✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

संघः कलियुगातील एक चमत्कार

न
नर्मदेतला गोटा यांनी
Mon, 09/12/2016 - 13:26  ·  लेख
लेख
संघ आणि त्याचे टिकाकार साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे. आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे. समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे. इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे. खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे. आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे. शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो. तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे. म्हणून काम करणार्‍याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
83205 वाचन

💬 प्रतिसाद (480)

प्रतिक्रिया

ऑ

शाम भागवत
Wed, 09/14/2016 - 14:40 नवीन
युवराजांच लग्न झाले? :))
↩ प्रतिसाद: मोदक

नाही अजुन

चंपाबाई
Wed, 09/14/2016 - 15:09 नवीन
कुणीतरी कौल की खापर नावाची स्त्री त्यांच्यासोबत रहायची ना ?
↩ प्रतिसाद: शाम भागवत

...

चंपाबाई
Wed, 09/14/2016 - 15:12 नवीन
पंतप्रधान असताना तीन बायकांसमोर लोटांगणं घालुन गुढगे झिजलेत युवराजांचे... आता कस्चं लग्न करताय त्यांचं !?
↩ प्रतिसाद: शाम भागवत

स्वतः

आजानुकर्ण
Wed, 09/14/2016 - 23:06 नवीन
स्वतः लग्न न करता इतरांच्या बायकांनी बालकोत्पादन करावे हा एक बहुमूल्य सल्ला या विचारधारेतून कायम दिला जातो.
↩ प्रतिसाद: चंपाबाई

.. अगदी सहमत

चंपाबाई
गुरुवार, 09/15/2016 - 08:00 नवीन
या संघ भाजप्यांचे दोन पंतप्रधान ... एक ब्रह्मचारी, दुसरा बायको सोडून पळालेला... आणि यांना दुसर्‍यांची लग्ने, तिसर्‍यांची पोरे यांच्या नस्त्या उचापत्या हव्या असतात.
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

असे प्रतिसाद हे केवळ द्वेष

सुबोध खरे
गुरुवार, 09/15/2016 - 10:06 नवीन
असे प्रतिसाद हे केवळ द्वेष दाखवतात असे वाटते. पोप साहेबानी ने लग्न केलेले नाही म्हणून त्यांनी संसारी लोकांना उपदेश करू नये असे तर नाही. या न्यायाने तर पुरुषाने स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच नये. किंवा चंपाबाईनी तर मुल्ला ओमर आणि ओसामा बिन लादेन यांचे चरणतीर्थ घ्यायला पाहिजे. मुल्ला ओमर ने ओसामाच्या मुलीशी लग्न केले आणि ओसामा ने मुलाच्या मुलीशी लग्न केले. दोघे एकमेकांचे जावई आणि सासरे एकाच वेळेस. माशा अल्लाह.
↩ प्रतिसाद: चंपाबाई

हे मला माहित नव्हते.

शाम भागवत
गुरुवार, 09/15/2016 - 10:33 नवीन
हे मला माहित नव्हते. चंपाबाईमुळे कळले. ;))
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

...

चंपाबाई
गुरुवार, 09/15/2016 - 11:28 नवीन
उपदेश करणं वेगळं आणि उपहास करणं वेगळं. राहूल गांधींच्या अविवाहितपणावर उपहासाची चिखलफेक करणारे लोक , बाजपेयींचे ब्रह्मचर्य व मोदींचे रामदासीपण काढलं की चवताळून धावून येतात.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मिरच्या झोंबल्या का?

सुबोध खरे
गुरुवार, 09/15/2016 - 11:54 नवीन
मिरच्या झोंबल्या का? राहूल गांधींच्या अविवाहितपणावर उपहासाची चिखलफेक करणारे लोक कुणी केली अशी अविवाहितपणावर चिखलफेक जरा सांगता का? हां त्यांच्या अफाट "बुद्धिमत्ते"बद्दल लोकांनि त्यांची वाहवा केली आहे पण ती वेगळी गोष्ट आहे.
↩ प्रतिसाद: चंपाबाई

लक्ष देऊ नका हो डॉक्टरसाहेब.

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/15/2016 - 14:55 नवीन
लक्ष देऊ नका हो डॉक्टरसाहेब. ज्याची बायको नवर्‍याच्या विकृत स्वभावामुळे त्याला सोडून निघून गेली आहे तोच इथे येऊन दुसर्‍यांच्या संसाराच्या उठाठेवी करीत आहे.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हे कार्बन डेटिंग वगैरे थोतांड

साहना
Wed, 09/14/2016 - 19:36 नवीन
हे कार्बन डेटिंग वगैरे थोतांड आहे तुमच्या आमच्या सारख्या काँग्रेस कम्युनिस्ट वगैरे मंडळींचं. अगदी नासा सुद्धा पुराणाचा आधार घेऊन मंगळावर यान पाठवत आणि तुम्ही इथे पुराणा ची टवाळी करता आहात ? स्टीव्ह ला आयफोन काढण्याची युक्ती निमकरोली बाबानी दिली ते ऐकून झुकेरबर्ग ने तात्काळ बाबाकडे धाव घेतली आणि बाबानी त्याला फेसबुक काढण्याचा आशीर्वाद दिला पुढे काय जहाँ तो आहे इतिहास आणि वर्तमान. आपल्या इथले फ्लिपकार्ट वगैरे मस्ती दाखवून निम करोली बाबा कडे जात नाहीत आणि तिथे विदेशी लोक त्यांचा फायदा घेतात. मागे पुरुषसुक्त वापरून पाण्यापासून पेट्रोल करणाऱ्या थोर वैज्ञानिकाला संघाने कवेत घेतले होते. त्याचा रिसर्च विदेशी शक्तींनी पूर्ण व्हायला दिला नाही. पण ह्या वेळी पुराणिक इतिहास संघ नक्कीच लिहून टाकेल. प्रोजेक्ट कधी सुरु होईल आणि कधी संपेल ह्या साठी कार्बन डेटिंग ची गरज लागेल बहुतेक पण एकदा का दीड दोनशे वर्षांत प्रकल्प पूर्ण जाहला कि भारत साक्षांत विश्व्गुरु होईल.
↩ प्रतिसाद: पुंबा

समाजाला बनशाली बनवण्याऐवजी

खालीमुंडी पाताळधुंडी
Wed, 09/14/2016 - 17:45 नवीन
समाजाला बनशाली बनवण्याऐवजी देवभोळं बनवण्याचं काम संघ करत आहे.कारण "राम मंदिर झालच पाहिजे" हे मोहन भावतांचे विधान ताजेच आहे. शिवाय एका विद्यार्थ्याने भागवतांना विचारले कि राम मंदिर झाल्यावर गरीबाच्या भाकरीचा प्रश्न सुटणार आहे का? तर भागवतांच उत्तर असं होतं कि "राम मंदिर न झाल्याने तरी कुठे गरीबाच्या भाकरीचा प्रश्न सुटणार आहे"? हे उत्तर म्हणजे उद्धटपणाचा कळस आहे. मंदिरही नको आणि मशीदही नको,तिथे एखादं लोकोपयोगी काम व्हावं.पण कोण ऐकेल तर ना?

दोन्ही गोष्टींचा परस्परसंबंध काय आहे?

ट्रेड मार्क
Wed, 09/14/2016 - 19:35 नवीन
राम मंदिराचा काढला की भाकरीचा प्रश्न विचारायचा, शेतीविषयक सुधारणा सांगायला लागले की देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्न काढायचा, सुरक्षेसंबंधी बोलायला लागले की दुष्काळावर विचारायचं... मुद्द्याला धरून चर्चा, प्रश्न का विचारले जात नाहीत? या प्रसंगात प्रश्न विचारणारा तरी शाळकरी मुलगा होता, पण तथाकथित बुद्धिवादी आणि पत्रकार पण या विकाराचे बळी आहेत.
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

रामजन्म भूमीवर मंदिराचं

साहना
Wed, 09/14/2016 - 19:52 नवीन
रामजन्म भूमीवर मंदिराचं असायला पाहिजे. भाकरीचा प्रश्न सोडवायला हज सबसिडी बंद करावी, चर्च ची जमीन ताब्यांत घ्यावी , हिंदू लोकांची श्रीमंत देवस्थाने तर सरकारने भाकरी प्रश्नासाठी आधीच घेतली आहेत.
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

शिवाय एका विद्यार्थ्याने

श्रीगुरुजी
Wed, 09/14/2016 - 20:22 नवीन
शिवाय एका विद्यार्थ्याने भागवतांना विचारले कि राम मंदिर झाल्यावर गरीबाच्या भाकरीचा प्रश्न सुटणार आहे का? तर भागवतांच उत्तर असं होतं कि "राम मंदिर न झाल्याने तरी कुठे गरीबाच्या भाकरीचा प्रश्न सुटणार आहे"? हे उत्तर म्हणजे उद्धटपणाचा कळस आहे.
यात काय उद्धटपणा आहे? योग्य व समर्पक उत्तर आहे. मागे एकदा "सकाळ" मध्ये बाबा आढावांनी एक लिहिला होता. त्यात त्यांनी असे लिहिले होते की "शनिवारवाडा महोत्सव भरवून किंवा विश्रामबागवाड्या कारंजी थुईथुई नाचवून पुण्याचे प्रश्न सुटणार आहेत का?". मुद्दाम फक्त शनिवारवाडा व विश्रामबागवाडा या स्थानांचाच उल्लेख करण्यामागचा हेतू लपला नव्हता. त्यावर एकाने विचारले की "मग फुल्यांच्या वाड्याचे स्मारक करून किंवा पुणे विद्यापीठाचे नाव बदलून तरी हे प्रश्न सुटणार का?". या अडचणीच्या प्रश्नावर अर्थातच त्यांनी सोयिस्कर मौन पाळले.
मंदिरही नको आणि मशीदही नको,तिथे एखादं लोकोपयोगी काम व्हावं.पण कोण ऐकेल तर ना?
श्रीरामजन्मभूमीच्या स्थानावर श्रीरामांचे मंदीर होणे हे लोकोपयोगी कामच आहे.
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

संघाचे एवढे विरोधक मिपावर असतील असं वाटलं नव्हतं.

बोका-ए-आझम
Wed, 09/14/2016 - 18:38 नवीन
याचा अर्थ संघ चांगलाच असला पाहिजे. उसके दुश्मन है बहोत, आदमी अच्छा होगा हे माणसांप्रमाणेच संस्थांनाही लागू होतंच. बाकी संघाला विरोध करणारे आयडी कोण आहेत ते बघितलं आणि मग त्यांच्या विरोधाला महत्त्व देण्याची गरज नाही हे ओघान आलंच.रच्याकने संघही आपल्या विरोधकांची अशीच दखल न घेता आपलं काम करत होता, आहे आणि राहील. ज्यांना जमतं ते करतात, नाही जमत ते टीकाकार बनतात. माझी इथल्या सर्व संघ टीकाकारांना सहानुभूती आहे. आजारी माणसांना सहानुभूती दाखवावी हे जगातले सगळे धर्म सांगतात.

लष्कर ए तय्यबा किंवा इसिस वर

साहना
Wed, 09/14/2016 - 19:28 नवीन
लष्कर ए तय्यबा किंवा इसिस वर सुद्धा टीका होते म्हणून ते काय चांगले आहेत ? माजघरातून डोक्यावर पदर ओढून कराकरा अर्थशून्यटोमणे मारणाऱ्या कजाग आत्याबाई प्रमाणे वागून काय फायदा ?
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बोकासाहेब माझे निरिक्षण थोडे

शाम भागवत
Wed, 09/14/2016 - 19:38 नवीन
बोकासाहेब माझे निरिक्षण थोडे वेगळे आहे. संघ त्याच्या पध्दतीने काम करत आलाय व करत राहाणार आहे. ते काम बरोबर का चूक हा इथे मुद्दाच नाहिये. जसजशी संघाबद्दलची माहिती लोकांपुढे येत जाईल त्याप्रमाणे लोक त्यांचे मत बनविणारच आहेत. मिडिआ संघावर टिका करत होता व बाकीच्यांच्या हातात ते वाचणे किंवा ऐकणे येवढेच होते. वाचकांची पत्रे एवढाच मार्ग सर्वसामान्यांना उपलब्ध होता. पण काय प्रसिध्द करायचे हे मिडियाच्या हातात होते. सोशल मिडियात मात्र दुसरी बाजू मांडायची सोय झाली व त्यामुळेच सगळी उलथापालथ झाली आहे. माध्यमांनी मतप्रदर्शन करायचे व बाकीच्यांनी त्यानुसार मत बनवायची ही पध्दत हळूहळू लयास जाते आहे. याच बरोबर सर्वयामान्यांचा आंतरजालाचा वाढता वापर व गुगल सारखी सुविधा याचाही मोठा वाटा आहे. बरेच जण जे संघाबद्दल अनभिज्ञ होते व ज्यांनी स्वत:हून कधिही संघ जाणून घ्यायचा प्रयत्न केला नसता ते निव्वळ संघावर होणारे आरोप व त्याला दिली जाणारी उत्तरे यामुळे संघ समजून घ्यायला लागले आहेत. वाक्यरचनेतून व्यक्त होणारा राग द्वेष तसेच आकस्त्राळेपणा बरोबर उलटा परिणाम करायला लागलेला आहे. यामुळे संघ पूर्वीपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचायला लागला आहे. त्यामुळे इथे संघावर जेवढे आरोप होतील त्या प्रमाणात संघाला त्याच्या न कळत व्यक्त होण्याचे मार्ग मिळणार आहेत. ही सोय पूर्वी संघाला नव्हती. मात्र संघ विरोधकांना मात्र होती.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हम करे सो कायदा?

राही
गुरुवार, 09/15/2016 - 07:04 नवीन
बाकी संघाला विरोध करणारे आयडी कोण आहेत ते बघितलं आणि मग त्यांच्या विरोधाला महत्त्व देण्याची गरज नाही हे ओघान आलंच. हेच वाक्य इथल्या नेहमीच्या काही थोड्या संघसमर्थकांनाही लागू पडू शकेल. टीकेची अजिबात दखल न घेता सपशेल दुर्लक्ष्य करून काम सुरू ठेवणे हा काही फारसा धीरोदात्तपणा नाही. ज्यांना जमत नाही ते टीकाकार बनतात हेही फारसे खरे नाही. कदाचित ते विधायक असा आणखी वेगळा मार्ग अनुसरत असू शकतील किंवा त्यांना तसा मार्ग पसंत असू शकेल. आपल्याच मार्गाने सर्व प्रश्न सुटणार आणि सुटावेत ही वृत्ती वेळोवेळी 'हम करे सो कायदा'गिरीकडे झुकलेली दिसून आली आहे. आणखी एक स्थानिक म्हणजे मिपावरचे निरीक्षण म्हणजे काही शेलके संघसमर्थक चिडीला येऊन स्वमतविरोधकांना अपमानकारक विशेषणे बहाल करताना दिसतात. स्वमतविरोधाला 'गरळ ओकणे' म्हणणे म्हणजे त्या विरोधकाला 'साप' समजणे असा होतो हे मी सांगायला नको. इतके चिरडीला का यावे लागावे? की थंडपणे विचार करणे म्हणजे षंढपणा?
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

=)) =))

संदीप डांगे
गुरुवार, 09/15/2016 - 07:08 नवीन
=)) =)) कुत्रे झालं, कोल्हे झालं, मतिमंद झालं, हे आता सापाचे नवीनच कळले. आय होप, जेपी साहेबांचं ह्या सगळ्यावर नीट लक्ष आहे, ;)
↩ प्रतिसाद: राही

डांगे साहेब,

जेपी
गुरुवार, 09/15/2016 - 07:46 नवीन
डांगे साहेब, धाग्यावर काय होणार याचा अंदाज आधीच आलता, त्यामुळे पहिल्याच प्रतिसादात आमी' हे राम ' म्हटल आहे.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

विरोधक त्या चंपाबाईचे पण आहेत

फेदरवेट साहेब
गुरुवार, 09/15/2016 - 07:45 नवीन
विरोधक त्या चंपाबाईचे पण आहेत भरपूर मिपावर............ टाळ्याखाऊ स्वीपिंग स्टेटमेंट्स करून उपयोग नाही
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

संपादक मंडळ,

श्रीगुरुजी
Wed, 09/14/2016 - 20:45 नवीन
संपादक मंडळ, या धाग्यावरील काही प्रतिसादात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अतिशय असभ्य व शिवराळ भाषा वापरली जात आहे. बहुसंख्य प्रतिसाद सभ्य व विषयाला धरून असताना काही प्रतिसाद मात्र अतिशय वाईट आहेत. आपले लक्ष असेलच.

तुमच्या पण काहीही अपेक्षा हं गुरुजी!

बोका-ए-आझम
Wed, 09/14/2016 - 21:15 नवीन
संपादक मंडळ फक्त ठराविक लोकांना बॅन करणं हेच काम करतं, आणि संघविरोधक त्या यादीत येत नाहीत हे तुम्हाला अजून कळलेलं नाही? - (Privileged to be banned by मिपा संपादक मंडळ) बोका - ए -आझम
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

म्हणजे संघविरोधकांना बॅन

खालीमुंडी पाताळधुंडी
गुरुवार, 09/15/2016 - 00:25 नवीन
म्हणजे संघविरोधकांना बॅन करावे अशी तुमची इच्छा आहे का? तुम्ही पातळी सोडलेले किती प्रतिसाद असतील मिपावर एकंदरीत?
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

पातळी ठरवण्याचे अधिकार संपादकांना आहेत.

बोका-ए-आझम
गुरुवार, 09/15/2016 - 00:38 नवीन
ते ठरवतात ती पातळी. त्यांना विचारा. मला विचाराल तर मी शून्य असंच सांगणार.
म्हणजे संघविरोधकांना बॅन करावे अशी तुमची इच्छा आहे का?
याला विपर्यास म्हणतात. मला विचाराल तर कुणालाच बॅन करू नये. करमणूक काय मग? सगळेच जण एका बाजूने बोलत असतील तर किती boring होईल ते!
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

'भाद्रपद'

राही
गुरुवार, 09/15/2016 - 07:06 नवीन
आपला या धाग्यावरचा 'भाद्रपद' प्रतिसाद आवडला नव्हता.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

तो न आवडायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे.

बोका-ए-आझम
गुरुवार, 09/15/2016 - 15:30 नवीन
आणि ते व्यक्त करायचाही. आणि त्यातून स्वतःला वाटेल तो अर्थ काढण्याचाही.
↩ प्रतिसाद: राही

साहना यांचे प्रतिसाद आवडले

आजानुकर्ण
Wed, 09/14/2016 - 21:39 नवीन
साहना यांचे प्रतिसाद आवडले. संघ हा एक मोठा चमत्कार आहे याच्याशी मात्र सहमत. भगवा झेंडा हा राष्ट्रध्वज व्हावा आणि एकाच धर्मीयांचे हे राष्ट्र असावे आदि मुक्ताफळे प्रसवणाऱ्या संघचालकांची विचारसरणी मानणारी ही संघटना स्वतःला अव्वल दर्जाची राष्ट्रप्रेमीही म्हणवून घेते आणि बाकीच्यांना 'पाकिस्तान'ला (अखंड भारताचाच भाग ना हो तो?) जायला सांगते हे ह्या चमत्काराचे प्रात्यक्षिक. बाकी भाद्रपद आलाय, जंगलात जा, वगैरे शिवराळ व असभ्य प्रतिसाद आले आहेत या गुरुजींच्या मताशी सहमती.

भाद्रपद आलाय यात काय असभ्य आहे?

बोका-ए-आझम
Wed, 09/14/2016 - 22:35 नवीन
भाद्रपदच महिना चालू आहे सध्या. बाकी काय सभ्य आणि काय असभ्य हे तुम्ही मिपावर ठरवता काय आजकाल?
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

:)

विकास
Wed, 09/14/2016 - 22:49 नवीन
बाकी काय सभ्य आणि काय असभ्य हे तुम्ही मिपावर ठरवता काय आजकाल? चमत्कार वगैरे म्हणणे मला पटत नाही. शिवाय चमत्कार असता तर नमस्कार करणारे झाले असते... पण वरील एका प्रतिसादात आल्याप्रमाणे शक्ती नक्कीच आहे. त्या शक्तीला बघून चमत्कारीक बोलणारे आणि तर्क लढवणारे मात्र असतात ह्यावर माझा विश्वास आहे... :)
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हो. हाही एक मुद्दा आहे.

बोका-ए-आझम
Wed, 09/14/2016 - 22:56 नवीन
समस्त संघविरोधकांना एक आवाहन करु इच्छितो - नवे मुद्दे आणा राव. ८-८ वर्षे लोक मिपावर असतात पण तेच तेच मुद्दे आणतात. एवढ्या वर्षांत संघ बदलला पण यांचे विरोधाचे मुद्दे काही बदलले नाहीत. संघ विरोधी पक्ष असताना जे मुद्दे तेच संघ सत्तेत असतानाही. काय हे?
↩ प्रतिसाद: विकास

संघ बदलला?

आजानुकर्ण
Wed, 09/14/2016 - 22:58 नवीन
संघ बदलला
हाफ चड्डी सोडून* फुल प्यांट आणण्याचे वगळता काही बदलल्याचे दिसले नाही. * हाफ चड्डी सोडण्यात काही असभ्य नाही हो संमं आणि गुरुजी.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

काय नक्की बदलले आहे संघ मध्ये

साहना
गुरुवार, 09/15/2016 - 01:43 नवीन
काय नक्की बदलले आहे संघ मध्ये ? भाजप निर्माण केला आहे आणि त्यामुळे सततची फळे चाखायला मिळत आहेत हा एक बदल सोडला तर आणखीन काही विशेष दाखवण्यासारखे नाही. बहुतेक मुद्द्यावर माघार घेतलेली दिसत आहे.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

नाही

आजानुकर्ण
Wed, 09/14/2016 - 22:56 नवीन
बाकी काय सभ्य आणि काय असभ्य हे तुम्ही मिपावर ठरवता काय आजकाल?
नाही हो मी ते ठरवत नाही. संपादक मंडळ आणि गुरुजी ठरवतात असं दिसतंय. तुम्ही फुकटात लोकांचंं रोगनिदान करता आणि बरे व्हा वगैरे शुभेच्छा देता असं वाटतंय. भाद्रपदानिमित्त काही विशेष? :)
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

काही नाही.

बोका-ए-आझम
Wed, 09/14/2016 - 23:00 नवीन
नवे मुद्दे आणा. ९ वर्षे मिपावर काढूनही संघविरोधाचे तेच तेच मुद्दे आणत असाल तर त्यावरून काय ते कळतंच. बरे व्हा, मोठे व्हा आणि अभ्यास वाढवा. म्हणजे नीट वाद घालता येतील.
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

अहो

आजानुकर्ण
Wed, 09/14/2016 - 23:03 नवीन
अहो गेल्या ५० वर्षात संघाने मुसलमान, ख्रिश्चन, दलित, कम्युनिस्टविरोधाचे तेच ते मुद्दे उगाळून गुळगुळीत केलेले चालले का तुम्हाला? नवे कुठले मुद्दे आणलेत ते दाखवा मग त्यासंदर्भात चर्चा करता येईल. अजून हिंदुत्त्व म्हणजे काय आणि राममंदिर कधी बांधणार यावरच गाडं अडलंय.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अहो गेल्या ५० वर्षात संघाने

बोका-ए-आझम
Wed, 09/14/2016 - 23:23 नवीन
अहो गेल्या ५० वर्षात संघाने मुसलमान, ख्रिश्चन, दलित, कम्युनिस्टविरोधाचे तेच ते मुद्दे उगाळून गुळगुळीत केलेले चालले का तुम्हाला?
कम्युनिस्ट सोडले तर इतर कुणाचाही संघाने विरोध केलेला नाही. संघ दलितविरोधी आहे हा संघाच्या विरोधकांनी केलेला अपप्रचार आहे. देशात झालेल्या कुठल्याही दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणात संघ किंवा संघ स्वयंसेवक सहभागी असल्यास दाखवून द्यावे. तसंच संघ मुस्लिम आणि ख्रिश्चनविरोधी असल्याचं वक्तव्य आहे. संघ अल्पसंख्यांकांचा अनुनय करण्याच्या विरोधात आहे. म्हणजे तो त्या धर्मांच्या विरोधात आहे असं म्हणणं हे संघविरोधकांना convenient आहे म्हणूनच तसं म्हटलं जातं. पण वस्तुस्थिती वेगळी आहे आणि हे संघविरोधकांनाही माहित आहे. म्हणून तर संघाचा विषय काढल्यावर ते एवढे आक्रमक होतात, कारण आपल्याजवळचे मुद्दे संपलेत आणि नवे मुद्दे नाहीयेत ही आपली केविलवाणी अवस्था त्यांना मान्य करवत नाहीये. त्यामुळेच संघ ५० वर्षांत तेच तेच मुद्दे उगाळतोय वगैरे पलायनवादी भूमिका घेतली जाते. असो. जसं मी आधी म्हटलं तसंच - संघविरोधकांचा राग येत नाही, कीव येते. दया येते. आपण ज्याला प्राणपणाने विरोध केला तो आपल्या विरोधामुळेच मोठा झाला हे समजणं किती भयावह आहे याचा सगळे संघविरोधक अनुभव घेत आहेतच पण ते मान्य करण्याऐवजी denial mode मध्ये राहणं जर त्यांना मान्य असेल तर असो बापडे.
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

हा हा

आजानुकर्ण
Wed, 09/14/2016 - 23:47 नवीन
संघाचा खोटारडेपणा उघड करणे यात केविलवाणेपणा कुठला आलाय. मला तर त्यात विशेष मजा येते ब्वॉ. बाकी संघ ख्रिश्चन-मुस्लिम विरोधक नाही हे वाचून खरंच आनंद झाला. निदान ईशान्य भारतातील धर्मांतराविरोधात, किंवा घरवापसीसारखी, किंवा हिंदूंनी लोकसंख्या वाढवावी असे सल्ले देण्याची कामं करण्याऐवजी जरा आजूबाजूला काहीतरी करण्यासाठी संघ स्वयंसेवक दिसतील हा एक भाबडा आशावाद आहे. मुळात संघाची एकंदर एक्स्टेंडेड संघटना इतकी गुंतागुंतीची आहे की कुठलेही आतबट्ट्याचे प्रकरण घडले की ताबडतोब 'मी नाही त्यातली' म्हणत अंग काढून घेण्यात संघ हुशार आहे. विहिंप, बजरंग दल, पतित पावन संघटना वगैरे उपद्रवी मंडळींनी काही उद्योग करुन ठेवले की त्याला डिसक्रेडिट करण्याची सोयही संघाकडे आहे. त्यामुळे बाबरी मशीद पाडली हे खाजगीत आनंदाने मान्य करणारे संघी, जाहीरपणे 'मशीद पाडल्याने दुःख झाले' असे म्हणू शकतात. तसंच दलितांवर केलेल्या अत्याचाराचे कुठलेही पुरावे दिले तरी त्यात संघाचा काही सहभाग नाही असे म्हणण्याची सोय अर्थातच उपलब्ध आहे.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

पुरावे द्या हो.

बोका-ए-आझम
गुरुवार, 09/15/2016 - 00:03 नवीन
दलितविरोधाचे वगैरे. बाकी ईशान्य भारतात धर्मांतराविरोधी कार्य संघ करतो हे ऐकून करमणूक झाली. संघाने चालवलेल्या अनेक संस्था ईशान्य भारतात चालू आहेत. तिथली अनेक मुलं महाराष्ट्रात येऊन शिकताहेत. आणि कोणाच्याही धर्माला धक्का वगैरे लागलेला नाही. मुळात तुम्ही ईशान्य भारतात गेला आहात का? तिथे धार्मिक व्यवस्था दर जमातीनुसार बदलते आणि बहुसंख्य जमातींचे स्वतःचे धर्म आहेत. त्यांच्यावर जेव्हा ख्रिश्चन धर्म लादायचे प्रयत्न झाले तेव्हा संघाने त्याविरूद्ध आवाज उठवलेला आहे. यात चुकीचं काय आहे? अर्थात तुमच्यासाठी संघच चुकीचा असल्यामुळे तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. रच्याकने संघाचा खोटारडेपणा कितपत उघडकीला आणलात तुम्ही? आणि त्यामुळे कितपत समाजप्रबोधन वगैरे झालं? स्वतःची संघविरोधी मतं मिपासारख्या संस्थळावर मांडणं म्हणजे खोटारडेपणा उघडकीला आणणं ही नवीन व्याख्या मराठी भाषेला दिल्याबद्दल शतश: धन्यवाद!
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

देशात झालेल्या कुठल्याही

फेदरवेट साहेब
गुरुवार, 09/15/2016 - 08:05 नवीन
देशात झालेल्या कुठल्याही दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणात संघ किंवा संघ स्वयंसेवक सहभागी असल्यास दाखवून द्यावे. पुरावे द्या हो हे पुरावे वगैरे देणे उपयोगाचे नाही, कारण ते तुमच्या अभद्र प्रतिसादांसारखे आहे, तुम्हाला विचारले तर तुम्ही शून्यच सांगाल. तसेच हे पण, पुरावे द्यायचे म्हणले की द हिंदू, फर्स्टपोस्ट वगैरेचे द्यायला नको असतात तुम्हाला, का? तर ती साम्यवादी मुखपत्रे अन संस्थळे आहेत. मग संघाच्या संदिग्ध कारवाया संघच पांचजन्य अन ऑर्गनायझर मध्ये छापेल असेही शक्य नाही. रच्याकने, भाद्रपद कॉमेंट ही चक्क अश्लील अन द्वयार्थी आहे, कॉमेंट केली आहेत तर त्याची जबाबदारी घ्या जरा (का परत बॅन व्हायची भीती वाटती आहे म्हणून......) , भाद्रपदाचा रेफरन्स कशाकरता दिला होता हे न समजण्याइतके मिपाकर खुळे नाहीत, तुम्ही डोळे मिटून दूध प्यायले तरी......
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हे पुरावे वगैरे देणे उपयोगाचे

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/15/2016 - 14:59 नवीन
हे पुरावे वगैरे देणे उपयोगाचे नाही, कारण ते तुमच्या अभद्र प्रतिसादांसारखे आहे, तुम्हाला विचारले तर तुम्ही शून्यच सांगाल. तसेच हे पण, पुरावे द्यायचे म्हणले की द हिंदू, फर्स्टपोस्ट वगैरेचे द्यायला नको असतात तुम्हाला, का? तर ती साम्यवादी मुखपत्रे अन संस्थळे आहेत. मग संघाच्या संदिग्ध कारवाया संघच पांचजन्य अन ऑर्गनायझर मध्ये छापेल असेही शक्य नाही.
पुरावे असतील तर नक्की द्या. पुरावे नसतील तर खोटे आरोप करू नका. जर हिंदू, फर्स्टपोस्ट इ. मध्ये संघाने दलितांवर केलेल्या अत्याचाराच्या बातम्या छापून आल्या असतील तर भारतातील इतर अनेक वृत्तपत्रातून त्या बातम्या छापल्या गेलेल्या असतील. हिंदू, फर्स्टपोस्ट इ. च्या लिंक्स द्या. लगेच पडताळून पाहता येतील. बादवे, ते बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या बाबतीतलं कात्रण सापडलं का?
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

ढेल्या भूभू

बोका-ए-आझम
गुरुवार, 09/15/2016 - 15:04 नवीन
सर्वप्रथम - मी बॅन होतो साधारणपणे २२ ते २७ जुलै या काळात. तुमचं सदस्यत्व आहे २ आठवडे. म्हणजे आॅगस्टच्या शेवटी घेतलेलं. अर्थ उघड आहे. तुम्ही कुणाचे तरी डू आयडी आहात. कदाचित तुमचा आधीचा आयडी बॅन झाला असेल किंवा मग तुम्ही एक आयडी असताना दुसरा डू आयडी ट्रोलिंग करायला घेतलाय. That speaks for itself. असो. आता तुमच्या प्रतिसादांबद्दल - मला बॅन व्हायची अजिबात भीती वाटत नाही कारण - १. मी चूक केलेली नाही २.मला मिपाव्यतिरिक्त आयुष्य आहे. मिपा अस्तित्वात यायच्या आधीही होतं आणि नंतरही असेल. भाद्रपद आहे आणि ही वस्तुस्थिती आहे हे मी म्हटलं होतं. नाकारायचा प्रश्नच येत नाही. त्याचा अश्लील आणि द्वयर्थी संदर्भ आहे असं मी म्हणत नाही आणि मला तो माहितही नाही. मी तो शब्द कुठल्या अर्थाने वापरलाय हे तुम्ही आणि इतर लोक म्हणताहेत. तुम्हाला माझ्या मनातलं कसं ठाऊक? आणि अश्लील अर्थच का घेतलात तुम्ही? याचा अर्थ तुमच्या मनात अश्लीलता आहे. मग माझ्यावर बिल फाडू नये.
हे पुरावे वगैरे देणे उपयोगाचे नाही, कारण ते तुमच्या अभद्र प्रतिसादांसारखे आहे, तुम्हाला विचारले तर तुम्ही शून्यच सांगाल.
यापेक्षा सरळ पुरावे नाहीत असं सांगा आणि पांढरा झेंडा फडकवा. किती तो आटापिटा स्वतःला बरोबर सिद्ध करायचा!
पुरावे द्यायचे म्हणले की द हिंदू, फर्स्टपोस्ट वगैरेचे द्यायला नको असतात तुम्हाला, का? तर ती साम्यवादी मुखपत्रे अन संस्थळे आहेत.
हिंदू आणि फर्स्टपोस्ट यांचे पुरावे म्हणजे बिनतोड असं तुमचं म्हणणं असेल तर ते द्या. काहीही हरकत नाही. संघ जर दलितविरोधी कारवाया करत असता तर हिंदू आणि फर्स्टपोस्टच काय, जगातल्या प्रत्येक वृत्तपत्रात ते आलंच असतं. पण पुरावाच नसेल तर - तसाही तो तुम्ही स्वीकारणार नाहीच मग आम्ही तो देणार नाही, पण संघ दलितविरोधी आहे - हे म्हणणं म्हणजे शुद्ध कांगावा आहे. अजूनही म्हणतो - पुरावा आहे का? एखाद्या संघ स्वयंसेवकाला अशा गुन्ह्यासाठी शिक्षा वगैरे झाल्याचा? जरुर पुढे आणा.
भाद्रपदाचा रेफरन्स कशाकरता दिला होता हे न समजण्याइतके मिपाकर खुळे नाहीत,
मिपाकर खुळे नाहीच आहेत. पण तुम्हाला सोयीस्कर अर्थ काढून तेच माझ्या मनात होतं हे तुम्ही कशाच्या आधारावर सांगताय? स्वतःचं मन आधी शुद्ध करा. भाद्रपद या शब्दाने जर तुमच्या मनात अश्लील विचार येत असतील तर तो माझा नव्हे, तुमच्या विचारांचा दोष आहे.
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

काय योगायोग पहा ? भाद्रपद

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 09/15/2016 - 15:17 नवीन
काय योगायोग पहा ? भाद्रपद वाली कमेंट आणि लगेच भूभू यांचा प्रतिसाद.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

पुन्हा प्रपंच

रविकिरण फडके
Wed, 09/14/2016 - 23:07 नवीन
खरे तर मला पुनश्च ह्या विषयावर लिहायचे नव्हते पण संघ आजूबाजूला कुठेच दिसत नाही असे विधान मी आधीच्या प्रतिसादात केले आणि ते संपूर्ण नव्हते असे वाटल्यावरून हा पुन्हा प्रपंच. संघ मला आजूबाजूच्या परिसरात कुठे सक्रिय दिसत नाही हे तर खरेच पण तेवढाच issue नाहीये. तो अप्रत्यक्षपणे समाजाच्या अधोगतीस कारणीभूत ठरतो आहे हा अधिक मोठा सल आहे माझ्या मनात. सन 1993 पासून आपल्या शहरांत (निदान मुंबईत तरी नक्कीच) तथाकथित धार्मिकतेचे वारे शिरले आणि मोठ्या प्रमाणात उत्सवांना सुरुवात झाली. गणपती तर आधीपासूनच गोंगाटमय होते. त्यात दुर्गापूजा, माघी गणपती, शिवरात्री, अशांची भर पडली. उदा. ह्या वर्षी प्रथमच आमच्या भागात माघी गणपतीला गणपती बसवला गेला आणि त्यासाठी स्टेशनकडे जाण्यासाठी जेमतेम दोन फूट सोडून बाकी सर्व जागेत स्टेज उभारले गेले. मग मंडप, लाऊड स्पीकर्स, प्रचंड आवाज, ट्रॅफिक जॅम हे सगळे आलेच. ह्यास आळा घातला गेला नाही तर हे प्रकरण हाताबाहेर जाईल. आळा कोण घालणार म्हणा? चोराच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्या. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे श्रद्धेचे बाजारीकरण होतेय, हिंदू धर्मापासून लोक दूर जाण्याचा धोका आहे, हिंदू धर्माबद्दल आणि हिंदूंबद्दल एक नेगेटिव्ह इमेज निर्माण होते आहे, परिणामी, ज्या हिंदू धर्माबद्दल संघ इतका भरभरून बोलतो त्या हिंदू धर्माचेच नुकसान होणार आहे, ह्याचे भान जर संघाच्या मान्यवरांना नसेल तर पुढे काही बोलण्याजोगे नाही. आणि जर असेल तर ते इतके हतबल आहेत का हे गैरप्रकार रोखण्यास? तसे असेल तर माझा मुद्दा आपोआप सिद्ध होतो. पण असो. संघ काही फालतू माणसांनी केलेल्या शंकांना उत्तर देणार नाही. दिलेच तर ते 'संघ विचारांची पुस्तके वाचा नाहीतर शाखेवर जा' असे काहीतरी असेल. त्यामुळे माझ्या शंका अनुत्तरीतच राहणार!

फडके साहेब

आजानुकर्ण
Wed, 09/14/2016 - 23:23 नवीन
तुमचे सगळे प्रश्न सुयोग्य आहेत. पण संघ आणि त्यांच्या मांदियाळीतील संघटना यांना केवळ बाकीचे काय करतात आणि ते कसं चुकीचं करतात यातच रस आहे. बीफ सेवन, मशीदीवरचे भोंगे, ताबूतांच्या मिरवणुका, धर्मांतर, रस्त्यावरचे नमाज, ख्रिश्चन शाळा, बाकीच्यांची वाढणारी लोकसंख्या आदी मुद्दे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. शिवाय दुर्गापूजा, माघी गणपती, शिवरात्री, मंडप, लाऊड स्पीकर्स, प्रचंड आवाज, ट्रॅफिक जॅम वगैरेंमध्ये अनेकदा संघिष्ठ आणि त्यांच्या समविचारी संघटनाच अग्रेसर असतात. त्यामुळं ते यासंदर्भात काही करतील अशी अपेक्षा फोल आहे.
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके

ह्म्म.. खरे तर मला बोलायचे

आनन्दा
Wed, 09/14/2016 - 23:46 नवीन
ह्म्म.. खरे तर मला बोलायचे नव्हते, पण एव्हढेच सांगतो, हे संघाचे कार्यक्षेत्र नाही.. सर्वसामान्यपणे पाहू गेल्यास तात्विक पतळीवर संघ बराचसा सावरकरांचा हिंदुत्ववाद स्वीकारतो, जो काही अंशी नास्तिकतावादाकडे झुकतो. त्यामुळेही कदाचित ते याकडे दुर्लक्ष करत असतील. दुसरे, गुरुजींनी लिहिल्याप्रमाणे इतर काही समविचारी संघटना (संघाशी संबंध नसलेल्या) या क्षेत्रात कार्य करत आहेत. बाकी संघाचे म्हणून जे काही कर्यक्रम होतात ते अत्यंत शिस्तबद्ध असतात आणि त्यामुळे सामान्य जनतेचा खोळंबा झाल्याचे ऐकिवात नाही. जर तुम्ही राजकीय पक्षांविषयी बोलत असाल विशेषतः शिवसेना, तर आपला पास.
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

लोलियत

आजानुकर्ण
Wed, 09/14/2016 - 23:51 नवीन
संघ बराचसा सावरकरांचा हिंदुत्ववाद स्वीकारतो, जो काही अंशी नास्तिकतावादाकडे झुकतो.
ही वाक्यरचना बदलून घ्या साहेब. संघ सावरकरांचा सोयीस्कर हिंदुत्त्वाद स्वीकारतो. सावरकरांची द्विराष्ट्रवादाची थेअरी मान्य करायची मात्र गायीला उपयुक्त पशू माना म्हटलं की शेपूट घालायचं ही संघाची तात्त्विक पातळी आहे.
↩ प्रतिसाद: आनन्दा

सर्वसामान्यपणे पाहू गेल्यास

सतिश गावडे
गुरुवार, 09/15/2016 - 00:15 नवीन
सर्वसामान्यपणे पाहू गेल्यास तात्विक पतळीवर संघ बराचसा सावरकरांचा हिंदुत्ववाद स्वीकारतो, जो काही अंशी नास्तिकतावादाकडे झुकतो.
नाही हो. सध्याचा हॉट टॉपिक असलेल्या मुद्यावर सावरकरांचे विचार आणि संघाचे विचार म्हणजे दोन धृव आहेत. इतका मोठा मुद्दा विरोधी असताना संघ आणि सावरकर यांना एकाच विचारांचे म्हणणे म्हणजे मोठी गंमतच आहे.
↩ प्रतिसाद: आनन्दा

संघपुरस्कृत सण?

ट्रेड मार्क
Wed, 09/14/2016 - 23:41 नवीन
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की संघ हे सगळे सण पुरस्कृत करतो? हिंदू सण अश्या गोंगाटात आणि बाजारूपणे साजरे करावे म्हणून प्रोत्साहन देतो? संघाने बसवलेले किती गणपती तुमच्या भागात किंवा संपूर्ण मुंबईत आहेत? किती स्वयंसेवक तुम्हाला या सणांमध्ये भाग घेताना दिसतात? १९९३ नंतर धार्मिकतेचे वारे वाहू लागण्याचं कारण तुमच्या मते फक्त बाबरी मशिदीचे पाडणे आहे का? त्यानंतर मुंबईत झालेल्या दंगली आणि बॉम्बस्फोट अजिबात कारणीभूत नसावेत का? संघ हिंदूंची संघटना आहे मग ते हिंदूंबद्दलच बोलणार ना? ते काही कोणाला सांगत नाहीयेत की असे सण साजरे करा. मुळात संघ या सगळ्यामध्ये नाहीये. हे सणवार आणि असे साजरे करणे हे त्या त्या भागातल्या राजकारण्यांनी व भाईलोकांनी चालू केले आणि मला खात्री आहे की त्यांच्यापैकी कोणी संघात जात नसावे.
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा