dominance over the politics and economics of the state, can never establish through constitutional means that it is socially and educationally backward and establish the claim for OBC reservation. If the political class manages the inclusion through fraudulent means, the existing OBCs are likely to oppose it and the courts will stall it. The second demand — the claim to repeal the SC and the ST (Prevention of Atrocities) Act has now changed to modification of the act — is directed against the Dalits. The basis of the demand that convictions are few — the rate of conviction is as low as six per cent — only indicates the dominance of the dominant castes over the state apparatus, which works to ensure that cases booked under the act fail at every node of the justice delivery system. Moreover, it is a national act and cannot be tinkered under false pretexts. Though both the demands are unlikely to be fulfilled, the consciousness of victimhood among the Marathas achieved by the morchas is going to serve the interests of the political parties. The Maratha youth must realise that their own leaders have been responsible for their current plight. The current mobilisations are unlikely to alleviate their misery.

असो एक अनुभव कित्येक जवळचे मित्र ह्यात आयोजन किंवा सहभाग घेणं ह्यात सामील होते. कालपर्यंत आमचा कोणीही नेता नाही असं म्हणणारे आज काल पंकजा मुंडेंचं भाषण आणि अजून काही लोकांचं झाल्यावर राष्टवादी ला कसे उलट बोलतात आता दाखवतो अश्या टाईप च्या पोस्ट करत आहेत !! चालायचं..आहेत तर आहेत पवार साहेब

काही निर्णय

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना लागू करण्याचा निर्णय
  • – व्यावसायिक शिक्षणात SC,ST ,OBC यांना फी मिळते
  • – ही योजना सुरु करण्यात आली, यात 6 लाख उत्पन्न असलेल्या सगळ्यांसाठी योजना लागू करण्यात आली आहे.
  • – या योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक शुल्क ओबीसी 50% सवलत त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना ही योजना
  • – सरसकट सर्व विद्यार्थ्यांना 60%गुण आणि 6 लाख उत्पन्न
  • – अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही अट नाही
  • – विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण घेताना मदत
  • – मराठा समाज मोर्चा महत्वाची मागणी कि शिक्षण परवडत नाही
  • – इंजिनिअरिंगसाठी खासगी 1 लाख 45 हजार जागा तर 6 हजार शासकीय जागा
  • – सामान्य माणसांना खासगी प्रवेश घेणं त्रासदायक आहे.
  • – या योजनेनंतर 1 लाख 45 जागा विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील.
  • – पंजाबराव देशमुखांच्या नावानं योजना
  • – अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण घेताना निवासासाठी 30 हजार रुपये प्रतिवर्ष देण्याचा निर्णय
  • – पंडित दिनदयाळ उपाधअयाय स्वयम योजना- आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना
  • – आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण, शिक्षणसाहित्य शासनाकडून
  • – सहा हजार रुपये मोठ्या शहरांमध्ये तसेच, छोट्या शहरांमध्ये ५ आणि ४ हजार रुपये दरमहा देणार
  • – फी प्रतिपूर्ती योजना आतापर्यंत फक्त खाजगी महाविद्यालयांसाठी होती. आता सरकारी महाविद्यालयांसाठीही फी प्रतिपूर्ती योजना लागू होणार
  • – मेरिट विद्यार्थ्यांना सरकारी कॉलेजमध्ये पण सवलत मिळणार
  • – 2.5 ते 6 लाख उत्पन्न असणाऱ्यांनी खासगी मेडिकल कॉलेजसाठी शैक्षणिक कर्ज घेतले तर व्याज राज्य सरकार भरणार
  • – 2. 50 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना कुठलीही अट नाही. 2. 5 ते 6 लाखसाठी 60%ची अट आहे.
  • – कॉलेजं दुकानांसारखी चालवू नका. कॉलेजेसनी 50% प्लेसमेंट केली पाहिजे
  • – कॉलेजेसची गुणवत्ता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार
  • – यावर्षीपासून योजना लागू होणार, 1000 कोटींची तरतूद
  • – राधानगरी धामणी मध्यम प्रकल्पाला 782 कोटी
  • – मुंबई उच्च न्यायालयाला १० हजार चौरस फूट जागा
  • – वारणा प्रकल्पाला फेर प्रशासकीय मान्यता
  • प्रत्यक्ष मोर्च्यात सहभागी झालेल्या मिपाकरांनी सांगावे नक्की काही मागण्या (ज्या व्यवहार्य आहेत) त्या मान्य केल्यात की नाही.

In reply to by नाखु

या फक्त घोषणा आहेत का प्रत्येक्षात निर्णय घेतले आहेत या बद्दल माहिती नाही. कॅलॅरिटी आली की प्रतिसाद देता येतील. तूर्तास स्वल्प विराम...

In reply to by नाखु

वरवर पाहता 'मराठ्यांच्या दृष्टीने' निर्णय फारसा आवडला नाही. माझे जुनेच प्रश्न: 1. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी जर ३०% मराठा+कुणबी असतील तर वर ज्या दिड लाख जागा दिल्यात त्यातल्या कमीतकमी २८ ते ३०% मराठ्यांना मिळायला हव्या. तसे नसेल तर वरील विविध योजना ३०% जागा व्यापणार्या साडेतीनटक्क्यांसाठीच बनवल्यात... मराठा मोर्चांचा कोणता हेतू साध्य झाला त्यात? 2. माझा पुर्वीप्रमाणेच परत सल्ला: सरकारकडून घटना बदल वगैरे अवघड मार्गाने आरक्षण मिळाले तरी १.५ लाखपैकी जास्तीजास्त १६% म्हणजे २५ हजार जागा मिळतील. त्याऐवजी जर सध्या ४०% खाजगी संस्था मराठ्यांच्या असतील तर त्यांना पुर्ण खाजगी करुन १००% मराठ्यांना किंवा ७०% मराठा आणि ३०% SC,ST,NT असे केल्यास जास्त जागा मराठ्यांना उपलब्ध होतील. ६० हजार किंवा ४२ हजार. === – अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण घेताना निवासासाठी 30 हजार रुपये प्रतिवर्ष देण्याचा निर्णय – पंडित दिनदयाळ उपाधअयाय स्वयम योजना - आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना – आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण, शिक्षणसाहित्य शासनाकडून – सहा हजार रुपये मोठ्या शहरांमध्ये तसेच, छोट्या शहरांमध्ये ५ आणि ४ हजार रुपये दरमहा देणार – कॉलेजं दुकानांसारखी चालवू नका. कॉलेजेसनी 50% प्लेसमेंट केली पाहिजे – कॉलेजेसची गुणवत्ता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार – यावर्षीपासून योजना लागू होणार, 1000 कोटींची तरतूद – राधानगरी धामणी मध्यम प्रकल्पाला 782 कोटी – मुंबई उच्च न्यायालयाला १० हजार चौरस फूट जागा – वारणा प्रकल्पाला फेर प्रशासकीय मान्यता हे निर्णय ठीक आहेत. बाकीचा केवळ चालूपणा आहे. === माझे मत: मोर्चे चालू ठेवावेत किंवा खाजगीकरण करावे. जिथे जास्त फायदा असेल ते.

In reply to by एमी

1. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी जर ३०% मराठा+कुणबी असतील तर वर ज्या दिड लाख जागा दिल्यात त्यातल्या कमीतकमी २८ ते ३०% मराठ्यांना मिळायला हव्या. तसे नसेल तर वरील विविध योजना ३०% जागा व्यापणार्या साडेतीनटक्क्यांसाठीच बनवल्यात... मराठा मोर्चांचा कोणता हेतू साध्य झाला त्यात?
३०% जागा व्यापणार्‍या साडेतीन टक्क्यांसाठी बनविल्यात? काहीतरीच काय? ३.५% वाल्यांना कोठेही आरक्षित जागा नाहीत. त्या त्यांना मिळाल्या असतील तर त्यांनी तेवढी गुणवत्ता दाखविली असेल म्हणून मिळाल्या असतील. ज्यांना या जागा हव्यात त्यांनी जास्त गुणवत्ता दाखवावी आणि घ्याव्यात या सगळ्या जागा. मी अमुक एका जातीचा हे कारण पुढे करून जागांवर हक्क सांगू नये. मराठा मोर्च्याच्या अनेक हेतूंपैकी एक हेतू असा आहे की मराठ्यांना "मागासवर्गीय" हा शिक्का मारून न घेता राखीव जागा हव्या आहेत. आम्ही गरीब आहोत, आमच्यात शिक्षण कमी आहे इ. कारणे त्यासाठी पुढे केली जात आहेत. आम्ही मागासलेले आहोत म्हणून आम्हाला राखीव जागा द्या असे म्हणणारे फार थोडे आहेत. आताचे सर्व फायदे कायम ठेवून त्यांना अजून पाहिजे आहे.
2. माझा पुर्वीप्रमाणेच परत सल्ला: सरकारकडून घटना बदल वगैरे अवघड मार्गाने आरक्षण मिळाले तरी १.५ लाखपैकी जास्तीजास्त १६% म्हणजे २५ हजार जागा मिळतील. त्याऐवजी जर सध्या ४०% खाजगी संस्था मराठ्यांच्या असतील तर त्यांना पुर्ण खाजगी करुन १००% मराठ्यांना किंवा ७०% मराठा आणि ३०% SC,ST,NT असे केल्यास जास्त जागा मराठ्यांना उपलब्ध होतील. ६० हजार किंवा ४२ हजार.
खाजगी संस्थांनी फक्त मराठा जातीला जागा असणार्‍या शिक्षणसंस्था काढल्या तर त्या सरकारमान्य नसतील. त्यामुळे तिथे बहुसंख्य मराठे जाणारच नाहीत व त्यांनी दिलेल्या पदवीला मान्यता असणार नाही.
माझे मत: मोर्चे चालू ठेवावेत किंवा खाजगीकरण करावे. जिथे जास्त फायदा असेल ते.
खाजगीकरण करून फायदा नाही. त्याऐवजी मोर्चेच चालू ठेवूया. कदाचित दडपण येऊन फडणविस गेले तर मोर्चाचा मुख्य छुपा हेतू साध्य होईल.

In reply to by श्रीगुरुजी

कदाचित दडपण येऊन फडणविस गेले तर >>>>>>>> गेले तर गेले त्याने काय फरक पडतो? मला नाही वाटत मुख्यमंत्री एवढे नाजूक मनाचे आहेत. सध्या तरी दिसतंय ते अगदी सावधतेने पाऊले टाकत आहेत. बाकी पुढील वाटचाली साठी त्यांना शुभेच्छा. आपल्या माणसावर तरी विश्वास ठेवा श्री गुरुजी. (कृपया "आपला माणूस" भाजप पक्ष या अर्थाने घ्या, जाती वरून नाही )

In reply to by विशुमित

फरक पडतो ना. आपल्यावर राज्य करणारा ब्राह्मण जाऊन नवीन अब्राह्मण मुख्यमंत्री आला तर फरक पडतोच ना. भ्रष्टाचाराची प्रकरणे धसाला लावून तुरूंगात पाठविणारा मुख्यमंत्री जाऊन त्याजागी सेटींग करणारा मुख्यमंत्री आला तर फरक पडतो ना. एनीवे, मराठा मोर्चाचं फॅड आता बर्‍यापैकी कमी झालेलं दिसतंय. बहुतेक सर्व शहरातून व जिल्ह्यातून मोर्चे काढून झाले आहेत. आता नवीन मोर्चे फारसे निघताना दिसत नाहीत.

In reply to by अभ्या..

३-४ आठवड्यांपूर्वी दर १-२ दिवसांनी मोर्चे निघायचे. एका दिवशी तर तीन मोर्चे निघाले होते. आता प्रमाण खूपच कमी झालंय.

In reply to by श्रीगुरुजी

फरक पडतो ना>>>>>> -- तुम्हाला फरक पडत असेल. तसे पण त्यांच्या कडे काही स्वतंत्र विचार आहेत अजून तरी जाणवलं नाही. स्वतः गृह मंत्री असताना सुद्धा नाशिकचा हिंसाचार थांबवू नाही शकले. आपल्यावर राज्य करणारा ब्राह्मण जाऊन नवीन अब्राह्मण मुख्यमंत्री आला तर फरक पडतोच ना. >>>>> --तुम्ही पुन्हा जातीय तेढ निर्माण करताय. यॉर्कर यांचा हा प्रतिसाद अगदी समर्पक आहे त्यासाठी. http://www.misalpav.com/comment/888144#comment-888144 तुमच्या अशा विखारी प्रतिसादामुळे खालील विचारांना अधिक बळकटी मिळेल, जो मोर्चाचा बिलकुल केंद्रबिंदू नाहीय. http://www.misalpav.com/comment/888455#comment-888455 भ्रष्टाचाराची प्रकरणे धसाला लावून तुरूंगात पाठविणारा मुख्यमंत्री जाऊन त्याजागी सेटींग करणारा मुख्यमंत्री आला तर फरक पडतो ना.>>>>> -- तुमचा रोख भुजबळांकडे असेल तर प्रत्येक जण खासगीत हेच म्हणतोय की अजित पवारांना वाचवण्यासाठी पवार साहेबांनीच भुजबळांची गेम केली. मुख्यमंत्रांचं यात काहीच कर्तृत्व नाही. (कृपया दुवा मागू नका ) मराठा मोर्चाचं फॅड आता बर्‍यापैकी कमी झालेलं दिसतंय>>>>> --- फॅड???? इतका कुत्सित शब्द वापरायला नको होता. असो.. आता नवीन मोर्चे फारसे निघताना दिसत नाहीत.>>>>> --- कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर बाकी आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

३.५% वाल्यांना कोठेही आरक्षित जागा नाहीत. >> आहेत! कोणत्या क्षेत्रात ते ओळखा बरं? त्या त्यांना मिळाल्या असतील तर त्यांनी तेवढी गुणवत्ता दाखविली असेल म्हणून मिळाल्या असतील. ज्यांना या जागा हव्यात त्यांनी जास्त गुणवत्ता दाखवावी आणि घ्याव्यात या सगळ्या जागा. मी अमुक एका जातीचा हे कारण पुढे करून जागांवर हक्क सांगू नये. >> हे सांगणारे तुम्ही कोण? आधी म्हणल्याप्रमाणे 'देणारा' ठरवणार कधी, कोणाला, किती आणि का द्यायचं आणि सध्या देणारा = सरकार किंवा जैनमराठा. खाजगी संस्थांनी फक्त मराठा जातीला जागा असणार्या शिक्षणसंस्था काढल्या तर त्या सरकारमान्य नसतील. त्यामुळे तिथे बहुसंख्य मराठे जाणारच नाहीत व त्यांनी दिलेल्या पदवीला मान्यता असणार नाही. >> का हो? आतापर्यंततर 'ब्राह्मण क्षमस्वला हरकत नाही' म्हणत होता ना? एनीवे मराठा काय करणार आणि काय नाही हे 'तुम्ही' सांगायची गरज नाही.

In reply to by एमी

३.५% वाल्यांना कोठेही आरक्षित जागा नाहीत. >> आहेत! कोणत्या क्षेत्रात ते ओळखा बरं?
कोणत्या क्षेत्रात?
त्या त्यांना मिळाल्या असतील तर त्यांनी तेवढी गुणवत्ता दाखविली असेल म्हणून मिळाल्या असतील. ज्यांना या जागा हव्यात त्यांनी जास्त गुणवत्ता दाखवावी आणि घ्याव्यात या सगळ्या जागा. मी अमुक एका जातीचा हे कारण पुढे करून जागांवर हक्क सांगू नये. >> हे सांगणारे तुम्ही कोण? आधी म्हणल्याप्रमाणे 'देणारा' ठरवणार कधी, कोणाला, किती आणि का द्यायचं आणि सध्या देणारा = सरकार किंवा जैनमराठा.
मोर्चेकरी म्हणतात की आम्ही आमच्या हक्काचे मागतोय, आम्ही इतरांच्या पानातले मागत नाही. राखीव जागा यांच्या हक्काच्या कधीपासून झाल्या? कोणी हा हक्क दिला? तुम्हाला राखीव जागा द्यायच्या म्हणजे, ज्यांना कोठेच राखीव जागा नाहीत अशा खुल्या वर्गातील लोकांना ज्या ४८% जागा जातीच्या आधारावर न मागता गुणवत्तेच्या आधारावर मिळविण्याचा प्रयत्न करावा लागतो, त्यातल्या तुम्हाला काढून द्यायच्या. म्हणजे ज्या जागांवर ते प्रयत्न करू शकतात त्या जागा अजून कमी होणार. आणि तरी हे म्हणणार आम्ही आमच्या हक्काच्या जागा मागतोय, कोणाच्या पानातले मागत नाही. खाजगी संस्थांनी फक्त मराठा जातीला जागा असणार्या शिक्षणसंस्था काढल्या तर त्या सरकारमान्य नसतील. त्यामुळे तिथे बहुसंख्य मराठे जाणारच नाहीत व त्यांनी दिलेल्या पदवीला मान्यता असणार नाही. >> का हो? आतापर्यंततर 'ब्राह्मण क्षमस्वला हरकत नाही' म्हणत होता ना? एनीवे मराठा काय करणार आणि काय नाही हे 'तुम्ही' सांगायची गरज नाही. हरकत नाही. मराठा शिक्षणसम्राटांनी मराठा ओन्ली महाविद्यालये काढून बघावीत. मग समजेल काय होतंय ते.

In reply to by श्रीगुरुजी

कोणत्या क्षेत्रात? >> स्वबळावर शोधा की :-) === मोर्चेकरी म्हणतात की आम्ही आमच्या.... कोणाच्या पानातले मागत नाही. >> एक काय तो स्टँड ठेवलात तर बरं होइल. आधी म्हणत होता "अगदी १००% जागा राखीव ठेवल्या तरी ब्राह्मण प्रगती करतीलच. कोणताही ब्राह्मण राखीव जागांची अजिबात काळजी करीत नाही." आता म्हणताय "आमच्या पानातलं काढून तुम्हाला द्यायचं का" एनीवे परत वरच्याच प्रतिसादातले एक वाक्य: 'देणारा' ठरवणार कधी, कोणाला, किती आणि का द्यायचं आणि सध्या देणारा = सरकार किंवा जैनमराठा. === हरकत नाही. मराठा शिक्षणसम्राटांनी मराठा ओन्ली महाविद्यालये काढून बघावीत. मग समजेल काय होतंय ते. >> परत तळ्यात मळ्यात?? :-) बादवे त्या 'काढून बघावीत'मुळे वाचणार्यांचा गैरसमज होइल. नवीन कॉलेज काढा असे मी म्हणत नाहीय. आहे तीच कन्वर्ट करा. इंफ्रा, सिस्टीम सगळंच ऑलरेडी सेट आहे. फक्त सरकारी विद्यापिठाऐवजी खाजगी विद्यापिठ करायचे. === एनीवे आपण तेचते बोलतोय. त्यामुळे यापुढे काही नवीन मुद्दा आला तर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. नाहीतर आपल्याकडून शांती. Peace :-)

In reply to by एमी

कोणत्या क्षेत्रात? >> स्वबळावर शोधा की :-)
ब्राह्मणांसाठी कोणतंतरी क्षेत्र राखीव आहे अशी खात्रीशीर माहिती तुमच्याकडे दिसते. ब्राहमणांना कोणत्या सरकारी खात्यात किंवा सरकारमान्य शैक्षणिक संस्थात जातीवर आधारीत राखीव जागा आहेत किंवा संसद/विधानसभा/विधानपरीषद/नगरपालिका/महानगरपालिका/ग्रामपंचायत/जिल्हा परीषद इ. संस्थांच्या मतदारसंघापैकी कोणते मतदारसंघ ब्राह्मणांसाठी राखीव आहेत हे सर्वत्र शोध घेऊनसुद्धा सापडलं नाही (मुळात ब्राहमणांसाठी कोठेच, काहीही राखीव नाही त्यामुळे सापडणार तरी कसं?). त्यामुळे आता तुम्हीच याविषयी आमचे प्रबोधन करावे ही नम्र विनंती. अर्थात एखाद्या क्षेत्रात ब्राह्मण मोठ्या प्रमाणात दिसत असतील तर त्या क्षेत्रात ब्राहमणांनी जातीचा आधार वगैरे न घेता, आमच्यावर अन्याय झाला हो असे न विव्हळता त्या क्षेत्रासाठी जी पात्रता आहे ती सिद्ध केल्यामुळे ते तिथे दिसत असतात.
बादवे त्या 'काढून बघावीत'मुळे वाचणार्यांचा गैरसमज होइल. नवीन कॉलेज काढा असे मी म्हणत नाहीय. आहे तीच कन्वर्ट करा. इंफ्रा, सिस्टीम सगळंच ऑलरेडी सेट आहे. फक्त सरकारी विद्यापिठाऐवजी खाजगी विद्यापिठ करायचे.
मग करू देत की. कोणी अडवलंय? पतंग कदम, नवले, डी वाय पाटील, जयवंत सावंत इ. शिक्षणसम्राटांनी त्यांची सध्या आहेत तीच संस्थाने मराठ्यांसाठी १००% राखीव करावीत.

In reply to by श्रीगुरुजी

त्यांना ब्राह्मण राखीव क्षेत्र म्हणजे भिक्षुकी, पौरोहित्य ह्याबद्दल म्हणायचे आहे, का पेडगाव ट्रिप करताय गुरुजी?

In reply to by संदीप डांगे

तुम्ही नेहमीप्रमाणे सोयिस्कर गैरसमज करून घेतलाय. मी पेडगाव बिडगाव असल्या ठिकाणी जात नसतो. तुमचाच कायमस्वरूपी मुक्काम पेडगावला दिसतोय. असो. त्यांना काय म्हणायचेय ते त्यांच्याकडूनच येऊ देत की. तुम्ही कशाला स्पेक्युलेशन करताय? आता राखीव क्षेत्राबद्दल. भिक्षुकी, पौरोहित्य इ. क्षेत्र घटनेच्या कोणकोणत्या कलमांनुसार सरकारने फक्त ब्राह्मणांसाठी राखीव ठेवले आहे ते सांगता का जरा?

मोर्चा च फॅड इथे बघा--- http://www.esakal.com/Tiny.aspx?K=VBHUTL मोर्चामध्ये... घोषणा देणे, टाळ्या वाजवणे, मोर्चात सेल्फी काढणे यावर पूर्ण निर्बंध. मोर्चा मूक असल्याने शांतता हे या मोर्चाचे वैशिष्ट्य. मोर्चाच्या मार्गावर अस्वच्छता होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. मोर्चासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच महापालिका, पोलिस, आरोग्य विभाग, डॉक्‍टरांचे पथक, रुग्णवाहिका सज्ज मोर्चासाठी व्यवस्था मोर्चाच्या मार्गावर 300 लाउड स्पीकर 20 ठिकाणी एलईडीची सोय चारही मार्गांवर स्वयंसेवक करणार नियोजन दसरा चौक "मराठा‘मय शहरातील रस्त्यांवरील वाहने हटवली मोर्चाच्या मार्गावर पोलिसांचे "वॉच टॉवर‘ सर्व समाजबांधवांचा पाठिंबा शहर स्वच्छ करण्यासाठी स्वतंत्र पथक मुस्लिम समाजाकडून पार्किंग व नाष्ट्याची सोय कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चाला मुस्लिम समाजाने पाठिंबा देत मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांना पाणी व नाष्टासह पार्किंगचीही सोय केली आहे. शहरातील विविध रस्त्यांवर मुस्लिम नागरिक पाणी वाटप करताना दिसत होते.

In reply to by विशुमित

"साम" वाहिनी मोर्चाचे अगदी थेट प्रक्षेपण करीत होते. एका शाळकरी मुलीची मुलाखत "साम"च्या प्रतिनिधीने घेतली. तिने सुरवातीला आपले नाव सांगितले व आपण ८ वीत शिकत आहोत असे सांगितले. त्यानंतर तिने एकदम शाळेत पाठ केलेला निबंध वाचून दाखवावा त्याच तालासुरात पढीक वाक्ये सांगायला सुरुवात केली. अगदी कोपर्डी पासून आरक्षण, शेतकरी आणि अ‍ॅट्रोसिटी इ. मुद्दे तिच्या निबंधात होते. ८ वीतल्या मुलीला अ‍ॅट्रोसिटी म्हणजे काय हे कळत तरी असेल का याविषयी शंका आली. आम्ही जिजाऊच्या लेकी, जिजाऊच्या लेकीवर कोपर्डीत अत्याचार झाला, अ‍ॅट्रोसिटीत अनेक मराठा अडकवले आहेत त्यामुळे हा कायदा रद्द करा, मराठा ही जात नसून साम्राज्य आहे, अनेक शतके आम्ही अन्याय सहन करतोय, आमचे हक्क मागण्यासाठी हा मोर्चा आहे इ. इ. इ.

In reply to by श्रीगुरुजी

वाहिनी वाले वारी मध्ये पण वारकऱ्यांची मुलखात घेत असतात आणि ते सुद्धा पढवल्या सारखेच बोलत असतात. तुम्ही जर निरागस मुलीच्या भाषणावरून मोर्चा ची टर उडवत असाल तर तुमची टर तुम्हाला लख लाभ. सूचना दिल्या बद्दल धन्यवाद. या पुढे वाहिन्यांना कोणीही बाईट देणे मोर्चा मध्ये नक्की बंद करण्याचा प्रयत्न होईल.

In reply to by विशुमित

वारकर्‍यांच्या मुलाखती पढविलेल्या पोपटाप्रमाणे नसतात. समजा तशा असल्या तरी वारी काढण्यामागे व वारीत सामील होण्यामागे राजकीय अजेंडा नसतो.

In reply to by श्रीगुरुजी

वारकर्‍यांच्या मुलाखती पढविलेल्या पोपटाप्रमाणे नसतात>>>> -- हे कशाच्या आधारावर तुम्ही म्हणताय? तुम्ही वारी मध्ये गेला आहात का कधी? किती तरी वेळा रिटेक घेतात कॅमेरा वाले. तसे वारी मध्ये आता बरेच लोक बरेच अजेंडे घेऊन चालत असतात, तो मोठा विषय आहे, परत कधी तरी..

जे अण्णांचे झाले तेच मोर्चाचे होईल. अण्णानी हाती घेतलेले प्रश्न जाती धर्म यांच्या पलिकडचे होते तरीही.... आज त्या॑ आंदोलनाची काय स्थिती आहे.? इथे तर .......

In reply to by चौकटराजा

अन्नाच्या मोर्चा ने जन माणसात राजकारणा आणि भ्रष्टाचाराप्रती नक्कीच जागरूकता आली आहे. काँग्रेस सत्तेपासून पायउतार झाली. मी स्वतः राशन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, उत्पनाचा दाखला, आणखी इतर सरकारी दाखले 1 रुपयाची सुद्धा लाच न देता काढलेलं आहेत.

बाकी जास्त काही समजतं नाही , आणि समजून घ्यायचं हि नाही. हा, एक कळतं मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर सगळ्यांचं आरक्षण बंद करा. #फुल्ल_अँड_फायनल

In reply to by वैभव पवार

काही समजून न घेता आपल्याच मागण्या पुढे करणे याला बालहट्ट म्हणता येईल! आणि तो पुरवला जाईल अशी शाश्वती नाही! नुसते आरक्षण देऊन प्रश्न सुटणार आहेत का? मुळात असलेल्या प्रश्नांचं मूळ काय आहे ते तरी समजून त्यानुसार उपाय योजना झाल्या पाहिजेत! नुसतेच #डायलॉग मारून काही होत नसते! वाचून राग आल्यास क्षमा असावी!

२०१४ निवडणुकीच्या आधी अगोदरच्या सरकारने घाई घाईने आरक्षणाचा वटहुकूम काढला त्यावर मोठ्या साहेबांचे म्हणणे काय आहे ते पहा. आपल्या राजकीय स्वार्थासाठी अख्ख्या मराठा समाजाला वेठीस धरणाऱ्या या राजकारण्यांबद्दल मराठा समाजाचे डोळे उघडतील तर बरे. आणि याच बरोबर मराठा समाजाची वस्तुस्थिती काय आहे ते ही पहा. We are not a bunch of saints, and if we are going to get political advantage for giving reservations to Marathas and Muslims, then so be it.” http://www.livemint.com/Opinion/76XE10XAWthbQgvyhHjnNN/Will-Maratha-and…

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने राज्यात मराठा समाजासाठी १६ टक्के आणि मुस्लीम समाजासाठी ५ टक्के आरक्षण ठेवण्याचा घेतलेला निर्णय राजकीय स्वरूपाचा आहे. शरद पवार यांनी म्हणूनच स्वच्छपणे सांगून टाकले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा काही साधुसंतांचा पक्ष नसून आरक्षणामुळे जर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राजकीय फायदा होत असेल तर तो घेण्यात काहीही गैर नाही. हेही वाचून घ्या http://www.loksatta.com/vishesh-news/maratha-reservation-from-ambedkari…

मोर्च्यांच नुसत पिक निघालय.बिडला दलित मोर्चा निघाला तो पहायला मिळाला गर्दी पाहुन डोळे फिरले. कुठुन इतके लोक जमा होतात काय ठाउक. आणि मोर्च्यांनी मागण्या पुर्ण होतील असे मला वाटत नाही. मराठा आरक्षण तर कोर्टात टिकणे कठिण आहे। गर्दीने सरटकारवरचा दबाव वाढु शकतो पण कोर्ट काय किती गर्दी जमली यावर आधारीत निकाल देउ शकत नाही. फडणविसांनी खरतर ईबिसी सवलत वाढवुन चांगला निर्णय घेतला आहे.

परवा सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक होते. ते न दिल्याने आणि त्यास मुदतवाढ दिल्याने सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली गेली आहे. न्यायालयाने मराठा समाजाची महाराष्ट्रात किती लोकसंख्या आहे ते विचारले आहे. जर असे असेल तर शासन मराठा आरक्षणात पहिल्याच प्रयत्नात अडकेल. असेही न्यायालयात हे आरक्षण टिकणार नाही. त्यातच मराठा आणि कुणबी या हे एकच असले तरी जात या सदरात ते वेगवेगळे आहेत. यावर सकल मराठ्यांमध्ये फुट पडणार. कुणबी हे ओ.बी.सी. मध्ये आहेत. काही कडे तशी जात प्रमाणपत्रे ही आहेत.

In reply to by जानु

सरकारने दिरंगाई केलेली नाही

सविस्तर बातमी h मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टाने सरकारला फटकारलं नाही : मुख्यमंत्री मुंबई : मराठा आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सरकारने वेळ मागितला नाही, याचिकाकर्त्यांनी मागितलं आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. हायकोर्टाने आम्हाला फाटकारलं नाही, याचिकाकर्त्यांनी वेळ मागितला आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सज्ज आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. अफवांवर विश्वास ठेवू नका, किमान कोर्टाचं खरं सांगत जा, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. यापूर्वीच मराठा आरक्षणावर आपण भूमिका मांडली आहे असं सांगतानाच आरक्षणाने सगळे प्रश्न सुटत नाहीत, असंही फडणवीस म्हणाले. सरकारी कॉलेज मध्ये मराठा समाजाला 900 जागा मिळतील, अशी माहिती त्यांनी दिली. मराठा संघटनांशी चर्चा झाली आहे, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी मागणी नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चुकीच्या गोष्टी पसरवायच्या, भडकवणारी वक्तव्यं करायची, समाजात तेढ निर्माण करायची, हे योग्य नसल्याचंही ते म्हणाले. सरकार सर्व समाजाचा विचार करत आहे, त्यामुळे एका समाजाने दुसऱ्या समाजाविरुद्ध भूमिका घेऊ नये. आम्हाला शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा आहे. शाहू, फुले, आंबेडकरांना अपेक्षित असं वर्तन सगळ्यांकडून व्हावं, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं.

श्रीगुरुजी, तुम्हाला http://aisiakshare.com/node/5569 इथले 'जातपात न मानणार्या विचारवंतां'चे प्रतिसाद फार आवडतील. वाटल्यास खरडफळापण बघा भाप्रवेनुसार २१तारीख रात्रीचा. =))

In reply to by एमी

मराठा मोर्च्यांच्या चर्चांमुळे मला एक गोष्ट लक्षात आली. मी संघवाल्यांना मागास म्हणून प्रचंड नावं ठेवते. पण संघिष्ट आपल्या मुलीबाळींनी शिकावं, नोकऱ्या कराव्या, स्वतंत्र व्हावं म्हणून मेहेनत करतात. माझं स्टँडर्ड फारच वरचं आहे म्हणून मी त्यांना नावं ठेवते, ठेवणारच. पण काय दे दिवस आल्येत, माझ्या ओळखीतले संघवाले अगदीच मागास नाहीत हो, अशी कबुली देण्याची वेळ आल्ये. >> मराठ्यांपेक्षा संघ चांगला आहे म्हणे. सगळ्या मराठा स्त्रिया अशिक्षीत, आयुष्यभर बापाच्या भावाच्या नवर्याच्या मुलाच्या जीवावर जगणार्या, पर्दानशीन आहेत असं काहीसं मत झालं आहे विचारवंतांचं. धन्य आहेत.