✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

खुलता खुळी खुलेना...

न
नीलमोहर यांनी
Fri, 09/30/2016 - 17:33  ·  लेख
लेख
शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :) 'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग, तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते. या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली. आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :) सिरेलचे शीर्षकगीत अत्यंत सुरेल आहे, गायिका श्रेया घोषाल असल्यावर प्रश्नच नाही म्हणा. सिरेलचे एक वेगळेपण म्हणजे त्याचे टायटल मोन्टाज, यात सॅण्ड आर्ट अर्थात वाळू वापरून निर्मित केलेली कला आहे, त्यातून सिरेलच्या कथानकाचा साधारण अंदाज येतो. शीर्षकगीत एकदम अभिनव, प्रेक्षणीय, श्रवणीय झाले आहे, तर अशी ही एक सर्वांगसुंदर मालिका झी मराठीने प्रेक्षकां (चा अंत पाहण्या) साठी आणली आहे. सिरेलचे ट्रेलर पाहिले तेव्हापासूनच उत्सुकता होती, कारण होते नवीन, सुंदर, समंजस, प्रगल्भ (वाटणारे) नायक नायिका, वेगळे वाटणारे कथानक. तेच ते सास बहू अन घरातल्या घरात कट-कारस्थानं दाखवणार्‍या सिरेलांतून हा काहीतरी सुखद बदल वाटत होता म्हणून पाहण्याचे ठरवले. अजून काही सांगता येत नसले तरी सिरेल याच ट्रॅकने पुढे जात राहिली तर मात्र हा समज चुकीचा ठरण्याची चिन्हे जास्त दिसतायत. k3 सुरूवातीच्या काही भागांत, लग्नाच्या वेळी प्रेग्नंट असणारी नायिका, अन हे लग्नाच्या दिवशीच समजणारा डॉक्टर नायक दाखवल्यामुळे हे काहीतरी वेगळेय असे वाटले, पण ते वेगळे म्हणजे टोटली अनबिलीव्हेबल असणार हे आता लक्षात येते आहे, जसजसे दिवस जात आहेत, literally. खी खी खी :) मालिकेत नक्की खुळे कोण याची यादी करायची झाल्यास बाकी कुणी शिल्लक राहील का याबद्दल शंका आहे. पहिली नायिका नं १, तिला आपण M1 म्हणू, शॉर्टफॉर्म यु नो. तर ही एकदम सालस मुलगी ३ महिन्यांची प्रेग्नंट आहे, तिचं लग्नही लागतंय तरी तिला या गोष्टीचा पत्ताच नाहीय, इतकी निष्पाप. वर त्या होणार्‍या बाळाचा पिता कोण हेही तिला ठाऊक नाही हा तर निरागसतेचा कळस.. m1 डॉक्टर नवरा सप्तपदीच्या वेळेस तिचा हात धरतो तेव्हा ती प्रेग्नंट आहे हे त्याला कळतं. ही गोष्ट तो तिला नंतर सांगतो, त्यावर ही बया वर तोंड करून न पटेलशी स्पष्टीकरणंही देते. इज धिस इव्हन पॉसिबल.. (आमच्या डॉक्टर बंधूराजाला विचारलं, असं असतं का, तर उलट मला म्हणे, ती सिरेल आहे, असं असतं का :( तरी तो इथे नाही म्हणून बरं, नाहीतर सिरेल मध्ये समोरचा जे बोलेल, त्याची शाब्दिक चिरफाड करून पूर्णवेळ रनिंग कॉमेंट्री ऐकवणार, हे म्हणे डॉक्टर. असो. हा विषय 'आपले घर: एक प्राणीसंग्रहालय' या लेखमालेसाठी राखून ठेवण्यात आलेला आहे.) दुसरा स्वतः नायक, डॉक्टर V , ज्याला लग्नाच्या दिवशी आपली बायको प्रेग्नंट आहे हे कळतं, तरी तो एक लाडकी आत्या सोडून हे बाकी कुणाकुणाला सांगत नाही, का तर स्वतःच्या आयुष्याची सोडून, त्याला इतर सर्वांची काळजी. त्यागी परोपकारी महात्मे या भूतलावर असल्याचे हा मूर्तिमंत उदाहरण. एवढा गोंडस, समंजस नायक कायम उदास राहतो ते अगदीच बघवत नाही. त्याला कोणीतरी गदागदा हलवा, जागे करा असं वाटत राहतं. कथानक पुढे सरकतेय तसतसा हा माणूस अजून अगम्य वागत चाललाय. का तर म्हणे बायकोच्या आधीच्या प्रकरणातून जन्मणार असलेल्या बाळाला आपले नाव देऊ असे वचन त्याने त्या दिवट्या बायकोला दिलेले असते. शिवाय त्या डबल M ना आईवडिल नसतात, मग त्यांचा सांभाळ करणार्‍या त्यांच्या वयोवृध्द आजी आजोबांना कुठलाही धक्का द्यायचा नाही म्हणे. अरे पण त्या दिवटीला लहानपाणापासून ओळखणार्‍या त्यांना तिचे (उधळलेले) गुण अजून माहित नसतील हे शक्य आहे का ?? अरे देवा, व्हॉट्स गोइंग ऑन रे बाबा .. !! तर त्यासाठी तो खोट्यावर खोटे बोलत रहतो. तेही आपल्या घरच्यांसमोर, मुख्य म्हणजे आजीसमोर जी घर मातृसत्ताक पद्धतीने चालवत असते, संपूर्ण घरात जिच्या शब्दाबाहेर जाण्याची कोणाची हिंमत नसते आणि महत्वाचे म्हणजे, जिला खोटे बोललेले अजिबात चालत नसते म्हणे. तिसरी, M1 ची बहिण, M2, MBBS करणारी, अर्थात अभ्यास, कामबीम सोडून बाकीचं सगळं करतांना दिसणारी. ही आहे मात्र गोड, सुंदर, मुख्य म्हणजे प्रगल्भ, अशा नायिका फार कमी असल्यामुळे तिला सगळं माफ :) m2 आपल्या बहिणीच्या चुका, आतताईपणा सगळे दिसतेय पण ती काही करू शकत नाही, V ला सपोर्ट करणे सोडून. पुढेमागे हिची आणि V ची जोडी जुळणार, ते कसे हा कथानकाचा मुख्य भाग. तो येईपर्यंत रामा, शिवा, गोविंदा.. बाकी आजीबद्दल काय बोलावं, दुसर्‍यांच्या चूका काढतांना आपण स्वतः किती चुकतोय याकडे सपशेल दुर्लक्ष करणारी. कुठल्याही गोष्टीची व्यवस्थित शहानिशा न करता सगळ्या घरावर केवळ आपला दरारा आणि हुकूमशाही चालवणे हा हिचा मुख्य उद्योग. मग V ची आई, अर्थात कधी किचन न सोडणारी, सोशिक, कनवाळू, मायाळू, उठसूठ अगंबाई, अगंबाई !! आणि मी आलेच हं.. हे हिचे पेटंट शब्द. V चुकलाय असे समजून त्याच्याशी बोलण्यावर बहिष्कार टाकायला लावणार्‍या सासूसमोर काही न बोलणारी, उलट तिच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडणारी. बाकी V चे पिताश्री, काकाश्री, काकूश्री इतर, सगळे एका माळेचे मणी, कुणालाच कसले प्रश्न पडत नाहीत, पडले तरी ते सोडवत नाहीत, तसं तर तसं, मम म्हणणारे. एक फक्त आत्या आहे, तीही डॉक्टर आहे, जिला V ने लग्नादिवशीच हा प्रकार सांगितलाय, ती त्याच्या बाजूने आहे, तिलाही हा अन्याय अजिबात पटत नाही, अर्थात त्याने काहीच फरक पडत नाही. स्वतः धडाधड चुका करून वर घरच्यांच्या डोक्यावर मिरे वाटणारी नायिका, सोशिक त्यागमूर्ती नायक, हे सर्व नुसतेच बघत राहणारी अजून एक नायिका, असे सगळे मिळून जीव नकोसा करतात. कालच्या भागात तर टेबलाच्या एका बाजूला V अन दुसर्‍या बाजूला M2, असे दोघे दोन्हीकडे मूकपणे टिपे गाळतायत, तेही तिसर्‍याच्या चुकीसाठी, असे दृश्य. ते बघून दोघांनाही समुद्रात एक डुबकी मारून, नाकातोंडात पाणी जाईपर्यंत, श्वास कोंडेपर्यंत तसेच ठेवावे आणि जरा डोकं असल्यासारखे वागाल का नाही असे विचारावे, हो म्हटल्यावरच बाहेर काढावे असे वाटले. सिरेलच्या निर्माता दिग्दर्शकांनी प्रेक्षकांच्या डोक्याचा पार भुगा होईल, सहनशक्तीला सुरुंग लागतील, याची पुरेपूर काळजी घेतलीय. ही सर्व सर्कस पाहून त्या गरीब, सोशिक प्रेक्षकाला मात्र जोरात ओरडावंसं वाटतं, "अरे काय हे... असं कुठे असतं का ?? तुम्हाला कुणालाच मेंदू नावाची गोष्ट नाहीय का, आणि असेल तरी त्याचा वापर करायचाच नाही असे ठरवलेय का..?? ईश्वर या सर्व लोकांना सद्बुध्दी देवो आणि त्यांनी थोडेफार तरी लॉजिक वापरून सिरेल योग्य मार्गाने पुढे न्यावी, अशी प्रार्थना करण्याखेरीज गरीब बिचारा प्रेक्षक अजून काय करू शकतो. सिरेल बघायची नाही हा पर्याय असूनही, कदाचित पुढे काही बदलेल, चांगले घडेल या आशेने तो बघत राहतो. शेवटी आपण भारतीय नेहमी आशावादी. तसे पुढे चांगले घडेलही, घडावे, आमेन... !!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
बालकथा
राहणी
औषधोपचार
राहती जागा
गुंतवणूक
फलज्योतिष
राजकारण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना
शुभेच्छा
आस्वाद
माध्यमवेध
अनुभव
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
40142 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

त्या हिरवनीला गालावर गोग्गोड

महासंग्राम
Fri, 09/30/2016 - 17:45 नवीन
त्या हिरवनीला गालावर गोग्गोड खळी पडते, त्यामुळे अभ्यास वगैरे सर्व माफ, बाकी सगळे डोक्यात बाद प्रकार आहे.
  • Log in or register to post comments

हायला, नुसत्या खळीपायी सगळं

अभ्या..
Fri, 09/30/2016 - 19:00 नवीन
हायला, नुसत्या खळीपायी सगळं माफ असतय व्हय. भारीच की. आम्हाला कोण नाही माफ करत. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

पार्शिलीटी

पाटीलभाऊ
Fri, 09/30/2016 - 19:13 नवीन
अहो...तुमची खळी गोग्गोड नसेल कदाचित...! बाकी ती हिरवनी...मग पार्शिलीटी तर व्हनारच ...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हम्म. सलूनवाला पण तक्रार करतो

अभ्या..
Fri, 09/30/2016 - 19:18 नवीन
हम्म. सलूनवाला पण तक्रार करतो. शेव्हिंग जमत नाहि ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ

ढाढी करावीच कशाला म्हणतो मी .

अद्द्या
Sat, 10/01/2016 - 12:25 नवीन
ढाढी करावीच कशाला म्हणतो मी .. अभ्या "काका " असं बारसं कोणी तरी केलेलंच आहे .. आता अभ्या बाबाजी पण होईल .. त्यात काय एवढं =]]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मग तो विषयच नई ना भौ. मला

महासंग्राम
Sat, 10/01/2016 - 10:27 नवीन
मग तो विषयच नई ना भौ. मला अजूनही आठवते २२ जुलै ला मालिकेचा पहिला भाग होता, तेव्हा गावावरून पुण्याला यायला निघालो होतो पण, फक्त या खळी पाई गाडी हुकणार होती. ट्रॅव्हल्स वाला फोन करून करून बेजार झाला. शेवटी पहिला भाग पाहूनच निघालो होतो. आणि तोच शेवटचा भाग होता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

!@#$% शिरेलीच्या

पैसा
Fri, 09/30/2016 - 17:50 नवीन
असा माणूस खरा कुठे दिसला तर त्याचा लकडीपुलावर झाईर सत्कार करू म्हटले मी, तर अजून एकजण म्हणे, लकडीपुलावर ट्रॅफिक जाम होईल. त्यापेक्षा शन्वारवाड्यावर करू. नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली. ती आत्या मेडिकल कॉन्फरन्सला गर्भसंस्कार या विषयावर मराठीत भाषण करते. दोन दिवसापूर्वी हाब्यास करणारी नायिका अचानक फश्ट क्लासमधे यम्बीबीयश झाल्याचे सांगत पेढे घेऊन येते. बहुधा एक्स्टर्नल परीक्षा देत असावी. वगैरे बरेच अचंबित करणारे प्रकार आहेत. खलनायिका जानेवारी महिन्यात डिलिव्हरीला ड्यु आहे मात्र कोणत्या वर्षाचा जानेवारी ते साल्यानी सांगितलेच नाही! ही माबोवरची हाईट्ट प्रतिक्रिया. =))
  • Log in or register to post comments

!@#$% शिरेलीच्या...

संजय पाटिल
Fri, 09/30/2016 - 18:18 नवीन
!@#$% शिरेलीच्या... कशाला बघून डोक्याला शॉट लावून घेताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अहो खाली लिहिलय बघा

पैसा
Fri, 09/30/2016 - 18:22 नवीन
नवर्‍याला रिमोट द्यायचा नाही हा मुख्य हेतू आहे. दुसरा काहीतरी चांगला मराठी पर्याय सुचवा प्लीज. स्टार वाले यांचे बाप आहेत. ते नको. तसेही चार दिवसात आम्चे शिनेर सिटिझन्स येणारेत. मग मला काही पर्याय शिल्लक नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

दुसरा पर्याय आहे पण हिन्दीत आहे

मारवा
Fri, 09/30/2016 - 18:51 नवीन
राष्ट्रभाषेतला चालेल का पहले मै बहोत मोटा था..... सब हसते थे..... ७९९ का बेल्ट पहना अब म्म्म्म्म्म्म्म्म्म........ एव्हरग्रीन ऑप्शन अभी कॉल कीजीए
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))

पैसा
Fri, 09/30/2016 - 18:55 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

कार्टून नेटवर्क ??

अद्द्या
Sat, 10/01/2016 - 12:27 नवीन
कार्टून नेटवर्क ?? पण त्यात हि आजकाल राम राहिला नाही .. कुठे ते dragon ball z आणि swat cats.. कुठे आत्ताची झुरळं .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट

तेजस आठवले
Fri, 09/30/2016 - 18:31 नवीन
नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली
हे शक्य असावे. नाडी बघून बऱ्याच गोष्टींचा अंदाज वर्तवणारे डॉक्टर पाहिले आहेत. तसेच नाडी बघून गर्भार असणे सांगितलेले बघितले आहे.नाडीपरीक्षा या विषयाबद्दल आयुर्वेदिक शिक्षण घेतलेले मिपावरील वैद्य अधिक माहिती सांगू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बिनडोक मालिका आहे ती!

पामर
Mon, 10/03/2016 - 15:25 नवीन
एक तर सप्तपदी वा पाणिग्रहण ह्या विधित वराने वधुचा फक्त हात हातात घेणे अपेक्षित आहे, मनगट पकडणे नाही. लग्नाच्या विधित फिरत असताना त्याला नाडी-परिक्षा जमत असेल तर धन्वन्तरि बेशुध्द पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

पैसांचा बंदा प्रतिसाद

मारवा
Fri, 09/30/2016 - 17:58 नवीन
लय मजा येणारे या धाग्याचे प्रतिसाद वाचतांना. उत्सुकता शिगेला.....
  • Log in or register to post comments

सगळे मान्यच!

रेवती
Fri, 09/30/2016 - 18:03 नवीन
सगळे मान्यच! शिरेला त्यातील बीन्डोक ष्टोर्‍यांमुळे आवडत नसतील तर टीव्ही बंद ठेवायचा/ च्यानल बदलायचा पर्याय आहे असे मला आधी वाटायचे, अजूनही वाटते. किंबहुना एका शिरेलीचे लेखन करणार्‍या महिलेनं तसंच सुचवलय. व्यवसायीक यश मिळवणार्‍या कथा आम्ही लिहितो, च्यानलचीही ती मागणी असते वगैरे. जशी सध्या मी सक्तिने सिरियलांची प्रेक्षक झालिये तसा प्रेक्षकांचा नाईलाज कळतोय. च्यानल बदलणे, टीव्ही बंद करणे हे पर्याय सुचवणे हे म्हण्जे आमच्या दुकानात हेच उपलब्ध आहे, घ्यायचे तर घ्या, नैतर चालते व्हा! म्हणण्यासारखे आहे. एकवेळ दुकानातून निघून येणे शक्य आहे. इथे आमच्याच घरात दुकान थाटून नाईलाज लादण्यासारखे आहे. मला टीव्हीकडे पाठ फिरवून जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अनेक वयस्क, आजारी लोकांना उपलब्ध असलेल्या एकमेव पर्यायाला शरण जाण्याशिवाय इलाज नाही.
  • Log in or register to post comments

बाकी आज्जींच्या बोलण्याच्या

आदूबाळ
Fri, 09/30/2016 - 18:07 नवीन
बाकी आज्जींच्या बोलण्याच्या स्टाईलची नक्कल करायला जाम मजा येते. "अरे विक्रांत, चड्डीची नाडी बांधलीयस ना नीट?" किंवा "अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये" वगैरे आचरट वाक्यं बोलून पहावीत.
  • Log in or register to post comments

आदुबाळ साहेब

मारवा
Fri, 09/30/2016 - 18:16 नवीन
नाही उदाहरणच आहे हे मान्य आहे पण विक्रांतच्या नाडी बांधण्याची खातरजमा एकीकडे..... किंवा ची किंचीतशी भिंत ओलांडुन लगेच मोनिका समोर येते आता भेदरलेला बोका थोड नाही म्हटल तरी थोड नाही म्हटल तरी काहीबाही तरळुन जातच की हो डोल्यासमोर झर्र्क्कन मग आम्हाला उगीचच वाटत साला आबाला अस म्हणायच असेल तस सुचवायच असेल नाही म्हणजे तुमचा रेकॉर्ड खराब आहे म्हणुन अस आनंद ध्वज वगैरे सुचत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

लोल! माझं एक जाऊदे.

आदूबाळ
Fri, 09/30/2016 - 18:25 नवीन
लोल! माझं एक जाऊदे. आज्जींच्या वयाचा तरी विचार करा हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

सॉरी सॉरी फॅमिली धागा आहे

मारवा
Fri, 09/30/2016 - 19:03 नवीन
फॅमिली धागा आहे विसरलोच होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मामो ऑन

नाखु
Sat, 10/01/2016 - 08:40 नवीन
"अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये, आणि बोका नसेल तर शेजार्यांचा पण रिकाम्या पायाने परत येऊ नकोस"माणसाने चांगल्या कामात हयगय करू नये असे आमचे हे नेहमी म्हणतात" मामो ऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आमच्या शेजा-यांची आणि तुमची ओळख आहे की काय?

बोका-ए-आझम
Sun, 10/02/2016 - 14:56 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

पात्र निवड

पैसा
Fri, 09/30/2016 - 18:12 नवीन
पात्र निवड हे एक राहिलंच. संजय मोने आणि सविता प्रभुणे यांच्यासारखे कलाकार घेतलेत ते "अग्गबाई" "अरेच्चा!" एवढ्याचसाठी का? नवरा सबंध वेळ टाईम्स नाऊ वरच्या अर्णवच्या आरडाओरडा म्याचेस लावतो म्हणून मी त्याच्याकडून रिमोट काढून घेऊन एक/दोन मराठी शिरेल बघायला सुरुवात केली तर शिंची मलाच शिक्षा झाली ती! !@#$%^&
  • Log in or register to post comments

झी युवा वरच्या शिरेली पहा

महासंग्राम
Fri, 09/30/2016 - 18:15 नवीन
झी युवा वरच्या शिरेली पहा बऱ्यापैकी बघणेबल असतात. फ्रेशर्स, दिल तो बच्चा है जी वर आधारलेली 'लव्ह लग्न लोचा' बरी असते 'खूखूखू' पेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बघणॅबल शब्द आवडण्यात आलेला आहे

मारवा
Fri, 09/30/2016 - 18:20 नवीन
बघणेबल थोडासा एडिबल च्या जवळ वाटतो. म्हणजे खाण्याजोगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

ते खाणेबल असं आहे.. बेशुद्ध

आनन्दिता
Fri, 09/30/2016 - 19:28 नवीन
ते खाणेबल असं आहे.. बे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

सहमत आह्

मयुरेष
Fri, 09/30/2016 - 23:54 नवीन
Z युवा बरा वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

याड लागल रं.

मयुरेष
Sat, 10/01/2016 - 00:01 नवीन
वेड लागायचं बाकी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

झीट मराठी आता उच्छाद आणतंय.....

माम्लेदारचा पन्खा
Fri, 09/30/2016 - 18:15 नवीन
ही मालिका तर बथ्थड आहेच....बाकीही उजेडच आहे... कथाबीज वगैरे प्रकार वावदूक असतात असा ह्यांचा समज असावा.... कुठे त्या जुन्या दूरदर्शनच्या सकस मालिका आणि कुठे हे ह्यांचं २ मिनिटाचं फास्टफूड.... नो मनोरंजन...केवळ मनस्ताप !
  • Log in or register to post comments

M2 ही माझ्या लेकाचा लेटेस्ट

अजया
Fri, 09/30/2016 - 18:22 नवीन
M2 ही माझ्या लेकाचा लेटेस्ट क्रश आहे ;) त्यामुळे तो रोज तिचे दर्शन घ्यायला ही मालिका लावतो.मन लावून बघतो. त्यावर आम्ही एक चर्चा पण केली! असली सुंदर पण माठ वाटणारी तुला चालणारे का.तर त्याने तो क्रश्ड असल्याने रोज बघायला छान आहे मग चालेल ढ असे उत्तर देऊन मला निरूत्तर केलंय. एकूण तिकडे कळी खुलली नाही तरी लेकाची नक्कीच खुलली आहे या शिरेलीमुळे!
  • Log in or register to post comments

अगं हे निदान त्याच्या वयामुळे

रेवती
Fri, 09/30/2016 - 18:30 नवीन
अगं हे निदान त्याच्या वयामुळे असं झालय हे समाधान नाही का तुला? आमच्या पोराला त्यातील फक्त आज्जी लक्षात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

तुमच्या लेकाच्या क्रश साठी +

महासंग्राम
Fri, 09/30/2016 - 18:30 नवीन
तुमच्या लेकाच्या क्रश साठी + 111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

तो फिर बात पक्की समझु ?

मारवा
Fri, 09/30/2016 - 18:53 नवीन
एकूण तिकडे कळी खुलली नाही तरी लेकाची नक्कीच खुलली आहे या शिरेलीमुळे!
तो फिर बात पक्की समझु ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

समजा समजा.मला लवकर सून येईल

अजया
Fri, 09/30/2016 - 21:29 नवीन
समजा समजा.मला लवकर सून येईल.मग गायडन्स म्हणून मी शिरेली बघेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

काय बिशाद आहे

नाखु
Sat, 10/01/2016 - 08:46 नवीन
सुनेची सासूसमोर दात काढायची?.....गालावर खळ्यांचे राज्य येईल. भावी सुनांनी,संभाव्य सासवांनी,दातांनी,कळींनी आणि शिरेल प्रेक्षकांनी हलके घ्यावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

=))))

अजया
Sat, 10/01/2016 - 09:13 नवीन
=))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अ‍ॅक्च्युअली ताज्या ताज्या दाम्पत्य जीवनात अनेक

मारवा
Fri, 09/30/2016 - 18:59 नवीन
गमती जमती असतात अनेक हळुवार क्षण असतात उदा. नविन लग्न झालेले जेव्हा नविन नविन फिरायला जातात ( मी थोडा जुन्या पिढीविषयी बोलतोय म्हणजे कार वगैरे नसलेले पायी फिरायला जाणारे ) तेव्हा एक गंमत असते मुलगा पुढे पुढे जातो कधी कधी मुलगी एकदम पुढे जाते अस पुढे मागे चालण्यात नविन दाम्पत्यात होत असत. मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते. हे साले सिरीयलवाले काहीतरी मोठ टेन्शन पहीलेच क्रिएट करतात काय वेगळ दाखवत नाही आपल्याला स्क्रिप्ट देत नाही ही एक तक्रार आहेच नायत नवविवाहीत दाम्पत्याच्या कितीतरी गमती जमती आहेत....
  • Log in or register to post comments

क्या बात है! पुरानी यादें

एस
Fri, 09/30/2016 - 19:20 नवीन
क्या बात है! पुरानी यादें ताज़ा कर दी जनाब आप ने तो। ते 'कधीतरी चुकून धक्का लागणे' चं रुपांतर नंतर 'मुद्दाम धक्का मारून खोडी काढणे' मध्ये होतं. मग अजून काही काळाने 'अरेच्चा, ही कुठे राहिली!'. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

अगदी,

नीलमोहर
Sat, 10/01/2016 - 15:52 नवीन
' मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते.' - आणि असा एखाद चुकार धक्का लागला की जो ४४० चा करंट बसतो.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

ह्या सिरिअल्स बघणार्‍यांचे

अभ्या..
Fri, 09/30/2016 - 19:02 नवीन
ह्या सिरिअल्स बघणार्‍यांचे अभिणंडण. त्याची चर्चा करणार्‍यांचे डब्बल अभिणंडण ह्यावरसुध्द्दा जिलब्या पाडणार्‍याला तर काय म्हणावे? . दुदुदुदुदुदुदुदुद
  • Log in or register to post comments

.

नीलमोहर
Sat, 10/01/2016 - 15:56 नवीन
रेड एफेम वर ऐकूयात हे ऑल टाईम हिट्ट गाणं, ' जळणेवाले तो जळते रहेंगे, हाथों को अपने मळते रहेंगे..'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मी चुकुन 'हाथीको अपने मळते

अभ्या..
Sat, 10/01/2016 - 16:08 नवीन
मी चुकुन 'हाथीको अपने मळते रहेंगे' वाचले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

लिस्टीजिलब्यांपेक्षा या काय वाईट आहेत मी म्हणतो

मारवा
Fri, 09/30/2016 - 19:05 नवीन
माजी आवडती २० सीरीयल्स पेक्षा काय वाईट जिलबी आहे. असलीच जिलबी तर अफगाण आहे.
  • Log in or register to post comments

मला त्या शीर्षक गीतात श्रेया

एस
Fri, 09/30/2016 - 19:25 नवीन
मला त्या शीर्षक गीतात श्रेया घोषाल बाईंनी काहीकाही चुका केल्यात असं वाटत राहतं ऐकताना. उदा. 'खुलता' ऐवजी ती थोडासा 'खलता' असं म्हणते. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरे ही का तरीही सारी मिटेना हीच प्रीती, हीच भीती वीण दोघांतली ही तुटेना हेच कोडे रोज थोडे   सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळी ही खुलेना वाट चुकल्या या मनाची  आज खुलता कळी ही खुलेना अजून एक काहीतरी चूक बायकोनं सांगितली होती. तिला विचारून सांगतो.
  • Log in or register to post comments

+१

रातराणी
Fri, 09/30/2016 - 22:44 नवीन
खीखीखी. मराठी हिंदी सिरेलेंच्या वाट्याला शहाण्या माणसाने लागू नये. शीर्षकगीत बरे आहे. आस मकल्या जीवनाची असं काहीतरी ऐकू आलं. तुम्ही दिलेले गाण्याचे बोल वाचल्यावर ते आस मुकल्या जीवनाची आहे हे कळलं. आताच बया का मधे सिक्सर मारला श्रेयानी. ह्या गाण्याला पाट्या टाकल्या सारख्या वाटल्या. सगळ्यात बेस्ट शीर्षकगीत वादळवाटचं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

बरं झालं मी टीव्ही पाहत नाही.

सतिश गावडे
Fri, 09/30/2016 - 19:29 नवीन
बरं झालं मी टीव्ही पाहत नाही. आणि तुम्ही टीव्ही पाहता हे चांगलं आहे. त्यामुळे असे खुसखुशीत लेख आणि त्यावरील प्रतिक्रया वाचायला मिळतात.
  • Log in or register to post comments

कवि अनिल यांचा अपमान

रमेश आठवले
Fri, 09/30/2016 - 21:00 नवीन
अनिल ( आ. रा . देशपांडे ) यांनी लिहिलेल्या आणि कुमार गन्धर्वं यांनी गाऊन अजरामर केलेल्या 'खुलता कळी खुलेना' या शब्दांचे पालुपद असलेल्या भावपूर्ण कवितेचा या सीरिअल साठी केलेला वापर विकृत आहे . मूळ गीतातील भावनांशी सीरिअल मधील कथेचा आणि तीच्या सुरवातीला केलेल्या चित्रीकरणाचा सुतराम सबंध नाही.
  • Log in or register to post comments

:)

मन१
Fri, 09/30/2016 - 21:35 नवीन
भारिच. शीर्षक विशेष आवडलं. "या गो लाजिरवाण्या घरात"ची आठवण झाली.
ईश्वर या सर्व लोकांना सद्बुध्दी देवो आणि त्यांनी थोडेफार तरी लॉजिक वापरून सिरेल योग्य मार्गाने पुढे न्यावी, अशी प्रार्थना करण्याखेरीज गरीब बिचारा प्रेक्षक अजून काय करू शकतो. सिरेल बघायची नाही हा पर्याय असूनही, कदाचित पुढे काही बदलेल, चांगले घडेल या आशेने तो बघत राहतो. शेवटी आपण भारतीय नेहमी आशावादी. तसे पुढे चांगले घडेलही, घडावे, आमेन... !!
ह्याच्याशी विशेष जोडून घेउ शकलो. कारण "काहे दिया परदेस", "होणार सून मी" ... वगैरेचे काही एपिसोड्स बघावे लागलेत. ;)
  • Log in or register to post comments

तुमच्या दुःखात सहभागी आहोत,

टवाळ कार्टा
Sat, 10/01/2016 - 00:06 नवीन
तुमच्या दुःखात सहभागी आहोत, बाकी लेख मस्तय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

मस्तं लेख :)

पद्मावति
Sat, 10/01/2016 - 00:42 नवीन
मस्तं लेख :) आत्ताच यु टुयुब वर आठ दहा एपिसोड्स पाहून आले. प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे त्यामुळे बरं आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा