Skip to main content

संघः कलियुगातील एक चमत्कार

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 12/09/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
संघ आणि त्याचे टिकाकार साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे. आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे. समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे. इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे. खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे. आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे. शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो. तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे. म्हणून काम करणार्‍याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 84392
प्रतिक्रिया 480

प्रतिक्रिया

In reply to by साहना

तुमचे मनापासून विचारलेले प्रश्न आक्रस्ताळेपणे मांडून तुम्हाला हवी तशी उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहात का..? खरोखरी उत्तरे हवी असतील तर दोन्ही बाजूंचा नीट अभ्यास करा आणि मग सभ्यतेने प्रकट व्हा. बाकी तुम्ही डुआयडी पिलावळीतले असाल तर वरची सुचवणूक तुम्हाला लागू नाही असे समजून गरळ ओकणे सुरू ठेवा.

In reply to by साहना

त्यांच्या ह्या लेखांत मायनॉरिटी ह्या शब्दाचा उल्लेख सुद्धा नाही http://www.vifindia.org/article/2012/may/16/the-right-to-education
कशाला पाहिजे तो उल्लेख? तसं पाहिलं तर त्या लेखात हिंदू, ख्रिश्चन इ. शब्दांचे सुद्धा उल्लेख नाहीत.
VIF ला मी RTE वर आपली भूमिका स्पष्ट करा म्हणून इमेल पाठवले अजून तरी त्यांना वेळ मिळाला असेल असे वाटत नाही.
अनुदानाच्या मुद्द्यावर पर्रीकर सरकारने २०१२ मधील निवेदन तुम्हाला समजलेच नाही. तरीसुद्धा तुम्ही छातीठोकपणे 'पर्रीकर सरकारने हिंदू शाळांचे अनुदान काढून ते इंग्लिश शाळांना दिले' अशा अर्थाचे पूर्णपणे असत्य असलेले दावे रेटून केलेत. या धाग्यावर प्रतिसाद देताना अनेक प्रतिसादात तुम्ही खालची पातळी गाठलीत. एकंदरीत तुम्ही त्या ईमेलमध्ये काय चुकीचे प्रश्न विचारले असेल व त्यासाठी कशी भाषा वापरली असेल याचा अंदाज येतोय. त्यामुळेच त्यांनी ईमेलला उत्तर दिले नसावे.

In reply to by श्रीगुरुजी

आर्यभट्टानी थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा शोध आधीच लावला होता पण कुणी विचारले नाही म्हणून सांगितले नाही अश्या प्रकारच्या अर्ग्युमेण्ट निरर्थक आहेत. RTE कायदा युनिफॉर्म नाही हा त्यातील घोळ कोणीही समजू शकतो. हे ज्या विचारवंतांच्या लक्षांत येत नाही ते आणि कसले विचारवंत ? आणि फायदा काय असल्या विचारटंकीचा ज्यांना मूलभूत प्रश्न सुद्धा समाजत नाहीत ? ह्या उलट स्वतंत्र हिंदू आक्टिविस्ट जसे राजीव मल्होत्रा ह्यांना हे मुद्दे तात्काळ समजतात. अगदी विदेशी विचारवंत जसे कोएनरोड एलस्ट वगैरे लोकांना सुद्धा ह्या कायद्यातील हिंदू विरोधी त्रुटी तात्काळ समजल्या पण आपले सांग वाले मात्र कम्युनिस्ट छाप लिखाणाचं करतात. कायदा, शिक्षण, अर्थव्यवस्था ह्या विषयावर संघ आणि कम्युनिस्ट ह्यांच्यात विशेष फरक नाही. > तुम्ही छातीठोकपणे 'पर्रीकर सरकारने हिंदू शाळांचे अनुदान काढून ते इंग्लिश शाळांना दिले' मी काय लिहिते ह्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही काय समजलात ह्याची जबाबदारी माझ्या कडे नाही. पर्रीकर सरकारने फक्त ख्रिस्ती इंग्रजी शाळांनाच अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय परिपत्रक काढून जाहीर केला होता. काही दिवसांत त्याचे रूपांतरण कायद्यांत सुद्धा होईल. परिपत्रक आणि त्यासंबंधित कॅबिनेट नोट दोन्ही गोआ सरकारच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत आणि तिथे जे लिहिले आहे ते स्पष्ट आहे. तुम्हाला अज्ञानात लोळून सुख उपभोगायचे असेल तर मी काय करू शकते ?

In reply to by साहना

पर्रीकर सरकारने फक्त ख्रिस्ती इंग्रजी शाळांनाच अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय परिपत्रक काढून जाहीर केला होता. काही दिवसांत त्याचे रूपांतरण कायद्यांत सुद्धा होईल.
होईल ...अच्छा म्हणजे झालं नाही हे मान्य करता तर.पण तुम्ही तर म्हणला होता ८ शाळांच अनुदान काढल होत, त्या कोणत्या शाळा हे सांगाल का? नाही आता डायरेक्ट सांगते मी गोवा बोर्ड मधे कार्यरत आहे. त्यामुळे ग्रांट काढली ना तर मला समजतं अहो. हां १-२ शाळा मुलं नसल्यामुळे बंद पडायच्या मार्गावर आहेत (का हे मी सांगू शकत नाही) पर्रीकरांनी माध्यम प्रश्न नीट हाताळला नाहीये हे मान्यच आहे. पण म्हणून नाही ते त्यांच्या माथी मारु नका. मराठी/ कोकणी शाळा कोणत्याही संस्थेच्या असल्या तर अनुदान मिळेल. इंग्रजी माध्यमातून फक्त जुन २०११ पूर्वी अनुदानित शाळांच अनुदान काढणार नाही आहेत. आता डायोसेशन सोसायटीच्या काही शाळांना मान्यता मिळाली (माझ्या माहितीप्रमाणे त्या प्राथमिक शाळा नाहियेत).जर माध्यमिक शाळा असतील तर प्रश्नच नाही. पण प्राथमिक असतील तर या शाळांचे माध्यम कोणते ते पहावे लागेल. जर इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा असतील तर अनुदान मिळू नये त्यांना. टीप. या शाळांसोबत अनेक बिगर ख्रिश्चन प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना मान्यता मिळाल्याचे मला ठाउक आहे. त्यातल्या काही शाळा माझ्या भागातच सुरु झाल्या आहेत.

In reply to by प्रीत-मोहर

आणि अश्या प्रकारे ग्रांट काढली असेल तर ते रस्त्यावर उतरले असते की हो. आता तर भाभासुमं पण आहे सपोर्ट ला. अस काही घडल्याच माझ्या ऎकण्यात आणि वाचण्यात नाहीये.

In reply to by साहना

> तुम्ही छातीठोकपणे 'पर्रीकर सरकारने हिंदू शाळांचे अनुदान काढून ते इंग्लिश शाळांना दिले' मी काय लिहिते ह्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही काय समजलात ह्याची जबाबदारी माझ्या कडे नाही. पर्रीकर सरकारने फक्त ख्रिस्ती इंग्रजी शाळांनाच अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय परिपत्रक काढून जाहीर केला होता. काही दिवसांत त्याचे रूपांतरण कायद्यांत सुद्धा होईल. परिपत्रक आणि त्यासंबंधित कॅबिनेट नोट दोन्ही गोआ सरकारच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत आणि तिथे जे लिहिले आहे ते स्पष्ट आहे. तुम्हाला अज्ञानात लोळून सुख उपभोगायचे असेल तर मी काय करू शकते ?
तुमच्या पूर्वीच्या प्रतिसादात गोवा सरकारच्या परिपत्रकासंबंधी तुम्हीच खालील लिंक दिलेली आहे.
पर्रीकर ह्यांचा बद्दल मी जे काही लिहिले आहे ते १००% सत्य आहे. पर्रीकर ह्यांनी इशू केलेले हे सर्कलर वाचा http://www.education.goa.gov.in/Cir_MoI1.pdf (पॅरा vi )
या परिपत्रकातील सर्व मुद्दे पाहू या. १) At the primary level, the teaching in primary schools shall be in the mother tounge of the child i.e. Konkani/Marathi, as the case may be and subject to exception provided herein after, only Konkani/Marathi primary schools shall be entitled to receive grants. 2) Government will give permission immediately to new primary schools oting to impact primary education in Konkani/Marathi. For such schools, one time initila special grant of Rs. 12.00 Lakhs and Rs. 1.00 Lakh per annum for next 05 years shall be given so as to imrpove and set up the necessary infrastructure as well as build up resources in the school. 3) State government proposes to amend suitably the Goa School Education Rules to voercome the distance criteria, in respect of permitting additional schools in Konkani/Marathi within 01 KM, provided the existing school has strength of less than 40 students. 4) All grent-in-aid primary schools, including the new ones will be eligible for full grant to primary schools including Maintenance Grant Salary Grant for non teaching staff as also addional teacher with B.Ed. qualifications for improving the quality of English/Konkani/Marathi teaching at the primary level, on a case to case basis. 5) The State Policy is to encourage Primary Education in the mother tongue of the Children i.e. with Konkani and Marathi being the regional languages of the State and in this regard, the State Government shall initiate all steps to increase the number of schools in the regional languages namely Konkani/Marathi and give financial assistance as well as full grants over and as above free salary grants to all such Konkni/Marathi schools proposed to be started in the State. 6) However, having regard to the fact that
minority/certain institutions in the State which were prior to 10th June, 2011 imparting Konkani/Marathi primary education, and have thereafter simultaneously shifted to English and started English Primary classes shall, vontinue to receive grants so as to give continuity to these schools and especially having regard to the fact the fact that the students in these schools should not suffer.
7) The aforesaid schools will be entitled to continuw receiving grants provided the fulfill the follwoing" a) Such schools were Konkani/Marathi schools until 10th June 2011. These schools have started English classes at the primary stage during the last academic year wholly or partly. b) That none of such schools had given an undertaking to the Directorate of Education stating that they would not claim grant in aid from the state Government to establish or run such English Primary schools. या परिपत्रकातील सर्व ७ मुद्द्यांमधून खालील गोष्टी अगदी स्पष्ट दिसत आहेत. - कोकणी/मराठी माध्यम असलेल्या शाळांना अनुदान सुरूच राहील. - नवीन कोकणी/मराठी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यास सरकार प्रोत्साहन देऊन सरकार अशा शाळांना अनुदान देईल. - जून २०११ पूर्वी ज्या शाळा कोकणी/मराठी माध्यमाच्या होत्या व त्यानंतर ज्यांनी इंग्लिश माध्यम सुरू केले आहे, अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अशा शाळांचे देखील अनुदान सुरू राहील. तुमचे आधीचे दोन दावे - 'पर्रीकर सरकारने हिंदू शाळांचे अनुदान काढून ते इंग्लिश शाळांना दिले' व 'पर्रीकर सरकारने फक्त ख्रिस्ती इंग्रजी शाळांनाच अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय परिपत्रक काढून जाहीर केला होता.' - हे धडधडीत खोटे आहेत हे या परिपत्रकातील मुद्द्यांवरून स्पष्ट आहे. एवढे असूनसुद्धा तुम्ही आपल्या मूळच्या पूर्वग्रहदूषित व असत्य दाव्यांना चिकटून आहात व त्याचे समर्थन करीत आहात.

In reply to by श्रीगुरुजी

> minority/certain institutions in the State which were prior to 10th June, 2011 imparting Konkani/Marathi primary education ह्यांत मायनॉरिटी हा शब्द आपल्याला दिसत नाही का ? "मायनॉरिटी/certain" ह्या शब्दाचा अर्थ कॅबिनेट च्या concept नोट मध्ये अधिक स्पष्ट पणे (फक्त मायनॉरिटी) दिला गेला आहे. पूर्वग्रहाचा प्रश्नच येत नाही. पूर्वी पासून आमचे पर्रीकर आणि गोवा भाजपशी घनिष्ट संबंध आहेत. आज सुद्धा फार चांगले संबंध आहेत. अकॅडेमिक क्षेत्रांत कार्य असल्याने कायदा काय आहे, कश्या साठी केला गेला आहे आणि त्याचा वापर कसा केला जाईल हे ह्याचा माझ्या परिवाराला first hand अनुभव आहे. पर्रीकरांना व्हिलन ठरविण्याचा माझा उद्धेश नाही उलट पर्रीकर सारखा विद्वान माणूस सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी हिंदू हिताचा बळी देऊ शकतो आणि त्यासाठी तुमच्या आमच्या सारख्यांच्या डोळ्यांत तेल घालून सरकारी कारभारावर लक्ष ठेवले पाहिजे असे माझे म्हणणे आहे. पर्रीकर ह्यांनी फक्त ख्रिस्ती शाळांचे अनुदान चालू ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो वरील मुद्यातून अगदी स्पष्ट आहे. सुमारे १३० ख्रिस्ती शाळांनी १० जून आधी माध्यम बदलले होते. एकूणच कायदा निर्माणात डायसोजेन सोसायटी ह्यांचा फार जवळचा सहभाग असल्याने त्यांनी व्यवस्थतीत गंगेत हात धुवून घेतले आहेत. १० जून आधी माध्यम बदलेल्या हिंदूचालीत शाळांची संख्या फार कमी आहे आणि त्यांना अनुदान प्राप्त होणार नाही. खरेतर सुमारे १२ खाजगी शाळांनी इंग्रजी पासून मराठी/कोंकणी माध्यम बदलले आहे. Certain हा एक अतिशय vague शब्द परिपत्रकांत वापरला गेला आहे. Certain ह्याचा अर्थ बिगर-अल्पसंख्यांक असा होत नाही. कायदा जेंव्हा पास होईल तेंव्हा कदाचित ह्या शब्दाचा नेमका अर्थ स्पष्ट केला जाईल पण मुद्दाम हुन हा ओपन एंडेड शब्द वापरला गेला आहे. कायद्यात certain ह्या शब्दाचा अर्थ MOI concept नोट मधील डेफिनिशन ने ठरवलं जाईल असे सर्वच (गोव्यांतील) कायदे पंडितात एकमत आहे. पान ८ वर A मध्ये तीन वर्गवारी दिल्या गेल्या आहेत. त्यातील i आणि ii म्हणजे मायनॉरिटी/certain आणि iii म्हणजे इतर (ज्यांत हिंदू इंग्रजी शाळा ज्यांनी माध्यम १० जून आधी बदलले होते) [ http://www.education.goa.gov.in/cir13/State%20Govt%20decision%20on%20MO… ] कायद्याची भाषा वेगळी असते. कायद्याचा भाषेंत "only minority" असा शब्द प्रयोग करण्याची गरज नाही कारण "मायनॉरिटी" ह्याचा अर्थ "only minority" असाच होतो.

In reply to by साहना

> minority/certain institutions in the State which were prior to 10th June, 2011 imparting Konkani/Marathi primary education ह्यांत मायनॉरिटी हा शब्द आपल्याला दिसत नाही का ?
दिसतोय ना. पण याचा अर्थ तुमच्या आधीच्या दाव्यानुसार 'मराठी शाळांचे अनुदान बंद करून १००% अनुदान ख्रिस्ती शाळांना दिले' असा होतो का? हा मुद्दा पुन्हा एकदा वाचा व त्यातील ठळक वाक्ये वाचा. minority/certain institutions in the State which were prior to 10th June, 2011 imparting Konkani/Marathi primary education, and have thereafter simultaneously shifted to English and started English Primary classes shall, vontinue to receive grants so as to give continuity to these schools and especially having regard to the fact the fact that the students in these schools should not suffer.
अकॅडेमिक क्षेत्रांत कार्य असल्याने कायदा काय आहे, कश्या साठी केला गेला आहे आणि त्याचा वापर कसा केला जाईल हे ह्याचा माझ्या परिवाराला first hand अनुभव आहे.
तुमचे एकंदरीत इंग्लिश भाषेचे अज्ञान, मनात भरलेला पराकोटीचा पूर्वग्रह व द्वेष आणि इथल्या बहुसंख्य प्रतिसादातून दिसणारी अत्यंत खालच्या पातळीची, असभ्य व शिवराळ भाषा यावरून तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात आहात यावर विश्वास ठेवणे अत्यंत अवघड आहे.
पर्रीकरांना व्हिलन ठरविण्याचा माझा उद्धेश नाही उलट पर्रीकर सारखा विद्वान माणूस सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी हिंदू हिताचा बळी देऊ शकतो आणि त्यासाठी तुमच्या आमच्या सारख्यांच्या डोळ्यांत तेल घालून सरकारी कारभारावर लक्ष ठेवले पाहिजे असे माझे म्हणणे आहे.
पर्रीकरांनी हिंदू हिताचा बळी दिलेला नाही. हा निष्कर्ष अत्यंत चुकीचा आहे.
पर्रीकर ह्यांनी फक्त ख्रिस्ती शाळांचे अनुदान चालू ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो वरील मुद्यातून अगदी स्पष्ट आहे.
पहिले ५-६ मुद्दे अजूनही समजलेले दिसत नाहीत. कोकणी/मराठी शाळांचे अनुदान सुरूच राहील, नवीन कोकणी/मराठी शाळांना प्रोत्साहन देऊन त्यांना अनुदान देण्यात येईल असे अगदी स्पष्ट व निसंदिग्ध शब्दात लिहिले आहे. तरीसुद्धा पर्रीकर यांनी फक्त ख्रिस्ती शाळांचे अनुदान सुरू ठेवले हा अत्यंत चुकीचा निष्कर्ष अजूनही कायम आहे.
१० जून आधी माध्यम बदलेल्या हिंदूचालीत शाळांची संख्या फार कमी आहे आणि त्यांना अनुदान प्राप्त होणार नाही.
असे परिपत्रकात कोठे लिहिले आहे?

In reply to by श्रीगुरुजी

हम्म, आता मला आपला गोंधळ समजला. मराठी/कोंकणी शाळा हे dont care टर्म आहे. म्हणजे ह्या शाळा संबंधित काहीही विशेष पोलिसी बदल पर्रीकरांनी किंवा आणखी कोणीही केलेला नाही. संपूर्ण वाद फक्त इंग्रजी प्राथमिक शाळांचाच आहे. थोडक्यांत सांगायचे झाले तर हि क्रमवारी आहे. ०. गोव्यांत कुठल्याही इंग्रजी प्राथमिक शाळेला अनुदान मिळत नव्हते. १. काँग्रेस सरकारने सर्व प्राथमिक इंग्रजी शाळांना सरकारी अनुदान जाहीर केले. २. सुमारे १३० आणि १०-२० हिंदू खाजगी शाळांनी माध्यम बदलून अनुदानाचा फायदा घेतला. ३. पर्रीकर सरकारनी इंग्रजी प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान ह्या पुढे मिळणार नाही असे जाहीर केले. ४. जुन १० पूर्वी ज्या अल्पसंख्यांक इंग्रजी शाळांना अनुदान मिळत होते त्यांना ते तसेच चालू राहील हे घोषित केले. ह्याचाच अर्थ ज्या १०-२० हिंदू इंग्रजी प्राथमिक शाळा होत्या त्यांना ते अनुदान मिळणे बंद झाले आहे. थोडक्यांत काय तर आज गोव्यांत सुमारे १३० ख्रिस्ती इंग्रजी माध्यमाच्या शाळा सरकारी अनुदानावर चालतात तर सरकारी अनुदानावर चालणाऱ्या हिंदू इंग्रजी शाळांची संख्या शून्य आहे. इंग्रजी प्राथमिक शिक्षण ह्या high growth मार्केट वर सरकारने चर्च ला मोनोपॉली प्रदान केली आहे.

In reply to by साहना

थोडक्यांत काय तर आज गोव्यांत सुमारे १३० ख्रिस्ती इंग्रजी माध्यमाच्या शाळा सरकारी अनुदानावर चालतात तर सरकारी अनुदानावर चालणाऱ्या हिंदू इंग्रजी शाळांची संख्या शून्य आहे. इंग्रजी प्राथमिक शिक्षण ह्या high growth मार्केट वर सरकारने चर्च ला मोनोपॉली प्रदान केली आहे.
Are you sure about this? कारण मला जितकी इंग्रजी समजते त्यात सर्टन मधे बिगर मायनोरिटी शाळा येतात. कोई नही. हातच्या काकणाला आरसा कशाला?DE माझ्या ऒफिसशेजारीच आहे. बघतेच विचारून.

चमत्कार हा शब्द फारच उदारपणे वापरला आहे असं म्हणता येईल. संघाने जे काही चांगलं काम केलेलं आहे तसं काम करणाऱ्या संस्था, संघटना जगभर गेल्या हजारो वर्षांत कित्येक झाल्या. हिंदू धर्मात जी वर्णव्यवस्था आहे त्याप्रमाणे जर कलियुगात झालेल्या चमत्कारांचं वर्गीकरण करायचं झालं तर संघ हा त्यामनाने क्षुद्र चमत्कार आहे. वरच्या जातीतले चमत्कार काही नोंदवतो. १. आधुनिक वैद्यक किंवा मॉ़डर्न मेडिसिन - पेनिसिलिनने कोट्यवधी जीव वाचवले. पोलियो, देवी, वगैरेंवरच्या लशींमुळे अब्जावधी आयुष्यं सुखी झाली. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान जितके लोक युद्धाने मारले तितकेच फ्लूच्या साथीने मेले. आता हे सगळं इतिहासात गेलं आहे. हा खरा उच्च जातीचा चमत्कार. २. लोकशाही - जगभर लोकशाहीचं वारं फिरतं आहे. शंभरेक वर्षांपूर्वी जवळपास आख्खं जग कुठल्या ना कुठल्या राजवटीखाली होतं. आता लोकं काय म्हणतात हे गंभीरपणे घेणाऱ्या राज्यव्यवस्थांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. अमर्त्य सेन यांनी म्हटलेलं होतं त्याप्रमाणे दुष्काळ आणि त्यातून होणारे मृत्यू हे लोकशाही व्यवस्थेत होत नाहीत - आणि त्याची प्रचिती दिसून येते आहे. हाही उच्च प्रतीचा चमत्कार आहे. त्याआधी गेल्या हजारो वर्षांत दुष्काळात लोकं मरणं हे जवळपास नैसर्गिक होतं. ३. शिक्षणाचा प्रसार - हजारो वर्षं अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेली सामान्य जनता आता ज्ञान घेऊ शकते आहे. शिक्षण हा मूलभूत अधिकार बनलेला आहे. जगातल्या साक्षरांचं प्रमाण दोनपाच टक्क्यांवरून नव्वद टक्क्यांच्या आसपास येतं आहे. याला म्हणतात चमत्कार. कारण तो अब्जावधी जीवनांवर सकारात्मक परिणाम करून जातो. ४. इंटरनेट/मोबाइल क्रांती - प्रत्यक्ष ज्ञान अगदी चुटकीसरशी हाताशी आलेलं आहे. त्याचबरोबर घडलेल्या मोबाईल क्रांतीमुळे जगाशी असलेला जोडलेपणा वाढलेला आहे. हा खरा चमत्कार आहे. ५. भारतीय घटना - नुसतं हिंदूंबाबतच बोलायचं तर हिंदू समाजातल्या ८० टक्के समाजाला दलित, महार, सोनार, चांभार वगैरे जातींच्या बंधनांतून बाहेर काढण्याचं काम भारतीय घटनेवर काम करून जे आंबेडकरांनी लेखणीच्या काही फटकाऱ्यांनी केलं, ते कितीही दंड फिरवून संघाला करता आलं नाही. त्या चमत्काराच्या मानाने संघाचा 'चमत्कार' हा क्षुद्रच आहे. तेव्हा चमत्कार नक्की कशाला म्हणायचं हे जरा तुलनेेनेच ठरवावं असं माझं मत आहे.

In reply to by राजेश घासकडवी

जे आंबेडकरांनी लेखणीच्या काही फटकाऱ्यांनी केलं, ते कितीही दंड फिरवून संघाला करता आलं नाही. दंडवत !

In reply to by श्रीगुरुजी

मिरच्या झोंबल्या का ? डॉ. आंबेडकरांचे कर्तूत्व जगभर गाजल्यावर संघाने आंबेडकर जयंतीचा गांजावाजा सुरु केला ना ? एकेकाळी बुद्धाला त्या धर्मातून या धर्मात ओढुन झालं .... आता बाबासाहेबाना 'त्या' संघातून 'या ' संघात ओढण्याची धडपड !

In reply to by राजेश घासकडवी

भारतीय घटनेवर काम करून जे आंबेडकरांनी लेखणीच्या काही फटकाऱ्यांनी केलं,
घटनेचे प्रारूप तयार केले ते सात सदस्यांच्या समितीने. समितीचे सदस्य होते अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के.एम. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मित्तल व डी.पी. खेतान. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद होते असाही उल्लेख दिसतो. सदस्यांची नावे गांधीजींनी सत्यनारायण सिन्हा यांच्यातर्फे सुचवली होती आणि बी एन राव यानी घटनेचा पहिला कच्चा मसूदा तयार केला होता अशीही माहिती मिळते. मग "ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिली" या चालीत घटना डॉ. आंबेडकरांनी लिहिली असे का म्हटले जाते? डॉ आंबेडकरांचे कार्य वादातीत आहे पण घटना तयार करण्याचे श्रेय बर्‍याच जणांचे मिळून आहे ना?

In reply to by पैसा

घटना तयार करण्याचे श्रेय बर्‍याच जणांचे मिळून आहे ना? असे लिहिणे म्हणजे प्रतिगामी आणि मनुवादी आहे. आम्ही पैसा ताईंचा निषेध करतो.

In reply to by पैसा

ते रामाने लंकेवर विजय मिळवला , या चालीत वाचावे. टीमवर्क असले तरी टीम त्यातल्या कुणाच्या तरी नावे ओळखली जाते , तसे. किंवा शास्त्रीय संगीताच्या भाषेत , एका थाटात भरपूर राग असतात . त्यापैकी एकाचे नाव थाटाला देतात , तसे.

In reply to by चंपाबाई

टीमवर्क असले तरी टीम त्यातल्या कुणाच्या तरी नावे ओळखली जाते , तसे. ओके. तर मग यापुढे कोणत्याही डु आयडीने उचापती केल्या तर त्या 'चंपाबाई' या आयडीच्या नावे ओळखल्या जाव्यात का ?

In reply to by श्रीगुरुजी

मूल आई व बाप दोघांचे असते... पण पूर्ण नाव म्हटले की बाबांचे नाव लागते , तसे. बाबा ! हे तरी पटले का ?

In reply to by चंपाबाई

माई मोड सुरु हो ग चंपूडी, अगं अगदी तुझा जन्म झाला तेव्हा आमचे हे आणि मी किती वेळ ठरवत होतो कि तुझे नाव काय बरे ठेवावे.... पण नाव काय ठेवायचे.. मुलीचे का मुलाचे.... तुझा तर काही अंदाजच लागत नव्हता.... पुन्हा पुन्हा पहिले तरी !! तसे आमचे हे जरा धांदरट होतेच म्हणा पण त्यांचे शब्द मात्र खरे ठरले हो, म्हणाले, नाव काहीही ठेवा, हे बालक नेहमी नाव बदलून जगात आग लावायचे धंदे करणार हे मात्र नक्की. मी काही फारसे लक्ष तेव्हा देऊ शकले नाही तेव्हा, मला माझ्याच दहाव्या डुआयडी चे डोहाळे लागले होते ...इश्श्य!!! माई मोड समाप्त हलके घेणे : सर्व वर्जिनल आयडी .... अजिबात हलके घेऊ नये :डुआयडी.... विशेष नोंद : मी कोणाचा ही डुआयडी नाही. मी गेली 6 वर्षे वाचनमात्र होतो आणि आत्ताच सदस्यत्व घेतले आहे. सबब माझ्या इकडील सदस्यत्व कार्यकालावरून कोणतेही तर्क व आरोप करू नयेत ही विनंती!

In reply to by तेजस आठवले

नाव आत्या ठेवते . म्हणजे तू माझी आत्या ! आत या !

In reply to by चंपाबाई

बाकी चंपेशा तुमची विचारसरणी काय का असेना, हजरजबाबी पणाला मात्र तोड नै. अशे कै लिहिता की हसलाच पैजे वाचणारा.

In reply to by चंपाबाई

हो, माई तुझी आत्या आणि माईंचे हे तुझे आत्तोबा

In reply to by चंपाबाई

आता मुलाच्या वडिलांचं आणि आईचं अशी दोघांचीही नावं लागतात. मुंबई विद्यापीठातल्या गुणपत्रकावर असं नाव गेली १५ वर्षे लिहिलं जातंय. बाकी विद्यापीठांमध्येही असंच असावं. जन्म प्रमाणपत्रावरही दोघांची नावं असतात.

In reply to by राजेश घासकडवी

अनेक बॅका आज दादा बाबा यांच्या नावाने ओळखल्या जातात. करोडोंच्या गैरव्यवहारात त्या अडकतात. हे आपल्यासमोर आहे. पण संघ स्वयंसेवकांच्या बँका कोणा एका व्यक्तिच्या नावाने ओळखल्या जात नाहीत. दुसरी गोष्ट खातेदारांचा पैसा लाटण्याच्या उद्देशाने त्या चालवल्या जात नाहीत. या स्वार्थी जगातले हे वेगळेपण आहे.
हिंदू धर्मात जी वर्णव्यवस्था आहे त्याप्रमाणे
वरच्या जातीतले चमत्कार
जातीपातींनी बरबटलेला हा आपला विचार. याचे मूळ नक्कीच माजवादात असणार. चमत्कार शब्द वापरताना तो का हे सविस्तर लिहीले आहे. तेवढे न वाचता चमत्कार शब्दावर इतकं लिहित बसलात. शब्दछळ करण्याचा माजवाद्यांचा आवडता छंद असतो. तो जोपासत रहा.

In reply to by नर्मदेतला गोटा

जातीपातींनी बरबटलेला हा आपला विचार. याचे मूळ नक्कीच माजवादात असणार.
नाही हो, हिंदुत्वावाद्यांना त्यांची भाषा समजेल म्हणून मी ती रूपकं वापरली. जात वगैरे शब्दांऐवजी प्रत दर्जा असे शब्द वापरले तरी माझ्या प्रतिसादात शष्पही फरक पडत नाही. बाकी संघाला जर तुम्ही चमत्कार म्हणत असाल तर आधुनिक वैद्यकाला 'अतिमहासुपरड्युपर चमत्कार' वगैरे काहीतरी म्हणावं लागेल. माझी तक्रार संघाच्या कार्याबद्दल नसून भोंगळ लेखनाबद्दल होती. जर लेखात अतिरेकी आणि पोकळ विधानं आली नसती तर लेख जास्त परिणामकारक झाला असता. हा फीडबॅक आहे, घ्यायचा तर घ्या, नाहीतर द्या सोडून.

In reply to by राजेश घासकडवी

शष्प फरक पडत नव्हता तर प्रत दर्जा वगैरे शब्द असणारी भाषा वापरायला कोणी आडकाठी केली नव्हती ना..? का तुम्ही सर्वमान्य भाषेबद्दल निवडक लोकांना सोयीस्कर सल्ले देता..?

In reply to by मोदक

शष्प फरक पडत नव्हता तर प्रत दर्जा वगैरे शब्द असणारी भाषा वापरायला कोणी आडकाठी केली नव्हती ना..?
आडकाठी? छे छे, वर म्हटल्याप्रमाणे हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतं, त्यांना जात, उच्चनीचता वगैरे गोष्टी चटकन समजतात म्हणून मुद्दामून ते शब्दप्रयोग केले होते.
का तुम्ही सर्वमान्य भाषेबद्दल निवडक लोकांना सोयीस्कर सल्ले देता..?
हो, पण निवडक नाही, सर्वच लोकांना देतो. असे सल्ले नको असतील तर मिपावर लेखन टाकू नये, किंवा लेखात खाली "कृपया टीका करू नये, माझ्या भावना दुखावतात" असं ठळक शब्दांत लिहावं.

In reply to by राजेश घासकडवी

हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतं हे पण वरवरचा अभ्यास करून बनवलेले मत की आणखी काही..? सर्वच लोकांना देतो. अरे व्वा.. सुधारणा आहे, अच्छे दिन आले मिपाकरांचे.

In reply to by मोदक

अहो काय चालवलंय हे? मी फक्त लेखकाला त्याच्या लेखनशैलीबद्दल सूचना केल्या. त्यांनी त्या घेतल्या असाव्यात, किंवा फाट्यावर मारल्या असाव्यात. विषय संपला. माझ्या लेखनशैलीबद्दल प्रश्न उभा केला तर मी त्याचं कारण सांगितलं. सोडून द्या ना...

In reply to by राजेश घासकडवी

हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतं, त्यांना जात, उच्चनीचता वगैरे गोष्टी चटकन समजतात हे तुमचे अभ्यासपूर्ण मत आहे की अभ्यास, अनुभव आणि आकलन नसतानाही केलेले बेजबाबदार विधान..?

In reply to by मोदक

अनुभव, पुरावे, अभ्यास इ. गोष्टी त्यांना विचारायच्या नसतात. उदा. हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतं, त्यांना जात, उच्चनीचता वगैरे गोष्टी चटकन समजतात किंवा सध्याची राजवट ही फॅसिस्ट राजवट आहे, ही त्यांची मते पुरावेबिरावे, अनुभव, अभ्यास वगैरे नसले तरी ठाम आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

http://www.firstpost.com/politics/modi-govt-is-not-fascist-prakash-kara… सध्याची राजवट फॅसिस्ट नाही असा निर्वाळा खुद्द "करात साहेबानी" दिला.कम्युनिस्टांकडून असे प्रमाणपत्र मिळणें म्हणजे शेळींनी वाघाला अहिंसक असल्याचे प्रमाणपत्र देण्यासारखे आहे. तेंव्हा गुरुजी तुम्ही आपले मत ताबडतोब मागे घ्या.

In reply to by राजेश घासकडवी

राजेश सर, अति उत्कृष्ट प्रतिसाद...!! श्रीगुरुजी यांनी सांगितलेल्या ज्या काही 6-7 संस्था आणि त्यांचे कार्य, एक वेळ मान्य करू पण या कार्य मधून drastically (कृपया मराठी शब्द सुचवा) समाजजीवनामध्ये काहीच बदल दिसत नाही. दिसतात ते फक्त एवढेच मुद्दे- 1) राम मंदिर 2) गो रक्षा 3) लव्ह झिहाद 4) विदेशी द्वेष 5) स्वदेशीचा घोष 7) अन्य धर्मीयांशी तुलना 8) प्रसंगानुरूप बदलणारे आदर्श व्यक्ती 9) पुरातन वैदिक पद्धतीचा गाजावाजा 10) आयुर्वेद आणि हर्बल-जैविक तेच उत्तम 11) आपत्ती निवारण 12) हिंदुत्ववाद दिलेली सूची प्रतिकात्मिक आहेत, पण एवढेच मुद्दे का प्रकर्षाने पुढे येतात. संघ इथे थोडा कमी पडतो असं नाही वाटत का ?

In reply to by विशुमित

1) राम मंदिर
श्रीराम मंदीर निव्वळ संघाचा नव्हे तर इतर अनेकांचा खूप जिव्हाळ्याचा मुद्दा आहे.
2) गो रक्षा
गोरक्षा किंवा गोवंशहत्याबंदीचा कायदा काही राज्यातून खूप पूर्वीपासून आहे. काही राज्यातून काँग्रेस सत्तेवर असतानाचा हा कायदा आलेला आहे.
3) लव्ह झिहाद
लव्ह जिहादच्या हा संघाचा एकमेव किंवा फक्त संघाचा मुद्दा नाही. अनेकांनी त्यावर लिहिले आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून होणारे धर्मांतर व धर्मांतरातून नंतर पुढे येणारी वेगळेपणाची भावना व नंतर कालांतराने तिथे जन्माला येणारा फुटिरतावाद हे निव्वळ भारतासाठी धोकादायक नसून जगात जिथे जिथे मुस्लिमांची संख्या वाढली तिथे तिथे हा धोका निर्माण होत आहे.
4) विदेशी द्वेष
विदेशी द्वेष म्हणजे नक्की काय?
5) स्वदेशीचा घोष
स्वदेशीचा घोष म्हणजे नक्की काय?
7) अन्य धर्मीयांशी तुलना
उदाहरणार्थ?
8) प्रसंगानुरूप बदलणारे आदर्श व्यक्ती
बदलणारे म्हणजे काल जे आदरणीय होते ते आज तिरस्करणीय आहेत व काल जे तिरस्करणीय होते ते आज आदरणीय आहेत असा अर्थ होतो का? दोन्ही प्रकारची काही उदाहरणे देता येतील का?
9) पुरातन वैदिक पद्धतीचा गाजावाजा
उदाहरणार्थ?
10) आयुर्वेद आणि हर्बल-जैविक तेच उत्तम
असे संघ कधी म्हणाला?
11) आपत्ती निवारण
हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतातील अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये संघ कार्यकर्त्यांनी स्वतःहून मदतकार्यात सह्भाग घेतला आहे. संघाची ओळख जर आपती निवारण कार्यात सहभागी होणारी संस्थ असा होत असेल तर ती अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
12) हिंदुत्ववाद
संघ मुळातच हिंदूंसाठी स्थापन झालेला आहे. जसं कॉग्रेसची ओळख फक्त भ्रष्टाचार, गुन्हेगारी, जातीयवाद, देशद्रोहीपणा, अतिरेक्यांचे समर्थन इ. वरून होते तसेच संघाची ओळख हिंदुत्ववादावरून होत असेल तर ती अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

चमत्कार हा शब्द फारच उदारपणे वापरला आहे असं म्हणता येईल. संघाने जे काही चांगलं काम केलेलं आहे तसं काम करणाऱ्या संस्था, संघटना जगभर गेल्या हजारो वर्षांत कित्येक झाल्या. हिंदू धर्मात जी वर्णव्यवस्था आहे त्याप्रमाणे जर कलियुगात झालेल्या चमत्कारांचं वर्गीकरण करायचं झालं तर संघ हा त्यामनाने क्षुद्र चमत्कार आहे. वरच्या जातीतले चमत्कार काही नोंदवतो. १. आधुनिक वैद्यक किंवा मॉ़डर्न मेडिसिन - पेनिसिलिनने कोट्यवधी जीव वाचवले. पोलियो, देवी, वगैरेंवरच्या लशींमुळे अब्जावधी आयुष्यं सुखी झाली. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान जितके लोक युद्धाने मारले तितकेच फ्लूच्या साथीने मेले. आता हे सगळं इतिहासात गेलं आहे. हा खरा उच्च जातीचा चमत्कार. २. लोकशाही - जगभर लोकशाहीचं वारं फिरतं आहे. शंभरेक वर्षांपूर्वी जवळपास आख्खं जग कुठल्या ना कुठल्या राजवटीखाली होतं. आता लोकं काय म्हणतात हे गंभीरपणे घेणाऱ्या राज्यव्यवस्थांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. अमर्त्य सेन यांनी म्हटलेलं होतं त्याप्रमाणे दुष्काळ आणि त्यातून होणारे मृत्यू हे लोकशाही व्यवस्थेत होत नाहीत - आणि त्याची प्रचिती दिसून येते आहे. हाही उच्च प्रतीचा चमत्कार आहे. त्याआधी गेल्या हजारो वर्षांत दुष्काळात लोकं मरणं हे जवळपास नैसर्गिक होतं. ३. शिक्षणाचा प्रसार - हजारो वर्षं अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेली सामान्य जनता आता ज्ञान घेऊ शकते आहे. शिक्षण हा मूलभूत अधिकार बनलेला आहे. जगातल्या साक्षरांचं प्रमाण दोनपाच टक्क्यांवरून नव्वद टक्क्यांच्या आसपास येतं आहे. याला म्हणतात चमत्कार. कारण तो अब्जावधी जीवनांवर सकारात्मक परिणाम करून जातो. ४. इंटरनेट/मोबाइल क्रांती - प्रत्यक्ष ज्ञान अगदी चुटकीसरशी हाताशी आलेलं आहे. त्याचबरोबर घडलेल्या मोबाईल क्रांतीमुळे जगाशी असलेला जोडलेपणा वाढलेला आहे. हा खरा चमत्कार आहे. ५. भारतीय घटना - नुसतं हिंदूंबाबतच बोलायचं तर हिंदू समाजातल्या ८० टक्के समाजाला दलित, महार, सोनार, चांभार वगैरे जातींच्या बंधनांतून बाहेर काढण्याचं काम भारतीय घटनेवर काम करून जे आंबेडकरांनी लेखणीच्या काही फटकाऱ्यांनी केलं, ते कितीही दंड फिरवून संघाला करता आलं नाही. त्या चमत्काराच्या मानाने संघाचा 'चमत्कार' हा क्षुद्रच आहे. तेव्हा चमत्कार नक्की कशाला म्हणायचं हे जरा तुलनेेनेच ठरवावं असं माझं मत आहे.

In reply to by राजेश घासकडवी

संघाने काहीतरी चांगली कामं केली हे तरी मान्य करताय. फक्त त्या तसं काम करणाऱ्या कित्येक संस्थांपैकी काही विदा दिल्यात तर आमच्या ज्ञानात भर पडेल. बाकी जी तुलना केलीये ते सफरचंद आणि मोसंबी यांची तुलना करण्यासारखे आहे.

In reply to by ट्रेड मार्क

अहो संघाने चांगली कामं केली आहेतच. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत 'राष्ट्रवाद, देशाभिमान' वगैरे गुण चांगलेच असतात. अन्नात मीठ असावं तसं. त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. मी चमत्कार कशाला म्हणावं याबद्दल बोलत होतो. मी दिलेली उदाहरणं (शेवटचं भारतीय घटनेचं सोडलं तर) जगातल्या अब्जावधी व्यक्तींचं आयुष्य सुधरून गेलेलं आहे. भारतीय घटनेचाही चांगला परिणाम अब्ज लोकांवर झालेला आहे. आधुनिक वैद्यक ठाउक नाही अशी व्यक्ती जगात विरळा. संघ ठाउक आहे अशा जगात किती व्यक्ती आहेत?
बाकी जी तुलना केलीये ते सफरचंद आणि मोसंबी यांची तुलना करण्यासारखे आहे.
सफरचंद आणि मोसंबी नाही, मी कलिंगड आणि चणियामणिया बोरं अशी तुलना करून दाखवत होतो. दोन्ही फळंच आहेत, पण वजनांमध्ये केवढा प्रचंड फरक आहे बघा ना! जर कोणी त्या क्षुद्र बोरांना 'महाप्रचंड फळ' म्हणायला लागलं तर हसायला येणारच. या लेखात जो चमत्कार शब्द वापरला आहे त्याबद्दलच तक्रार आहे. 'बघा बघा चमत्कार, करा इथे नमस्कार' या म्हणण्यापलिकडे लेखात काहीही नाही. जर संघाने केलेल्या मर्यादित का होईना, पण कामांचा व्यवस्थित आढावा घेतला असता तर निदान काहीतरी नवीन काहीतरी शिकायला मिळालं असतं. 'शिक्षणक्षेत्रही संघाने काबीज केलेलं आहे' यासारखी उथळ विधानं दिसतात. अहो, भारतातली ८०-९० टक्के पोरं सरकारी शाळांमधून शिकतात. उरलेल्या १०-२० टक्क्यातला कुठचातरी अर्धापाव टक्का मिळवल्यावर त्याला 'काबीज करणं' म्हणायचं?

In reply to by राजेश घासकडवी

हे चमत्कार वगैरे पध्धतीचे लेख हि एका प्रकारे 'सेल्फआरती ' किंवा आरशासमोर उभे राहून आरती असते. माझे वैयक्तिक मत .

In reply to by A.N.Bapat

५. भारतीय घटना - नुसतं हिंदूंबाबतच बोलायचं तर हिंदू समाजातल्या ८० टक्के समाजाला दलित, महार, सोनार, चांभार वगैरे जातींच्या बंधनांतून बाहेर काढण्याचं काम भारतीय घटनेवर काम करून जे आंबेडकरांनी लेखणीच्या काही फटकाऱ्यांनी केलं, ते कितीही दंड फिरवून संघाला करता आलं नाही. त्या चमत्काराच्या मानाने संघाचा 'चमत्कार' हा क्षुद्रच आहे. हे विधान अशा प्रचारकी थाटाचा उत्तम नमुना आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पेशव्याना बाबा गटाचा प्रचार कसा आवडेल ? १८१८ चा स्तंभ आठवत असेल.

In reply to by राजेश घासकडवी

आम्बेडकरानी लेखणिच्या एक फटकार्यात ८० टक्के हिन्दु समाजाला जातीच्या बन्धनातुन बहेर काढलेले मला तरी कोठेहि दिसलेले नाही. म्हणजे त्यान्च्या लेखणीचा फटका फक्त घटनेच्या पानावरच अद्याप आहे. अजून मराठा समाज आरक्शण मागत आहे आणि इतर समाजहि हेच करत आहेत याचा अर्थ असा की देशातला जातिद्वेश दुर्दैवाने अजुन कायम आहे व त्यावर अनेक क्रुश्णकारस्थानी नेते जीवन जगत आहेत.

In reply to by दिगोचि

डॉ. आंबेडकरांच्या तथाकथित अनुयायांनी त्यांचे पुतळे उभे केले आणि त्यांना घटनेच्या पुस्तकात बंदिस्त करून ठेवले आहे. कारण त्यांचे विचार इथल्या सारखे सगळीकडे पिंक टाकण्यासाठीच वापरले. ते विचार अमलात आणले तर यांची दुकाने बंद होतील ना. डॉ आंबेडकर आता फक्त "जप आणि पूजा करण्यापुरते" उरले आहेत.

In reply to by सुबोध खरे

हो ना ! म्हणुनच तर रा. स्व. संघ बाबासाहेब ( तसेच गांधीजी ) यांचे फोटो पूजतो , पण आचरण मात्र शून्य

In reply to by चंपाबाई

आणि तुम्ही औरंगजेब, अब्दाली,मुल्ला ओमर, ओसामा बिन लादेन यांची पूजा करता आणि आचरण शून्य

In reply to by राजेश घासकडवी

तुम्ही सांगितलेले मुद्दे चमत्कार आहेत होय. आम्हाला आपलं वाटायचं विज्ञान म्हणतात ते हेच. आधुनिक वैद्यकशास्त्र, मोबाईल क्रांती चमत्कार म्हणायचे तर. शिक्षणाच्या प्रसारासाठी असंख्य लोकांनी घेतलेले कष्ट कुचकामी असून फक्त चमत्काराने हे साध्य झाले. बाबासाहेबांना दैवी साक्षात्कार होऊन त्यांनी भारतीय घटना लिहिली म्हणायचं की. सगळं चमत्कारिकच आहे म्हणायचं!

In reply to by ट्रेड मार्क

अहो, तुम्ही कशाला मध्ये पडता? मी लेखकाने ज्या अर्थाने 'चमत्कार' हा शब्द वापरला होता त्याच अर्थाने बोलत होतो. संघाची स्थापना दैवी साक्षात्काराने झाली असं लेखकाचंही म्हणणं नाही. काहीतरी प्रभावी, परिणामकारक या अर्थाने त्यांनी तो शब्द वापरला आहे. तुम्ही माझ्या प्रतिसादाला एक निकष आणि त्यांच्या लेखाला वेगळा निकष असं करून स्वतःचं अज्ञान का उघड करता? सोडून द्या. मी लेखकाला भाषेबद्दल फीडबॅक दिला. त्यांनी तो मान्य करायचा की नाही याबद्दल काहीतरी ठरवलं असणारच. तिथेच विषय संपला. तुम्ही मला बोलण्याऐवजी लेखकालाच का विचारत नाही माझा मुद्दा पटला की नाही ते? मला काही या चर्चेत फार रस नाही. मी पुढच्या कामाकडे वळलेलो आहे. तुम्हीपण काहीतरी सकारात्मक करा. काय म्हणता?

In reply to by राजेश घासकडवी

लेखक सोडून दुसऱ्या कोणी मध्ये बोलू नये असा नियम आहे का? एकमेकांशी बोलायचं असेल तर व्यनी करून बोला. मी कुठे वेगळा निकष वापरतोय. माझ्या मते लेखकाने चमत्कार हा शब्द या अर्थी वापरलाय की लाखो लोक गेली ९० वर्षे स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. त्यांना कोणी पगार देत नाही किंवा अजून कसले "फायदे" नाहीत. तरी इतके लोक संघाबरोबर आहेत आणि अजूनही त्यात वाढ होते आहे. याचा आधुनिक वैद्यकीशी काय संबंध? किंवा तुम्ही उल्लेखलेल्या इतर गोष्टींशी काय संबंध? जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या अश्या संस्थेबरोबर तुलना केली तर ते योग्य ठरले असते. मी कशाला लेखकाला विचारू तुमचा मुद्दा पटला का नाही ते, पण लेखकाने उत्तर सुद्धा दिलं नाही म्हणजे.... समजायला तुम्ही सुज्ञ आहातच. बाकी सकारात्मक करण्याच्या सल्ल्याबाबत धन्यवाद. पण असे सल्ले आणि अश्या लेखांवर मतप्रदर्शन करून उगाच वेळ वाया घालवू नका. का तुम्हाला हेच करणं सकारात्मक वाटतंय?

In reply to by राजेश घासकडवी

राजेश जी, तुमच्या प्रतिक्रियेची प्रतिउत्तर चुकून तुमच्या प्रतिसादाच्या वरती गेले आहे. कृपया नोंद घ्यावी.

बाकी काही लोकांचा संघावर इतका राग का आहे तेच कळत नाही. MIM, झकीर नाईकांच्या वा तत्सम संस्थांसारखे ते लोक प्रचार/ भाषणे करत नाहीत. ते ख्रिस्ती मिशनऱ्यांसारखे चमत्कार दाखवून आजार बरे करत नाहीत. ते कोणाला आग्रह करून, भुलवून, अमिष दाखवून, बळाच्या जोरावर संघात सामील करून घेत नाहीत. ते कोणाकडून पैसे मागत नाहीत. बरं ते शाखेत करतात काय तर त्यांचे कार्यक्रम म्हणजे प्रार्थना, खेळ, बैठका ई असतात. त्यांचे विचार ऐकावे आणि आचरणात आणावे असाही त्यांचा आग्रह नसतो. हे स्वयंसेवक संघटितपणाच्या जोरावर गुंडगिरी करत नाहीत, मुलींची छेड काढत नाहीत. एवढी चेष्टा होते तरी कोणी हाणामारी केल्याची, दंगल केल्याची उदाहरणे नाहीत. याउपर, देशांतर्गत नैसर्गिक संकटकाळात हे स्वयंसेवक मदतीला धावून जातात. संकटातील लोकांना त्यांची जात, धर्म न विचारता मदत करतात. त्यांना त्याचे कोणी पैसे देत नाहीत... पगार जाऊद्या पण जायचा, यायचा आणि तिथला खर्च पण कोणी देत नाही. बाकी वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे ते आसपास असतात पण आहेत असं कळत नाही. तरी एखादा खाकी चड्डीवाला दिसला की चेष्टा होतेच. हातात दंड (काठी) बघितली तरी चेष्टा होते. बरं नुसतीच चेष्टा नाही तर लोक रागराग पण करतात. काय कारण आहे याचे?

In reply to by ट्रेड मार्क

ट्रेड मार्क, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अत्यंत सोपं आहे. जोवर संघाचे लोकं समोरच्याच्या कानफडात भडकावत नाहीत तोपर्यंत त्यांची टिंगल, टवाळी, रागराग, द्वेष, मत्सर सगळं छानपैकी होणारंच. काळ्या दगडावरची रेघ आहे ही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कानफटात वगैरे मारण्याची फक्त भाषा ह्यांना जमते. वेळ येते तेंव्हा ह्यांची खाकी चड्डी पिवळी होते. "तो मी नव्हेच हो" किंवा "मी सरकारी नोकरी वाला माणूस" अश्या प्रकारचे सोंग पांघरून संघवाले पोबारा करतात. ह्यांची मर्दमुखी फक्त बौद्धिक वर्गांत लहान मुलांच्या पुढे. बौद्धिकांत "आम्ही बाबरी मशीद पाडली" पण सार्वजनिक रित्या "कुणी पडली ठाऊक नाही आमचा उद्धेश फक्त अहिंसात्मक प्रदर्शन करण्याचा होता. पण ती पडली हि दुःखद घटना आहे." असली भाषा. चार भिंतींच्या मागे "२००२ गुजरात मध्ये मुसलमानांना आम्ही धडा शिकवला" पब्लिक मध्ये "दंग्यांत आमचा काहीही सहभाग नव्हता आम्ही आपले अल्लाह घराची गाय". मैदानात "भारत माता कि जय ... " नंतर फोन वर "अमेरिकन सिटीझनशिप मिळाली हो आमच्या सिद्धेशला... " बौद्धिकांत "मुसलमान लोक एक नंबरचे नालायक असतात" पब्लिक मध्ये "मुसलमान ख्रिस्ती सगळे लोक हिंदूच आहेत." बौद्धिकांत "इस्लाम हा भयानक धर्म आहे" पब्लिक मध्ये "इस्लाम शांततेची शिकवण देतो" थोड्क्यात काय तर वैचारिक दिवाळखोरी आणि स्वतः बद्दल असलेली grandiose delusions आणि त्याचा भंग झाला कि लोकांचा कानफटात मारण्याची "फक्त भाषा".

In reply to by साहना

तुम्हाला असं म्हणायचंय की इतर शांती आणि सलोखा पसरवणाऱ्या "अल्पसंख्यांका"प्रमाणे संघिंनी पण काठ्या टाकून शस्त्र हातात घेतली पाहिजेत. जरा कोणी खाकी चड्डीपासून ते हिंदू, हिंदुत्व, भारत याविरुद्ध बोलला की कापून टाकायला पाहिजे. हिंदूंची देवळे सोडून बाकी सगळी प्रार्थनास्थळे नेस्तनाबूत केली पाहिजेत ई ई ना? पण जर का ते नुसतंच बोलतात तर तुम्हाला एवढा राग का त्यांचा? त्यांच्या असण्यानसण्याने जर काही फरक पडत नाही तर मग करू दे त्यांना काय करायचं ते. तुम्ही द्या सोडून.

In reply to by ट्रेड मार्क

अच्छा म्हणजे ते पोपटपंची, मखलाशी वगैरे करतात हे आपल्याला मान्य आहे अन त्यातच संघाचं दिव्यत्व वगैरे आहे असं आपण मानता का?

In reply to by फेदरवेट साहेब

अच्छा म्हणजे ते पोपटपंची, मखलाशी वगैरे करतात हे आपल्याला मान्य आहे अन त्यातच संघाचं दिव्यत्व वगैरे आहे असं आपण मानता का?
ऑ.. मी कुठे असं म्हणलंय? ते जे बोलतात ते तुम्हाला पोपटपंची, मखलाशी वाटत असेल तर मी करणार? प्रत्येकाची विचार करण्याची/ समजण्याची कुवत वेगवेगळी असते. काहींना रागा, दिग्गु, झाना, ओवेसी यांचे बोलणे प्रचंड आवडते. मुद्दा हा आहे की जर संघी फक्त बोलतात, मग ते तुम्हाला वाटते तसे पोपटपंची, मखलाशी असो, त्याने तुम्हाला काय फरक पडतो?

In reply to by साहना

मैदानात "भारत माता कि जय ... " नंतर फोन वर "अमेरिकन सिटीझनशिप मिळाली हो आमच्या सिद्धेशला... "
आयशपथ काय निरीक्षण आहे हे, एक नंबर, खल्लास _/\_

In reply to by फेदरवेट साहेब

संघाचे चांगले काम एकतर तुम्ही पाहिलेच नाही किंवा तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष करायचे आहे असे दिसतेय. मी संघ अगदी जवळून पाहिलेय. मला स्वतःला संघ तेव्हढा पटत नसला तरी आज भारतात असलेल्या समस्यांपैकी काही समस्यांवर संघ काम करत आहे यात वाद नाही. त्यामुळे तुम्हाला संघ लहान वाटत असेल तर तुम्ही एकातर फारच मोठे आहात किंवा फारच छोटे आहात.

In reply to by फेदरवेट साहेब

सन्घाविरूद्ध किती जळजळ काही वाइट नाही परदेशी जाणे• उच्चवर्णियानी जरूर जावे सुखात रहावे हिन्दू धर्म वाढवावा इथे पैसा पाठवावा

In reply to by साहना

कानफटात वगैरे मारण्याची फक्त भाषा ह्यांना जमते. वेळ येते तेंव्हा ह्यांची खाकी चड्डी पिवळी होते. ...
संघ विरोधकांना कधीही संघाशी वैचारिक पातळीवर मुकाबला करता आला नाही. संघाची विचारसरणी व तत्वज्ञान त्यांना कधीही वैचारिक युक्तीवाद करून खोडता आले नाही. संघाचे विचार चुकीचे आहेत हे कधीही त्यांना व योग्य विचार कोणता हे त्यांना कधीही वैचारिक पातळीवर करता आलेले नाही. यांना फक्त संघाचा द्वेष करता आला. त्यामुळेच संघावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे एवढेच त्यांना जमते.