खुलता खुळी खुलेना...
शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :)
'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग,
तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते.
या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार
लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली.
आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :)
सिरेलचे शीर्षकगीत अत्यंत सुरेल आहे, गायिका श्रेया घोषाल असल्यावर प्रश्नच नाही म्हणा. सिरेलचे एक वेगळेपण
म्हणजे त्याचे टायटल मोन्टाज, यात सॅण्ड आर्ट अर्थात वाळू वापरून निर्मित केलेली कला आहे, त्यातून सिरेलच्या
कथानकाचा साधारण अंदाज येतो. शीर्षकगीत एकदम अभिनव, प्रेक्षणीय, श्रवणीय झाले आहे,
तर अशी ही एक सर्वांगसुंदर मालिका झी मराठीने प्रेक्षकां (चा अंत पाहण्या) साठी आणली आहे. सिरेलचे ट्रेलर
पाहिले तेव्हापासूनच उत्सुकता होती, कारण होते नवीन, सुंदर, समंजस, प्रगल्भ (वाटणारे) नायक नायिका,
वेगळे वाटणारे कथानक. तेच ते सास बहू अन घरातल्या घरात कट-कारस्थानं दाखवणार्या सिरेलांतून हा
काहीतरी सुखद बदल वाटत होता म्हणून पाहण्याचे ठरवले. अजून काही सांगता येत नसले तरी सिरेल याच
ट्रॅकने पुढे जात राहिली तर मात्र हा समज चुकीचा ठरण्याची चिन्हे जास्त दिसतायत.
सुरूवातीच्या काही भागांत, लग्नाच्या वेळी प्रेग्नंट असणारी नायिका, अन हे लग्नाच्या दिवशीच समजणारा
डॉक्टर नायक दाखवल्यामुळे हे काहीतरी वेगळेय असे वाटले, पण ते वेगळे म्हणजे टोटली अनबिलीव्हेबल असणार
हे आता लक्षात येते आहे, जसजसे दिवस जात आहेत, literally. खी खी खी :)
मालिकेत नक्की खुळे कोण याची यादी करायची झाल्यास बाकी कुणी शिल्लक राहील का याबद्दल शंका आहे.
पहिली नायिका नं १, तिला आपण M1 म्हणू, शॉर्टफॉर्म यु नो.
तर ही एकदम सालस मुलगी ३ महिन्यांची प्रेग्नंट आहे, तिचं लग्नही लागतंय तरी तिला या गोष्टीचा पत्ताच
नाहीय, इतकी निष्पाप. वर त्या होणार्या बाळाचा पिता कोण हेही तिला ठाऊक नाही हा तर निरागसतेचा कळस..
डॉक्टर नवरा सप्तपदीच्या वेळेस तिचा हात धरतो तेव्हा ती प्रेग्नंट आहे हे त्याला कळतं. ही गोष्ट तो तिला नंतर
सांगतो, त्यावर ही बया वर तोंड करून न पटेलशी स्पष्टीकरणंही देते. इज धिस इव्हन पॉसिबल..
(आमच्या डॉक्टर बंधूराजाला विचारलं, असं असतं का, तर उलट मला म्हणे, ती सिरेल आहे, असं असतं का :(
तरी तो इथे नाही म्हणून बरं, नाहीतर सिरेल मध्ये समोरचा जे बोलेल, त्याची शाब्दिक चिरफाड करून पूर्णवेळ
रनिंग कॉमेंट्री ऐकवणार, हे म्हणे डॉक्टर. असो. हा विषय 'आपले घर: एक प्राणीसंग्रहालय' या लेखमालेसाठी
राखून ठेवण्यात आलेला आहे.)
दुसरा स्वतः नायक, डॉक्टर V , ज्याला लग्नाच्या दिवशी आपली बायको प्रेग्नंट आहे हे कळतं, तरी तो एक
लाडकी आत्या सोडून हे बाकी कुणाकुणाला सांगत नाही, का तर स्वतःच्या आयुष्याची सोडून, त्याला इतर सर्वांची
काळजी. त्यागी परोपकारी महात्मे या भूतलावर असल्याचे हा मूर्तिमंत उदाहरण. एवढा गोंडस, समंजस नायक
कायम उदास राहतो ते अगदीच बघवत नाही. त्याला कोणीतरी गदागदा हलवा, जागे करा असं वाटत राहतं.
कथानक पुढे सरकतेय तसतसा हा माणूस अजून अगम्य वागत चाललाय. का तर म्हणे बायकोच्या आधीच्या
प्रकरणातून जन्मणार असलेल्या बाळाला आपले नाव देऊ असे वचन त्याने त्या दिवट्या बायकोला दिलेले असते.
शिवाय त्या डबल M ना आईवडिल नसतात, मग त्यांचा सांभाळ करणार्या त्यांच्या वयोवृध्द आजी आजोबांना
कुठलाही धक्का द्यायचा नाही म्हणे. अरे पण त्या दिवटीला लहानपाणापासून ओळखणार्या त्यांना तिचे
(उधळलेले) गुण अजून माहित नसतील हे शक्य आहे का ?? अरे देवा, व्हॉट्स गोइंग ऑन रे बाबा .. !!
तर त्यासाठी तो खोट्यावर खोटे बोलत रहतो. तेही आपल्या घरच्यांसमोर, मुख्य म्हणजे आजीसमोर जी घर
मातृसत्ताक पद्धतीने चालवत असते, संपूर्ण घरात जिच्या शब्दाबाहेर जाण्याची कोणाची हिंमत नसते आणि
महत्वाचे म्हणजे, जिला खोटे बोललेले अजिबात चालत नसते म्हणे.
तिसरी, M1 ची बहिण, M2, MBBS करणारी, अर्थात अभ्यास, कामबीम सोडून बाकीचं सगळं करतांना दिसणारी.
ही आहे मात्र गोड, सुंदर, मुख्य म्हणजे प्रगल्भ, अशा नायिका फार कमी असल्यामुळे तिला सगळं माफ :)
आपल्या बहिणीच्या चुका, आतताईपणा सगळे दिसतेय पण ती काही करू शकत नाही, V ला सपोर्ट करणे सोडून.
पुढेमागे हिची आणि V ची जोडी जुळणार, ते कसे हा कथानकाचा मुख्य भाग. तो येईपर्यंत रामा, शिवा, गोविंदा..
बाकी आजीबद्दल काय बोलावं, दुसर्यांच्या चूका काढतांना आपण स्वतः किती चुकतोय याकडे सपशेल दुर्लक्ष
करणारी. कुठल्याही गोष्टीची व्यवस्थित शहानिशा न करता सगळ्या घरावर केवळ आपला दरारा आणि हुकूमशाही
चालवणे हा हिचा मुख्य उद्योग.
मग V ची आई, अर्थात कधी किचन न सोडणारी, सोशिक, कनवाळू, मायाळू, उठसूठ अगंबाई, अगंबाई !!
आणि मी आलेच हं.. हे हिचे पेटंट शब्द. V चुकलाय असे समजून त्याच्याशी बोलण्यावर बहिष्कार टाकायला
लावणार्या सासूसमोर काही न बोलणारी, उलट तिच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडणारी.
बाकी V चे पिताश्री, काकाश्री, काकूश्री इतर, सगळे एका माळेचे मणी, कुणालाच कसले प्रश्न पडत नाहीत,
पडले तरी ते सोडवत नाहीत, तसं तर तसं, मम म्हणणारे. एक फक्त आत्या आहे, तीही डॉक्टर आहे,
जिला V ने लग्नादिवशीच हा प्रकार सांगितलाय, ती त्याच्या बाजूने आहे, तिलाही हा अन्याय अजिबात पटत नाही,
अर्थात त्याने काहीच फरक पडत नाही.
स्वतः धडाधड चुका करून वर घरच्यांच्या डोक्यावर मिरे वाटणारी नायिका, सोशिक त्यागमूर्ती नायक, हे सर्व
नुसतेच बघत राहणारी अजून एक नायिका, असे सगळे मिळून जीव नकोसा करतात.
कालच्या भागात तर टेबलाच्या एका बाजूला V अन दुसर्या बाजूला M2, असे दोघे दोन्हीकडे मूकपणे टिपे
गाळतायत, तेही तिसर्याच्या चुकीसाठी, असे दृश्य. ते बघून दोघांनाही समुद्रात एक डुबकी मारून, नाकातोंडात
पाणी जाईपर्यंत, श्वास कोंडेपर्यंत तसेच ठेवावे आणि जरा डोकं असल्यासारखे वागाल का नाही असे विचारावे,
हो म्हटल्यावरच बाहेर काढावे असे वाटले.
सिरेलच्या निर्माता दिग्दर्शकांनी प्रेक्षकांच्या डोक्याचा पार भुगा होईल, सहनशक्तीला सुरुंग लागतील, याची
पुरेपूर काळजी घेतलीय. ही सर्व सर्कस पाहून त्या गरीब, सोशिक प्रेक्षकाला मात्र जोरात ओरडावंसं वाटतं,
"अरे काय हे... असं कुठे असतं का ?? तुम्हाला कुणालाच मेंदू नावाची गोष्ट नाहीय का, आणि असेल
तरी त्याचा वापर करायचाच नाही असे ठरवलेय का..??
ईश्वर या सर्व लोकांना सद्बुध्दी देवो आणि त्यांनी थोडेफार तरी लॉजिक वापरून सिरेल योग्य मार्गाने पुढे न्यावी,
अशी प्रार्थना करण्याखेरीज गरीब बिचारा प्रेक्षक अजून काय करू शकतो. सिरेल बघायची नाही हा पर्याय असूनही,
कदाचित पुढे काही बदलेल, चांगले घडेल या आशेने तो बघत राहतो. शेवटी आपण भारतीय नेहमी आशावादी.
तसे पुढे चांगले घडेलही, घडावे, आमेन... !!

वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्या हिरवनीला गालावर गोग्गोड
हायला, नुसत्या खळीपायी सगळं
पार्शिलीटी
हम्म. सलूनवाला पण तक्रार करतो
ढाढी करावीच कशाला म्हणतो मी .
मग तो विषयच नई ना भौ. मला
!@#$% शिरेलीच्या
!@#$% शिरेलीच्या...
अहो खाली लिहिलय बघा
दुसरा पर्याय आहे पण हिन्दीत आहे
=))
कार्टून नेटवर्क ??
नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट
बिनडोक मालिका आहे ती!
पैसांचा बंदा प्रतिसाद
सगळे मान्यच!
बाकी आज्जींच्या बोलण्याच्या
आदुबाळ साहेब
लोल! माझं एक जाऊदे.
सॉरी सॉरी फॅमिली धागा आहे
मामो ऑन
आमच्या शेजा-यांची आणि तुमची ओळख आहे की काय?
पात्र निवड
झी युवा वरच्या शिरेली पहा
बघणॅबल शब्द आवडण्यात आलेला आहे
ते खाणेबल असं आहे.. बेशुद्ध
सहमत आह्
याड लागल रं.
झीट मराठी आता उच्छाद आणतंय.....
M2 ही माझ्या लेकाचा लेटेस्ट
अगं हे निदान त्याच्या वयामुळे
तुमच्या लेकाच्या क्रश साठी +
तो फिर बात पक्की समझु ?
समजा समजा.मला लवकर सून येईल
काय बिशाद आहे
=))))
अॅक्च्युअली ताज्या ताज्या दाम्पत्य जीवनात अनेक
क्या बात है! पुरानी यादें
अगदी,
ह्या सिरिअल्स बघणार्यांचे
.
मी चुकुन 'हाथीको अपने मळते
लिस्टीजिलब्यांपेक्षा या काय वाईट आहेत मी म्हणतो
मला त्या शीर्षक गीतात श्रेया
+१
बरं झालं मी टीव्ही पाहत नाही.
कवि अनिल यांचा अपमान
:)
तुमच्या दुःखात सहभागी आहोत,
मस्तं लेख :)